✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माया ही पात्तळ-१"बेशर्त स्वीकृती"

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 07/13/2013 - 02:13
ढीश्श....क्लेमर!!! >>> आंम्हास तसे सर्व काही साधे सरळ रुचते,आणी पचतेही! वेळच आली तर,वेडे/वाकडेही पचवू कदाचित.,,, पण... सरळ होणारे पदार्थ मुद्दाम कोणी जड करून खावयास दिले,आणी वरून मी सांगतो तितके वेळाच चाव,आणी मी म्हणतो तसेच गिळ! असे म्हटले तर ते आमच्या लेखी(इथे लिहायच्या नव्हे! ;) ) गिळगिळीतच होइल. म्हणून आंम्हास "त्यानी" जे सुचविले,ते यांना बोधप्रद होवो,अशी "जड" प्रस्तावना करून ही जिल्बी तळायला-सोडत आहे. तिचा बाकिच्यांनीही आस्वाद घ्यावा..असे मी सांगतो. अता हिची(ही) "बेशर्त स्वीकृती" होते का?-ते पहायचं! माया ही पात्तळ आत नाही विठ्ठल । सांगतो केवळ आत्मरंग ॥१॥ पाव-बटर-चहा भूकेलागी खावे । म्हणावे का त्यासी ब्रेकं....फाश्टं ? ॥२॥ फुलं-पाखरू ते..आधी सुरवंट । हिशेब तो साधा निसर्गाचा ॥३॥ ध्यान मन पूजा सरळ आनंद । हाची बेशर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्त शोभतसे ॥४॥ सरळ मनाचा चोळामोळा केला । अर्थ' कोठे गेला(?) आपणं(ही) कोठे? ॥५॥ देखोनी चर्चा ही हेची आले मनीं । खर्‍या आत्मज्ञाना,साधी बोली ॥६॥

प्रतिक्रिया द्या
7871 वाचन

💬 प्रतिसाद (36)

क्या बात !!

अर्धवटराव
Sat, 07/13/2013 - 02:49 नवीन
बुवांची काव्यप्रतिभा काय वर्णावी महाराज... अर्धवटराव
  • Log in or register to post comments

तुमची गफलत होते आहे

रामपुरी
Sat, 07/13/2013 - 03:34 नवीन
सांख्य आणि भक्ती यात तुमचा गोंधळ झाला आहे. स्वाभाविकच आहे. तुम्ही तुमच्या मनाचे पूर्णपणे विश्लेषण केलेच नाहीये. "मी" सांगतो तसं एकदा करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माया हा भ्रम आहे. मनापासून मुक्त होण्याचा मार्ग फक्त "मी" सांगतो तोच आहे आणि या विश्वातील प्रत्येकाने मनापासून मुक्ती मिळवलीच पाहीजे. मग बघा जीवनात कशी मजा येते ते. स्वानुभवाने सांगतो, तुम्ही काहीही म्हणा मी निश्चिंत आहे. पाव-बटर-चहा भूकेलागी खावे हे तुम्ही सकाळी उठल्यावर ब्रेकं....फाश्टं ची वेळ झाली म्हणून खाता. तसे न करता मी सांगतो तसे कष्ट करून भूक लागल्यावर खाल्ले तर क्या बात है. तुम्हाला रोज तो अनुभव घ्यावासा वाटेल. पुढच्या ओळीत तुम्ही म्हणता फुलं-पाखरू ते..आधी सुरवंट. हे निखालस चूक आहे. "मी" म्हणतो आधी फुलपाखरू. कारण त्याशिवाय सुरवंट संभवतच नाही. ध्यान आणि पूजा हे निरर्थक आहे त्यामुळे पुढचे सर्व निरर्थक ठरते. सरळ मनाचा तुम्ही चोळामोळा केला आहे त्यावरून तुमची मानसिक अवस्था "मी" जाणू शकतो. चर्चा सकारात्मक होण्यासाठी ती "मी" म्हणतो त्याच दिशेने गेली पाहीजे. तेव्हां शेवटच्या ओळीतले तुम्ही म्हणता ते आत्मज्ञान तुम्हाला झालेले नाही हे स्पष्ट आहे. "माझा" प्रतिसाद नीट वाचलात तर ते तुमच्या सहज लक्षात येईल. थोडक्यात "मी" म्हणातो त्या मार्गाने चर्चा जात नसेल तर हे सर्व व्यर्थ आहे.
  • Log in or register to post comments

तुमचे मला पटले.

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/13/2013 - 09:43 नवीन
तुमचे मला पटले. ;-) अता माझे तुम्हाला पटेल का? =)) तुमची माझी इच्छा, तो "राम" पुरि करो...अशी माझ्या मनाची प्रार्थना! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

जमलय, जमलय!!

कवितानागेश
Sat, 07/13/2013 - 23:54 नवीन
जमलय, जमलय!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

+१०^१००!!!!!

