Skip to main content

आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 11/03/2009 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी भल्या पहाटे ( ८ वाजता ) आम्ही पुर्ण शुद्धीत येऊन आमचा लॅपटॉप उघडला आणि होळीच्या निमीत्ताने आंतरजालावर ठिकठिकाणी काय शिमगा चालला आहे ह्याचा ( किलकिलत्या नजरेने ) अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. पण काय हे ? सगळीकडे शांतच ? कसलाच स्पेश्शल इव्हेंट अथवा वाद्-विवाद नाही ? नेहमीच कसल्याही क्षुल्लक विषयांवर अगदी आरामात ३-४ पाने भरुन मेगाबाइटच्या मेगाबाईट वाद घालणार्‍या व ५०००-६००० हजारांच्या आसपास संख्या असणार्‍या संकेतस्थळांवर "शिमगा" साजरा होत नाही हे अतिशय गर्हणीय आहे. एवढ्या महत्वाच्या आंतरजालीय उत्सवाला असे वाळीत टाकण्याच्या हीन व हिडीस कॄत्याला पाहुन मला एक हलकट आंतरजालीय व्यक्तीमत्व ह्या नात्याने शरम वाटली व डोक्यात सणक गेली ( व आम्ही आंथरुण व पांघरुण गुंडाळुन वर बेडवर ठेवले.) अरे दिवाळीला मात्र ( काही लोक म्हणतात तसे चहा, शिग्रेटी व रोजी २० रुपये मात्र ह्या दरावर संपादक ठेऊन ) मोठ्या जोशात दिवाळी अंक काढता मग ह्या शिमग्याच्या निमीत्ताने साधा १ लेख का नसावा ह्या विचाराने आम्हाला गरगरुन आले ( ह्याला आमच्या मित्रांनी कालचा हँगओव्हर समजुन शिग्रेटचे पाकीट पुढे केले पण तो भाग वेगळा ;) ). चला तर मंडळी, आपण साजरा करु आंतरजालीय शिमगा ... शिमगा म्हणजे आपल्या मनातल्या अमंगल, अविचारी, हीन, हिडीस विचारांना शिव्या वाटे बाहेर काढुन व बोंब मारुन त्याच विचारांचे अग्नीच्या साक्षीने दहन करण्याचा उत्सव. तात्यांनी ( अनुष्काचा फोटो टाकुन ) अग्नी पेटवला आहेच फक्त आता आपण बोंबा मारायच्या बाकी आहेत ... कुणाच्या नावाने बोंबा मारणार ??? ढीगाने पर्याय आहेत, तसेही त्याला निमीत्त थोडेच लागते म्हणा ... मिपावर व इतर ठिकाणी आपला "कंपु: बनवुन आपलीच अनभिषीक्त सत्ता चालवणार्‍या "कंपुबाजांच्या" नावाने बोंब मारा, आपल्याला कंपुत सामील करुन न घेणार्‍यांच्या नावाने बोंब मारा, कंपुविना आपला चांगला लेख मागे पडत असुन त्याला प्रतिसाद मिळत नाहीत असे आरोप करणार्‍यांनी आता इथे उघड बोंब मारा. कंपुबाजांनी असले आरोप करणार्‍यांविषयी बोंबा मारा , एखादा माणुस आवडत नसुन तो उगाच कंपुत घुसायचा प्रयत्न करुन सारखे मध्येमध्ये करत असेल तर त्याच्या नावाने बोंब मारा ,कंपुवर जळणार्‍यांच्या नवाने बोंब मारा ... ज्यांचे प्रतिसाद जे जळजळीत व तीव्र असल्या कारणाने उडवले गेले/जात आहेत अशा लोकांनी ( अवलियाशेठ, कसे काय, बरे आहे ना ? ) संपादकांच्या अथवा सो कॉल्ड पाध्यांच्या नावाने बोंब मारा व असे प्रतिसाद लिहुन फुकटचा डोक्याला ताप आणुन त्रास देनार्‍यांचा नावाने संपादक हो तुम्हीही बोंब मारा ... महिला मंडळाने वारंवार त्यांच्या मागे लागणार्‍या आंतरजाल सख्याहारींच्या नावाने शिमगा करा व लगे हात चान्स मिळाला आहे तर धोपटुन घ्या. आपल्याला लोचट, लाळघोट्या खरडी/व्यनी पाठवणार्‍याच्या नावाने बोंब मारा. सख्याहारींनो, तुम्ही आपल्याला कायम दुर्लक्षीले जाते व हे स्त्री सदस्य फक्त ठरावीक सदस्यांशी मोकळेपणाने बोललात व आपल्याला फाट्यावर मारतात ह्या त्राग्याने त्या स्त्री सदस्यांच्या व त्यांच्या मित्रांच्या नावाने बोंब मारा ... सर्वसामान्य मिपाकरहो आपल्याला रोज त्रास देण्यासाठी फालतु कौले, लेख , चर्चा विषय व जाणकारांनी प्रकाश टाकावा अशी विनंती करणार्‍या महाभागांच्या नावाने बोंब मारा व जमले तर होळीतले पेटते लाकुड काढुन त्यांना २ तडाखे द्या. तर अशा उठवळ आणि टाईमपास लेखकोहो तुम्ही तुमच्या धाग्यावर तुम्हालाच ठोकणार्‍या सच्च्या मिपाकराच्या नावाने बोंब मारा ... जेन्युईन कवींनो तुम्ही तुमच्या कवितेची एका दिवसात ५-६ विडंबने पाडणार्‍या नवजात विडंबक टोळधाडीच्या नावाने बोंब मारा व विडंबकांनो तुम्ही तुम्हाला विरोध करणार्‍यांचा नावाने बोंब मारा ... इतर अजुन बरेच काही, आठवेल तसे टाकेन ... मी फक्त जागा पोळवली, आता होळी रचायची आणि ढणढणीत पेटवायची जबाबदारी मिपाकरांची ... होऊन जाऊ द्या ..!!!! * डिस्क्लेमर : १. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन हाताची खाज मिटवु नये. २. व्यक्तीगत आरोप करु"च" नयेत ... ३. सर्वांनीच हलकेच घेऊन फक्त आनंद लुटावा, न आवडल्यास तसे स्पष्त सांगावे, अशी जास्त मते आल्यास मी स्वतःच हे लिखाण इथुन उडवुन लावीन ... मारा मग बोंबा तिच्यायला ...!!! पहिली बोंब आम्ही आमच्याच नावाने मारतो आहोत. असले धागे काढुन पब्लिकचा वेळ व मिपाची बँडविड्थ फुक्कट घालवणार्‍या डॉन्याच्या बैलाला हो ऽऽऽ ...!!!

