दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे
तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे
कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे
अनासक्त मी! हे तिला मानवेना, कसे डाव लटकेच खेळायची ती
वृथा आळ घेणे, मनस्ताप देणे, रुजूवात करणे वगैरे वगैरे
कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा, मुळी थांग पत्ता मनाचा न येई
मला पेच हा की पुढे काय होणे! मनाशी कचरणे वगैरे वगैरे
मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा, किती चिंबलो ते कळालेच नाही
जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणें वगैरे वगैरे
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे
"अभय" एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे
- गंगाधर मुटे "अभय"
--------------------------------------------------------------------------

गझल मस्त... विशेषतः
छान
मस्त ! मस्त!
वाह!!!!!!
सुंदर
मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा,
कुणालाच नव्हती खबरबात काही,
+ १
क्या बात है !
+१
सगळी कडे कोरडी जमीन्,दुष्काळ
हा हा हा
खूप आवडली
भुईसंग जगणे असो ते खरेही,परी
वाह! फार सुरेख कविता.
मस्तच.
वाह!!!
अप्रतिम
वा!
जबरदस्त!
(No subject)
झकास!
मस्त
मस्त मस्त मस्त !!!!!!
कातिल गजल!
सर्व प्रतिसाद दात्यांना रामराम
म हा न!
मस्त कविता
तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली
एकदम रोमँटिक .........वगैरे
शृंगार हा माझा विषय नाही.
गंगाधरजी.... तुम्ही म्हणताय
मुटेसाहेब, 'वगैरे वगैरे' हा
"वगैरे" असा आहे
रदीफ, काफिया किंवा गझलेतील
कृपया मक्ता ऐवजी मतला असे
रदीफ नाही, काफिया. स्वसंपादन
गझलेविषयी काहीच बोलल्या नाहीत
:)
नाही आवडले तर त्यात काय विशेष
मी स्मित करून नंतर ) कंस
काहीच विशेष नाही. हल्ली
आवडली
अप्रतिम! खूप आवडली!
अप्रतिम
च्यामारी ह्या प्रेमाच्या...
मस्त!!!!
गझल अतिशय आवडली.
इंदुसुता यांच्याशी सहमत.
बॅटमनसाहेब, करा की नक्कल