Skip to main content

नि:शब्द (कथा)

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 10/07/2013 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्या संध्याकाळी घरातून निघतानाच नीलेश टेन्शन मध्ये होता ... आज गुरुवार होता, संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करून स्तोत्र म्हटल्यावर आज घराबाहेर पडू नये असे तीव्रतेने वाटत होते. पण रमेशचा फोन पुन्हा आला तेव्हा साडेसात झाले होते. ...येतोस ना, मी वाट बघतोय...... रमेश आणि नीलेश ची दोस्ती अगदी कॉलेज पासूनची. नीलेश एका कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये अकाऊंटंट होता . मुंबईतली कार्गो लोजीस्टिक्स मधली नोकरी सोडून गेली 2/3 वर्षे आपल्याच गावशेजारी असलेल्या कंपनीत स्थिरावला होता. रमेश गेली दोन वर्षे सौदीला काढून सुट्टीवर आला होता . त्याची पिण्याच्या दृष्टीने सौदीला दोन वर्षे चांगलीच उपासमार झाली होती. त्यामुळे तिथी-वार-सण-उत्सव याची कसलीही फिकीर न करता तो पीत असे. नीलेश चे मात्र तसे नव्हते. नीलेश ही प्यायचा ,पण महिन्यातून 3-4 वेळा , तेही फक्त रविवार –बुधवारीच ... तो तसा धार्मिक होता. पण लग्न होत नसल्याचे टेन्शन कधीकधी असह्य होई,आणि मग त्याला नाइलाजाने बारचा रस्ता धरावा लागे. रमेशचा फोन आला तसा बाईकला किक मारून नीलेश निघाला. आईने विचारलेही……अरे आता रात्रीचा कुठे निघालास ?..रमेशने भेटायला बोलावले आहे ,लगेच येतो परत ..... असे आईला सांगून नीलेश निघाला .... घरापासून बारचे अंतर पंधरा मिनिटात कापून तो बारवर पोहोचला . रमेश आधीच आला होता. मग गप्पांची मैफिल जमली, आणि त्या नादात किती पेग झाले ,त्याचे भान कुणालाच राहिले नाही. नीलेशची एक क्वार्टर ची नेहमीची मर्यादा कधीच ओलांडली गेली होती. डिसेंबर महिना, थंडी आपले रंग दाखवू लागली होती. म्हणून आज ओल्ड मंक होती. एव्हाना साडेदहा झाले होते ,आणि दोघांनीही प्रत्येकी तीन क्वार्टर च्या वर ओल्ड मंक संपवली होती. आता पुरे ....म्हणून बारच्या मॅनेजरनेच त्यांना थांबवले,आणि बार बंद करायचं आहे ,असे सांगून दोघांना उठवले ... मग शेजारच्याच चायनीज गाडीवर ट्रिपल राईस खाल्ला आणि रमेशला घरी सोडून नीलेशने बाइक आपल्या गावाच्या रस्त्याला वळवली . साडेअकरा झाले, एव्हाना थंडी चांगलीच जाणवू लागली होती. गावाकडच्या रस्ता माळरानवरून जात असल्याने वारा सुद्धा भन्नाट लागत होता. थंडी आणि वारा यांचा एकत्रित इफेक्ट झाला आणि ओल्ड मंकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली .नीलेशचा स्वत:च्या विचारांवर अजिबात कंट्रोल नव्हता . गाडी चालवण्याऐवजी आपण हवेतून उडत आहोत,असेच त्याला वाटू लागले. इतक्यात समोरून एक पॉश कार आली. आणि दामिनी कार चालवत होती. ... दामिनी ........... नीलेशने दामिनीला 4-5 वर्षापूर्वी लग्नासाठी विचारले होते... तो कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिच्या प्रेमात होता ... पण एकतर्फीच .... त्याला ती खूप आवडायची ... त्याच्या स्वप्नांची राणी तीच होती.... पण..पण... जेव्हा त्याने तिला विचारले ,तेव्हा तिने साफ उडवून लावले.... नीलेश खूप खोलवर दुखावला गेला....तिचा नकार त्याला पचला नाही. प्रेमभंगाचे दू:ख त्याला पेलले नाही. यापुढे लग्न/प्रेम या गोष्टींवर विचारच करायचं नाही ,असे त्याने ठरवून टाकले..... आणि आत्ता , या अवस्थेत तीच दामिनी समोरून कार चालवत येत होती. चांगला डॉक्टर नवरा मिळाला होता तिला ,त्याचीच आलीशान कार घेवून ती निघाली होती... हॉस्पिटल नधून नवर्या.चा फोन आला होता... आज उशिरापर्यंत थांबावे लागणार होते... त्याच्यासाठी जेवण घेवून ती निघाली होती..... आपल्या सगळ्या दू:खाला ही दामिनीच जबाबदार आहे, असा विचार नीलेशच्या मनावर गारुड करू लागला... बदला घे तिचा....... मार मार ................ विचारांचा स्फोट झाला मेंदूत ...................आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने बाइक तुफानी वेगात सरळ कारवर चढवली...................... जाग आली तेव्हा नीलेश हॉस्पिटल मध्ये होता ....रमेश समोर बसला होता ,आई पायाशी रडत बसली होती. अपघातात त्याच्या उजव्या हाताची नस कापली गेली होती.गेले चार दिवस तो बेशुद्ध होता . कारचे फार नुकसान झाले असले तरी दामिनीला मात्र जास्त दुखापत झाली नव्हती. सुदैवाने तिने नवर्याेला फोन करून अम्ब्युलंस मागवली, आणि नीलेशला हॉस्पिटल मध्ये आणले. मग दामिनीच्या नवर्यावने त्याच्या प्लॅस्टिक सर्जन मित्राला बोलावून ऑपरेशन केले . ...आणि नीलेशला जीवदान मिळाले होते...... थोड्याच वेळात दामिनी आणि तिचा डॉक्टर नवराही तिथे आला . नीलेश ने त्यांचे आभार मानले. पण हताश डोळ्यांनी तो दामिनीकडे बघत राहिला ............. जिला आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल दोषी ठरवून मारायला निघालो होतो...........तिच्यामुळेच आज मृत्युच्या दारातून आपण परत आलो.............हे समजल्यावर नक्की काय बोलावे तेच त्याला कळत नव्हते...........................!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32061
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by मराठी कथालेखक

कथेबद्दल जराही तिर्कस कमेंट सहन करता येत नसेल तर अवघड आहे. विशेषतः इथे या कथेवरचे प्रतिसाद पाहिले तर कारण लक्षात येईल.

In reply to by बॅटमॅन

कथेबद्दल जराही तिर्कस कमेंट सहन करता येत नसेल तर अवघड आहे. विशेषतः इथे या कथेवरचे प्रतिसाद पाहिले तर कारण लक्षात येईल.
मला कमेंट सहन करता येत नाही वगैरे अनुमान काढू नये. माझ्या कथेवर कमेंट करण्यासाठी तिचा धागा आहे ना , तिथे कितीही तीव्र कमेंट आली तरी ते मी समजू शकतो. पण इतर ठीकाणी मी काही लिहिले असेल तर त्यावर कमेंट करताना माझ्या त्या कथेचा संदर्भ ओढुन ताणुन जोडणे न समजण्यासारखे आहे.

वो मराठी कथालेखक राव तुम्च्जी कथा एवढी बी भारी नवती कि इजुभौंचे संतुलन बिन्तुलन बिघडल. "मोकालाया दाही दिशा " ह्येच्या एवढी तुमच्या कथेमदी कीचक नाय बगा !

नि:शब्द वर प्रतिसाद द्यायला त्याचा सगळा इतिहास भुगोल माहित पाहिजे. नाहीतर मिपावर नवीन असलेल्यांचा असा लोचा होतो.

In reply to by भाते

कोणत्याही लेखनावर (खास करुन ते ललित लेखन असेल तर) त्यावर प्रतिक्रिया देताना कोणताही इतिहास, भूगोल माहित असणे गरजेचे आहे असे मला वाटत नाही. तसेच सदस्य मिपावर नवीन आहे की जुना याने काही फरक पडत नाही. मिपा हे केवळ एक व्यासपीठ आहे. ती पोस्ट कुठेही असू शकते. मंदार यांची ही कथा वाचून मला जे वाटले ते मी व्यक्त केले, त्याकरिता मला त्यांच्या जुन्या लेखनाचा अभ्यास करायची गरज नाही. झालंच तर त्यांना माझी प्रतिक्रिया अनुचित वाटली असे जाणवत नाही. तरी मला हा निरर्थक वाद वाढविण्यात रस नाही. मी मंदार यांना जे सुचविले त्या मुद्यांवर अधिक काही चर्चा करायला आवडेल.

एखादी कथा तितकीशी दर्जेदार नाही वाटली आपल्याला,म्हणून त्या लेखकालाच दर्जाहीन (?) ठरवण्याचा इतका अट्टाहास ? मिपा सदस्यान्कडून हे अपेक्षित नव्हते . माझ्या इतर कथान्चा सन्ग्रह इसाहित्य प्रतिश्ठान तर्फे २ महिन्यापुर्वी प्रकाशित झाला ,त्याला भरघोस आनि चान्गला प्रतिसाद मिळाला ,हे इथे नमूद करू इच्छितो . http://www.esahity.com/2013/09/blog-post_28.html मी इत्के दिवस मजा म्हणून घेत होतो, पण टवाळक्या आणि कुचाळक्याच करायच्या असतील ,तर नेट वर येताच कशाला राव?

टवाळक्या, कुचाळक्या नको तर नेट वर लिहुच्च नये मु ळा त. तरी बर अजुन दुध सागर, सद्दाम, मोठ्या विचारी लोकांणी अजुन लक्ष घातलेले दिसत नै.

पति-पत्नी रथाची दोन चाके. दोन्ही असली, तरच संसाराचा रथ चालणार, तद्वत या दोन्ही 'निशब्द' कथा आहेत. एक-दुसर्‍याशिवाय अधुर्‍या. दोन्ही वाचल्यावरच खरा वाचनानंद लाभणार. http://www.misalpav.com/node/25166

एखादी किरकोळ कथा वाचून मानसीक संतुलन बिघडण्याइतके कोणी इथे असेल असे वाटत नाही. बाकी माझी प्रतिक्रीया या कथेत काय भर टाकता येईल याच्यासंदर्भात होती. नवर्‍याला/ बायकोला पट्ट्याने बडवणार्‍या कथा केवळ एखाद्याचीच मक्तेदारी असेल असे मी तरी मानत नाही. एखाद्याला काय आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लिहीणाराने लिहीत जावे. टीका झाली तर ती हसतखेळत घ्यावी. जर टीका बोचरी वाटत असेल तर अभीव्यक्तीचा आग्रह ठेवू नये ही अम्मळ सूचना. असो. रच्याकने माझे मानसीक संतुलन हरवलेय हा शोध लावल्याबद्दल "वाढदिवसाच्या शुभेच्छा"..

In reply to by विजुभाऊ

रच्याकने माझे मानसीक संतुलन हरवलेय हा शोध लावल्याबद्दल "वाढदिवसाच्या शुभेच्छा"..
:ड :ड

In reply to by विजुभाऊ

टीका झाली तर ती हसतखेळत घ्यावी. जर टीका बोचरी वाटत असेल तर अभीव्यक्तीचा आग्रह ठेवू नये ही अम्मळ सूचना.
काय टीका करायची ना ती माझ्या कथेच्या धाग्यावर येवून करावी... कुठेपण उगाचच कुरापत काढण्यात काय धन्यता. असो. आता हा निरर्थक वाद मला वाढवायचा नाही. या धाग्यावर फक्त या (म्हणजे नि:शब्द) कथेबद्दल बोलायला /सकारात्मक चर्चा करायला मला आवडेल.

या कथेत मी कुठेही तुम्च्या कथेचा संदर्भ थेट दिलेला नाही. कथेत काही अ‍ॅड करण्यासाठीची ती सूचना होती. त्यामुळे कोणाला मिरच्या झोंबण्याचे कारण नव्हते. अवांतर : या कथेवर एक विडंबन लिहून दुसरा स्वतन्त्र कथेचा धागा काढला गेला होता http://misalpav.com/node/25166 या कथेच्या कथालेखकाने तो धागा हसतखेळत घेतला. सकारात्मक चर्चेबद्दल.... या धाग्यावर ओल्डमंक च्या कीक बद्दल चर्चा झालेली आहे. फक्त एका कॉमेन्ट्स मुळे जर कुरापत काढली असे वाटत असेल तर मग बोलणेच खुंटले. असो. मलादेखील असल्या कुरापतखोरीत इन्टरेस्ट नाहिय्ये. सकारात्मक म्हणायचेच असेल तर "या पुढे माझ्याकडून हा विषय बंद" हे सकारात्मक वाक्य.