✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

स
सोत्रि यांनी
Tue, 03/13/2012 - 04:00  ·  लेख
लेख
स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे. अदितीच्या ह्या लेखामुळे त्यावर जरा विचार करून उत्तर शोधून काढावेच असे वाटते. ह्या बाबतीत मला असे वाटते किंबहूना आजवरचे माझे मत असे की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री
  • आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
  • शिक्षणापासून वंचित राहते
  • सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
  • चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते (हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)
तर, तिला शिक्षण मिळून ती आर्थिकदृष्ट्या स्वाबलंबी होऊन तिला सत्तेत किंवा अधिकारामध्ये वाव मिळायला हवा ही झाली स्त्री मुक्ती आणि त्यासाठी ‘सर्व पातळीवर समान संधी’ मिळणे म्हणजेच शिक्षण, करियर, सत्तेत (अधिकारात) वाटा ह्यामध्ये स्त्री पुरूष असा लिंगभेद न होता समान संधी मिळणे म्हणजे स्त्री पुरुष समानता. त्या अनुषंगाने आंतरजालावर जरा शोध घेतला तर फार काही हाती लागले नाही. खरंच हे जरा विस्मयकारकच होते. पण जे काही थोडे बहुत वाचायला मिळाले, काही चर्चा वाचायला मिळाल्या तेथेही मुळात स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हेच स्पष्ट नाही. एके ठिकाणी स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली. सांख्यिकीच्या आधारे ही समानता मोजण्याचा प्रयत्न वर उल्लेखलेल्या अदिती ह्यांच्या लेखात झाला आहे. ज्या ज्या गोष्टी पुरूष करू शकतात त्या त्या स्त्रियांनी करणे म्हणजे समानता का? किंवा मग तसे नसेल तर निदान ज्या गोष्टी स्त्रिया करू शकतात त्यात त्यांची संख्या पुरुषांएवढी(च) हवी का? म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का? ही स्त्री पुरुष समानता नेमकी काय हा विचार करता करता ‘दिमाग का दही’ का काय म्हणतात तसे झाले आणि अचानक एक छान लेख वाचायला मिळाला (हिंदीत आहे). ह्यात म्हटले आहे की स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं. मला हे एकदम भावले आणि पटले. साधक-बाधक चर्चा होऊन ह्याचे उत्तर इथे मिळेल असे वाटते ब्वॉ.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
127823 वाचन

💬 प्रतिसाद (247)

प्रतिक्रिया

झालं का??????????????

प्यारे१
Fri, 03/16/2012 - 12:00 नवीन
झालं का?????????????? ;)
  • Log in or register to post comments

धाग्याचं दीड शतक पूर्ण होऊन

यकु
Sat, 03/17/2012 - 01:48 नवीन
धाग्याचं दीड शतक पूर्ण होऊन त्याची दुसर्‍या शतकाकडे वाटचाल सुरु झाली असली तरी वर सोकाजी मला तोच मूलभूत प्रश्न विचारताना दिसतोय. स्‍त्री पुरूष समानता म्हणजे काय? वरुन पुन्हा सोकाजींचा तो कुणीतरी अंगावर धावून आल्यासारखा, दबलेला फोटो. लैच मजेशीर आहे सगळं.
  • Log in or register to post comments

ते घाबरलेत!

पैसा
Sat, 03/17/2012 - 16:04 नवीन
म्हणूनच आपल्याबरोबर आणखी कोण आहेत याची चाचपणी करतायत कळलं नाही तुला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

ख्याख्याख्या सोकाजी मजेदार

यकु
Sat, 03/17/2012 - 16:40 नवीन
ख्याख्याख्या सोकाजी मजेदार माणूस आहे. त्यांना 'शेपटी पेटलेला हनुमंत' असा आयडी द्या.. ;-) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हौ!

पैसा
Sat, 03/17/2012 - 16:43 नवीन
म्हणूनच विहिरी आणि समुद्र शोधतायत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

अगतिक पुरुषांचं काय?

