Skip to main content

दारू - म्हणजे काय रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 05/03/2013 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
   दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते. ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय? चला तर आज तेच बघूयात... कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल  :) ) दारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार. दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती ह्यावरून, दोन प्रकार पडतात. लिकर आणि लिक्युअर. लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली. लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी घेण्याचा पेय प्रकार तर लिक्युअर म्हणजे जेवेणानंतर घेण्याचा प्रकार. लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार. (इथे कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्च्याने इथे दुर्लक्ष करावे). लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे त्यावरून. व्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते. जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते. मेक्सिकन टकिला अगावे ह्या कंदापासून बनते. व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते. जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते. लिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात. तसेच काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात. त्या चवीला त्यामुळे गोड असतात. भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोल मध्ये वेगेवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते. ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे असला शास्त्रोक्तपणा नसतो. इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो. प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारवांचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते. बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो. त्यामुळे जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते. मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये ब्लेंड करून त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते. ह्याउलट हातभट्टीची दारू असते. मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय. अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो. ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे एवढाच असतो त्यामुळे कच्चा माल दर्जाहीन असला तरीही काहीही फरक पडत नाही; कारण इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते. डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त’ असलेला हा माल फार खपतो. ह्या प्रकारच्या दारूमुळेच, दारू वाईट असा सरसकट समज झाला आहे. ह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे देशी दारू किंवा सरकार मान्य दारू. हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्‍या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार बनणारी ही देशी दारू, सरकारमान्य, हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असतो. आता दारू म्हणजे काय ते कळले पण दारू प्यायल्यावर नेमके होते काय? खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने. जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते आणि त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते. हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो. एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते. ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोल च्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्‍या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात आणि शरीराच्या हालचाली मंदावतात. त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते. अर्थात हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. अती तिथे माती ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली तर सहजावस्था ही सहजावस्था न राहता पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते. ही दारू पचविण्याची शक्ती माणसामाणसावर अवलंबून असते. ३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो. शरीरात पसरत जाणारे हे अल्कोहोल हे शरीरासाठी एक अ‍ॅन्टीबॉडीच असते त्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात. आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग? तर त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते. त्यामुळेच पोलीस Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये श्वास सोडायला सांगतात आणि त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते. तर दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला तर माणसाची अवस्था बिकट होते. आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल? तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते? तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही? तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्‍याचा ‘वकार युनुस’ होतो. त्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते, नापेक्षा दारू म्हणजे वाईट असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते. तर आता दारू म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 81515
प्रतिक्रिया 250

प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अजुन तरी पेग(पेग घेणारे हे हुच्चभ्रु असतात कारण ते बीयर किंवा विदेशी घेतात म्हणुन) घेणार्यांच प्रमाण हे ५ ते १०% असाव्,बहुतेक हे देशी व हात भट्टीची (जी स्वस्त मिळते)पिण्यात धन्याता मानतात, आजही तुम्ही जे हातमजुरीवर जगणारे असतात ते ,उदा:शेतमजुर्,खाणकामगार्,विटभट्टीवर काम करणारे,हातगाड्या ओढणारे हे तत्सम लोक हे बघा, हे आनंद यावा म्हणुन नाही पित ते त्यांच अंग जे काम केल्याणे ठणकत ते कमी व्हाव म्हणुन पितात्,जास्त काम केल तर जास्त पितात्,अजुन एक प्रकार म्हणजे वेगवेगळ्या मालवाहतुक गाड्यांचे ड्राइव्हर तेही अंग दुखत म्हणुनच दारु पितात स्वस्तातली जि की रस्त्याच्या ढाब्यावर विनासायास उपलब्ध असते. विषारी दारु चे बळी अश्या बातम्या येतात त्यातले बळी हे मजुर असतात, त्याच्यावर काही उपाय आता तरी दिसत नाही, म्हणुन म्हणालो की जास्त पितात व गटारीत पडतात व वर जातात

In reply to by श्री गावसेना प्रमुख

साहेब, जर श्रमिक लोक अंगदुखी साठी दारू पीत असतील तर त्यांच्या बायकांनी सुद्धा (ज्या स्वतः सुद्धा तितकीच मेहनत करतात) प्यायला हवी.अंग दुखी साठी अस्प्रोची गोळी फक्त २५-५० पैशात मिळेल. पण मजूर जास्त दारू पिता यावी म्हणून आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करताना आढळले आहेत. श्रमिक लोक नशेसाठीच दारू पितात. फक्त त्यांच्या खिशात पैसे नसल्याने ते स्वस्तात स्वस्त मिळेल ती पितात. दुर्दैवाने या हात भट्टी तर्हेच्या दारूच्या दर्जा बद्दल कोणतेही नियमन(मुळात बेकायदेशीर गोष्टीचे नियमन हाच विरोधाभास आहे) नसल्याने दारू मुळे विषबाधा हे प्रकार घडतात. पोलीस आणि हात भट्टीवाले यांचे साटेलोटे असल्याने हात भट्ट्या राजरोस पाने चालू असतात. देशी दारू ची दुकाने हि या प्रकाराला आला घालण्यासाठीच निर्माण केली पण अबकारी कर आणि "वरकड" खर्च यामुळे ती दारू हातभट्टी इतकी स्वस्त नसते. आणि फक्त मजूर किंवा निम्न उत्पन्न गटातील लोकच दारू पिउन झीन्गतात किंवा गटारात पडतात हि वस्तु स्थिती नाही तर उच्च आणि अति उच्च गटातील लोकांची पण हि अवस्था होते पण त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे कौटुंबिक किंवा नोकर(ड्रायव्हर इ) असल्याने ते आपणास रस्त्यात पडलेले क्वचित दिसतात.

