Skip to main content

सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 28/03/2013 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
हि १९८८ सालची गोष्ट आहे. मी नौदलाच्या अश्विनी या ८२५ खाटा असलेल्या कुलाब्याच्या रुग्णालयात इंटर्नशिप करीत होतो. स्त्रीरोग शास्त्राच्या प्रभागात(वार्ड) मध्ये माझी नेमणूक होती. सर्वात लहान(कनिष्ठ) डॉक्टर असल्याने प्रभागातील हमाली कामे(रुग्णाला बेशुद्धीकरणा पूर्वीची तपासणी करून घेणे त्यासाठी लागणार्या सर्व तपासण्या करून घेणे रुग्णाकडून शस्त्रक्रिये पूर्वीची परवानगी लिखित घेणे ई.) हा वारसा हक्क माझ्याकडे होता. एके दिवशी सकाळी आमचे विभागप्रमुख सर्जन कप्तान सुरंजन मुखर्जी यांनी मला एका अधिकार्याचा वीर्य तपासणी अहवाल प्रयोग शाळेतून आणण्यास सांगितले. मी आदेशाप्रमाणे तो अहवाल घेऊन आलो त्यात शुक्राणू नाहीत असा निर्वाळा होता. अर्थात याची पार्श्वभूमी मला माहित होती. ती अशी वरील अधिकारी हा आपली नसबंदी ३ महिन्यांपूर्वी करून गेला होता. परंतु त्याची पत्नी गरोदर आहे असा तिचा मुत्र तपासणी अहवाल सांगत होता.नसबंदी केल्यावर पहिले ३ महिने पर्यंत स्त्रीसंबंध ठेवताना गर्भनिरोधक वापरणे गरजेचे असते कारण अगोदर तयार होऊन वीर्य नलीकेत शिल्लक राहिलेले शुक्राणू गर्भधारणा करू शकतात. आपले जाट भाई सैनिक अशी कोणतीही काळजी घेत नसत आणि बायका गरोदर झाल्या तर त्यांना मारहाण करून 'साफ सफाई" करण्यासाठी येत असत.पण हा सुशिक्षित अधिकारी होता आणि त्या अधिकार्याने अशी सर्व काळजी घेतली होती पण तरीही त्याची पत्नी गर्भार आहे हे पाहून तो तिला रुग्णालयात घेऊन आला होता. आता हा अहवाल पाहून मुखर्जी सर( विभागप्रमुख) पण जरा चक्रावलेच. त्यांनी त्या स्त्रीला भेट देण्याच्या अगोदर स्त्रीरोग विभागातील आम्हा सर्व डॉक्टरना आपल्या खोलीत बोलावले आणि सांगितले कि मी आता जे करणार आहे ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तुम्ही ते करावे कि नाही हे सुद्धा मी सांगू शकत नाही पण मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असे करीत आहे.त्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी मी कदाचित चुकीचे काम करणार आहे.पण मी हे पूर्ण सदभावमूलक मनोवृत्तीने (BONAFIDE INTENTION) करीत आहे तुमच्यावर असा प्रसंग आला तर तुम्ही तुम्हाला पटेल तसे करा. यानंतर आम्ही अधिकार्यांच्या कौटुंबिक वार्ड राउंड ला गेलो तेंव्हा त्या स्त्री च्या कक्षात जाऊन तिला असे सांगितले कि "बेटी तू जे काही करते आहेस ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तू ते करावेस कि नाही हे सांगण्याचा माझा अधिकार नाही पण वयाच्या अनुभवाने मला असे वाटते कि तू जे करीत आहेस ते बरोबर नाही. आता तुझ्या यजमानांचा अहवाल शुक्राणू नाहीत असे दाखवीत आहे त्यावर काय करायचे आहे. ती काहीच बोलली नाही.त्यांनी असे सुचवले कि आत्ता तर गर्भपात करणे आवश्यक आहे.तो आपण करू त्याबरोबर तुझे गर्भनलिका बंद करण्याची शस्त्रक्रिया पण करू आणि या स्थितीत तू म्हणत असशील तर मी तुझ्या यजमानांना काहीच सांगत नाही.तुझे कौटुंबिक जीवन सुरळीत होण्याचा मला हा एकच उपाय दिसतो आहे यावर तिने होकार दिला. यावर तिच्या नवऱ्याला असे कधी कधी होते त्याला सांगितले कि नसबंदी ची शस्त्रक्रिया कधीकधी फेल जाते(नीट होत नाही)आणि म्हणून एकाच बेशुद्धीकरणात आपण गर्भपात आणि नलीकाबंदी ची शस्त्रक्रिया करून टाकू. हे सांगून तिचा गर्भपात आणि गर्भनिरोधक शस्त्रक्रिया केली. आजही हि गोष्ट मला वारंवार आठवते कारण सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन करताना एखादा रुग्ण कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात (stage) असलेला आढळतो. कर्करोगाच्या विभागात काम करीत असताना घेतलेल्या अनुभवातून माहित असते कि या रुग्णाचा रोग शस्त्रक्रियेच्या पलीकडे गेला आहे आणि याचे काही दिवस किंवा महिने शिल्लक आहेत. अशा रुग्णाला अहवाल सांगण्याची पाळी येते तेंव्हा मी अनेकदा असे सांगितले आहे कि तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज नाही औषधाने उपाय होऊ शकतो.(हे करताना मी अनेकदा तोंड फिरवून डोळे पुसले आहेत) शब्द हे फसवे असतात, हे बोलणे खोटे आहे हे मला पूर्ण माहित असते पण दुसरे काय करता येईल हे मला अजून तरी समजलेले नाही. रुग्णाला सत्य सांगितले कि आपले शेवटचे काही दिवस बाकी आहेत तर त्याला धक्का बसतो त्याचे शेवटचे दिवस कष्टात जातात.(अज्ञानात आनंद असतो).कर्करोगाच्या विभागात असे शेवटच्या टप्प्यातील अनेक रुग्णांनी मला विचारलेले आहे कि साहेब आम्ही या रुग्णालयातून घरी जाऊ शकू का? मी उत्साहात त्यांना नक्कीच म्हणून उत्तर हि दिले आहे.त्यावर त्यांनी मोठ्या आनंदाने मला हात वर करून धन्यवाद दिले आहेत. पण पहिल्यांदा जेंव्हा हा प्रश्न आला तेंव्हा माझ्या मनात एकच विचार आला कि आपण रोज या रुग्णालयात यतो पण आपण येथून कधीच जिवंत बाहेर पडणार नाही हा विचार किती भयानक आहे माणूस म्हणून आपण किती तोकडे आहोत हि जाणीव वारंवार टोचत राहते. माझ्या भावाच्या कंपनीतील एका वरिष्ठ व्यवस्थापकाच्या वडिलांना कर्करोग झाला होता तेंव्हा त्याने मला सांगितले कि तू वडिलांना काहीही सांगू नको. मी त्याला म्हटले कि मी सांगत नाही पण त्यांना ते समजून चुकेल.कालपर्यंत ते काही बोलत असताना तुम्ही पूर्ण लक्ष देत होतात असे नाही पण आज नंतर तू किंवा तुझी बहिण त्यांनी पाणी मागितले तर धावून धावून कराल.हे न कळण्या इतके ते मूढ नाहीत. हि मानवी वृत्ती आहे एखाद्या गोष्टीची आपल्याला किमत कळते जेंव्हा ती आपल्याकडे नसते किंवा ती नाहीशी/ गहाळ झाली. सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात (सत्य बोला प्रिय बोला कटू सत्य बोलू नका )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 53014
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

डॉक्टरांनी रुग्णाचे 'वैद्यकिय हित' ह्या एकमेव गोष्टीला प्राधान्य देऊन काय तो व्यवहार करावा. मग त्यासाठी सगळे सत्य सांगणे आवश्यक असेल वा कधी संक्शिप्त सत्य सांगणे आवश्यक असू शकते. परंतू हा व्यवहार रुग्णाचा संसार वाचवणे, नितीमत्ता तपासणे, न्याय करणे वगैरे हेतुने केल्यास ते चुकीचे आहे. डॉक्टर कधी कधी स्वतःला न्यायाधिशही समजू लागतात आणि त्यातुन असे गोंधळ होतात. एखादी स्त्री गर्भार असेल तर तिला त्याची कल्पना देऊन योग्य ते उपचार/सुचना/खबरदारी देणे हे डॉक्टरचे कर्तव्य. ती कशी गर्भार झाली, नव्यर्‍यापासुन की बॉयफ्रेंड पासुन, लग्नाआधी की लग्नानंतर ह्याच्याशी त्याला काही मतलब असू नये. ह्याचे भान ठेवल्यास विवाहपूर्व संबंधांमधून गर्भार राहणे हा रोग आहे असे विनोदी निदान डॉक्टर करणार नाहीत. वरील लेखातील उदाहरणात, सदर महिलेचा नवराही ह्या डॉक्टरांचा रुग्ण होता आणि त्याला रिपोर्ट माहित असुनही सत्य परिस्थिती न सांगता त्याची निश्चितच फसवणुक केली गेली आहे. त्याची पत्नी त्याच्याशी एकनिष्ठ नसल्यास ते माहित करुन घेण्याचा त्याला हक्क नाही का?त्या महिलेची ही चूक (चूक आहे हे ही ह्यांनीच ठरवले) परस्पर माफ करुन त्याचा न्याय निवाडा करणारे हे डॉक्टर कोण? इथे ह्या निर्णयाचे स्वागत करणारे किती लोक त्या नवर्‍याच्या भुमिकेतुन विचार करुन ह्या निर्णयाला सहमती देतील? उद्या एखाद्या व्यक्तिच्या हाताचे ठसे एका चोरीच्या संदर्भात तपासण्यास पोलिस घेऊन आले तर ठसे तपासणार्‍या व्यक्तिने ते ठसे तपासुन काय तो निकाल देणे आवश्यक असते. उगाच ठसे तर जुळत आहेत पण त्याने ह्याच्यावर चोरीचा गुन्हा सिद्ध होऊन ह्याच्या कुटुंबाची वाट लागेल, त्याचा संसार वाचवण्यासाठी मला खोटे बोलणे भाग आहे म्हणून नाही जुळले ठसे असे सांगणे तुमच्या दृष्टीने योग्य आहे का?

In reply to by बंडा मामा

डॉक्टरांनी रुग्णाचे 'वैद्यकिय हित' ह्या एकमेव गोष्टीला प्राधान्य देऊन काय तो व्यवहार करावा.
बंडा मामा ,तुम्ही म्हणता तसे डॉक्टरांनी वागायचे असेल तर मग स्त्रीभृणहत्येसाठीसुद्धा डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. कारण मुलगी आहे म्हणून गर्भपात करण्यासाठी ते लोकच स्वतःहून डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर्स त्यांना असे करण्यासाठी निमंत्रण देत नाहीत. पण अशावेळी हेच अभिप्रेत असते कि डॉक्टरांनी त्यांना सामाजिक भान ठेवून व परिणामांची जाणीव करून देऊन ह्या कृत्यापासून परावॄत्त करावे व आपण ते कृत्य करू नये. तुमच्या वरील विचारांप्रमाणे अशी अपेक्षा डॉक्टरांकडून ठेवणे मग चूकच आहे.

In reply to by अधिराज

अहो अधिराज मी रुग्णाचे 'वैद्यकिय हित' म्हंटले आहे 'वैयक्तिक स्वार्थ' नव्हे. स्त्रीभ्रुण हत्या करण्यात रुग्णाचे वैद्यकिय हित कसे काय आहे ते सांगा वरे? तसेच इथे आई आणि मुल हे दोन्ही डॉक्टरांचे रुग्ण आहेत, त्यातील एकाची निव्वळ स्वार्थपोटी हत्या करणे हा तर गुन्हा आहे.

उद्या एखाद्या व्यक्तिच्या हाताचे ठसे एका चोरीच्या संदर्भात तपासण्यास पोलिस घेऊन आले तर ठसे तपासणार्‍या व्यक्तिने ते ठसे तपासुन काय तो निकाल देणे आवश्यक असते. उगाच ठसे तर जुळत आहेत पण त्याने ह्याच्यावर चोरीचा गुन्हा सिद्ध होऊन ह्याच्या कुटुंबाची वाट लागेल, त्याचा संसार वाचवण्यासाठी मला खोटे बोलणे भाग आहे म्हणून नाही जुळले ठसे असे सांगणे तुमच्या दृष्टीने योग्य आहे का? चुकीचे उदाहरण दिले राव तुम्ही, इथे तो थोडे दिवस जेर्ल मध्ये गेल्याने त्याचा संसार कसा काय उधळला जाइल

In reply to by श्री गावसेना प्रमुख

चुकीचे उदाहरण दिले राव तुम्ही, इथे तो थोडे दिवस जेर्ल मध्ये गेल्याने त्याचा संसार कसा काय उधळला जाइल
एकदा चोरीचा शिक्का लागला की कुठेही नोकरी मिळणे दुरापास्त होते. सामाजिक खच्चीकरण होते. त्यातुन त्याचा संसार उधळला जाणार नाहीतर काय आणखी बहरणार का? डॉक्टरांच्या उदाहरणातला संसारही १००% उधळलाच गेला असता ह्याची खात्री काय? कदाचित नवर्‍याने समजुतदारपणा दाखवुन एक चूक पोटात घातलीही असती. मुलांकडे पाहुन वा इतर कारणे बघुन अशा परिस्थितीतही लोकं बर्‍याचदा टोकाचे निर्णय घेत नाहीत.

In reply to by बंडा मामा

कदाचित नवर्‍याने समजुतदारपणा दाखवुन एक चूक पोटात घातलीही असती चुक नवरा ह्या कॅटेगरीतल्या लोकांची मानसीकताच अशी असते की मी बाहेर कुठेही तोंड मारीन पण बायको चरित्रवान हवी,हे माझ म्हणने समस्त पुरुष जातीला लागु पडत असाव.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

नवरा ह्या कॅटेगरीतल्या लोकांची मानसीकताच अशी असते की मी बाहेर कुठेही तोंड मारीन पण बायको चरित्रवान हवी,हे माझ म्हणने समस्त पुरुष जातीला लागु पडत असाव
हे तुमचे मत तुम्ही आवश्य बाळगू शकता जो पर्यंत तुम्ही त्यावर आधारीत उपचार लोकांना करत नाही. वरील उदाहरणातही त्या व्यक्तिचा संसार धोक्यात आहे असे माझे मत आहे त्यावर आधारीत मी निर्णय पोलिसांना कळवला तर तुम्हाला तो मान्य आहे का?

In reply to by बंडा मामा

वरील उदाहरणातही त्या व्यक्तिचा संसार धोक्यात आहे असे माझे मत आहे त्यावर आधारीत मी निर्णय पोलिसांना कळवला तर तुम्हाला तो मान्य आहे का? बिनधास्त कळवा

In reply to by यशोधरा

या क्षणी समाजरचना अशीच आहे! :( आणि कुणीही समाज सोडून कुठे जाउ शकत नाही. ....कदाचित माणसे हळूहळू चांगली होतील आणि नसते समज आणि अडाणीपणा सोडतील, अशी आशा आहे (नसते समज= माणसाचे चारित्र्य 'केवळ' त्याच्या सेक्स लाईफवरुन न पारखणं, अडाणीपणा सोडणे= गरोदरपण टाळण्यासाठीचे उपाय शास्त्रशुद्धरित्या माहित होणं आणि सेक्स म्हणजे नक्की काय ते कळणं)

In reply to by कवितानागेश

>>या क्षणी समाजरचना अशीच आहे >> मग ती तशीच ठेवायची आहे का? आणि समाजरचना आपोआप बदलते का माऊ? कधी बदलली आहे अशी? प्रत्येकाने स्वतःच बदलायला हवे तेह्वाच समाज बदलेल ना? किंवा हे सारे सोयीने ठरते? म्हणजे शिवाजी जन्माला तर यायला हवा आहे, पण तो दुसर्‍याच्या घरात. असे कसे? समाजरचना अशीच आहे, त्याला काय करणार वगैरे असे उद्गार म्हणजे पूर्वीपासून समाज सुधारावा, अधिक निकोप व्हावा म्हणून समाजधुरीणांनी केलेल प्रयत्न वायाच की!

In reply to by यशोधरा

समाजरचना अशीच आहे, त्याला काय करणार > असे मी अजिबात म्हणत नाहीये. पण ती सहजासहजी बदलणार नाही हे मला नक्की माहित आहे. पण आज जी काही परिस्थिती आहे, त्या द्रुष्टीनी काळजी घ्यावीच लागते. अवांतरः स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल आणि मवाळ गटांच्या चर्चेसारखे वाटतय आता मला! :P

In reply to by कवितानागेश

पण ती सहजासहजी बदलणार नाही हे मला नक्की माहित आहे. >>अगदी मान्य, पण मग आपण नुसती बघ्याची भूमिका घ्यायची का? पण आज जी काही परिस्थिती आहे, त्या द्रुष्टीनी काळजी घ्यावीच लागते. >> हेही मान्य, मी काळजी घेऊ नये असे म्हटलेय का? :) पण मग एखाद्याला जज करणे हे काळजीत मोडते? बहुतांशी आई वडिल नक्कीच आपल्या मुली आणि मुलांची काळजी घेतात आणि त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत ह्यासाठी धडपडतात, त्यातूनही कोणा मुला/मुलीच्या हातून काही समाजमान्य नसलेले घडले तर त्यांचे आयुष्य जे आधीच कठीण झालेले असते, ते अधिक कठीण करुन ठेवणे म्हणजे काळजी? >>स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल आणि मवाळ गटांच्या चर्चेसारखे वाटतय आता मला! >> तू जहाल ना? मला वाटलेलेच ते! :D :P