सोत्रि
Sat, 03/17/2012 - 13:34 नवीन
खूपच गरम झाले आहे वातवरण म्हणून ढकलपत्रातून आलेली हे एक कविता टाकतो आहे वातावरण जरा हलके करायला. :) जागतिक महिला दिनाचं ठिक आहे हो.. अगतिक पुरुषांचं काय? म्हणे, महिलांवर अत्याचार होतो..! च्यायला, हे बरं आहे.. आम्ही केला तो अत्याचार तुम्ही केला तो चमत्कार? अहो, कंटाळा आलाय मला ह्या जगण्याचा रोज घाबरत घरात शिरण्याचा “आज काय झालं असेल ? कामवाली आली नसेल? की शेजारीण भांडली असेल..? माझ्याशी नीट वागेल ना? उखडलेली नसेल ना?” आता होतं कधी कधी माणसाकडून कामाच्या व्यापात जातो काही विसरून दिवसभरात फोन केला नाही म्हणून इतकं का चिडायचं? "तुझं माझ्यावर प्रेम नाही" म्हणून डोळ्यात पाणी आणायचं? फारच अवघड काम आहे लग्न करणंच हराम आहे बारा तास ऑफिसात सडल्यानंतर थोडा विरंगुळा लागतो कधी एखादी मॅच कधी ॲक्शन सिनेमा असतो पण रोज हिची कोणती तरी फालतू सीरियल असते ब्रेकमध्येसुद्धा चॅनल बदलायला मला मनाई असते ऑफिस मध्ये बॉस बसू देत नाही घरी आल्यावर ही झोपू देत नाही जरा डोळा लागायचा अवकाश कर्कश्श घोरायाला लागते जागं करून सांगितलं तर– “मी कुठे घोरते…!!” डोक्याखालची उशी मी कानावरती घेतो मलाच माहीत कसा मी झोपेत गुदमरतो!! तरी अजून तुम्हाला भांडणांचं सांगितलं नाही कटकट, भुणभुण करण्यासाठी कारणही लागत नाही..! "चादरीची घडी केली नाही.. पेपर उचलून ठेवला नाही.. पंखा बंद केला नाही.. दूधवाला आला नाही..(??) माझ्या भावाने याँव केलं माझ्या “जीज्जू”ने त्याँव केलं माझंच असलं नशीब फुटकं वाट्यास आलंय ध्यान मेलं..!!” वीकेंडलाच घेतो मी एखाद-दोन पेग त्याच्यावरून हिची आदळआपट.. फेकाफेक.. मोठेमोठे डोळे तिचे आणखी मोठे करते माझ्या अख्ख्या खानदानाचा उगाच उद्धार करते! तरी मी बिचारा सगळं सहन करतो प्रत्येक अपमान पचवतो अन् तोंड बंद ठेवतो.. आजकाल मला प्रत्येक पुरुष दीनवाणा दिसतो 'बायको' नावाच्या भुताने पछाडलेला वाटतो !! आणि तुम्ही म्हणता महिलांवर अत्याचार होतो..? च्यायला, हे बरं आहे!! महिला दिन - पुरुष 'दीन'
  • Log in or register to post comments

भय इथले संपत नाSSSहीSSS...!

प्रभाकर पेठकर
Sat, 03/17/2012 - 14:03 नवीन
हा: हा: हा:....! मुद्देसुद कवितेत बरीच 'स्फोटकता' सामावलेली आहे. सोत्रीसाहेब, आज दोन नाही चार पेग भरावे लागणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

बायको कशीही असली तरी शेवटी

पिलीयन रायडर
Mon, 03/19/2012 - 17:32 नवीन
बायको कशीही असली तरी शेवटी पुरुषांना काय हवं असतं... बायकोच्या हातचा डबा.. ऑफिस मध्ये मिरवायला.. तिचा मउसुत हात.. केसातुन फिरवायला... तिची लांबसडक बोटं...मस्त तेल जिरवायला.. तिचे नाजुक ओठ.. गालावर फिरवायला.. आईची उबदार कुस.. सगळी दु:ख हरवायला.. तिचा मायेचा हात.. वरण भात भरवायला.. तिचा प्रेमळ धाक.. बाराखडी गिरवायला... तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला.. त्याला बहीण हवी..हट्ट पुरवायला.. त्याला मुलगी हवी..जाताना रडवायला... त्याला ती हवीये... माधुर्य टिकवायला... तिला तो हवाय.. गोडी वाढ्वायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

ज ह ब ह र द ह स्त !