सर्व साधारणपणे जगभर कोणत्याही संस्कृतीत स्त्रिया मद्य पान क्वचित/ कमी प्रमाणात करतात. याचे कारण मद्यपानाने स्वतः वरील ताबा जातो हे आहे.शील किंवा यौन शुचिता हा भाग वादासाठी सोडला तरी कोणतीही स्त्री हिआयुष्य भर एका काल्पनिक स्थितीपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाही ती म्हणजे बलात्कार. पहिली बलात्कारित रुग्ण स्त्री पाहताना हे विदारक सत्य मला जाणवले. मी त्या दुर्दैवी स्त्रीशी अत्यंत सहानुभूतीने वागत होतो त्यापेक्षा आमच्याबरोबर असलेल्या इतर स्त्रिया सिस्टर मेट्रन आया वगैरे यांचे वागणे मला जास्त ओलाव्याचे वाटले . पुरुष असल्याने आपल्यावर बलात्कार होऊ शकतो हि भीती मला कधीच शिवलेली नव्हती. परंतु ६० च्या जवळपास असलेली मेट्रन सुद्धा त्या स्त्री शी जास्त एकरूपतेने इलाज करीत होती त्यावरून आणि तिच्या डोळ्यातून हि वस्तुस्थिती मला प्रकर्षाने जाणवली. स्त्रियांचे शरीर अल्कोहोलचे विघटन पटकन करू शकत नाही म्हणून तेवढ्याच प्रमाणात प्यायलेली दारू स्त्रियांना पटकन चढते.तसेच स्त्रियांचा मेंदू हा पुरुषांच्या मेंदू पेक्षा रचनेने/ निर्मितीने वेगळा असल्याने त्यावर दारूचा परिणाम पटकन आणि जास्त प्रमाणात असतो.याच कारणासाठी स्त्रियांनी मद्यपान करायचे असेल तर विश्वासू लोकांबरोबर आणि सुरक्षित जागी करावे असा सल्ला आहे.दारूचा परिणाम पोटात असलेल्या बाळावर अतिशय वाईट होत असल्याने गरोदर स्त्रियांनी किंवा गरोदर होण्याची तयारी करणाऱ्या स्त्रियांनी मुलीसुद्धा मद्य पण करू नये. केवळ एक पेग सुद्धा न जन्मलेल्या बाळाच्या मेंदूवर प्रतिकूल परिणाम करू शकतो असे नवीन संशोधनात आढळले आहे. तसेच अल्कोहोल हे आईच्या दुधात उतरत असल्याने दुध पाजणार्या आईने दारू मुळीच पिऊ नये.कारण बाळाच्या मेंदूची वाढ १ वार्हपर्यंत होत असते आणि या काळात मेंदूचा नाजूक सौन्द्नया केंद्रावर अल्कोहोल चा अतिशय वाईट परिणाम होतो.

In reply to by सुबोध खरे

सर्व साधारणपणे जगभर कोणत्याही संस्कृतीत स्त्रिया मद्य पान क्वचित/ कमी प्रमाणात करतात.
ह्यावर काही माहिती असल्यास वाचायला आवडेल. - (अभ्यासू)सोकाजी

In reply to by सोत्रि

... कारण प्रत्यक्षात निरीक्षणं थोडी वेगळी आहेत. धार्मिक नसणार्‍या पश्चिम युरोपात आणि त्यांच्या तुलनेत फार जास्त धार्मिक असणार्‍या अमेरिकेत सुशिक्षित स्त्रियाही व्यवस्थित दारू पिताना दिसतात. तिथल्या टीव्ही-चित्रपटांमधेही बायका दारू पिताना दिसतात. (भारतातही प्रसिद्ध झालेल्या 'फ्रेंड्स' या अमेरिकन मालिकेत तिन्ही मुख्य स्त्रिया दारू पिताना दाखवलेल्या आहेत.) योनीशुचितेचं त्यांच्याकडे स्तोम नाही, एका रात्रीपुरते संबंध ठेवण्याबद्दल तिथे टॅबू नाही या गोष्टी इथे महत्त्वाच्या असाव्यात. यूके, आयर्लंडमधे डॉक्टरच गर्भार स्त्रियांना मर्यादित प्रमाणात गिनेस बिअर घ्यायला सुचवतात (आणि अनेक आयरिश स्त्रिया हा सल्ला मानतात) असं ऐकून आहे. गिनेसमधे लोहाचं प्रमाण बरंच जास्त असतं. इथले काही आकडे चाळले; यूकेत स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी दारू पितात असं दिसलं. पण स्त्रियांचं दारू पिण्याचं प्रमाण दुर्लक्षणीय दिसत नाही. स्त्रियांना बिअर आवडत नाही या सामान्य समजाच्या उलट, अमेरिकेत होणार्‍या एका 'ऑक्टोबरफेस्ट'मधे स्त्री-पुरुषांची संख्या (मोजली नाही पण) दिसतानातरी साधारण सारखीच दिसली. (याउलट भारतात, दिवसाउजेडीही काही ठिकाणी, दारूपासून लांब असतानाही रस्त्यावर, ऑफिसांमधे बायका फार कमी आहेत असं जाणवलं आहे.) मुंबईमधे एकेकाळी पब/बारमधे गेले असता मुलींची संख्या अजिबातच कमी नव्हती. कातकरी समाजातल्या स्त्रियाही दारूच्या व्यसनाला बळी पडल्याचं पाहिलेलं आहे. ठाण्यातल्या हातावर पोट असणार्‍या समाजातलीही अशी उदाहरणं आहेत. काहींना व्यसन, काहींचं अवलंबित्त्व फार नाही. दारूची नशा वापरून बलात्कार होतात हे जेवढं खरं आहे तेवढंच खरं हे ही आहे की मैत्रिणीला दारू चढली तर दुसर्‍या दिवशीही तिच्या हँगओव्हरची काळजी घेणारे मित्र असतात. भारतातही असतात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत, माझा जपानमधील वास्तव्यातला अनुभव अदितीच्या मतांशी जुळणारा आहे. - (अधिक माहिती करून घेण्यास उत्सुक) सोकाजी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दारूची नशा वापरून बलात्कार होतात हे जेवढं खरं आहे तेवढंच खरं हे ही आहे की मैत्रिणीला दारू चढली तर दुसर्‍या दिवशीही तिच्या हँगओव्हरची काळजी घेणारे मित्र असतात.
"When a dog bites a man, that is not news. But if a man bites a dog, that is news." असो. सुबोध खरेंचे प्रतिसाद वाचनीय.

In reply to by दादा कोंडके

दादासाहेब खाली दिलेली अमेरिकेतील सरकारी आकडेवारी भयावह आहे. माझ्या दुसर्या प्रतिसादातील CDC अमेरिका मधील संदर्भातून घेतली आहे Each year, about 1 in 20 college women are sexually assaulted. Research suggests that there is an increase in the risk of rape or sexual assault when both the attacker and victim have used alcohol prior to the attack.18, 19 असे माझ्या बाबतीत होणार नाही हा फाजील आत्मविश्वास स्त्रियांना घातक ठरतो.अनोळखी जागी जुजबिच्या ओळखीच्या माणसांबरोबर दारू पिणे हे प्रगतीचे लक्षण नाही.ज्या माणसाबरोबर दारू पिता तो माणूस दारू प्यायल्यावर पशु होणार नाही हा फाजील आत्मविश्वासच नव्हे काय?

