Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मंदार कात्रे on Wed, 07/10/2013 - 22:02
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
त्या संध्याकाळी घरातून निघतानाच नीलेश टेन्शन मध्ये होता ... आज गुरुवार होता, संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करून स्तोत्र म्हटल्यावर आज घराबाहेर पडू नये असे तीव्रतेने वाटत होते. पण रमेशचा फोन पुन्हा आला तेव्हा साडेसात झाले होते. ...येतोस ना, मी वाट बघतोय...... रमेश आणि नीलेश ची दोस्ती अगदी कॉलेज पासूनची. नीलेश एका कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये अकाऊंटंट होता . मुंबईतली कार्गो लोजीस्टिक्स मधली नोकरी सोडून गेली 2/3 वर्षे आपल्याच गावशेजारी असलेल्या कंपनीत स्थिरावला होता. रमेश गेली दोन वर्षे सौदीला काढून सुट्टीवर आला होता . त्याची पिण्याच्या दृष्टीने सौदीला दोन वर्षे चांगलीच उपासमार झाली होती. त्यामुळे तिथी-वार-सण-उत्सव याची कसलीही फिकीर न करता तो पीत असे. नीलेश चे मात्र तसे नव्हते. नीलेश ही प्यायचा ,पण महिन्यातून 3-4 वेळा , तेही फक्त रविवार –बुधवारीच ... तो तसा धार्मिक होता. पण लग्न होत नसल्याचे टेन्शन कधीकधी असह्य होई,आणि मग त्याला नाइलाजाने बारचा रस्ता धरावा लागे. रमेशचा फोन आला तसा बाईकला किक मारून नीलेश निघाला. आईने विचारलेही……अरे आता रात्रीचा कुठे निघालास ?..रमेशने भेटायला बोलावले आहे ,लगेच येतो परत ..... असे आईला सांगून नीलेश निघाला .... घरापासून बारचे अंतर पंधरा मिनिटात कापून तो बारवर पोहोचला . रमेश आधीच आला होता. मग गप्पांची मैफिल जमली, आणि त्या नादात किती पेग झाले ,त्याचे भान कुणालाच राहिले नाही. नीलेशची एक क्वार्टर ची नेहमीची मर्यादा कधीच ओलांडली गेली होती. डिसेंबर महिना, थंडी आपले रंग दाखवू लागली होती. म्हणून आज ओल्ड मंक होती. एव्हाना साडेदहा झाले होते ,आणि दोघांनीही प्रत्येकी तीन क्वार्टर च्या वर ओल्ड मंक संपवली होती. आता पुरे ....म्हणून बारच्या मॅनेजरनेच त्यांना थांबवले,आणि बार बंद करायचं आहे ,असे सांगून दोघांना उठवले ... मग शेजारच्याच चायनीज गाडीवर ट्रिपल राईस खाल्ला आणि रमेशला घरी सोडून नीलेशने बाइक आपल्या गावाच्या रस्त्याला वळवली . साडेअकरा झाले, एव्हाना थंडी चांगलीच जाणवू लागली होती. गावाकडच्या रस्ता माळरानवरून जात असल्याने वारा सुद्धा भन्नाट लागत होता. थंडी आणि वारा यांचा एकत्रित इफेक्ट झाला आणि ओल्ड मंकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली .नीलेशचा स्वत:च्या विचारांवर अजिबात कंट्रोल नव्हता . गाडी चालवण्याऐवजी आपण हवेतून उडत आहोत,असेच त्याला वाटू लागले. इतक्यात समोरून एक पॉश कार आली. आणि दामिनी कार चालवत होती. ... दामिनी ........... नीलेशने दामिनीला 4-5 वर्षापूर्वी लग्नासाठी विचारले होते... तो कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिच्या प्रेमात होता ... पण एकतर्फीच .... त्याला ती खूप आवडायची ... त्याच्या स्वप्नांची राणी तीच होती.... पण..पण... जेव्हा त्याने तिला विचारले ,तेव्हा तिने साफ उडवून लावले.... नीलेश खूप खोलवर दुखावला गेला....तिचा नकार त्याला पचला नाही. प्रेमभंगाचे दू:ख त्याला पेलले नाही. यापुढे लग्न/प्रेम या गोष्टींवर विचारच करायचं नाही ,असे त्याने ठरवून टाकले..... आणि आत्ता , या अवस्थेत तीच दामिनी समोरून कार चालवत येत होती. चांगला डॉक्टर नवरा मिळाला होता तिला ,त्याचीच आलीशान कार घेवून ती निघाली होती... हॉस्पिटल नधून नवर्या.चा फोन आला होता... आज उशिरापर्यंत थांबावे लागणार होते... त्याच्यासाठी जेवण घेवून ती निघाली होती..... आपल्या सगळ्या दू:खाला ही दामिनीच जबाबदार आहे, असा विचार नीलेशच्या मनावर गारुड करू लागला... बदला घे तिचा....... मार मार ................ विचारांचा स्फोट झाला मेंदूत ...................आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने बाइक तुफानी वेगात सरळ कारवर चढवली...................... जाग आली तेव्हा नीलेश हॉस्पिटल मध्ये होता ....रमेश समोर बसला होता ,आई पायाशी रडत बसली होती. अपघातात त्याच्या उजव्या हाताची नस कापली गेली होती.गेले चार दिवस तो बेशुद्ध होता . कारचे फार नुकसान झाले असले तरी दामिनीला मात्र जास्त दुखापत झाली नव्हती. सुदैवाने तिने नवर्याेला फोन करून अम्ब्युलंस मागवली, आणि नीलेशला हॉस्पिटल मध्ये आणले. मग दामिनीच्या नवर्यावने त्याच्या प्लॅस्टिक सर्जन मित्राला बोलावून ऑपरेशन केले . ...आणि नीलेशला जीवदान मिळाले होते...... थोड्याच वेळात दामिनी आणि तिचा डॉक्टर नवराही तिथे आला . नीलेश ने त्यांचे आभार मानले. पण हताश डोळ्यांनी तो दामिनीकडे बघत राहिला ............. जिला आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल दोषी ठरवून मारायला निघालो होतो...........तिच्यामुळेच आज मृत्युच्या दारातून आपण परत आलो.............हे समजल्यावर नक्की काय बोलावे तेच त्याला कळत नव्हते...........................!
  • Log in or register to post comments
  • 31825 views

