चार भिंतींच्या आत माझ्या शब्दांचा मार ती निशब्दतेने सहन करत होती. प्रत्येक शब्दाच्या प्रहाराने तिच्या अखंड तपश्चर्येचा बांध फुटतो की काय?? त्या चार भिंतींच्या पोकळी मध्ये आभाळ दाटून आलेलं मला साफ जाणवत होतं. अशा वातावरणामध्ये माझ्या शाब्दिक विजेचा ताल बेताल झाल्यावर क्षणात वादळी बरसात होणार. अवकाशाच्या कुरुक्षेत्री जेव्हा समोरचा (प्रकाश) अस्तित्वाची लढाई हरू लागतो तेव्हा माझ्या आत्मकेंद्रित मनाच्या कोपर्यामध्ये लपलेला अहमभाव स्वतहाचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी तिच्या जाणिवेच्या वास्तूला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो. या वास्तूमध्ये अंधाराची शिंपडणी करत तिच्या तेजोमय अस्तित्वाला नष्ट करण्याचा जीवघेणा प्रयत्न मी करत होतो. एकीकडे स्वत:भोवती असंबद्ध तांडवामध्ये मग्न मी आणि दुसरीकडे माझ्या शब्दांमुळे गर्भगळीत झालेली ती.
माझ्या दुधारी शब्दांच्या आघाताने तिच्या अतिसूक्ष्म मनावर संवेदनशील जखमा होत होत्या. प्रत्येक जखमेतून स्त्रवणारी अतिसंवेदनशील आठवण तिच्या तपश्चर्येचा बांध आणखीन कमकुवत करण्यासाठी हातभार लावत होती. समोर चाललेला पडझडीचा खेळ पाहताना विकृती नेमकी फेर धरून नाचू लागते. मग सबंध वातावरण एका विचित्र मंत्राघोषाने भरून जाते. मघाशी, वादळी बरसातीला कारणीभूत ठरलेली बेताल वीज माझ्या रक्तामध्ये मिसळून मेंदुमधील कटू वाटांच्या सहाय्याने मुखाद्वारे बाहेर पडते ती अधिक तीव्र होवूनच, ब्रम्हस्त्राप्रमाणे. आता यास परतीचा मार्ग नाही. विनाशाचे भाग्य असलेला हा प्रलयास कारणीभूत ठरणार हे वास्तव. त्याचा परिणाम मला वातावरणामध्ये जाणवत होता. विचारांच्या वार्याचा वेग अचानक वाढला आणि या वावटळीमध्ये समोरचा औदुंबर मुळासकट उन्मळून पडला.त्याच्या आदिम मुळांनी घट्ट धरून ठेवलेल्या मातीची धूळ सार्या आसमंतामध्ये भरून गेली.
आणि अचानक माझी नजर तिच्या डोळ्यांवर स्थिर झाली. माझ्या खवळलेल्या समुद्राला तिच्या अश्रूंचा किनारा पुरेसा होता. आसमंत व्यापून टाकणारी ती आदिम धूळ स्थिरावली ती थेट माझ्या त्वचेवर. त्या धुळीने माझ्या पेशीपेशीना झाकून टाकले. अंधाराला ग्रहण लागावे त्या प्रमाणे संपूर्ण खोली प्रकाशाने भरून गेली. माझ्या अहमतेचा बुरूज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्या चार भिंतीच्या आतमध्ये तिच्या आणि माझ्यामधील अंतर वाढत चालले होते. हे वेळीच थोपवण्यासाठी मी वेगाने तिच्या दिशेने धाव घेतली. मघाशी उन्मळून पडलेल्या औदुंबरच्या मुळावर पुरातन काळामधील वेदनेच्या खुणा मला स्पष्ट दिसत होत्या. मुळावर घाव घालणे चुकीचेच. कणखर प्रहरांनी न तुटलेला तपश्चर्येचा बांध माझ्या नाजुक स्पर्शाने मात्र क्षणार्धात फुटला. त्या नंतर येणारा भावनांचा आवेग थोपवण्याकरिता मी तिला कवेत घेतले. तिथे माझी सावरण्याची असमर्थ धडपड.
माझ्या अस्तित्वाला कारणीभूत ती
माझ्या अस्तित्वासाठी झगडणारी ती
माझ्या अस्तित्वासाठी कष्टणारी ती
माझ्या अस्तित्वासाठी तपश्चर्यामग्न ती
आदिमकाळात तुटलेली नाळ आज पुन्हा जोडली गेली. मनाचा मनाशी संवाद झाला अश्रुंद्वारे.
हे ईश्वरा, माझ्या प्रार्थनेची सुरुवात तिच्या शब्दांनी व्हावी.
माझ्या रौद्ररूपी अहमभावाचा शक्तिपात होवून सतत तिच्या चरणाशी लोळण घेण्याचे सामर्थ्य तू मला दे.
त्या मातृत्वरूपी तेजचा अंश असलेल्या मला त्या तेजसामर्थ्याकडे झुकल्या नजरेने का होईना मात्र पाहण्याचे सामर्थ्य मला दे.
ही प्रार्थना.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
14934
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
शब्दबंबाळ !
??¿
घरगुती त्सुनामी.
In reply to ??¿ by मनिम्याऊ
नाय गो.......
In reply to ??¿ by मनिम्याऊ
अवघड आहे.
अगागागा
In reply to अवघड आहे. by प्रभाकर पेठकर
घाबल्लो
मी पण...!
