पुन्याच्या आत्याला पोरगी न्हाय.
आत्याची म्या लाडाची हाय.
सुट्टीला पुन्याला नेनार म्हन्ली.
म्या इचारलं, “हिकडं आंबे असत्यात, पुन्याला काय?”
आत्या हसली. मंग हे ते लई सांगितलं तिनं.
तरीबी म्या न्हाई म्हनून रायली.
मंग आत्या म्हन्ली, “बटाट्याची भाजी देईन.”
लई झ्याक बगा.
आमच्या हित सोमेवाडीच्या बाजारात बटाटा न्हाई. फकस्त कांदे.
म्या इचारलं, “रोज देशील?”
हो म्हन्ली.
मंग म्हैनाभर आत्याची पोरं मला पळवत होती.
पानी दे, चा दे, हे दे, ते दे, याला बोलवून आन.
म्या नाय म्हन्ली की फकस्त “बटाट्याची भाजी” म्हनत, की म्या लागलीच कामाला.
त्या दिशी उटले झोपेतून तर आत्या पुन्याला गेलेली.
आयनं बटाटा भाजी दिली.
म्या नाय खाल्ली.
*शतशब्दकथा
वाचने
13966
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
"परचक्र" नावची प्रकाश नारायण
+१११११११११११११११११११११.
In reply to "परचक्र" नावची प्रकाश नारायण by आदूबाळ
परचक्र?
In reply to +१११११११११११११११११११११. by बॅटमॅन
हो तीच ती गोष्ट
In reply to परचक्र? by आतिवास
आवडली
+१
In reply to आवडली by ढब्बू पैसा
सुंदरच. मला तर सगळ्या कथा /
+७८६
In reply to सुंदरच. मला तर सगळ्या कथा / by मृत्युन्जय
+१
In reply to +७८६ by तुमचा अभिषेक
(No subject)
सुन्दर कविता
ही कविता नसून 'शतशब्दकथा' आहे
In reply to सुन्दर कविता by तनुजा महाजन
_/\__/\__/\_
त्या दिशी उटले झोपेतून तर आत्या पुन्याला गेलेली.हे आठ शब्द एका वेगळ्याच मनःस्थितीत भिरकावतात... आत्या आणि तिच्या पोरांना चांगलंच झोडपून काढायला पाहिजे असं वाटतं. साध्या आणि मोजक्याच शब्दात खूप काही सांगणार्यांचा नेहमीच हेवा वाटत आला आहे. शतशब्दकथा सांगण्यात एकदम शिरोमणी आहात, अतिवास !(No subject)
<blockquote>आत्या आणि तिच्या
मस्त आवडली बटाच्ट्याची भाजी
झकास!!!
खवचट मेली.
नाहीतर काय?
सुंदर..
यातल्या प्रत्येक शब्दाशी सहमत
In reply to सुंदर.. by चिगो
मस्तच
चिगो शी बाडिस
ही शतशब्दकथा पण आवडली.
अर्रर्र
सुंदर कथा.
आभार
अशा लोकांचा खूप राग येतो.. पण