In reply to by सुबोध खरे

दारूच्या आणि अन्य अंमली पदार्थांच्या नशेचा वापर करून बलात्कार केले जातात हे मान्य आहे. फक्त त्याचा परिणाम किती असा प्रश्न आहे. म्हणजे नशेत नसणार्‍या किती स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होतात आणि किती नशेत असणार्‍या किती स्त्रियांवर अत्याचार होतात. किती दारू प्यायलेली आहे हे ही महत्त्वाचं कारण एक ग्लास वाईन/एक पाईंट बिअर किंवा equivalent (मराठी?) दारू पिऊन गाडी चालवण्याचीही अनुमती अमेरिकेत आहे. (हे शरीराचं वस्तूमान ~६० किलो असल्यास). थोडक्यात हँड-आय कोऑर्डीनेशनही एकाच प्याल्यात जात नाही असा त्यांचा विदा.
असे माझ्या बाबतीत होणार नाही हा फाजील आत्मविश्वास स्त्रियांना घातक ठरतो.अनोळखी जागी जुजबिच्या ओळखीच्या माणसांबरोबर दारू पिणे हे प्रगतीचे लक्षण नाही.
असा विश्वास निर्माण होणं हे समाजाच्या प्रगतीचं लक्षण का नाही? पुरुषांना त्यांची लैंगिक भावना ताब्यात ठेवता येणं याला प्रगती का म्हणू नये? आणि मनुष्यांचं वर्तन खरोखरच दारूमुळे बदलतं का फक्त दाबून ठेवलेल्या भावना मेंदूवरचा ताबा सुटल्यामुळे उफाळून येतात? स्त्रिया असहाय्य परिस्थितीत फक्त दारूमुळेच जातात असं नव्हे. आणि सगळेच पुरुष असहाय्य स्त्रियांचा गैरफायदा घेणारे असतात असंही नाही. (आणि आयुष्याचा बहुतांश काळ स्त्रिया गर्भार होण्यास उत्सुक किंवा गर्भवती किंवा दूध पाजत नसतात. 'हम दो-हमारा एक'च्या जमान्यात तर नाहीच; साधारण ५०-६० वर्षांच्या अडल्ट आयुष्यातली दोन वर्ष फारतर!)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असा विश्वास निर्माण होणं हे समाजाच्या प्रगतीचं लक्षण का नाही?
नाही. जुजबी ओळखीच्या माणसावर आंधळा विश्वास ठेवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे, प्रगतीचे नाही. सुबोध काकांनी शब्द मोजून मापून वापरले आहेत. परत एकदा वाचून बघ.
पुरुषांना त्यांची लैंगिक भावना ताब्यात ठेवता येणं याला प्रगती का म्हणू नये?
प्रगती नाही, प्रगल्भता म्हणता येईल. पण इतरांच्या प्रगल्भतेवर/अप्रगल्भतेवर आपला ताबा नसतो.
मनुष्यांचं वर्तन खरोखरच दारूमुळे बदलतं का फक्त दाबून ठेवलेल्या भावना मेंदूवरचा ताबा सुटल्यामुळे उफाळून येतात?
कशामुळेही बदलले वर्तन तरी बलात्काराच्या परिणामात काही फरक पडणार आहे का ?? कॉज आणि इफेक्ट याची गल्लत करू नये.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

जुजबी ओळखीच्या माणसावर आंधळा विश्वास ठेवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे, प्रगतीचे नाही.
जुजबी ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपण बसमधून प्रवास करतो, गप्पागोष्टी करतो, टपरीवर चहा-शिग्रेटही होते. दारू पिणं तेवढं वाईट. (कारण दारू पिणं म्हणजे दारू पिऊन डायरेक्ट झिंगणं असंच असावं. वाईन टेस्टिंग, (ब्रिटीश पद्धतीच्या) पबमधे दारू विकत घेता-घेता वाढणार्‍या ओळखी, दारू पिऊन तात्पुरत्या वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर नेहेमीचा लाजाळू स्वभाव सोडून लोकांशी दिलखुलास बोलणं वगैरे सेन्सिबल गोष्टी येतच नसाव्यात. बाकी घरच्या आणि घरच्यांसारख्या जवळच्या लोकांबरोबर भरपूर दारू पिण्यातली मजा काय हे तर सांगतच नाही. लगेचच बलात्कार्‍यांमधे बहुतेक वेळा ओळखीचेच लोक असतात असं सांगितलं जाईल.) दादा कोंडकेंनी वर लिहीलेलं आहेच, कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही, कुत्र्याला माणूस चावला ही बातमी होते. दारू पाजून मैत्रिणीवर बलात्कार केला ही बातमी असते. दारू चढलेल्या मैत्रिणीची काळजी मित्राने घेतली ही बातमी होत नाही. त्यातून मुळातच बदनाम दारूची अधिक बदनामीही सहजच करता येणार.
पुरुषांना त्यांची लैंगिक भावना ताब्यात ठेवता येणं याला प्रगती का म्हणू नये?
दिल्लीच्या प्रकारानंतर 'लोकसत्ता'च्या पुरवणीत मंगला सामंत यांचे दोन लेख आले होते. एक, दोन. हे जरूर वाचावेत. ही जी प्रगती आहे ही संपूर्ण समाजाची आहे, एकदोघांची आर्थिक, शैक्षणिक उन्नती नाही.
कशामुळेही बदलले वर्तन तरी बलात्काराच्या परिणामात काही फरक पडणार आहे का ?? कॉज आणि इफेक्ट याची गल्लत करू नये.
ही गल्लत कोण करतंय? बलात्कार होण्यामागची कारणं काय आहेत? बलात्काराचे त्या स्त्रीवर जे परिणाम होतात त्यात चूक तिची असते का पुराण्या, खुळचट कल्पनांना चिकटून रहाणार्‍या समाजाची? पीडीत व्यक्तीलाच दोषी मानणं तर सगळ्यात सोपं; ती आधीच अपमान झाल्यामुळे हादरलेली असते. मंगला सामंत काय म्हणतात, सामाजिक शास्त्राचे इतर अभ्यासक काहीही का म्हणेनात! दुवा 'निर्भया', सोहेला अब्दुलाली (दुवा एक, दुवा दोन) दारू प्यायलेल्या होत्या, रोज पेपरात "दारूच्या नशेतल्या स्त्रीवर बलात्कार झाला" अशीच बातमी असते. त्यात ती एकटी असते, लाचार असते, चार पुरुषांसमोर तिची शारीरिक शक्ती कमी पडते, तिला फसवून कोणीतरी तिच्या घरात शिरतं, असे काहीही तपशील त्यात नसतातच. साधा प्रश्न आहे, किती टक्के बलात्कारांमधे 'बाईच्या दारूची नशा' हे मुख्य कारण आहे असं दिसतं? --- What is this fuss about? योनीशुचिता, बलात्कार म्हणजे त्या स्त्रीचं आयुष्य बरबाद होतं इ. भोंगळ कल्पना असणार्‍या समाजात दारूचा संबंध बलात्काराशी लावला जातो याचं खरंतर मला पुनःपुन्हा आश्चर्य वाटू नये, पण साली सवयीची गुलामगिरी संपत नाही. कोणीतरी बलात्कार करेल म्हणून बायांनी दारू प्यायची नाही, स्वतःला आवडतील, आनंद होईल असे कपडे घालायचे नाहीत, बुरखे नाहीतर कथकलीचे बोंगे घालून फिरायचं, सातच्या आत घरात यायचं, एकटीदुकटीने फिरायचं नाही, गुवाहाटीच्या पबमधे जाऊन पुरुषांशी वाद तर अजिबातच घालायचा नाही, व्हॅलेण्टाईन डे साजरा करायचा नाही ... सगळ्या मुक्त स्त्रियांनी मग सौदी अरेबियातच जाऊन का राहू नये? निदान तिथे पेट्रोलतरी स्वस्त आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती ताई , माझा स्त्रियांनी दारू पिण्याबद्दल मुळीच आक्षेप नाही.त्यांना आनंदासाठी मद्यप्राशन करावेसे वाटत असेल तर त्यांनी ते जरूर करावे. केवळ एका विशिष्ट छोट्याशा कालावधीसाठी ( गरोदर होण्याच्या अगोदर) त्यांनी आपल्या होणार्या बाळाच्या मेंदू साठी ते करू नये असा मी (फुकटचा/ अनाहूत) सल्ला!! दिला आणि त्या शब्द बद्दल दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. माझे म्हणणे फक्त एवढेच आहे कि स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्या आधी दोन वेळा विचार करावा.याचे कारण चूक त्यांची नसून समाजाची विकृत दृष्टी आहे. एखादी स्त्री सिगारेट किंवा दारू पीत असेल तर ती उपलब्ध(AVAILABLE) आहे असा विकृत अर्थ भारतातील पुरुष काढतात हि खेदाची गोष्ट आहे. बलात्कारात स्त्रीची नशा नसून पुरुषांची नशा हि मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. आपण जर मूळ/ नैसर्गिक प्रवृत्ती(instinct) पहिले तर आहार निद्रा भय नि मैथुन या मूळ प्रवृत्ती आहेत या चा विपर्यास झाल्यास माणूस विकृत वर्तन करताना आढळतो. उदा झोप, भूक, भीती किंवा लैंगिक भूक अनावर झाली तर माणसाच्या हातून गैरवर्तन होते.दारू मुळे सद्सदविवेक बुद्धी शिथिल होते आणि मेंदू ची काही केंद्रे उत्तेजित होतात त्यामुळे शेळी असलेला माणूस सुद्धा गैरकृत्ये करण्यास धजावू शकतो. म्हणून सार्वजनिक ठिकाणी जुजबीच्या ओळखीच्या माणसाबरोबर मद्य प्राशन करणे हे प्रगतीचे लक्षण नाही असे मी म्हटले आहे. कारण जुजबिच्या ओळखीचा माणूस आपल्यासाठी इतर नरपशू विरुद्ध किती मदत करील याची शंका वाटते. उलट्या दिशेने जोरात येणाऱ्या ट्रकशी वाद घालण्यापेक्षा त्याच्या रस्त्यातून बाजूला होणे हे दुचाकी वाहनास जास्त श्रेयस्कर असते.कारण कोण चूक आणि कोण बरोबर याचा निवाडा करण्याची ती वेळ नाही. पुरुषांच्या लैंगिक प्रवृत्तीवर ताबा ठेवणे हि मंगलताई म्हणतात तितकी सोपी गोष्ट असती तर प्रत्येक डॉक्टर ला किंवा पोलिस ला स्त्रियांची तपासणी करण्यासाठी आणखी एक स्त्री हजर राहणे(LADY ATTENDANT) "जगभरात" बंधनकारक ठेवले नसते शेवटी हि स्वयंचलित (AUTONOMIC) मज्जासंस्था आहे आणि ती आपल्या मेंदूच्या अखत्यारीत येत नाही. तरुणपणात विरुद्ध लिंगी सुंदर व्यक्तीचा साधा स्पर्श सुद्धा विजेचा झटका देतो.तेंव्हा आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीवर ताबा मिळवणे वाटते इतके सोपे नाही.मर्यादा पुरुषोत्तम फार क्वचित मिळतात. आपला सात्विक संताप समजू शकतो.पण हे जग आपण म्हणता तितके समतोल आणि न्याय्य नाही हि दुर्दैवी गोष्ट आहे आणि भारतात विशेषतः उत्तर भारतात स्त्री हि उपभोग्य वस्तू मानली गेल्याने चूक कोण आणि बरोबर कोण हे न पाहता स्त्री लाच दोषी ठरवले जाते. मी हा विषय माझ्यापुरता संपवला होता पण आपला सात्विक संताप पाहून मला उत्तर् द्यावेसे वाटले. क लो अ.गैर समज नसावा

In reply to by सुबोध खरे

आमच्या गावात होळी व धुळवड अशी साजरी करतात. जर्मनीच्या अनेक प्रमुख शहरात धुळवड साजरी करतात ,त्यांच्या पद्धतीने ह्या वर्षी मी पण जाणार आहे , पाण्याशिवाय होळी खेळायला रंगात नाहून निघायला , पाण्यापेक्षा बियर समवेत होळी साजरी होणार. सगळ्यांना खुले आमंत्रण आहे , येथे बियर चे प्याले रिचवले जातात पण डॉक्टर साहेबांनी जे सनातन विचार सोत्री ह्यांच्या धाग्यात मांडले तसे अती दारू महिला व पुरुषांनी एकत्र पियुन सुद्धा येथे गैर प्रकार होत नाहीत ,ऑक्टोबर फेस्ट मध्ये सुद्धा होत नाहीत , अनेक बायका तेथे दारवा रिचवतात , त्यांच्या कामेच्छा वाढल्या नाहीत व मी दोन वेळा तेथे होतो , माझ्या बाबतीत काहीही दुखद घटना न घडता घरी परत आलो , निदान येथील महिलांनी व पुरुषांनी डॉक्टरांची मते वाचली असती तर माझ्या सारख्या अनोळखी व्यक्ती च्या बाजूला बसून मद्याचे प्याले रिचवले नसते गैर प्रकाराला दारू पेक्षा समाज व त्याची मानसिकता , महिलांच्या प्रती वागणूक जो आदितीचा मुद्दा होता ,ते जबाबदार असतात , उगाच दारूला बदनाम कशाला करायचे . ,विषय माझ्या हि दृष्टीने संपला होता ,पण तुम्ही दारू बाबतीत जे अगाध मत मांडले म्हणून परत लिहिले , ज्या समाजात महिला व पुरुषांना समान संधी व महत्व आहे , जेथे महिला व पुरुष पूर्ण शुध्धीत एकाच रेल्वेच्या डब्यातून सुरक्षित रीत्या प्रवास करू शकतात , असा प्रगत समाज माझ्या मते अदितीला अभिप्रेत होता , Drunk Woman Showing Tongueह्यात भारताला कमी लेखण्याचा प्रश्न नाही , प्रत्येक समाजाच्या काही समस्या असतात , काही उणीवा असतात पण महिलांचे समाजात स्थान ह्या मुद्यावर येथील समाज नक्कीच प्रगल्भ आहे. आपल्याकडे उगाच दारूवर नाहक खापर फोडण्यात येते तेव्हा राहवत नाही , हरिवंश बच्चन ह्यांच्या मधुशाला मधील रुबाली एकदा वाचाच ,दारू सारखी निर्मळ गोष्ट जगात नाही. जीचा डबल पेग मारला की विवाहित पुरुषाला क्षणार्धात सिंगल झाल्याचा क्षणिक आनंद मिळतो , बालक पालक सारखा सिनेमा पाहून जनता प्रभावित होते ,पण सरकार होत नाही , आणि ते चुकून झाले तर विरोधक राजकारणाच्या पायी झालेले निर्णय रद्द करायला लावतात.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद- खुप दिवसांपासुन चर्चा वाचतोय. तुमचे आंतरराष्ट्रिय घडामोडींवरचे प्रतिसाद वाचनीय असतात. मी ते आवर्जुन वाचतो. पण इथे तुम्ही काहीच्या काही भरकटला आहात असे माझे स्पष्ट मत आहे. डॉ. खरे ह्यांनी दारु प्यायल्याने काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे सांगितलं आहे. त्याचा स्वत:ला वाट्टेल तसा अर्थ प्लीज लावुन घेऊ नका. भारतात स्त्री पुरुष समानता नाही हे वास्तव आहे. ती यायला हवी हे १००% मान्य. पण जो पर्यंत ती येत नाही, तो पर्यंत स्त्रीयांनी स्वतःला सांभाळुन राहिलं पाहिजे हे तर तुम्हीही मान्य कराल. बाकी मिपावरील काही स्त्री आयडींबद्दल बोलायला नको. पेठकर काकांनी खुप पुर्वी अशाच काळजीपोटी सल्ला दिला होता तर एक स्त्री आयडी त्यांच्यावर गरज नसताना टीका करत होता. अर्थात मेजॉरिटी लोकांना पेठकर काकांचे बोलणे व्यवस्थित समजले असल्याने त्या आयडीवरच लोकं हसत होते. त्याच आयडीने हा प्रयत्न वर केला आहे. तुम्ही प्लीज वैयक्तिक मतं बाजुला ठेवुन डॉ खरेंचा प्रतिसाद वाचा. अनोळखी लोकांबरोबर दारु पिऊ नये असे सांगण्यात काय चुक आहे ? ते स्वतः डॉक्टर आहेत, दारुचे दुष्परिणाम त्यांना आपल्या सर्वांपेक्षा जास्त माहित आहेत. तुम्ही लगेच श्रीखंड पुरी, मिसळ आणि दारुची तुलना कोणत्या लॉजिकने करताय ? आज तुमचा एक चाहतावर्ग आहे, ज्यात मी पण येतो. उद्या त्यातील एखादा जर मी पण दारु पिऊन बघतो असं म्हणत त्याच्या आहारी गेला तर ? तुम्ही स्वतःला व्य्वस्थित कंट्रोल करत दारु पिताय, काय गॅरेंटी आहे की दुसरा माणुस पण तसंच करेल ? तेव्हा प्लीज गैरसमज करु नका. दारु प्रमाणाबाहेर घेतली की मेंदुवरचा कंट्रोल जातो हे शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या सारखा किंवा पेठकर काकांसारखा कंट्रोल सगळ्यांचा नसतो. तेव्हा दारु प्यायल्याने काहीही होत नाही असं प्लीज बोलु नका. श्रीखंड किंवा मिसळ जास्त खाल्ली तरी माणुस गैरवर्तन करुन चेष्टेचा विषय होत नाही, त्यामुळे प्लीज अशी तुलना करु नका. डॉ खरेंनी ओव्हरऑल काळजीपोटी वरील स्टेटमेंट केली आहेत. त्यांना प्लीज उपदेश वगैरेचे लेबल लावु नका. बाकी आपण सुज्ञ आहातच. आपल्या सद्सदविवेकबुद्धिला जे योग्य वाटेल ते कराल अशी आशा आहे.

In reply to by अमोल खरे

श्रीखंड किंवा मिसळ जास्त खाल्ली तरी माणुस गैरवर्तन करुन चेष्टेचा विषय होत नाही
नेमका आक्षेप कळला नाही. म्हणजे दारु पिऊन माणूसाने गैरवर्तन केले नाही आणि चेष्टेचा विषय झाला नाही तर दारु आपोआप चांगली मानली जाईल का?
पण इथे तुम्ही काहीच्या काही भरकटला आहात असे माझे स्पष्ट मत आहे
माझेही असेच मत आहे पण ते तुमच्या प्रतिसादांबद्दल आहे. नाण्याला जशा दोन बाजू असतात तश्याच त्या दारु बद्दलही असणारच ना? डॉक्टर जशी एक बाजू मांडत आहेत (काळजीपोटी) तशीच निनादही त्याची बाजू मांडत आहे (जो मूळ लेखाचाही उद्देश होता). त्यामुळे फक्त डॉक्टरच बरोबर आणि निनाद भरकटला आहे हे जरा अवास्तव वाटते. - (सद्सदविवेकबुद्धिला जे योग्य वाटेल तेच करणारा) सोकाजी अवांतरः प्रतिसादातिल बाकीचे वैयक्तिक उल्लेखही भरकटलेले वाटले.

In reply to by अमोल खरे

भारतात स्त्री पुरुष समानता नाही हे वास्तव आहे.
मेजॉरिटी लोकांना पेठकर काकांचे बोलणे व्यवस्थित समजले असल्याने त्या आयडीवरच लोकं हसत होते
खरे, तुमची ही वाक्य निवडून पुन्हा चोप्य-पस्ते करण्यामागची तर्कविसंगती आपली आपणच समजेल का तेव्हा तोफ डागल्यानंतर जसा मेलोड्रामा केला गेला होता तसा केल्याशिवाय काहीच समजत नाही? (तुम्हाला नाही समजलं तर आग्रह नाही; पाशवी शक्ती असला मेलोड्रामा करत नाहीत.) --- डॉक, दारूचे दुष्परिणाम मला माहित नाहीत असं अजिबात नाही; पुस्तकं वाचून आणि प्रात्यक्षिकातूनही! तसं म्हटलं तर कोणतीही गोष्ट अति करण्याचे दुष्परीणाम असतात आणि दोन-चार क्लिक करून कोणत्याही सुशिक्षित माणसाला ते समजू शकतात. प्रमाणात घेतलेली व्हिस्की, रम, व्होडकात फार काही पोषण नसतं हे मलाही माहित आहे. (रक्त वारूणी सोडूनच देऊ तिच्यातून शरीराला आवश्यक असे काही पोषक पदार्थ मिळतातच.) पण प्रमाणात आणि/किंवा वर्तन ताब्यात ठेऊन दारू पिऊन लोकांना जो आनंद मिळतो तो ही विटाळलेला आहे अशी भूमिका घेणं कितपत योग्य आहे? अशीच भूमिका ज्या शारीरिक संबंधांतून मूल होणार नाही त्यांच्याबद्दल ख्रिश्चन धर्माने घेतलेली होती/आहे. एकेकाळी विधवेने आनंददायक कोणतीही गोष्ट करू नये, शरीराचे काहीही लाड करू नयेत असं आपल्याच समाजात समजत असत. "शिरापुरी फार चापू नका" असं जे तुम्ही लठ्ठ रुग्णांना सांगत असाल तीच गोष्ट लोकं तरूण विधवांना एक घासही खाण्यापासून थांबवण्यासाठी सांगायचे. दारूड्याला जी गोष्ट सांगता तीच गोष्ट हेल्दी लाईफस्टाईल असणार्‍यांना सांगता का? ही आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी नाही का? प्रमाणात दारू पिणारे लोकं तुम्ही फार पाहिले नसतील, मी आत्तापर्यंत एकाही माणसाला दारू पिऊन दुर्वतन करताना पाहिलेलं नाहीये. एखाद्याला दारू जास्त झालीच तर स्त्रियांसमोर बेईज्जती व्हायला नको म्हणून अधिक काळजी घेताना, लाजताना पाहिलेलं आहे. आपल्या व्यवसाय-शिक्षणामुळे आपल्याला समाजाच्या वेगवेगळ्या थरांमधली माणसं दिसणार. म्हणूनच मी आधीच्या प्रतिसादात वाईन-टेस्टींग, पबमधला दिलखुलास व्यवहार यांचा उल्लेख केला. हा लेखही दारूच्या शैक्षणिक बाजूबद्दल आहे, अतिसेवनासंदर्भात नाही. तरीही दारू वाईटच असा सरसकटीकरणाचा धोका विज्ञानाचं शिक्षण घेतलेला माणूस घेतो हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. पेनिसिलीनचाही ओव्हरडोस होऊ नये याची काळजी घेतात ना? सात्त्विक संताप? माझा रोजच्या रोज सात्त्विकच काय प्रत्यक्ष संताप होतो. रोज कोणीतरी हरामखोर, बाईने अंगभर कपडे घातले असले तरी तिने कपडे घातलेले नाहीच अशा पद्धतीने तिच्याकडे पहाताना भारतात दिसतो तेव्हा संताप होतो. आणि पुन्हा संस्कृतीचा ठेका घेतलेले स्वयंघोषित मुतव्वे त्या हरामखोरांचा फारतर त्यांच्या मागे निषेध करून "तुम्ही अजून थोडे कपडे का घालत नाही? आम्ही तुमच्या काळजीपोटीच बोलतो" असं त्या बायांनाच म्हणताना भयंकर हास्यास्पद वाटतात. सोहेला अब्दुलालीने आपल्या पोलिसांनी, न्यायव्यवस्थेने तिच्याशी काय वर्तन केलं ते लिहीलेलं आहेच; आणि आता ३२ वर्षांनी आपण तिथेच! या असल्या हास्यास्पद मुतव्व्यांना चुपचाप मधलं बोट दाखवणारा जाफर पनाही अजून १८ वर्ष नजरकैदेत अडकून पडलेला असेल या विचाराने थरकाप होतो. बहुदा इराणमधला "मेजॉरिटी" शिक्षित वर्गही या मुतव्व्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती ताई मी लष्करात २३ वर्षे काढलेली आहेत तेथे प्रत्येक पार्टीत दारू हि असतेच आणि त्याला कोणत्याही तर्हेचा taboo नाही. काश्रात एखादा अधिकारी दारू पिउन तर्र झाला तर दुसर्या दिवशी त्याला कमांडिंग अधिकाऱ्या कडून समाज दिली जाते आणि जर तो सुधारला नाही तर त्याच्या पार्टीत दारू पिण्यावर नियंत्रण आणले जाते अति झाले तर त्यावर पूर्ण बंदी पण आणली जाते. त्यामुळे प्रमाणात पिणारे लोक मी शेकड्यांनी/हजारांनी पाहिलेले आहेत. दारू पिऊन लोकांना जो आनंद मिळतो तो ही विटाळलेला आहे अशी भूमिका मी कुठे घेतली हे मला दाखवाल का?मी फक्त एवढेच म्हणत आहे कि दारू पिणे किंवा न पिणे या दोन्ही गोष्टी उदात्ततेच्या पातळीवर आणू नका. ज्यांना दारू प्यायची नाही त्यांना कमी लेखू नका तसेच जे दसरू पितात ते फार गुन्हा करीत आहेत असेही म्हणू नका विधवा स्त्रियांची परिस्थिती फारच वाईट होती/ आहे याचा इथे काय संबंध आहे? हे कळले नाही. मी आत्तापर्यंत एकाही माणसाला दारू पिऊन दुर्वतन करताना पाहिलेलं नाहीये.हि मला जरा अतिशयोक्ती वाटते. "तरीही दारू वाईटच असा सरसकटीकरणाचा धोका विज्ञानाचं शिक्षण घेतलेला माणूस घेतो हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे" कोणत्याही औषधाचे हे परिणाम असतात तसेच दुष्परिणाम हि असतातच पण औषधाचे परिणाम जर दुष्परिणामापेक्षा जास्त असतील तरच ते वापरले जाते.दुर्दैवाने दारूचे परिणाम आणि दुष्परिणाम यात दुष्परीणामाचे पारडे जड आहे म्हणून दारूला अन्न किंवा औषधाच्या पातळीवर आणणे बरोबर नाही असे मला वाटते बाकी सर्वजन सुजाण आहेतच आपला अज्ञानी सुबोध

In reply to by सुबोध खरे

धाग्याचा विषय दारू म्हणजे काय असा आहे. दारू पिणे चांगले की वाईट असा नाही. तरीही मोठा अहं ने इथे प्रतिसाद येताहेत व मूळ ज्ञानात्मक धागा बाजूला पडून सगळेच बर्ट्राड रसेल असल्यासारखे अवांतरा मागे धावयायत ! मग मी मागे का राहू ? दारू मी पिऊन बघितलेली आहे अगदी काही ही न घालता. त्यावेळी जबर भिजलो होतो पावसात म्हणून प्यालो थोडीशी व खरंच सांगतो मस्त गरम वाटलो. बाकी चवीला म्हणाल तर उसाचा ताजा रस मला दारूच्या चवीपेक्षा जास्त आवडतो. दारू प्यायल्याने अगदी वाताहत झालेली आयुष्य आहूबाजूला पाहिली आहेत. पण दारू पिणे ही काय हीन दर्जाची सवय आहे असे मला वाटत नाही. मला दारू आवडत नाही हे नक्की. शेवटी अतिरेकी परमेशवर भक्तीने तासंतास पूजा करीत बसणे व जराही व्यायाम न करणे यात निसर्ग कोणत्या माणसाच्या बाजूने कौल देईल हे महत्वाचे ! अति सर्वत्र वर्जयेत. अतिरेकी आईसक्रीम खाल्याने खाणार्‍याच्या शरीरात चरबी वाढेल पण आएसक्रीमच्या प्रभावाखाली बायकोला मारहाण केली अशी बातमी आपण कोणी वाचली आहे का? दारू व ततत्सम भाउबंद व इतर पदार्थांचा अतिरेक यात आपहानी , परहानी असा फरक नक्कीच आहे.

In reply to by चौकटराजा

धाग्याचा विषय दारू म्हणजे काय असा आहे. दारू पिणे चांगले की वाईट असा नाही. तरीही मोठा अहं माझ्या आक्षेपाचे सार एका वाक्यात मांडल्याबद्दल विशेष आभार सोत्री ह्यांचे पूर्वीचे धागे काढून पहा , अनेक मान्यवर दारू न पिणाऱ्या माणसांनी त्यावर दिलखुलास प्रतिसाद दिले आहे कारण त्यांना सोत्री ह्यांच्या धाग्याचे उद्दिष्ट चांगलेच ठाऊक असते.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद, या धाग्यावरचे तुझे प्रतिसाद विनाकारण अग्रेसिव्ह आहेत. तुला मते मांडायची आहेत, मांड. समोरचा भांडत असेल तर तू ही भांड. पण सुबोध खरे इतक्या व्यवस्थितपणे आणि शांतपणे मुद्दे मांडत असताना, तुझे बोलणे उगाचच तिरकस झाले आहे. सदर मुद्दा इतका मनाला लावून घ्यायचे काही खास कारण नाही. He has his opinion. You have your. You can agree to disagree. खरे पाहता त्यांनी काही गरज नसताना वर एकदा माफी पण मागितली आहे. असे असताना तू अजूनही काहीश्या अनादराने लिहितो आहेस. थोडा शांत होऊन विचार कर. इथे अनेक जणांनी तुझे वागणे पटले नाही असे लिहिले आहे वर. मिपावर तुझा चाहता वर्ग आहे. आणि गेली २ वर्षे अभ्यासपूर्ण प्रतिसाद देऊन तू तो निर्माण केला आहेस. तुझ्याबद्दल एक प्रकारची आपुलकी या लोकांना आहे म्हणून तुला सांगताहेत, नाहीतर सरळ दुर्लक्ष केले असते. आणि हो, मुद्द्यावरून चर्चा करताना आकांडतांडव, आक्रस्ताळेपणा करणे हे पाशवी शक्तींचे काम आहे. तुझा आयडी ह्याक तर नाही ना केला कुणा पाशवी शक्तीने ;-) (ह घ्या रे सगळ्यांनी)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणीतरी बलात्कार करेल म्हणून बायांनी दारू प्यायची नाही, स्वतःला आवडतील, आनंद होईल असे कपडे घालायचे नाहीत, बुरखे नाहीतर कथकलीचे बोंगे घालून फिरायचं, सातच्या आत घरात यायचं, एकटीदुकटीने फिरायचं नाही, गुवाहाटीच्या पबमधे जाऊन पुरुषांशी वाद तर अजिबातच घालायचा नाही, व्हॅलेण्टाईन डे साजरा करायचा नाही ...
हवे ते घाला हो बायांनो. माझ्या डोक्याची काशी घातली जाण्याच्या आत थांबतो. जे बोललो त्यापेक्षा स्पष्ट बोलण्याची ताकद आता माझ्यात नाही. जितं त्वया !!! अभिनंदन....

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

जितं त्वया !!! अभिनंदन....
विमे, हे काही झेपले नाही. असा प्रतिसाद तुमच्याकडून यावा हे पटत नाही. कितीही मतभेद असले तरीही इथे सगळे वाद - प्रतिवाद हे जिंकण्यासाठी असतात का? - (समंजस) सोकाजी

In reply to by सोत्रि

मी हे वाद प्रतिवाद जिंकण्यासाठी करत नाही. पण इथे समोरचा तसे करत असेल असे वाटले म्हणून माघार घेतली. वादात प्रवीण असलेला माणूस काहीही सिद्ध करू शकतो. माझा एक मित्र आहे, तो वादविवाद स्पर्धेत तो कुठल्याही बाजूने वाद घालून जिंकू शकतो. पण मला असले वांझोटे वाद घालण्यात रस नाही. कारण त्याने जिंकण्याचे समाधान मिळते, पण त्यापुढे काहीच होत नाही. "मी आत्तापर्यंत एकाही माणसाला दारू पिऊन दुर्वतन करताना पाहिलेलं नाहीये." हे विधान विनोद म्हणून ऐकू, खोटे बोलण्याचा प्रकार समजू की अत्यंत मर्यादित अनुभवविश्व आणि त्याहून मर्यादित कल्पनाशक्ती याचा अनोखा संगम समजू, हे कळले नाही. शिवाय एका विशिष्ट विधानाला प्रतिवाद करताना उलट्या बाजूला तर्क ताणून धरणे आणि केवळ आपल्याला सोयीस्कर अर्थ काढून वाद घालणे हे माझ्या दृष्टीने निरर्थक आहे. म्हणून तत्सम कारणांनी माझ्या बाजूने वाद बंद केला. एकूणच मिपावर वाद घालायचा आताशा कंटाळा येतो. :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एकूणच मिपावर वाद घालायचा आताशा कंटाळा येतो. > सहमत. म्हणूनच मी गप्प बसलेय. :)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

