Skip to main content

दारू - म्हणजे काय रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 05/03/2013 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
   दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते. ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय? चला तर आज तेच बघूयात... कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल  :) ) दारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार. दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती ह्यावरून, दोन प्रकार पडतात. लिकर आणि लिक्युअर. लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली. लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी घेण्याचा पेय प्रकार तर लिक्युअर म्हणजे जेवेणानंतर घेण्याचा प्रकार. लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार. (इथे कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्च्याने इथे दुर्लक्ष करावे). लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे त्यावरून. व्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते. जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते. मेक्सिकन टकिला अगावे ह्या कंदापासून बनते. व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते. जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते. लिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात. तसेच काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात. त्या चवीला त्यामुळे गोड असतात. भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोल मध्ये वेगेवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते. ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे असला शास्त्रोक्तपणा नसतो. इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो. प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारवांचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते. बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो. त्यामुळे जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते. मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये ब्लेंड करून त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते. ह्याउलट हातभट्टीची दारू असते. मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय. अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो. ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे एवढाच असतो त्यामुळे कच्चा माल दर्जाहीन असला तरीही काहीही फरक पडत नाही; कारण इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते. डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त’ असलेला हा माल फार खपतो. ह्या प्रकारच्या दारूमुळेच, दारू वाईट असा सरसकट समज झाला आहे. ह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे देशी दारू किंवा सरकार मान्य दारू. हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्‍या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार बनणारी ही देशी दारू, सरकारमान्य, हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असतो. आता दारू म्हणजे काय ते कळले पण दारू प्यायल्यावर नेमके होते काय? खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने. जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते आणि त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते. हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो. एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते. ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोल च्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्‍या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात आणि शरीराच्या हालचाली मंदावतात. त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते. अर्थात हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. अती तिथे माती ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली तर सहजावस्था ही सहजावस्था न राहता पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते. ही दारू पचविण्याची शक्ती माणसामाणसावर अवलंबून असते. ३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो. शरीरात पसरत जाणारे हे अल्कोहोल हे शरीरासाठी एक अ‍ॅन्टीबॉडीच असते त्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात. आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग? तर त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते. त्यामुळेच पोलीस Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये श्वास सोडायला सांगतात आणि त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते. तर दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला तर माणसाची अवस्था बिकट होते. आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल? तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते? तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही? तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्‍याचा ‘वकार युनुस’ होतो. त्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते, नापेक्षा दारू म्हणजे वाईट असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते. तर आता दारू म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 81450
प्रतिक्रिया 250

प्रतिक्रिया

In reply to by सोत्रि

काहीही काय ?? मी आधी व्यक्तिगत हल्ले करतो आणि समोरचा नामोहरम झाला की मग वैचारिक मुद्दे काढतो. बाकी, इथे मी व्यक्तिगत हल्ला नेमका कुणावर केला असे तुमचे म्हणणे आहे ?? तुमच्यावर कि ३_१३ वर ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे, ३_१३ असा कोणताही आयडी मिपावर नाहीये ! बाकी रात्रभर पिऊन दोघा तिघांनी परिक्षा छान प्रकारे दिल्या व उत्तम पास देखील झाले असा आमच्या मित्रांनी आम्हाला सांगितलेलं आठवतं. असो. जाताजाता तू आता अभ्यास वाढवच विमे, कमी पडतो आहे असं सांगावंसं वाटतंय. इतक्या अभ्या सूप्रति सादांचा प्रति वा दकरायचा असला तरते करणं अत्यंत आवश्य आहे,,,,,,,,, - अत्यंत सीरियस प्यारे. (सध्या मु पो अल्जिरिया हे तुला माहिती आहेच.)