सोत्रि
Mon, 03/19/2012 - 18:25 नवीन
मस्तच! अतिशय आवडली छोटी कविता! - (पिलीयन रायडर ह्यांचा पंखा झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

प्रनबदा नी हा धागा वाचला की

निखिल देशपांडे
Sat, 03/17/2012 - 21:03 नवीन
प्रनबदा नी हा धागा वाचला की काय?? स्त्री पुरुष यांना प्राप्तीकराच्या पातळीवर समान केले की त्यांनी. निखिल
  • Log in or register to post comments

चला म्हणजे कुठंतरी समानता आली

५० फक्त
Sun, 03/18/2012 - 10:35 नवीन
चला म्हणजे कुठंतरी समानता आली बरं झालं.
  • Log in or register to post comments

चर्चा थंडावली काय..?

मोदक
Sun, 03/18/2012 - 20:19 नवीन
चर्चा थंडावली काय..? की सगळे मधल्या सुट्टीतला डबा खात आहेत..? (हा धागा ३ पानी होणार अशी पैज मारून बसलेला) मोदक. ;-)
  • Log in or register to post comments

झालि ३ पण झालि. आता मि

किचेन
Sun, 03/18/2012 - 22:38 नवीन
झालि ३ पण झालि. आता मि द्विशतकचि वात बघत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आता २५० कडे वातचाल सुरू आहे..

मोदक
Tue, 03/20/2012 - 12:19 नवीन
आता २५० कडे वातचाल सुरू आहे.. अशुध्द लिहिलेले असले तरी झकास श्लेश जमला आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

१९९

इरसाल
Mon, 03/19/2012 - 11:32 नवीन
हा घ्या १९९ वा
  • Log in or register to post comments

२०० पण मीच पुरे करतो.

इरसाल
Mon, 03/19/2012 - 11:32 नवीन
हा २०० वा खुश........
  • Log in or register to post comments

सोकाजीरावांचं द्विशतकी

प्यारे१
Mon, 03/19/2012 - 11:59 नवीन
सोकाजीरावांचं द्विशतकी खेळीबद्दल हार्दिक अभिनंदन....! अशाच खेळ्या वारंवार येऊ द्या / होऊ द्या हो मालक. ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सोत्रि
Mon, 03/19/2012 - 17:30 नवीन
बापरे द्विशतक! सर्वांचे आभार छान चर्चा घडवल्याबद्दल. खासकरून पेठकरकाका, पिलीयन रायडर, किचेनताई, अदिती (समुद्रफेम ;) ), लीमाउजेट ह्यांचे चर्चा अपेक्षित अंगाने खुलवत नेल्याबद्दल विषेश आभार ! - (त्रिशतकाची अपेक्षा असलेला*) सोकाजी * अर्थातच चर्चात्मक प्रतिसांदांच्या:)
  • Log in or register to post comments

काय सोत्रि!

पैसा
Mon, 03/19/2012 - 17:55 नवीन
आम्हाला कात्र्या हातात घेऊन बसवून ठेवायचा विचार आहे वाटतं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

सोत्रि...

पिलीयन रायडर
Mon, 03/19/2012 - 18:13 नवीन
pearl, मनीषा, मस्त कलंदर, पियुषा अजुन बरेच लोक सुंदर लिहीत आहेत.. तुमचेच हा धागा काढल्याबद्दल आभार...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मि आता त्रिशतकचि वाट

किचेन
Mon, 03/19/2012 - 18:22 नवीन
मि आता त्रिशतकचि वाट बघतिये.या धग्यवर तर नक्कि त्रिशतक होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

सोत्रि, >>खासकरून पेठकरकाका,

Pearl
Mon, 03/19/2012 - 19:21 नवीन
सोत्रि, >>खासकरून पेठकरकाका, पिलीयन रायडर, किचेनताई, अदिती (समुद्रफेम Wink ), लीमाउजेट ह्यांचे चर्चा अपेक्षित अंगाने खुलवत नेल्याबद्दल विषेश आभार !>> अपेक्षित अंग काय होते हे स्पष्ट केल्यास आवडेल. आणि एवढे प्रतिसाद आल्यानंतर, आणि आतापर्यंत झालेल्या चर्चेनंतर तुमचे मत काय झाले आहे (कि जे होते तेच राहिले आहे), तुम्हाला काही नवीन माहिती/नवीन व्ह्यू मिळाला आहे का, हे जाणून घ्यायला आवडेल. >>(त्रिशतकाची अपेक्षा असलेला*) सोकाजी * अर्थातच चर्चात्मक प्रतिसांदांच्याSmile>> फक्त धाग्यांवरची प्रतिसादांची संख्या वाढू दे एवढीच (धाग्याकडून) अपेक्षा असेल तुमची तर वर मी जे लिहिले आहे की तुमची मते जाणून घ्यायला आवडेल ती मतं नाही दिली तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

फक्त धाग्यांवरची प्रतिसादांची

सोत्रि
Mon, 03/19/2012 - 19:34 नवीन
फक्त धाग्यांवरची प्रतिसादांची संख्या वाढू दे एवढीच (धाग्याकडून) अपेक्षा असेल तुमची तर वर मी जे लिहिले आहे की तुमची मते जाणून घ्यायला आवडेल ती मतं नाही दिली तरी चालेल.
अग्ग बाब्बो! पर्लतै तुमचे नाव विसरलो टंकायला वरच्या यादीत. राग मानून घेऊ नका हो! एक डाव माफी करा ह्या सोक्याला. च्यायला तरी सगळे मला सांगत असतात अशी 'वेळी अवेळी' लावून बसत जाऊ नकोस म्हणून! - ( पर्लतैपुढे मान झुकवलेला ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

आणि माझंही नाव विसरलात हां

रेवती
Mon, 03/19/2012 - 19:44 नवीन
आणि माझंही नाव विसरलात हां सोकाजी. कित्ती कित्ती आशेनं आले होते.;) भले माझा एखाद् दुसरा प्रतिसादच असेल पण फारच मोलाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

;(

सोत्रि
Mon, 03/19/2012 - 20:02 नवीन
च्यामारी, माझी माती खायची सवय काही केल्या जाईना हो. - (सर्वांची माफी मागणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सोक्या

पैसा
Mon, 03/19/2012 - 20:07 नवीन
आभारप्रदर्शन पुरे. चर्चेचं सार काय ते सांग, नाहीतर स्त्रीपुरुष समानता दुसर्‍या बाजूला झुकायला लागलेली दिसेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

एक ग्राफिटी आठवली..

मोदक
Tue, 03/20/2012 - 12:24 नवीन
एक ग्राफिटी आठवली.. लोकशाहीवर विश्वास आहे की नाही बोल.. का घालू गोळी..!!! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ह्म्म्म...

सोत्रि
Mon, 03/19/2012 - 20:33 नवीन
सर्व चर्चा वाचता, व्यापक आणि रूढ अर्थाने बघितल्यास समानता नाही असे म्हणावे लागेल. पण माझे वैयक्तिक मतः जर निसर्गानेच स्त्री-पुरूष असा भेद निर्माण केला आहे तर त्याला मान का देऊ नये? फुकाचा समानता - असमानता असा भेद आपण का निर्माण करावा? वेळेनुसार पुरूषाने स्त्रीप्रमाणे आणि स्त्रीने पुरूषाप्रमाणे वागून एकमेकांस पूरक व्हावे, उगा एकेमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न केल्यास उत्तम. असो, पण एकंदरीत पुरूषप्रधानसंस्कृती बघता तसे होणे कठीणच आहे, ज्या दिवशी असे होईल तो सुदिन! - (पूरक व्ह्यायचा प्रयत्न करणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

चर्चेचे सार....

