मोदींनी गुजरातच्या निवडणुका जिंकल्या आणि मोठ्या फ़रकाने जिंकल्यात. मोदी गुजरातच्या निवडणुका का जिंकतात? त्यांच्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची दावेदारी मजबुत होते का? ह्यावर थोडी चर्चा करुयात.
मोदींचे गुजरात सरकार वर्षाला १५००० कोटी रुपये हे स्वत:च्या कामाच्या जाहिरातबाजीसाठी खर्च करते. जाहिरातबाजी सरकारी कामांची असते पण त्यायोगे श्रेय मोदींना दिलं जातं आणि त्यांची प्रतिमा मोठी होत जाते. गुंतवणुकदार आकर्षित करण्यात येणाऱ्या ह्या जाहिरातबाजी कॅंम्पेनचा मोदींच्या प्रतिमानिर्मीतीत मोठा हिस्सा आहे. ह्या जाहिरातबाजीचा परिणाम पक्षाच्या काडरवर आणि शहरी मध्यमवर्गीयांवर होणे अपेक्षित आहेच. त्यातुनच ह्या वर्गात मोदी पंतप्रधान बनावेत अशी भावना निर्माण होत चाललीय.
नुसत्या आपापल्या राज्याच्या निवडणुका जिंकणे आणि विकास करणे हा जर क्रायटेरीआ ठरवला तर मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान आणि बिहारचे नितीश कुमार हे दोघेही दावेदार ठरतात. अगदी प्रतिकुल परिस्थितीतुन ह्या दोघांनी त्यांची बिमारु राज्य पुढे आणली. तसेच ते वादग्रस्त नाहीयेत. अशा परिस्थितीत मोदींना पंतप्रधान पदाचे दावेदार रालोआ कशी जाहीर करु शकते?
मोदींना उघडपणे नेतत्व देण्याचा दुसरा धोका म्हणजे मोदींचा इतर राज्यात फ़ार मोठा करिश्मा नाहिये, उलट तिथे त्यांची प्रतिमा खराब आहे. परराज्यात त्यांच्या विरुद्ध मुस्लिम मतदार एकगठ्ठा कॉंग्रेसच्या (किंवा युपीमधे समाजवादी पक्षाच्या) बाजुने जमतील. गुजरात मधे मुस्लिमांनीही मोदींना मतदान केलं..इतर राज्यात हे शक्य होणार नाही बहुतेक. गेल्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेला त्यांनी जिथे जिथे प्रचार केला त्या बहुतेक ठिकाणी युतीचा पराभव झाला. मो्दींना पंतप्रधानपदासाठी प्रमोट करणे म्हणजे सगळ्या सेक्युलरवादी मतांना/पक्षांना एकत्र जोडण्यासारखं आहे.
तिसरा धोका म्हणजे रालोआ मधे मोदींचे नेतृत्व सर्वमान्य होणं शक्यच नाही. भाजपात होईल एखाद्यावेळेस, पण रालोआत अशक्यच आहे. रालोआकडुन मान्यता मिळावी म्हणुनच हल्ली मोदींनी मुस्लिमांना आपल्या जाहिरातबाजीचा भाग बनवलं आहे. काही दिवसांपुर्वी आयबीएन लाइव्ह वर गुजरातचे मुस्लिमांनी मोदींवर कसा विश्वास दाखवायला सुरुवात केलीय ह्याच्या जाहीरातबाजीचा प्रोग्राम झाला ह्या निवडणुकीतुन तर ते स्पष्टच झाले. प्रसारमाध्यमातुन आता ह्या गोष्टीची खुप जाहीरातबाजी मोदी घडवुन आणतील. पुढील १ वर्षात मुस्लिम-मोदी दोस्तीच्या खुप कहाण्या वाचायला मिळतीलच...नाही मिळाल्या तर मोदी पंतप्रधान होणे अशक्यच आहे.
वाचने
38546
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजच मोदी यांच FICCI मधल
हो, ऐकलं भाषण.
In reply to आजच मोदी यांच FICCI मधल by पिंपातला उंदीर
आम्ही सुद्धा वृत्तपत्र वाचतो.
In reply to आजच मोदी यांच FICCI मधल by पिंपातला उंदीर
मोदीकावीळपीडित प्रतिसादाचा एक
In reply to आजच मोदी यांच FICCI मधल by पिंपातला उंदीर
रिडीफ
इंटरनेट वरच जनमत निवडणूक
In reply to रिडीफ by विकास
:)
In reply to इंटरनेट वरच जनमत निवडणूक by पिंपातला उंदीर
रोचक आहे
In reply to रिडीफ by विकास
>>> या सर्वेक्षण यादीमधल्या
In reply to रोचक आहे by श्रीरंग_जोशी
शक्य आहे
In reply to >>> या सर्वेक्षण यादीमधल्या by श्रीगुरुजी
तुम्ही दोघ २०/२० खेळता का?
In reply to शक्य आहे by श्रीरंग_जोशी
विकास राव मी तिथे दोनदा मतदान
In reply to रिडीफ by विकास
:-)
In reply to विकास राव मी तिथे दोनदा मतदान by श्री गावसेना प्रमुख
मोदींच नाव घ्या की अस आडुन
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
-
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
मला काय माहीत? :)
In reply to विकास राव मी तिथे दोनदा मतदान by श्री गावसेना प्रमुख
मोदी मोदी मोदी
२०१४ मध्ये एनडीए व युपीएला
गेल्या दीडदोन महिन्यात
तेलाचे दर
In reply to गेल्या दीडदोन महिन्यात by श्रीगुरुजी
३१/१२/२००८ ला क्रूड ऑईलचा भाव