मोदींनी गुजरातच्या निवडणुका जिंकल्या आणि मोठ्या फ़रकाने जिंकल्यात. मोदी गुजरातच्या निवडणुका का जिंकतात? त्यांच्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची दावेदारी मजबुत होते का? ह्यावर थोडी चर्चा करुयात.
मोदींचे गुजरात सरकार वर्षाला १५००० कोटी रुपये हे स्वत:च्या कामाच्या जाहिरातबाजीसाठी खर्च करते. जाहिरातबाजी सरकारी कामांची असते पण त्यायोगे श्रेय मोदींना दिलं जातं आणि त्यांची प्रतिमा मोठी होत जाते. गुंतवणुकदार आकर्षित करण्यात येणाऱ्या ह्या जाहिरातबाजी कॅंम्पेनचा मोदींच्या प्रतिमानिर्मीतीत मोठा हिस्सा आहे. ह्या जाहिरातबाजीचा परिणाम पक्षाच्या काडरवर आणि शहरी मध्यमवर्गीयांवर होणे अपेक्षित आहेच. त्यातुनच ह्या वर्गात मोदी पंतप्रधान बनावेत अशी भावना निर्माण होत चाललीय.
नुसत्या आपापल्या राज्याच्या निवडणुका जिंकणे आणि विकास करणे हा जर क्रायटेरीआ ठरवला तर मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान आणि बिहारचे नितीश कुमार हे दोघेही दावेदार ठरतात. अगदी प्रतिकुल परिस्थितीतुन ह्या दोघांनी त्यांची बिमारु राज्य पुढे आणली. तसेच ते वादग्रस्त नाहीयेत. अशा परिस्थितीत मोदींना पंतप्रधान पदाचे दावेदार रालोआ कशी जाहीर करु शकते?
मोदींना उघडपणे नेतत्व देण्याचा दुसरा धोका म्हणजे मोदींचा इतर राज्यात फ़ार मोठा करिश्मा नाहिये, उलट तिथे त्यांची प्रतिमा खराब आहे. परराज्यात त्यांच्या विरुद्ध मुस्लिम मतदार एकगठ्ठा कॉंग्रेसच्या (किंवा युपीमधे समाजवादी पक्षाच्या) बाजुने जमतील. गुजरात मधे मुस्लिमांनीही मोदींना मतदान केलं..इतर राज्यात हे शक्य होणार नाही बहुतेक. गेल्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेला त्यांनी जिथे जिथे प्रचार केला त्या बहुतेक ठिकाणी युतीचा पराभव झाला. मो्दींना पंतप्रधानपदासाठी प्रमोट करणे म्हणजे सगळ्या सेक्युलरवादी मतांना/पक्षांना एकत्र जोडण्यासारखं आहे.
तिसरा धोका म्हणजे रालोआ मधे मोदींचे नेतृत्व सर्वमान्य होणं शक्यच नाही. भाजपात होईल एखाद्यावेळेस, पण रालोआत अशक्यच आहे. रालोआकडुन मान्यता मिळावी म्हणुनच हल्ली मोदींनी मुस्लिमांना आपल्या जाहिरातबाजीचा भाग बनवलं आहे. काही दिवसांपुर्वी आयबीएन लाइव्ह वर गुजरातचे मुस्लिमांनी मोदींवर कसा विश्वास दाखवायला सुरुवात केलीय ह्याच्या जाहीरातबाजीचा प्रोग्राम झाला ह्या निवडणुकीतुन तर ते स्पष्टच झाले. प्रसारमाध्यमातुन आता ह्या गोष्टीची खुप जाहीरातबाजी मोदी घडवुन आणतील. पुढील १ वर्षात मुस्लिम-मोदी दोस्तीच्या खुप कहाण्या वाचायला मिळतीलच...नाही मिळाल्या तर मोदी पंतप्रधान होणे अशक्यच आहे.
वाचने
38490
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोदीच व्हावेत ही इच्छा आहे
अलिकडील काही घडामोडी भाजपसाठी
मी पूर्वी एका प्रतिसादात
लिंकबद्दल धन्यवाद
In reply to मी पूर्वी एका प्रतिसादात by श्रीगुरुजी
१२० कोटींच्या देशात अवघ्या
In reply to लिंकबद्दल धन्यवाद by क्लिंटन
"मुख्य म्हणजे निवडणुकीला १६
In reply to १२० कोटींच्या देशात अवघ्या by पिंपातला उंदीर
"२००९ मध्ये यु.पी.ए ने विविध
In reply to लिंकबद्दल धन्यवाद by क्लिंटन
"२००९ मध्ये यु.पी.ए ने विविध राज्यांमध्ये जिंकलेल्या जागा केरळ: १६, कर्नाटक: ६, गोवा: १, महाराष्ट्र:२६, गुजरात:११, राजस्थान: १९, मध्य प्रदेश+छत्तिसगड: १२,हरियाणा:९, दिल्ली:७, पंजाब+चंदिगढ: ६, जम्मू-काश्मीर: ६, हिमाचल:१, उत्तराखंड:५, उत्तर प्रदेश:२१, पश्चिम बंगाल: २६, आसाम:९, आंध्र प्रदेश:३३, तामिळनाडू+पॉंडेचेरी:२८,बिहार:२ आणि इतर राज्यांमधून (झारखंड,ओरिसा,उत्तर पूर्वेतील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश):१५. यापैकी युपीएला उल्लेखनीय तोटा होईल अशी परिस्थिती केरळ,गोवा,राजस्थान,दिल्ली,उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल,आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आहे.यापैकी केवळ राजस्थान आणि दिल्लीमध्ये एन.डी.ए युपीएच्या जागा घ्यायच्या परिस्थितीत आहे.तेव्हा युपीएचे नुकसान झाले तरी त्याचा फायदा एन.डी.ए ला न होता इतर पक्षांना (ममता,मुलायम,जगनमोहन इत्यादी) होणार असे दिसत आहे आणि १९९६ ची पुनरावृत्ती होणार असेही दिसत आहे.पण १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयींचे उत्युंग नेतृत्व भाजपकडे असल्यामुळे नंतरच्या काळात इतर पक्षांना बरोबर घेऊन आणि एन.डी.ए स्थापन करून त्यांच्या नावावर लोक मते देतील अशी परिस्थिती होती.आता त्या तोडीचा नेता कोणत्याच पक्षात नाही तेव्हा यानंतरच्या काळातही अशीच खिचडी चालू राहणार असे चित्र दिसत आहे."
काँग्रेसला दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, केरळ, प. बंगाल, आंध्र, गुजरात व तामिळनाडूत खूप तोटा होईल. पण कर्नाटकमध्ये काँग्रेसला लक्षणीय फायदा होईल. यापैकी दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब व गुजरातमध्ये एनडीएला फायदा होईल. बंगालमध्ये ममता, केरळमध्ये डावी आघाडी, आंध्रमध्ये जगनमोहन व तामिळनाडूत जयललिताला फायदा होइल. उ.प्र., झारखंड, बिहार, ओरिसा, हरयाना, काश्मिर, उत्तराखंड, हिमाचल, आसाम इ. राज्यात २००९ ची परिस्थिती थोड्याफार फरकाने कायम राहिल. १९९६ मध्ये भाजप १६० (+ शिवसेना, अकाली दल व समता पक्षाचे अंदाजे २५ खासदार), काँग्रेस १४० व इतर २१५ अशी परिस्थिती होती. २०१४ मध्ये काँग्रेस व भाजप हे दोघेही १५० च्या आसपास राहतील व इतरांना अंदाजे २२५ जागा असतील. म्हणजे १९९६ जवळपास जशीच्या तशी पुनरावृत्ती.राहूल - मोदी
In reply to मी पूर्वी एका प्रतिसादात by श्रीगुरुजी
अजून माहिती
गेल्या ६-७ तासात परिस्थिती
निवडणुका होणार की नाही
In reply to गेल्या ६-७ तासात परिस्थिती by श्रीगुरुजी
मध्यावधी निवडणुकीच्या बाबतीत
In reply to निवडणुका होणार की नाही by आजानुकर्ण
जालावरच्या मंडळींना जे विषय
In reply to मध्यावधी निवडणुकीच्या बाबतीत by श्रीगुरुजी
नाही
In reply to जालावरच्या मंडळींना जे विषय by नितिन थत्ते
+
In reply to जालावरच्या मंडळींना जे विषय by नितिन थत्ते
देखील काढून बघितलामिळू नये यासाठी यशस्वी प्रयत्न देखील करून बघितला...... पण मतदारांच्या निवडीत काहीच फरक नाही! :(अमेरिका
In reply to + by विकास
तसे नाही... आपलेच दात
In reply to अमेरिका by आजानुकर्ण
बदल आवश्यक
In reply to तसे नाही... आपलेच दात by विकास
खुलासा
In reply to बदल आवश्यक by आजानुकर्ण
ओह ओके
In reply to खुलासा by विकास
अरेच्चा
In reply to मध्यावधी निवडणुकीच्या बाबतीत by श्रीगुरुजी
शिळ्या कढीला ऊत
काय ठरलं मग दावेदारीबद्दल?
कर्नाटक विधानसभा
कर्नाटक
In reply to कर्नाटक विधानसभा by श्रीगुरुजी
०/१
In reply to कर्नाटक by क्लिंटन
येथील चर्चा वाचून माझ्या मनात
बरचसं पटेबल.
In reply to येथील चर्चा वाचून माझ्या मनात by निनाद मुक्काम …
अजय देवगण ने साडे तीनशे करोड
लांगूलचालन
In reply to अजय देवगण ने साडे तीनशे करोड by निनाद मुक्काम …
मागे एक न्यूज पहिली होती,
In reply to लांगूलचालन by आजानुकर्ण
हो पण
In reply to मागे एक न्यूज पहिली होती, by निनाद मुक्काम …
किंचित फरक
In reply to हो पण by आजानुकर्ण
धन्यवाद
In reply to किंचित फरक by विकास
संदर्भ
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
उपशंका
In reply to किंचित फरक by विकास
नाही
In reply to उपशंका by आजानुकर्ण
हिंदूंची?
In reply to नाही by विकास
असं कसं म्हणता?
In reply to हिंदूंची? by आजानुकर्ण
>>>जेएनयुमधील इतिहासाचे
In reply to असं कसं म्हणता? by विकास
सगळे नाही हो
In reply to >>>जेएनयुमधील इतिहासाचे by नाना चेंगट
फक्त जेएनयु मधीलच. +१००
In reply to सगळे नाही हो by विकास
+१११११११११११११११११११.
In reply to सगळे नाही हो by विकास
रामजन्मभुमी न्यास ही संस्था माहीत आहे ना? त्यात हिंदूच तर होते,
In reply to असं कसं म्हणता? by विकास
म्हणजे
In reply to रामजन्मभुमी न्यास ही संस्था माहीत आहे ना? त्यात हिंदूच तर होते, by आजानुकर्ण
"हिंदूंची मागणी" याची
In reply to म्हणजे by विकास
ह्सावं काय?
In reply to "हिंदूंची मागणी" याची by नितिन थत्ते
साधे हिंदु
In reply to "हिंदूंची मागणी" याची by नितिन थत्ते
अर्धवटराव
In reply to साधे हिंदु by अर्धवटराव
हा राग लोभाचा विषय नाहि दादा
In reply to अर्धवटराव by इरसाल
अगदी अगदी
In reply to हा राग लोभाचा विषय नाहि दादा by अर्धवटराव
ही उपचर्चा वर चालू होयचे कारण
In reply to "हिंदूंची मागणी" याची by नितिन थत्ते
अर्थात.
In reply to उपशंका by आजानुकर्ण
"जेंव्हा एखाद्या समुदायाच्या
In reply to किंचित फरक by विकास
माझ्या माहिती प्रमाणे मोदी
In reply to हो पण by आजानुकर्ण
मला वाटते टोपी न घालण्याच्या
In reply to माझ्या माहिती प्रमाणे मोदी by निनाद मुक्काम …
"*हे इतरांनी केले असता त्यास
In reply to मला वाटते टोपी न घालण्याच्या by नितिन थत्ते
असेच म्हणतो
In reply to "*हे इतरांनी केले असता त्यास by श्रीगुरुजी
त्याच इव्हेण्टमध्ये टोपी
In reply to मला वाटते टोपी न घालण्याच्या by नितिन थत्ते
राजकीय ओवी ,अभंग
आजच मोदी यांच FICCI मधल
हो, ऐकलं भाषण.
In reply to आजच मोदी यांच FICCI मधल by पिंपातला उंदीर
आम्ही सुद्धा वृत्तपत्र वाचतो.
In reply to आजच मोदी यांच FICCI मधल by पिंपातला उंदीर
मोदीकावीळपीडित प्रतिसादाचा एक
In reply to आजच मोदी यांच FICCI मधल by पिंपातला उंदीर
रिडीफ
इंटरनेट वरच जनमत निवडणूक
In reply to रिडीफ by विकास
:)
In reply to इंटरनेट वरच जनमत निवडणूक by पिंपातला उंदीर
रोचक आहे
In reply to रिडीफ by विकास
>>> या सर्वेक्षण यादीमधल्या
In reply to रोचक आहे by श्रीरंग_जोशी
शक्य आहे
In reply to >>> या सर्वेक्षण यादीमधल्या by श्रीगुरुजी
तुम्ही दोघ २०/२० खेळता का?
In reply to शक्य आहे by श्रीरंग_जोशी
विकास राव मी तिथे दोनदा मतदान
In reply to रिडीफ by विकास
:-)
In reply to विकास राव मी तिथे दोनदा मतदान by श्री गावसेना प्रमुख
मोदींच नाव घ्या की अस आडुन
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
-
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
मला काय माहीत? :)
In reply to विकास राव मी तिथे दोनदा मतदान by श्री गावसेना प्रमुख
मोदी मोदी मोदी
२०१४ मध्ये एनडीए व युपीएला
गेल्या दीडदोन महिन्यात
तेलाचे दर
In reply to गेल्या दीडदोन महिन्यात by श्रीगुरुजी
३१/१२/२००८ ला क्रूड ऑईलचा भाव