एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.)
आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो. ती पान टपरी,कोपऱ्यावरचे अमृततुल्य, आतला छोटा बोळ असे सगळे माझ्या डोळ्यासमोर दिसत असते."पुण्यातले पत्ते शोधणे " हा माझा छंद होता .
कॉलेज मध्ये असल्या पासून साप पकडायला लागलो तेंव्हा पासून मला हा जोड छंद लागला. सर्पोद्यानात काम करायचो तेंव्हा त्यांच्या बरोबर साप पकडायला जायचो. तेंव्हा "पत्ता शोधणे " हा प्रकार काय आहे याची कल्पना नव्हती. ते काय प्रकरण आहे हे नंतर कळले.
तुमच्या माझ्या सारखे ,आपले मित्र,नातेवाईक जास्तीतजास्त ऑफिस मधले मित्र यांच्या सोडून कुठे पत्ता शोधत नाही, किंवा आपल्याला गरज पण नसते. त्यामुळे माझी पण मजल पण सहकारनगर,पर्वती,सिंहगड रस्त्याचे काही भाग एवढ्याच ठिकाणी आणि ते पण मोठ्या सोसायट्या मध्येच होती. अश्या मोठ्या जागांचा पत्ता काय अगदी गुगल नकाशा वर पण सापडतो.
आता जरा मुद्यावर येऊयात, लोकांच्या घरातील साप पकडण्यासाठी आधी त्या "घरी" पोचणे ते पण वेळेत हे सगळ्यात महत्वाचे होते. मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो. एका हातात पेन आणि मानेत फोन आणि माझा प्रश्न असायचा "साप कशात आहे ,मी पोहचेपर्यंत कोणाला पण जवळ जाऊ देऊ नका आणि सापावर लक्ष ठेवा. आत्ता सांगा पत्ता ?"
ती वक्ती चालू व्हायची..."३२,मधुमालती बंगला,अप्पर इंदिरा नगर "..(जसं काय त्याचा बंगला शनिवारवाडा आहे!)
मी पण माझा सगळ स्कील लावायचो: "व्ही-आई-टी पासून वरती आलो सरळ...मग उजवीकडे अप्पर इंदिरा ..ते पहिल्या कोपऱ्या वर किराणा तिकडून कुठे ?,डावीकडे का त्या तिरक्या आडव्या गल्लीत,...पण तिकडे तर कचराकुंडी आहे ..ठीक आहे, त्या कचरा कुंडी वरून उजवीकडे का? हा तिकडे एक बोलाईच्या मटणाचे दुकान आहे...आलो मी त्या दुकानापर्यंत मग पुढे..तिकडे तुमचा माणूस उभा करा आणि फक्त १० मिनिटे द्या मला मी आलो!" त्यांचा फक्त फोन नंबर घेऊन मी फोन ठेवायचो. हा पत्ता विचारताना मी स्मरणशक्तीला बेक्कार ताण द्यायचो आणि महत्वाच्या खुणा विचारायचो ( अभियांत्रिकीच्या परीक्षेला पण येवढा ताण कधी दिला नाही ;))पण एकडे सगळा प्रकारच वेगळा, तिकडच्या लोकांच्या डोळ्यासमोरची भीती मला एकडे दिसत असायची. हे सगळ जास्तीत जास्त २-३ मिनिटे चालायचे. माझ्या आईला तर आधी वाटायचे "काय झाल या पोराला ?" आमच्या घरी पाहुणे आले असतील तर अजूनच मजा, त्यांना हा प्रकार नवा असायचा . नंतर जे काय कपडे वरती असतील ते घालून साप पकडायची काठी आणि पिशवी घेऊन मी पुढच्या ५ मिनिटात घर सोडलेले असायचे.