वाचने 28615
प्रतिक्रिया 67

प्रतिक्रिया

छोटा डॉनच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ तात्याच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ मिपाकरांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ आणि हो, नानाच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽ दणक्यात बोंबा मारा रे.... --अवलिया

In reply to by अवलिया

ह्या धाग्यात प्रतिसादांची संख्या "५० + " झाल्याने तो वाचण्यास त्रास होत आहे. सबब नवे लेखन ह्या धाग्यावर करु नये ही विनंती. जो असे करणार नाही त्याच्या बैलाला ऑलरेडी हो ऽऽऽऽ भाग -२ तुम्ही http://www.misalpav.com/node/6609 इथ पाहु शकता व त्यावर नव्या प्रतिक्रियाही देऊ शकता. ह्या ही धाग्याची तीच हालत झाल्यास "भाग-३" परस्पर चालु करावा, माझी वाट पाहु नये. आमची वाट पाहणार्‍याच्या बैलाला हो ऽऽऽ चालु द्यात, होली है ...!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आम्हाला कोणाच्या नावाने बोंब मारायची ह्याची अक्कल नसल्याच्या गोड गैरसमजातुन हा असला टुकार हिन आणी हिडिस आणी हिणकस सल्ला देणारा लेख लिहिणार्‍या छोट्या डॉनच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ अवांतर :- हे माझे विचार नसुन कोणीतरी मला हे लिहायला उद्युक्त केले आहे ! निरागस ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

:? ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

In reply to by परिकथेतील राजकुमार

आम्ही बोंब मारा म्हटल्यावर न मारणार्‍या आणि इथे येवुन पुन्हा बोंब मारणार्‍या कंपुबाजांच्या नावाने बोंबला रे बोंबला............................................... (हे वाक्य लिहिल्यावर होणार्‍या परीणामास तयार.) विन्या टारझन छानसे वाचलेले विनायक पाचलग

