त्या संध्याकाळी घरातून निघतानाच नीलेश टेन्शन मध्ये होता ... आज गुरुवार होता, संध्याकाळी देवाजवळ दिवाबत्ती करून स्तोत्र म्हटल्यावर आज घराबाहेर पडू नये असे तीव्रतेने वाटत होते. पण रमेशचा फोन पुन्हा आला तेव्हा साडेसात झाले होते. ...येतोस ना, मी वाट बघतोय......
रमेश आणि नीलेश ची दोस्ती अगदी कॉलेज पासूनची. नीलेश एका कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये अकाऊंटंट होता . मुंबईतली कार्गो लोजीस्टिक्स मधली नोकरी सोडून गेली 2/3 वर्षे आपल्याच गावशेजारी असलेल्या कंपनीत स्थिरावला होता. रमेश गेली दोन वर्षे सौदीला काढून सुट्टीवर आला होता . त्याची पिण्याच्या दृष्टीने सौदीला दोन वर्षे चांगलीच उपासमार झाली होती. त्यामुळे तिथी-वार-सण-उत्सव याची कसलीही फिकीर न करता तो पीत असे.
नीलेश चे मात्र तसे नव्हते. नीलेश ही प्यायचा ,पण महिन्यातून 3-4 वेळा , तेही फक्त रविवार –बुधवारीच ... तो तसा धार्मिक होता. पण लग्न होत नसल्याचे टेन्शन कधीकधी असह्य होई,आणि मग त्याला नाइलाजाने बारचा रस्ता धरावा लागे.
रमेशचा फोन आला तसा बाईकला किक मारून नीलेश निघाला. आईने विचारलेही……अरे आता रात्रीचा कुठे निघालास ?..रमेशने भेटायला बोलावले आहे ,लगेच येतो परत ..... असे आईला सांगून नीलेश निघाला .... घरापासून बारचे अंतर पंधरा मिनिटात कापून तो बारवर पोहोचला . रमेश आधीच आला होता. मग गप्पांची मैफिल जमली, आणि त्या नादात किती पेग झाले ,त्याचे भान कुणालाच राहिले नाही. नीलेशची एक क्वार्टर ची नेहमीची मर्यादा कधीच ओलांडली गेली होती.
डिसेंबर महिना, थंडी आपले रंग दाखवू लागली होती. म्हणून आज ओल्ड मंक होती. एव्हाना साडेदहा झाले होते ,आणि दोघांनीही प्रत्येकी तीन क्वार्टर च्या वर ओल्ड मंक संपवली होती. आता पुरे ....म्हणून बारच्या मॅनेजरनेच त्यांना थांबवले,आणि बार बंद करायचं आहे ,असे सांगून दोघांना उठवले ... मग शेजारच्याच चायनीज गाडीवर ट्रिपल राईस खाल्ला आणि रमेशला घरी सोडून नीलेशने बाइक आपल्या गावाच्या रस्त्याला वळवली .
साडेअकरा झाले, एव्हाना थंडी चांगलीच जाणवू लागली होती. गावाकडच्या रस्ता माळरानवरून जात असल्याने वारा सुद्धा भन्नाट लागत होता. थंडी आणि वारा यांचा एकत्रित इफेक्ट झाला आणि ओल्ड मंकने आपले रंग दाखवायला सुरुवात केली .नीलेशचा स्वत:च्या विचारांवर अजिबात कंट्रोल नव्हता . गाडी चालवण्याऐवजी आपण हवेतून उडत आहोत,असेच त्याला वाटू लागले. इतक्यात समोरून एक पॉश कार आली. आणि दामिनी कार चालवत होती. ...
दामिनी ........... नीलेशने दामिनीला 4-5 वर्षापूर्वी लग्नासाठी विचारले होते... तो कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिच्या प्रेमात होता ... पण एकतर्फीच .... त्याला ती खूप आवडायची ... त्याच्या स्वप्नांची राणी तीच होती.... पण..पण... जेव्हा त्याने तिला विचारले ,तेव्हा तिने साफ उडवून लावले.... नीलेश खूप खोलवर दुखावला गेला....तिचा नकार त्याला पचला नाही. प्रेमभंगाचे दू:ख त्याला पेलले नाही. यापुढे लग्न/प्रेम या गोष्टींवर विचारच करायचं नाही ,असे त्याने ठरवून टाकले.....
आणि आत्ता , या अवस्थेत तीच दामिनी समोरून कार चालवत येत होती. चांगला डॉक्टर नवरा मिळाला होता तिला ,त्याचीच आलीशान कार घेवून ती निघाली होती... हॉस्पिटल नधून नवर्या.चा फोन आला होता... आज उशिरापर्यंत थांबावे लागणार होते... त्याच्यासाठी जेवण घेवून ती निघाली होती.....
आपल्या सगळ्या दू:खाला ही दामिनीच जबाबदार आहे, असा विचार नीलेशच्या मनावर गारुड करू लागला... बदला घे तिचा....... मार मार ................ विचारांचा स्फोट झाला मेंदूत ...................आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने बाइक तुफानी वेगात सरळ कारवर चढवली......................
जाग आली तेव्हा नीलेश हॉस्पिटल मध्ये होता ....रमेश समोर बसला होता ,आई पायाशी रडत बसली होती. अपघातात त्याच्या उजव्या हाताची नस कापली गेली होती.गेले चार दिवस तो बेशुद्ध होता . कारचे फार नुकसान झाले असले तरी दामिनीला मात्र जास्त दुखापत झाली नव्हती. सुदैवाने तिने नवर्याेला फोन करून अम्ब्युलंस मागवली, आणि नीलेशला हॉस्पिटल मध्ये आणले. मग दामिनीच्या नवर्यावने त्याच्या प्लॅस्टिक सर्जन मित्राला बोलावून ऑपरेशन केले . ...आणि नीलेशला जीवदान मिळाले होते......
थोड्याच वेळात दामिनी आणि तिचा डॉक्टर नवराही तिथे आला . नीलेश ने त्यांचे आभार मानले. पण हताश डोळ्यांनी तो दामिनीकडे बघत राहिला ............. जिला आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल दोषी ठरवून मारायला निघालो होतो...........तिच्यामुळेच आज मृत्युच्या दारातून आपण परत आलो.............हे समजल्यावर नक्की काय बोलावे तेच त्याला कळत नव्हते...........................!
वाचने
32061
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा छान जमलीये कथा....
मागच्या वेळी तुमच्याच कथेत
स्पा...
In reply to मागच्या वेळी तुमच्याच कथेत by स्पा
चांगला प्रयत्न
पण
सुरेश कुठे आहे ?
जयेश नि राजेश!!
In reply to सुरेश कुठे आहे ? by कपिलमुनी
काय रे बाईक्वाल्या पोरांनो,
हान तिज्यायला
अगदी अगदी!
In reply to हान तिज्यायला by आदिजोशी
बाईकने गाडीला ठोकून बदला
अपघात महत्वाचा.
In reply to बाईकने गाडीला ठोकून बदला by स्पा
http://www.misalpav.com/node
येस येस हीच
In reply to http://www.misalpav.com/node by स्पा
अरेरे
काय हे आदि
In reply to अरेरे by आदिजोशी
l
मित्रा मंदार
पहिलं प्रेम?
In reply to मित्रा मंदार by दिपक.कुवेत
प्रयत्न चांगला होता पण...
.
In reply to प्रयत्न चांगला होता पण... by किसन शिंदे
(No subject)
In reply to . by आदिजोशी
=) =) +००००
नीलेश टेन्शन मध्ये का होता?
;)
In reply to नीलेश टेन्शन मध्ये का होता? by मंदार कात्रे
फेकू नका हो काका!
In reply to ;) by मंदार कात्रे
किंवा...
In reply to फेकू नका हो काका! by धमाल मुलगा
हा हा हा!!!
In reply to किंवा... by अर्धवटराव
लोल
In reply to हा हा हा!!! by धमाल मुलगा
:)
In reply to लोल by अर्धवटराव
रेडी टु ड्रिंक>>
In reply to हा हा हा!!! by धमाल मुलगा
ड्राफ्टींगच्या आधी ओमचा दणका
In reply to फेकू नका हो काका! by धमाल मुलगा
खी खी खी...
In reply to ड्राफ्टींगच्या आधी ओमचा दणका by बाळ सप्रे
अगदी बरोबर.. कमीत कमी कथा
In reply to फेकू नका हो काका! by धमाल मुलगा
एकदम सॉल्लीड कथा.
आधीची कथा दणकट बांध्याची होती
आधीची कथा दणकट बांध्याची होती
In reply to आधीची कथा दणकट बांध्याची होती by रेवती
आई शप्पथ
वार
In reply to आई शप्पथ by नि३सोलपुरकर
पुढच्या कथेत कात्रे बहुधा
रात्री साडे अकरा वाजता
हार्ट सर्जन जीव वाचवू शकेल.
नस
त्या लॉजीकवर टेलर देखील जीव
ये क्या हो रहा है?
ही घ्या सर्जनशीलता. अर्थात
In reply to ये क्या हो रहा है? by भावना कल्लोळ
सर्वजण सर्जन व्हता का
In reply to ये क्या हो रहा है? by भावना कल्लोळ
च्यायला,
आपण आकाशात विमान चालवतो आहोत
In reply to च्यायला, by भाते
बाईक आणि विमान
In reply to आपण आकाशात विमान चालवतो आहोत by रेवती
एकदा रजनीकांत नेटवर आपलेच
In reply to बाईक आणि विमान by कपिलमुनी
काय खतरा लिहितोस, भाऊ..
च्यायला, तीन क्वर्टर
In reply to काय खतरा लिहितोस, भाऊ.. by चिगो
तेच ना राव
In reply to च्यायला, तीन क्वर्टर by सोत्रि
मंदार
या कथेचा शेवट
दया ! रिसबुड दया!
In reply to या कथेचा शेवट by lakhu risbud
हो आणि मग....
In reply to या कथेचा शेवट by lakhu risbud
तो अर्धमागधी मधे डॉ. होता.
म्हंजे नक्की काय? मागधीचा
In reply to तो अर्धमागधी मधे डॉ. होता. by विजुभाऊ
च्या मारी...
छान
माताय पुन्हा एकादा भैताड
एका प्रसंगाला कथेचा आत्मा करणं टाळा
धन्यवाद
In reply to एका प्रसंगाला कथेचा आत्मा करणं टाळा by मराठी कथालेखक
अरे हो दामिनी रमेश ला
थोडी विश्रांती घ्या बरं वाटेल...
In reply to अरे हो दामिनी रमेश ला by विजुभाऊ
>>>तुमचे मानसिक संतुलन
In reply to थोडी विश्रांती घ्या बरं वाटेल... by मराठी कथालेखक
जिथल्या प्रतिक्रिया तिथेच द्याव्यात ना...
In reply to >>>तुमचे मानसिक संतुलन by प्यारे१
+१११११११११११११११११११११११११११११
In reply to >>>तुमचे मानसिक संतुलन by प्यारे१