Skip to main content

प्रलायानंतरची प्रार्थना

बुधवार, 24/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
चार भिंतींच्या आत माझ्या शब्दांचा मार ती निशब्दतेने सहन करत होती. प्रत्येक शब्दाच्या प्रहाराने तिच्या अखंड तपश्चर्येचा बांध फुटतो की काय?? त्या चार भिंतींच्या पोकळी मध्ये आभाळ दाटून आलेलं मला साफ जाणवत होतं. अशा वातावरणामध्ये माझ्या शाब्दिक विजेचा ताल बेताल झाल्यावर क्षणात वादळी बरसात होणार. अवकाशाच्या कुरुक्षेत्री जेव्हा समोरचा (प्रकाश) अस्तित्वाची लढाई हरू लागतो तेव्हा माझ्या आत्मकेंद्रित मनाच्या कोपर्‍यामध्ये लपलेला अहमभाव स्वतहाचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी तिच्या जाणिवेच्या वास्तूला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो. या वास्तूमध्ये अंधाराची शिंपडणी करत तिच्या तेजोमय अस्तित्वाला नष्ट करण्याचा जीवघेणा प्रयत्न मी करत होतो. एकीकडे स्वत:भोवती असंबद्ध तांडवामध्ये मग्न मी आणि दुसरीकडे माझ्या शब्दांमुळे गर्भगळीत झालेली ती. माझ्या दुधारी शब्दांच्या आघाताने तिच्या अतिसूक्ष्म मनावर संवेदनशील जखमा होत होत्या. प्रत्येक जखमेतून स्त्रवणारी अतिसंवेदनशील आठवण तिच्या तपश्चर्येचा बांध आणखीन कमकुवत करण्यासाठी हातभार लावत होती. समोर चाललेला पडझडीचा खेळ पाहताना विकृती नेमकी फेर धरून नाचू लागते. मग सबंध वातावरण एका विचित्र मंत्राघोषाने भरून जाते. मघाशी, वादळी बरसातीला कारणीभूत ठरलेली बेताल वीज माझ्या रक्तामध्ये मिसळून मेंदुमधील कटू वाटांच्या सहाय्याने मुखाद्वारे बाहेर पडते ती अधिक तीव्र होवूनच, ब्रम्हस्त्राप्रमाणे. आता यास परतीचा मार्ग नाही. विनाशाचे भाग्य असलेला हा प्रलयास कारणीभूत ठरणार हे वास्तव. त्याचा परिणाम मला वातावरणामध्ये जाणवत होता. विचारांच्या वार्‍याचा वेग अचानक वाढला आणि या वावटळीमध्ये समोरचा औदुंबर मुळासकट उन्मळून पडला.त्याच्या आदिम मुळांनी घट्ट धरून ठेवलेल्या मातीची धूळ सार्‍या आसमंतामध्ये भरून गेली. आणि अचानक माझी नजर तिच्या डोळ्यांवर स्थिर झाली. माझ्या खवळलेल्या समुद्राला तिच्या अश्रूंचा किनारा पुरेसा होता. आसमंत व्यापून टाकणारी ती आदिम धूळ स्थिरावली ती थेट माझ्या त्वचेवर. त्या धुळीने माझ्या पेशीपेशीना झाकून टाकले. अंधाराला ग्रहण लागावे त्या प्रमाणे संपूर्ण खोली प्रकाशाने भरून गेली. माझ्या अहमतेचा बुरूज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्या चार भिंतीच्या आतमध्ये तिच्या आणि माझ्यामधील अंतर वाढत चालले होते. हे वेळीच थोपवण्यासाठी मी वेगाने तिच्या दिशेने धाव घेतली. मघाशी उन्मळून पडलेल्या औदुंबरच्या मुळावर पुरातन काळामधील वेदनेच्या खुणा मला स्पष्ट दिसत होत्या. मुळावर घाव घालणे चुकीचेच. कणखर प्रहरांनी न तुटलेला तपश्चर्येचा बांध माझ्या नाजुक स्पर्शाने मात्र क्षणार्धात फुटला. त्या नंतर येणारा भावनांचा आवेग थोपवण्याकरिता मी तिला कवेत घेतले. तिथे माझी सावरण्याची असमर्थ धडपड. माझ्या अस्तित्वाला कारणीभूत ती माझ्या अस्तित्वासाठी झगडणारी ती माझ्या अस्तित्वासाठी कष्टणारी ती माझ्या अस्तित्वासाठी तपश्चर्यामग्न ती आदिमकाळात तुटलेली नाळ आज पुन्हा जोडली गेली. मनाचा मनाशी संवाद झाला अश्रुंद्वारे. हे ईश्वरा, माझ्या प्रार्थनेची सुरुवात तिच्या शब्दांनी व्हावी. माझ्या रौद्ररूपी अहमभावाचा शक्तिपात होवून सतत तिच्या चरणाशी लोळण घेण्याचे सामर्थ्य तू मला दे. त्या मातृत्वरूपी तेजचा अंश असलेल्या मला त्या तेजसामर्थ्याकडे झुकल्या नजरेने का होईना मात्र पाहण्याचे सामर्थ्य मला दे. ही प्रार्थना.
लेखनविषय:

वाचने 14934
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

काय आहे हे?

In reply to by मनिम्याऊ

नाय गो मनिम्याऊ हे तुझ्यासाठी नाई...

मराठीतील बरेच शब्द माहित आहेत हो तुम्हाला. शेवटी 'क्रमशः' टाकले असते तर पुढच्या धाग्यात अजून ५०० ते ६०० शब्दांना वाट ढसाढसा मोकळी करून देता आली असती.

In reply to by सस्नेह

तुम्ही तिघांनी हे सगळे नक्की वाचले आहे का..? खर्रं खर्रं सांगा. एका वाक्यात उत्तरे द्या टाईप प्रश्न विचारेन मी. ;-)

In reply to by स्पा

हाट रे घाबरवतो काय स्पा ला..रक्तपिसासू थेयरपी आहे का ओ तुमच्याकडे????

In reply to by गोरा सौमित्र

तुमच्या सारख्या अगाध लिहिणाऱ्या जेष्ठ माणसापुढे आम्ही लहानच हो .. अगदीच तान्हुले .. काहीच समजले नाही आम्हास -- पिवळे गोमुत्र

In reply to by स्पा

स्पावड्या अन लहान?????? त्येची तर आख्खी टीम हाय म्हणं. भल्लीभल्ली माणसे आम्ही टीममध्ये आहे ते अभिमानाने मिरवतेत आणि त्या टीमचा कर्णधार लहान होय? मग त्यापुढे आम्ही तर काय? . .हिरवे जनित्र (फक्त किर्लोस्कराचेच)

प्रायोगिक नाटकातील पात्रे किंवा पुराण्/इतिहास कालावर आधारित आर्ट फिल्मवाल्यांची पात्रे मोठे परिच्छेद बोलून जो माहौल बनवतात, तोच बनवायचा उद्देश असेल तर सफल झाला आहे.

एकसमयावच्छेदेकरून मशारनिल्हे सौमित्र यांचा "जैसे भडबुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात जाहला" तद्वत शब्दच्छल पाहोन डोळियांचे लोणार सरोवर जाहले असोन ऐसियास उतारा म्हणोन बुधवारात द्विपञ्चाशत-कोष्ठात जावयाचे योजिले आहे.

In reply to by बॅटमॅन

ते मशारनिल्हे आहे होय. मला कायमच ते मल्हारनिशे अस वाटत आलय. म्हणजे मल्हाराच्या निशेने, इचिभैनं पोपट झाला म्हणायचा !

आदिम धूळ स्थिरावली ती थेट माझ्या त्वचेवर बापरे मनाच्या कोपर्‍यामध्ये लपलेला अहमभाव स्वतहाचा मोठेपणा 'स्वतहा' ह नवा शब्द मिळाला मराठीला अहमभावाचा आणखी एक नवा शब्द त्या धुळीने माझ्या पेशीपेशीना झाकून टाकले म्हणजे काय ? बा द वे भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा अर्थ आज कळाला.

In reply to by आशु जोग

:))

In reply to by आशु जोग

@भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा अर्थ आज कळाला. तुम्ही 'फ' तुकडे मध्ये होता वाटत...

In reply to by गोरा सौमित्र

'फ' तुकडे म्हणजे ? बा द वे गोरा सौमित्र म्हणजे तुम्ही मराठी चित्रपटातला कवी सौमित्र का ?

In reply to by आशु जोग

गोरा सौमित्र म्हणजे तुम्ही मराठी चित्रपटातला कवी सौमित्र का ? नसावे बहुतेक. ते सौमित्र पक्क्या रंगाचे आहेत.

लेख वाचून हृदय पिळवटून निघाले…. उत्तराखंडनंतर व तितक्याच क्षमतेचा परंतु शब्दाचा महाप्रलय मनामध्ये उसळला …. मगजामध्ये विचारांचा आगडोंब उसळला …. मनावरचा असलेला ताबा सुटून आज आश्रुंचा बांध फुटला…. "गोरा" तुझ्या चरण स्पर्शाने हि भूमी पवित्र झाली …. तुमचे असे ज्ञानाने ओतप्रोत झालेले लेख आमच्या सारख्या क्षुद्र मानवास वाचावयास मिळणे हे आमचे परमभाग्य …अश्रू वेचण्यास कोणीतरी टोवेल द्या रे

In reply to by देवांग

अश्रू वेचण्यास कोणीतरी टोवेल द्या रे
अश्रू वेचायचे आहेत? मोत्ये झाली की काय त्यांची? असेल तर तुम्ही आहात तिथे थांबा, मी आलोच टोपल्या-बॅगा-ट्रक इ. घेऊन.

आता मुद्द्याचं काय ते बोला. अवांतरः जे काहि टंकलय... वाचायला लय भारी वाटतय :) अर्धवटराव

काय भयंकर लिहीलय सगळं!,,
अवकाशाच्या कुरुक्षेत्री जेव्हा समोरचा (प्रकाश) अस्तित्वाची लढाई हरू लागतो
समोरचा प्रकाश हरला तर हरला तुम्ही का इतकं मनाला लाउन घेतलंय?.

संपादक काही अर्थ असेल तर हा धागा ठेवा. अन्यथा केवळ मजा पहायला लोक हे धागे टाकतात असा अंदाज आहे.

In reply to by आशु जोग

चिरागा करके दिल बहला रहे हो दुनियावालो अंधेरा चाहे कितना भी रोशन हो जाये उजाला तो उजाला है !!!!! हे तरी कळलं का??????

In reply to by गोरा सौमित्र

नाही. कॅप्टन स्पावड्याला कळाले असेल तर (आमच्यासारख्या) गोरगरीब रयतेला कळेल.

माझ्या दुधारी शब्दांच्या आघाताने तिच्या अतिसूक्ष्म मनावर संवेदनशील जखमा होत होत्या.
म्हणजे काय? बाकी लेखाचा शब्दबंबाळपणा दोनच ओळीत आटोपणारा शेर आठवला. (कदाचित मुनावर राणांचा आहे.) "वो कुछ इस तरह मेरे गुनाह धो देती है, माँ जब गुस्से में होती हैं तो रो देती हैं !"

In reply to by चिगो

मुनावर राणांनी 2 ओळीत सांगितलं आणि 100.. फरक एवढाच.. अर्थ तुम्हाला कळाला आहे.. :) "वो कुछ इस तरह मेरे गुनाह धो देती है, माँ जब गुस्से में होती हैं तो रो देती हैं !" उत्तम!!!!!

स्फुट लेखन म्हणजे काय हे बहुधा हल्ली मराठी वाचकच विसरले आहेत तिथे मराठी आंतरजालावर तेवढी समज कुठून सापडणार? हरवू पाहणार्‍या वाटेवरचा हा प्रयत्न नक्कीच आवडला.

In reply to by रमताराम

खरोखरच कळलं नाही हो. पृथ्वीला उद्द्येशून आहे की काय असं वाटलं एकदा... पण.. :( त्यातून स्पा घाबल्ल्यावर मीपण घाबल्ले आणि अर्थ शोधणं सोडून दिलं! ;)

