डोळे पाणावले. फार हृद्य आठवणी.
पण एक खटकलं. 'आठवतं का तुला?' ह्या प्रश्नाने एकूण लिखाण त्या 'प्रिय व्यक्तिशी संवाद' ह्या साच्यात उतरवलेला आहे. हे अति खाजगी स्वरूपाचे विचार वाटतात. ते तसे यायला नको होते. त्या ऐवजी 'आक्का' ह्या शिर्षकाने आक्काच्या आठवणी वाचकाशी संवाद साधत आल्या असत्या तर त्या जास्त बर्या वाटल्या असत्या असे मला प्रामाणिकपणे वाटते.
प्रभाकर पेठकरजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपल्याला जे वाटलं-हे अति खाजगी स्वरूपाचे विचार वाटतात.-तसं हे लिहिताना मला
खरोखरंच वाटलं नाही.खरं म्हणजे "आक्का" ह्या जगात नसताना सुद्धा मी तिच्याशी संवाद
साधण्याचा जो प्रयत्न करित होतो तो केवळ माझे मायबाप वाचक माझ्या मनात न आणताच करीत होतो.तेव्हा तो आपण म्हणता तसंच " प्रिय व्यक्तिशी संवाद" ह्या स्वरूपात होता.
लिहून झाल्यावर असं वाटलं,की "माझी आक्का अशी अशी होती"हे जरी संवादाच्या कल्पनेने वाचका पुढे ठेवलं तर ती एक "कहाणी" सांगितल्या सारखी झाली असती.आणि तिचं खासगीपण जास्त प्रकर्षाने दिसलं असत.
माझ्या सारख्या अनेक जणांच्या(वाचकांच्या) अशाच प्रिय व्यक्ति चटका लावून त्यांना सोडून जात असतील.त्यांच्या पण मनात त्या व्यक्तिला,
"आठवतं का तुला"?
हा प्रश्न मनात येऊन त्याना त्या व्यक्तिला आठवून माझ्या सारखं त्यांच्या ही डोळयात पाणी आल्याविना रहाणार नाही.अशी कल्पना करून मी हा लेख लिहिला.
खासगी असून सुद्धा सार्वजनीक करून तो वाचायला, वाचकाना वाचताना "ट्ची" वाटावा हा उद्देश ठेवला.
संकेस्थळ आणि जालामुळे वाचकांची आणि लेखकांची जवळीक एव्हडी होत आहे,की खासगी काय आणी सार्वजनीक काय ह्याच्या मधलं अंतर अगदी पुस्सट झालं आहे.
पुस्तकाचा लेखक आणि त्याचे वाचक यामधल्या दुव्या पेक्षा ह्या मधला दुवा जास्त बोलका आणि तात्कालीक झाला आहे असं मला वाटत. निदान माझ्या पुरता तरी.
मला प्रामाणिकपणे काय वाटलं ते मी लिहिले आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
नारायणी,
तुला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
नि:शब्द....
आभार
नि:शब्द
आभार
किती
आभार
डोळे पाणावले...
खासगी आणि सार्वजनीक
सुरेख.
आभार