In reply to by सोत्रि

हे मात्र शंभर नंबरी! पण जर तोच मार्ग व्यापक करून दाखविण्याचा प्रयत्न असेल तर? असे काय करता सोत्री साहेब आम्ही येथे दारू पीत नाही ,त्यामुळे दारू म्हणजे व्यसन एवढेच आम्हाला खरडता येते. दारू पियुन उध्वस्त झालेली कुटुंबे आम्हाला दिसतात मात्र दारू पियुन सुद्धा आपले आयुष्य व्यवस्थित दिसणारी कुटुंबे आम्हाला दिसत नाहीत , किंबहुना ती दिसली तरी त्यांचा येथे आम्ही उल्लेख करत नाहीत , आम्ही आमच्या सोयी नुसार खरडतो हे तुमच्या ध्यानी आले नाही का अजून आम्ही दारू पीत नाही ह्या मागे आमचे काहीतरी लॉजिक आहे , ते तुमच्या धाग्यावर अवांतर करून आमची बाजू मांडण्याचा आम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहोत ह्याची तुम्हाला जाणीव होत नाही का दारू मुळे मला अपयश मिळाले असे सांगणारी व्यक्ती बहुदा आम्हाला नेहमीच भेटते. अश्या थाटात आमचे लिखाण चालू आहे. किंबहुना आमचा आमच्या मनावर ताबा नाही आहे , दारूचे चे लेख पाहून त्यांचे उदात्तीकरण झाले अशी आवई उठवतो , त्याने आमच्या मनावर परिणाम होईल किंवा इतरांच्या मनावर होईल अशी भीती व्यक्त करतो , मात्र बॉलीवूड चे सिनेमे अनेक गोष्टींचे उदात्तीकरण करतात म्हणून ते पाहणे आम्ही सोयीस्कर टाळतो , कारण काय वाचून व पाहून आपण कसे वागावे ,आपल्या प्रवृत्तीला काय झेपेल व आवडलेलं ह्यांचा सारासार विचार करून निर्णय घेण्याची आमची शमता दारू न पिताच बोथट झाली आहे मिपा वरील अवांतर करण्याचे नियम आमच्या सारख्या समाज प्रबोधन करण्याच्या उद्दात हेतूला लागू होत नाहीत , किंबहुना जो येथे अवांतर करतो त्याचे प्रतिसाद आवडले असे म्हणून आम्ही अवांतर होण्यास हातभार लावतो , लोकशाहीत मतांच्या संख्येला महत्व आहे , सध्या ह्या धाग्यावर दारू पिणारे मिपाकर कमी व आमच्या सारखे न पिणारे जास्त आहेत तेव्हा आमचे म्हणणे खरे आहे आणि हेच खरे सत्य आहे. तुम्ही कधी लहानपणी जास्तीची मेजोर्टी हा खेळ खेळला नाही आहे आहे का दारू न पिणारा एक मिपाकर

In reply to by निनाद मुक्काम …

छान विनोदी लिखाण :) पण एकच सांगा कोणत्या लॉजिक्ने तुम्हाला वाटलं की मी किंवा इथे दारु वाईट आहे असं म्हणाणारे स्वतः दारु पितच नसतील. गंमत आहे बुवा..!! वैयक्तिक आयुष्याचा काय संबंध ह्याच्याशी. दारुमुळे प्रचंद सामाजिक (तसेच कौटुंबिक) नुकसान होतेय हेच मान्य नसेल तर यापुढे कुठलाही वाद हा वितंड वादच असणार, त्यामुळे चालूंद्या.. करमणूक होते आहेच :)

In reply to by उपास

करमणूक होते आहेच
हांग आश्शी, मूळ धाग्याचाही नेमका तोच उद्देश होता. समाज प्रबोधन अजिबात नव्हता जो अवांतरारून झाला. :) - (विनोदी मद्यपी) सोकाजी

