✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं

अ
अक्षया यांनी
Tue, 01/29/2013 - 18:37  ·  लेख
लेख
मिसळलेला काव्यप्रेमी यांनी लहानपणीचा आठवणींचा पेटारा उघडलाच आहे तर त्याच अनुषंगाने. आत्ता आचानक मुकद्दर का सिकंदर मधले 'ओ साथी रे...तेरे बीना भी क्या जीना' गाणे मी ऐकले आणि लिहावेसे वाटले. हे गाणे ऐकले आणि मला लहानपणी उन्हाळ्याचा सुट्टीत वाड्यात सगळे एकत्र खेळायचो ते दिवस आठवले. तेंव्हा हा चित्रपट आणि हे गाणे खुपच फेमस झाले होते आणि सतत कानावर पडत असे. हे गाणे आंणि ते दिवस याची मन आपोआपच सांगड घालते. तेंव्हा एकत्र घालवलेले ते क्षण ते सवंगडी यांची आठवण येते. आता ते सवंगडी बरोबर नसले ते दिवस नसले तरी हे गाणे ऐकले की ते सगळे स्पष्ट डोळ्यासमोर उभे रहाते. प्रत्येकाचा मनात एखाद्या गाण्याचे विशेष स्थान असते. गाणे कोणतेही असो ते विशिष्ट गाणे ऐकले की मन प्रसन्न होते, गहिवरते, आठवणींचा जगात नेते असे एक तरी गाणे प्रत्येकाचा आयुष्यात असतेच. ते आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जाते. त्याचे आपल्याशी जोडलेले नाते कधीच तुटत नाही. अस आठवणीतले गाणे ‘माझे गाणे’ असे आपल्याला वाटते. आपण ते कधी कोणासमोर व्यक्त केलेले असते कधी नसते. ते गाणे एकदम कुठे ऐकले की आपण स्तब्ध होतो काही क्षणापुरते का होईना भावनीक होतो. ‘असे आठवणीतले गाणे’ मी तुमचा बरोबर शेअर करते आहे.. तुम्ही पण तुमच्या मनातील तुमचे ते विशेष गाणे शेअर करा…
  • गाण्याची आठवण.. आठवणीतलं गाणं.. (भाग २ )

Book traversal links for गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं

  • गाण्याची आठवण.. आठवणीतलं गाणं.. (भाग २ ) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
40533 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

सत्यम शिवम सुंदरा

श्रीरंग_जोशी
Wed, 01/30/2013 - 08:31 नवीन
हे गाणे आम्हाला पहिलीत असताना म्हणवले जात असे. त्याचे बोल आठवले की आजही रोमांच उभे राहते... या धाग्यामूळे चित्रफीत प्रथमच पाहिली पण तो परिणाम मात्र अजिबात जाणवला नाही...
  • Log in or register to post comments

चाळीतल्या आमच्या घराशेजारी एक

किसन शिंदे
Wed, 01/30/2013 - 08:59 नवीन
चाळीतल्या आमच्या घराशेजारी एक काका राहायचे त्यांच्याकडे भालजी पेंढारकरांच्या सगळ्या चित्रपटांच्या गाण्याच्या कॅसेट्स होत्या. येता जाता ती सगळी गाणी कानावर पडली अनं मनात कुठेतरी खुप खोलवर रूजली. केव्हाही जावं आणि टेपरेकॉर्डर चालू करून ती गाणी ऐकावीत. 'वाट पाहूनी जीव शिणला' किंवा 'अखेरचा हा तुला दंडवत' सारखी सगळी आर्त गाणी त्या लहान वयातही प्रचंड आवडू लागली होती. आज भालजीं पेंढारकरांच्या कुठल्याही चित्रपटातलं कोणतंही गाणं ऐकलं कि ते काका आणि त्यांच्याजवळ असलेल्या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटाच्या बहुमोल अश्या कॅसेट्स आठवतात. अंवातराबद्दल क्षमस्व पण..
आत्ता आचानक मुकद्दर का सिकंदर मधले 'ओ साथी रे...तेरे बीना भी क्या जीना' गाणे मी ऐकले आणि लिहावेसे वाटले.
हे वाचलं अनं आम्हाला गविंच मुकंदर का सिकंदर? हे आठवलं. :)
  • Log in or register to post comments

चांगला विषय..