माझी सोपी खलाशी-पद्धत होती, की ज्या दिशेचा पत्ता असेल तिकडे गाडी भरदाव सोडायची. त्या साठी डोक्यात गणिते करून मी सिग्नल तोडायचो(डावी कडे वळण्यासाठी सिग्नल हि कवी कल्पना आहे ;)), गल्ल्यामधून जायचो, मामा-मामी चुकवायचो, फुटपाथ वरच्या हलत्याबोलत्या सुंदर गोष्टींकडे दुर्लक्ष करायचो इ. गाडीवर बसून ४ था गिअर पडेपर्यंत माझ्या डोक्यात एक ढोबळ नकाशा झालेला असायचा. माझा ठरलेला भाग म्हणजे एकडे बिबवेवाडी पासून स्वारगेट,लुल्लानगर-कोंढवा,निलायम पुलाखालचा सिंहगड रस्ता,सहकारनगर,पर्वतीपायथा...असा माझ्या घरापासून पासून १० किलोमीटरच्या परिघातील भाग. वरती लिहिल्या प्रमाणे स्वतःला त्या पत्याच्या दिशेला झोकून द्यायचो. कोपऱ्यावरच्या पानवाल्याला-किरणावाल्याला पत्ता विचार, कोणी क्रिकेट खेळत असेल त्यांना विचार, फेरीवाल्याला विचार, असे करून त्या सापपर्यंत मी जास्तीत जास्त १५ मिनिटात पोहोचायचो.(हे करणे लिहिले आहे तेवढे सोपे नाही ज्यांनी पुण्यात घर शोधायचा प्रयत्न केला असेल त्यांना कल्पना असेल.) आणि मग साप पकडून सर्पोद्यान गाठायचो ! (हे कसे करायचो आणि अनुभव दुसऱ्या पोस्ट मध्ये ). आपल्या इकडच्या लोकांना प्रश्न फार म्हणून मी कधीच सांगायचो नाही मी कशाला पत्ता शोधतो आहे. आजी-आजोबांना आणि सोसायटी मधल्या काकूंना कोणी नसलेच तर पत्ता विचारायचो कारण आधीच वेळ कमी असायचा आणि आजी-आजोबांना शंका फार.;)
सुरवातीला-सुरवातीला खूप लोकांनी फिरवले नंतर एक लोकांचा ठराविक अंदाज येत गेला आणि मग चुका कमी झाल्या आणि साप जास्त मिळू लागले.(सापापेर्यंत पोचायला लागणारा वेळ आणि तो मिळणे हेय व्यस्त प्रमाण आहे : वेळ = १/साप मिळणे )खूप वेळा मला जनता वसाहत, आंबेडकर वस्ती, तळजाई वस्ती अश्या डोंगरावर असलेल्या वस्त्यामधून फोन यायचा. तिकडे तर सगळाच भुलभुलैय्या! अशा वेळी मग कामी यायच्या त्या जुन्या ओळखी. आधी कधी येऊन गेलो असलो तर तिकडचे खूप लोक ओळख ठेवायचे ते मला त्या वस्ती च्या रस्त्यापासून त्या आतल्या साप असलेल्या घरापर्यंत घेऊन जायचे. काय दृश्य असायचे ते ! माझ्या मागे कोणी तरी वाटाड्या बसलेला आहे आणि माझ्या गाडीच्या मागे १०-१२ चीलीपील्ली "सापवाला सापवाला" ओरडत पळत आहेत.
असेच पत्ते शोधत आणि साप पकडत मी ३-४ वर्ष काढली नंतर एकडे आलो अमेरिकेमध्ये . आत्ता पत्ता शोधण्याची मजा राहिली नाही, काही झालं की जीपीएस निघते आणि पत्ता २ मिनिटात मिळतो.
पण पुण्यातल्या रस्त्यांसाठी जीपीएस काही कामाचे नाही ...
कारण आत्तापण मी डोळे बंद केले तर मी पुण्याच्या रस्त्यांवर पोहोचतो आणि जुने पत्ते शोधत राहतो.
वाचने
45289
वाचनखूण
प्रतिक्रिया
64
लेखन आवडले
In reply to लेखन आवडले by श्रीरंग_जोशी
धन्यवाद ! हो तो परिसरच असा
पत्त्ता शोधणे! एक कौशल्य! अस
In reply to पत्त्ता शोधणे! एक कौशल्य! अस by स्पंदना
धन्यवाद् !
In reply to धन्यवाद् ! by जॅक डनियल्स
आता जे काही धन्यवाद असतील ते
मला तर झैरात वगैरे काही वाटली
मस्त
In reply to मस्त by नंदन
धन्यवाद् !
वेलकम.
In reply to वेलकम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद् ! माफ करा बिरुटे
In reply to धन्यवाद् ! माफ करा बिरुटे by जॅक डनियल्स
बरं....
In reply to बरं.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साप पकडण्यासाठी ट्रिक नसते,
In reply to साप पकडण्यासाठी ट्रिक नसते, by जॅक डनियल्स
ट्रीक असेल नै तर अभ्यास असेल. सांगता येत असेल तर नीट सांगा.
In reply to ट्रीक असेल नै तर अभ्यास असेल. सांगता येत असेल तर नीट सांगा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचे बरोबर आहे, शेपटीला
In reply to ट्रीक असेल नै तर अभ्यास असेल. सांगता येत असेल तर नीट सांगा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचे बरोबर आहे, शेपटीला
In reply to धन्यवाद् ! माफ करा बिरुटे by जॅक डनियल्स
पकडलेले / हाताळलेले सर्व साप
In reply to पकडलेले / हाताळलेले सर्व साप by गवि
सर्व साप विषारी नव्हते, पण
पण पुण्यातल्या रस्त्यांसाठी
मस्त खुसखुशीत लेख!
In reply to मस्त खुसखुशीत लेख! by पैसा
धन्यवाद् ! नक्कीच प्रयत्न
मस्त लेख.....
लेख आवडला.
भारी लेख. पुभाप्र.
ज्याक, मस्त जमलाय लेख...
In reply to ज्याक, मस्त जमलाय लेख... by आदूबाळ
धन्यवाद् ! आपली कृपा राहूदे.
In reply to धन्यवाद् ! आपली कृपा राहूदे. by जॅक डनियल्स
तुम्ही ज्याक डैनियल आणत रहा.
लेख आवडला.
मस्त जमलाय
वाचतो आहे.
मस्तच...
वेगळ्या विषयावरचा लेख..
लेख आवडला
लेखमालेचा रोचक विषय आहे.
उत्तम लेख
मस्त खुसखुशीत झालाय लेख!!!
मस्त खुसखुशीत लेख.सापांवर
In reply to मस्त खुसखुशीत लेख.सापांवर by प्रकाश घाटपांडे
धन्यवाद् !
छान!
मस्त लेख. पुढील भागांच्या
पुभाप्र
खुसखुशीत! पुभाप्र
पुण्यात पत्ता
मस्त झालाय हा भाग. पुढील
छान आहे...एक एक नमुने भेटतात
मस्त
लेख आवडला
मस्त.. पुण्यात परत-बिरत आलात
In reply to मस्त.. पुण्यात परत-बिरत आलात by पिशी अबोली
परत साप निघाला तर लगेच
In reply to परत साप निघाला तर लगेच by जॅक डनियल्स
हो... सर्पोद्यानला फोन केला
मस्त सुरूवात !
अहो जेडी
In reply to अहो जेडी by मी-सौरभ
+१ हे एक बाकी बरोबर!
जैक डैनिअल्स यांनी दोन अवघड
In reply to जैक डैनिअल्स यांनी दोन अवघड by कंजूस
माझ्या कामासाठी मला
जबार लिवलय.
चिमट्याने साप पकडण्याचे आणि
लेख आवडला
जबरी !
मस्त आहे लेख!
डावी कडे वळण्यासाठी सिग्नल हि
रोचक..
लेखन आवडले लिहित रहा
ही मालिका पूर्ण झाल्यामुळे
In reply to ही मालिका पूर्ण झाल्यामुळे by रुपी
उत्तम मालिका