Skip to main content

अबोलीच्या निमीत्ताने...

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 19/04/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, अबोली नावाचा नवा विभाग मिपावर सुरू करायचे ठरले. पाडव्याला याची घोषणा झाली. आता एवढ्यात हा विभाग सुरू होईल. अपेक्षेप्रमाणे मिपावर याबाबतीत उलटसुलट चर्चा सुरू झाली. मिपावर काही एक नवीन होतंय तर त्यावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत. काहींना हा विभाग आवडला तर काहींना अजिबात नाही आवडला. काहींनी आपला संबंधच नाही त्यामुळे कोरड्या शुभकामना दिल्यात तर काहींनी विभाग कधी सुरू होतो अशी चौकशीसुध्दा केली. मात्र काही लोकांच्या प्रतिक्रिया जरा मर्यादा सोडलेल्या वाटल्या त्याचे वाईट वाटले. आता त्याचे कारण काय? याच्या खोलात जायला नको. मात्र तरीही काही विचार या निमीत्ताने मांडायचे आहेत. मिपावर स्त्रीयांना त्यांच्या विषयावर बोलायला तेवढे मोकळे वातावरण नाही असा काहींचा सुर होता. मला असं म्हणायचं होतं की विषय जसा असेल तसा मिपाकर प्रतिसाद देतात. उत्तम विषय असला तर डोक्यावर घेतील आणि नाहीच पटलं तर 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' देऊन चेष्टा करतील. मिपाची प्रकृती अशीच आहे. मात्र तरी प्रश्न त्यांचा उरतोच, की आमच्या रोजच्या आयुष्यात असं खुप काही असतं जे आमच्यासाठी खुप महत्वाचं असतं मात्र पुरूषांसाठी त्याची काहीच किंमत नसते. किंवा असे काही विषय आहेत की ज्यावर पुरूषांनी बोलणे सुध्दा अपेक्षीत नसते. मात्र मुख्य बोर्डावर अशी सुचना तर देऊ शकत नाही ना, की यावर केवळ निमंत्रीतांनीच बोलणे अपेक्षीत आहे... हे शक्य नाही... मात्र एक शक्य आहे की एक असा कप्पा तयार करता येऊ शकतो जेथे अश्या विषयांवर चर्चा होऊ शकते. अन्य लोकांना या भागात प्रवेश नसेल, कारण हे चर्चा विषय त्यांच्यासाठी नसतील, त्यांना ज्या विषयांशी संबंध नाही किंवा चर्चेत केवळ टर उडवायच्या शिवाय ज्यांना सहभाग देता येणार नाही त्यांना धागा अवांतरात नेण्याची मुभा नको. ह्या एका साध्या विचारावर हा विभाग आहे. मात्र काल परवा उत्साहात निघालेल्या धाग्यांत जे तारे तोडल्यागेलेत ते वाईट वाटावेत असेच आहेत. त्यात असा विभाग काढायला नको होता इतपत बोलणे किंवा मतप्रदर्शन ठिक आहे, मात्र ज्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाचा निषेध करावासा वाटत असेल त्या संकेतस्थळावर आपण येऊच नये ना ! तसे मात्र नाही, येथे यायचे आणि उगाच राळ उडवत रहायची असा प्रकार हा आहे. मिपा व्यवस्थापन चालवून घेतय... मऊ लागतंय... असा प्रकार हा वाटतोय. मी कधी नव्हे तर एवढा कठोर बोलतोय मात्र यासाठी झालेला वैताग एवढा आहे की असं बोलावं लागतंय. त्यानंतर ह्या विभागात काहीही गुप्त राहणार नाही असा प्रचार चालला आहे. खरं तर ह्या विभागात गुप्त राहण्यासारखे काहीच नसेल. ह्या विभागात 'त्यांना' वाचनमात्र ठेवावे ज्यांना या विषयात सामान्यतः रस नसतो म्हणून वेगळा विभाग, मग केवळ वाचनमात्रच न ठेवता प्रवेशच नको असा विचार केला. यात अगदी लिंगाधारीत अन्याय कारक रचना वगैरे असे काही नाही. आणि स्त्री- पुरूष समानतेचाही असा काही विचार आवश्यक नाही. कारण ह्या सरळ्या स्त्रीया मुख्य बोर्डावर लिहीणार आहेतच. त्यामुळे हा विभाग हॅक करून दाखवण्याच्या गप्पा करने सर्वथा अनाठाई आहे. स्त्रीयांच्या विशेष विभागात पुरूषांनी येऊ नये असा संकेत आपण ठरवतोय. याउप्पर कुणी घुसखोरी केलीच तर त्या विकृतीला आपण काय म्हणावं ? त्यामुळे ह्या विभागात काय चालतंय याच्याशी अन्य लोकांना काहीही रस असू नये. काही चुकीचं होणार नाही , वातावरण उत्तम रहावं यासाठी संपादक आहेत ते काळजी घेतील. या विभागाबाबत ज्यांना आपला विरोध नोंदवायचा आहे ते मला व्यनि करू शकतात. त्यामुळे माझ्या काही जवळच्या मित्रांना विनंती आहे की काळजी करू नका असा विभाग निघाल्यामुळे काही लागलीच जगबुडी होणार नाही. ह्याच चर्चेत काही अश्या प्रकारची कागाळी झाली आहे की ज्याने संपादकांना बडवे वगैरे उपमा देण्यात आली आणि त्याला एका राजकीय उल्लेखाचा संदर्भ दिल्याने ते नकारात्मक उद्द्येशाने बडवे बोलल्यासारखे होते. हे अत्यंत चुकीचे आहे. आणि अजिबात मान्य नाही. संपादक आपल्यातीलच एक आहेत. आपला वेळ ते आपल्या मिपासाठी देतात. त्यांच्या कष्टांची कल्पना मला पुर्णपणे आहे. त्यामुळे त्या कमेंटवर व्यवस्थापन कारवाई तर करेलच मात्र अन्य सर्व सदस्यांना पुन्हा एकदा सुचना देतो की संपादकांविषयी काहीही बोललेलं खपवून घेणार नाही. काही लोक कायम मिपावर येतात ते मिपाविषयी, मिपा व्यवस्थापना विषयी वाईट बोलायलाच येतात असे दिसते. कारण चांगल्या चर्चांत यांचा सहभाग नसतो. चांगले लेख यांना लिहीता येत नाही. मात्र नावे ठेवायलाच हे येतात असे दिसते. अश्या लोकांना सुधारण्यासाठी बराच वेळ दिलेला आहे. यापुढे खरडवहीत सुध्दा चुकीचे लिहीलेले आढळले तर अश्या लोकांवर कारवाई केली जाईल. शेवटी पुन्हा एकदा सर्व सदस्यांना आवाहन आहे की मिपा व्यवस्थापन जे करते त्याबाबत चर्चा करण्याची आपले मत प्रदर्शन करण्याची सर्वांना मुभा आहे. मात्र मिपाचं वातावरण आपल्या लिहीण्याने गढूळ होत असेल तर असे लेखन जाहीर न करता मला व्यक्तिगत निरोप पाठवा. माझ्याशी चर्चा करा. मुख्य बोर्डावर निषेधाचे धागे, हॅक करण्याची आव्हाने आणि संपादकांना नकारात्मक पदव्या का म्हणून सहन कराव्यात? मिपा आपलं आहे, ते सकारात्मक पुढे नेऊया. त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षीत आहे. - नीलकांत
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19713
प्रतिक्रिया 127

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

माझ म्हणन- अश्या घडलेल्या गोष्टी सांगुन त्या स्त्री ने असही घडु शकत हे बाकिच्यांना सांगायचा प्रयत्न केला. तीची विश्वास ठेवण्यात चुक झाली पण हे करायला पाहणारा खरा गुन्हेगार अन या गोष्टीचा वापर करुन तीचा अपमान करणारा दुसरा गुन्हेगार. आपल्याकडे व्हिक्टीमला खाली दाखवण्यात धन्यता मानली जाते. हे बदलले पाहिजे. अन ते बदलण्यासाठी समाजाची मानसीकता बदलली पाहिजे, निदान व्हिक्टीमची मानसीकता बदलली पाहिजे. पाश्च्यात्त देशात व्हिक्टीमला सपोर्ट केला जातो, व्हाइल इथे व्हिक्टीमला लज्जीत केले जाते. अगदी पराने सुद्धा मोठ्या सहानुभुतीचा आव आणत त्या बाईला अस झाल तुम्हाला पण अस होइल अशी भिती घातली आहे, जेंव्हाकी पराने असा विश्वास ठेउन पुढे जाउन वैयक्तीक संबंध वाढवु नका असा संदेश त्या बाईने दिला होता तो इथे उद्धृत करायचा होता. पण पडली मानसिकता शेवटी. दुसरी गोष्ट इथे वर कुणीस परत संपादक अन होउ घालणारे संपादक री ओढताहेत अस लिहिलं आहे जे पुर्णतः चुकीचे आहे.

In reply to by स्पंदना

तीची विश्वास ठेवण्यात चुक झाली पण हे करायला पाहणारा खरा गुन्हेगार अन या गोष्टीचा वापर करुन तीचा अपमान करणारा दुसरा गुन्हेगार.
आमच्या दृष्टीने 'स्त्रीयांना मोकळे होण्यासाठी' म्हणून उघडलेल्या त्या दालनाची संपादीका खरी गुन्हेगार. कारण पुरुषांसमोर चर्चा करता येत नाही, किंवा टिंगल होईल अशा भितीने जो विभाग उघडला गेला, त्या विभागतल्याच गोष्टी पुरुषांकडे पोचल्यावरती अजून काय होणार ? आणि जुने स्कोर सेटल करणे ही काय फक्त मराठी संस्थळांचीच मक्तेदारी नाही. ;)
अगदी पराने सुद्धा मोठ्या सहानुभुतीचा आव आणत त्या बाईला अस झाल तुम्हाला पण अस होइल अशी भिती घातली आहे,
मी भिती वैग्रे काहीही घातलेली नसून स्पष्ट शब्दात मला माहिती असलेले अनुभव इथे सांगीतलेला आहे. त्यातून प्रत्येकानी योग्य ते आचरण अमलात आणावे. मी माझ्या प्रतिसादात काय लिहिले आहे ते निट वाचा. :- हा अनुभव नेहमीच येतो, किंवा सर्वच स्त्रीयांच्या बाबतीत असे घडते असे देखील नाही. पण असे देखील कधी कधी घड शकते ह्याची जाणीव सर्व बहिणींना असावी येवढीच इच्छा. सदर संस्थळावरती संपादीका पत्नी आणि सदस्य नवरा अशी जोडी होती पण इतरही अनेक जोड्यांच्या गॉसीपमुळे असे घडू शकते हे देखील ध्यानात ठेवावे. आणि मला सहानुभुती वैग्रे काहीही नाही. जे इथल्या भगिनींनी माहिती असावे असे वाटले ते इथे लिहिले. हा जो अनुभव मी शेअर केला आहे, तो तुम्हा स्त्रियांना गैर वाटत असेल किंवा उगाच भिती वैग्रे घालणारा वाटत असेल तर तो उडवून लावला तरी माझी हरकत नाही. शेवटी आम्ही फक्त सावध करु शकतो. तेही नाही जमले, तर 'मरु दे ना.. कुठे आपल्या सख्या आया बहिणी आहेत' असा विचार करून गप्प बसू.

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्त्रीयांना मोकळे होण्यासाठी याचा अर्थ कुणी काढेल असं वाटले नव्हतं. 'इथे येउन आपली सगली सीक्रेट्स सान्गा हो!' असा बोर्ड इथे कुणीही टान्गलेला नाही. उलट, ७. विभागातले विषय वा पोस्टी ह्याबद्दल विभागाबाहेर न बोलणे हे पथ्य प्रत्येकीने पाळावे. ही सूचना आधीच दिलेली आहे. आधीचा धागा कुणीही नीट न वाचता आपल्या मनचे वाट्टेल ते अर्थ काढणे अजूनही सुरु आहे असं दिसतय. स्त्रियांना "मोकळेपणा"नी बोलण्यासारख्या सतराशे साठ गोष्टी असतात. पुन्हा तेच सान्गतेय, अगदी घरगुती वस्तू असोत, खास कलागुण असोत, प्रकृतीच्या तक्रारी असोत, स्वैपाकातल्या साध्या साध्या गोष्टी असोत, किंवा इतर कुठल्या व्यावहारीक गोष्टींबद्दलची माहिती असो, यासाठी स्त्रियांना एक व्यासपीठ हवे आहे. ज्या स्त्रियांना राजकीय, आर्थिक किंवा अन्य चर्चांमधे रस नसतो पण इतर स्त्री सदस्यांशी इंटरअ‍ॅक्शन आवडेल, त्या मोकळेपणाने अशा दालनात वावरू शकतील. अश्या वेगळ्या दालनामुळे आपल्या नेहमीच्या माहितीतल्या ४ जणींऐवजी अजून १०० जणींचे मत जाणून घेता येइल. फक्त स्त्रियांना रस वाटेल अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या मुख्य पानावर सर्वांना अपील होणार नाहीत. उदाहरणार्थ; मध्ये आलेला एक 'फ्रॉक'चा धागा. त्यावरची शिवणाची चर्चा होउच शकली नाही. त्यावरच्या थट्टा-मस्करीला विरोध नाही, पण तरीही त्यात काहीजणींचा उत्साह मावळतो आणि इतर काहीजणींची काही छोट्या गोष्टी शिकण्याची संधीही जाते. "अबोली" हे दालन अश्या सर्व गोष्टींना व्यक्त होण्यासाठी स्थापन करण्यात येत आहे.

In reply to by कवितानागेश

निट न वाचता प्रतिक्रिया का देत आहेत सगळे ? ज्या संस्थळावरती हा किस्सा घडला, त्या संस्थळावरती असे दालन हे 'स्त्रीयांना मोकळे होण्यासाठी' म्हणून काढलेले होते असे मी सांगत आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पश्चिम युरोप आणि उत्तर रशिया यान्च्या बॉर्डरवर असलेल्या फॉकल्यान्ड्मध्ये १० वर्षांपूर्वी एक माणूस हाटीलात चहा प्यायला गेला. तो तिथेच टेबलावर त्याचे एटीएम कार्ड विसरून गेला. त्या कारडाच्या कव्हरवर त्यानी त्याचा पिन नम्बर लिहून ठेवला होता. ते कार्ड हाटेलाच्या म्यानेजराला मिळाले आणि त्याने सर्वच्या सर्व अकाउन्ट लुटले. तेंव्हापासून मी आणि माझ्या नात्यातल्या सगळ्यांनी एटीएम कार्ड वापरणे बन्द केले.

In reply to by कवितानागेश

मस्त प्रतिसाद आणि चपखल उदाहरण बेहद्द आवडले. मलाही मूळ प्रतिसादातल्या किस्स्याचे प्रयोजन समजले नाही. सदर स्थळावर स्त्रीयांसाठी दालन होते इतका संदर्भ सोडल्यास तो किस्सा इथल्या चर्चेशी काहीच सुसंगत नाही. सदर महिलेने टाकलेला धागा महिला दालनात टाकला होता की मूख्य बोर्डावर ह्याचाही खुलासा नाही. दुसरे म्हणजे असे खरेच घडले असेल तर त्या महिलेला धागा काढून टाकणे, आणि त्यानंतर आंतरजालावरुन निवृत्ती घेणे हे पटणारे नाही. त्यापेक्षा त्या दारू पार्टीतील ऐकिव माहितीवर आरोप करणार्‍या धटिंगणाला शाब्दिक चोप द्यायला हवा होता. मिपावरील अ‍ॅक्टिव महिलांपैकी कुणाशी असा प्रसंग झाला असता तर त्यांनी भर बोर्डावर त्या इसमला फोडून काढला असता आणि अनेक सदस्यांनीही पाठींबा दिला असता. तितके सुज्ञ् सदस्य इथे नक्कीच आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

जे नवरा बायको / स्त्री पुरुश एकच आयडी घेउन जॉइ॑ट लॉगइन करुन मिपा वर वावरतात, त्ञाचेबाबत अबोली विभागात कशी खबरदारी घेतलि जानार आहे हो? माझ्या एका प्रतिसादाला झापून झालेच आहे स॑पादिका बैन्चे. पण एक रास्त श॑का दुर्लक्शित केली गेली आहे. आयडी शेअर करणे फार कॉमन आहे. तेथे कशी खबरदारी घेतलि जानार आहे ? एवढेच प्रामाणिकपणे विचारले होते. ऊत्तराची सक्ति नाहिच, पण दिल्यास चा॑गले वाटेल. किणकिनाट

In reply to by किणकिनाट

आज ना उद्या पकडले जातातच. तेव्हा आयडी शेअर करणार्‍या दोघांचीही नाचक्की होईल हे सरळ आहे. वाईट हेतूने कोणीतरी यायचा प्रयत्न करणार हे गृहीत धरून फोनवरून ओळख पटवायची कल्पना आहे. आपला आयडी दुसर्‍याला वापरू देणार्‍या महिलेला सुद्धा पकडले जाऊन शिक्षा कधीतरी होणारच.

In reply to by पैसा

पैसा ताई, कसे पकडणार हो? समजा माझा आयडी वापरून माझा मित्र लॉगीन करत असेल तर तुम्हाला कळण्याची काही सोय आहे का? फार फार तर दोन IP दिसतील तुम्हाला पण त्यावरून दोन व्यक्ती आहेत हे कसे सिद्ध करणार? प्रश्न उरला नाचक्की चा. आजवर कुणाची झाली आहे नाचक्की? डु आयडी कळला कि तुम्ही त्याला उडवून टाकता, विषय संपतो. नाचक्की झाली तरी ती चावडीवर होत असेल. त्यामुळे या विधानाला फार काही अर्थ नाही. असे दावे करणे हे सद्य स्थितीत counter effective आहे. त्यापेक्षा असे होऊ शकते हे मान्य आहे. आणि हे गृहीत धरूनच अबोलींनी वावरायचे आहे असे सांगणे जास्त बरे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हल्लीच प्रसाद आणि अनुराधा या पतीपत्नींच्या प्रतिसादावरून ही गोष्ट अन्य सदस्यांच्या लक्षात आली होती आणि चुकून लॉगिन केले ते राहिले असे त्यांनी सांगितले. त्रासदायक काही नसल्यामुळे कोणी एवढे गंभीरपणे घेतले नाही. पण अशा संशयास्पद सदस्यांना "अबोली"मधे प्रवेश दिला जाणार नाही. दुसर्‍याचा आयडी वापरणे हा गुन्हाच आहे. आमच्या बॅंकेत काही जणांवर त्यासाठी क्रिमिनल केसेस झालेल्या आहेत. आणि गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कधीतरी पकडला जातोच.
त्यापेक्षा असे होऊ शकते हे मान्य आहे. आणि हे गृहीत धरूनच अबोलींनी वावरायचे आहे असे सांगणे जास्त बरे.
हे बरोबरच आहे. आणि आतापर्यंत आम्ही ज्यांच्याशी बोललो आहोत त्यांना याची कल्पना आहे.

In reply to by पैसा

पैसाताई, प्रणाम, सन्तुलीत, विचारपूर्वक, जेन्युईन आणि हो, पदग॑ड नसल्याचे जाणवणारा आपला प्रतिसाद आवडला. किणकिनाट

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

असे दावे करणे हे सद्य स्थितीत counter effective आहे. त्यापेक्षा असे होऊ शकते हे मान्य आहे. आणि हे गृहीत धरूनच अबोलींनी वावरायचे आहे असे सांगणे जास्त बरे.
अजानुकर्णाने हेच सांगितले होते. अतिरिक्त किंवा अवांतर (नेमका शब्द त्यांच्या प्रतिसादातच सापडेल) स्पष्टीकरणे दिलीत तर त्याविषयी प्रश्न येणारच, असे त्यांनी म्हटले आहे. तो इशारा पुरेसा ठरला नाही आणि आता तुम्हाला तेच सांगावे लागले. तंत्रज्ञान असल्याने प्रश्नांना, रादर आधी मुद्द्यांना, सीमा नसते. पण तारतम्य हा गुण थोडा दुर्मीळच असतो. त्यात लोकशाही आहे. अभिव्यक्ती वगैरेचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळं 'बालीश बहु 'बडबडणे'' चालू राहते. नीलकांत काही लिहितोय म्हटल्यावर संपादक मंडळातील व्यक्तींनी सदस्यत्वाच्या आयडीद्वारे संपादकाच्या भूमिकेतून काही लिहिण्याची गरज नाही, नव्हती. पण नाही. तांत्रीक प्रश्नांवर त्यांना बहुदा नीलकांतापेक्षा अधिक ज्ञान असावे. मग विषयाचा चोथा झाला किंवा होतोय म्हणून ओरडण्यात हशील नसतो. पण पुन्हा तारतम्यापाशी येऊन गाडी थांबते. असो.

In reply to by श्रावण मोडक

श्रामोंशी सहमत.

In reply to by श्रावण मोडक

त्यामुळं 'बालीश बहु 'बडबडणे'' चालू राहते. नीलकांत काही लिहितोय म्हटल्यावर संपादक मंडळातील व्यक्तींनी सदस्यत्वाच्या आयडीद्वारे संपादकाच्या भूमिकेतून काही लिहिण्याची गरज नाही, नव्हती. पण नाही. तांत्रीक प्रश्नांवर त्यांना बहुदा नीलकांतापेक्षा अधिक ज्ञान असावे. मग विषयाचा चोथा झाला किंवा होतोय म्हणून ओरडण्यात हशील नसतो. पण पुन्हा तारतम्यापाशी येऊन गाडी थांबते. असो. >>>> हा हा हा हा !!! सहमत होण्याशिवाय पर्यायच नाही.

In reply to by श्रावण मोडक

मला काही तांत्रिक ज्ञान आहे असा दावा मी कुठेही केला नाही. किंवा इतर तुम्ही म्हणताय तसे सुरक्षितता इ इ मुद्द्यांवर दावे मी तरी केलेले नाहीत. मला काय माहिती आहे आणि काय नाही याबद्दल माझे कोणतेही गैरसमज नाहीत. पण आतापर्यंत एकाचे झाले की दुसरे अशा प्रकाराने जे मुद्दे (आधीच्या चर्चा न वाचता) उभे केले जात आहेत त्याचा आता वीट आला आहे. नीलकांतने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला पाठिंबा देणे हे एक संपादक म्हणून मी माझे कर्तव्य समजते. एक नक्की, या विभागावरील चर्चेच्या निमित्ताने अनेकांनी आपाआपले खाजगी हिशेब चुकते करून घेतले हे पाहून मौज वाटली. मला तारतम्य नाही हे इतके स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद.

मुळात अश्या वेगळ्या दालनाची मागणी स्त्री-सदस्याकडून झाली आहे. आणि पुष्कळ स्त्रियांनी त्यात उत्साह दाखवला आहे. त्याचे कारण म्हणजे, कुठल्याही स्त्रीची दुसर्‍या कुठल्यीही स्त्रीबरोबर एक प्रकारची हार्मनी असते, पण ती अनुभवून कळते. ती अशी शब्दात सांगता येणार नाही. ( कदाचित तशीच पुरुषांचीही असे, मला कल्पना नाही) पण येणारी सदस्या स्त्रीच आहे याची खात्री करुन घेण्यासाठी स्वतः बोलणे गरजेचे आहे. त्यात फक्त फोनसाठी सोयीचे जावे यासाठी राहण्याचे गाव विचारले आहे. बाकी रंग, वय, उन्ची, वजन, शिक्षण, पगार, बॅन्क अकाउन्ट आणि मॅरिटल स्टेटस या गोष्टी विचारलेल्या नाहीत. माहित करुन घेण्यात इथे कुणालाही रसही नाही.

In reply to by कवितानागेश

या विभागाबद्दल स्त्रिया अन थोरामोठ्यांनी परस्पर विचारांती घेतलेल्या निर्णयावर ४ शब्द आधिच बोलुन झाले असल्याने त्यावर आता पुन्हा टंकत नाही. पण तुम्ही मनाचा कोते पणा बाजुला सारुन एक अतिशय महत्वाचे सत्य विधान केले आहे जे हाइलाइअट होणे गरजेचे वाटले. ते म्हणजे
कुठल्याही स्त्रीची दुसर्‍या कुठल्यीही स्त्रीबरोबर एक प्रकारची हार्मनी असते, पण ती अनुभवून कळते. ती अशी शब्दात सांगता येणार नाही.
म्हणजे स्त्रिया नैसर्गीकदृश्ट्याच पुरुषांशी जुळवुन घेण्याला (हार्मनी साधायला) कमी पडतात. पण याचा दोष मात्र पुरुषांच्या माथी मारला जातोय. थोडक्यात स्त्रि विभागाची स्थापना ही पुरुष स्त्रियांची करत असलेली टवाळी नसुन स्त्रियांच्या कोत्या मानसिकतेची निकड आहे हे स्पष्ट केल्या बद्दल विषेश आभार. टवाळी होण्यापेक्षा स्त्रियांना हर्मनी साधता येत नाहीये हेच प्रमुख कारण आहे, जर का स्त्रियांना हर्मनी साधता आलि तर होणार्‍या ट्वाळेकडे बघण्याचा द्रुश्टीकोनच मुळात सकारात्मक असेल व सेपरेट विभागाचे गरजच असणार नाही हे समस्त भगीनीवर्गाने कृपया लक्षात घ्यावे.

In reply to by अग्निकोल्हा

पुरुषांचा आपला उगाच एक समज असतो की त्यांचं लॉजिक फार्फार भारी असतं..आता या प्रतिसादात हा जो अचाट निष्कर्ष आहे तो कोणत्या लॉजिकने काढला असेल बरं???

In reply to by पिशी अबोली

तो कोणत्या लॉजिकने काढला असेल बरं???
स्त्रियांचा म्हणे सिक्स्थ-सेन्स स्ट्राँग असतो, असेल बुआ. पुरुषांचा मात्र कॉमसेन्स स्ट्राँग असतो. मला वाटतं हे एकमेव लॉजिक पुरेसं आहे. असो :- विषयानुशंगाने सर्व काही बोलुन झाले असल्याने या धाग्यावरचा हा शेवटचा प्रतिसाद***. *** जर वैयक्तीक पातळीवर प्रश्न अथवा शंका न विचारल्या गेल्या तर.

In reply to by अग्निकोल्हा

माझा या विभागाला विरोध नाही आणि हवाच अशी असोशीही नाही. त्यामुळे मी समर्थन आणि विरोध दोन्हीही करत नाहीय. कदाचित वरच्या ठळक टायपातल्या मानहानीकारक सरसकटीकरणामुळे काहीजणी लिहायला बिचकत असतील. वरचं वाक्य एक उदाहरण झालं, परंतु गेल्या चार दिवसांतच स्त्रियांना खिलाडूवृत्ती,अक्कल नसणे इ.प्रकार लिहून झाले आहेत,मग जुने धागे तर सोडूनच द्या. इथे कोत्या मनोवृत्तीचे कोण आहे हे मी सांगायची गरज नाही,परंतु त्या एका उदाहरणावरून मी त्या लिंगी व्यक्तींचं, त्या व्यक्तीच्या मित्रपरिवाराचं सरसकटीकरण करत नाही. जे ते ज्या त्या व्यक्तीपुरतं(आयडीपुरतं) आहे हे मानणं, हा झाला कॉमनसेन्स. तो कॉमन नसतो असं लोकांचं म्हणणं आहे म्हणे!!!

In reply to by मस्त कलंदर

एका उदाहरणावरून मी त्या लिंगी व्यक्तींचं, त्या व्यक्तीच्या मित्रपरिवाराचं सरसकटीकरण करत नाही. जे ते ज्या त्या व्यक्तीपुरतं(आयडीपुरतं) आहे हे मानणं, हा झाला कॉमनसेन्स
थोडक्यात रेफरन्स म्हणून सदर आयडीने , कुठल्याही स्त्रीची दुसर्‍या कुठल्यीही स्त्रीबरोबर एक प्रकारची हार्मनी असते, असे जे सरसकटीकरण असलेले विधान केलेय त्याचा तुम्ही करत असलेला निषेध/विरोध माझ्या प्रतिसादाला उत्तर म्हणुन का लिहलाय ?
तो कॉमन नसतो असं लोकांचं म्हणणं आहे म्हणे!!!
नसतोच मुळी. पण ज्या कोणाकडे तो असतो त्यात तो स्ट्राँग कोणाचा असतो याची खातरजमा अजुनही झाली नसल्यास. समज येइ पर्यंत व्यनितुन अवश्य चर्चा केल्या जाइल.

In reply to by अग्निकोल्हा

एका आयडीने जे लिहिलं, त्याचं त्याव्यक्तीसापेक्ष काहीतरी आकलन असेल, ते माझं असायलाच हवं असं नाही. तुम्ही उधृत केलेलं माझंच वाक्य म्हणतं की
एका उदाहरणावरून मी त्या लिंगी व्यक्तींचं, त्या व्यक्तीच्या मित्रपरिवाराचं सरसकटीकरण करत नाही.
त्यामुळे माझा प्रतिसाद त्या वाक्याचं समर्थन/विरोध नसून तुमच्या स्ट्रांग कॉमनसेन्सने जो तुम्हाला निष्कर्ष काधून दिला आहे, त्या अनुमानासाठी आहे. असो.. इतरांना समज येईपर्यंत त्यांच्याशी व्यनिमधून गप्पा हाणायला मला वेळ नाही.

In reply to by मस्त कलंदर

त्याव्यक्तीसापेक्ष अन प्रतिसादसापेक्ष विधान यात तुमची गफलत होतेय का ?
इतरांना समज येईपर्यंत त्यांच्याशी व्यनिमधून गप्पा हाणायला मला वेळ नाही.
मला आहे, म्हणून तर समज येइल याची खात्रि नसुनही मी चर्चेचा प्रस्ताव ठेवत असतो.

In reply to by मस्त कलंदर

मग स्वतःशीच व्यनी-मनीच्या गोष्टी खेळाल तर बरं..
तुमच्या सवयी मला लावु नका.
असो.. तुमचं चालूच द्या.
तर काय. पक्का मुबैकर असल्याने शेवटचा शब्द माझा ठरत नाही तो पर्यंत चालुच राहणार.

मुळात जालावर वा इतरत्रही वावरताना आपली (वैयक्तिक) माहिती कुठे आणि किती प्रमाणात उघड करायची याची जाण प्रत्येकाला असायला हवी. आंधळा विश्वास कुणावरही ठेऊ नये. एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर, रहाण्याचं ठिकाण आदी माहिती फक्त संकेत्स्थळावरुनच मिळते का? इथल्या स्त्री सदस्यांच्या मागणीनुसार हा विभाग उभा रहातोय. शिवाय महिलांना या ईथे सामिल व्हा म्हणुन कुठलंही निवेदन केलेलं नाही. फक्त ज्या सदस्यांना सामिल व्हायचय, त्यांची त्या खरच महीला आहेत ही खात्री पटवण्यासाठी फोन नं मागितले आहेत. काही जणांची सेफ्टीच्या दृष्टीने शंका रास्त आहेच पण तुम्ही त्यांना सावध करुन तुमची कामगीरी पार पाडलीत. आता निर्णय त्या सदस्यांना घेऊद्यात ना. जर त्यांची इच्छा असेल तर होतील त्या सहभागी. जर विरोधाकांचा मुद्दा त्यांना पटला तर नाही होणार. प्लीज आता हे पुराण थांबवा. अन आपली शक्ती अन वेळ दुसर्‍या चांगल्या कामासाठी वापरा ही विनंती.

In reply to by गणपा

आपापला कॉमन सेन्स नीट वापरलात तर काहीही अघटीत घडण्याची शक्यता नगण्य होते. एवढे लक्षात ठेवा.

अनेकांनी आपल्या सोईचे अर्थ काढून झाले असं दिसतंय आणि त्यावरून अनेक उपाध्या देऊनही झाल्या आहेत. आता सर्वांचं बोलून झालं असं गृहीत धरून अबोलीची कार्यपध्दती ठरवूयात. सर्वात आधी हा विभाग स्त्रियांसाठी आहे हे नक्की, येथे त्यांना रस असेल त्या विषयावर त्यांची चर्चा होईल साधारणतः घर, परिवार , घरातली कामे वगैरे चर्चा होतील असे अपेक्षीत आहे. फक्त अबोलीमध्येच नाही तर मिपावर सुध्दा कुणीही आपली व्यक्तिगत माहिती देऊ नये अशी जाहीर घोषणा यापुर्वीच करून झाली आहे. तेच आता पुन्हा सांगतोय की मिसळपाव हे सामाजीक संकेतस्थळ आहे येथे आपली व्यक्तिगत माहिती देऊ नये. अबोलीत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या स्त्रीसदस्यांना कुणातरी स्त्री संपादकांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांच्या संवाद होईल. त्या नंतर संपादक मला त्या सदस्यांची नावे देतील त्यांना अबोलीत प्रवेश दिल्या जाईल. लक्षात घ्या. मला कुणाचेही संपर्क तपशील देण्याची गरज नाही. मी प्रत्यक्ष संवादात कुठेही नसेन आणि तसे असण्याची गरज नाही. तांत्रीकबाबी व अन्य काही अडचण असल्यास मी असेन एवढंच. बाकी सर्व त्यांचा त्यांचा विभाग असेल. पुन्हा एकदा सांगतो ज्या सदस्यांना इच्छा असेल त्यांनीच प्रवेश घ्या. प्रवेश घ्याल तर त्या विभागाच्या नियमांचं पालन करा. तसेच तो विभाग वेगळा आहे तरी सुध्दा आपलं खाजही असं काहीही जाहीर करू नका. आणि अन्य सदस्यांना विनंती आहे की आता बस करा. आपण अन्य विषयांकडे वळूया. - नीलकांत

In reply to by नीलकांत

ज्या उदात्त भावनेने हा विभाग चालू करत आहेस, त्याच्या नावाचा पुर्नविचार झाला तर आनंद वाटेल; सक्ती नाही. आतापर्यंत सुचवण्यात आलेली क्रमवार नांवे-सुचवणार्‍यांची नावे. १, मानिनी-- मस्त कलंदर २. स्वच्छंदी-- बहुतेक सुबक ठेंगणी ३. मुक्ता- पेठकर काका मी सर्वच धागे आणि सर्व प्रतिसाद वाचले नसल्याने काही नांवे हुकली असण्याची पूर्ण शक्यता आहे. जर कुणास आठवत असतील तर इथे ती दिल्यास बरे होईल.

