आर्ट इज नॉट आर्ट टिल इट डिस्टर्ब्स यु.हे वाक्य म्हणून वाचायला बरे आहे. पण खरच अशी कला जेव्हा सामोरी येते, तेव्हा भयंकर वाटते. खूप वर्षांपूर्वी, खरं तर लहानपणी "महानंदा" हा चित्रपट पाहीला होता. दूरदर्शनवर लागला होता. अर्थातच सेन्सॉर केलेला होता. आज परत आपलीमराठी वर पाहीला. व्यक्तीचित्रण अतिशय प्रभावी आहे. जयवंत दळवींसारख्या सिद्धहस्त लेखकाची कथा असल्याने चित्रपट उत्तम असणार यात वादच नव्हता. हा चित्रपट "बेंचमार्क" चित्रपट म्हणून नावाजलेला असल्याने आता कळत्या वयात पहायची उत्सुकता होतीच. गोव्याच्या पार्श्वभूमीवर एका भावीणीची मुलगी व एक मराठीचा प्राध्यापक यांच्यामध्ये फुललेली प्रेमकथा आहे. जयवंत दळवी लिखीत असल्याने एक तरी वेडसर पात्र असणे जरुरीचे आहे. पण या कथेत २ वेडी पात्रे आहेत. हे स्फुट चित्रपटाचे परीक्षण नाही तर एका प्रसंगाबद्दलचे मनोगत आहे. सुदैवाने आतापर्यंत कधीच इतका अस्वस्थ करणारा प्रसंग कोणत्याही चित्रपटात मी पाहीला नाही. हा जो सीन (प्रसंग) मी लिहीते आहे तोदेखील इतका सखोल अस्वस्थ करणारा होता की मी तो पूर्ण पाहूच शकले नाही. गावात एक वेडसर भावीण आहे, जी लक्तरे ल्यालेल्या अवस्थेत, मांड्या कराकरा खाजवत फिरते. ती सदैव अन्न-पाण्याकरता भुकेली, वखवखलेली अशी चित्रीत केलेली आहे. याच गावात एक पोस्ट्मास्तर आहे जो सर्वांची खाजगी पत्रे चोरुन वाचतो. प्रसंग असा होता की ही वेडसर मुलगी रस्त्यावर एका रिकाम्या खोलीच्या कडेला काहीबाही खात बसलेली आहे, मध्येच हसते आहे, कराकरा अंग खाजवते आहे. आणि पोस्टमास्तर तिचे अन्न हिसकावून घेऊन, तिच्या तोंडापाशी नेत पण तिला न देता तिला त्या रिकाम्या खोलीकडे भुलवत नेतो. कधी गडव्यातील पाण्याची धार तिच्या समोर ओतत, पण पाणी न देत तिला "ये ये" असे म्हणत तिला त्या खोलीत घेऊन जातो. आणि एखाद्या पशुसारखी ही मुलगी अन्न-पाण्याला भुलून, त्याचा कावा न ओळखता त्याच्या मागे मागे जाते. मला हा प्रसंग बघवला नाही. खूप म्हणजे प्रचंड अस्वस्थता दाटून आली. अन्न-लैंगिकता- वेडसरपणा या तीनही प्रभावी (पोटंट) गोष्टींतून साकार झालेला, पोस्टमास्तरच्या विकृतीचे दर्शन घडवणारा तो प्रसंग मनावर अतिशय ओरखडे उठवून गेला. जबरदस्त डिस्टरबींग सीन आहे. जयवंत दळवी लिखीत हा प्रसंग दिग्दर्शकाने फार ताकदीने चित्रित केलेला आहे एवढेच म्हणेन. खरं तर चांगल्या गोष्टी नेहमी दुसर्यांबरोबर शेअर कराव्या पण आज ही अस्वस्थता शेअर करावीशी वाटली म्हणून हे स्फुट्/मुक्तक. तो सीन पाहील्यावर अगदी १००% असे वाटून गेले की जगात देव असावा आणि तो न्यायी असावा आणि त्या पोस्टमास्तरसारख्या हीडीस नरधमांन शिक्षा व्हावी. खरं तर काय काय वाटले हे शब्दात न मांडता गेणारा अनुभव चित्रपटातील तो प्रसंग देऊन गेला. दाटून आलेल्या अस्वस्थेला बद्ध करणारे शब्दच खरोखर नाहीत. जयवंत दळवींचे सामर्थ्य पुन्हा माझ्या साठी निर्विवाद अधोरेखित झाले.
वाचने
13452
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाटक पण छान होते आशा काळे व
फार पूर्वी पाहिला होता हा
हम्म...
विचार करू नये
भेदक आणि भडक
In reply to विचार करू नये by पैसा
कहर आहे!!!
अंगावर येणारे चित्रपट,
मी बहुतेक पूस्तक वाचलय हे ...
गुंतता हृदय हे...
प्रसंग
सभ्य समाजाची कृत्रिमता की
In reply to प्रसंग by अर्धवटराव
सभ्य समाजाची कृत्रीमताच.
In reply to सभ्य समाजाची कृत्रिमता की by शुचि
??????
In reply to सभ्य समाजाची कृत्रीमताच. by अर्धवटराव
पशु?
In reply to ?????? by स्पंदना
पशूंमधे नैसर्गिकतः आजारी,
In reply to पशु? by अर्धवटराव
पशुता म्हणजे निव्वळ क्रौर्य नाहि.
In reply to पशूंमधे नैसर्गिकतः आजारी, by ३_१४ विक्षिप्त अदिती
चाणक्याचे एक वचन
In reply to पशु? by अर्धवटराव
पक्षी-प्राण्यांची लैंगिकता
In reply to ?????? by स्पंदना
अजून एक
In reply to ?????? by स्पंदना
माणुस कितीही "उंच" गेला तरी
In reply to सभ्य समाजाची कृत्रीमताच. by अर्धवटराव
मी ही हेच म्हणतो.
In reply to माणुस कितीही "उंच" गेला तरी by ५० फक्त
आयला...
In reply to माणुस कितीही "उंच" गेला तरी by ५० फक्त
नाही हो, असं नका म्हणु.
In reply to आयला... by अर्धवटराव
आणि त्यावर एकमेव उपाय म्हणजे
In reply to आयला... by अर्धवटराव
त्याला पर्याय नाहि.
In reply to आणि त्यावर एकमेव उपाय म्हणजे by धन्या
सगुणाचेनि आधारे, निर्गुण
In reply to त्याला पर्याय नाहि. by अर्धवटराव
राम
In reply to सगुणाचेनि आधारे, निर्गुण by प्यारे१
ज्जे बात!
In reply to राम by अर्धवटराव
बरोबर आहे.
In reply to राम by अर्धवटराव
दळवी तेंडुलकर आजच्या काळात
भेंडे ह्यांची आव्हान मालिका
बाणा, बाणा...
In reply to भेंडे ह्यांची आव्हान मालिका by मदनबाण
हा हा. तो ज्वागींगवाला का?
In reply to बाणा, बाणा... by दादा कोंडके
या मालिकेचे नाव आव्हान होते.
In reply to भेंडे ह्यांची आव्हान मालिका by मदनबाण
पुढचे पाउल
In reply to या मालिकेचे नाव आव्हान होते. by निनाद मुक्काम …
खल्लास...काय पिच्चर होता राव.
In reply to पुढचे पाउल by विकास
माझ्या हायलाईट केलेल्या
In reply to या मालिकेचे नाव आव्हान होते. by निनाद मुक्काम …
बाणा
In reply to माझ्या हायलाईट केलेल्या by मदनबाण
ते माहीत आहे...
In reply to बाणा by निनाद मुक्काम …
नंदू भेंडे त्यांचे सुपुत्र
In reply to ते माहीत आहे... by विकास
अवांतरः कलाकाराचे यश आहे ते.
In reply to भेंडे ह्यांची आव्हान मालिका by मदनबाण
+१
In reply to अवांतरः कलाकाराचे यश आहे ते. by धमाल मुलगा
;) फार बोलत नाही...
In reply to +१ by मालोजीराव
+१ :)
In reply to ;) फार बोलत नाही... by धमाल मुलगा
अस्वस्थता
ह्युमन इज जस्ट अनदर अॅनिमल
ह्युमन इज जस्ट अनदर अॅनिमल
In reply to ह्युमन इज जस्ट अनदर अॅनिमल by धन्या