आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!
आज सकाळी भल्या पहाटे ( ८ वाजता ) आम्ही पुर्ण शुद्धीत येऊन आमचा लॅपटॉप उघडला आणि होळीच्या निमीत्ताने आंतरजालावर ठिकठिकाणी काय शिमगा चालला आहे ह्याचा ( किलकिलत्या नजरेने ) अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. पण काय हे ? सगळीकडे शांतच ? कसलाच स्पेश्शल इव्हेंट अथवा वाद्-विवाद नाही ?
नेहमीच कसल्याही क्षुल्लक विषयांवर अगदी आरामात ३-४ पाने भरुन मेगाबाइटच्या मेगाबाईट वाद घालणार्या व ५०००-६००० हजारांच्या आसपास संख्या असणार्या संकेतस्थळांवर "शिमगा" साजरा होत नाही हे अतिशय गर्हणीय आहे. एवढ्या महत्वाच्या आंतरजालीय उत्सवाला असे वाळीत टाकण्याच्या हीन व हिडीस कॄत्याला पाहुन मला एक हलकट आंतरजालीय व्यक्तीमत्व ह्या नात्याने शरम वाटली व डोक्यात सणक गेली ( व आम्ही आंथरुण व पांघरुण गुंडाळुन वर बेडवर ठेवले.)
अरे दिवाळीला मात्र ( काही लोक म्हणतात तसे चहा, शिग्रेटी व रोजी २० रुपये मात्र ह्या दरावर संपादक ठेऊन ) मोठ्या जोशात दिवाळी अंक काढता मग ह्या शिमग्याच्या निमीत्ताने साधा १ लेख का नसावा ह्या विचाराने आम्हाला गरगरुन आले ( ह्याला आमच्या मित्रांनी कालचा हँगओव्हर समजुन शिग्रेटचे पाकीट पुढे केले पण तो भाग वेगळा ;) ).
चला तर मंडळी, आपण साजरा करु आंतरजालीय शिमगा ...
शिमगा म्हणजे आपल्या मनातल्या अमंगल, अविचारी, हीन, हिडीस विचारांना शिव्या वाटे बाहेर काढुन व बोंब मारुन त्याच विचारांचे अग्नीच्या साक्षीने दहन करण्याचा उत्सव. तात्यांनी ( अनुष्काचा फोटो टाकुन ) अग्नी पेटवला आहेच फक्त आता आपण बोंबा मारायच्या बाकी आहेत ...
कुणाच्या नावाने बोंबा मारणार ???
ढीगाने पर्याय आहेत, तसेही त्याला निमीत्त थोडेच लागते म्हणा ...
मिपावर व इतर ठिकाणी आपला "कंपु: बनवुन आपलीच अनभिषीक्त सत्ता चालवणार्या "कंपुबाजांच्या" नावाने बोंब मारा, आपल्याला कंपुत सामील करुन न घेणार्यांच्या नावाने बोंब मारा, कंपुविना आपला चांगला लेख मागे पडत असुन त्याला प्रतिसाद मिळत नाहीत असे आरोप करणार्यांनी आता इथे उघड बोंब मारा.
कंपुबाजांनी असले आरोप करणार्यांविषयी बोंबा मारा , एखादा माणुस आवडत नसुन तो उगाच कंपुत घुसायचा प्रयत्न करुन सारखे मध्येमध्ये करत असेल तर त्याच्या नावाने बोंब मारा ,कंपुवर जळणार्यांच्या नवाने बोंब मारा ...
ज्यांचे प्रतिसाद जे जळजळीत व तीव्र असल्या कारणाने उडवले गेले/जात आहेत अशा लोकांनी ( अवलियाशेठ, कसे काय, बरे आहे ना ? ) संपादकांच्या अथवा सो कॉल्ड पाध्यांच्या नावाने बोंब मारा व असे प्रतिसाद लिहुन फुकटचा डोक्याला ताप आणुन त्रास देनार्यांचा नावाने संपादक हो तुम्हीही बोंब मारा ...
महिला मंडळाने वारंवार त्यांच्या मागे लागणार्या आंतरजाल सख्याहारींच्या नावाने शिमगा करा व लगे हात चान्स मिळाला आहे तर धोपटुन घ्या. आपल्याला लोचट, लाळघोट्या खरडी/व्यनी पाठवणार्याच्या नावाने बोंब मारा.
सख्याहारींनो, तुम्ही आपल्याला कायम दुर्लक्षीले जाते व हे स्त्री सदस्य फक्त ठरावीक सदस्यांशी मोकळेपणाने बोललात व आपल्याला फाट्यावर मारतात ह्या त्राग्याने त्या स्त्री सदस्यांच्या व त्यांच्या मित्रांच्या नावाने बोंब मारा ...
सर्वसामान्य मिपाकरहो आपल्याला रोज त्रास देण्यासाठी फालतु कौले, लेख , चर्चा विषय व जाणकारांनी प्रकाश टाकावा अशी विनंती करणार्या महाभागांच्या नावाने बोंब मारा व जमले तर होळीतले पेटते लाकुड काढुन त्यांना २ तडाखे द्या.
तर अशा उठवळ आणि टाईमपास लेखकोहो तुम्ही तुमच्या धाग्यावर तुम्हालाच ठोकणार्या सच्च्या मिपाकराच्या नावाने बोंब मारा ...
जेन्युईन कवींनो तुम्ही तुमच्या कवितेची एका दिवसात ५-६ विडंबने पाडणार्या नवजात विडंबक टोळधाडीच्या नावाने बोंब मारा व विडंबकांनो तुम्ही तुम्हाला विरोध करणार्यांचा नावाने बोंब मारा ...
इतर अजुन बरेच काही, आठवेल तसे टाकेन ...
मी फक्त जागा पोळवली, आता होळी रचायची आणि ढणढणीत पेटवायची जबाबदारी मिपाकरांची ...
होऊन जाऊ द्या ..!!!!
* डिस्क्लेमर :
१. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन हाताची खाज मिटवु नये.
२. व्यक्तीगत आरोप करु"च" नयेत ...
३. सर्वांनीच हलकेच घेऊन फक्त आनंद लुटावा, न आवडल्यास तसे स्पष्त सांगावे, अशी जास्त मते आल्यास मी स्वतःच हे लिखाण इथुन उडवुन लावीन ...
मारा मग बोंबा तिच्यायला ...!!!
पहिली बोंब आम्ही आमच्याच नावाने मारतो आहोत. असले धागे काढुन पब्लिकचा वेळ व मिपाची बँडविड्थ फुक्कट घालवणार्या डॉन्याच्या बैलाला हो ऽऽऽ ...!!!
वाचने
28524
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
छोटा
In reply to छोटा by अवलिया
भाग - २
आम्हाला
In reply to आम्हाला by परिकथेतील राजकुमार
.
In reply to आम्हाला by परिकथेतील राजकुमार
आम्ही बोंब
विनायक पाचलग ...
भो....
In reply to भो.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सदस्यांच्
In reply to भो.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एका बैलाच्या निमीत्ताने ...
In reply to एका बैलाच्या निमीत्ताने ... by छोटा डॉन
सविस्तर
In reply to सविस्तर by अवलिया
सही
In reply to सही by दशानन
नाही..
In reply to सही by दशानन
हा हा हा ...
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
.
सारख्या
In reply to सारख्या by अवलिया
भो भो भो
In reply to सारख्या by अवलिया
मार्केट
In reply to मार्केट by दशानन
* बाय द वे,
In reply to सारख्या by अवलिया
हा हा हा...
पाकृ
संस्कृतसा
In reply to संस्कृतसा by अवलिया
:)
.
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
पुर्ण
In reply to पुर्ण by अवलिया
सही जा रहे
In reply to सही जा रहे by दशानन
+१,
सग'ळ्या
ज्यांनी आजून काही लिहीले नाही (माझ्यानंतर)
रोज
In reply to रोज by सँडी
तरीच बारिक
सर्व
In reply to सर्व by दशानन
बोळेकुमार
In reply to बोळेकुमार by अवलिया
तसेच ...!
बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!
In reply to बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!! by सहज
बोंबलायचे
In reply to बोंबलायचे by अवलिया
मंदी येणार
In reply to मंदी येणार by परिकथेतील राजकुमार
एकदा घ्याच बोंबलुन
In reply to एकदा घ्याच बोंबलुन by विनायक पाचलग
बराख
In reply to बराख by अवलिया
टाक बे
In reply to एकदा घ्याच बोंबलुन by विनायक पाचलग
ह्या ला
कधीही काहिही
In reply to कधीही काहिही by अवलिया
लै भारी
अजुन
आमचा लेख /
In reply to आमचा लेख / by दशानन
अगदी
In reply to अगदी by अवलिया
वर ती युफओ
In reply to आमचा लेख / by दशानन
विन्याच्य
.
च्यामारी
In reply to च्यामारी by अवलिया
+१
उगाचचं
जिलब्यां
In reply to जिलब्यां by विंजिनेर
मुळ
हो.....
आम्ही कपडे
थांबा! रस्त
काय णाणा ?
बाझवला..!
In reply to बाझवला..! by विसोबा खेचर
मिपाला
.
होळीच्या पाच गोव-या...
In reply to होळीच्या पाच गोव-या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तिनच गोवर्या देउन पाच
In reply to होळीच्या पाच गोव-या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला!!!!
लै भारि की...
होळी पेटवायची सोडून होळी
In reply to होळी पेटवायची सोडून होळी by नगरीनिरंजन
++१
अरे बोंबला खच्च्च्च्चून