दामिनी किंवा सौदामिनी नाव मला योग्य वाटते, किंवा सोनिया ठेवा मग तुमच्या विभागाला कितीही विरोध झाला , त्याविरुद्ध कितीही आदळआपट झाली तरी सरत शेवटी यश ,भरभराट , प्रगती तुमच्या विभागाला पाचवीला पुजल्या जातील. नावातच विभागाचे अर्धे यश सामावले आहे.

इथे सर्व सदस्य महिलांना कुठलेही बंधन, दडपण, संकोच अनुभवास न येता मुक्तपणे विचार मांडण्यास/चर्चा करण्यास संधी मिळावी ह्या विचारातून 'मुक्ता' हे नांव सुचविले आहे.

In reply to by लंबूटांग

मी वाचला होता तुमचा प्रतिसाद .... पण गावामागुन आल्यागत वाटला ... म्हणजे जे मुद्दे तुम्ही मांडले होते त्यावर आधी चर्चा झाल्यागत वाटली ... सगळं झाल्यावरच निलकांत चा प्रतिसाद आला होता ... त्यामुळे चोथा झालेल्या उसाला परत चावण्यात काहिच तथ्य नव्हतं ... असो बाकी नाव बदलण्याबाबत चर्चा व्हावी ....

नीलकांत शी सहमत आहे. आपण आपल्या कुटुंबातील स्त्रियांना वेगळा अवकाश देतोच ना! पुरुषांनाही वेगळा अवकाश स्त्रिया देतातच ना! मिपा हे आपल एक कुटुंबच मानतो ना आपण?

या धाग्यावरचे काही प्रतिसाद वाचून अठराव्या शतकातल्या; न शिकलेल्या; बाहेरचे जग कधीही न अनुभवलेल्या; अडाणी, गरीब बिच्चा -या अब ला 'अबोली' (किंवा जे काही नाव ठरेल ते!) व्यासपीठाचा वापर करणार आहेत अशी एक शंका मनात यायला लागली आहे. :-) अर्थात अशा अनेक स्त्रिया आजही आपल्या भवती आहेत - पण त्या कशाला आंतरजालावर येतील? म्हणजे इतक्यात तरी तशी शक्यता दिसत नाही.

In reply to by आतिवास

या धाग्यावरचे काही प्रतिसाद वाचून अठराव्या शतकातल्या; न शिकलेल्या; बाहेरचे जग कधीही न अनुभवलेल्या; अडाणी, गरीब बिच्चा -या अब ला 'अबोली' (किंवा जे काही नाव ठरेल ते!) व्यासपीठाचा वापर करणार आहेत अशी एक शंका मनात यायला लागली आहे.
गरीब अन बिचार्‍या नाही तर वैतागलेल्या, काहीही बोलायला गेल की टांगायला नेण्याच्या वृत्तीला कंटाळलेल्या अश्या खमंग बायका असणार आहेत तिथे. मोकळेपणाने बोलतील. थोड्या रिलॅक्स होतील. नव्या दमाने, पुन्हा जगाला भिडतील.

हे सगळं वाचून आता संपादिका स्त्रीदालनाच्या होतकरू सदस्यांना "मिरांडा वॉर्निंग" सारखं काहीतरी वाचून दाखवतील असं वाटायला लागलंय!

वरीलपैकी काही 'वडाप' छाप प्रतिसाद वाचून 'बातका बतंगड' किंवा 'काथ्याचा चोथा' म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभवले...!

मला ह्या धाग्यावर संपादिकांचे आभार मानायचे आहेत. ते अशासाठी की आम्ही सगळ्यांनी अशा विभागाची मागणी केली, ती नीलकांतापर्यंत पोचवायचे काम तुम्ही केलेत - त्यानंतर पाठपुरावा करुन असा विभाग प्रत्यक्षात येईल ही चांगली बातमी मिळाली. त्यासाठीही आता तुम्ही काम कराल - थोडक्यात मिपाच्या प्रेमापोटी आपला वेळ घालवून लष्कराच्या भाकरी भाजाल. त्यासाठी कारण नसताना अपशब्द,टिंगल टवाळी ऐकून घेतलीत, इतकेच काय ज्या धाग्यावर नीलकांताने मिपाकरांशी "संवाद" साधायचे काम केले, त्याच धाग्यावर त्याने जे लिहिले आहे ते धाब्यावर बसवून तुमचे तारतम्यही काढले गेले. तेह्वा हे इतके सगळे तुम्ही आमच्यासाठी सहन केलेत. मनापासून आभार आणि हा अबोली विभाग, त्यातील संभाव्य धोक्यांची शक्यता लक्षात घेऊनही यशस्वी करण्यासाठी माझे पूर्ण सहकार्य तुम्हांला नेहमीच देईन हे प्रॉमिस. :)

नीलकांता.. तुझ्या सगळ्या योजनांना माझा पाठिंबा आहे.. अनेकानेक शुभेच्छा.. तात्या, (मिपा संस्थापक)

In reply to by विसोबा खेचर

धन्यवाद तात्या. तुम्ही दिलेले सल्ले अजुनही लक्षात आहेत. त्यामुळे लोड घेत नाही :) तुम्ही सक्रिय झालात हे उत्तम.