Skip to main content

बटाटा

लेखक राजा सोव्नी यांनी बुधवार, 20/03/2013 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
केला जरी सर्व भाज्यांनी टाटा उरतो केवळ मी बटाटा उन्ह-पाऊस-थंडीत राहतो मी सान-थोर सर्वांस भावतो मी गाव-शहर असो पाऊल-वाटा सर्वत्र दिसतो मी बटाटा पार्टी असो वा उपास करती जन माझा तपास गोड अथवा तिखट कुरकुरीत वा चिवट परिस्थिती असो बिकट असतो मी सदैव निकट असा मी बटाटा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3935
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

हा शुद्ध अन्याय आहे. समोर जे दिसतंय ते त्याक्षणी खाता येत नाही. नुसता फोटो बघून पोटात आगडोंब उसळला.

खरं आहे...! बटाटा भगवंतापेक्षाही सर्वव्यापी झालेला आहे. ;)

राजा, आपल्या कवितेच्या रुपातील प्रतिभा - 'बटाटा एकमेव तारक कंद भाजी' ने बहरुन आली आहे.... मला तर ती भाजीबाजारातील 'राजा' पदवीस पात्र असल्याचे मान्य आहे.

In reply to by शशिकांत ओक

@ मला तर ती भाजीबाजारातील 'राजा' पदवीस पात्र असल्याचे मान्य आहे.>>> तरिही असला राजा लोकमान्य की
लोक-सहनकारक
हा प्रश्न उरतोच!

खड ,खड चुंबन दंताडा दंताडी चे लग्न जाहले ,दिवस मजेत जावू लागले . चुंबन घेता खड~खड होई ,ओठांचे मिलन ना होई , आगळे वेगळे ऐसे चुंबन ,तृप्त होईना कधी मन , त्रासून त्यांनी लावली कवळी ,चुंबनाची चव ती कळली , एकदा मात्र गंमत घडली ,चुंबन घेता कवळी पडली .