In reply to घाबल्लो by स्पा
पळा पळा !
In reply to मी पण...! by अत्रुप्त आत्मा
तुम्ही तिघांनी हे सगळे नक्की
In reply to पळा पळा ! by सस्नेह
भले !
In reply to तुम्ही तिघांनी हे सगळे नक्की by मोदक
एका वाक्यात?
In reply to तुम्ही तिघांनी हे सगळे नक्की by मोदक
हाट रे....
In reply to घाबल्लो by स्पा
हाट रे घाबरवतो काय स्पा ला
In reply to हाट रे.... by गोरा सौमित्र
अच्च होय..
In reply to हाट रे घाबरवतो काय स्पा ला by स्पा
होय
In reply to अच्च होय.. by गोरा सौमित्र
स्पावड्या अन लहान??????
In reply to होय by स्पा
कोण माणसे? धन्यवाद!
In reply to स्पावड्या अन लहान?????? by अभ्या..
सह्या (आणि मते) बदलतात हो
In reply to कोण माणसे? धन्यवाद! by कवितानागेश
शैलीदार....
बरोबर !!!
In reply to शैलीदार.... by मन१
एकसमयावच्छेदेकरून मशारनिल्हे
हे "मशारनिल्हे" काय असतं रे?
In reply to एकसमयावच्छेदेकरून मशारनिल्हे by बॅटमॅन
उपरोल्लेखित, अफोरमेन्शन्ड.
In reply to हे "मशारनिल्हे" काय असतं रे? by आदूबाळ
ओह हो
In reply to उपरोल्लेखित, अफोरमेन्शन्ड. by बॅटमॅन
वटवाघळा जाण पां
In reply to एकसमयावच्छेदेकरून मशारनिल्हे by बॅटमॅन
.
आदिम धूळ स्थिरावली ती थेट माझ्या त्वचेवरबापरेमनाच्या कोपर्यामध्ये लपलेला अहमभाव स्वतहाचा मोठेपणा'स्वतहा' ह नवा शब्द मिळाला मराठीलाअहमभावाचाआणखी एक नवा शब्दत्या धुळीने माझ्या पेशीपेशीना झाकून टाकलेम्हणजे काय ? बा द वे भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा अर्थ आज कळाला.(No subject)
In reply to . by आशु जोग
म्हणीचा अर्थ
In reply to . by आशु जोग
.
In reply to म्हणीचा अर्थ by गोरा सौमित्र
'फ' तुकडेम्हणजे ? बा द वे गोरा सौमित्र म्हणजे तुम्ही मराठी चित्रपटातला कवी सौमित्र का ?गोरा सौमित्र म्हणजे तुम्ही
In reply to . by आशु जोग
@माझ्या रौद्ररूपी अहमभावाचा
:)
अश्रू वेचण्यास कोणीतरी टोवेल
In reply to :) by देवांग
आटोपलं ???
रामाची सीता...
In reply to आटोपलं ??? by अर्धवटराव
काय भयंकर लिहीलय सगळं!,,
संपादक
कोल्ह्याला द्राक्षे अंबट
In reply to संपादक by आशु जोग
"काही अर्थ असेल तर हा धागा
In reply to संपादक by आशु जोग
मरतय आज हसुन!
In reply to "काही अर्थ असेल तर हा धागा by रामपुरी
हे तरी कळलं का??????
In reply to संपादक by आशु जोग
नाही.
In reply to हे तरी कळलं का?????? by गोरा सौमित्र
हाण त्येज्याआयला !
हाट लेका...
In reply to हाण त्येज्याआयला ! by आबा
ये हाथ मुझे दे दे ठाकूर!!
ओ मॅडम
In reply to ये हाथ मुझे दे दे ठाकूर!! by स्पंदना
असं काही वाचणं माझ्याच्याने
In reply to ओ मॅडम by इरसाल
घे घे...
In reply to ये हाथ मुझे दे दे ठाकूर!! by स्पंदना
म्हणजे काय?
उत्तम!!!!!
In reply to म्हणजे काय? by चिगो
आवडले
खरोखरच कळलं नाही हो.
In reply to आवडले by रमताराम
+०.५
In reply to आवडले by रमताराम
+.२५
In reply to +०.५ by मन१
राइट्ट....
In reply to +.२५ by धमाल मुलगा
कोणत्या पात्राच्या तोंडी
In reply to +०.५ by मन१
+१
In reply to आवडले by रमताराम
be the change you want to see
In reply to +१ by सोत्रि
हहपुवा!
चल सोडा प्यायला जाऊया
असाच होतो रस्त्याने एकदा मी
In reply to चल सोडा प्यायला जाऊया by सुबोध खरे
माझी न(व)कविता...
In reply to चल सोडा प्यायला जाऊया by सुबोध खरे
केवढा हा तळतळाट
In reply to माझी न(व)कविता... by प्रभाकर पेठकर
पेठकर काका तुम्ही एका
In reply to माझी न(व)कविता... by प्रभाकर पेठकर
नाही हो..
In reply to पेठकर काका तुम्ही एका by अभ्या..
पानात पानम पानात पाम, पानात
In reply to माझी न(व)कविता... by प्रभाकर पेठकर
सालात साल, सालात साल, सालात
In reply to पानात पानम पानात पाम, पानात by आनन्दिता
गुंता
एके दिवशी...
In reply to गुंता by विजुभाऊ
ओके
रमताराम यांच्याशी पूर्ण सहमत.