प्रभाकर पेठकर
Mon, 03/19/2012 - 20:44 नवीन
मला जाणवलेले काही मुद्दे.... बौद्धीक पातळीवर असमानता असता कामा नये. सुशिक्षितांमध्ये ह्या मुद्याचा स्विकार झालेला दिसून येतो. शारीरिक पातळीवर आणि भावनिक पातळीवर स्त्रियांना भोगावे लागणारे अत्याचार भयानक आहेत. ही समस्या इतकी व्यापक आणि महासागरा इतकी खोल आहे त्यावर उपाययोजना ही १००% स्त्री-पुरुष प्रबोधनातूच साध्य व्हावी (कायदेही करावे लागतील). तरी पण पुन्हा, १०० टक्के यश अपेक्षित धरता येणार नाही. स्त्री-पुरूष नैसर्गिक आकर्षण, स्त्रियांची शारीरिक दुर्बलता, स्त्री-पुरूष असमान संख्या असे काही अडथळे नजरेत येतात. पुरुषांइतकेच स्त्रियांनाही प्रयत्न करावे लागतील. स्त्री म्हणून मिळणारी विशेष वागणूक विसरून त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून विचार करून इतर स्त्रियांचे प्रबोधन करावे लागेल. समाजसुधारणेतील खारीचा वाटा म्हणून प्रत्येकाने पुढच्या पिढीला 'सुजाण' बनविणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील लहान मुलगा लहान लहान बाबतीत स्त्री-पुरूष असा भेदभाव करीत असेल तर तो मोठा होई पर्यंत वाट न पाहता तिथेच, त्या क्षणीच त्याला समजावून रुजणारी विषवृक्षाची बिजं काढून टाकावीत. मुलगी, जर मुलगी म्हणून वेगळे हक्क अपेक्षित असेल तर तिलाही समजवावे. स्त्रिवरील शारीरिक अत्याचार ही एवढी गहन समस्या आहे की त्याचे समुळ उच्चाटन होईल असे मानणे म्हणजे 'रामराज्य' अवतरेल असा भाबडा भाव मनी बाळगण्यासारखे होणार आहे, हे माहित असूनही प्रयत्न करायला काय हरकत आहे, असे वाटते.
  • Log in or register to post comments

२०० + झाले तरि कहिहि निष्कर्ष

किचेन
Mon, 03/19/2012 - 21:01 नवीन
२०० + झाले तरि कहिहि निष्कर्ष नाहि. :(
  • Log in or register to post comments