ह भ प
Wed, 01/30/2013 - 10:30 नवीन
तूनळी वर जाऊन आवडत्या गाण्याची ध्वनीचित्रफीत शोधून मग बघण्यापेक्षा हा धागा सतत बघितला तरी हौस भागवता येईल.. धन्स अक्षयाजी... :)
  • Log in or register to post comments

गाणी सदोदित ऐकत असल्याने

इनिगोय
Wed, 01/30/2013 - 10:45 नवीन
गाणी सदोदित ऐकत असल्याने गाण्याशी जोडलेल्या आठवणी म्हणण्यापेक्षा प्रत्येक आठवणीशी जोडलेलं एक गाणं सापडेल :) कधीही गाणं गात नसताना एका घरगुती कार्यक्रमात कोणत्याही पूर्वतयारीशिवाय 'या जन्मावर या जगण्यावर' गायलं होतं. आजही ते ऐकलं की त्यावेळी जगण्यावर खरोखरच दाटून आलेलं प्रेम आणि त्यामुळे मनापासून गायलं गेलेलं ते गाणं जसंच्या तसं आठवतं. 'स्वये श्रीराम प्रभू ऐकती' चे सूर कानावर पडले की मुंबईत झालेला बाबुजींचा सत्कार आठवतो. त्यावेळी स्वाक्षरी घेताना अगदी जवळून दिसलेले कर्मयोगी बाबूजी आठवतात. ही आणि अशी अनेक..
  • Log in or register to post comments

'भूल'

प्रभाकर पेठकर
Wed, 01/30/2013 - 17:03 नवीन
पूर्वीच्या काळी माध्यमि़क शालान्त परीक्षेचे निकाल वर्तमानपत्रात छापून यायचे. आपला आसन क्रमांक त्यात शोधताना हृदय धडधडायचं. वर्तमानपत्र घरपोच असले तरी तो पर्यंत धीर निघायचा नाही. रेल्वे स्थानकावर जाऊन आपला वर्तमानपत्रवाला हुडकून आपले वर्तमानपत्र त्याच्याकडून ताब्यात घ्यायचे आणि धडधडत्या छातीने आसन क्रमांक शोधायचा. असा तणावपूर्ण प्रसंग असायचा. माझा आसनक्रमांक शोधताना शेजारच्या उपहारगृहातील रेडियोवर 'रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना भूल कोई हमसे ना हो जाएSSSSS' असे आराधना चित्रपटाचे गाणे लागले होते. वर्तमानपत्रात निकाल पाहिला आणि माझ्याकडून कोणतीही (अभ्यासाच्या बाबतीत) 'भूल' झाली नाही हे सांगायला घराकडे धूम ठोकली होती.
  • Log in or register to post comments

रिमझिम गिरे सावन

मूकवाचक
Mon, 02/11/2013 - 23:33 नवीन
  • Log in or register to post comments

One song I recall is not from

स्वप्निल घायाळ
Mon, 02/18/2013 - 17:44 नवीन
One song I recall is not from any movie but one of my favorite Serial "Friends" This song reminds me of my college days...
  • Log in or register to post comments

मा़झे आवडते गाणे

आप्पा
Wed, 02/20/2013 - 11:39 नवीन
http://www.youtube.com/watch?v=7rzWRxTFcuA
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

अक्षया
Wed, 02/20/2013 - 11:50 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आप्पा

डायरेक्ट युट्युब ची लिंक इकडे

नानबा
Wed, 02/20/2013 - 12:25 नवीन
डायरेक्ट युट्युब ची लिंक इकडे कशी देतात? मी लिंक देतोय तर पेज चा पत्ता दाखवतो इकडे. :(
  • Log in or register to post comments

युट्युब चा व्हिडिओवर जा...

अक्षया
Wed, 02/20/2013 - 12:40 नवीन
तिथे 'शेअर' बटण वर क्लिक करा मग 'एंबेड' वर क्लिक करा. तिथे जी लिंक येईल ती इथे पोस्ट करा म्हणजे व्हिडिओ दिसेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

खाली अक्षयाने सांगितलेच आहे,

ग्रेटथिन्कर
Sat, 02/23/2013 - 17:59 नवीन
खाली अक्षयाने सांगितलेच आहे, फक्त FULL HTML सिलेक्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

ते गाणं सुंदर वगैरे असतं असं

खटासि खट
Wed, 02/20/2013 - 23:49 नवीन
ते गाणं सुंदर वगैरे असतं असं नाही, पण तरीही आपल्यासाठी खास असतं. बालपणीच्या स्मृतींना उजाळा देणारी गोष्ट गहीवर आणतेच..
  • Log in or register to post comments

हो नक्कीच :)

अक्षया
गुरुवार, 02/21/2013 - 10:36 नवीन
आठवणींमुळे ते गाणे आपल्याला जवळचे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

मस्त धागा!

पैसा
गुरुवार, 02/21/2013 - 10:53 नवीन
नेमकं कोणतं गाणं घ्यावं आणि कोणाला मागे ठेवावे हे निश्चित करता येणार नाही. पण लहान असताना रात्रीच्या वेळी आईची सगळी कामं आटपली की आम्ही घराच्या अंगणात बसून रेडिओवर विविधभारतीवरची गाणी ऐकत असू ते लख्ख डोळ्यासमोर उभं राहिलं. गावातलं घर. भोवताली आंब्याची नारळाची झाडं, बाजूला दोणीतल्या पाण्याचा थंडावा आणि घराच्या लाकडी रेज्यांतून येणारा अर्धवट उजेड. त्या उजेडात घर हसतंय असं वाटायचं आणि या सगळ्या उबदार वातावरणात वडिलांना चिकटून बसलेली आम्ही भावंडं...
  • Log in or register to post comments

भोवताली आंब्याची नारळाची झाडं

गवि
गुरुवार, 02/21/2013 - 11:00 नवीन
भोवताली आंब्याची नारळाची झाडं, बाजूला दोणीतल्या पाण्याचा थंडावा आणि घराच्या लाकडी रेज्यांतून येणारा अर्धवट उजेड.
बास गो पैसाताई आता.. फारच आठवणी येतात. आता विश्वास बसत नाही की कधीतरी आपण भरलेल्या डोणीत डुंबत बसण्याइतके लहान होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पैसाताईंनी एकदम बालपणात नेलं

अक्षया
गुरुवार, 02/21/2013 - 11:04 नवीन
आठवण फार छान लिहिलीत पैसाताई.. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आभारी आहोत अक्षया ता,आवडती

kanchanbari
गुरुवार, 02/21/2013 - 11:37 नवीन
आभारी आहोत अक्षया ता,आवडती गाणी असंख्य आहे पण http://youtu.be/EvdTOHZHQEA हे गाण मनाला निरागस बाळाची आठवण करुन देते मन उधान उधान त्याले नाही कशाची सर गाणे आठवनीतले सारे वाहे काळ्जाचे नीर
  • Log in or register to post comments

अक्षया, छान धागा.

अस्मी
Sat, 02/23/2013 - 17:23 नवीन
अक्षया, छान धागा. आठवणीतील गाणी तशी खूप आहेत. त्यातील एक म्हणजे कॉलेजला जातानाची. कॉलेजला जाताना सकाळी लवकर एसटी ने जावं लागायचं, तेव्हा गाडीतली सगळीजणं आजूबाजूच्या गावातील आणि तशी ओळखीची होती. आमची गाडी पण तशी खासंच होती :) टीपिकल एसटी; तिला त्या गणपतीतल्या सजवायच्या माळा लावलेल्या आणि तिचं नाव ठेवलेलं 'धाडस'!! कारण त्या गाडीच्या मागे तसं लिहीलेलं होतं :P आमच्या धाडसमध्ये एक टेपरेकॉर्डर होता आणि त्यावर रोज एकच गाणं लावलेलं असायचं...तेच रोज म्हणत, ऐकत आम्ही ३ वर्ष प्रवास केला... ते गाडीत लोंबकळत म्हणलेलं ते (पूर्ण पाठ झालेलं ;)) गाणं 'छोटा सफर हो..लंबा सफर हो सूनी डगर हो या मेला...' अजूनही लक्षात आहे... धन्यवाद अक्षया...आज त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
  • Log in or register to post comments

वा अस्मी :)

अक्षया
Wed, 02/27/2013 - 10:39 नवीन
छान आठवण शेअर केल्या बद्द्ल धन्यवाद. तीन वर्षे रोज एकच गाणे ऐकणे म्हणजे चांगलेच धाडस आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्मी

पुन्हप्रत्यय

रमेश आठवले
Sat, 02/23/2013 - 17:54 नवीन
संगीताचा आनंद हा पुन्हप्रत्ययाचा आनंद असतो असे म्हणतात. मला सचिनदेव बर्मन यांचे गायलेले किंवा संगीत बद्ध केलेले गाणे पहिल्या ऐकण्यात विशेष आवडत नसे परंतु ते जसे जसे पुन्हा पुन्हा ऐकावे तसे तसे जास्त मधुर वाटत जाते.
  • Log in or register to post comments

गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं

फिरंगी
Sat, 02/23/2013 - 21:01 नवीन
अमरप्रेम मधील सर्व गाणी अशीच आठवणीत ठेवणयाजोगी आहेत
  • Log in or register to post comments

आठवणीतली गाणी

पैसा
Mon, 05/27/2013 - 20:28 नवीन
आदुबाळ आणि मदनबाण यांच्यासाठी हा धागा खास. सोबत मला आवडणारं एक गाणं इथे देतेय. "जॉनी मेरा नाम" सिनेमातलं. सिनेमा क्लायमॅक्सकडे जातानाचं. लताचे सूर पकड घेणारे आहेतच. पण हेमामालिनीच्या डौलदार नृत्यामुळे तितकंच प्रेक्षणीय. "चुप चुप मीरा रोये"
  • Log in or register to post comments

ठांकु ठांकु...

मदनबाण
Mon, 05/27/2013 - 20:39 नवीन
ठांकु ठांकु... माझ्या गाण्यांच्या यादीची सुरुवात या गाण्यापासुन करतो... ;)
  • Log in or register to post comments

हे वरील गाणं मला विशेष आवडतं

मदनबाण
Mon, 05/27/2013 - 20:50 नवीन
हे वरील गाणं मला विशेष आवडतं कारण या गाण्यातल्या काही लोकेशन्सवर मी फिरलो आहे,आणि फोटु सुद्धा काढले आहेत. गाण्यात दिसणार्‍या फुलांचे देखील्,तलावाचे देखील.गाणं आवडतं याच्या अनेक कारणां पैकी हे एक. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

क्या बात!

इनिगोय
Mon, 05/27/2013 - 21:32 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

वाद्यसंगीत आणि कंठसंगीताची

आदूबाळ
Mon, 05/27/2013 - 21:30 नवीन
वाद्यसंगीत आणि कंठसंगीताची जुगलबंदी नेहेमीच रंगते असं नाही. कंठसंगीत श्रोत्याला चट्कन अपील होतं. त्यामानाने वाद्यसंगीत अ‍ॅबस्ट्रॅक्ट असतं. अशा जुगलबंदीत बर्‍याचदा गायकाला जास्त दाद मिळते आणि वादक नकळत 'साथ करणार्‍याच्या' भूमिकेत जातो. तो नाजूक तोल सांभाळणं सगळ्यांनाच जमत नाही. असा उत्तम समतोल असलेलं हे एक गाणं/वाजवणं. "बाजो रे मौंदरवा" ही शुद्ध कल्याण रागातली एक प्रसिद्ध बंदिश आहे. गायक आहेत जयतीर्थ मेवुंडी आणि बासरीवादक आहेत प्रवीण गोडखिंडी.
  • Log in or register to post comments

अप्रतिम जुगलबंदी

रमेश आठवले
Mon, 05/27/2013 - 22:59 नवीन
अप्रतिम जुगलबंदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हे माझं आवडतं गाणं. किशोरसाठी

इनिगोय
Mon, 05/27/2013 - 21:40 नवीन
हे माझं आवडतं गाणं. किशोरसाठी, अमिताभसाठी. आणि एके काळी मुंबईला आणखी देखणी बनवत बरसणार्‍या देखण्या पावसासाठी..
  • Log in or register to post comments

+१

कोमल
Tue, 05/28/2013 - 09:50 नवीन
पाऊस सुरू झाला की सर्वात पहिल्यांदा हेच गाणं मनात झंकारू लागतं.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

हे आमच्या पिढीतले

मोदक
Wed, 05/29/2013 - 11:49 नवीन
हे आमच्या पिढीतले ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

लहानपणी हा सिनेमा पाहिला होता

मदनबाण
Mon, 05/27/2013 - 23:00 नवीन
लहानपणी हा सिनेमा पाहिला होता (शेहनषाह)तेव्हा हे गाणं पाहिल होत ते कायम लक्षात राहिल्.यातल संगीत्,आणि टाळ्यांचा गाण्यात केलेला वापर मला फार आवडले. या गाण्याचे लोकेशन सुद्धा मला फिरायला मिळाले. :) ज्या तलावात अमिताभ आणि मिनाक्षी यांनी बोटींग केले,त्याच तलावात मी सुद्धा बोटींग केले. काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ ) काही क्षण टिपलेले... ३ (Pykara Lake २ ) हे वरचे फोटो खालच्या गाण्यात शोधा... ;)
  • Log in or register to post comments

खुदा गवाह या चित्रपटातील मला

मदनबाण
Tue, 05/28/2013 - 08:31 नवीन
खुदा गवाह या चित्रपटातील मला २ गाणी जास्त आवडतात... एक म्हणजे तू न जा रे मेरे बादशाह आणि दुसरे म्हणजे तू मुझे कबुल.हे गाणं तस बर्‍यापैकी मोठं आहे,या गाण्यातली एक ओळ फार आवडते,ती अशी :-हो कोई गुलाम चाहे बादशाह इश्क के बिगर जिंदगी गुनाहं. हा चित्रपट म्हणे काबुल मधे सलग १० आठवडे हाउसफुल चालला होता. :)
  • Log in or register to post comments

हे गाणं आवडायला काही वेगळ

मदनबाण
Tue, 05/28/2013 - 08:58 नवीन
हे गाणं आवडायला काही वेगळ कारण हवं ?
  • Log in or register to post comments

किशोर कुमार यांनी गायलेली ही

मदनबाण
Tue, 05/28/2013 - 09:16 नवीन
किशोर कुमार यांनी गायलेली ही दोन गाणी १) जब चाहा यारा तुमने आखाँ से मारा तुमने २) जितने भी करले सितम. जितने भी करले सितम याची २ व्हर्जनस आहेत. एक किशोरदांनी गायलेले आणि दुसरे आशा भोसले यांनी गायलेले.दोन्ही इथे देत आहे,पण यातील मला किशोर कुमार यांनीच गायलेल आहे...हे गाण जरा जास्त वेगवान आहे.संगीत तर अफलातुन !
  • Log in or register to post comments

क्या यही प्यार है ? ;)

मदनबाण
Tue, 05/28/2013 - 09:31 नवीन
संजुबाबा सध्या जेलयात्रेवर आहेत्,त्याच्या पहिल्या चित्रपटातील हे गाणं मात्र फार आवडतं.
  • Log in or register to post comments

वरील गाण्याचे बोल आहेत क्या

मदनबाण
Tue, 05/28/2013 - 09:45 नवीन
वरील गाण्याचे बोल आहेत क्या यही प्यार आहे... असेच पण संपूर्ण वेगळे गाणं माझं आवडतं आहे... जरास संथ पण क्या यही प्यार है ? हेच विचारणार ! ;) हे गाणं कमाल खान ने गायलं आहे. हो हाच तो कमाल खान ज्याने ओ ओ जाने जाने जाना गायलं आहे. गाणं फक्त ३ मिनीटांच आहे,तरी मला आवडतं. तेरा मेरा प्यार ! ;) तेरा मेरा प्यार अमर... हे अप्रतिम गाण तर सगळ्यांनाच ठावुक आहे पण कुमार सानु यांनी गायलेल एक गोड गाणं मला फार आवडतं... गाण तर सुंदरच आहे, पण व्हिडीयो देखील तितकाच सुंदर आहे. यातला गिटारचा वापर मला फारच आवडला. आता वरती जराशी २ संथ गाणी दिल्यावर एक वेगवान गाणं इथे दिल्या शिवाय मला राहवत नाही. तूम बीन या चित्रपटातलं सुरु रु रु हे गाणं आवडण्यासारखचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मस्त धागा

कोमल
Tue, 05/28/2013 - 09:52 नवीन
खूपच भारी खजीना मिळाला आहे असं वाटत आहे.. आणि मबा त्यात एक एक रत्नं वाढवत जात आहेत.. मी पण येते माझ्या आठवणींतिल गाणी घेऊन.. :)
  • Log in or register to post comments

रंग दे बसंती

मीउमेश
Tue, 05/28/2013 - 10:45 नवीन
तसा मी काहि नविन गाण्याचा शौकीन नाहि, पण रंग दे बसंती चित्रपटातले तु बिन बताए मुझे ले चल कही हे गाण काळिजाचे तुकडे तुकडे करुन टाकतॅ. डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राह्त नाही. प्रत्तेकाच एखादे गाण आवड्ण्यासाटी काहितरि कारण असतच!
  • Log in or register to post comments

