नमस्कार,
अबोली नावाचा नवा विभाग मिपावर सुरू करायचे ठरले. पाडव्याला याची घोषणा झाली. आता एवढ्यात हा विभाग सुरू होईल.
अपेक्षेप्रमाणे मिपावर याबाबतीत उलटसुलट चर्चा सुरू झाली. मिपावर काही एक नवीन होतंय तर त्यावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत. काहींना हा विभाग आवडला तर काहींना अजिबात नाही आवडला. काहींनी आपला संबंधच नाही त्यामुळे कोरड्या शुभकामना दिल्यात तर काहींनी विभाग कधी सुरू होतो अशी चौकशीसुध्दा केली. मात्र काही लोकांच्या प्रतिक्रिया जरा मर्यादा सोडलेल्या वाटल्या त्याचे वाईट वाटले. आता त्याचे कारण काय? याच्या खोलात जायला नको. मात्र तरीही काही विचार या निमीत्ताने मांडायचे आहेत.
मिपावर स्त्रीयांना त्यांच्या विषयावर बोलायला तेवढे मोकळे वातावरण नाही असा काहींचा सुर होता. मला असं म्हणायचं होतं की विषय जसा असेल तसा मिपाकर प्रतिसाद देतात. उत्तम विषय असला तर डोक्यावर घेतील आणि नाहीच पटलं तर 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' देऊन चेष्टा करतील. मिपाची प्रकृती अशीच आहे. मात्र तरी प्रश्न त्यांचा उरतोच, की आमच्या रोजच्या आयुष्यात असं खुप काही असतं जे आमच्यासाठी खुप महत्वाचं असतं मात्र पुरूषांसाठी त्याची काहीच किंमत नसते. किंवा असे काही विषय आहेत की ज्यावर पुरूषांनी बोलणे सुध्दा अपेक्षीत नसते. मात्र मुख्य बोर्डावर अशी सुचना तर देऊ शकत नाही ना, की यावर केवळ निमंत्रीतांनीच बोलणे अपेक्षीत आहे... हे शक्य नाही... मात्र एक शक्य आहे की एक असा कप्पा तयार करता येऊ शकतो जेथे अश्या विषयांवर चर्चा होऊ शकते. अन्य लोकांना या भागात प्रवेश नसेल, कारण हे चर्चा विषय त्यांच्यासाठी नसतील, त्यांना ज्या विषयांशी संबंध नाही किंवा चर्चेत केवळ टर उडवायच्या शिवाय ज्यांना सहभाग देता येणार नाही त्यांना धागा अवांतरात नेण्याची मुभा नको. ह्या एका साध्या विचारावर हा विभाग आहे.
मात्र काल परवा उत्साहात निघालेल्या धाग्यांत जे तारे तोडल्यागेलेत ते वाईट वाटावेत असेच आहेत. त्यात असा विभाग काढायला नको होता इतपत बोलणे किंवा मतप्रदर्शन ठिक आहे, मात्र ज्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाचा निषेध करावासा वाटत असेल त्या संकेतस्थळावर आपण येऊच नये ना ! तसे मात्र नाही, येथे यायचे आणि उगाच राळ उडवत रहायची असा प्रकार हा आहे. मिपा व्यवस्थापन चालवून घेतय... मऊ लागतंय... असा प्रकार हा वाटतोय. मी कधी नव्हे तर एवढा कठोर बोलतोय मात्र यासाठी झालेला वैताग एवढा आहे की असं बोलावं लागतंय.
त्यानंतर ह्या विभागात काहीही गुप्त राहणार नाही असा प्रचार चालला आहे. खरं तर ह्या विभागात गुप्त राहण्यासारखे काहीच नसेल. ह्या विभागात 'त्यांना' वाचनमात्र ठेवावे ज्यांना या विषयात सामान्यतः रस नसतो म्हणून वेगळा विभाग, मग केवळ वाचनमात्रच न ठेवता प्रवेशच नको असा विचार केला. यात अगदी लिंगाधारीत अन्याय कारक रचना वगैरे असे काही नाही. आणि स्त्री- पुरूष समानतेचाही असा काही विचार आवश्यक नाही. कारण ह्या सरळ्या स्त्रीया मुख्य बोर्डावर लिहीणार आहेतच. त्यामुळे हा विभाग हॅक करून दाखवण्याच्या गप्पा करने सर्वथा अनाठाई आहे. स्त्रीयांच्या विशेष विभागात पुरूषांनी येऊ नये असा संकेत आपण ठरवतोय. याउप्पर कुणी घुसखोरी केलीच तर त्या विकृतीला आपण काय म्हणावं ? त्यामुळे ह्या विभागात काय चालतंय याच्याशी अन्य लोकांना काहीही रस असू नये. काही चुकीचं होणार नाही , वातावरण उत्तम रहावं यासाठी संपादक आहेत ते काळजी घेतील. या विभागाबाबत ज्यांना आपला विरोध नोंदवायचा आहे ते मला व्यनि करू शकतात. त्यामुळे माझ्या काही जवळच्या मित्रांना विनंती आहे की काळजी करू नका असा विभाग निघाल्यामुळे काही लागलीच जगबुडी होणार नाही.