वारंवार आम्हाला "मन्याच्या कुपीत" ढकलुन , खरडवहीत त्याच्या लिंका डकवुन व आता "आम्ही बोंबलतो आहोत" असे आम्हाला आमच्या खरडवहीत येऊन सांगताना बेंबीच्या देढापासुन बोंब मारणार्‍या व हिंदी पिक्चरची किळस वाटणार्‍या मुलाखतफेम कोल्हापुरी दादा विनायक पाचलगच्या बैलाला हो ऽऽऽ

दीर्घ खरडी, दीर्घ प्रतिसाद,दीर्घ लेखन, दीर्घ विचार, दीर्घ लेखन करुन मिपाची जागा आटवणार्‍या छोट्या डॉन्याच्या बैलाला रे भो. संपादकाच्या नावाने बोंबा मारणार्‍या सदस्यांच्या बैलाला रे भो :)( च्यायला याच्यात बैलाचा संबध कळला नाही. ) मिपाच्या नावाने कण्हत बसणार्‍या इतर संकेतस्थळाच्या सदस्यांच्या बैलाचा रे भो.... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सदस्यांच्या मनमोकळ्या प्रतिसादांवर आणी लेखांवर तोंडावर उशी दाबुन कात्री चालवणा-या संपादकांच्या बैलाला रे भोऽऽऽऽ --अवलिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> च्यायला याच्यात बैलाचा संबध कळला नाही. ) हम्म् , ह्याच मुद्द्याच्या अनुषंगाने शिमग्यातील बैलाचे महत्व स्पष्ट करणारा एक सणसणीत ( नेहमीप्रमाणे ) दीर्घ असा २ पानी प्रतिसाद टाकायची इच्छा होत आहे. मात्र सदस्यांचा संभाव्य रोष लक्षात घेता आम्ही शांत बसतो ;) मात्र तुर्तास ह्या ( दीर्ध च्या )निमीत्ताने आमची कळ काढणार्‍या बिरुटेसरांच्या व आमच्या समस्त आंतरजालीय दुश्मनांच्या (ह्यात बिरुटे सर नाहीत ह्याची अवश्य नोंद घ्यावी ) "बैलाला हो ऽऽऽ " असेच म्हणतो ... सविस्तर प्रतिसादासाठी ही जागा राखुन ठेवत आहे. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

सविस्तर प्रतिसादासाठी ही जागा राखुन ठेवुन कधीही तो प्रतिसाद न पुर्ण करणा-यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ --अवलिया

In reply to by अवलिया

=)) सही पकडलास त्या डॉन्याला तु नाना ! लेकाचा नेहमी जागा रिजर्व करतो पण त्यात काही लिहीतच नाय... एमसीडीची पार्किंग वाटली की काय रे तुला डॉन्या... एक दगड लावला की झालं रिजर्व पार्किंग ;)

In reply to by दशानन

नाही.. ओपन थिएटर... वाळुत झोपुन पिच्चर पहायचा... बसलेय बसलेय करुन मफलर, रुमाल टाकुन ठेवायचा.. अंधार झाला की कर लांब पाय.. --अवलिया

In reply to by दशानन

>>सही पकडलास त्या डॉन्याला तु नाना ! चालायचेच ...!!! >> लेकाचा नेहमी जागा रिजर्व करतो पण त्यात काही लिहीतच नाय... असे आपल्याला वाटते. असो. >>एमसीडीची पार्किंग वाटली की काय रे तुला डॉन्या... एक दगड लावला की झालं रिजर्व पार्किंग हे माझे वैयक्तीक मत आहे, त्याबद्दल कुणालाही कसलेही स्पष्टीकरण देण्यास आम्ही बांधील नाही आहोत. तुमचे चालु द्यात ... अरे हा डॉन्या तुमच्यासारख्या १० आंतरजालीय हितशत्रुंना ...... जाउ दे, तुम्हाला माहित आहेच की पुढचे ;) यानिमीत्ताने आमचा कात्रजचा घाट करणार्‍या नाना ( ची टांग ;) ) व राजेंच्या बैलाला हो ऽऽऽऽ

सारख्या सारख्या प्रेमभंगाच्या कथा लिहिणा-या राजेच्या बैलाला होऽऽऽऽ --अवलिया

In reply to by अवलिया

>>>सारख्या सारख्या प्रेमभंगाच्या कथा लिहिणा-या राजेच्या बैलाला होऽऽऽऽ हा हा हा... =))

In reply to by अवलिया

=)) =)) मार्केट पडणार पडणार म्हणून वर्षाआधी पासून बोंबामारुन मारुन मार्केटला पडायला लावले त्या नाना च्या बैलाला होऽऽऽऽ * बाय द वे, बैलाला होऽऽऽऽ चा अर्थ / संबध काय आहे येथे :?

In reply to by दशानन

* बाय द वे, बैलाला होऽऽऽऽ चा अर्थ / संबध काय आहे येथे नानाच्या बोंबा मारण्याचा आणि मार्केट पडण्याचा जो संबंध आहे तोच इथे आहे. कशाचाही कुठेहि संबंध लावणा-याच्या बैलाला होऽऽऽऽऽ --अवलिया

In reply to by अवलिया

सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

एका पेक्षा एक सरस पाकृचे फोटु टाकून आम्हा खवैयांना जळवणार्‍यांच्या नावाने बो बो बो...

संस्कृतसारख्या सुंदर भाषेचा द्वेष करणा-यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ --अवलिया

In reply to by अवलिया

>>संस्कृतसारख्या सुंदर भाषेचा द्वेष करणा-यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ सहमत आहे ! हसुन हसुन मरतो च्यायला आज ! :)

लिहितो लिहितो असे म्हणून लेख अर्धवट सोडणार्‍यांचा बैलाला होऽऽऽऽ

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

पुर्ण लेखमाला लिहुनही कधीही प्रतिसाद न देणा-यांच्या बैलाला होऽऽऽऽऽ --अवलिया

In reply to by दशानन

राज्या, तु अगदी करेक्ट व चपखल ( ओ अभिजीतराव, शब्द बरोबर आहे ना ? ;) ) बोललास बघ ... ह्या निमीत्ताने जे काही वाद्-विवाद व मतभेद असतील ते शांततेने मिटवुन पुढील आंतरजालीय आयुष्य निवांत घालवा ह्या हेतुनेच हा शिमगा आयोजीत केला आहे ... चालु द्यात ... आता लिहायचे म्हणुन "कोणाच्या तरी" बैलाला हो ऽऽऽ ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

रोज स्वप्नात येऊन मानशिक व शारिरिक छळ करणारया सर्व सुन्दर बायका आनि नट्यांच्या बैलाला भोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ -वळू

In reply to by अवलिया

बोळेकुमारांना समज व धमक्या देण्याच्या सुपार्‍या घेत फिरणार्‍या व कसल्याही टिकेला न घाबरता आंतरजालीय सच्च्या मैत्रीला जागणार्‍या कंपुबाज मित्रांच्या बैलाला हो ऽऽऽ

In reply to by अवलिया

मंदी येणार मंदी येणार म्हणुन बोंबलणार्‍या आणी मंदी आल्यावर तिला स्वतःपाशी लपवुन ठेवणार्‍या नानाच्या बैलाला होऽऽऽऽ टंकायचा आळस करुन शिळेपाके लेख स्कॅन करुन इथे आणुन डकवणार्‍या विन्याच्या बैलाला होऽऽऽऽ मित्रांना लाथा मारुन स्वतः मात्र दाहि दिशांच्या वार्‍यात हुंदडणार्‍या राजेंच्या बैलाला होऽऽऽऽ ण ण ण वापरुण णाकात दम आणणार्‍या टारझण च्या बैलाला होऽऽऽऽ सहा आठ महिन्यानी कधितरी एक लेख तो पण भाग १ लिहुन अदृष्य झालेल्या धम्याच्या बैलाला होऽऽऽऽ ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

लवकर बोंबलुन घ्या ३ तासात टाक्र्तो नवा कोरा -मनाच्या कुपीतले-बराक ओबामा छानसे वाचलेले विनायक पाचलग

In reply to by अवलिया

टाक बे लवकर .. आज थोडा वेळ आहे .. एक हिण आणि हिडिस विडंबण लिहितो .. " मण्याच्या डब्यातले : तुराट उपमा "

In reply to by अवलिया

=)) लै भारी * कवितांचा ढिग लावणा-याच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ * नको तेथे फोटो चिटकवणा-या च्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ

अजुन रिंगणात न आलेल्या मिपाकरांच्या बैलाला होऽऽऽऽऽ --अवलिया

आमचा लेख / कथा / कविता / प्रवास वर्णन / विंडबन / कौल / सुड कथा / प्रेम कथा / मार्केट कथा / मार्केट वॉच वाचून आवडलेले माझ्या खरडी मध्ये येऊन / व्यनी द्वारे कळवणा-या पण मुळ लेखाला प्रतिसाद न देणा-या काला बंदर च्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ =))

In reply to by दशानन

अगदी अगदी आणि असे लेख आवडुन सुद्धा कबुल करण्याचे धैर्य नसलेल्यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽ --अवलिया

In reply to by दशानन

विन्याच्या आणी त्याला लेख लिहायला उद्युक्त करणार्‍या बराक ओबामाच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

प्रेमभंग करणारया आणि प्रेमभंग झालेल्यांला भोऽऽऽऽऽऽऽऽऽ आणि त्यांच्या बैलाला पण भोऽऽऽऽऽऽऽऽऽ -भोकाड बैल

च्यामारी ह्या सगळ्याला सुरवात झाली, तात्यामुळे एकदा जोरदार होवुन जावु दे तात्याच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ --अवलिया

उगाचचं दुसरयांच्या बैलाला भोऽऽऽऽऽऽऽऽ लावणारयांच्या बैलाला पण भोऽऽऽऽऽऽऽऽऽ -सभ्य बैल

जिलब्यां सारखी दिसेल त्या लेखा/कवितेची/विडंबनाची विडंबने पाडणार्‍यांच्या बैलाला डबल ट्रीपल हो ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

५० विविध विषयांवर लेख लिहिण्याचा संकल्प सोडून तो तडीस न नेणार्‍या णानाच्या बैलाला..................... बिचारे सख्याहरी आपापले बोळे काढू पाहत असताना, त्यांच्या नावाने धागे काढणार्‍या शिष्ट लोकांच्या नानाची................. फलाटावर बसून डब्यातल्यांना नावे ठेवणार्‍यांच्या नावाने.............. रोशनी पूर्ण न करणार्‍या तात्याच्या नावाने..................... बरेच क्रमशः अर्धवट ठेवणार्‍या रामदास काकांच्या नावाने................ पोरांहून पोर होणार्‍या मास्तरच्या नावाने.................. आणि शुद्धलेखनाच्या नावाने...................... हो................ बिपिन कार्यकर्ते

आम्ही कपडे घालु किंवा उघडे राहु. आमच्या देवाला आम्ही स्वेटर घालणारच. आमच्या श्रद्धेला हसणा-यांच्या बैलाला हो.ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ --अवलिया

काय णाणा ? सामंतांसारख्या प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देणार्‍याच्या बैलाला ................ हो :) ण ण ण .. टारझण

बाझवला..! शिमगा आवडला रे डॉन्या! :) तसाही तात्याला आणि मिपाला शिव्या देण्याचा शिमगा आंतरजालावर वर्षभरच सुरू असतो म्हणा! :) त्या नादात पब्लिक नवे नवे ब्लॉग्ज काढतात, संस्थळं काढतात! चालायचंच! :) आपला, (शिमगाप्रेमी) तात्या.

नविन धागा टाकुन जुन्या धाग्यावर (माझ्यासहित) लिहणारयांच्या बैलाला घोऽऽऽऽऽऽ

ड्रूपलचा एररचा आणि मिपाकर मालकांचा रे भो.....! सतत कामात बीझी असल्याचे नाटक करणा-या धमाल मुलगा चे रे भो...... माझ्या चांगल्या धाग्यात वाकड्यात शिरणा-याच्या बैलाला पण भो ऽऽऽऽऽऽ होली है भै दिल पे मत लो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तिनच गोवर्‍या देउन पाच दाखवणार्‍यांच्या बैलाला होऽऽऽऽ!!!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बळंच आमच्यावर बीलं फाडणार्‍या गुर्जींच्या बैलाला हौऽऽऽऽ.... ते गायब होऊन बसलेल्या आनंदयात्री, इनोबा, डांबिसकाका ह्यांच्याही बैलाला हौऽऽऽ....... दंगा घालायचा सोडून हुच्चभ्रू झालेल्या त्या बिपीनदाच्या बैलाला तर लोणी-हळद फासून हौऽऽऽ...... आन समस्त नव्या-जुन्या मायबाप मिपाकरांच्या........... नाय नाय नाय... :) सगळ्यांना हुताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!! अरे बोंबलाऽऽ...ऑबॉबॉबॉबॉबॉ.............