प्रतिक्रिया

Submitted by दिपक.कुवेत on गुरुवार, 07/11/2013 - 11:20

Permalink

वा छान जमलीये कथा....

कथा फार अंतर्मुख करुन सोडते.....वाचुनच नि:शब्द झालोय.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 07/11/2013 - 11:34

Permalink

मागच्या वेळी तुमच्याच कथेत

मागच्या वेळी तुमच्याच कथेत बाईक जीप ला ठोकून जीप पुलात पडलेली ना =)) भारी विनोदी लिहिता ब्वा तुमी
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on गुरुवार, 07/11/2013 - 11:54

In reply to मागच्या वेळी तुमच्याच कथेत by स्पा

Permalink

स्पा...

अरे कथेत अ‍ॅक्सीडेंट महत्वाचा आहे मग तो कुठे/कसा का होईना.....त्याशीवाय कथानायकाला महत्व कसं येइल?
  • Log in or register to post comments

Submitted by चंबु गबाळे on गुरुवार, 07/11/2013 - 11:48

Permalink

चांगला प्रयत्न

चांगला प्रयत्न
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on गुरुवार, 07/11/2013 - 11:58

Permalink

पण

नीलेश टेन्शन मध्ये का होता? घराबाहेर पडू नये अस त्याला का वाट्त होतं?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 07/11/2013 - 12:21

Permalink

सुरेश कुठे आहे ?

नीलेश , रमेश आहेत ..पण सुरेश कुठे आहे ? बहुतेक त्या पोरीने सुरेश सोबत लग्न केले असावे .. त्यांच्या मुलांची नावे काय असतील :P
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 07/11/2013 - 16:14

In reply to सुरेश कुठे आहे ? by कपिलमुनी

Permalink

जयेश नि राजेश!!

जयेश नि राजेश!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 07/11/2013 - 13:27

Permalink

काय रे बाईक्वाल्या पोरांनो,

असं बाईक चालवताना समोरुन येणारी कार 'कोण' चालवतय ते दिसतं का? -झुक्झुक्गाडीतून फिरणारी माउ
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on गुरुवार, 07/11/2013 - 13:33

Permalink

हान तिज्यायला

बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्‍या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम :) असो. गाडीला बाईकने ठोकण्याआधी तो मिपाकर विवाहितांशी बोलला असता तर लग्नाविषयीचं त्याचं मत बदललं असतं.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 07/11/2013 - 13:41

In reply to हान तिज्यायला by आदिजोशी

Permalink

अगदी अगदी!

पण लग्न न झाल्याचं टेन्शन असणारा माणूस असा "मुंगीने हत्तीला चिरडून टाकण्यासारखा" विचार करू शकेल ना सहज!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 07/11/2013 - 13:40

Permalink

बाईकने गाडीला ठोकून बदला

बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्‍या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम
अरे त्यांच्या प्रत्येक कथेत हेच घडते .. सुरुवात वेगळी शेवट हाच. नशीब समज.. यावेळी गाडी पुलावरून खाली पडली नाही , फक्त भरपूर नुकसानच झाले .. बहुधा नायकाकडे स्कुटी असावी
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 07/12/2013 - 14:14

In reply to बाईकने गाडीला ठोकून बदला by स्पा

Permalink

अपघात महत्वाचा.

अपघात महत्वाचा. मागे एक तै इथे त्यांच्या बहुतेक कथेत ट्रक खाली कोणालातरी चिरडुन मारायच्या.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 07/11/2013 - 13:42

Permalink

http://www.misalpav.com/node

http://www.misalpav.com/node/23045 हीच ती कथा बहुतेक =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/11/2013 - 14:03

In reply to http://www.misalpav.com/node by स्पा

Permalink

येस येस हीच

येस येस हीच =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on गुरुवार, 07/11/2013 - 14:19

Permalink

अरेरे

उदयोन्मुख लेखकांना नाऊमेद करणार्‍या स्पा, बॅटॅ, मुनी आणि दिपक ह्या खलप्रवॄत्तींचा जाहीर निषेध. ह्या अशाच लोकांमुळे माझा लेखकराव होता होता राहिला. त्यावेळी नावं वेगळी होती पण प्रवॄत्ती हीच.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on गुरुवार, 07/11/2013 - 14:43

In reply to अरेरे by आदिजोशी

Permalink

काय हे आदि

मी आत्ता अगदि हेच म्हणायला आलो होतो......एनी वे माझं नाव वगळुन तुझ्या मताशी सहमत फ्क्त आपल्यात काय लिखाणाची ताकद नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 07/11/2013 - 14:25

Permalink

l

=)l
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on गुरुवार, 07/11/2013 - 14:51

Permalink

मित्रा मंदार

कथेतल्या नायकाचा अ‍ॅक्सीडेंट केलाच आहेस तर काय काय दुखापत झाली ते पण सवीस्तर लिहि काय आहे प्लॅस्टिक सर्जन डॉ. मुळे नीलेशला जीवदान कोणत्या स्वरुपात मिळाले तर शेवट समजायला सोपा जाईल. शीवाय कारचा ईन्सुरस होता ना बाबा? काय आहे दुचाकि/चारचाकि चालवणार्‍यांच पहिलं प्रेम कार त्यांची बाईक/कार असते आणि मग पत्नी!
  • Log in or register to post comments

Submitted by मी_आहे_ना on गुरुवार, 07/11/2013 - 15:10

In reply to मित्रा मंदार by दिपक.कुवेत

Permalink

पहिलं प्रेम?

म्हणजे तुम्हाला तो निलेश दुसरं प्रेम असफल झाल्यानं निराश होता असं म्हणायचंय का??
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 07/11/2013 - 16:16

Permalink

प्रयत्न चांगला होता पण...