बरेच लोक निष्कर्ष नाही म्हणुन

पिलीयन रायडर
Tue, 03/20/2012 - 13:51 नवीन
बरेच लोक निष्कर्ष नाही म्हणुन ओरडत आहेत किंवा नुसताच गोंगाट करताएत ( चर्चेत काहिही नवीन भर न घालणार्या प्रतिक्रिया)... कारण माझ्यामते त्यांनी ह्या विषयावर नीट्सा विचार केलेला नाही.. किंवा दुर्दैवाने त्यांना हा मुद्दा तेवढा महत्वाचा वाटत नाही... तरिही निष्कर्ष काढायचा झाल्यास.. ०)स्त्री पुरुष समानता म्हणजे पुरुष जे जे करतात ते ते स्त्रीयांनी पण करणे आणि आकडेवारीमध्ये त्यांची बरोबरी करणे म्हणजे समानता नाही.. तर माणुस म्हणून जे जे काही करणे स्वाभाविक आहे ते ते करायला मिळणे म्हणजे समानता म्हणता येइल.. १) स्त्री -पुरुष ह्यांमध्ये निसर्गतः शाररिक आणि मानसिक पातळीवर भेद (असमानता) आहेच. पाणी वहाते राहाण्यासाठी जसा " पोटेन्शिअल लेवल " मध्ये फरक असावा लागतो तसंच.. त्याचे महत्व समजुन घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.. २) मात्र सामाजिक पातळीवर जो भेद स्त्री - पुरुषात केला जातो तो मिटवणे आवश्यक आहे.. त्या मागे अर्थकारण हे सर्वात मोठे कारण आहे ( मुलगा हा आर्थिक आधार तर मुलगी आर्थिक बोजा).. ह्याला लग्नसंस्था पण मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.. जर लग्नात होणारा वधु आणि वर पक्षा मध्ये जो भेद्भाव केल्या जातो तो जर मिटवता आला (जसे की आजकाल शहरात मोठ्या प्रमाणात लग्नाचा खर्च वाटुन घेतात ) तर मुलीच्या पालकांवर आर्थिक ताण येणार नाही.. ३) मुलगा आणि मुलगी दोघांनाही हक्क आणि कर्तव्ये समान असावीत्..शिक्षणाच्या संधी आणि संपत्तीमधील हक्क या सोबत आई- वडिलांची म्हातार वयात जवाब्दारी पण समान असावी. म्हणजे पालकही दोघांकडे समान द्रुष्टिकोनातुन पहातील.. ४) स्त्रीयांवर होणार्या अत्याचारासाठी कायदे अत्यंत कठोर असावेत.. पण त्याच सोबत मुलींनी शाररिक द्रुष्ट्या किमान स्वतःचे संऱक्षण करण्या इतपत तरी सक्षम असावे.. मुली नाजुक असतात, भाउ/नवरा/वडील त्यांची काळजी घेतात असले फुटकळ विचार हद्दपार करावेत.. कुणी हात धरला तर तो सोडवुन घेउन त्याच्या २ मुस्कटात मारण्या एवढी ताकद आणि हिम्मत असावी.. त्या साठी घरातुन सुद्धा शाररिक आणि मानसिक पातळिवर तयरी करुन घेतली पाहिजे.. ५) पालकांना शेवटी अपत्याकडुन काय हवं असतं... आर्थि़क आधार आणि सामाजिक प्रतिष्ठा.. मुली शिकल्या तर त्या दोन्ही देउ शकतात.. राहता राहिला प्रश्न "घरण्याचे नाव" पुढे नेण्याचा.. मुळात ही कल्पना कुणाला किती महत्वाची वाटते हे ही बघावे लागेल.. पण नुकत्याच आलेल्या कोर्टाच्या निर्णया नुसार स्त्रीने नवर्‍याचे नाव लावणे आता आवश्यक नाही.. माहेरच्या नावा वरही त्या सर्व कागदपत्रे ठेवु शकतात.. त्यामुळे एक मुलगी पण आईवडीलांचे "नाव " कागदोपत्री सुद्धा उज्वल करुच शकते.. (मुळात वडिलांचेच नाव का लावायचे हा वेगळा चर्चेचा विषय होउ शकतो) कुबड्या घेउन पळायला शिकता येत नाही.. त्यामुळे स्त्री म्हणुन मिळणारी "सहानभुती" " नो थॅन्क्स" म्हणुन नाकारता आली तरच स्त्री खर्‍या अर्थाने पुढे जाउ शकेल...आणि तिच्यावर होणारर्‍या अन्यायाचे निवारण करायला कोणीतरी येइल ह्याची वाट बघत न बसता स्वतःच ह्यातुन मार्ग काढेल... आपण हे सर्व बोलणारे सुशि़क्षित आणि चांगल्या घरातील आहोत.. मुळात आपण फारशी असमानता पाहिलीच नाहीये.. पण खेड्या पाड्यातील (खास करुन बिहार, राजस्थान मधील) अशिक्षित स्त्री साठी हे स्र्व फार अवघड आहे.. तिला आपल्यावर अन्याय होतोय याची तरी जाणीव होउ देतात की नाही कोण जाणे.. कदाचित "स्त्री जन्म" म्हणजे मागच्या जन्मीची पापे असल्या कल्पनां मध्ये ती जगत असेल... अशा ठिकाणची एखादी जरी मुलगी शिकुन आप्ल्या सोबत चर्चा करताना दिसली तर त्या दिवशी "समानतेच्या" वाटेला आपण चालत आहोत असेल मला वाटेल..
  • Log in or register to post comments

कुबड्या घेउन पळायला शिकता येत

मोदक
Mon, 04/15/2013 - 01:41 नवीन
कुबड्या घेउन पळायला शिकता येत नाही.. त्यामुळे स्त्री म्हणुन मिळणारी "सहानभुती" " नो थॅन्क्स" म्हणुन नाकारता आली तरच स्त्री खर्‍या अर्थाने पुढे जाउ शकेल...आणि तिच्यावर होणारर्‍या अन्यायाचे निवारण करायला कोणीतरी येइल ह्याची वाट बघत न बसता स्वतःच ह्यातुन मार्ग काढेल सहमत आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+१.