जमुना के तीर

रमेश आठवले
Tue, 05/28/2013 - 10:58 नवीन
आपआपल्या फर्माईश ची गाणी सर्वजण देत आहेत. त्यातच हे माझे योगदान - अब्दुल करीमखान यांनी अजरामर करून ठेवलेली आणि किराणा घराण्याची खास मानली जाणारी ही प्रसिद्ध ठुमरी कुमार गंधर्व यांनी १९७५ च्या सवाई गंधर्व सम्मेलनात खास गायला निवडली होती. भीमसेन जोशी रसिकांमध्ये बसून ऐकताना दिसतात. https://www.youtube.com/watch?v=_wq_HaTqkTM
  • Log in or register to post comments

आता जरा साउथ ट्रॅक पकडावा

मदनबाण
Tue, 05/28/2013 - 11:09 नवीन
आता जरा साउथ ट्रॅक पकडावा म्हणतो... गाणी कुठल्याही भाषेतली असोत देशातली असोत ती मला आवडतात. :)
  • Log in or register to post comments

वाह !! एका पेक्षा एक छान गाणी शेअर करता आहात सगळे..

अक्षया
Tue, 05/28/2013 - 11:28 नवीन
वाह !! एका पेक्षा एक छान गाणी शेअर करता आहात सगळे.. अजुन येवुद्यात. :)
  • Log in or register to post comments

mujhse juda hokar mp3

पूनम शर्मा
Tue, 05/28/2013 - 17:22 नवीन

mujhse juda hokar mp3 download
  • Log in or register to post comments

ही गाणी मला का आवडली ते ती

मदनबाण
Tue, 05/28/2013 - 18:05 नवीन
ही गाणी मला का आवडली ते ती पाहिल्यावर कळेलच... अधिक इथे :-Meet Alaa Wardi, the Bolly magician!
  • Log in or register to post comments

सध्या गाजत असलेल गाणं...

मदनबाण
Tue, 05/28/2013 - 18:44 नवीन
सध्या गाजत असलेल गाणं... रिक्षाच आणि कशा कशाच टेंशनु ते तिलाच ठावुक ! ;)
  • Log in or register to post comments

अ र्र र्र र्र... हा धागा कसा

मोदक
Tue, 05/28/2013 - 18:52 नवीन
अ र्र र्र र्र... हा धागा कसा सुटला नजरेतून...?? एकदा चॅनेल सर्फिंग करताना अचानक हे गाणे पाहण्यात आले होते व लगेचच विसरले गेले. आठवत होती एक फ्रेम आणि एक ओळ - "पाहतो जेंव्हा तुला मी, गझल उमटे अंतरी.." त्यावेळी नक्की काय गुगल काय करावे हाही एक प्रश्न होता, अचानक बर्‍याच वर्षांनी हे गाणे सापडले.. मायकेल जॅक्सन आणि या गाण्याच्या लिरीक्स साठी.. आयटम साँग.. त्याचा अर्थ वगैरे गोष्टी फाट्यावर मारून फक्त या गाण्याच्या "संगीतासाठी" अजय अतुलला लै वेळा धन्यवाद!! एकेकाळी नियमीतपणे 'जीम'ला जाताना "रॉकी" सोबत असायचा.. हे ऐकताना हेडफोन मस्ट!! बाकी गाणे नाही, पण रॉकीची ही फाईट.. आणि त्याचे आभाराचे भाषण. भाषण - "I came here tonight and I didn't know what to expect. I seen a lot of people hating me and I didn't know what to feel about that so I guess I didn't like you much none either. During this fight I seen a lot of changing, the way yous felt about me, and the way I felt about you. In here there were two guys killin each other, but I guess it's better than 20 million. What I'm trying to say is, that if I can change, and you can change, everybody can change!"
  • Log in or register to post comments

काही गाणी जग्गु दादाची...

मदनबाण
Tue, 05/28/2013 - 20:24 नवीन
काही गाणी जग्गु दादाची...
  • Log in or register to post comments

आता जरा इंग्रजी गाण्यांकडे

मदनबाण
Tue, 05/28/2013 - 21:18 नवीन
आता जरा इंग्रजी गाण्यांकडे वळावे म्हणतो...
  • Log in or register to post comments

बाणा.. एक विंग्लीश गाणे आहे.

मोदक
Tue, 05/28/2013 - 22:14 नवीन
बाणा.. एक विंग्लीश गाणे आहे. you have take my breath away.. गायिकेने काळा गाऊन घातला आहे आणि बहुदा रेनडीअर्स व बर्फामध्ये पिक्चरायझेशन झाले आहे त्या गाण्याचे. मला सापडत नाहिये. माहिती असल्यास कृपया कळवणे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ही अजुन आवडती गाणी.

अक्षया
Wed, 05/29/2013 - 09:33 नवीन
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा