Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जॅक डनियल्स on Fri, 05/17/2013 - 03:54
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.) आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो. ती पान टपरी,कोपऱ्यावरचे अमृततुल्य, आतला छोटा बोळ असे सगळे माझ्या डोळ्यासमोर दिसत असते."पुण्यातले पत्ते शोधणे " हा माझा छंद होता . कॉलेज मध्ये असल्या पासून साप पकडायला लागलो तेंव्हा पासून मला हा जोड छंद लागला. सर्पोद्यानात काम करायचो तेंव्हा त्यांच्या बरोबर साप पकडायला जायचो. तेंव्हा "पत्ता शोधणे " हा प्रकार काय आहे याची कल्पना नव्हती. ते काय प्रकरण आहे हे नंतर कळले. तुमच्या माझ्या सारखे ,आपले मित्र,नातेवाईक जास्तीतजास्त ऑफिस मधले मित्र यांच्या सोडून कुठे पत्ता शोधत नाही, किंवा आपल्याला गरज पण नसते. त्यामुळे माझी पण मजल पण सहकारनगर,पर्वती,सिंहगड रस्त्याचे काही भाग एवढ्याच ठिकाणी आणि ते पण मोठ्या सोसायट्या मध्येच होती. अश्या मोठ्या जागांचा पत्ता काय अगदी गुगल नकाशा वर पण सापडतो. आता जरा मुद्यावर येऊयात, लोकांच्या घरातील साप पकडण्यासाठी आधी त्या "घरी" पोचणे ते पण वेळेत हे सगळ्यात महत्वाचे होते. मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो. एका हातात पेन आणि मानेत फोन आणि माझा प्रश्न असायचा "साप कशात आहे ,मी पोहचेपर्यंत कोणाला पण जवळ जाऊ देऊ नका आणि सापावर लक्ष ठेवा. आत्ता सांगा पत्ता ?" ती वक्ती चालू व्हायची..."३२,मधुमालती बंगला,अप्पर इंदिरा नगर "..(जसं काय त्याचा बंगला शनिवारवाडा आहे!) मी पण माझा सगळ स्कील लावायचो: "व्ही-आई-टी पासून वरती आलो सरळ...मग उजवीकडे अप्पर इंदिरा ..ते पहिल्या कोपऱ्या वर किराणा तिकडून कुठे ?,डावीकडे का त्या तिरक्या आडव्या गल्लीत,...पण तिकडे तर कचराकुंडी आहे ..ठीक आहे, त्या कचरा कुंडी वरून उजवीकडे का? हा तिकडे एक बोलाईच्या मटणाचे दुकान आहे...आलो मी त्या दुकानापर्यंत मग पुढे..तिकडे तुमचा माणूस उभा करा आणि फक्त १० मिनिटे द्या मला मी आलो!" त्यांचा फक्त फोन नंबर घेऊन मी फोन ठेवायचो. हा पत्ता विचारताना मी स्मरणशक्तीला बेक्कार ताण द्यायचो आणि महत्वाच्या खुणा विचारायचो ( अभियांत्रिकीच्या परीक्षेला पण येवढा ताण कधी दिला नाही ;))पण एकडे सगळा प्रकारच वेगळा, तिकडच्या लोकांच्या डोळ्यासमोरची भीती मला एकडे दिसत असायची. हे सगळ जास्तीत जास्त २-३ मिनिटे चालायचे. माझ्या आईला तर आधी वाटायचे "काय झाल या पोराला ?" आमच्या घरी पाहुणे आले असतील तर अजूनच मजा, त्यांना हा प्रकार नवा असायचा . नंतर जे काय कपडे वरती असतील ते घालून साप पकडायची काठी आणि पिशवी घेऊन मी पुढच्या ५ मिनिटात घर सोडलेले असायचे. माझी सोपी खलाशी-पद्धत होती, की ज्या दिशेचा पत्ता असेल तिकडे गाडी भरदाव सोडायची. त्या साठी डोक्यात गणिते करून मी सिग्नल तोडायचो(डावी कडे वळण्यासाठी सिग्नल हि कवी कल्पना आहे ;)), गल्ल्यामधून जायचो, मामा-मामी चुकवायचो, फुटपाथ वरच्या हलत्याबोलत्या सुंदर गोष्टींकडे दुर्लक्ष करायचो इ. गाडीवर बसून ४ था गिअर पडेपर्यंत माझ्या डोक्यात एक ढोबळ नकाशा झालेला असायचा. माझा ठरलेला भाग म्हणजे एकडे बिबवेवाडी पासून स्वारगेट,लुल्लानगर-कोंढवा,निलायम पुलाखालचा सिंहगड रस्ता,सहकारनगर,पर्वतीपायथा...