बॅटमॅन
Sun, 07/14/2013 - 00:09 नवीन
+१०^१००!!!!! अगदी पर्फेक्ट जमलंय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

बुवा,

पैसा
Sat, 07/13/2013 - 09:45 नवीन
समजून घेण्यासाठी प्रिंट ऑट काढत आहे. :-/
  • Log in or register to post comments

मग...??? नैच कळायला पायजे!

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/13/2013 - 10:00 नवीन
मग...??? :P नैच कळायला पायजे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चान जिलबी

स्पा
Sat, 07/13/2013 - 10:02 नवीन
चान जिलबी
  • Log in or register to post comments

अध्या+" आत्मा "ची जिलबी ..

चौकटराजा
Sat, 07/13/2013 - 10:23 नवीन
अध्यात्माची जिलबी , "अहं"चा च मट्ठा मीच वस्त्ताद आणि मीच आहे पट्ठा तुम्ही काय सांगता साध्या बोलीची गरिमा क्लिष्टतेत खरा आहे ज्ञानीयांचा महिमा टाके जिलबी आता त्यागून मस्त कविता आत्मज्ञान आले खरे बुवांस पै आता बुबा यापेक्षा जास्त काही येत नाही हो. आमचा ष्टॉक लय मर्यादित हाय !
  • Log in or register to post comments

__/\__ !!

सस्नेह
Sat, 07/13/2013 - 13:36 नवीन
__/\__ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

चौराकाका, तुम्हेसुद्धा!!

कवितानागेश
Sat, 07/13/2013 - 23:53 नवीन
चौराकाका, तुम्हेसुद्धा!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

जिलबिच्या शेवटच्या टोका पासुन

मदनबाण
Sat, 07/13/2013 - 10:31 नवीन
जिलबिच्या शेवटच्या टोका पासुन मागोवा काढण्यास सुरवात करावी म्हणजे तीच्या गोलाईची मूळ सुरुवात कुठुन सुरु झाली हे एकदा कळेल आणि एकदा कळले की तुम्हाला समजेल ही गोल गोल जिलबी नसुन फक्त भ्रम आहे. ;) (अत्रुप्त प्रेमी) ;)
  • Log in or register to post comments

@ही गोल गोल जिलबी नसुन फक्त

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/13/2013 - 10:50 नवीन
@ही गोल गोल जिलबी नसुन फक्त भ्रम आहे. >>> Image removed. काय मोडलीये राव!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आंबट जिलेबि!!!

चेतन माने
Sat, 07/13/2013 - 11:02 नवीन
मस्त आत्मा जी ……. प्रतिसाद पण एकेक खतरनाक आलेत ;) (हे असले हल्ले वारंवार झाले तरी आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही!!!) :D:D:D
  • Log in or register to post comments

***

जेपी
Sat, 07/13/2013 - 11:25 नवीन
या जिलबी सोबत मठ्ठा पाहिजे होता :-)
  • Log in or register to post comments

शोधा म्हणजे सापडेल.

प्रभाकर पेठकर
Sat, 07/13/2013 - 13:48 नवीन
नीट मनापासून पाहिलेत तर 'मठ्ठा' ची कलाकृती आजूबाजूलाच सापडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ग्रेट अन्वेषक पेठकर काका.

अभ्या..
Sat, 07/13/2013 - 14:28 नवीन
=)) =)) =)) =)) ग्रेट अन्वेषक पेठकर काका. पण गुर्जी तुम्हाला काय होतंय सध्या? असं का करता? काळजी घ्या हो जरा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

जी...काळबा!!!

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/13/2013 - 14:48 नवीन
जी...काळबा!!! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छिद्रान्वेषी पेठकरकाका, सादर

बॅटमॅन
Sun, 07/14/2013 - 00:09 नवीन
=)) =)) =)) छिद्रान्वेषी पेठकरकाका, सादर प्रणाम _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

बुवा,

कवितानागेश
Sat, 07/13/2013 - 23:59 नवीन
बुवा, मला पाव-बटर-चहा! मला तितकंच कळतय! ;) बाकीचं कळण्याइतकी मला समजच नाही मुळी. - (अज्ञानाच्या अन्धःकारात मायेचं पांघरुण गुरफटून झोपलेली)माउ
  • Log in or register to post comments

माऊ... माऊ... गुर्रर्रर्र..

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/14/2013 - 13:51 नवीन
माऊ... माऊ... गुर्रर्रर्र...माऊ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

उगाचेची शब्द, नसत्या करामती

राघव
Sun, 07/14/2013 - 17:48 नवीन
उगाचेची शब्द, नसत्या करामती फाटकी संस्कृती.. ’वीट’लेली. सर्व जन भ्रमी, मीच केवळ ज्ञानी सतत हेची जनी, आळवावे.. एक पालुपद स्विकृती बिनशर्त जगणे होई मस्त... मस्तवाल! सांगोनी जे गेले संत-ज्ञानी काही त्यांना काही नाही, अनुभव. मीच घेतलाहे अनुभवाचा ठेका हाच माझा हेका.. सांगतोय. म्हणोन राघवा ऐक बोल माझे ढोल अनुभवाचे.. बडवलेले.
  • Log in or register to post comments

रघु भाय... ऐकत नाय...

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/14/2013 - 21:06 नवीन
रघु भाय... ऐकत नाय... =)) येक नंबर !!! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

देवा रे! सगळेच सुटलेत!

यशोधरा
Sun, 07/14/2013 - 17:51 नवीन
देवा रे! सगळेच सुटलेत! =))
  • Log in or register to post comments

सर्वांच्या सहनशीलतेचा अंत

प्रभाकर पेठकर
Sun, 07/14/2013 - 18:34 नवीन
सर्वांच्या सहनशीलतेचा अंत पाहीला की आणखिन काय होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मनाला विचारा बरं हा प्रश्न!

यशोधरा
Sun, 07/14/2013 - 19:45 नवीन
मनाला विचारा बरं हा प्रश्न! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

लगाम.

प्रभाकर पेठकर
Mon, 07/15/2013 - 14:18 नवीन
पण त्यासाठी तुम्हाला मनाच्या ताब्यात असलेल लगाम स्वतःच्या हाती घ्यावा लागेल. मी आणि मन ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. बहुतेक जणं स्वत;लाच मन समजतात आणि सर्व घोळ होतो. मनापासून मुक्त व्हा आणि मनात येणारे विचार नियंत्रित करा. अनुभवातून लिहीतो आहे त्यामुळे त्यात काही चुक असण्याची शक्यता संभवतच नाही. हुश्शः... नाही जमत बुवा अनाकलनिय लिखाण. बेशर्त शरणांगती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पेठकरकाका, मिपावर मन म्हणून

यशोधरा
Mon, 07/15/2013 - 20:43 नवीन
पेठकरकाका, मिपावर मन म्हणून आयडी होता ना? त्याने लगाम धरलाय का? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मला ते दोन माणसांचं लिहीलेलं

प्यारे१
Sun, 07/14/2013 - 18:52 नवीन
मला ते दोन माणसांचं लिहीलेलं 'ए क अ क्ष र सु द्धा' कळत नाय ब्वा. एक 'माझं' नि दुसरे ते यु जी कृष्णमूर्तींचं. काय क्रावं ब्रं?
  • Log in or register to post comments

मस्त

निवेदिता-ताई
Sun, 07/14/2013 - 19:08 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

मध्यंतरी लैच गंभीर मोड मध्ये

प्रचेतस
Sun, 07/14/2013 - 19:37 नवीन
मध्यंतरी लैच गंभीर मोड मध्ये गेलेले जुने बुवा आता परत दिसायाले लागलेत. मजा आली वाचून.
  • Log in or register to post comments

"मला" याचा अर्थ कोणीतरी

मोदक
Mon, 07/15/2013 - 10:39 नवीन
"मला" याचा अर्थ कोणीतरी समजावून सांगेल काय..?
  • Log in or register to post comments

बेशर्त स्वीकृती

अवतार
Mon, 07/15/2013 - 11:06 नवीन
बेशर्त स्वीकृतीचा आग्रह धरणाऱ्या भ्रमराला एकही प्रतिसाद न देता ह्या धाग्याची बेशर्त स्वीकृती करणे जमेल काय?
  • Log in or register to post comments

आत्मास झाले बघा आत्मज्ञान, पुढला ज्ञानियाचा राजा आत्मा तोच

निश
Mon, 07/15/2013 - 12:53 नवीन
आत्मास झाले बघा आत्मज्ञान, पुढला ज्ञानियाचा राजा आत्मा तोच. बोला अ आत्मा ह्यांचा विजय असो.
  • Log in or register to post comments

सगळ्यांनी नीट न वाचताच

बाळ सप्रे
Mon, 07/15/2013 - 14:58 नवीन
सगळ्यांनी नीट न वाचताच प्रतिसाद द्यायची घाई केली आहे!!
  • Log in or register to post comments

नको रे नको भगवंता... हा उप

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/15/2013 - 20:27 नवीन
नको रे नको भगवंता... हा उप-हास =)) आज हसून हसून मरणार...!!! प्रचंड म्हणजे प्रचंड उपहास होतोय...तरी "तो" शरणा गती स्विकारायला तयार होत नाही!!! =)) @पेठकर काका>>> हुश्शः...नाही जमत बुवा अनाकलनिय लिखाण.बेशर्त शरणांगती.>>> Image removed. नको हो नको! Image removed. @अवतार>>> बेशर्त स्वीकृतीचा आग्रह धरणाऱ्या भ्रमराला एकही प्रतिसाद न देता ह्या धाग्याची बेशर्त स्वीकृती करणे जमेल काय?>>>>>> Image removed. अवतारबाबा की जय Image removed. @निश>>> बोला अ आत्मा ह्यांचा विजय असो. >>> विजय असो...!!! विजय असो...!!! ( मीच माझं कौतिक करायच नाय...तर,दुसरं कोण करणार!!! :p ....) @बाळ सप्रे>>> सगळ्यांनी नीट न वाचताच प्रतिसाद द्यायची घाई केली आहे!! >>> Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा