पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०२ : पूर्वतयारी - हवामान
=====================================================================
पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...
=====================================================================
...मग काय, वाट कसली बघताय? करा सुरू प्रवासाची तयारी ! काय समजलात? हा चांगला दोन लाख वर्षांच्या मुदतीचा"पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास" आहे, राजे !
आता जायचे नक्की झाल्यावर प्रवासाची पूर्वतयारी करणे आलेच. असल्या मोठ्या प्रवासासाठी खूप तयारी करायला लागते हे काय सांगायला नको. पण या खास सहलीची बरीचशी व्यवस्था मी तुमच्यासाठी अगोदरच केली आहे, तेव्हा निश्चिंत रहा. तरीसुद्धा सहलीची मजा पूर्णपणे उपभोगायला आपल्याला महत्त्वाच्या दोन गोष्टी नीट समजावून घेणे जरूरीचे आहे. त्या म्हणजे फिरायच्या ठिकाणच्या हवामानाचा अंदाज आणि आपल्याला योग्य वाटेवरून नेणारे मार्गदर्शक. तेव्हा त्यांची थोडी माहिती घेऊ या.
हवामान
सत्तर लाख वर्षांपूर्वी उत्तरपूर्व आफ्रिकेत प्रायमेट्समधली वेगळी झालेली एक शाखा काही जगावेगळे करेल अशी खास लक्षणे तिच्यात सुरुवातीला तरी दिसत नव्हती. हे प्राणी इतर प्रायमेट्स सारखेच त्यांच्या आयुष्याचा बहुतेक सर्व काळ उष्णप्रदेशिय वर्षारण्यांमधे झाडांवरच काढत होते. त्या काळी जंगलांत फिरत असणार्या श्वापदांच्या मानाने हे प्राणी अगदीच कमकुवत होते. त्यांच्याकडे अजस्त्र शरीर, टोकदार नखे अथवा तीक्ष्ण दात नव्हते. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी झाडांच्या पर्णभारात लपून राहून आणि जरूर तेव्हा झाडांच्या फांद्यांवर इकडून तिकडे पळण्याच्या आपल्या चापल्ल्याच्या जोरावर त्या प्राण्यांनी पुढची जवळ जवळ ३५ लाख वर्षे काढली. या काळी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि त्यांच्या जीवनपद्धतीमुळे त्यांनी शाकाहारी बनणे हे साहजिकच होते. या काळात या शाखेत अनेक प्रजाती उत्पन्न झाल्या. आजूबाजूचा सतत (अर्थातच पृथ्वीवरील उत्क्रांतीच्या भाषेत सतत याचा अर्थ काही हजार अथवा काही लाख वर्षांच्या मुदतीत असा आहे) बदलणार्या वातावरणाचा आणि इतर परिस्थितीचा परिणाम होऊन त्यातल्या अनेक नामशेष झाल्या तर काही थोड्याच कश्याबश्या तग धरून जिवंत राहिल्या आणि परिस्थिती सोईस्कर बनताच परत जोमाने वाढू लागल्या. ही बदलणारी परिस्थिती म्हणजे फक्त आजूबाजूचे हवामान आणि प्राणी एवढीच नव्हती. कारण अशी परिस्थिती फक्त एका प्राण्याच्या अथवा प्राणी समुदायाच्या जीवनावर प्रभाव पाडू शकेल. सर्व जमातीवर दीर्घकालीन प्रभाव पाडण्यास आजूबाजूची परिस्थिती सर्व जीवन एकतर उद्ध्वस्त किंवा सबळ होईल इतक्या प्रचंड प्रमाणात बदलली पाहिजे. असे दीर्घ परिणाम करण्याची ताकद मुख्यतः पृथ्वीवर काही ठरावीक कालखंडांनी येणार्या हिमयुगांत होती. हिमयुगांमुळे पृथ्वीवरच्या हवामानात झालेल्या दीर्घ आणि प्रचंड उलथापालथींनी दर काही लाख वर्षांनी पृथ्वीवरील प्राण्यांनी राहण्यास आणि वंशवृद्धी करण्यास योग्य अश्या जागा सतत बदलत राहिल्या. गेल्या साठ कोटी वर्षांपासून, साधारणपणे दर वीस कोटी वर्षांनी, काही लक्ष / दशलक्ष वर्षांच्या कालावधीचे हिमयुग अवतरत होते आणि वनस्पती व प्राणी जीवनाची वाताहात करत होते. गेल्या २० लाख वर्षांत त्यांच्या वारंवारतेचे प्रमाण बरेच वाढले आहे आणि या कालावधीत ध्रुवीय बर्फाचे प्रमाण २० वेळा लक्षणीय प्रमाणात कमीजास्त झाले आहे. हिमयुगांमुळे अतिथंड होणारा पृथ्वीचा बराच मोठा भूभाग प्राण्यांच्या वस्तीला अयोग्य तर होत होताच पण ध्रुवीय प्रदेशांत समुद्रातले बरेचसे पाणी गोठून बर्फाच्या स्वरूपात अडकून पडल्याने समुद्रातील पाण्याची पातळी अगदी १००-१३० मीटरपर्यंत खाली जात होती आणि हिमयुग संपून परत वातावरण उष्ण झाले की तेवढीच वर येत होती. पाण्याची पातळी खाली गेली की उघड्या पडलेल्या समुद्रतळाने अनेक भूभाग एकमेकाला जोडले जात होते आणि त्यांना पायी अथवा कामचलाऊ होड्या वापरून पादाक्रांत करणे शक्य होत होते. तर पाण्याची पातळी वर गेली की दोन भूभागांत शे-दोनशे किलोमीटर अथवा जास्त दुरावा निर्माण होऊन त्यांचा लाखो वर्षे एकमेकापासून संबद्ध तुटत होता. हजारो-लाखो वर्षांमध्ये या वेगळ्या झालेल्या दोन भूभागांतील जीवांत संपूर्णपणे वेगळी जनुकीय सामग्री उत्क्रांत होत होती आणि त्यामुळे तेथील भूभाग, वातावरण व इतर परिस्थितीत तगून राहणार्याची पात्रता असणारे जीव शिल्लक राहत होते... ते न जमणारे नष्ट होत होते. याशिवाय हिमयुगाने धृवप्रदेशांत गोठवून ठेवलेल्या पाण्याने तेथील भूमी बर्फाळ-निर्जन-निष्प्राण बनत होती. तर त्या बर्फरूपात अडकलेल्या पाण्यामुळे इतर ठिकाणी होणार्या पाण्याच्या आणि पर्यायाने पावसाच्या कमतरनेने तेथील विशाल वर्षारण्ये नष्ट होऊन तेथे भयानक वाळवंटे बनत होती. याच कारणाने ज्या उत्तर आफ्रिकेत एके काळी घनदाट उष्णप्रदेशीय जंगल होते आणि जिराफासारखे मोठे मोठे शाकाहारी प्राणी होते तेथे आज जगातले सर्वात मोठे रखरखीत सहारा वाळवंट आहे. तसेच आजच्या थंड प्रदेशीय ब्रिटिश बेटांवरही एका कालखंडात घनदाट उष्णप्रदेशीय जंगल होते व सद्या आफ्रिकेत असलेले प्राणी राहत होते तर दुसर्या एका कालखंडात बारा महिने बर्फाळ भूभाग आणि आता फक्त ध्रुवीय प्रदेशात दिसणारे रेनडियर, ध्रुवीय अस्वले यांच्यासारखे प्राणी राहत होते! पृथ्वीच्या वातावरणावर आणि पर्यायाने जीवांवर प्रचंड परिणाम करणार्या दुसर्या महत्त्वाच्या घटना म्हणजे पृथ्वीच्या पोटातील आग बाहेरच्या वातावरणात ओकणारे ज्वालामुखींचे महाप्रचंड उद्रेक. हा प्रकार काही कोटी वर्षांपूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर होत असे. अश्या उद्रेकामुळे वातावरणात उडालेल्या धूर आणि राखेने सूर्यकिरण शेकडो-हजारो वर्षांपर्यंत रोखून ठेवल्यामुळे हिमयुगाची सुरुवात झाली किंवा चालू असलेल्या हिमयुगाच्या कालखंडात आणि प्रखरतेत भर पडली असे अनेकदा झालेले आहे. सद्या तुलनेने थंड झालेल्या पृथ्वीवर असे प्रकार जरी कमी प्रमाणात होत असले तरी आईसलँड मधील Eyjafjallajökull ज्वालामुखीच्या सन २०१० मध्ये झालेल्या उद्रेकाने हवेत पसरलेल्या राखेने संपूर्ण युरोपभरची विमानसेवा जवळ जवळ दहा दिवस ठप्प केली होती, हे आठवत असेलच. पृथ्वीवर याच्या अनेकपटींनी जास्त हाहा:कार माजवू शकणारी सुप्त ज्वालामुखींची स्थाने अजूनही अस्तित्वात आहेत. पण दु:खात सुख इतकेच की असा उद्रेक काही हजार ते काही लाख वर्षांतून एकदाच होण्याची शक्यता आहे. पण तो जर झाला तर पृथ्वीवरचे जीवन उद्ध्वस्त करण्याची अथवा नाहीसे करण्याची त्याची क्षमता असू शकते ! अशा या बदलणार्या परिस्थितीला तोंड देण्यास प्रत्येक वनस्पतीला अथवा प्राण्याला कितपत जमते यावर ती जमात शिल्लक राहणार की नामशेष होणार हे ठरत होते. हवामानाच्या बदलांमध्ये टिकून राहण्यासाठी बहुतांश प्राण्यांना भूभागावरचे सहाय्यक हवामान जसजसे सरकत दुसरीकडे जाई तसतसे तिकडे स्थलांतरित होण्याशिवाय किंवा ते जमले नाही तर नष्ट होण्यापलीकडे काही उपाय नव्हता. बिचार्या वनस्पतींना तर स्थलांतराचा पर्याय नव्हता, त्यामुळे त्यांतल्या नवीन वातावरणाला तोंड देण्याची क्षमता असणार्या कणखर वनस्पती शिल्लक राहत व इतर नष्ट होत होत्या. जीवांच्या या होणार्या फरपटीचे मुख्य कारण म्हणजे हवामानाचा आणि इतर प्रतिकूल परिस्थितीचा प्रतिकार करणारी साधने स्वकृतीने बनवण्याएवढी पात्रता कोणत्याही जीवात वीस लाख वर्षांपूर्वीपर्यंत आलेली नव्हती. अशी पात्रता जेव्हा अगदी थोड्याफार प्रमाणात ज्याच्यात येऊ लागली तो Homo ergaster हा प्राणी १५ लाख वर्षांपूर्वी झाडांवरून खाली उतरून जमिनीवर इतर प्राण्यांशी स्पर्धा करत, त्यांना तोंड देत, आत्मविश्वासाने आपल्या दोन पायावर चालू लागला आणि नंतर आफ्रिका खंड सोडून पुढच्या काही लाख वर्षांत हळू हळू Homo erectus या नावाने आशियाभर पसरला. तशीच अजून एक Homo heidelbergensis या नावाचा प्राणी ५ लाख वर्षापूर्वीपर्यंत आफ्रिकेतून बाहेर पडून युरोपात पसरला आणि त्याच्यातूनच Homo neanderthalensis विकसीत झाला. Homo erectus ने आशियात जवळजवळ १० लाख वर्षे तर Homo heidelbergensis व Homo neanderthalensis या दोघांनी मिळून युरोपमध्ये जवळजवळ ५ लाख वर्षे निरंकुश सत्ता गाजवली. हे सगळे होत असताना Homo प्रजातीतील एक शाखा आफ्रिकेतच विकसित होत होती. या प्राण्याचा विकास आणि पृथ्वीचे वातावरण व इतर परिस्थितीतील बदलांचे या प्राण्यावर झालेले परिणाम, तसेच त्याने केलेल्या उलाढाली व प्रवास; या सगळ्यात आपण पुढच्या काही भागांत खूप बारकाव्यांसकट सामील होणार आहोत. पण त्याआधी आपण आपल्या प्रवासाच्या प्रमुख मार्गदर्शकांची ओळख करून घेऊया. ज्यांच्या भरवशावर प्रवास करायचा त्या वाटाड्यांच्या कर्तबगारीची आणि कामाच्या पद्धतीची माहिती मिळाल्याशिवाय आणि त्यांनी दिलेल्या माहितीची विश्वासार्हता पटल्याशिवाय आपल्याला सहलीची मजा नि:शंकपणे आणि पुरेपूर अनुभवता येणार नाही. (क्रमशः ) ===================================================================== महत्त्वाचे दुवे १. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens २. https://genographic.nationalgeographic.com/ ३. http://www.smithsonianmag.com/ ४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration ५. http://www.bradshawfoundation.com/ ===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)... =====================================================================
वाचने
52126
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
बापरे लाखात वर्षे म्हणजे किती
वाचतेय... लव्कर लवकर लिहा.
प्रवासातली रंजकता आणि आव्हाने
झकास!
सध्या आपल्या प्रुथ्वीचे वय
In reply to सध्या आपल्या प्रुथ्वीचे वय by आभि जित
पृथ्वीचे वय आहे ४.५४ बिलियन
In reply to पृथ्वीचे वय आहे ४.५४ बिलियन by डॉ सुहास म्हात्रे
म्हणूनच
अफाट अन अफाट रोचक विषय आहे
इतिहासापूर्वीचा इतिहास बेष्टच
In reply to इतिहासापूर्वीचा इतिहास बेष्टच by बॅटमॅन
धन्यवाद !
धन्यवाद !
खूपच माहितीपूर्ण! पुढील
झक्कास
जबरदस्त.
In reply to जबरदस्त. by प्रचेतस
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
नकाशा आणि इतर माहितीबद्दल
In reply to नकाशा आणि इतर माहितीबद्दल by प्रचेतस
पृथ्वीचे भूभाग पुढच्या २५
In reply to पृथ्वीचे भूभाग पुढच्या २५ by डॉ सुहास म्हात्रे
वरची लिंक नादुरुस्त झालेली
In reply to वरची लिंक नादुरुस्त झालेली by डॉ सुहास म्हात्रे
थोडक्यात लाखों / करोडो
In reply to थोडक्यात लाखों / करोडो by शिल्पा ब
"इतिहासाची पुनरावृत्ती होते"
In reply to वरची लिंक नादुरुस्त झालेली by डॉ सुहास म्हात्रे
आपला भारत
धन्यवाद !
उत्तम लेखमाला
वाचतोय.
<<< या काळी आजूबाजूच्या
In reply to <<< या काळी आजूबाजूच्या by शिल्पा ब
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
या काळी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि त्यांच्या जीवनपद्धतीमुळे त्यांनी शाकाहारी बनणे हे साहजिकच होते.हे तुम्ही उदधृत केलेले वाक्य सुरुवातीच्या काळातल्या (७० लाख ते ३५ लाख वर्षांपुर्वींच्या) आदिमानवांबद्दल लिहीलेले आहे. आतापर्यंत सापडलेल्या पुराव्यांप्रमाणे २० लाख वर्षांपूर्वी Homo habilis ने प्रथम मांस खाण्यास सुरुवात केली पण तो स्वतः शिकार करत नव्हता... स्कॅव्हेंजर होता हा उल्लेख पहिल्या भागात आला आहेच. प्राचीन प्राण्यांच्या खाण्याच्या सवयी त्यांच्या सापडलेल्या दातांच्या रचनेवरून व दातांना चिकटलेल्या अन्नकणांच्या पृथक्करणातून खात्रीने ठरवल्या जातात (ह्या पद्धतीची तोंडओळख पुढच्या तिसर्या भागात येत आहे). त्याशिवाय जबड्याच्या रचनेवरून आणि जबड्यांच्या स्नायूंच्यामूळे जबड्यांच्या हाडांवर झाल्या असलेल्या खुणांवरूनही प्राण्याच्या खाण्याच्या सवयीबद्दल अंदाज बांधला जातो.हल्लीच एप्स झाडांच्या फांद्या तोडुन त्याचं एक टोक चावुन भाल्यासारखं टोकदार करुन छोट्या प्राण्यांची शिकार करुन खातात अशी एक डॉक्युमेंटरी पाहीली.१. साधने बनवणे हे केवळ मानवाचे राखीव कौशल्य नाही तर ज्यांना ग्रेट एप्स असे संबोधले जाते ते गोरिला आणि विशेषतः चिंपांझी प्राथमिक प्रकारची साधने बनवतात. पण ते अजून तरी या प्राथमीक अवस्थेतच अडकलेले आहेत. या विषयावर बरेच संशोधन चालू आहे. काही इतर प्राणी आणि पक्षांमध्येही काड्या वापरून कीटकांना झाडाच्या सालीतून अथवा त्यांच्या वारूळातून बाहेर काढून गट्टम करण्याची कृती दिसून येते. कच्चा माल वापरून अधिकाधीक सुधारलेली साधने बनवणे आणि ती प्रथा पुर्वांपार चालवत अत्यंत प्रगत अवस्थेला नेणे हे आतापर्यंत फक्त आधुनीक मानवालाच (Homo sapiens sapiens) जमले आहे. २. आजची काही माकडे मांस खातात म्हणून सरसकट सर्वच आदिमानव मांस खात असणार असे निदान काढता येत नाही. मानवाच्या जवळपास येणार्या ग्रेट एप्सपैकी गोरिला किटक खाणे सोडले तर शाकाहारी आहे; तर चिंपांझी बराचसा शाकाहारी आणि थोडासा मांसाहारी आहे. अवांतरः माणसाच्या मांसाहारी बनण्याबद्दलची एक थियरी अशी आहे: आदिमानव झाडावरून खाली उतरला ते दलदलीत वाढणार्या वनस्पतीचे रसदार कोवळे कोंब आणि देठ खाण्यासाठी. दलदलीत वावरण्यासाठी त्याला दोन पायावर उभे राहणे भाग पडले. वनस्पतींबरोबर दलदलीतल्या पाण्यात सापडणारे मासे त्याचे खाद्य झाले. हा काळ माणसाच्या मेंदूची झपाट्याने वाढ होण्याचा होता... या वाढीत जनुकीय बदलाचा किती भाग होता आणि सामिष खाद्याचा त्याला किती हातभार लागला याबद्दल दुमत आहे... मात्र या दोन्ही गोष्टींचा माणसाच्या उत्क्रांतीला फार मोठा हातभार लागला हे नक्की.In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
वाचतोय.
In reply to वाचतोय. by धमाल मुलगा
माणसाच्या मिश्राहारी
In reply to वाचतोय. by धमाल मुलगा
अस्वलांचं बरं चाललंय की,
एक्कारावांचा निषेध.
धन्यवाद !
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
धन्यवाद !
मस्तच माहीती. लेख आवडला.
In reply to मस्तच माहीती. लेख आवडला. by किलमाऊस्की
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
ओक्के!! समजलं.
In reply to ओक्के!! समजलं. by किलमाऊस्की
हे सर्व नक्कीच हवामानाशी
In reply to हे सर्व नक्कीच हवामानाशी by डॉ सुहास म्हात्रे
ह्म्म..
वाचतोय
In reply to वाचतोय by चेतन माने
धन्यवाद ! सफरीतला सहभाग असाच
लेख आवडला.
In reply to लेख आवडला. by आतिवास
धन्यवाद !
१ नंबर
सुंदर लेखमाला
धन्यवाद !
मस्त चालली आहे मालिका.
In reply to मस्त चालली आहे मालिका. by अजो
धन्यवाद !
केवढा प्रचंड प्रवास....
In reply to केवढा प्रचंड प्रवास.... by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
वरच्या प्रतिसादातले "...८.४
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
याच अनुषंगाने थोडे अवांतरः
माहितीपूर्ण असूनही रटाळ
In reply to माहितीपूर्ण असूनही रटाळ by सस्नेह
धन्यवाद !