In reply to by उपास

गमंत खरेच आहे बुआ Bouncing माझ्या लिखाणातून असे तुम्हाला का वाटले मला असे वाटत आहे , @पण एकच सांगा कोणत्या लॉजिक्ने तुम्हाला वाटलं की मी किंवा इथे दारु वाईट आहे असं म्हणाणारे स्वतः दारु पितच नसतील. गंमत आहे बुवा.. मी येथे सरळ साधा उल्लेख केला आहे दारू न पिणारा मिपाकर आता तुम्ही ह्या धाग्याचा व प्रतिसादांचे नीट वाचन केले तर अनेकांनी येथे ते दारू पीत नाहीत असा सरळ उल्लेख केला आहे ,माझा रोख त्यांच्यावर आहे , आणि उपास राव येथे एवढे पोटतिडकीने लिहित आहात पण तुम्ही मात्र स्वतः दारू पितात का नाही हे अजून सांगितले नाही ,नाही म्हणजे दारू विषयी मत व्यक्त करता आहत तुमच्या आयुष्यात दारूचे स्थान काय हे गुलदस्त्यात ठेवण्याचे कारण काय येथे बहुतेक सर्वांनी प्रतिसाद लिहिले आहेत ते नीट वाचा ,सर्वांनी ते दारू पितात किंवा पीत नाही ह्याचा उल्लेख करून मग दारूवर मत मांडले आहे , आणि दारू पिणारे दारू वाईट आहे , असे म्हणत असतील म्हणजे जर असे कुणी म्हणत असेल मला एक गमतीदार कल्पना मनात आली सलमान खान ने फेस बुक वर स्टेटस टाकले विवाहाच्या आधी शरीर संबंध वाईट आहे . मी माझ्या भूमिकेतून करणार नाही आणि त्यांच्या ह्या स्टेटस ला लाईक करणारे सोमी , संगीता , ऐश्वर्या , कतरिना असतील. दारू पिणारे अनेक मिपाकरांनी संतुलित प्रमाणात दारू प्यायली तरी आयुष्य सुरळीत जगता येते असा स्वानुभवाने आपले मत मांडले तर इतरांना का खुपते , येथे येणारा मिपाकर सुज्ञ आहे , उदा अभिषेक ने सांगितले आहे कॉलेज जीवनात त्याने दारू चाखली आहे , व आता तो पीत नाही , तस्मात आपण काय करावे ,काय करू नये ह्याचे आत्मभान ज्याला नसते , ते उदात्तीकरण , उदात्तीकरण अशी आवई उठवतात. मुन्नी आणि शिलामुळे मिपाकर बदनाम झाला नाही किंवा त्यांची जवानी उतू गेली नाही , किंवा रंग दे बसंती पाहून कुठल्या मिपाकाराने भष्टाचार निर्मूलनाचा त्यात दाखवला तो मार्ग सुद्धा स्वीकारला आहे असे पाहण्यात नाही , तस्मात मिपाकर समूहाला काही पाहून ,काही वाचून आपण शेवटी काय करायचे हे नक्कीच कळते असे मला वाटते. आता प्रश्न आला

In reply to by सोत्रि

>>असो, जर कोणाला ह्या लेखात किंवा एकंदरीतच माझ्या दारूविषयक लेखांमध्ये दारूचे उदात्तीकरण दिसत असेल तर ज्याची त्याची जाण आणि ज्याची त्याची समज! -- या वाक्यात " दारूचे उदात्तीकरण दिसत असेल तर" पर्यंत वाचले आणि काळजात धस्स झाले... आता सोत्री यापुढे वारुणीवर लेख लिहायचे टाळण्याची प्रतिज्ञा करतो कि काय अशी भिती वाटली. पण "ज्याची त्याची जाण" वाचुन मरणछ्या गर्मीत होरपळुन निघाल्यावर चीईईईल्ड हेवर्ड ५००० चा घोट घ्यावा तसं गार वाटलं :) जीव भांड्यात पडला :) अर्धवटराव

>>जर दारूमुळे वैफल्य येत असेल तर जे लोकं तीला कवटाळून बसतात ते मूर्खच आहेत की नाही? अगदी त्रिवार सत्य! ते मूर्खच आहेत त्यामुळे त्यांना कळत नाही की अशा (वैफल्यग्रस्त) परिस्थितीत दारू ही सुटका नाही पाश आहे आणि म्हणून स्वतः तर गुंतत जातातच आणि कुटुंबाची वाट लावतात.

काही लोक दारुच उगाच उदात्तीकरण करताहेत्,खर तर ते हुच्चभ्रु लोकांनाच समोर ठेउन लिखाण करीत असावेत(मुंबैत दारु पिउन फुटपाथवर गाडी चढवुन झोपलेल्यांना मारणारे हे ही हुच्चभ्रुच होते असे ऐकण्यात आहे),पण दारुची नशा करी जीवनाची दुर्दशा ही स्लोगन त्यांना माहीत नसावी,कारण जसे बंगल्याच्या सभोवताली हिरवळ असली तर बाहेर दुष्काळ असला तरी दिसत नाही,तसे गावठीने मेलेले त्यांना दिसत नसावेत स्वता हुच्चभ्रु समजणारे किंवा असणारे हे हुच्च दर्जाची?(दारु ही हुच्च असली काय गावठी असली काय व्हायचा परीणाम तो होतोच)पितात ती त्यांना चढत नसावी ,पण ह्या सांगोसांगी मुळे जे दारु च उदात्तीकरण?होतय ते गावठीचही होउ शकत हे त्यांनी ध्यानात घ्याव ही एक अपेक्षा. मांडवाच्या ग्रामस्थांबद्दल सहानभुती ठेउन असलेला.

२००!

सोत्रि, दारु म्हणजे काय रे भाऊ??????????????? - चर्चेचे गुर्‍हाळ बघून स मू ळ भरकटलेला....प्यारे

In reply to by इरसाल

बरोबर आहे...कश्याला उगाच चर्चा दोन्ही बाजूंनी ताणुन धरली आहे तेच कळत नाही. अरे, ज्याला आवडते तो पितो (ते देखील स्वखर्चाने) आणि ज्याला नाही तो नाही. मग कश्याला हे चर्चेचे गुर्‍हाळ सुरु आहे तेच कळत नाही.

ह्याच लायनीवरची जुनी चर्चा मिपावर पहायला मिळेल.((http://www.misalpav.com/node/23075) तिथे दुसर्‍या पानावर गविंचा भन्नाट प्रतिसाद आवडला. आँ? गवि - Fri, 09/11/2012 - 17:51 आँ? चेटकीण, पाकिस्तान.. अयायाया... थांबा, धाग्याचं शीर्षक परत बघून येतो.. माझं मत आता सपशेल बदललं आहे. दारु खरंच वाईट आहे.

In reply to by मन१

मणोबा तुझ्या सहीत एक तांत्रिक चूक आहे. जीजस ख्राईस्टने सुरू केलेल्या धर्माचे अनुयायी, थोडक्यात ख्राईस्टला मानणारे म्हणून ख्रिश्चन आहेत. खुद्द जीजस कसा क्रिश्चन होईल रे? :)

In reply to by बॅटमॅन

ब्याटॅ, अरे किती अवांतर करशील रे! इतकी मुद्देसूद चर्चा सुरु असताना असं करायचा धीरच कसा झाला बे तुला?????????????????? संपादक मंडळ इकडे लक्ष देईल का? -सध्या अल्जेरियात

In reply to by बॅटमॅन

ख्रिस्तानं घालून दिलेली तत्वे पाळणारे ते ख्रिश्चन.(शेजार्‍यावर प्रेम करा वगैरे वगैरे ष्टाइल उपदेश.) ती तत्वे ख्रिस्त पाळत असेल तर तोही ख्रिश्चनच. . टवाळकी मोड सुरु > मी खेडू कडूस मध्ये असताना एका ख्रिश्चनाशी बोललो होतो. तिथे त्याने मला ख्रिस्तदृष्टांविषयी सांगितले. मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे. माझ्या व्यवसायात , डेव्हलपमेंट, युनिट टेस्टिंग दरम्यान जाता येता बग्ज निघाल्यावर "जीझस" असे म्हणायची वेळ येते. त्यावरून मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे. तसेच मी एकदा कंपनीत काम करत असताना माझ्या शेजारुन एक ख्रिश्चन क्लायंट गेला होता. म्हणूनही मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे. मी अशा देशातून हे सांगत आहे जिथून शिकून जीझस पुन्हा बेथलहॅम- जेरुसलेमला गेला(lost years of jesus) म्हणूनही मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे. मी इथे असल्यामुळे आणि मलाच एकट्याला सगळ्यातले सगळे झुंजवता येत असल्याने माझी सही योग्यच आहे. म्हणूनही मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे. तुझे प्रतिसाद वैयक्तिक आहेत. तू विनोद करीत आहेस. टवाळकी मोड संपला >

In reply to by मन१

अजून एक कारण राहिलं ना भो. मी याआधी अब्राहमिक धर्मांवर लिहिलेलंआहे. म्हणूनही मी ह्याविषयावर बोलण्यात अधिक अधिकारी आहे.

In reply to by मन१

ख्रिस्तानं घालून दिलेली तत्वे पाळणारे ते ख्रिश्चन.(शेजार्‍यावर प्रेम करा वगैरे वगैरे ष्टाइल उपदेश.) ती तत्वे ख्रिस्त पाळत असेल तर तोही ख्रिश्चनच.
अमुक अमुक तत्वे पाळणारा तो क्रिश्चन ही व्याख्याच नंतर आली, सबब हे असले रिव्हर्स इंजिनिअरिंग कामाचे नै भौ :)

हे एवढे प्रतिसाद वाचुन आता मात्र खरंच आंतरजालीय बार मध्ये बसल्यासारखं वाटत आहे.चला बिल यायच्या आधी निघावं हे बरं, अजुन काय? चला प्यारेजी अल्जेरियावासी निघता ना, सोडतो तुम्हाला जाता जाता.

In reply to by ५० फक्त

हे बघा, जर्मनीवाले निघाल्याशिवाय आम्हाला हलता यायचं नाही. आम्ही त्यांची दीक्षा घेणार आहोत. तुमी व्हा फुडं. आमी आवरुन येतो. जाताना कुणी यशस्वी गटारात तर पडला नाही ना ऑर गटारात जाऊन यशस्वी झाला नाही ना हे पण पहायचंय ना! ;)

येथे जमले नाही म्हनुन काही लोक दुसर्या धाग्यावर जाउन नसत्या उचापत्या करीत असावेत अस माझ मत झालेल आहे.

हा धागा भलताच रंजक झाला आहे. सुबोध खर्‍यांचे प्रतिसाद बर्‍याच अंशी पटले. बरेच जण दारु केवळ धतिंग करण्यासाठी पितात. किंवा एक स्टाइल स्टेटमेंट म्हणुन. माझ्या ओळखीतील एका सद्गृहस्थांनी शाळेत जाणार्‍या आपल्या मुलीला वाईन प्यायला लावली आणि वर "प्यायची नाही म्हणजे काय? गावंढळ रहायचे आहे का तुला जन्मभर?" असे विचारले. थोडक्यात त्यांच्यासाठी दारु पिणे हे एक स्टाइल स्टेटमेंट किंवा एक सामाजिक गरज होती. ते उच्चभ्रू आणि सुशिक्षित असण्याचे लक्षण होते. दारु प्यायल्याने लोकांशी संवाद साधणे सोपे जाते हे मात्र खरे. दोन दारुडे इतर कुठलाही संबंध नसेल तरी दारु या एका विषयावर लगेच एकमेकांशी संवाद साहु शकतात. दारु पाजुन लोकांकडुन कामे करुन घेतली जाउ शकतात. घसट वाढवली जाऊ शकते. व्यावसायिक गरजांसाठी आणि कामाचा एक भाग म्हणुन मी दारु प्यायला सुरुवात करावी म्हणजे योग्य माण्सांशी ओळख आणि घसट वाढवणे सोप्पे जाते असे मला हापिसातुन बॉसकडुन बर्‍याच वेळा सांगण्यात आले आहे. मी तो सल्ला फाट्यावर मांडला. बाकी मी स्वतः दारु पीत नाही कारण ज्या पदार्थाने माझा माझ्या मेंदुवरचा किंवा जिभेवरचा ताबा सुटु शकतो अश्या कुठल्याही पदार्थाचे सेवन करणे मला रुचत नाही. यावर अर्रे एका पेगने काही चढत नाही असे ज्ञान मला एका मित्राने दिले होते. मग एवढी घाणेरड्या चवीची आणी वासाची दारु प्यायचीच कशाला याचे उत्तर मात्र तो देऊ शकला नव्हता.

In reply to by मृत्युन्जय

मग एवढी घाणेरड्या चवीची आणी वासाची दारु
हे पटले नाही, अर्धवट आणि ऐकिव माहितीवर केलेले विधान. - (साकिया) सोकाजी

मद्याचार्य सोकाजीराव त्रिलोकेकर यांचा जोरदार धागा ! धाग्याबरोबरच सोत्री आणि सुबोध खरेंचे प्रतीसाद वाचनीय…अनेक ठिकाणी भरकटलेले आणि अवांतर प्रतिसाद…पण साठवून ठेवण्यासारखा धागा धन्यवाद सोत्री, एक या विषयाला वाहिलेला कट्टा होऊन जाऊदेत…काय बोलता ? - सोत्रीजी कडून मद्य-ज्ञान घेण्यास उत्सुक असलेला मालोजी

अश्या लोकांनी खरे तर सोत्री ह्यांचे धागे वाचले पाहिजे म्हणजे दारूच्या बाबतीत ते साक्षर होतील. भारतात दारू म्हणजे काय , ती कशी बनते , ती कशी प्यायची ह्या बाबत माहिती नसते , अनेकांची दारू पिण्याची सुरुवात लपून छपून होते ,ह्यामुळे पुरेश्या माहिती अभावी दारू पिणाऱ्या मंडळींच्या मध्ये दारू विषयी अनेक गैर समज असतात ते दूर व्हावेत असे वाटते. , भारतात आज भारतीयांना जर कोणत्या संस्थेविषयी आदर आहे तर तो भारतीय लष्कर होय , भारतीय लष्करात अनेक बडे अधिकारी ते सैनिक दारू पितात , आणि हे माहिती असूनही त्यांच्या विषयी भारतीय जनतेच्या मनातील आदर कमी होत नाही , लष्कर व दारू ह्या संबंधी काही वृत्त पत्रातील बातम्या वाचल्या . आमची मते जुळतात ,हे पाहून बरे वाटले.

भारतात दारू म्हणजे काय , ती कशी बनते , ती कशी प्यायची ह्या बाबत माहिती नसते , कशी प्यायची ह्याचे क्लासेस चालु करावेत असा विचार आहे, भारतातल्या लोकांना अक्कलच नाहीये पिण्याची.

कशी प्यायची ह्याचे क्लासेस चालु करावेत असा विचार आहे, गावसेना प्रमुख ह्या भारतीयांची अक्कल काढण्याची काय गरज आहे. दारू हा अभ्यासाचा विषय आहे ह्या संबंधी अनेकांना माहिती नसते , आपण प्रथम येथून रीतसर शिक्षण घ्या मग भारतात दारू जर प्यायची झाली तर रीतसर कोणती ,कशी प्यायची ह्याबाबत तुम्हाला लोकांना प्रशिक्षित करता येईल आता दारू म्हणजे गावठी एवढेच भावविश्व असणाऱ्या लोकांना ह्या शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे , Barman

In reply to by गवि

दारु लय वाईट! तुमी डावीकडनं सुरु करा. म्या उजवीकडनं कर्तु. संपवूनच टाकू च्यामारी. दारु लय वाईट! चकन्याला शाकारी काय मिळालं तर आन रे आन्ना ;) !

ते पण खर आहे म्हणा,दारु म्हणजे गावठीच एव्हढेच मज पामराला माहीत, आता मी एक करतो की आधी तुमच्या कडुन रितसर शि़क्षण घेतो,मग भारताच्या कानाकोपर्यात जाउन्,त्या येड्या भारतीयांना सांगतो की मुर्खांनो काही अक्कल आहे की नाही हे बघा निनाद राव बाहेर जाउन काय नाही ते शिकुन आले,आता राहा तुम्ही दारुमागास्,येड्पट कुठले जरा आंतरराष्ट्रीय दर्जाची प्या,मग कळेल जिवन म्हणजे काय ते.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

चालेल सोबतीला हिन्दु तितुका मेळवावा । आपुला हिन्दुधर्म वाढवावा ।। सर्वत्र विजयी करावा । सनातन हिन्दुधर्म ।। पहिल्या उदाहरणात तुम्हाला ह्या कार्यातून फुरसत मिळाली की सांगा मला हे कार्य करण्याचे प्रोजेक्ट मी परदेशातून तुम्हाला out सोर्स करतो