✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं

अ
अक्षया यांनी
Tue, 01/29/2013 - 18:37  ·  लेख
लेख
मिसळलेला काव्यप्रेमी यांनी लहानपणीचा आठवणींचा पेटारा उघडलाच आहे तर त्याच अनुषंगाने. आत्ता आचानक मुकद्दर का सिकंदर मधले 'ओ साथी रे...तेरे बीना भी क्या जीना' गाणे मी ऐकले आणि लिहावेसे वाटले. हे गाणे ऐकले आणि मला लहानपणी उन्हाळ्याचा सुट्टीत वाड्यात सगळे एकत्र खेळायचो ते दिवस आठवले. तेंव्हा हा चित्रपट आणि हे गाणे खुपच फेमस झाले होते आणि सतत कानावर पडत असे. हे गाणे आंणि ते दिवस याची मन आपोआपच सांगड घालते. तेंव्हा एकत्र घालवलेले ते क्षण ते सवंगडी यांची आठवण येते. आता ते सवंगडी बरोबर नसले ते दिवस नसले तरी हे गाणे ऐकले की ते सगळे स्पष्ट डोळ्यासमोर उभे रहाते. प्रत्येकाचा मनात एखाद्या गाण्याचे विशेष स्थान असते. गाणे कोणतेही असो ते विशिष्ट गाणे ऐकले की मन प्रसन्न होते, गहिवरते, आठवणींचा जगात नेते असे एक तरी गाणे प्रत्येकाचा आयुष्यात असतेच. ते आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जाते. त्याचे आपल्याशी जोडलेले नाते कधीच तुटत नाही. अस आठवणीतले गाणे ‘माझे गाणे’ असे आपल्याला वाटते. आपण ते कधी कोणासमोर व्यक्त केलेले असते कधी नसते. ते गाणे एकदम कुठे ऐकले की आपण स्तब्ध होतो काही क्षणापुरते का होईना भावनीक होतो. ‘असे आठवणीतले गाणे’ मी तुमचा बरोबर शेअर करते आहे.. तुम्ही पण तुमच्या मनातील तुमचे ते विशेष गाणे शेअर करा…
  • गाण्याची आठवण.. आठवणीतलं गाणं.. (भाग २ )

Book traversal links for गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं

  • गाण्याची आठवण.. आठवणीतलं गाणं.. (भाग २ ) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
40533 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

@ मोदक अरे बरीच गाणी आहेत !

मदनबाण
Wed, 05/29/2013 - 10:18 नवीन
@ मोदक अरे बरीच गाणी आहेत ! घोडा सापडला, पण रेनडीअर आणि ती बाई काही सापडेना ! आजची काही वेगळी गाणी...
  • Log in or register to post comments

सगळि गाणी एकसो एक आहेत

दिपक.कुवेत
Wed, 05/29/2013 - 11:40 नवीन
पण ईथे तुनळि दिसत नाहि त्यामुळे स्वःतच गुणगुणुन समाधान मानतोय. वेल ह्या निमित्ताने गैरफिल्मी पण गाणी येउद्यात. कुवेतमधील जयवीच्या (जयश्रि अंबासकर) कवीतांना मधे देवकि पंडित, स्वप्निल बांदोडकर आणि वैशाली सामंत ह्यानी स्वरबध्द केलेली. ती सगळि गाणी तर छान आहेतच पण त्यातलं देवकि पंडितनी गायलेलं 'तुझा हळवा पाउस आज आठवतो मला' हे मला खुपच आवडतं. मुसळधार बरसणार्‍या पाउसात आपल्या आवडत्या व्यक्तिची आठवण आली नाहि तर नवलच! कुणी लिंक दिली तर जरुर एका.
  • Log in or register to post comments

१:४२ ते १:४५ मधील मुव्हमेंटस

मदनबाण
Wed, 05/29/2013 - 16:09 नवीन
१:४२ ते १:४५ मधील मुव्हमेंटस पाहुन जीव गेला... ;) बाकी गाणं केवळ अप्रतिम ! ;)
  • Log in or register to post comments

layer_detailpage">http://www

प्यारे१
Wed, 05/29/2013 - 16:18 नवीन
http://www.youtube.com/watch?v=FH7OXblvPg8&feature=player_detailpage हे एक नंबर.
  • Log in or register to post comments

बॉम्बे मधलं तू ही रे आहे.

प्यारे१
Wed, 05/29/2013 - 16:23 नवीन
बॉम्बे मधलं तू ही रे आहे. कुणीतरी दुरुस्त करा प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बॉम्बे मधलं तू ही रे आहे.

अक्षया
Wed, 05/29/2013 - 16:33 नवीन
  • Log in or register to post comments

मी हे गाणे किती वेळा हि एकू

भावना कल्लोळ
Wed, 05/29/2013 - 16:44 नवीन
मी हे गाणे किती वेळा हि एकू शकते …
  • Log in or register to post comments

तुनळीची लिंक का येत नाही आहे,

भावना कल्लोळ
Wed, 05/29/2013 - 16:46 नवीन
तुनळीची लिंक का येत नाही आहे, बाय द वे, तनु वेड मनु मधले रंगरेज हे गाणे.
  • Log in or register to post comments

तनु वेड मनु मधले रंगरेज :)

अक्षया
Wed, 05/29/2013 - 16:51 नवीन
  • Log in or register to post comments

जरा रिमिक्स करतो... ;)

मदनबाण
Wed, 05/29/2013 - 17:55 नवीन
  • Log in or register to post comments

आता मोदकाने आयटम साँगला संगीत

मदनबाण
Wed, 05/29/2013 - 18:20 नवीन
आता मोदकाने आयटम साँगला संगीत प्रेमामुळे फाट्यावर मारलेलचं आहे तर्...माझही संगीत प्रेम उफाळुन आलं ! ;)
  • Log in or register to post comments

जस्ट चेक आउट...

मदनबाण
Wed, 05/29/2013 - 21:01 नवीन
  • Log in or register to post comments

आज अनेक वर्षांनी हे गाणं ऐकल...

मदनबाण
Wed, 05/29/2013 - 21:45 नवीन
कोणी ऐकल होतं का हे गाणं आधी ?
  • Log in or register to post comments

मायबोलीने सुरू करावं..

मैत्र
Wed, 05/29/2013 - 22:12 नवीन
पहिली दोन गाणी मुक्तामधली आहेत. संगीत - आनंद मोडक, गीते नाधोंची आणि गायली आहेत जयश्री शिवराम यांनी वळण वाटातल्या जाईजुईचा गंध मातीला धुंद होते शब्द सारे - उत्तरायण संगीत - अमर्त्य राहूल, गीत - कौस्तुभ सावरकर वर सर्वांनी दिल्याप्रमाणे तूनळीचा preview इथे दिसेल अशी सोय कुठे आहे.
  • Log in or register to post comments

मैत्रा - तूनळीच्या दुव्यावर

मोदक
Wed, 05/29/2013 - 22:30 नवीन
मैत्रा - तूनळीच्या दुव्यावर राईट क्लिक करून COPY EMBED CODE असा ऑप्शन सिलेक्ट कर आणि तो कोड येथे पेस्ट कर. शिंपल! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

गाण्याची अठवण---

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/30/2013 - 00:25 नवीन
गाण्याची अठवण--- दिवाळिची सुट्टी...मावशीच्या घरी-दादरला दादासाहेब फाळके रोडवरिल चाळ... तिथली मागच्या बाजुची बांधकाम अर्धवट र्‍हायलं म्हणून तयार झालेली ओपन टेरेस-गच्ची...अगदी गार नसला,तरी भरपूर वारा ,समोर काहि अंतरावरून जाणार्‍या लोकल्स...वेळ संध्याकाळी ५:३० ते ६:३० ची आणी गच्चिवर तिथले कुणी एक काका लांब एरियलचा ट्रांझिस्टर(की कॅसेट प्लेअर? अठवत नाही) घेऊन एका कोपर्‍यात ''हवा'' खात गाणी ऐकायला आलेले...आणी त्यावेळी लागलेलं गाणं,,,''माना हो तुम बेहद हंसी,वैसे बुरे हम भी नही...'' मला त्या गच्चीत एकतर समोरून त्या धावत जाणार्‍या लोकल ट्रेन्सचं प्रचंड आकर्षण होतं..आणी त्या धरतिवर मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं आणी लव्ह अ‍ॅट फस्ट साइट सारखं मला ते कायम अठवणीत र्‍हायलं,नंतर जेंव्हा जेंव्हा म्हणून मी हे गाणं ऐकलं तेंव्हा तेंव्हा मी आपोआप त्या गच्ची मध्ये गेलेलो आहे. अजुनही जातो. गाण्यांच्या अश्या अठवणी खूप आहेत..पण आज ही पहिली... अठवणितलं गाणं----
  • Log in or register to post comments

(No subject)

मदनबाण
गुरुवार, 05/30/2013 - 09:32 नवीन
  • Log in or register to post comments

वा खुप नविन नविन गाणी ऐकायला आणि पहायला मिळत आहेत.

अक्षया
गुरुवार, 05/30/2013 - 10:08 नवीन
वा खुप नविन नविन गाणी ऐकायला आणि पहायला मिळत आहेत. :)
  • Log in or register to post comments

(No subject)

मदनबाण
गुरुवार, 05/30/2013 - 11:02 नवीन
  • Log in or register to post comments

Anaida

मदनबाण
गुरुवार, 05/30/2013 - 15:25 नवीन
Anaida Suchitra Alisha Chinoy
  • Log in or register to post comments

(No subject)

मदनबाण
Fri, 05/31/2013 - 11:17 नवीन
  • Log in or register to post comments

वो हसीन दर्द दे दो

कोमल
Fri, 05/31/2013 - 20:49 नवीन
  • Log in or register to post comments

थॅक्स "को" तू दिलेल हे गाणं

मदनबाण
Sat, 06/01/2013 - 10:39 नवीन
थॅक्स "को" तू दिलेल हे गाणं मी पहिल्यांदाच ऐकल... गाणं गाण्यातली जपानी गुडीया आणि तिचा तो पंखा पाहुन खालचं गाण पहावसं वाटलं ! दोन्ही गाण्यात ज्यॉय मुखर्जी आहे हे विशेष ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

आठवणीतली गाणी..

चिगो
Sun, 06/02/2013 - 00:15 नवीन
लिंक्स शेयर करता येत नाही, पण काही गाणी.. १)"कल दिल दुखाया था मैनें तुम्हारा" (तेजाब).. गाणं आवडत वगैरे नाही, पण हे गाणं मी नेहमी "कंदिल दुखाया था" असं म्हणायचो लहानपणी, म्हणून आठवतंय.. २) "लिये सपने निगाहों में, चला हुं तेरी राहो में" (मशाल).. आयुष्यातल्या एका कठीण फेजमध्ये हे गाणं माझं "अँथम" होतं.. ३) "तू बीन बताए मुझे ले चल कहीं" (रंग दे बसंती) सुंदर गाणं, सुरेख आठवणी.. ह्याच चित्रपटातलं "लुकाछुपी बहुत हुई" अत्यंत आर्ततेनं मनाला भिडणारं, आणि " अभी अभी हुआ यकीन" हे एकदम जोशीलं गाणं.. ४) "चांदण्यात फिरतांना माझा धरलास हात", आणि "तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही" ही गाणी अभ्यासाचा दट्ट्या आणि प्रेमात भारलेलं मन, ह्यांच्या कात्रीत सापडलेली तीन वर्षे पुन्हा समोर घेऊन येतात.. थँकफुली, "तुझ्या माझ्यासवे" मधलं शेवटचं कडवं आमच्यापुरतं गैरलागू.. ;-) "आओगे जब तुम ओ साजना" आणि "तुम से ही" (जब वी मेट) ही गाणीही ह्याचमुळे जास्त आवडीची.. ५) आता आवडती गाणी "पहला नशा पहला खुमार" "खामोशीयां गुनगुनाने लगी" (वन टू का फोर) "गुंजी सी है सारी फिजा, आओ ना" (क्यु हो गया ना) "रंगरेज" (तनु वेड्स मनु) "कितने दफे दिल ने कहा" (त.वे.म) "नादान परींदे" (रॉकस्टार) (ह्यातील बहुतेक सगळीच) "नेव्हर से नेव्हर" (कराटे कीड चित्रपटाचे जस्टीन बीबरच्या आवाजातले थीम साँग) "यु कॅन पुट द ब्लेम ऑन मी" (अकॉन) "अँड आय डोंट वॉना मिस अ थिंग" (एरोस्मिथ : आर्मागेडन थीम साँग) "लेट्स मेक अ नाईट टू रिमेंबर", "हॅव यु एव्हर लव्ड अ वुमन" "कट्स लाइक नाईफ" इ. ब्रायन अ‍ॅडम्स लोबोची गाणी "इफ टूमारो नेव्हर कम्स" रोनॅन किटींग आणखीही बरीच आहेत, येतील हळूहळू...
  • Log in or register to post comments

आठवणीतली गाणी..