पहिले पाच परिच्छेद वाचून कथा वाचतोय कि तळीराम पुराण वाचतोय हेच कळत नव्हतं.
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on गुरुवार, 07/11/2013 - 16:31

In reply to प्रयत्न चांगला होता पण... by किसन शिंदे

Permalink

.

यादीत ह्यांचे पण नाव अ‍ॅड करावे अशी संपादक मंडळाला विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 07/11/2013 - 16:38

In reply to . by आदिजोशी

Permalink

(No subject)

:P
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on गुरुवार, 07/11/2013 - 16:47

Permalink

=) =) +००००

हम्म! जिच्या जिवावर उठला तिनेच प्राणदान दिले. नीलेशला टाळायचा तिचा निर्णय अतिशय योग्य होता हेच यातुन स्पष्ट होते.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on गुरुवार, 07/11/2013 - 18:30

Permalink

नीलेश टेन्शन मध्ये का होता?

नीलेश टेन्शन मध्ये का होता? घराबाहेर पडू नये अस त्याला का वाट्त होतं?
कारण तो गुरुवार होता ,आणि गुरुवारी तो पीत नसे....
मागच्या वेळी तुमच्याच कथेत बाईक जीप ला ठोकून जीप पुलात पडलेली ना smiley
मागच्या वेळी बाईकच्या ठोकरीने शुकला चे स्टेयरिंग वरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे जीप नदीत पडली होती.
बाईकने गाडीला ठोकून बदला घेण्याचा विचारच किती भन्नाट विनोदी आहे. असे विचार सुचणार्‍या तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम
दोन्ही वेळी बदला घेण्याचा विचार करणारा नायक fully drunk होता. ...........थंडी आणि वारा यांचा एकत्रित इफेक्ट झाला आणि ओल्ड मंकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली .नीलेशचा स्वत:च्या विचारांवर अजिबात कंट्रोल नव्हता . गाडी चालवण्याऐवजी आपण हवेतून उडत आहोत,असेच त्याला वाटू लागले.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on गुरुवार, 07/11/2013 - 18:37

In reply to नीलेश टेन्शन मध्ये का होता? by मंदार कात्रे

Permalink

;)

एकदा कडाक्याच्या थंडीमध्ये ओल्ड मंक च्या दोन क्वार्टर पिऊन भरधाव बाइक चालवून बघा ............. वारा जसा कानात भरतो तशी ओल्ड मंक मेंदूत भिनू लागते..................! -स्रोत-बेवड्याचे बायबल .लेखक - सुधाकर तळीरामपूरकर आणि बोकाजी बेवडे!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/12/2013 - 02:42

In reply to ;) by मंदार कात्रे

Permalink

फेकू नका हो काका!

च्यायला! ओम बसल्याजागी दणका देते..ग्लासाचा तळ दिसेदिसेतो. दोन क्वार्टर ओम सलग मारुन बाईकपर्यंत गेल्यावर बोंबलायला किल्ली लावायला इगिन्शन स्विचच सापडत नाय पैले धा मिंटं. वार्‍यासोबत चढते ती व्होडका. रम नव्हे. रम जास्त झाल्यावर तोंडावर सोडा मारुन वार्‍याला बसवायची जुनी पध्दत आहे...पंधरा मिनिटं असं वारं तोंडावर घेऊन झालं की मग उदरभरण केल्यावर पोरं जाग्यावर येतात. गोष्टीच्या डिटेलिंगमध्ये लै गडबड झालीये. येकडाव नवं ड्राफ्टिंग मारुन बघा राव. -आजीवन सचिव, आर्य मदिरा मंडळ
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 07/12/2013 - 02:58

In reply to फेकू नका हो काका! by धमाल मुलगा

Permalink

किंवा...

>> येकडाव नवं ड्राफ्टिंग मारुन बघा राव. -- किंवा धम्यासोबत रम आणि व्होडका कधी, का, व कशी उतरते हे प्रत्यक्ष्य बघायला एक-दोन बैठका होऊन जाऊ दे (अर्थात, कथा लेखकाची स्पॉन्सरशीप ;) ) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/12/2013 - 03:21

In reply to किंवा... by अर्धवटराव

Permalink

हा हा हा!!!

बघायला की अनुभवायला? ;) साला खूप वर्षं लोटली, ओमची बैठकच नाय झाली, चवही विसरायलाशी झालीये. येताव काय दोस्तहो? हैऽऽ तिच्यायला! करु मज्जाऽऽ :) चतकोरराव -रेडी टु ड्रिंक
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 07/12/2013 - 03:42

In reply to हा हा हा!!! by धमाल मुलगा

Permalink

लोल

चतकोरराव -रेडी टु ड्रिंक --> पुढील बैठकीत पहिल्या पेगला हे आठवुन ठसका लागेपर्यंत हसणार हे नक्की =)) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/12/2013 - 18:56

In reply to लोल by अर्धवटराव

Permalink

:)

म्हणजे आमचा प्रयत्न सार्थकी लागणार तर. हसत रहा, हसवत रहा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/12/2013 - 11:08

In reply to हा हा हा!!! by धमाल मुलगा

Permalink

रेडी टु ड्रिंक>>

रेडी टु ड्रिंक>> =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Fri, 07/12/2013 - 10:24

In reply to फेकू नका हो काका! by धमाल मुलगा

Permalink

ड्राफ्टींगच्या आधी ओमचा दणका

ड्राफ्टींगच्या आधी ओमचा दणका बसला असेल तर?? डीटेलिंगमध्ये गडबड होणारच :-) कात्रेजी हलकेच घ्या..
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 07/12/2013 - 19:03

In reply to ड्राफ्टींगच्या आधी ओमचा दणका by बाळ सप्रे

Permalink

खी खी खी...

मला मात्र उलटं वाटतं. ओमच्या कृपेनं एकदा तार लागली म्हणजे पहिल्या ड्राफ्टिंगमध्येच ष्टुरी तयार. फू बाई फू चे स्किट्स लिहिताना पंचेस येण्यासाठी म्हणे नेहमीची ग्लेन ड्रमॉन्ड सोडून ओमची साधना करायचे आमचे लेखकूमित्र. हो ना रे अ‍ॅड्या? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sun, 07/14/2013 - 21:25

In reply to फेकू नका हो काका! by धमाल मुलगा

Permalink

अगदी बरोबर.. कमीत कमी कथा

अगदी बरोबर.. कमीत कमी कथा लिहण्याआधी एकदा ओम भरपूर प्यायची होती.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 07/12/2013 - 02:55

Permalink

एकदम सॉल्लीड कथा.

स्व. जसपाल भट्टींचा फ्लॉपशो आठवला. त्यात भट्टीसाहेब हॉरर सिरियल(का सिनेमा) बनवतात व त्याला सर्वोत्कृष्ट विनोदी सिरीयल(का सिनेमा)चं पारितोषीक मिळतं. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 07/12/2013 - 05:29

Permalink

आधीची कथा दणकट बांध्याची होती

आधीची कथा दणकट बांध्याची होती ना? यावेळच्या कथेत दामिनीला फारशी दुखापत झाली नसल्याने कार दणकट दिसतीये. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 07/13/2013 - 16:28

In reply to आधीची कथा दणकट बांध्याची होती by रेवती

Permalink

आधीची कथा दणकट बांध्याची होती

आधीची कथा दणकट बांध्याची होती ना? यावेळच्या कथेत दामिनीला फारशी दुखापत झाली नसल्याने कार दणकट दिसतीये.
लॉजीक चुकलं रेवती..... दामिनी दणकट बांध्याची होती असे म्हणायला पाहिजे
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on Fri, 07/12/2013 - 10:39

Permalink

आई शप्पथ

मंदार मामा, काय खतरनाक लोजिक आहे. ------नीलेश टेन्शन मध्ये का होता? घराबाहेर पडू नये अस त्याला का वाट्त होतं? ---------कारण तो गुरुवार होता ,आणि गुरुवारी तो पीत नसे.... अवांतर : मिपावर आगामी धागा :"दारु पितांना तुम्ही वार पाळता का ?"
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 07/12/2013 - 13:39

In reply to आई शप्पथ by नि३सोलपुरकर

Permalink

वार

काय काय करताना वार पाळायचे ..याचा कोष्टक बनवून प्रसिद्ध केल पायजे
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Fri, 07/12/2013 - 14:06

Permalink

पुढच्या कथेत कात्रे बहुधा

पुढच्या कथेत कात्रे बहुधा स्वत:च्याच गाडीवर स्वतःचीच बाइक चढवणार. किंवा गाडीमध्ये बाइक घालुन नदीत ड्गकलुन देणार. त्यावेळेस त्यात निलेश, रमेश सुरेश तिघेही असणार बहुधा.
  • Log in or register to post comments

Submitted by टिलू on Fri, 07/12/2013 - 18:32

Permalink

रात्री साडे अकरा वाजता

एवढ्या रात्री पॉश गाडी तून दामिनी एकटीच कुठे गेली होती/चालली होती?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 07/12/2013 - 19:11

Permalink

हार्ट सर्जन जीव वाचवू शकेल.

हार्ट सर्जन जीव वाचवू शकेल. पोटाचा सर्जन जीव वाचवू शकेल, प्लास्टीक सर्जरीने जीव कसा वाचू शकेल हे इथले कोणी जाणकार सांगु शकेल का? तदमाताय .... हे म्हणजे एकता कपूरची सिरीयल वाटायला लागलीय. ढॅण्ण........... ढॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण ........ ढॅण्ण........... ढॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sat, 07/13/2013 - 11:15

Permalink

नस

अपघातात हाताची नस कापली .... फाटली असेल :-)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 07/13/2013 - 16:30

Permalink

त्या लॉजीकवर टेलर देखील जीव

त्या लॉजीकवर टेलर देखील जीव वाचवू शकेल प्यान्ट फाटली ती त्याने शिवून दिली. त्यामुळे प्यान्टच्या शिवणी मध्ये पाय अडकून पडला नाही. अपघात टळला .जीव वाचला. सही: सही रे सही. भरली माझी वही
  • Log in or register to post comments

Submitted by भावना कल्लोळ on Sat, 07/13/2013 - 17:31

Permalink

ये क्या हो रहा है?

काय खतरनाक चिरफाड केली आहे सर्व मिपा बंधूनी, पहिल्या जन्मी सर्वजण सर्जन व्हता का रा बंधुनो? काहि तरी सर्जनशीलता (सज्जनशीलता) दाखवा, किती ते नामोहरम… वाचवत नाही हो … बाकी अजून प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 07/13/2013 - 17:53

In reply to ये क्या हो रहा है? by भावना कल्लोळ

Permalink

ही घ्या सर्जनशीलता. अर्थात

ही घ्या सर्जनशीलता. अर्थात आमच्या अल्पमती प्रमाणे http://misalpav.com/node/25166
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 07/15/2013 - 04:08

In reply to ये क्या हो रहा है? by भावना कल्लोळ

Permalink

सर्वजण सर्जन व्हता का

सर्वजण सर्जन व्हता का व्हय जी! पन कोंच्या प्रकारचे ते म्हायतीये का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sat, 07/13/2013 - 20:47

Permalink

च्यायला,

हे ओल्ड मंक (ओम) आहे तरी काय? सगळे एवढी तारीफ करताहेत त्याची? एकदा गावठी पिऊन बघा, कशी नशा होते ते. रस्त्यावरची गाडी काय, आपण आकाशात विमान चालवतो आहोत असे वाटते, च्यामायला.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 07/15/2013 - 04:09

In reply to च्यायला, by भाते

Permalink

आपण आकाशात विमान चालवतो आहोत

आपण आकाशात विमान चालवतो आहोत झाऽऽऽलं, मिळाली नवीन कल्पना! आता बघाच फुडल्या ष्टोरीत काय होतय!
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 07/15/2013 - 14:25

In reply to आपण आकाशात विमान चालवतो आहोत by रेवती

Permalink

बाईक आणि विमान

पुढच्या वेळी ते बाईकने विमानाला धडक देणार.. गवि , टंकनिकेला बोलवा ...नविन ष्टूरी येणार आहे ..विमान अपघाताची
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com