Skip to main content

दारु पुराण

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 12/05/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.

दारुपुराण सांगतो मी,तुम्ही ऐका शांतचित्ता
ऐका एका दारुड्याची कथा ॥धृ॥

रोज येतो दरु पिऊन
बाटली खिशामद्ये घेऊन
सांगे रुबाबात येऊन
चल वाढ मला भोजन
रोज हवी मच्छी मटण
बायको आण्ल सांगा कुठुन
रागाने ऊठतो पेटून
अर्ध्या जेवणावर ऊठुन
होते त्याची चालू,ही बडबड आता
ऐका एका दारुड्याची कथा ॥१॥

मुले कावरीबावरी होऊन
आईच्या पदराखाली लपून
ऊपाशी पोटी जाती झोपून
याची थोडीही नाही त्याला जाण
आई त्यांची कष्ट करुन
देई मुलांना चांगले शिक्षण
मुलेही हुशार आणि गुणवान
फेडतील आईचे त्यांच्या ऋण
मुलेच खरी तिची संपत्ती व सत्ता
ऐका एका दारुड्याची कथा ॥२॥

दहा तारखेला होतो पगार
जमे सारा मित्र परिवार
दरु पिऊन चाले जुगार
कोणी पिऊन होतात तर्र..
कुणा सुचेना आपले घर
कोणी पडती भर रस्त्यावर
घरी बायको पोरांना घोर
हवलदाराचा खातात मार
अशा त्यांच्या खोडी,किती वर्णाव्या मी आता
ऐका एका दारुड्याची कथा ॥३॥

पैसे संपल्यावर सारं
सारे मित्र होती पसार
घरी येई जेंव्हा आजार
कोणी लाविना त्याला हात भार
याने केला मनी विचार
हा सारा माया-बाजार
गेला वेसन्मुक्ति केंद्रावर
ऊपचार घेतले त्याने सत्वर
सुटली त्याची दारु,हे सांगे भगवंता
ऐका एका दारुड्याची कथा ॥४॥

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5408
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

दारूने बरबाद झालेला एक दारूडा एकदा दारू सोडण्याचा निष्चय करतो.

घरी येऊन दारूच्या सगळ्या रिकाम्या बाटल्या फेकायला लागतो.

पहिली रिकामी बाटली घेतो, 'तुझ्यामुळे माझी नोकरी गेली.' फेकून देतो.
दूसरी रिकामी बाटली घेतो, 'तुझ्यामुळे माझे घर मला विकावे लागले आणि ह्या झोपडीत आलो.' फेकून देतो.
तिसरी रिकामी बाटली घेतो, 'तुझ्यामुळे माझी बायको मला सोडून गेली.' फेकून देतो.
चवथी बाटली भरलेली निघते. तिच्याकडे प्रेमाने पाहात म्हणतो, 'वेडी का तू? जरा बाजूला थांब. तुझा काय दोष. तू तर निष्पाप आहेस.'


In reply to by प्रभाकर पेठकर

दारुड्या व्यसनमुक्त होणार नाही,जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही.


चुकीने दारू पुरण असे वाचले.. एका भन्नाट कॉम्बिनेशनची शक्यता मनात डोकावतेय,

सोत्री, जमेल का?


ऐका एका दारुड्याची कथा ॥धृ॥

- ऐका सत्यनारायणाची कथा या चालीवर म्हणायचे का ? :)

अमोल केळकर