असा माझ्या घरापासून पासून १० किलोमीटरच्या परिघातील भाग. वरती लिहिल्या प्रमाणे स्वतःला त्या पत्याच्या दिशेला झोकून द्यायचो. कोपऱ्यावरच्या पानवाल्याला-किरणावाल्याला पत्ता विचार, कोणी क्रिकेट खेळत असेल त्यांना विचार, फेरीवाल्याला विचार, असे करून त्या सापपर्यंत मी जास्तीत जास्त १५ मिनिटात पोहोचायचो.(हे करणे लिहिले आहे तेवढे सोपे नाही ज्यांनी पुण्यात घर शोधायचा प्रयत्न केला असेल त्यांना कल्पना असेल.) आणि मग साप पकडून सर्पोद्यान गाठायचो ! (हे कसे करायचो आणि अनुभव दुसऱ्या पोस्ट मध्ये ). आपल्या इकडच्या लोकांना प्रश्न फार म्हणून मी कधीच सांगायचो नाही मी कशाला पत्ता शोधतो आहे. आजी-आजोबांना आणि सोसायटी मधल्या काकूंना कोणी नसलेच तर पत्ता विचारायचो कारण आधीच वेळ कमी असायचा आणि आजी-आजोबांना शंका फार.;) सुरवातीला-सुरवातीला खूप लोकांनी फिरवले नंतर एक लोकांचा ठराविक अंदाज येत गेला आणि मग चुका कमी झाल्या आणि साप जास्त मिळू लागले.(सापापेर्यंत पोचायला लागणारा वेळ आणि तो मिळणे हेय व्यस्त प्रमाण आहे : वेळ = १/साप मिळणे )खूप वेळा मला जनता वसाहत, आंबेडकर वस्ती, तळजाई वस्ती अश्या डोंगरावर असलेल्या वस्त्यामधून फोन यायचा. तिकडे तर सगळाच भुलभुलैय्या! अशा वेळी मग कामी यायच्या त्या जुन्या ओळखी. आधी कधी येऊन गेलो असलो तर तिकडचे खूप लोक ओळख ठेवायचे ते मला त्या वस्ती च्या रस्त्यापासून त्या आतल्या साप असलेल्या घरापर्यंत घेऊन जायचे. काय दृश्य असायचे ते ! माझ्या मागे कोणी तरी वाटाड्या बसलेला आहे आणि माझ्या गाडीच्या मागे १०-१२ चीलीपील्ली "सापवाला सापवाला" ओरडत पळत आहेत. असेच पत्ते शोधत आणि साप पकडत मी ३-४ वर्ष काढली नंतर एकडे आलो अमेरिकेमध्ये . आत्ता पत्ता शोधण्याची मजा राहिली नाही, काही झालं की जीपीएस निघते आणि पत्ता २ मिनिटात मिळतो. पण पुण्यातल्या रस्त्यांसाठी जीपीएस काही कामाचे नाही ... कारण आत्तापण मी डोळे बंद केले तर मी पुण्याच्या रस्त्यांवर पोहोचतो आणि जुने पत्ते शोधत राहतो.
  • Log in or register to post comments
  • 45151 views
  • एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
  • एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
  • एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
  • एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
  • एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
  • एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
  • एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
  • एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
  • एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !
  • एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !
  • एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप !
  • एका गारुड्याची गोष्ट १३: धामण: उंदराचा कर्दनकाळ !

Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !

  • एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! ›

प्रतिक्रिया

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 05/17/2013 - 04:20

Permalink

लेखन आवडले

मिपावर स्वागत!! योगायोगाने लेखात वर्णिलेला बहुतांश परिसर माझ्या चांगलाच ओळखीचा असल्याने तुमची शोधाशोध सहजपणे डोळ्यासमोर आणू शकलो. पुलेशु.
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Fri, 05/17/2013 - 04:36

In reply to लेखन आवडले by श्रीरंग_जोशी

Permalink

धन्यवाद ! हो तो परिसरच असा

धन्यवाद ! हो तो परिसरच असा आहे की डोळ्यासमोर उभा राहतो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 05/17/2013 - 04:26

Permalink

पत्त्ता शोधणे! एक कौशल्य! अस

पत्त्ता शोधणे! एक कौशल्य! अस काहीस नावं हव होत लेखाचं. तरीही उगा कोणी बोलायच्या आधी आज पयल्यांदा मी बोलुन घेते. अच्छा तुम्ही अमेरिकेत रहाता तर, त्याची झैरात!! अच्छा साप पकडायची कला आहे तर, त्याची झैरात!!! पुण्यातले का? त्याची झैरात!!!!! आता तुम्ही इम्युन झाला आहात. या प्वाँईंटावर आता कोणी बोलणार नाही. बोलल तर लसीकरण झालेले आहे हे सांगा. मुद्दा- एका वेगळ्याच फिल्डवर काहीतरी ऐकायला मिळते आहे. साप पकडण्याचे कौशल्य तर ऐकायला मजा येइलच, पण हे जे पत्ता पकडण्याचे कौशल्य आहे ते ही भारीच. आपले पुल या बद्दल लिहुन गेले आहेतच. अन त्यंनी सुद्धा म्हातारेबुवा कसे चौकश्या करतात याच सुरेख वर्णन केले आहे. लेखन आवडल. मिपावर स्वागत. पु. ले. शु.
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Fri, 05/17/2013 - 04:45

In reply to पत्त्ता शोधणे! एक कौशल्य! अस by स्पंदना

Permalink

धन्यवाद् !

धन्यवाद् ! झैरात तर झैरात .. झैरातिचे युग आहे , नवीन काही बोलायचे असेल तर झैरातीशिवाय लोकं ऐकत नाही...(आता बोलू नका की " झैरात" ची " झैरात" करतो म्हणून ;)) जन्मापासूनच इम्युन असल्यामुळे वेगळ्या लसीकरणाची गरज नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 05/17/2013 - 05:01

In reply to धन्यवाद् ! by जॅक डनियल्स

Permalink

आता जे काही धन्यवाद असतील ते

आता जे काही धन्यवाद असतील ते लेखाच्या शेवटी द्या एकदम. पण कुणी काही माहिती विचारली तर उत्तर द्या. न्हायतर परा येइल.(मिपावर, लहान मुलाला झोपवण्यासाठी कस,"बागुलबुवा येइल" म्हंटल जात तस नवसदस्यांना,"परा येइल" अस म्हंटल जात)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 05/17/2013 - 04:33

Permalink

मला तर झैरात वगैरे काही वाटली

मला तर झैरात वगैरे काही वाटली नाही !!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 05/17/2013 - 06:06

Permalink

मस्त

लेख आवडला. वापरून गुळगुळीत झाले असले तरी 'खुसखुशीत' हेच विशेषण पटकन डोक्यात आलं. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Fri, 05/17/2013 - 06:59

In reply to मस्त by नंदन

Permalink

धन्यवाद् !

धन्यवाद् ! इतर वेळेला, कोणाकडे जाण्यासाठी पत्ता शोधणे आणि साप पकडण्यासाठी पत्ता शोधणे यात मुख्य फरक म्हणजे 'हाती असलेला वेळ', कारण इतरवेळी लोकांनी चुकीचा पत्ता सांगितला (पार्ल्याच्या मावशीचा पत्ता...पुलं) तरी २ तासाने का घर सापडते, आणि पत्त्याचा धनी पण सापडतो. पण साप पकडण्यासाठी वेळेवर पोहचले नाही, तर तो साप पळून जातो किंवा लपून बसतो, आणि नंतर मग कधीपण (९५% वेळा रात्री २ नंतर )बाहेर पडतो, की मग लोकं परत फोन करतात ...आणि मग येरे माझ्या मागल्या ...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/17/2013 - 07:25

Permalink

वेलकम.

जॅक, लेख मस्त झालाय. साप पकडायचं शिकवा राव आणि सोबत फोटो टाका. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Fri, 05/17/2013 - 09:22

In reply to वेलकम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

धन्यवाद् ! माफ करा बिरुटे

धन्यवाद् ! माफ करा बिरुटे साहेब पण माझ्या कडे एक पण फोटो साप हातात धरून किंवा गळ्यात टाकून नाही. म्हणजे मी तो काढलाच नाही. सर्पोद्यान मध्ये एक वाक्य प्रचलित होते
जो सापांबरोबर फोटो काढतो, तो लवकर फोटो मध्ये जातो.
विषारी साप चावायचे- अपघात खूप वेळा हे फोटो काढताना होतात. त्यामुळे जर तुम्हाला फोटो बघायचे असतील तर Thailand snake show असे गूगल करा खूप सारे फोटो मिळतील.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/17/2013 - 11:28

In reply to धन्यवाद् ! माफ करा बिरुटे by जॅक डनियल्स

Permalink

बरं....

साप पकडायच्या ट्रीक्स या अपेक्षेने तसे म्हणालो होतो. साप गळ्यात घालून मिरवायची आणि फोटोत जायची इथे कोणाला हौस पडली आहे. एक महिला मिपाकराने साप पकडण्याच्या बाबतीतले अनुभव की साप पकडायचे शिकतांना असा धागा काढल्याचे आठवते आता तो धागा सापडत नव्हता म्हटलं तुम्ही काही ट्रीक शिकवाल असे वाटले होते. >>> त्यामुळे जर तुम्हाला फोटो बघायचे असतील तर Thailand snake show असे गूगल करा खूप सारे फोटो मिळतील. गुगलून तर सार्‍या जमान्याची माहिती मिळेल हो जालावर. बाकी, Thailand snake show असे गुगलल्यावर सापाशी धोकादायक प्रकारे खेळतांनाची चित्रे दिसल्यामुळे माझा हिरमोड झाला. असो, आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Fri, 05/17/2013 - 20:09

In reply to बरं.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

साप पकडण्यासाठी ट्रिक नसते,

साप पकडण्यासाठी ट्रिक नसते, तो एक प्रकारचा अभ्यास आहे,ज्यात शास्त्र आणि धैर्य लागते. तुम्हाला खूप गोष्टी उटूब वर सापडतील पण प्रत्येक साप पकडताना वेगळा अनुभव येतो. तसेच लोकांच्या घरचे साप पकडताना तर इतर पण गोष्टी विचारात घ्याव्या लागतात (आजूबाजूची लोकं, वेळ..) त्यामुळे ढोबळपणे पहिली पायरी ही 'साप ओळखणे ' असते. हा जिवावरचा खेळ असल्याने ९०% टक्के माहिती कामाची नसते,माझ्या पुढच्या लेखात थोडी माहिती येतच जाईल पण मी साप कसे पकडायचे ही माहिती देऊ शकणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/17/2013 - 22:08

In reply to साप पकडण्यासाठी ट्रिक नसते, by जॅक डनियल्स

Permalink

ट्रीक असेल नै तर अभ्यास असेल. सांगता येत असेल तर नीट सांगा.

>>>> साप पकडण्यासाठी ट्रिक नसते, तो एक प्रकारचा अभ्यास आहे,ज्यात शास्त्र आणि धैर्य लागते. अवघड आहे. साहेब, आता तुम्ही साप पकडत असाल काय याबद्दलच मला शंका यायला लागली आहे. बाकी, धैर्य लागते ही गोष्ट खरी आहे. पण, सापाच्या शेपटीला पकडावे लागते इन्ष्ट्रूमेंटने सापाच्या तोंडाजवळ उचलून घ्यावे लागते. हे आम्हा अनाडी लोकांना कळते त्यासाठी शास्त्र कशाला लागते आणि लागत असेल तर ते शास्त्र काय आहे हे सांगाल काय ? >>> तुम्हाला खूप गोष्टी उटूब वर सापडतील युट्यूबवर आम्हाला काय सापडते आणि काय नाही, ते आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्हाला याच्यातील काय माहिती आहे ती नीट आणि नेमकेपणाने सांगता येत असेल तर सांगा. -दिलीप बिरुटे (खवट)
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Sat, 05/18/2013 - 00:13

In reply to ट्रीक असेल नै तर अभ्यास असेल. सांगता येत असेल तर नीट सांगा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तुमचे बरोबर आहे, शेपटीला

तुमचे बरोबर आहे, शेपटीला पकडून हुक ने पिशवीत घालणे ही जगमान्य पद्धत आहे. पण साप सजीव असल्याने तो प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने वागतो.( दोरी असेल तर तिला एका बाजूने उचलून पिशवीत घालणे सोपे आहे.)माफ कर,, माझा शास्त्र हा शब्द चुकला असेल, मला साप ओळखायचे शास्त्र म्हणायचे होते मला. युटूब वर snake handling शोधुन बघा. पण खरा लोकांच्या घरातला साप पकडण्याचा विडो मिळणे अवघड आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Sat, 05/18/2013 - 00:14

In reply to ट्रीक असेल नै तर अभ्यास असेल. सांगता येत असेल तर नीट सांगा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तुमचे बरोबर आहे, शेपटीला

तुमचे बरोबर आहे, शेपटीला पकडून हुक ने पिशवीत घालणे ही जगमान्य पद्धत आहे. पण साप सजीव असल्याने तो प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने वागतो.( दोरी असेल तर तिला एका बाजूने उचलून पिशवीत घालणे सोपे आहे.)माफ कर,, माझा शास्त्र हा शब्द चुकला असेल, मला साप ओळखायचे शास्त्र म्हणायचे होते मला. युटूब वर snake handling शोधुन बघा. पण खरा लोकांच्या घरातला साप पकडण्याचा विडो मिळणे अवघड आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 05/17/2013 - 11:32

In reply to धन्यवाद् ! माफ करा बिरुटे by जॅक डनियल्स

Permalink

पकडलेले / हाताळलेले सर्व साप

पकडलेले / हाताळलेले सर्व साप विषारी होते का?
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Fri, 05/17/2013 - 20:11

In reply to पकडलेले / हाताळलेले सर्व साप by गवि

Permalink

सर्व साप विषारी नव्हते, पण

सर्व साप विषारी नव्हते, पण ढोबळपणे जर मी १० साप पकडले तर त्यातले ४ हे विषारी होते. तसेच मी पुण्यात चारी मुख्य विषारी साप (नाग, घोणस, मण्यार, फुरसे) पकडले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Fri, 05/17/2013 - 07:55

Permalink

पण पुण्यातल्या रस्त्यांसाठी

पण पुण्यातल्या रस्त्यांसाठी जीपीएस काही कामाचे नाही ... एक माननीय संपादक याला +१०००००^३ देतील याची खात्री आहे,
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 05/17/2013 - 08:39

Permalink

मस्त खुसखुशीत लेख!

मिपावर तुमचं स्वागत जसं व्हायला पाहिजे तसं झालं आहे आणि तुम्ही इम्युन आहात असं दिसतंय. तेव्हा मिपाकरांच्या (त्यात मी पण आले!)वाईट सवयीप्रमाणे लेखाचा पुढचा भाग पुढच्या वर्षी टाकू नये ही विनंती!
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Fri, 05/17/2013 - 09:26

In reply to मस्त खुसखुशीत लेख! by पैसा

Permalink

धन्यवाद् ! नक्कीच प्रयत्न

धन्यवाद् ! नक्कीच प्रयत्न करीन, वेळेत पुढचा लेख लिहायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 05/17/2013 - 09:02

Permalink

मस्त लेख.....

आवडला...
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Fri, 05/17/2013 - 09:02

Permalink

लेख आवडला.

लेख आवडला. मुळात 'पत्ता शोधणं' हीच एक कला आहे आणि 'पुण्यात पत्ता शोधणं' तर साधकाची परिसीमाच असते. पुण्यात ज्या कार्यालयात मी काम करत होते, त्या परिसरात हमखास साप दर्शन द्यायचाच दर दोनेक महिन्यांनी - त्यामुळे 'सर्पमित्रा'च्या प्रतिक्षेची एक बाजू माहिती आहे. आता दुस-या बाजूची (म्हणजे तुमच्या लेखांची) वाट पाहते :-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 05/17/2013 - 09:06

Permalink

भारी लेख. पुभाप्र.

भारी लेख. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 05/17/2013 - 09:15

Permalink

ज्याक, मस्त जमलाय लेख...

ज्याक, मस्त जमलाय लेख... लिहीत रहा भौ इकडे...
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Fri, 05/17/2013 - 09:27

In reply to ज्याक, मस्त जमलाय लेख... by आदूबाळ

Permalink

धन्यवाद् ! आपली कृपा राहूदे.

धन्यवाद् ! आपली कृपा राहूदे.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 05/17/2013 - 09:39

In reply to धन्यवाद् ! आपली कृपा राहूदे. by जॅक डनियल्स

Permalink

तुम्ही ज्याक डैनियल आणत रहा.

तुम्ही ज्याक डैनियल आणत रहा. मग आमची कृपा भेटंल लागंल तेव्हडी...:)
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Fri, 05/17/2013 - 09:36

Permalink

लेख आवडला.

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on Fri, 05/17/2013 - 09:57

Permalink

मस्त जमलाय

जे डी - मस्त जमलाय रे पहिला पेग....आपलं... लेख! येऊदे अजून ! जे.पी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 05/17/2013 - 10:14

Permalink

वाचतो आहे.

वाचतो आहे. पुढचा भाग लवकर अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कोमल on Fri, 05/17/2013 - 10:50

Permalink

मस्तच...

खुप्च चान चान.. पुभाप्र..
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 05/17/2013 - 11:08

Permalink

वेगळ्या विषयावरचा लेख..

वेगळ्या विषयावरचा लेख.. पुण्यातल्या वास्तव्यात पत्ते शोधताना खालील वाक्यांचा सराव झाला आहे: "चौकातून सरळ खाली या.." "तिथून वर गेलात की पटवर्धन वाडा विचारा" छान लेख. वेलकम आणि चियर्स.. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Fri, 05/17/2013 - 11:12

Permalink

लेख आवडला

पुण्यात पत्ता शोधणे म्हणजे कसब आहे हे नक्की ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 05/17/2013 - 11:18

Permalink

लेखमालेचा रोचक विषय आहे.

लेखमालेचा रोचक विषय आहे. लक्ष ठेऊन आहेच.. हा भाग आवल्डा!
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on Fri, 05/17/2013 - 12:30

Permalink

उत्तम लेख

बाकि पत्ते शोधुन काढणे हे एक कसब आहे,आणि पुण्यात तर तुम्हाला Hatsoff कारण दहा वर्श मी Fieldwork केले आहे त्यामुळे लोकान्च्या पत्ता सान्गण्याच्या तर्हा मला अवगत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/17/2013 - 12:44

Permalink

मस्त खुसखुशीत झालाय लेख!!!

मस्त खुसखुशीत झालाय लेख!!! धूम पिच्चरमधल्या जॉन अभ्रामसारखे तुम्ही गाडीवरून जाताना डॉळ्यासमोर आला एकदम :) बाकी साप पकडणे म्हंजे धैर्याची परिसीमाच. आपल्याला तर अशा गारुड्यांचं लै कौतुक वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 05/17/2013 - 12:44

Permalink

मस्त खुसखुशीत लेख.सापांवर

मस्त खुसखुशीत लेख.सापांवर वैज्ञानिक माहिती पण द्या हो. साप आणि अंधश्रद्धा पण चांगला विषय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Fri, 05/17/2013 - 20:15

In reply to मस्त खुसखुशीत लेख.सापांवर by प्रकाश घाटपांडे

Permalink

धन्यवाद् !

धन्यवाद् ! हो नक्कीच शास्त्रीय माहिती देईन आणि अंधश्रध्दा दूर करायचा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Fri, 05/17/2013 - 13:44

Permalink

छान!

मस्त लेख, वेगळा विषय. पुढील भागाची प्रतीक्षा.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Fri, 05/17/2013 - 14:08

Permalink

मस्त लेख. पुढील भागांच्या

मस्त लेख. पुढील भागांच्या प्रतिक्षेत!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Fri, 05/17/2013 - 14:13

Permalink

पुभाप्र

पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 05/17/2013 - 14:14

Permalink

खुसखुशीत! पुभाप्र

खुसखुशीत! पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by तिरकीट on Fri, 05/17/2013 - 14:40

Permalink

पुण्यात पत्ता

पुण्यातील एका कार्यालयाचा पत्ता शोधताना खूण म्ह्णून एकाने 'बाजीराव रोडची मागची बाजू' असे सांगीतले होते.... पण लग्न सासूरवाडीकडचे होते म्ह्णून पत्ता शोधायलाच लागला....
  • Log in or register to post comments

Submitted by निल्सन on Fri, 05/17/2013 - 15:48

Permalink

मस्त झालाय हा भाग. पुढील

मस्त झालाय हा भाग. पुढील भागांच्या प्रतिक्षेत. जो सापांबरोबर फोटो काढतो, तो लवकर फोटो मध्ये जातो. >> हे खर आहे असं वाटू लागलय. कारण याच महिन्यात माझ्या वहिनीचा भाऊ (वय-२२ वर्षे) एका अपघातात गेला तोही सर्पमित्र होता आणि त्याने सापांसोबत बरेच फोटो काढले आहेत. हो पण त्याच्या अपघाताचे कारण मात्र साप नव्ह्ता तर बाईक चालवताना मोबाईलवर बोलणे हे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by बापु देवकर on Fri, 05/17/2013 - 15:55

Permalink

छान आहे...एक एक नमुने भेटतात

छान आहे...एक एक नमुने भेटतात अश्यावेळी
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Fri, 05/17/2013 - 16:25

Permalink

मस्त

मस्त लेख, पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by लाल टोपी on Fri, 05/17/2013 - 16:40

Permalink

लेख आवडला

चांगला लेख. पुढिल भागासाठी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on Fri, 05/17/2013 - 17:03

Permalink

मस्त.. पुण्यात परत-बिरत आलात

मस्त.. पुण्यात परत-बिरत आलात तर इथे तुमचा पत्ता आधी टाका.. आमच्याकडे पुण्यात एक घोणस निघाला तर सर्पमित्र शोधताना नाकी-नऊ आले.. आणि सर्पमित्र सापडेपर्यंत घोणस गेला पळून..
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Fri, 05/17/2013 - 20:18

In reply to मस्त.. पुण्यात परत-बिरत आलात by पिशी अबोली

Permalink

परत साप निघाला तर लगेच

परत साप निघाला तर लगेच सर्पोद्यान ला फोन करा. त्यांच्या कडे महाराष्ट्रातले सर्पमित्रांचे फोन नंबर असतात. सर्पोद्यान:०२०-२४३७३७४७
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on Fri, 05/17/2013 - 20:52

In reply to परत साप निघाला तर लगेच by जॅक डनियल्स

Permalink

हो... सर्पोद्यानला फोन केला

हो... सर्पोद्यानला फोन केला होता पण दुर्दैवाने फोनवर बोलणारी व्यक्ती तुम्हाला भेटणार्‍या आजी-आजोबांपेक्षा वेळ-खाऊ निघाली. आता हे माझंच भाग्य होतं का नेहमीच असं होतं कुणास ठाऊक!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 05/17/2013 - 18:37

Permalink

मस्त सुरूवात !

एका वेगळ्या विषयावरचे तुमचे अनुभव वाचायला मजा आली. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com