बॅटमॅन
Mon, 04/15/2013 - 01:59 नवीन
+१. नवीन घडामोडींसंदर्भात हा ठळक प्यारा रोचक आहे एकदम ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

छान आहे

अभ्या..
Mon, 04/15/2013 - 02:03 नवीन
धन्यवाद मोदकराव, चिलीप्रमाणेच सुंदर खोदकाम.
आपण हे सर्व बोलणारे सुशि़क्षित आणि चांगल्या घरातील आहोत.. मुळात आपण फारशी असमानता पाहिलीच नाहीये..
हे वाक्य तर अगदी मनास स्पर्शून गेले आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मुलांनो

पैसा
Mon, 04/15/2013 - 14:19 नवीन
ती तिच्या माझ्यासारख्या तुमच्याशी वाद घालू शकणार्‍या महिलांबद्दल बोलत आहे. सध्याच्या घडामोडींचा विषय आम्ही नाही तर ज्या तुमच्याशी वाद घालू शकत नाहीत त्या आहेत. तेव्हा खोदकामाचा हेतू सफल झाला नाही असे खेदाने म्हणावे लागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अगगागा

निनाद मुक्काम …
Mon, 04/15/2013 - 02:14 नवीन
अगगागा केवढा राडा झाला येथे भलतेच शाब्दिक Image removed. रणकंदन झाले येथे ह्या कुरुक्षेत्रावर धर्मयुद्ध Image removed. चालू असतांना मी कुठे तडमडायला गेलो होतो. मला ही स्वतःची काही अमुल्य मते आहेत. तशी ती प्रत्येक विषयांवर असतात. म्हणा हा धागा आताच वर का आला तो वर राहावा म्हणून मी प्रतिसाद का दिला ह्याचे उत्तर सापडेपर्यंत ह्या विषयावर माझे अमुल्य मत व्यक्त करणार नाही. धागा वाचून माझ्या विचारांना कलाटणी मिळाली, हे मात्र नमूद करतो.
  • Log in or register to post comments

धागा वाचून माझ्या विचारांना

मोदक
Mon, 04/15/2013 - 02:24 नवीन
धागा वाचून माझ्या विचारांना कलाटणी मिळाली स्त्री पुरूष समानतेबद्दल तुमचे विचार (आधिचे आणि नंतरचे - दोन्ही!!) व्यक्त केलेत तर या धाग्याचा उद्देश सफल होण्याकडे वाटचाल होईल असे वाटते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

स्त्री पुरूष समानतेबद्दल

निनाद मुक्काम …
Mon, 04/15/2013 - 02:40 नवीन
स्त्री पुरूष समानतेबद्दल तुमचे विचार (आधिचे आणि नंतरचे - दोन्ही!!) व्यक्त केलेत तर या धाग्याचा उद्देश सफल होण्याकडे वाटचाल होईल असे वाटते.. ह्या संबंधीचे माझे विचार मिसळपाव वर अनेक धाग्यावर विखुरले आहेत.ते लपून राहिलेले नाही आहेत. ते परत येथे खरडण्याची ही वेळ नाही, मागे दारूचे उदात्तीकरण केले म्हणून माझ्या नावाने शिमगा झाला आता महिलांचे, त्यांच्या समानतेचे उदात्तीकरण करत आहे म्हणून राडा परत नको उसळायला. आधीच इतर धाग्यांवर राडे झाले आहेत , ते थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहेत,किंबहुना ते कधीही पेटून Image removed. उठतील अशी चिन्हे दिसत आहेत. अश्यात माझी Image removed. भर नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

दारूचे उदात्तीकरण केले म्हणून

मोदक
Mon, 04/15/2013 - 02:46 नवीन
दारूचे उदात्तीकरण केले म्हणून माझ्या नावाने शिमगा झाला आता महिलांचे, त्यांच्या समानतेचे उदात्तीकरण करत आहे म्हणून राडा परत नको उसळायला नक्की हेच म्हणायचे आहे तुम्हाला..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

नक्की हेच म्हणायचे आहे

निनाद मुक्काम …
Mon, 04/15/2013 - 02:57 नवीन
नक्की हेच म्हणायचे आहे तुम्हाला..? मला जे म्हणायचे होते ते मी म्हटले त्याचे तुमच्या सोयीचे रसग्रहण करण्याचा पूर्ण हक्क तुम्हाला आहे. लगाव बत्ती Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ब्वॉर.

