युरोपातला उन्हाळा आल्हाददायक असतो. २२ ते २५ अंश से तापमान,सूर्याचा ढगांशी लपंडाव आणि मध्येच एखादी हलकीशी सर असा 'श्रावण' उन्हाळाभर चालू असतो. साहजिकच ह्या वातावरणाचा जास्तीत जास्त उपयोग सगळे करून घेत असतात कारण त्यानंतर येणारी पानगळ दिवस लहान करते आणि तिच्यापाठोपाठची बोचरी थंडी सोबतीला करड्या संध्याकाळी आणते.त्यामुळे उन्हाळ्यात मौजमजेचे जास्तीत जास्त प्लान केले जातात्.व्हरांड्यात,गच्चीत,अंगणात केलेले बार्बेक्यू हे त्यात अग्रभागी असतात.अशा हवेत आम्हाला एकत्र काहीतरी करण्याची सुरसुरी न आली तरच नवल! त्यात आणि तात्याने अचानक छोटेखानी मिपा कट्टा! :)मा.मिच्या फोटोंसकट टाकल्याने मामि खायची इच्छा तीव्र व्हायला लागली पण इथे फ्रांकफुर्टात कुठला मामलेदार अन् कसली मिसळ? इथे फरसाण मिळते ते ही बिलकुल चांगले नसते पण मग मिळते तेच चांगले मानून मामि करूया असा बेत ठरवू लागलो.
अशातच एक दिवस प्रसादचा फोन आला.तो फ्राफुजवळच्या वेट्झलर येथे एका वर्कशॉपसाठी ४ दिवसांकरता येणार होता.त्याला फरसाण (मामि साठी पेश्शल )आणायचे फर्मान सोडले.तो ही मामि भक्त असल्याने कसे फरसाण हवे ते त्याला माहिती होतेच!दोस्तीला जागून त्याने फरसाण वाहून आणले आणि काल हातात फरसाण आल्यावर आज मामि करणे क्रमप्राप्तच होते.लिखाळ आणि केसुंना सांगावा धाडला पण लिखाळचे म्युनस्टर केसुंच्या डार्मस्टाट सारखे हाकेच्या अंतरावर नसल्याने त्याचा नाइलाज झाला.
आज सकाळीच मामिची तर्री करायला घेतली आणि मिसळीचा घमघमाट कॉरीडॉर पर्यंत पोहोचला.चव घेऊन पाहिली,मस्त झटका बसला.आता तिच्यावर तुटून पडायचा मोह नाइलाजाने टाळत आम्ही केसुंची वाट पाहत बसलो. न राहवून दिनेशने फोन लावला तेव्हा केसु फ्राफु मध्ये अवतीर्ण झाले होते आणि 'मदन'कडून गुलाबजाम वगैरे घेऊन येतो सांगून त्याने फोन ठेवला आणि मी इकडे रस्सा उकळवायला ठेवला.गुलाबजाम,गाजरहलवा आणि लाडूंसकट केसुंचे आगमन थोड्याच वेळात झाले आणि लालबुंद तर्रीत लुसलुशीत पाव बुडवत आम्ही मिसळीवर तुटून पडलो.
पोट आणि मन तुडुंब भरल्यावर सुस्तावायला झालंच पण मग मास्तरांनी रेकमेंड केलेला 'रॉक ऑन' पाहताना दुपारचा आळस कुठल्याकुठे पळाला.शिनूमा पहायलाच हवा असाच आहे.दुपार सार्थकी लागली.थ्यांकू मास्तर!
चहा पिऊन केसुंनी आमचा निरोप घेतला आणि आमच्या छोट्याशा मिसळ कट्ट्याची इतिश्री झाली.

मामलेदार मिसळ फ्राफु मध्ये
पहिली प्लेट संपेपर्यंत कोणी कोणाशी एक अक्षरही बोलले नाही. प्रसादने ठाण्यातून मिसळ स्पेशल फरसाण आणल्याबद्दल त्याला दुवा देत,घाम टिपत,हायहुश्श करत पुढची प्लेट हाणली.एव्हाना रश्श्याचा घमघमाट म्युनस्टरपर्यंत पोहोचला असावा कारण लिखाळचा फोन आलाच!फ्राफु ते म्युनस्टर अंतर ६०० किमीच्या वर असल्याची रुखरुख त्या दोघांना लागली होती. म्युनस्टरच्या दिशेने मिसळीचे चार चमचे टाका असे फर्मान तिकडून सोडण्यात आले पण चार चमचे मिसळ वाया कशाला घालवा? त्याऐवजी एक घास काऊचा,एक घास चिऊचा या चालीवर एक घास लिखाळचा ,एक घास लिखाळीचा करत आम्ही खाऊ असे केसु आणि दिनेशने त्यांना ऐकवले.

एक घास लिखाळचा...
मिसळीची रसभरीत वर्णने करुन म्युन्स्टरवाल्यांना जरा जळवले,ते कमी म्हणून की काय नंतर खाणार असलेल्या रवाबेसन लाडू, गुलाबजाम आणि गाजरहलव्याचीही वर्णने केली.

वाचने
7982
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वाती
अरे वा
सामर्थ्य आहे चळवळीचे.
हा हा
In reply to सामर्थ्य आहे चळवळीचे. by रामदास
स्स्स!!
चला, आपले सेट्टल झाले ...
चापलुस !
In reply to चला, आपले सेट्टल झाले ... by छोटा डॉन
जर्मनीवाले भारी पडताहेत. :)
In reply to चला, आपले सेट्टल झाले ... by छोटा डॉन
जर्मन
In reply to जर्मनीवाले भारी पडताहेत. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जर्मनीवाल
In reply to जर्मनीवाले भारी पडताहेत. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खवाट .............
In reply to जर्मनीवाल by विजुभाऊ
स्वाती,
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
स्वगत
In reply to वा! by नंदन
फोटु
मस्त कट्टा..
स्वाती,
ह्म्म..
In reply to स्वाती, by विसोबा खेचर
फोटू साईडनी घेतलात तर याद राखा!
In reply to ह्म्म.. by केशवसुमार
जहबहरा
अरे वा!!
वा वा वा.....
आभार..