सांग सांग भोलानाथ.. :)
सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून
सुट्टी मिळेल काय?
परवाच कुठेतरी हे गाणं ऐकलं आणि मी एकदम १९७६/७७ सालात पोहोचलो. असेन काहीतरी तिसरी किंवा चवथीत..
तसे आम्ही पयल्यापासनंच आळशी.. निसर्गत:च शाळा-अभ्यासाचा जो कंटाळा येतो तसा तो मलाही यायचा.. नुसती मजा करावी.. आईकडून फक्त छान छान लाड करून घ्यावेत, यथेच्छ खेळा-बागडावं, खाऊ खावा असंच आम्हालाही वाटायचं. म्हणजे एका अर्थी एका नॉर्मल मुलाची जी लक्षणं असतात तीच सगळी माझ्यात होती. मग ही शाळेची भानगड कशाला पायजेल?!.. - : )
शाळेत जायची वेळ झाली की मला अगदी कस्सचंच व्हायला लागायचं.. आता शाळेत जायचं, मग बाई जाड्या चष्म्यातून म्हारक्या म्हैशीसारख्या माझ्याकडे बघणार.. 'कस्सा सापडला हा आता पुढले ४-५ तास आपल्या ताब्यात..' असे त्यांच्या चेहर्यावर विजयी भाव.. - : )
मग बाई गृहपाठ विचारणार, पाढे आणि कविता पाठ म्हणायला लावणार.. छ्या छ्या.. नक्को रे बाबा ती शाळा.. - : )
खूप पाऊस पडावा आणि ऐनवेळी अचानक कुणीतरी येऊन सांगावं की 'शाळेभोवती हे मोठ्ठं तळं साचलं आहे.. अगदी गुडघाभर पाणी आहे.. आणि मास्तरीण बाई स्वत:च त्या पाण्यात धब्बाकदिशी पडल्या आहेत आणि म्हणून आज शाळेला सुट्टी आहे.. भोलानाथा.. अगदी अस्संच घडू दे रे बाबा..! - : )
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय,
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय?
भोलानाथा, अरे आईनं कालच छान लाडू केल्येत रे.. अगदी डबा भरून.. तू खूप पाऊस पाड, मग शाळेला सुट्टी मिळेल, आणि मग दुपारी आई झोपली की मी हळूचकन् त्या डब्यातला लाडू खाईन.. - : )
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा,
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा..?
किती सुरेख कल्पना आहे.. आठवड्यात तीन तीन रविवार..! - : )
भोलानाथा, आज जमलं नाही तर निदान उद्यातरी भरपूर पाऊस पाड रे बाबा.. उद्या गणिताचा पेपर आहे.. आणि माझे पाढे, पावकी/निमकी अजून पाठ व्हायची आहे रे.. भागाकारही मला नीटसा जमत नाही.. बेरीज-वजाबाकी करताना 'हातचा' कसा घेतात तेच अजून मला समजलं नाहीये रे.. उद्या माझं ढोपर तरी खूप दुखू दे किंवा मी 'पोट दुखतंय..' अशी खोटी खोटी अॅक्टींग करू का रे..?
भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळा येऊन दुखेल का रे ढोपर..?
काहीही कर रे भोलानाथा, पण खूप पाऊस पाड आणि शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळू दे.. वाटल्यास तुला आईनं केलेला बेसनाचा लाडू देईन.. - : )
खरंच, काही काही गाणी, काही काही आठवणी अवीट असतात, गोड असतात.. आईनं केलेल्या त्या बेसनाच्या लाडवांसारख्याच..!
-- तात्या अभ्यंकर.

-- तात्या अभ्यंकर.वर्गीकरण
प्रतिक्रिया
हम्म
ठीक आहे. सूचक परंतु विखारी
कदाचीत...
मान्य! विखारी अनुभवाप्रमाणेच
यंदा खर्या पावसाचे काय भाकीत
-१
-१-(-२)
माझ्या मते आता अवांतर चर्चा
भावना पोचल्या.
:)
मराठी बालगीताचं मराठीतलं भाषांतर आवडलं.
अस्सल..
मी मिसळ्पावची खुप जुणी वाचक
Kind attn : नीलकांत आणि
सारख काय
अन शेवटी...
चला कुद्या बोलला तर ! मी वाट
मला वाटते
भोलानाथ
कशी अप्रिय वाटेल रे
:-)
मस्त गाणे आहे.....