ह्याच चर्चेत काही अश्या प्रकारची कागाळी झाली आहे की ज्याने संपादकांना बडवे वगैरे उपमा देण्यात आली आणि त्याला एका राजकीय उल्लेखाचा संदर्भ दिल्याने ते नकारात्मक उद्द्येशाने बडवे बोलल्यासारखे होते. हे अत्यंत चुकीचे आहे. आणि अजिबात मान्य नाही. संपादक आपल्यातीलच एक आहेत. आपला वेळ ते आपल्या मिपासाठी देतात. त्यांच्या कष्टांची कल्पना मला पुर्णपणे आहे. त्यामुळे त्या कमेंटवर व्यवस्थापन कारवाई तर करेलच मात्र अन्य सर्व सदस्यांना पुन्हा एकदा सुचना देतो की संपादकांविषयी काहीही बोललेलं खपवून घेणार नाही.
काही लोक कायम मिपावर येतात ते मिपाविषयी, मिपा व्यवस्थापना विषयी वाईट बोलायलाच येतात असे दिसते. कारण चांगल्या चर्चांत यांचा सहभाग नसतो. चांगले लेख यांना लिहीता येत नाही. मात्र नावे ठेवायलाच हे येतात असे दिसते. अश्या लोकांना सुधारण्यासाठी बराच वेळ दिलेला आहे. यापुढे खरडवहीत सुध्दा चुकीचे लिहीलेले आढळले तर अश्या लोकांवर कारवाई केली जाईल.
शेवटी पुन्हा एकदा सर्व सदस्यांना आवाहन आहे की मिपा व्यवस्थापन जे करते त्याबाबत चर्चा करण्याची आपले मत प्रदर्शन करण्याची सर्वांना मुभा आहे. मात्र मिपाचं वातावरण आपल्या लिहीण्याने गढूळ होत असेल तर असे लेखन जाहीर न करता मला व्यक्तिगत निरोप पाठवा. माझ्याशी चर्चा करा. मुख्य बोर्डावर निषेधाचे धागे, हॅक करण्याची आव्हाने आणि संपादकांना नकारात्मक पदव्या का म्हणून सहन कराव्यात?
मिपा आपलं आहे, ते सकारात्मक पुढे नेऊया. त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षीत आहे.
- नीलकांत
वाचने
19713
प्रतिक्रिया
127
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१११११११११११११११११
ताकीदसुधा संयमित शब्दांत
+१
In reply to ताकीदसुधा संयमित शब्दांत by यशोधरा
+१
In reply to ताकीदसुधा संयमित शब्दांत by यशोधरा
मिपा आपलं आहे, ते सकारात्मक
+१
In reply to मिपा आपलं आहे, ते सकारात्मक by स्पंदना
+१
In reply to मिपा आपलं आहे, ते सकारात्मक by स्पंदना
सहमत
बर्याच लोकांनी अबोली या
समयोचीत ...
कळकळीचा संवाद
+ १
In reply to कळकळीचा संवाद by पैसा
+११११
सहमत
In reply to +११११ by पिलीयन रायडर
अगदी सहमत...
लाइक च बटन आहे का रे इथे
महत्वाच्या वेळी अगदी नेमक्या
+1
In reply to महत्वाच्या वेळी अगदी नेमक्या by किसन शिंदे
+१
शुभेच्छा आहेतच.. पण..
अनेक आभार
एक नविन सुरुवात
जिथे नांदायचे तिथे सुखाने
समय सूचित लेख
सहमत आहे..
सावधान मिपा बदलते आहे ?
ह्म्म
In reply to सावधान मिपा बदलते आहे ? by तर्री
गोगलगाई लेखातही ज्यांना खुसपट
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
सोनारानेच कान टोचलेले बरे.
In reply to गोगलगाई लेखातही ज्यांना खुसपट by शुचि
मॉनिटर्स! यु टु?????????
In reply to सोनारानेच कान टोचलेले बरे. by गणपा
काय दिवस आलेत. शुचि तैंशी
In reply to सोनारानेच कान टोचलेले बरे. by गणपा
खरोखर प्रचंड संयमी आणि
+१
In reply to खरोखर प्रचंड संयमी आणि by गुलाम
@नीलकांत साहेब, या निमित्ताने
In reply to खरोखर प्रचंड संयमी आणि by गुलाम
शुभेच्छा/शंका/सूचना
-१
In reply to शुभेच्छा/शंका/सूचना by आजानुकर्ण
मूलभूत फरक
In reply to -१ by स्पंदना
ह्म्म्म .. खरच या बाजुने
In reply to मूलभूत फरक by आजानुकर्ण
संपर्क-माहितीबद्दलच्या आक्षेपावर जरा असहमत
In reply to मूलभूत फरक by आजानुकर्ण
आजानुकर्णांशी प्रचंड सहमत!!!
In reply to मूलभूत फरक by आजानुकर्ण
+१
In reply to मूलभूत फरक by आजानुकर्ण
माफ करा
In reply to मूलभूत फरक by आजानुकर्ण
काही लोक कायम मिपावर येतात ते
आम्ही आपलं हा पेशल विभाग कधी
अबोलीचे सदस्यत्व नसेल तर नाही
In reply to आम्ही आपलं हा पेशल विभाग कधी by शिल्पा ब
म्हणजे अबोलीसाठी वेगळ्याने
In reply to अबोलीचे सदस्यत्व नसेल तर नाही by यशोधरा
वेगळे सदस्यत्व नाय गो!
In reply to म्हणजे अबोलीसाठी वेगळ्याने by शिल्पा ब
धागा वाच की गं शिपातै नीट.
In reply to म्हणजे अबोलीसाठी वेगळ्याने by शिल्पा ब
शिल्पा*
In reply to धागा वाच की गं शिपातै नीट. by यशोधरा
एक श॑का
श॑का बळ्कट झाली
In reply to एक श॑का by किणकिनाट
मला तरी "अबोली" अभेद्य आहे..
In reply to श॑का बळ्कट झाली by किणकिनाट
आपण करतो, मी करते. किबोर्ड
In reply to श॑का बळ्कट झाली by किणकिनाट
मला एक गोष्ट नीटशी कळत नाहीये
असुर्क्षित वाटत असेल तर
In reply to मला एक गोष्ट नीटशी कळत नाहीये by पिलीयन रायडर
हेच लिहीलं होतं आधी पण म्हणलं
In reply to असुर्क्षित वाटत असेल तर by यशोधरा
सॉरी नो जमेश.
In reply to हेच लिहीलं होतं आधी पण म्हणलं by पिलीयन रायडर
इतक्यात कुठलंहो जमायला!
In reply to सॉरी नो जमेश. by अभ्या..
:)
In reply to हेच लिहीलं होतं आधी पण म्हणलं by पिलीयन रायडर
अभिनंदन.
शेवटच्या परिच्छेदाबद्दल पेठकर
In reply to अभिनंदन. by प्रभाकर पेठकर
थोडक्यात पण अतिशय महत्त्वाचे
मिपाचे सर्वेसर्वा नीलकांत
लेखातील भावनेशी १००% सहमत आहे
विश्वनाथ मेहेंदळ्यांच्या
In reply to लेखातील भावनेशी १००% सहमत आहे by विश्वनाथ मेहेंदळे
खरेतर ह्या विषयावरती एक अक्षर
बाप्रे !!!
In reply to खरेतर ह्या विषयावरती एक अक्षर by परिकथेतील राजकुमार
भयानक
In reply to खरेतर ह्या विषयावरती एक अक्षर by परिकथेतील राजकुमार
आईचा घो!!!!!!!!
In reply to खरेतर ह्या विषयावरती एक अक्षर by परिकथेतील राजकुमार
वाईट घटना आहे.
In reply to खरेतर ह्या विषयावरती एक अक्षर by परिकथेतील राजकुमार