मोदक
Mon, 04/15/2013 - 09:56 नवीन
ब्वॉर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

उदात्तीकरण

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/18/2013 - 01:25 नवीन
दारूचे उदात्तीकरण केले म्हणून माझ्या नावाने शिमगा झाला आता महिलांचे, त्यांच्या समानतेचे उदात्तीकरण करत आहे म्हणून राडा परत नको उसळायला.
मुळात ज्या गोष्टी उदात्त नसतात त्यांचं उदात्तीकरण करावं लागतं, होतं. जे उदात्तच आहे त्याचं वेगळं करावं लागत नाही. त्यामुळे भावना पोचली पण शब्दवापर अयोग्य वाटला. चुभूदेघे मोल्सवर्थ आणि दाते-कर्वे कोषात हा शब्द सापडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

मोदका.. धन्यवाद.. माझ्या प्रतिसादा ट्यार्पी वाढवल्या बद्दल!!!

पिलीयन रायडर
Mon, 04/15/2013 - 13:55 नवीन
आयला... नवीन घडामोडी आणि स्त्री - पुरुष समानता ह्याचा नक्की संबंध काय? म्हणजे स्त्री - पुरुष समानतेच्या गप्पा करणार्‍यांनी "महिलांसाठी बंदिस्त दालन" मागु नये?? आणि माझे प्रतिसाद एवढे रोचक वाटतच आहेत तर हे ही आवडलं असेलच..
स्त्री -पुरुष ह्यांमध्ये निसर्गतः शाररिक आणि मानसिक पातळीवर भेद (असमानता) आहेच.
आणि ह्याच असामनते पोटी आम्हाला आमच्या "प्रायवेट" गफ्फा हाणायला जागा पायजेलच...!! स्वगत :- ह्या बाप्यांना हवय तरी काय? आम्ही गप्पा मारुच नयेत की मारल्या तर ह्यांना ऐकायला मिळाव्यात!!
  • Log in or register to post comments

आणि ह्याच असामनते पोटी

बॅटमॅन
Mon, 04/15/2013 - 14:47 नवीन
आणि ह्याच असामनते पोटी आम्हाला आमच्या "प्रायवेट" गफ्फा हाणायला जागा पायजेलच...!!
कीती कीती इणोदी म्हनायचं ह्ये वाक्य वो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

२ किलो इनोदी? की ४.५ मीटर

पिलीयन रायडर
Mon, 04/15/2013 - 14:54 नवीन
२ किलो इनोदी? की ४.५ मीटर इनोदी? नक्की किती वो बॅट्या भाउ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बक्कळ विनोदी. एकक कुठलेही

बॅटमॅन
Mon, 04/15/2013 - 21:49 नवीन
बक्कळ विनोदी. एकक कुठलेही घ्या, इनोदीपणा कमी होणार नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मोदका.. धन्यवाद.. माझ्या

मोदक
Mon, 04/15/2013 - 21:15 नवीन
मोदका.. धन्यवाद.. माझ्या प्रतिसादा ट्यार्पी वाढवल्या बद्दल!!! हम्म.. असामनते पोटी आम्हाला आमच्या "प्रायवेट" गफ्फा हाणायला जागा पायजेलच...!! जागा घ्या.. अगदी नवीन संस्थळ काढा. मी कोण आक्षेप घेणारा..? (आणि घेतलाच तर तुम्ही तो आक्षेप आसुरी आनंदाने फाट्यावर माराल याची खात्री आहे. ;-)) (मिपावरच्या महिला विभागाबद्दल माझे मत विचारत असशील तर, ज्या प्रभृती त्यामध्ये पुढाकार घेत आहेत त्यांच्या क्षमतेविषयी आजिबात शंका नसल्याने हा विभाग अस्तित्वात आला असेल याची खात्री आहे.) हा धागा वर काढला कारण.. "समाजाच्या एका घटकाच्या संवेदनां बद्दल जेव्हा समाजाचा इतर घटक इतका बेदखल असतो" तेव्हा पुन्हा स्त्री पुरूष समानतेच्या कढीला ऊत येणे अपरिहार्य होते.. मग कशाला कुणाचा वेळ घालवा? या आधी काय काय घडले आहे ते फक्त वर आणले. बाकी काहीही उद्देश नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा