आज तो जीने की तमन्ना है...........
हा लेख विजुभाऊंना समर्पित ......
*******************************************************************************************************************************************************
आज फिर मरनेका इरादा है!
.
.
.
.
काल डायवोर्स पेपर वर सह्या करताना तुझा हात एकदा तरी थरथरेल ,नजर बिथरेल असं वाटलं होतं, पण नाही ,एका अर्थी बरंच झालं. तुला मोकळ्या आभाळाखाली मोकळा श्वास हवा होता, आणि तुला श्वास घेताना मला पहायचं होतं. रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये सह्या करुन झाल्यावर परत येताना डोकं सुन्न होतं, एकटक नजर बाहेर भिरभिरत होती. अचानक आलेल्या वादळात आपलं घरट झाडावरनं खाली पडावं, पावसात वाहून जावं, आणि हे सारं आपल्यालाच आपल्या उघड्या डोळ्यानी पहायला लागावं, ह्या इतकं दुर्दैव असू शकतं का? किती विचार करत बसणार होती मी कोण जाणे?
खिडकीतनं बाहेर दिसणार्या थोटक्या झाडाकडे बघत निदान तास तरी उलटून गेला असेल. चिंध्या झाल्या होत्या डोक्याच्या, पुढचं आयुष्य एकटीने घालवायचंय ह्या गोष्टीची मानसिक तयारी होत नव्हतीं. न राहवून रेडीओची एक दोन बटणं फिरवली, कुठेच काहीच नाही, आज सूर नको होते, पण एकटेपणाही नको होता. वीस वर्ष जे सूर जुळले ...नाही, जुळवले होते ते क्षणात तुटले, बेसूर झालं होतं सगळं. त्याला मी नकोशी होती असं नाही, त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं असं नाही .खरतर तू एकदा भांडताना नुसतंच म्हणुन गेला होतास, मी मात्र ते खरं करुन दाखवलं. सेलीब्रेशन करत असशील, आय नो.
वीस वर्षांचा आपला सहवास .बघायला आला तेव्हा एकही प्रश्न मला विचारला नाहीस. बघताच क्षणी आवडला होतास मला. शांत स्वभाव भावला मनाला. आठवत असेल तुला अजून, कि नाही माहित नाही, पण मला चांगलच आठवतंय, हॉटेलमध्ये घेवून गेला होतास. माझ्या बिनधास्त बोलण्याने अचंबित व्हायचास, पण बराच इम्प्रेस्स्ड. त्यानंतर जुहूला समुद्रावर नकळत तुझ्या हातांचा झालेला तो पहिला स्पर्श अजूनही मनात मोरपंखी शहारा खुलवतो. माझं बोलणं तुला फार आवडायचं. माझ्यासाठी जमेल तेवढा वेळ श्रोता म्हणून राहाणं पसंत होतं तुला. आपल्या आवडीनिवडी कमालीच्या भिन्न, पण मनांचे सूर जुळले आणि सगळंच सोपं होऊन पुढ्यात आलं. आपलं लग्न झालं.
खरतर साध्या पद्धतीने लग्न करायचा तुझा विचार मी माझ्या ह्याच बडबडीने हाणून पाडला होता. लग्न एकदाच होतं . देवाब्राह्मणांसोबत थोरामोठ्यांचे आशिर्वाद मिळाले कि ते उत्तम प्रकारे निभवायला प्रचंड बळ मिळतं अशी माझी समजूत होती. पण आत्ता पटतय तू बरोबर होतास.
आयुष्याची वीस वर्ष भरकन गेली, वाटलं आत्ता आत्ताच कुठे सुरुवात होतेय, तोवरच? तुझ्या आवडी निवडी मी स्वत:च्या बनवून जगू लागले, तुझ्यासाठी साधेपणाचं रहाणीमान सोडून, तुला हवी तशी हव्या त्या रंगात स्वत:ला बदलून घेतलं.
"अबोली रंग तुझ्यावर खुलून दिसतो" ह्या एका वाक्यासाठी तशाच त्याच रंगाच्या चार चार साड्या खरेदी केल्या होत्या वेड्यासारख्या, पण तुला तुझ्या कामातनं त्यांच्याकडे पाहायलाही जमलं नाही. नोकरी सोडलीस त्यावेळी खरंच वाईट वाटलं होतं, आता हा संसाराचा गाडा ओढताना तुझी दमछाक होइल ह्याची पुरेपूर कल्पना होती, पण खांद्यावर जमेल तितकं ओझं पेलायची तयारी दाखवली, तुझी ओढाताण समजत होती, जाणवत होती. त्यावेळी व्यवसायात उतरण्याचा तुझा निर्णय "चुकलाच तर रे?" हे ओठांवर आलेले शब्द कितीतरी प्रयत्नाने आवंढ्यासकट गिळले होते. तुला कुठेही, कसंही दुखवायचं नाही, बस्स, फक्त एवढ्या हेतूनेच आयुष्यभर मनात बरच साठू दिलं, पण भावनेच्या भरातही मनानं दगा दिला नाही, तुला कधीच माझ्या अंतकरणात दडलेलं काहीच उमजलं नाही.
पुढे तुला व्यवसायात मिळणारं अपयश, तुझं शांत बसून रहाणं, तुझं सतत व्यस्त असणं, इतकं टोचू लागलं पण पर्याय नव्हता रे, तू हे सगळं आपल्यासाठी, आपल्या बाळासाठी करतोयस एवढं कळायचं मला. तुझे कष्ट दिसत होते मला. त्याचबरोबर तुझ्या अडचणीही दिसत होत्या, पण त्यावर मार्ग काढायला तू कमी पडत होतास, हेच खटकायचं मला. खचून जायचास, सतत धक्का मारावा लागायचा, हेच नको होतं मला. तू हुशार होतास, कष्टाळू होतास, पण निर्णय घ्यायला घाबरायचास, घटस्फोटाचा निर्णय मात्र तू किती पटकन घेवू शकलास.
पुढे व्यवसायातल्या अपयशाला, हो अपयशच. त्याला कंटाळून तू पुन्हा नोकरीचं मनावर घेतलंस, खर सांगू आकाश ठेंगण झालं होतं मला, त्यातही संयम बाळगला मी. कारण अजून नोकरी हातात नव्हती. माझ्या चेहेर्यावर नेहेमीच आशेचे किरण पहायची सवय झाली होती तुला. मनात नसतानाही ओठांवरचं हसू ढळू द्यायचे नाही मी. का? तर तुला तोच एक आधार वाटायचा. तुला नोकरी मिळाल्यावर तू उत्साहाच्या भरात मला उचलुन एक गिरकी घेतली होतीस, तो क्षण आयुष्यातल्या काही आनंदी क्षणांपैकी एक. ड्रेसही बदलू दिला नाहीस, लगेच नाक्यावरच्या सायबरकॅफेत नेऊन ऑफरलेटर दाखवलस. खिशात पैसे नसताना दोघात घेतलेलं एक आईस्क्रीम, तुझा आनंदून गेलेला चेहेरा, वाटलं हे सुख पदरातून खाली सांडूच नये कधी. पण पदर झीजत चालला होता ह्याकडे लक्षच गेलं नाही.
आठवतंय? मला दिवस गेलेत हि बातमी जेव्हा तुला सांगितली तेव्हा "अरे बापरे" असे भाव तुझ्या चेहेर्यावर होते. त्या दिवसात मला तुझ्या सहवासाची फार गरज होती. शक्य होइल तेवढी काळजी घेतलीस माझी. आपल्याला मुलगी झाली. गोंडस बाळ. तिच्याकडे बघून म्हणाला होतास, आता सारं हिच्याचसाठी करायचं. काही कमी पडू देणार नाही तिला, पण साधासा विचार कर आज तिला तिच्या ह्या वयात तुझी किती गरज आहे ते. काही कमी पडू देणार नाहि असं म्हणणारा तू आज तिच्या बाबतीतही कर्तव्य करायला कमीच पडलास. तुझ्या ह्या पावलोपावली कमी पडण्याचाच तिटकारा होता मला.
नोकरीनिमित्त तू मग घरापासून लांब रहायला लागलांस .तुझी इतकी सवय होऊन गेली होती कि, तुझं दूर रहाणं लवकर पचलंच नाही. तुझी वाट बघण्यात बर्याच रात्री जागवल्या, बरेच दिवस पापण्या आडून पालटवले. कधी तुझी येण्याची तारीख पुढे जायची, तर कधी माझा धीर सुटत जायचा, पण मग स्वत:लाच समजावलं, आता दोघे नाही आपण, आपल्यावर आपल्या मुलीचीही जवाबदारी आहे. तिच्यासाठी आपल्याला बरेच निर्णय स्वतंत्र घेतले पाहिजेत, प्रत्येकवेळी तू जवळ नाही हे कारण दाखवून नाही चालणार. मी स्वतंत्र विचार करु लागले, बरेच निर्णय तुझ्याशिवाय घेऊ लागले. त्याचा अभिमान वाटण्याऐवजी "तुला आता माझी गरजच उरली नाही" असं विधान केलस तू. मला काय वाटलं असेल त्यावेळी हे शब्दात सांगू शकत नाही मी.
सगळ्याच बाजूने सारख्याच अपेक्षा करणं चुकीचं असतं. एखाद्या तरी बाजूवर पडतं घ्यावंच लागतं. मान्य आहे मला, माझा स्वभाव चिडखोर झाला होता, तुझ्या जवळ नसण्याने असेल कदाचित. कदाचित नाही, हेच कारण, पण कधी ओठावर येऊच दिलं नाही मी. सुट्टीवर तू इकडे आला होतास, आपल्या मुलीला घेऊन आपण डॉक्टर कडे गेलो होतो.
डॉक्टरांनी लास्ट चेकप ची डेट विचारली तुला. तुला नाहि सांगता आली. तिच्या शाळेत भातुकलीचं एक्झिबिशन होतं, तुला यायला जमलं नाही, त्याबद्दल वाद नव्हता, पण एका शब्दानेही तू तिला विचारलं नाहीस, साधी चौकशीहि नाही. सांग ना ...एवढासा जीव तो, मला बिलगुन रडू लागला तेव्हा मला काय वाटलं असेल? तू नोकरीनिमित्त लांब होतास. तुझ्यावर कामाचा ताण होता, सगळं मान्य, पण मनाने लांब कसा काय जाऊ शकलास?
सध्या फक्त आपल्या सानुल्याचांच विचार करतेय. तेव्हा मात्र न सांगताच तुझाही विचार मनात, डोक्यात येतोच, काय करणार, तुझे कणाकणात भिनलेले श्वास मी वेगळे करु शकत नाहीय. तुझी लागलेली सवय, तुझा नसूनही असणारा, तरीही जपलेला सहवास, त्याला कशी काय विसरणार होते मी?
अजूनही विश्वास बसत नाहीयं, पण हे घडलंय खरं. तरीही वाटतं, माझ्या प्रेमाचे बंध इतके तकलादू नव्हते, इतक्या सहजासहजी तुझ्या हातातून निसटण्याइतकी सैल हाताची पकड नव्हती. हातात हात गुंफून चाललेल्या वाटाही निसरड्या नव्हत्या, कि पापण्यात पाहिलेलं दोघांचं एकच असं ते स्वप्नही भातुकलीच्या खेळाएवढं खोटं नव्हतं.
तू परतून येशील ही आशा नाही सुटत, यात दोष कुणाचा? तुझ्यावर जडलेला जीव तुझ्यापासून दूर होईना, ह्यात दोष कुणाचा? सुकलेल्या, गंधहीन फुलांतही नाजुकपणा शोधणारा तू, तुझ्या आठवणींच्या जाळ्यातून बाहेर येण्याची इच्छाच नाही, ह्यात चूक कुणाची? ह्या प्रश्नांची उत्तर नाही मिळाली तरी चालतील ...पण तू
तू परत ये .. !!
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!!!
सुरेख लिहिलंयस पोरी!!!
मी विजुभाऊला त्याचा लेख वाचल्यानंतर, तोही सुरेखच होता, इथे तोच लेख 'तिच्या' दृष्टिकोनातून लिहायचं आवाहन केलं होतं...
पण त्याने नाही लिहिलं...
दॅट्स ओके, त्याची मर्जी...
पण तू सुरेख लिहिलंयस. जियो!
तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला सारून तू असं लिहिलंयस याचं मला खूप कौतुक वाटतं!!!
{तुला खरं सांगू? तात्या मला हेच म्हणायचा, "डांबिसा फोकलीच्या, तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला सारून तू जेंव्हा लिहितोस ते खूप वाचनीय असतं!! पण मला वाचनीयतेपेक्षा वांडपणा जास्त प्यारा आहे हे त्याला काय माहिती!! :))}
एनिवे, पण तू छान लिहिलंयस, मला आवडलं...
फक्त शेवटात, "तू परत ये" च्याऐवजी "माझ्यात माझं बदललेलं आयुष्य जगण्याचं बळ आहे" हे वाचायला जास्त आवडलं असतं!!! विमेन कॅन हॅन्डल देअर लाईफ मच बेटर वे दॅन मेन कॅन!!!
बट दॅट्स जस्ट मी, नेव्हर माईंन्ड!!!
:)
+१११११
In reply to सुरेख!!! by पिवळा डांबिस
+१११११
अतीशय उत्कृष्ट,
अतीशय उत्कृष्ट,
गंध फुलांचा गेला सांगुन्,तुझे नी माझे व्हावे पुन्हा मिलन
ह्यालेखाबद्दल पुजा तैना माझ्याकडुन हे पारिजातकाच फुल

या लेखनात 'जान' आहे.
पूजा - खरंच तू लिहिलेलं हे लेखन वाचून खूप समाधान वाटलं. या प्रकारचे लिहिणे हे अजिबात सोपे काम नाही. विजुभाऊंना देखील 'ती' ची बाजू मांडताना जे जमले नाही ते तुला नक्कीच जमले.
आयला, त्याने लिहिलं होतं का?
आयला, त्याने लिहिलं होतं का?
आमच्या नजरेतनं सुटलंसं वाटतंय!!!!
स्वारी हो विजुभाऊ!!!!
प्रत्यक्ष भेटू तेंव्हा एक बीयर आमच्याकडून तुम्हाला!!!!
चूभूद्याघ्या....
डांबिसाशी पुर्ण सहमत. !
डांबिसाशी पुर्ण सहमत. ! :)
फक्त शेवटात, "तू परत ये" च्याऐवजी "माझ्यात माझं बदललेलं आयुष्य जगण्याचं बळ आहे" हे वाचायला जास्त आवडलं असतं!!! विमेन कॅन हॅन्डल देअर लाईफ मच बेटर वे दॅन मेन कॅन!!!
येस दे कॅन.. अॅब्सोल्युट्ली... नो क्वेशन अबाउट इट.
बट दॅट ड्झ नॉट मीन दॅट दे डोन्ट सफर, ऑर दे डोन्ट पे अ हेफ्टी इमोशनल प्राइस फॉर इट.. प्रॉबब्ली वे मोअर दॅन मेन डू !
कथेतिल नायिकेने कालच डिवोर्स पेपर वर सही केली आहे.. आज तिला " तू परत ये" असे वाटले तर ते अत्यंत स्वाभाविक आहे, खरी वाटण्यासारखी ही भावना आहे. आणखी ५ वर्षांनी हिच नायिका कदाचित त्याला " मी माझ्या बदललेल्या आयुष्यात सुखी आहे" असे सांगु शकेल, आणि ती भावना देखिल तेवढीच सच्ची असेल.
गैरसमज होतो!
In reply to डांबिसाशी पुर्ण सहमत. ! by इन्दुसुता
ऑफ कोर्स दे डू सफर!!!
बट, इन माय हंबल ओपिनियन, वीमेन हॅव द एबिलिटी टू फेस अॅन्ड कोप अप विथ द इमोशनल क्रायसिस बेटर दॅन मेन कॅन!!
बट देन अगेन, आय अॅम अ मॅन! इफ धिस इज नॉट सो देन प्लीज आय बेग फॉर युवर फरगिव्हनेस.....
आयडियली, आय वुड लाईक वीमेन टू बी एम्पॉवर्ड टू से "माझ्यात माझं बदललेलं आयुष्य जगण्याचं बळ आहे" दॅन,"तू परत ये" !!!!
बीकॉज, द लाईफ मूव्हज ऑन.....
गैर समज नाही.
In reply to गैरसमज होतो! by पिवळा डांबिस
नाही हो गैरसमज अजिबात नाही... पण तसे वाटले असल्यास क्षमस्व.
आता थोडे स्पष्टीकरण..
दे हॅव डिफरन्ट कोपिंग स्किल्स ( अॅन्ड येस, बेटर कोपिंग स्किल्स). अग्रीड विदाऊट एनी रिझर्वेशन.
आयडियली, आय वुड लाईक वीमेन टू बी एम्पॉवर्ड टू से "माझ्यात माझं बदललेलं आयुष्य जगण्याचं बळ आहे" दॅन,"तू परत ये" !!!!
मला याची जाणीव तर आहेच पण आपल्या लेखनाशी परिचय असल्यामुळे त्याची नुसती जाणीवच नाही तर खात्री आहे साहेब. आणि आय वुड लाईक वीमेन टू बी एम्पॉवर्ड टू.. म्हणूनच आपल्या प्रतिसादाशी सहमत आहे असे आधी म्हटलेले आहे.
बट देन अगेन, आय अॅम अ मॅन! इफ धिस इज नॉट सो देन प्लीज आय बेग फॉर युवर फरगिव्हनेस.....
एमेन.. यू आर फरगिव्हन बिकॉज यू आर अ मॅन.. :D =))
अॅन्ड सिन्स वीमेन हॅव बेटर कोपिंग स्किल्स अॅज अग्रीड अपॉन बाय बोथ, अॅन्ड इट इज सो, अॅन्ड सिन्स यू बेग एनीवे, यू आर फरगिव्हन अगेन. =))
नाऊ इन माय हंबल ओपिनियन,
बीकॉज, द लाईफ मूव्हज ऑन.....
बट नॉट इन अ डे ऑर अ मन्थ.. इट सम टाईम्स टेक्स यीअर्स.. इस्पेशली आफ्टर द लॉन्ग असोसिएशन इन्डिकेटेड इन धिस केस. इट इज आफ्टर ऑल माय हंबल ओपिनियन दॅट शी विल बी रेडी टू से ' माझ्यात माझं बदललेलं आयुष्य जगण्याचं बळ आहे" इन अ लिटल व्हाईल, बट नॉट जस्ट यट् ! :)
म्हणून हा स्पष्टीकरणाचा प्रपंच :)
@ तिमाजी अप्पा ( बरं अप्पा आवडत नसेल तर तिमाजी पंत चालेल का ?) : कसं तुम्ही बरोब्बर ओळखलं हो आम्ही इंग्रजीतून का गप्पा मारल्या ते? :)
@ शुची: घट्स्फोटीत कुणाशी तुमचा परिचय नसावा असे वाटते.. अगदी मारहाण करणारा नवरा जरी असेल तरी माझ्या पाहणीतील कुठ्ल्याही स्त्रीनी ( किंवा तसे बघितल्यास कुठल्याच पुरुषाने देखिल) मोकळ्या पतंगा सारखे वाटले असल्याचे कधी सांगितले नाही डिव्होर्स झाल्या दिवशी !!
इन अ लिटल व्हाईल, बट नॉट जस्ट
In reply to गैर समज नाही. by इन्दुसुता
हम्म! कान्ट ऑनेस्टली से आय टोटली अॅग्री बट आय सी युवर पॉईंट!! माझ्या मते जेंव्हा पब्लिक घटस्फोटापर्यंत गाडी आलेली असते तेंव्हा नातं मनातून (त्याच्या काय किंवा तिच्या काय)कितीतरी आधीच तुटलेलं असतं...
एनिवे, मतमतांतरे असायचीच पण तुमच्याशी चर्चा करण्यात आनंद वाटला.
Agreement
In total agreement with Pisa and indusuta.
हे काय?
In reply to Agreement by विनायक प्रभू
पिडां आणि इंदुसुता आम्हाला समजू नये म्हणून इंग्रजीतून गप्पा मारत आहेत. त्यांत मास्तर सुद्धा ? फक्त त्यांनी पिडांना 'पिसाचा मनोरा' बनवला आहे एवढंच समजलं.
पूजातैंनी लई ब्येस लिहिलं आहे. त्यांना मानाचा मुजरा.
फक्त त्यांनी पिडांना 'पिसाचा
In reply to हे काय? by तिमा
मराठीतलाच बनवलं, कोकणीतला नाही बनवलं हे काय आमच्यावर मास्तरांचे थोडे उपकार आहेत?
:)
मी कोकणीबद्दल लिहिणारच होते,
In reply to फक्त त्यांनी पिडांना 'पिसाचा by पिवळा डांबिस
मी कोकणीबद्दल लिहिणारच होते, पण मग म्हटलं जौद्यात :)
अप्रतिम.
भावनिक अगतिकता कांहिशी खुपली पण एकूणात भावनांचे प्रकटीकरण, शब्दांकन, स्वगत, जे आहे ते फार छान जमले आहे. अभिनंदन.
_/\_
_/\_
काश ऐसा कोई मंजर होता
मेरे कांधेपे तेरा सर होता|
जमा करता जो मै आए हुए संग
सर छुपाने केलिये घर होता||
मनाला भिडणारे लेखन! अगदी
मनाला भिडणारे लेखन! अगदी मनाच्या तळातून आलंय हे!
अप्रतिम लेखन
पुजाताई आणि विजुभाऊ,
एकाच नाण्याच्या तीन बाजू असू शकतात हे फारच छान तर्हेने आपण दाखविले आहे.
कोणत्याही नात्याचे अहंभावामुळे कसे नुकसान होते ते प्रभाव्पणे दाखविले आहे.
विजुभाऊ दोन्ही बाजूनी किती समर्पकपणे विचार करू शकता याबद्दल आपले अभिनंदन करावे
पुजाताईनि त्याच नाण्याची तिसरी बाजू एका स्त्रीच्या मनाने फार सुंदर दाखविली आहे
च्यायला, आमचा उजवा मेंदू एवढ्यातच अडखळू लागतो आणि मनात जे सांगायचे आहे त्याला शब्दच सुचत नाहीत. तुम्ही भाव समजून घ्यावा हि विनंती
उत्कृष्ट
सुबोध
मस्त....
मस्त मांडणी....
मस्तच पूजा. बाकी इंदुसुताताई
मस्तच पूजा. बाकी इंदुसुताताई आणी पिडांशी सहमत.
आवडलं!
आवडलं!
मस्त.......................
मस्त.......................
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
छान
एखाद्या व्यक्तीरेखेच्या मनाचे खेळ आपण शब्दात उतरवणे हे सोपे नाही. तुला ते छान जमलेय गं.
अशीच लिहित जा. :)
'विमेन कॅन हॅन्डल देअर लाईफ मच बेटर वे दॅन मेन कॅन' या पिडांकाकांच्या मताशी अगदी सहमत.
मस्त एकदम!!!!!
सुंदर लिहिलय..........
सुरेख..
सुरेख लिहीलयंस, पुजाबै.. अत्यंत हळव्या मनस्थितीतून जात असलेली ती, अगदी पुरेपूर समोर आली. बाकी स्त्रियांच्या भावनिक ताकतीबद्दल पुर्ण भरवसा असूनही, ह्या मनस्थितीत "तू परत ये" हेच जास्त स्वाभाविक वाटतंय..
आज्जे काय अप्रतीम लिहल आहेस
खुप आवडलं. शेवटि आहे मनोहर तरी....
बघ कशी भावपूर्ण लिहुन गेलिस..
बघ कशी भावपूर्ण लिहुन गेलिस... ! बालिका यु आर ग्रेट :-)
सच्ची भावना.
सच्ची भावना.
डिव्होर्स पेपरवर सही केल्यावर एका तुटलेल्या पतंगासारखं मुक्त आणि हलकंहलकं वाटत असावं असा कयास.
छान च की हो पवारबाई
छान च की हो पवारबाई ;)
एक पिझ्झा आमच्या मंडळातर्फे
पूजा जी, फार सुंदर लिहिल आहात.
पूजा जी, फार सुंदर लिहिल आहात.
तुमच्या ओघवत्या लिखाणामुळे ती ची बाजु फार परिणामकारकरित्या तुम्ही लिहिली आहे.
लिखाण सुरेख...
>>>खिशात पैसे नसताना दोघात घेतलेलं एक आईस्क्रीम, तुझा आनंदून गेलेला चेहेरा, वाटलं हे सुख पदरातून खाली सांडूच नये कधी. पण पदर झीजत चालला होता ह्याकडे लक्षच गेलं नाही.
ह्या वाक्यांना २ कोटी टाळ्या....
+१००
In reply to लिखाण सुरेख... by वपाडाव
+१०० टू वप्या!
- (टाळ्या वाजवणारा) सोकाजी
मस्त लिहिलं आहेत हो पुजातै,
मस्त लिहिलं आहेत हो पुजातै,
आपण या अशा परिस्थितीतुन जात नसलो तर असे विचार करायला आणि कागदावर उतरावयाला जाम जाम त्रास होतो, असे त्रास प्रत्यक्ष होणं परवडलं पण नुसती कल्पना करुन डोक्याला शॉट लावुन घेणं जास्त वाईट.
+१
In reply to मस्त लिहिलं आहेत हो पुजातै, by ५० फक्त
सकाळी सकाळी लेख वाचला पूजीचं नाव वाचून.
डोक्याला खरंच शॉट लागला. काही गोष्टी आपल्यालाही लागू पडतात ह्याची कारण नसताना चुटपूट लागली. ह्या बायका ना.... जौ दे! :(
पिडांशी सहमत ...(पण किंचित फरकाने...)
तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला सारून तू असं लिहिलंयस याचं मला खूप कौतुक वाटतं!!!ह्याच्याशी +१,०००,००० सहमत....आणि
... मला वाचनीयते इतकाच वांडपणा जास्त प्यारा आहेयाच्याशीही +१,०००,००० सहमत
असं पण वारंवार खरडायचं मनावर घे पुजातै. सासूबै, वैनीबै, भौराया... सग्ळे, सग्ळे कैच्याकै खूष होतील बग.
छान लिहिलयस पूजा. आवडलं.
छान लिहिलयस पूजा. आवडलं.
पुजाबाई,
पुजाबाई,
क्या बात है, मस्तच लिहीले आहे.
अभिनंदन.
१ एप्रिल
लेखाच्या प्रकाशनाची तारीख १ एप्रिल ही आधी वाचली.
लेख वाचला. प्रतिसाद वाचले.
आयडी हॅक झाला आहे. :-)
..
पूजातैंचे सुरुवातीचे लेख अन् कविता ज्यांनी वाच्ल्यात, त्येंना असं नाही वाटणार.
पूजातै सुरुवातीपासूनच असं इमोसनल अन् उत्कट लिहितातच!
सुपर्ब..
एखाद्या भूमिकेत शिरुन कसलेला नट जसा त्या पात्राचा अभिनय निभावतो, तसंच परमनोप्रवेश करुन लिहिलय. 'तुझ्या ह्या पावलोपावली कमी पडण्याचाच तिटकारा होता मला..' अशा वाक्यातून एक ओघ आलाय मनातल्या विचारांना, कसलेलं लिखाण, आवडलचं. पहिल्या परिच्छेदापासून आशा 'मेरा कुछा सामान तुम्हारे पास पडा है..' गातेय अस सुरु झालं बॅक्राउंडवर मनात.
पिडा काकांनी म्हटलेलं बुद्धिला पटलं तरी मनाला पटतं नाही. जजमेंटल व्हायचं नाही म्हटलं तरी, 'पेपरवर सही केल्यावर' मोकळं होता येण्याइतकं प्रॅक्टीकल होणं स्त्री म्हणून जास्त कठीण जात असावं असं वाटतं!
ब्रेव्हो पूजा !
तोडीस तोड लेखन.
...'माझं बदललेलं आयुष्य जगण्याचं बळ आहे' पेक्षा 'तू परत ये' हे जास्त नॅचरल वाटलं !
परकायाप्रवेश
परकायाप्रवेश उत्तम जमला आहे. आवडला.
पूजाताई तसं पाहिलं तर तुमचं
पूजाताई तसं पाहिलं तर तुमचं आमचं तितकं जमत नाही. पण एक वाचक म्हणून आवर्जून दाद द्यावीशी वाटली ह्या लेखाला. दुसर्याच्या भुमिकेतून लिहिणं अवघड गोष्ट आहे, पण तुम्ही ती लिलया केली आहे.
>>>पूजाताई तसं पाहिलं तर
In reply to पूजाताई तसं पाहिलं तर तुमचं by अधिराज
>>>पूजाताई तसं पाहिलं तर तुमचं आमचं तितकं जमत नाही.
हे लिहीण्याची काहीही गरज नव्हती असे वैयक्तिक मत आहे... लेखक(लेख लिहीणारी व्यक्ती-लिंगनिरपेक्ष)वेगळा, लेख वेगळा, आयडी आणखी वेगळा, एकच माणूस समान परिस्थितितल्या दोन घटनांमध्ये दोन वेगळ्या प्रकारे रिअॅक्ट होऊ शकतो. इथे बर्यापैकी सगळे वेगवेगळ्या झूली पांघरुन अथवा उतरवून येतात. त्यामुळे असं म्हणण्याची काहीच गरज नाही. फक्त लेखनाला दाद दिली तरी समजणाराला समजतेच की! असो.
@ एकच माणूस समान
In reply to >>>पूजाताई तसं पाहिलं तर by प्यारे१
@ एकच माणूस समान परिस्थितितल्या दोन घटनांमध्ये
हे वाक्य प्यारे विदा म्हणून वेगळे काढून ठेवणेत येत आहे. ;)
दोन वेगळ्या प्रकारे रिअॅक्ट होऊ शकतो.>>>
अ वांतर---वेटिंग फॉर धन्या ;)
एकच माणूस समान परिस्थितितल्या
In reply to @ एकच माणूस समान by अत्रुप्त आत्मा
प्रचंड सहमत आहे. कोणत्याही क्षणी आपण स्वतः, इतर लोक आणि परिस्थिती हे तीन घटक अस्तित्वात असतात. यातल्या "समान परिस्थिती" मध्ये इतर लोक आणि परिस्थिती हे दोन घटक टाकले आणि ते "समान परिस्थिती" या अटीखाली दोन घटनांमध्ये सारखेच वागले तरी आपलं स्वतःचं वागणं दोन्ही घटनांमध्ये सारखंच असेल असं नाही. कारण "मी" मध्ये माझं अंतर्मनही येतं. त्यामुळे मन वढाय वढाय वगैरे वगैरे...
मस्त
जमलाय लेख...आवडला
पुजा
पुजा , तिच्या मनातल्या भावनांचा कल्लोळ अगदी स्पष्ट चितारला आहेस. लिखाणात खोल शिरायला होतं आणि शिरल्यावर कोणत्याही संवेदनाशील मनाला गलबलायला होइलच. खूप छान लिहिलयस. मस्त.
छान लेख
खूप छान लिहिलंयेस पूजा! अनेक वर्षांच्या संसारानंतर डिव्होर्स पेपरवर सही केल्यावर लगेच दुसर्या दिवशी कोणत्याही स्त्रिच्या मनात अश्याच भावना येणं सहाजिक असावं असं वाटतं. अगदी 'तू परत ये...' सुद्धा! 'तिच्या' मनस्थितीचा खूप विचार करून लिहिलंय हे जाणवतंय.
या पिडांकाकांच्या मताशी सहमत. असंच कधीमधी वांडपणा बाजूला सारून लिहीत जा.
खूप आवडलं...खरंच सुंदर!!
खूप आवडलं...खरंच सुंदर!!
+ १
In reply to खूप आवडलं...खरंच सुंदर!! by अस्मी
+ १
लेखनाची लय एकदम पक्की आहे.
काल डायवोर्स पेपर वर सह्या करताना तुझा हात एकदा तरी थरथरेल ,हे वाक्य मनावर असे काही आदळते की संपूर्ण लेख ह्याच्या प्रभावाखाली वाचला जातो. लेखनाची लय एकदम पक्की आहे. त्यामुळे तो परिणाम शेवटपर्यंत राहतो.
इस्ट्रोजेन , प्रोगेस्टेरॉन आणि ऑक्सीटोसिन हे एक अगम्य रसायन आहे.
जबरा...
पूजा पवारच आयडी आहे का हे दोनदा तीनदा पाहावं लागलं लेखकावर अजूनही विश्वास बसत नै सॉरी हं पुजाशेठ.
खुपच सुंदर.
-दिलीप बिरुटे
सुंदर. आवडलं.
सुंदर. आवडलं.
व्वा पूजाकाका मस्त लिहुन
व्वा पूजाकाका मस्त लिहुन गेलात.
तसही विजुभाऊ बरेचसे सफल झाले होते या लिखाणात. हे ही सुरेखच.
शी बै सग्गे सग्गे जळ्ळ्तात
शी बै :-/ सग्गे सग्गे जळ्ळ्तात माझ्या वांडपणावर :-/
पिडांकाका मलापण वांडपणा करायला खुप ़ खुप खुप मज्जा येते :)
अँड थँक्स टू ऑल :)
सगळे प्रतिसाद आवडले ......
माझ्याकडुन माझीच एक कविता .... सगळ्या वाचक , प्रतिसादक ... बोले तो सब ़के वास्ते ....
.
गोठलेला एकच थेंब तासनतास तसाच असतो
शिक्षेचा अर्थच कळत नाहि
भिजलेला वारा हळुच येऊन त्याला झोंबत असतो
थेंबाची समाधीच ढळत नाहि
.
रोज रोज तीच जागा त्याच खाणाखुणा ,
वेगळं असं आयुष्यच नाहि
तेच ते क्षण , तीच अस्वस्थता पून्हा पून्हा,
कसला तो निष्कर्षच नाहि
.
बहुतेकदा आपलहि जगणं थोडफार असच असतं
बदल शक्यतो घडतच नाहि
त्याच वाटेवर तीच पाऊलं घेऊन चालत असतं
वळण मिळालं तरी ,
पाऊल तिकडं पडतच नाहि .
थँक्स अगेन .
पहिल्याच २ ओळी गोठवून जातायत.
In reply to शी बै सग्गे सग्गे जळ्ळ्तात by जेनी...
पहिल्याच २ ओळी गोठवून जातायत..
गोठलेला एकच थेंब तासनतास तसाच असतो
शिक्षेचा अर्थच कळत नाहि
मस्त लिहिलयस पूजा. :)
मस्त
In reply to पहिल्याच २ ओळी गोठवून जातायत. by कवितानागेश
+१ माऊ
ही कविता खरडफळ्यावर वाचली तेंव्हाच आवडली होती.
आज इथे अशी आली. :)
छानय गं पूजा.
@शी बै smiley सग्गे सग्गे
In reply to शी बै सग्गे सग्गे जळ्ळ्तात by जेनी...
@शी बै smiley सग्गे सग्गे जळ्ळ्तात माझ्या वांडपणावर smiley>>> =)) आमि नै जळत...आम्हाला बालिकेचा वांडपणाच जास्त अवडतो.
वांड बालिका=महान बालिका =))
पुजा
पुजा
अतिशय भावपूर्ण लेखन.
आवडले.... व कविताही छान.
तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला
तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला सारून तू असं लिहिलंयस याचं मला खूप कौतुकवाटतं!!!
पुर्ण सहमत.
अप्रतिम लेखन
तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला
तुझा नेहमीचा वांडपणा बाजूला सारून तू असं लिहिलंयस याचं मला खूप कौतुकवाटतं!!!
पुर्ण सहमत.
अप्रतिम लेखन
थ्यान्क्स पूजा. मी लेख लिहून
थ्यान्क्स पूजा. मी लेख लिहून वर्ष होऊन गेले. तो विषय मला अजूनही हळवा करून जातो.
विजुभाऊ तुमच्या प्रतिसादाची
In reply to थ्यान्क्स पूजा. मी लेख लिहून by विजुभाऊ
विजुभाऊ तुमच्या प्रतिसादाची खरच वाट बघत होती .... लेख सार्थकी लागला :)
तुमच्या एका बाजुमुळे दुसरी बाजु माझ्याकडुन मांडली गेली ... उत्तेजनासाठी पून्हा
एकदा थँक्स :)
पून्हा एकदा सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार :)
लेख वाचून निशब्द झाले, रात्री
लेख वाचून निशब्द झाले, रात्री झोप येत नव्हती म्हणून मिपावर आले आणि तुमचा हा लेख वाचला, त्या शांत वातावरणात,
तुमचे शब्द वाचताना " ती " ची अनुभूती होत होती, खरेच सुंदर लिहिले आहे, हेट्स ऑफ टू यु ……।
प्रतिक्रिया उशिरा देत आहे म्हणून क्षम्स्व्य
भारी गं तायडे..
भारी गं तायडे..
मस्त!
मस्त जमलंय! अजून नाण्याची तिसरी बाजू यायची राहिली आहे. आईवडिलांच्या घटस्फोटामुळे व्यथित आणि हरवलेली मुलं. पूजा किंवा विजुभौ कोणीही लिहा!
प्रॉमिस पैसा ताई. त्या " मनू"
प्रॉमिस पैसा ताई. त्या " मनू" चे कथन लिहायचे राहिलय. पूजाच्या लेखामुळे सुरुवात करेन लिहायला.
@पूजा :
एक शाम आती है हररोज
मुझे तनहाई का एअहसास दिलाती है
कभी जुगनू तो कभी चांद की कहानिया सुनाती है
कहांसे न जाने .. हवा भी चली आती है चुककेसे.
कुछ बारीश यादे भी साथ लाती है.
वो खामोश पल वो महकते सितारे
वो अनकही बाते. वो अनछुए स्पर्श
हथेलिया हाथ मे थामे. वो आखों आखोंसे बाते
यादे सारी उमडकर आती है.
तनहाई मिट जाती है.
ये शाम हर रोज आती है
मुझसे मुझे ले जाती है.
ये शाम हर रोज आती है मुझसे मुझे ले जाती है.
In reply to प्रॉमिस पैसा ताई. त्या " मनू" by विजुभाऊ
___/\____/\____/\___
हे घ्या पूजा च्या पूजेतील
हे घ्या पूजा च्या पूजेतील आणखी एक सुंदर फूल......