त्यांचाच जीव घे तू .....
हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता
म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता
मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!
पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी
शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता
मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना
करतात भाषणे ते आणून आव सस्ता
लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?
सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता
शोधून शोषकांना तू लाव फास त्यांना
त्यांचाच जीव घेणे उरला बचाव सस्ता
शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता
- गंगाधर मुटे
--------------------------------
वाचने
4614
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओ मस्त आहे हो.... झक्कास..
ज्या दिवशी...
मुक्त विहारी म्हणतात ते खरय !
गझल आवडली.
कल्पना आवडली.
छान गझल...
+१
In reply to छान गझल... by अत्रुप्त आत्मा
सुंदर ओळी झाल्यात.
In reply to +१ by मूकवाचक
सुन्दर कल्पना ! ! !
प्रतिसादाबद्दल सर्वांना
ह्म्म
कशी गंमत आहे?
In reply to ह्म्म by अर्धवटराव
त्या एखाद्याची काळजी नाहि दादा
In reply to कशी गंमत आहे? by गंगाधर मुटे
क्षमस्व.
In reply to त्या एखाद्याची काळजी नाहि दादा by अर्धवटराव
कविता आवडली …फ़ार भयानक