In reply to by यशोधरा

चर्चा वाचतोय. खरं तरं यशोधरा आणि खरे काकांचे मुद्दे प्रसंगानुरुप पटत आहेत.. म्हणजे एक डॉक्टर म्हणून पुढे आलेलं काम अलिप्तपणे उरकावं हे योग्य वाटतं, त्याचवेळी डॉक्टरने पेशंटला जीवशास्त्रीय औषधांबरोबर मान॑सिक आधार द्यावाच. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो इथे मांडलेला दिसत नाहीये - पेशंट ने सुद्धा डॉक्टरशी प्रामाणिक राहवं. म्हणजे समाज (नवरा) या भितीतून जर फॉर्मवर चुकीची माहिती मुद्दाम भरली जात असेल पण डॉक्टरशी खाजगीत बोलताना बरोब्बर उलट माहिती दिली गेली असेल तर ती डॉक्टरांची (परृयायाने) रुग्णाची फसवणूक नाही का? जर अमेरिकेसारखी प्रायव्हसी (हीप्पा) असेल ह्या माहिती संदर्भात तर ठीक पण भारताच्या संदर्भात विचार करता, सामाजिक, शासकीय पातळीवर जोपर्यंत अशी गोपनियता स्वीकारण्याची आपली तयारी नसेल तोपर्यंत डॉक्टरांचे वागणे चुकीचे वाटत नाही. त्यामुळे यशोधराताई, जर समाजसुधारणेला सुरुवात करायची असेल तर स्त्री-पुरुषांना कायदेशीर समज, गोपनीयतेच्या कायद्याची गरज आणि अंमलबजावणी अशा उपायांनी सुरुवात करावी लागेल (गर्भपात हा खूप्पच व्यापक विषय आहे, त्याविषयी इथे चर्चा नको..) दुसरा मुद्दा 'रोगी' ह्या शब्दाविषयी. उद्या मला बाईकवर अपघात झाला आणि रुग्णालयात ठेवले तर मला पेशंत, रुग्ण, रोगी म्हटले जाते की कसे? माझ्या मते तुमच्या शरीररचनेत तुमच्या मर्जीविरुद्ध बिघाड झाल तर रोग म्हणजे हा बिघाड, त्यासंदर्भात तुम्ही रोगी. तसंच डोक्यावरचे केस जाणे हा तुम्हाला ते त्रासदायक वाटत असेल तर (डॉ. बात्रांच्या संदर्भात विचार करता) तो रोग आणि तुम्ही रोगी अन्यथा तो काही रोग नव्हे. म्हणजे 'रोगी' ह्याची जनरलई(संदर्भहीन) व्याख्या करता येत नसावी, असं वाटतं. चर्चा वाचतोय.. शिकतोय त्यातून..!

In reply to by उपास

>>यशोधराताई, जर समाजसुधारणेला सुरुवात करायची असेल >> होयच की. :) मी नाकारलेले नाही. माझे म्हणणे इतकेच आहे की केवळ लग्नाआधी गरोदर राहिली, मग ती स्वेच्छेने वा कोण्या इतराच्या बळजबरीमुळे, म्हणून आकाश कोसळत नाही! वा लगेच त्या स्त्री, मुलीने फार मोठा गुन्हा केला आणि आता समाजाचे काय होणार वगैरे म्हणणे, म्हणजे खरेच भंपकपणा आहे. समाजाची शुचिता बाळगणे हे फक्त स्त्रीचे काम आहे काय? का ती सोपे टारगेट असते म्हणून तिच्या चिंधड्या करायच्या?

In reply to by यशोधरा

'आकाश कोसळत नाही' हे विधान (भारतीय समाजाचा विचार करता) टोकाचे वाटते. आजही बहुसंख्य मुलींना, आई बाबांना ते आकाश कोसळण्यासारखेच वाटते, मुलीच्या लग्नाचा प्रश्न येतोच. म्हणजे लग्नाआधी संबंध असणारी मुलगी स्वीकारण्याची मानसिक तयारी करण्यासाठी समाजातील पुरुषांचे (तसेच त्यांच्या आई-वडिलांचे) प्रबोधन सुरु होणे आवश्यक आहे. समाज संक्रमणातून जातो, जसं पुनर्विवाह/ विधुर तसेच विधवा विवाह बंद झाले तसे हे ही सुरु होईल. तर, पुन्हा मुद्द्याचा विचार करता (आत्ताच्या भारतीय समाजात) 'आकाश कोसळत नाही' असं मुलीला ठामपणे वाटत असेल तर तशी तिची मानसिकता असणे आवश्यक आहे. अशा खणकर मुलीच 'कुमारी माता' बनून आपल्या अपत्यास सामाजिक न्याय देऊन जबाबदारी पार पाडू शकता (अपवादाने का होईना अशी उदाहरणे आहेत..). तसच, अपघातून आणि कायदेशीर दृष्ट्या अमान्य (केवळ मजेखातर ठेवलेल्या बेजबाबदार) संबंधातून निपजणार्‍या गर्भप्राप्तीच्या प्रसंगाना गंभीरपणे न घेता, (ज्यात गर्भाचा जीवन/मरणाचा प्रश्न आहे), युगुलांचे करायचे काय? त्यांना कशी समज द्यायची? डॉक्टरांपेक्षा अजून कोण हे काम योग्यरीतिने आणि जबाबदारीने करु शकतो? इथे युगुलांचे स्वातंत्र्य आवळण्याचा प्रश्न नाही तर त्यांना जबाबदारीची जाणीव करुन देणे आवश्यक आहे (त्यांच्या तसेच समाजाच्या स्वास्थ्यासाठी) असं वाटतं.

In reply to by उपास

*समाज संक्रमणातून जातो, जसं पुनर्विवाह/ विधुर तसेच विधवा विवाह 'समाजमान्य झाले आहेत' तसे हे ही सुरु होईल.. असे वाचावे.

In reply to by उपास

उपास, मला वाटलेच की हे विधान शब्दशः घेतले जाईल, पण पुन्हा एक प्रतिसाद लिहायचा खरेच कंटाळा आला होता :) >>'आकाश कोसळत नाही' हे विधान (भारतीय समाजाचा विचार करता) टोकाचे वाटते. आजही बहुसंख्य मुलींना, आई बाबांना ते आकाश कोसळण्यासारखेच वाटते, मुलीच्या लग्नाचा प्रश्न येतोच. >> मान्य आहे. पण असा प्रश्न मुलीला गरोदर करणार्‍याबाबत पडत नाही. आणि मुलीच्याच बाबतीत असा प्रश्न येण्याचे कारण बहुतांश समाजाच्या मानसिकतेत अणि सोयीस्कर विचारसरणीत नाहीये का? आकाशा कोसळत नाही हे मी अशा अर्थाने म्हटले होते की हे इतके काही भयानक वा क्रौर्यपूर्ण वा हिडीस वा तत्सम कृत्य नव्हे ज्यामुळे समाजाला मोठ्या प्रमाणावर काही नुकसान संभवते, किंवा भयानक विनाश संभवतो पण मुलीला वागणूक मात्र अशी मिळते की तिने काय अनर्थ ओढवला आहे, आणि समाजमनाच्या धास्तीनेच हे घडते... जाऊदेत.. खरंच कंटाळा आला.. :) तुम्हांला माझा मुद्दा समजला असेल अशी आशा करते.

In reply to by यशोधरा

मुद्दा समजला, मी वादासाठी वाद घालतोय असं कृपया समजू नये :) कंटाळा आला असला तर उत्तर द्यायलाच पाहिजे नाही, कंटाळा गेल्यावर मूड असेल तेव्हा टंकलेत किंवा अनुल्लेख करुन उत्तर टाळलेत तरी काही हरकत नाही, गैरसमज नाही :) >>हे इतके काही भयानक वा क्रौर्यपूर्ण वा हिडीस वा तत्सम कृत्य नव्हे माझ्या मते आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे अनौरस मूल (आपल्या समाजात) वाढवायला सोप्प नाहीये. तुमची तेवढी आर्थिक, सामाजिक, मानसिक कुवत असेल तरच ते शक्य आहे. ह्याचा विचार न करता केवळ बेजबाबदारपणे वागणे हे होणार्या गर्भासाठी त्याच्या उर्वरीत आयुष्यासाठी (आपल्या समाजात) नुकसानकारक होण्याची शक्यता खूप्पच जास्त आहे. त्यासंदर्भात ते क्रूर आणि हिडीस आहे (मुल जन्माला घालून सोडून देणे). अर्थात ह्यात जबाबदारी नुसत्या मुलीची नसून दोघांची आहे पण जिथे ह्या मुलाचा बाप कोण हेच कळू शकणार नसेल तिथे कोणावर ठेवणार जबाबदारी? (वरती चर्चेत उदाहरण आले आहेच असे..)

In reply to by उपास

मुद्दा समजला, मी वादासाठी वाद घालतोय असं कृपया समजू नये >> अजिबात नाही :) कंटाळा आला असला तर उत्तर द्यायलाच पाहिजे नाही, कंटाळा गेल्यावर मूड असेल तेव्हा टंकलेत किंवा अनुल्लेख करुन उत्तर टाळलेत तरी काही हरकत नाही, गैरसमज नाही >> उत्तर टाळत नाहीये. सद्ध्या तरी अनिच्छा :) >>>>हे इतके काही भयानक वा क्रौर्यपूर्ण वा हिडीस वा तत्सम कृत्य नव्हे >> माझ्या मते आहे. >> अरे यार! तुमच्यापरेंत खरंच मला काय म्हणायचे आहे ते पोचत नाहीये. शेवटचा प्रयत्न करते. अनौरस अपत्य आणि त्या अपत्याची आई ह्यांच्यासाठी हे सगळं भयानकच असतं ह्याबाबत वाद नाही, पण हे भयानक आपोआप होतं का? समाजच?भयानक बनवतो ना हे? जर समाज इतक्या निर्दयतेने वागला नाही तर होईल का? >>जिथे ह्या मुलाचा बाप कोण हेच कळू शकणार नसेल तिथे कोणावर ठेवणार जबाबदारी? >> वैद्यकशास्त्र इतके प्रगत नक्कीच झाले आहे असे मला वाटते. डॉ नक्कीच सांगू शकतील. आणि जरी समजा त्यावेळी नसेल तरीही त्या उदाहरणातील मुलीबाबत काही ग्रह जोपासणे हे एका डॉ साठी चूकच.

In reply to by यशोधरा

वैद्यकशास्त्र इतके प्रगत नक्कीच झाले आहे असे मला वाटते. डॉ नक्कीच सांगू शकतील. वैद्यकशास्त्र प्रगत झाले असले तरी डीएनए चाचणी साठी जुळणारे सैंपल कसे मिळवणार? ते देण्यास कोणता पुरुष सहज तयार होईल?

In reply to by यशोधरा

वैद्यकशास्त्र इतके प्रगत नक्कीच झाले आहे असे मला वाटते. डॉ नक्कीच सांगू शकतील. वैद्यकशास्त्र प्रगत झाले असले तरी डीएनए चाचणी साठी जुळणारे सैंपल कसे मिळवणार? ते देण्यास कोणता पुरुष सहज तयार होईल? रोगी / रुग्ण ह्या शब्दाला एकापेक्षा जास्त अर्थ छटा असल्या तरी मला वाटते की जो डॉक्टर कड़े उपचारासाठी येतो तो डॉक्टर च्या दृष्टिने रुग्ण किंवा रोगी (पेशंट ) या अर्थाने डॉक्टर खरे यांनी तो शब्द वापरला आहे आणि हे त्यांनी ही नमूद केले आहे। म्हणजे दुकानात खरेदीसाठी कोणीही आले तरी ते गिर्हाइक असते तसेच

In reply to by यशोधरा

....कदाचित माणसे हळूहळू चांगली होतील आणि नसते समज आणि अडाणीपणा सोडतील, अशी आशा आहे
विशेषतः डॉक्टर लोकांकडून ज्यांच्या हातात आपले आरोग्य असल्याने त्यांना एक प्रतिष्ठा प्राप्त आहे.

श्री. सुबोध खरे, आपल्या लेखावरती इतकं स्ट्राँगली मत व्यक्त केल्याबद्दल दिलगीर आहे. आपली भावना समजू शकते. आपण व्यावसायीक आहात, व्यावहारीक ज्ञान आपल्याला जास्त आहेच. त्यातून आपण निर्णय घेत असाल. मी चटकन भावविवश होऊन प्रतिक्रिया दिली त्याबद्दल पुन्हा दिलगीर आहे.

In reply to by शुचि

प्रतिसादातला सच्चेपणा मनास भावला. निर्मळ मनाने व्यक्त होणार्‍या दुर्मिळ जमातीतल्या दिसता मामी आपण.

In reply to by शुचि

शुचिजी ह्यात दिलगिरी व्यक्त करण्यासारखे काही नाही. आपण व्यक्त केलेली मते ही लेखावर आहेत त्यांच्यावर नाहीत. एखाद्याच्या ज्ञानाचा वयाचा पूर्ण आदर राखून आपण स्ट्राँग मतभिन्नता व्यक्त करु शकतोच.

In reply to by बंडा मामा

"डिसगस्टींग" हा फार स्ट्राँग व निषेधार्ह शब्द झाला. तो वापरता कामा नये. अवांतर - मी कशबद्दल तरी असेच पुटपुटले - आय हेट इट. माझी ५ वर्षाची मुलगी म्हणाली "ममा अवर टीचर सेझ हेट इस अ बॅड वर्ड."

In reply to by बंडा मामा

एखाद्याच्या ज्ञानाचा वयाचा पूर्ण आदर राखून आपण स्ट्राँग मतभिन्नता व्यक्त करु शकतोच. Thumbs Up Hand Gesture कदाचित त्याचा अर्थ वैयक्तिक हल्ला असा काहीजण सोयीस्कररीत्या करून घेतात असा मला अनुभव आला आहे , एखादी विचारसरणी बाबत तुमची मत जेवढी प्रतिकूल आहेत , तेवढेच तुमच्याकडून त्यासंबंधी कडक विधान केले जाते , ह्यात शुची ताई गैर काही नाही आहे , तरी माझ्याकडून कोणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या दुखावले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो , माऊ ह्यांनी जहाल व मवाळ असे सूचक शब्द वापरले , मला महिलांना ह्या समाजाची रचनाच अशी आहे , तेव्हा तुम्ही असेच वागले पाहिजे ,तेच तुमच्या हिताचे आहे अश्या संबंधी विधान करणार्‍यांचा अजिबात राग येतो , निदान मिसळपाव तरी अजून महिलांवर आचारसंहिता लागू नाही ह्याबद्दल खरे तर आपण आनंदच साजरा केला पाहिजे Woohoo Dancing Banana

In reply to by शुचि

शुचि ताई आपण माझ्याकडे दिलगिरी व्यक्त करण्याची गरज नाही. आपली भाषा असभ्य आहे असे मला वाटत नाही उलट आपला सभ्यपणा हाच कि आपण चूक न करता दिलगिरी व्यक्त करत आहात. धन्यवाद

आपण सर्व जणांनी आपली मते व्यक्त केलीत त्याबद्दल धन्यवाद.काही गोष्टी मी आपल्या पुढे मांडू इच्छितो. एक म्हणजे मी धरून कोणताही डॉक्टर( काही असामान्य अपवाद वगळता) आपल्या रुग्णाशी सभ्यपणे वागत असतात. रुग्ण कित्येक अनैतिक गोष्टी करीत असले तरी. वैद्यकीय शिक्षणाचा हा एक भाग आहे कि रुग्णाशी कसे वागावे. मृत्युच्या समीप असलेल्या( Terminally ill) रुग्णाशी कसे वागावे याबद्दल एक पूर्ण विभाग वैद्यकाच्या पुस्तकात ठेवलेला आहे. फोरेन्सिक मेडिसिन(न्यायवैद्यक शास्त्र हा एक पूर्ण विषय ४०० गुणांसाठी आहे त्यात कायदे आणि वैद्यक याचा बराच उहापोह केलेला आहे. (वैद्यकीय शिक्षणात ५०% गुण उत्तीर्ण होण्यास लागतात). अर्थात शिक्षण आणि वागणूक यांचे समप्रमाण आहे असा माझा दावा नाही पण तसे असावे हि अपेक्षा असते. सार्वजनिक सेवेमध्ये असणार्याने( त्यात मी पण येतो) एक गोष्ट गृहीत धरावी लागते कि तुम्ही जीव तोडून काम करा लोक तुम्हाला दुषणे देणारच. उदाहरणर्थ- आपण रेल्वे आरक्षणाच्या रांगेत उभे असता. आपला क्रमांक पहिला लागला तर आपण आरक्षण करून घरी जाता दोन तास रांगेत उभे राहिल्यावर जर तेथला कारकून चहा पिण्यासाठी गेला तर आपण ताबडतोब त्याला दुषणे द्यायला सुरुवात करतो(तो सुद्धा गेले २ तास तेच रटाळ काम करीत असतो.)पण त्याने चांगले काम केल्यावर आपण कधी त्याला धन्यवाद दिल्याचे आठवत आहे काय? (मुन्नाभाई चित्रपट पाहून तसे करावे यावर एकमत होऊनही) वैद्यकीय व्यवसाय तसाच आहे.एशियन हरत इन्सटीटयूट मधील एका हृदयरोग तज्ञाने एका रुग्णावर शर्थीचे उपचार करूनही तो दगावला त्यावर रुग्णाच्या नातेवाईकाने त्यांना दैत्य कसाई असे शेलके शब्द वापरलेले मी पाहिले आहेत. अशा वेळी जनतेसाठी रुग्णाचे नातेवाईक हे बरोबर आणि डॉक्टर चूक असतो. मला सुद्धा कित्येक वेळा जेंव्हा कर्करोगाचे निदान केल्याबद्दल मूर्ख बेअक्कल अशी विशेषणे लावली गेली आहेत.या डॉक्टरला काहीही कळत नाही, जरा नीट पहा, असे सल्ले हि मिळतात. त्यावेळी रुग्णाचे नातेवाईक धक्क्यात असतात त्यामुळे डॉक्टरने त्यांना सांभाळून घेतले पाहिजे हि अपेक्षा असते. यामुळे लोकानी मला असेच काही शब्द ( विश्वासघातकी, अनैतिक ई.) वापरले त्याचाहि राग नाही. मला एकच आश्चर्य वाटते ते हे कि जेंव्हा आपण लिहितो तेंव्हा ते प्रकाशित करण्यापूर्वी विचार हि करता येतो तसेच त्याचे पूर्व परीक्षण करता येते हे असूनसुद्ध लोक त्याचा वापर करीत नाहीत. माझी आयडी डूप्लीकेट नाही तर खरी आहे . यासाठी मुंबईतील एशियन हार्ट , हिरानंदानी रुग्णालय, हिंदुजा रुग्णालय यांच्या प्रमुखांकडे किंवा क्षकिरण विभागांच्या प्रमुखांकडे आपण विचारणा करू शकता. कंपूशाही साठी मी आपणापुढे हे ठेवी इच्छितो कि २०१२ डिसेंबर पर्यंत मी मिपा च्या फक्त तात्या अभ्यंकर यांना तोंड देखले ओळखत होतो तेसुद्धा त्यांचे एक शेअर बाजारावरील भाषण ऐकण्यास गेलो असताना (२००८) ओळख झाली होती. त्युअवेलि त्यांनी मला मिपा वर येण्याचे आमंत्रण दिले होते. येथील दुसर्या कोणत्याही सदस्याला मी पाहिलेले नाही. त्यामुळे कंपूशाही शी माझा कोणताही संबंध नाही. येथे मी नक्की का आलो आणि आल्यावर मी येथे काय करीत आहे याचे मला नक्की उत्तर देता येणार नाही. कदाचित मातृभाषेवरील प्रेम हे कारण असेल. या विषय वर इतके काथ्याकूट झाले आहे कि प्रत्येक मित्राच्या टंकनाला उत्तर देण्या इतका धीर आणि हिम्मत माझ्यात नाही. बर्याच लोकांचे माझ्याबद्दल बरेच गैरसमज आहेत, काही लोकांचा वैयक्तिक आकस सुद्धा जाणवतो. ते दूर करावे असेही मला आता वाटत नाही यास्तव मी त्यांच्या आक्षेपास उत्तर देत नाही धन्यवाद.

In reply to by सुबोध खरे

लोकांचे माझ्याबद्दल बरेच गैरसमज आहेत, काही लोकांचा वैयक्तिक आकस सुद्धा जाणवतो. ते दूर करावे असेही मला आता वाटत नाही यास्तव मी त्यांच्या आक्षेपास उत्तर देत नाही
हे उत्तम. पालथ्या घड्यावर पाणी घालण्यापेक्षा दुसरा एखादा छान अनुभव लिहावा असे वाटते. तुमचे प्रतिसाद आवडले आणि पटले.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब तुमच्याशी असहमत असणारे काही प्रतिसाद मी दिले आहेत, पण ते तुमच्या (फक्त काही) मतांना आहेत*. तुमच्याविषयी कसलाही आकस नाही हे नमूद करू इच्छितो. कृपया गैरसमज करुन घेऊ नये. तुमचा अनुभव आणि ते लिहिण्याची पद्धत फारंच आवते हे ही आवर्जुन सांगतो. *१. जसे की अजिबात दारू पियु नये ( शून्य एमएल दारु प्यावी असे तुमचे टोकाचे मत वाचले आहे) २. स्त्रीचे चारित्र्य विचारात घेऊन डॉक्टरांनी निर्णय घ्यावेत.

In reply to by बंडा मामा

एक खुलासा: * हे चिन्ह काढून प्रतिसादाच्या शेवटी दिलेली मते ही मला डॉक्टरांची न पटणारी मते आहेत. मांडणी थोडी गंडल्याने काहींना त्याच्या उलटे वाटू शकते म्हणून हा खुलासा.

In reply to by बंडा मामा

बैठे काम सतत करणार्‍यांना साधारणतः किती अल्कोहोल recommanded मात्रेत असते?या मन १ यांच्या प्रश्नाचे ते उत्तर आहे या प्रश्नाचे उत्तर ०(शून्य) मिली हेच आहे. दारू हि recommended नाही. आपल्याला हे मत टोकाचे वाटते. ठीक् आहे. स्त्रीचे चारित्र्य विचारात घेऊन डॉक्टरने आपले निर्णय घ्यावेत असे माझ्या कोणत्या विधानावरून आपल्याला वाटले म्हन्जेमाला आपला गैरसमज दूर करत येईल. असे कोणतेही विधान मी केल्याचे मला आठवत नाही. या विधानाचा अर्थ असा निघतो काय कि डॉक्टरने वेश्येला किंवा समलिंगी माणसाना उपचार करूच नयेतकिंवा वेगळे वागवावे

In reply to by सुबोध खरे

त्यांनी recommended हा शब्द वापरला असला तरी, बैठे काम करणार्‍याने किती दारू पिणे योग्य (सेफ) आहे असे मन१ ह्यांना विचारायचे होते असे वाटते. त्यामुळे तुमचे उत्तर मला टोकाचे वाटले. मन१ ह्यांना खरंच किती दारू पिणे 'आवश्यक' (required) आहे ह्या अर्थाने विचारले असेल तर मी माझा आक्षेप मागे घेतो. एखादी महिला गरोदर असल्यास ती लग्ना आधी गरोदर झाली की लग्नानंतर हे विचारात घेऊन बाळंतपणा हा रोग आहे की नाही हे ठरवणे मला चारीत्र्य विचारात घेऊन घेतलेला निर्णय वाटते.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरने वेश्येला किंवा समलिंगी माणसाना उपचार करूच नयेतकिंवा वेगळे वागवावे
अवांतर: ह्यातुन तुम्हाला समलिंगी लोक हे वेश्येसारखेच चारीत्र्यहीन असतात असे वाटते असे दिसते. पण तसे नसावे.

बर सर्वानुमते काय ठरलं मग आता?

नेहमीप्रमाणेच वेगळा अनुभव...खरे सर, तुमचे विचार पटले.

मला एकच वाटत कि नैसर्गिक रित्या येणाऱ्या आजारात जसे कॅन्सर किव्हा अनुवौशिक रोगांमध्ये रुग्णापासून काही माहिती लपवणे किव्हा नातेवाईकांना थोडी ज्यास्त माहिती सगुण काळजी घेण्यास सांगणे ह्याला हरकत नसावी,पण आपण होवून ओढवून घेतलेल्या आजारात ( अनैतिक संबंध, एड्स, ड्रग्स किव्हा तत्सम ) रुग्णाला मुदाम सगळे खरे सांगावे कि त्याची चूक काय आहे किव्हा काय चूक केली आहे आणि काय होणार आहे ..... डॉक्टर साहेब तुम्ही लिहित राहा, तुमचे विचार / अनुभव किव्हा त्यवाराची चर्चा साधक/बाधक कशीही असो पण त्याने आमच्या ज्ञानात भरच पडत राहील ... आणि एक पुढे पुढे चालावे, ज्याला समजावून पटत नाही त्यासी फाट्यावर मारावे !!.........

काल सकाळी माझ्याकडे एक तरुण जोडपे आले होते. त्यातील बाईना ओटीपोटात दुखत होते. त्यांचा सहा महिन्यापूर्वी गर्भपात झाला होता त्यावेळी मी त्यांची सोनोग्राफी केली होती त्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास होता.( मी सोनोग्राफी करताना रुग्णाची परवानगी असेल तर जवळच्या नातेवाईकाला तेथे उपस्थित राहण्याची परवानगी देतो) सोनोग्राफी करताना त्यांचे यजमान मला अतिशय काळजीने विचारत होते कि डॉक्टर तिचे पोट फुगले आहे काही गैस वगैरेचा प्रकार तर नाही. मी त्यांना सांगितले कि असे काही नाही. त्यांनी परत परत काळजीने विचारले कि मग पोट का फुगले आहे. मी शेवटी त्यांना पडद्यावर मोजून दाखवले कि त्यांच्या पोटावर दीड इंच चरबी चढली आहे.यावर त्या बाईना कानकोंडे झालेले दिसत होते (मधल्या सहा महिन्यात त्या बाईंचे वजन बर्यापैकी वाढले होते).(बाकी त्यांना अपचनच होते) आता मला परत हाच प्रश्न पडला कि हे सत्य नवर्याला सांगणे चूक कि बरोबर?

डॉक्टरसाहेब, खूप दिवसांनी आपला लेख वाचायचा योग आला व लेख वाचून बरे वाटले. दोनेकशे प्रतिसादही आलेले दिसत आहेत म्हणजे या संथळावरही आपले छान स्वागत झालेले दिसते. सुरेख,,,,,! न्या.मू. काटजूंच्या संजय दत्तवरील ब्लॉगवर भाष्य करताना (http://justicekatju.blogspot.com/2013/03/i-have-read-views-of-those-cri…) मी हा पूर्ण श्लोक शोधला होता तो असा: सत्यम्ब्रूयात्प्रियम्ब्रूयान्न ब्रूयात्सत्यमप्रियम . अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ:.. सत्य वदावे, प्रिय वदावे, सत्य पण अप्रिय कधी बोलू नये (कारण) अप्रिय ऐकवणारे व ऐकणारे दुर्लभच असतात. तेंव्हां तुमच्या ज्येष्ठ डॉक्टरने योग्यच केले असे म्हणावे लागेल.

In reply to by सुधीर काळे

माझे तसे बरेच लेख( डझनभर तरी) मिसळपाव वर प्रसिद्ध झाले आहेत आणि काही लेख लोकांना आवडले. काही नाही आवडले. मुळात मी एक सिद्धहस्त लेखक नाही मी जे लिहितो ते बहुतांश माझे वैयक्तिक अनुभवच आहेत आणि त्यात नवनिर्मिती काही नाही या माझ्या कमतरतेची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्या लिखाणावर येणाऱ्या प्रतिकूल प्रतिसादाचे मी नक्कीच स्वागत करतो कारण कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू त्यातून कळते. एक कायद्याचे तत्व आहे कि DONT SIT ON JUDGEMENT OF DISPUTED FACTS. पण काही प्रतिसाद हे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या स्वरूपाचे असतात ते पाहून मात्र करमणूक होते. लोकांनी टीका केली तरी त्याचा मला राग नाही. वैयक्तिक/ खालच्या पातळीवर उतरू नये एवढेच माझे नम्र पणे सांगणे असते.