चिगो
Sun, 06/02/2013 - 00:15 नवीन
लिंक्स शेयर करता येत नाही, पण काही गाणी.. १)"कल दिल दुखाया था मैनें तुम्हारा" (तेजाब).. गाणं आवडत वगैरे नाही, पण हे गाणं मी नेहमी "कंदिल दुखाया था" असं म्हणायचो लहानपणी, म्हणून आठवतंय.. २) "लिये सपने निगाहों में, चला हुं तेरी राहो में" (मशाल).. आयुष्यातल्या एका कठीण फेजमध्ये हे गाणं माझं "अँथम" होतं.. ३) "तू बीन बताए मुझे ले चल कहीं" (रंग दे बसंती) सुंदर गाणं, सुरेख आठवणी.. ह्याच चित्रपटातलं "लुकाछुपी बहुत हुई" अत्यंत आर्ततेनं मनाला भिडणारं, आणि " अभी अभी हुआ यकीन" हे एकदम जोशीलं गाणं.. ४) "चांदण्यात फिरतांना माझा धरलास हात", आणि "तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही" ही गाणी अभ्यासाचा दट्ट्या आणि प्रेमात भारलेलं मन, ह्यांच्या कात्रीत सापडलेली तीन वर्षे पुन्हा समोर घेऊन येतात.. थँकफुली, "तुझ्या माझ्यासवे" मधलं शेवटचं कडवं आमच्यापुरतं गैरलागू.. ;-) "आओगे जब तुम ओ साजना" आणि "तुम से ही" (जब वी मेट) ही गाणीही ह्याचमुळे जास्त आवडीची.. ५) आता आवडती गाणी "पहला नशा पहला खुमार" "खामोशीयां गुनगुनाने लगी" (वन टू का फोर) "गुंजी सी है सारी फिजा, आओ ना" (क्यु हो गया ना) "रंगरेज" (तनु वेड्स मनु) "कितने दफे दिल ने कहा" (त.वे.म) "नादान परींदे" (रॉकस्टार) (ह्यातील बहुतेक सगळीच) "नेव्हर से नेव्हर" (कराटे कीड चित्रपटाचे जस्टीन बीबरच्या आवाजातले थीम साँग) "यु कॅन पुट द ब्लेम ऑन मी" (अकॉन) "अँड आय डोंट वॉना मिस अ थिंग" (एरोस्मिथ : आर्मागेडन थीम साँग) "लेट्स मेक अ नाईट टू रिमेंबर", "हॅव यु एव्हर लव्ड अ वुमन" "कट्स लाइक नाईफ" इ. ब्रायन अ‍ॅडम्स लोबोची गाणी "इफ टूमारो नेव्हर कम्स" रोनॅन किटींग आणखीही बरीच आहेत, येतील हळूहळू...
  • Log in or register to post comments

फिल कॉलिन्सचा-बट सिरियसली..

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/02/2013 - 01:43 नवीन
फिल कॉलिन्सचा-बट सिरियसली...जिओ जान से अवडणारा अल्बम...आणी त्यातली ही जास्त अवडणारी गाणी :) Phil Collins - Another Day In Paradise Phil Collins - I Wish It Would Rain
  • Log in or register to post comments

और आहिस्ता किजिये बाते...

मदनबाण
Fri, 06/14/2013 - 21:35 नवीन
  • Log in or register to post comments

liked..

विसोबा खेचर
Sat, 06/15/2013 - 12:35 नवीन
liked..
  • Log in or register to post comments

होगा तुमसे प्यारा कौन

मदनबाण
Sat, 06/15/2013 - 19:07 नवीन
  • Log in or register to post comments

क्या मौसम है. चल कही दूर निकल जाये...

अक्षया
गुरुवार, 06/27/2013 - 15:57 नवीन
  • Log in or register to post comments

अक्षया तुम्ही या धाग्याचा

मदनबाण
गुरुवार, 06/27/2013 - 17:20 नवीन
अक्षया तुम्ही या धाग्याचा दुसरा भाग काढा. तसेच पुढील भागात व्हिडीयोची साईज 400 X 300 (अंदाजे) अशी द्यायची विनंती (सर्व व्हिडीयो टाकणार्‍यांना करा.) हा धागा बर्‍याच वेळी क्रॅश होतो आहे,त्यामुळे इतरांनी दिलेली गाणी पाहणे आणि ऐकणे शक्य होत नाही. :( तेव्हा कॄपया नवा धागा काढा...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा