Skip to main content

मोदींची पंतप्रधानपदाची दावेदारी

लेखक शैलेंद्रसिंह यांनी शुक्रवार, 21/12/2012 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मोदींनी गुजरातच्या निवडणुका जिंकल्या आणि मोठ्या फ़रकाने जिंकल्यात. मोदी गुजरातच्या निवडणुका का जिंकतात? त्यांच्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची दावेदारी मजबुत होते का? ह्यावर थोडी चर्चा करुयात. मोदींचे गुजरात सरकार वर्षाला १५००० कोटी रुपये हे स्वत:च्या कामाच्या जाहिरातबाजीसाठी खर्च करते. जाहिरातबाजी सरकारी कामांची असते पण त्यायोगे श्रेय मोदींना दिलं जातं आणि त्यांची प्रतिमा मोठी होत जाते. गुंतवणुकदार आकर्षित करण्यात येणाऱ्या ह्या जाहिरातबाजी कॅंम्पेनचा मोदींच्या प्रतिमानिर्मीतीत मोठा हिस्सा आहे. ह्या जाहिरातबाजीचा परिणाम पक्षाच्या काडरवर आणि शहरी मध्यमवर्गीयांवर होणे अपेक्षित आहेच. त्यातुनच ह्या वर्गात मोदी पंतप्रधान बनावेत अशी भावना निर्माण होत चाललीय. नुसत्या आपापल्या राज्याच्या निवडणुका जिंकणे आणि विकास करणे हा जर क्रायटेरीआ ठरवला तर मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान आणि बिहारचे नितीश कुमार हे दोघेही दावेदार ठरतात. अगदी प्रतिकुल परिस्थितीतुन ह्या दोघांनी त्यांची बिमारु राज्य पुढे आणली. तसेच ते वादग्रस्त नाहीयेत. अशा परिस्थितीत मोदींना पंतप्रधान पदाचे दावेदार रालोआ कशी जाहीर करु शकते? मोदींना उघडपणे नेतत्व देण्याचा दुसरा धोका म्हणजे मोदींचा इतर राज्यात फ़ार मोठा करिश्मा नाहिये, उलट तिथे त्यांची प्रतिमा खराब आहे. परराज्यात त्यांच्या विरुद्ध मुस्लिम मतदार एकगठ्ठा कॉंग्रेसच्या (किंवा युपीमधे समाजवादी पक्षाच्या) बाजुने जमतील. गुजरात मधे मुस्लिमांनीही मोदींना मतदान केलं..इतर राज्यात हे शक्य होणार नाही बहुतेक. गेल्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेला त्यांनी जिथे जिथे प्रचार केला त्या बहुतेक ठिकाणी युतीचा पराभव झाला. मो्दींना पंतप्रधानपदासाठी प्रमोट करणे म्हणजे सगळ्या सेक्युलरवादी मतांना/पक्षांना एकत्र जोडण्यासारखं आहे. तिसरा धोका म्हणजे रालोआ मधे मोदींचे नेतृत्व सर्वमान्य होणं शक्यच नाही. भाजपात होईल एखाद्यावेळेस, पण रालोआत अशक्यच आहे. रालोआकडुन मान्यता मिळावी म्हणुनच हल्ली मोदींनी मुस्लिमांना आपल्या जाहिरातबाजीचा भाग बनवलं आहे. काही दिवसांपुर्वी आयबीएन लाइव्ह वर गुजरातचे मुस्लिमांनी मोदींवर कसा विश्वास दाखवायला सुरुवात केलीय ह्याच्या जाहीरातबाजीचा प्रोग्राम झाला ह्या निवडणुकीतुन तर ते स्पष्टच झाले. प्रसारमाध्यमातुन आता ह्या गोष्टीची खुप जाहीरातबाजी मोदी घडवुन आणतील. पुढील १ वर्षात मुस्लिम-मोदी दोस्तीच्या खुप कहाण्या वाचायला मिळतीलच...नाही मिळाल्या तर मोदी पंतप्रधान होणे अशक्यच आहे.

वाचने 38546
प्रतिक्रिया 231

प्रतिक्रिया

आजच मोदी यांच FICCI मधल भाषण कोणी ऐकल का? मोदी महिलांची जास्त काळजी करत असणार. त्यांनी गुजरातेत त्यांच्या मंत्रिमंडळात महिला व बालविकास मंत्री असणाऱ्या माया कोडनानी यांची आम्हाला ओळख करून दिली. सध्या त्या गुजरात दंगलीतील हत्याकांडात दोषी आढळल्याने जेलमध्ये आहेत. जर मोदींनी स्वत:च्या साध्या भोळ्या बायकोला सोडून दिले मग ते गृहिणींविषयक चर्चेचे तज्ञ कसे ठरु शकतात असा प्रश्न काही नॅतद्रष्ट विचारतात.

In reply to by पिंपातला उंदीर

भाषण म्हणुन खरच चांगलं झालं. मोदींना गृहीणींविषयी चर्चेचे तज्ञ कसे म्हणावे म्हणता... राहुल बाबा नक्षलवादापासुन गरिबी हटाव, आतंकवाद, ग्रामीण विकास वगैरे असंख्य मुद्द्यांवर बोलतात. राज्यात वा केंद्रात कुठल्याच मंत्रालयाचा अनुभव नसताना, एकाही समस्येला ते प्रत्यक्ष भिडले नसताना जर ते आपली तज्ञता प्रत्येक क्षेत्रात पाजळु शकतात तर एका राज्याचा मुख्यमंत्री गृहीणींविषयी नक्की बोलु शकतो (शिवाय मोदींनी कमितकमी आपल्या आईला गृहकर्म करताना बघितलं असेल) अवांतरः हे असले आर्ग्युमेण्ट्स वाचुन मोदींच्या विरोधकांना, मोदींवर वॉच ठेऊन बसलेल्यांना आता खरच व्हॅलीड मुद्दे मिळणं बंद झालं कि काय अशी शंका येते. अजाणतेपणी हे असले मुद्दे मोदींच्या पथ्यावर पडतील. येत्या काहि महिन्यात मोदीं नामक वळुला अंगावर घ्यायला सर्वात पुढे कदाचीत नितिश कुमार असेल. नॉट गुड फॉर यु.पी.ए. अर्धवटराव

रिडीफ ऑनलाईन पोलवर मी पाहीले तेंव्हा, ७६% मते मोदींना मिळाली आहेत आणि त्याच्या खालोखाल मनमोहन सिंगना ५% आणि राहूल गांधींना ४%! (पोलचे रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला मत द्यावे लागते.) तात्पर्यः काँग्रेस समर्थकांना इंटरनेट वापरता येत नाही. ;)

In reply to by विकास

इंटरनेट वरच जनमत निवडणूक निकालावर परिणाम करत असत तर भाजप २००४ ला आणि २००९ ला सत्तेबहेर राहिलेच नसते. तात्पर्य : - भाजप समर्थका ना निवडणुकांच गणित जमत नाही ; )

In reply to by पिंपातला उंदीर

भाजप समर्थका ना निवडणुकांच गणित जमत नाही निवडणुकांचे गणित हे समर्थक ठरवत नाहीत, तर ते राजकारणी ठरवतात ज्यांना प्रत्यक्ष सत्तेच येयचे असते. असो. प्रत्येकाला उत्तर देण्यास जमतेच असे नाही. ;)

In reply to by विकास

या सर्वेक्षण यादीमधल्या विविध नावांमध्ये गुणवत्ताअनुभव हे निकष लावायचे झाल्यास शरद पवार हे प्रथम स्थानी येतील (अर्थात माझ्यामते). मी त्यांना मत दिल्यावर पाहिले की सर्वात कमी मते त्यांनाच पडली आहेत (मी पाहिले तेव्हा केवळ ६८). २००४ पासून सर्वात अवघड खाती स्वतःकडे घेऊन त्यांनी संपुआ सरकारवर उपकारच केले आहेत. पवारांच्या पक्षामधले पिग्मी पाहून हेच वाटते की मोठ्या वृक्षाखाली इतर रोपांची वाढ खुंटते असे जे म्हणतात ते बरोबरच आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

>>> या सर्वेक्षण यादीमधल्या विविध नावांमध्ये गुणवत्ता व अनुभव हे निकष लावायचे झाल्यास शरद पवार हे प्रथम स्थानी येतील (अर्थात माझ्यामते). मी त्यांना मत दिल्यावर पाहिले की सर्वात कमी मते त्यांनाच पडली आहेत (मी पाहिले तेव्हा केवळ ६८). पण मत देणार्‍यांनी बहुतेक विश्वासार्हता व कामगिरी हे निकष लावले असावेत.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

असे ऐकले होते की एका पंतप्रधानेच्छुक नेत्याने कायमचा कर्मचारीवर्ग ठेवला आहे आंतरजालावर स्वतःला नेहमी आघाडीवर ठेवण्यासाठी. खरे असल्यास रोजगारनिर्मिती झाल्याबद्दल धन्यवादच द्यायला हवे.

In reply to by श्रीरंग_जोशी

पंतप्रधानेच्छुक नेत्याने कायमचा कर्मचारीवर्ग ठेवला आहे आंतरजालावर स्वतःला नेहमी आघाडीवर ठेवण्यासाठी
अशा पद्धतीने जर कोणी वागत असेल तर फारतर स्वतःस तात्पुरते खुष ठेवता येईल पण पुढे काहीच घडणार नाही... तीन वेळेस मुख्यमंत्री म्हणून निवडून येणार्‍या व्यक्तीस याची जाणीव असावी असे वाटते.

आयला या अगोदर आम्ही पिलू मोदी आर्किटेकट -खासदार , रूसी मोदी क्रिकेटर डो मोदी आय स्पेशालिस्ट याना जाणून होतो. आता नरेंद्रराव मोदी यांच्या शिवाय टीव्ही वर काही दिसतच नाही, नाही निळीपगडी घातलेली एक बाहुली कधी कधी दिल्लीच्या पाश्वभूमी वर जाताना दिसते. नरेंद्र मोदी हे गाजणारे व गाजवू घातलेले नेते आहेत. ते कुणाही आताच्या राजकारण्यापेक्षा चतुर वाटतात. पण नरेंद्र मोदी म्हणजे भाजपा नव्हे.भाजपा म्हणजे भारत नव्हे. पंतप्रधानपदी वर्णी लागलेल्या अनेकांना काहीही वजन नसताना ते त्या खुर्चीवर बसल्याचे आढळून येईल. मोरारजी, गुजराल, देवेगौडा, व्ही पी सिंग,चन्द्रशेखर, चरणसिंग ही ती नावे. अरेच्चा त्यात नरसि़ह राव व मनमोहन यांची नावे राहिलीच की. मुद्दा काय राजकीय प्रभावानेच तिथे बसता येते असे नव्हे. जो दुसर्‍याची - प्रभाव असणार्‍याची काहीतरी सोय करतो तिथे त्याला बसता येते. आपणही मधुन मधून शरद पवारांचे नाव त्या पदासाठी घेत असतोच ना !

२०१४ मध्ये एनडीए व युपीएला बहुमताच्या जवळ जाता येणार नाही व १९९६ प्रमाणे तिसरी आघाडी सत्तेच्या जवळ पोहोचेल या अंदाजाला पुष्टी देणारा अंदाज एका नवीन सर्वेक्षणात दर्शविला आहे. या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला ११३ व भाजपला १४१ जागा मिळतील आणि युपीए व एनडीएला अनुक्रमे १४५ व १८७ जागा मिळतील. म्हणजे उर्वरीत पक्षांना तब्बल २११ जागा मिळतील. महाराष्ट्रात सेना-भाजप युतीला ४८ पैकी २६ जागा मिळतील. प्रादेशिक पक्षांमध्ये संजद १९, शिवसेना १५, अकाली दल ९, राष्ट्रवादी ६, सपा ३५, बिजद १३, अद्रमुक २७, तृकाँ २६, डावे पक्ष २६, तेदे ९, तेरास ८, वायएसआर काँग्रेस १२, बसपा २६ अशी परिस्थिती असेल. http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=37128&boxid=52924828 http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=37138&boxid=54442984

गेल्या दीडदोन महिन्यात पेट्रोलचे भाव प्रतिलिटर रू. ७८.५० पासून रू. ६९.४२ पर्यंत उतरले आहेत. म्हणजे लिटरमागे ९ रूपयाहून अधिक घट झाली आहे. यामागे नक्की कोणते कारण आहे? युपीए सरकारने आपला हातखंडा प्रयोग सुरू केला आहे. ५ मे ला होणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकांमुळे ही तात्पुरती घट केलेली आहे. १५ मे किंवा जास्तीत जास्त ३१ मे पर्यंत भाव पुन्हा वाढतील. यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये ५ राज्यात विधानसभा निवडणुका आहेत व एप्रिल-मे २०१४ मध्ये लोकसभेची निवडणुक आहे. नोव्हेंबर २०१३ पासून पेट्रोलचे भाव परत उतरायला लागतील व नंतर एकदम ३१ मे २०१४ पासून पुन्हा जोरदार वाढ होईल. २००८-०९ मध्ये अगदी हाच प्रयोग केला होता. डिसेंबर २००८ मध्ये पेट्रोल रू. ५८ प्रतिलिटर होते. ते ५ रूं. नी कमी करून ५३ वर आणले व नंतर फेब्रु २००९ मध्ये अजून रू. ५ ने कमी करून प्रतिलिटर रू. ४८ केले. सेवाकर देखील १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणला. नंतर २१ मे २००९ ला युपीए पुन्हा एकदा सत्तेवर आल्यावर लगेच ८ दिवसात पेट्रोल परत ५ रु. ने वाढवून ५३ वर नेले व मार्च २०१४ मध्ये ते रू. ७८.५० पर्यंत पोचले होते. आता निवडणुकीमुळे तात्पुरते कमी केले आहे. भारतातली बिचारी गलीबल जनता या ढोंग्यांच्या नाटकाला पुन्हा एकदा फसणार.

In reply to by श्रीगुरुजी

२००८-०९ मध्ये अगदी हाच प्रयोग केला होता. डिसेंबर २००८ मध्ये पेट्रोल रू. ५८ प्रतिलिटर होते. ते ५ रूं. नी कमी करून ५३ वर आणले व नंतर फेब्रु २००९ मध्ये अजून रू. ५ ने कमी करून प्रतिलिटर रू. ४८ केले. सेवाकर देखील १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणला. नंतर २१ मे २००९ ला युपीए पुन्हा एकदा सत्तेवर आल्यावर लगेच ८ दिवसात पेट्रोल परत ५ रु. ने वाढवून ५३ वर नेले व मार्च २०१४ मध्ये ते रू. ७८.५० पर्यंत पोचले होते. आता निवडणुकीमुळे तात्पुरते कमी केले आहे.
जुलै २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर प्रति बॅरलला १४० डॉलरपेक्षा जास्त झाले होते.पण सप्टेंबर २००८ मध्ये लेहमन ब्रदर्स कोसळली आणि अभूतपूर्व मंदी आली.या पार्श्वभूमीवर डिसेंबर २००८ पर्यंत तेलाचे दर ४० डॉलरपेक्षाही कमी झाले.भारताच्या एकूण गरजेपैकी ७०% तेल आयात केले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्यावर सरकारने देशातील तेलाचे दर कमी केले.नंतरच्या काळात तेलाचे दर वाढले आणि जून २००९ च्या शेवटपर्यंत जवळपास ७० डॉलरपर्यंत दर पोहोचला.त्यामुळे देशातील तेलाचे दर वाढविले गेले. अर्थातच निवडणुका हा यामागे उद्देश अजिबात नसेल असे मी नक्कीच म्हणत नाही पण निवडणुका हा एकच उद्देश होता असेही म्हणता येणार नाही. संदर्भः http://www.quandl.com/DOE-US-Department-of-Energy/RBRTE-Europe-Brent-Cr…

३१/१२/२००८ ला क्रूड ऑईलचा भाव बॅरलला $ ३५.८२ होता. त्यावेळी पुण्यात पेट्रोल प्रति लिटर रू. ५८ होते. ०२/०१/२००९ ला क्रूड ऑईलचा भाव बॅरलला एकदम वाढून $ ४२.९४ झाला व नंतर १-२ दिवसांचा अपवाद वगळता हा भाव सतत $ ४४-४५ च्या आसपास होता. म्हणजे ३१/१२/२००८ च्या तुलनेत क्रूड ऑईलचे भाव किमान २० टक्क्यांनी वाढले होते. पण भारतात काय परिस्थिती होती? ३१/१२/२००८ ला रू. ५८ प्रतिलिटर असलेले पेट्रोल जाने २००९ मध्ये रू. ५३ केले गेले व नंतर २८ फेब्रुवारी २००९ मध्ये भाव रू ४८ वर आणला गेला. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव २० टक्क्यांहून अधिक वाढले तेव्हा भारतात भाव १७ टक्क्यांनी कमी केले गेले. एप्रिल २००९ मध्ये होणारी निवडणूक या एकमेव कारणापलिकडे दुसरे कोणते कारण यामागे असणार? सध्याची परिस्थिती पाहू. ३१/३/२०१३ क्रूड ऑईलचा भाव प्रतिबॅरल $ १०८.४६ होता व २९/४/२०१३ ला तो भाव $ १०२.८८ आहे. म्हणजे महिनाभरात भाव सुमारे ५ टक्क्यांनी कमी आले आहेत. पण मार्च २०१३ मध्ये प्रति लिटर रू. ७८.४६ असलेले पेट्रोल तब्बल १२ टक्क्यांनी स्वस्त होऊन रू. ६९ प्रतिलिटर झाले आहे. कर्नाटकमध्ये ५ मे ला असलेली निवडणूक याव्यतिरिक्त दुसरे कोणते कारण या भाव कमी करण्यामागे आहे?