In reply to by रमताराम

पण वाट हरवू लागलेली आहे वगैरे असे काही नाही. पुण्यात असाल तर समीप रंगमंच वगैरे चळ्वळ कुठे सुरु आहे ह्याचा शोध घेतला तर ह्या वाटेवरचे प्रयत्न दिसतील. ह्या वआटा तशाही कधीच मेनस्ट्रीमवर दीर्घ काळ आरुढ नव्हत्या. तुटक तुटक लेखाला तुम्ही स्फुट म्हणताय ते मान्यच आहे. पण सहसा अशी स्फुट लिखाणं पात्रांच्या तोडी स्वगत म्हणून तरी येतात किंवा निवेदक मह्णून तरी. (काही उदहरणे पाहिली आहेत, विविध स्फुट जशास तसे कॉपी पेस्ट करुन त्या लेखकाने स्वतःच्याच नाटकात वापरलेले.) निनित चंदरकांत देसाई ह्यांच्या एका मुलाकह्तीतही त्याचा उल्लेख होता. "बहरत एक खोज " च्या वेळेस ते तुलनीन नवीन होते. तेव्हाचा तो किस्सा आहे. एक प्रभावी पॅरा श्याम बेनेगलांच्या हाती लगला आणी अश्वत्थामा का कृष्णाचे मनोगत म्हणून चपखल बसला. असो. सहमत आहेच.

In reply to by मन१

इतर संपुर्ण प्रतिसादाशी सहमत. पण मला असं वाटतं, भाषेचा बाज पकडताना थोडंसं वरखाली झालंय. म्हणजे मधूनच पल्लेदार वाक्यं आणि मधूनच अगदी सर्वसाधारण वापरातली भाषा...त्यामुळं वाचताना थोडंसं ट्रॅक बदलताना खडखडल्यासारखं होतंय इतकंच.

In reply to by धमाल मुलगा

मधूनच पल्लेदार वाक्यं आणि मधूनच अगदी सर्वसाधारण वापरातली भाषा...त्यामुळं वाचताना थोडंसं ट्रॅक बदलताना खडखडल्यासारखं होतंय इतकंच. हे असू शकतं. पण इतक्या खोलात लक्ष देउ शकलो नव्हतो. ( "एकूणात काहीतरी त्या तसल्या प्रायोगिक धाटणीचं दिसतय" एवढच लक्षात राहिलं. तपशिलात शिरलो नव्हतो हा प्रतिसाद वाचण्यापूर्वी.)

In reply to by रमताराम

धन्यवाद ररा! कोणीतरी ह्या धाग्यावर एक चांगला प्रतिसाद देईल ह्याची वाट बघत होतो. - (प्रयत्न नक्कीच आवडलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

तुम्हाला प्रयत्न आवडला असेल तर तुम्ही उल्लेख केलेला "ह्या धाग्यावर एक चांगला प्रतिसाद" तुम्हीच का नाही दिलात? ह घ्या ;)

असाच होतो रस्त्याने एकदा मी जात वरून पडला भात मी विचारलं वरण कुठाय ? कविता संपली कवितेचं नाव - चल सोडा प्यायला जाऊया

In reply to by सुबोध खरे

असाच होतो रस्त्याने एकदा मी जात वरून पडला भात
वरून आठवलेले अतिअतिअवांतरः मराठीचे संस्कृतात शब्दशः भाषांतर "त्याची माझी रस्त्यात गाठ पडली" हे "तस्य च मम रथ्यां ग्रन्थि: पपात" असे एका महाभागाने केलेले होते कधीकाळी.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काका तुम्ही एका त्सुनामीची नांदी तर नाहीत ना करत? आधीच काय अगम्य काव्य जिलब्या कमी पडाय्य्ल्यात. ह्याने अजून स्फुरण येइल ;-)

In reply to by अभ्या..

हा:..हा:..हा:... प्रत्यक्षात ही माझी कविता (?) नाही. एका 'बैठकीत' एका मित्राने पीडलं होतं. त्याची, ही मला आवडलेली, कविता आपल्या आस्वादासाठी इथे टाकली. त्यासाठी नवीन धागा काढल्यास मिपाकर मला फासावर लटकवतील.

माझी ही एक क.वीता. एक होता दोरा. एक होती दोरी दोघे प्रेमात पडले. प्रेम केल्यावर दोघाना कळले अर्र गुंता झाला की.......

In reply to by विजुभाऊ

ह्या कवीतेची सुरुवात 'एके दिवशी काय झालेSSSS!' अशी पाहिजे.

लेखक मिपावर नवीन आहेत. ररांशी सहमत. स्फुट लिहिण्याचा चांगला प्रयत्न आहे. शब्दबंबाळ? वाटू शकते. पण लेखकाकडे स्वतःची शैली आहे हे नक्कीच. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!