खरं आहे विमे. मागे एका धाग्यावर (मला वाटतं गांधी आणि मल्ल्या) असाच वाद झाला होता, तात्या सरपंच होता तेव्हाची गोष्ट. दारुचं विनाकारण उदात्तीकरण चालू होतं. तेव्हा ते खटकलंच आणि आताही. दोन टोकांवर बसून वाद घालायचा असेल तर दोन्ही बाजूंनी विदे काढता येतील, पण शेवटी ह्या वादात हशील काय ते महत्त्वाचं. असो तर आपल्याला, भारताच्या चौकटीत विचार करायची सवय त्यामुळे हातभट्टी च्या दारुने मेल्यामुळे देशोधडीला लागलेली कुटूंब, दारुच्या आहारी जाऊन त्यातून आलेला कफल्लकपणा, अख्ख्या कुटूंबाची वाताहात हे सगळं जवळून बघतोय, वर्षानुवर्ष. सुरुवात बापाच्या पैशाने चांगल्या प्रकारच्या दारुवर आणि मग दारूच्या आहारी जाऊन घरादाराची विल्हेवाट इतकी की कुटुंब रस्त्यावर यावं अशी माझ्या पहाणीत ७-८ मराठी (सो कॉल्ड उच्चवर्णीय) कुटुंब आहेत (सॉरी विदा मागू नये!)सध्या कोकणात हे प्रमाण अगदी अंगावर येईल असं आहे. मोलमजुरी करुन (नशापाणी करुन नवहे) घरासाठी पैसे कमवणे, मुलांना शिकवणे अशी काम स्त्री करतेय आणि नवरा नुसता बेवडा मारुन राहतो हे दृश्य नवीन आहे का? प्रसंगी अशा कुटुंबाच्या पोशिंदा बायका बेवड्या नवर्याच्याही कानाखाली मारायला कमी करत नाहीत, ही खरी स्त्री मुक्ती. हे चित्र आपल्या भारतिय समाजात आजही आहे हे आपण मान्यच करणार नसू तर आपण समाजसुधारणेच्या बाता मारणं सोडून द्यायला हवं. दारु चांगली की वाईट ही व्यक्तिसापेक्ष आहेच पण समाजसापेक्षही आहे हे कधी कळणार आपल्याला? भारता संदर्भात विचार केला तर दारूचं आणि ती पिण्याच उदात्तीकरण होऊ नये असं कळकळीने वाटतं आणि म्हणूनच सचिन जेव्हा मद्याच्या जाहिराती नाकारतो तेव्हा सचिनविषयीचा अभिमान निश्चितच दुणावतो. असो!

In reply to by सोत्रि

काही महत्त्वाच्या लिंक्स खाली देत आहे जरूर वाचाव्या. संस्कृती (वा स्वैराचार) हा शब्द महत्त्वाचा आहे अतिविकसित(sophisticated )जगातील स्थिती वेगळी आहे http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-08-07/india/33081997_1… http://www.sciencedaily.com/releases/2009/02/090224163555.htm http://www.cdc.gov/alcohol/fact-sheets/womens-health.htm

In reply to by सुबोध खरे

सर्व लिंक्स वाचल्या. पण माझा मूळ प्रश्न खालच्या वाक्यातल्या बोल्ड केलेल्या मतावर होता.
सर्व साधारणपणे जगभर कोणत्याही संस्कृतीत स्त्रिया मद्य पान क्वचित/ कमी प्रमाणात करतात.
त्याचे उत्तर त्य लिंक्स मध्ये मिळाले नाही. त्यात अल्कोहोल स्त्रियांसाठी शारिरीकदृष्ट्या कसे हितकारक नाही हे आहे. - (शंकेखोर) सोकाजी

In reply to by सोत्रि

पहिली लिंक (TIMES OF INDIA ची) भारतातील विविध राज्यातील मद्यप्राशनाची आकडेवारी आहे. खालील आकडेवारी जगभरातील आहे http://www.who.int/substance_abuse/publications/globalstatusreportalcoh… http://www.greenfacts.org/en/alcohol/figtableboxes/table6.htm

In reply to by सुबोध खरे

ग्रीनफॅक्ट्स च्या दुव्याबद्दल धन्यवाद! टक्कट्वारीचे प्रमाण त्या त्या देशातील सामाजिक परिस्थिती आणि वैचारिक भूमिकेशी समरुप आहे -(आभारी) सोकाजी

In reply to by सुबोध खरे

ही संस्कृती वा स्वैराचार ह्याची व्याख्या कोण आणि कशी ठरवते? - (शंकेखोर) सोकाजी

In reply to by सोत्रि

संस्कृती वा स्वैराचार ह्याची व्याख्या कोण आणि कशी ठरवते? >> जास्तीची मेजॉरीटी ....

In reply to by सुबोध खरे

सर्व साधारणपणे जगभर कोणत्याही संस्कृतीत स्त्रिया मद्य पान क्वचित/ कमी प्रमाणात करतात.
ह्यावर काही माहिती असल्यास वाचायला आवडेल. - (अभ्यासू)सोकाजी

In reply to by सोत्रि

According to a 2009 article in journal The Lancet, Indians, officially, are still among the world's lowest consumers of alcohol - government statistics show only 21 percent of adult men and around two percent of women drink. But up to a fifth of this group - about 14 million people - are dependent drinkers requiring "help". Read more at: http://indiatoday.intoday.in/story/drink-dependence-up-in-urban-indian-…

In reply to by पैसा

हे नव्हे, सुबोध खरे जे म्हणाले त्यावर विदा हवा असे म्हणालो मी. लिंकमधला लेख त्यांच्या म्हणण्याच्या अगदी उलट आहे. -(अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

साहेब आपल्याला द्यायचा प्रतिसाद चुकून दादासाहेबांच्या ( दादा कोंडके) ना दिला गेला.तेथे तो वाचावा द्विरुक्ती टाळण्यासाठी परत देत नाही क्षमस्व

In reply to by सुबोध खरे

सर, मिल्ट्रीमधे दारू स्वस्तात मिळते. रिटायर झालेल्या मिल्ट्रीम्याणला देखिल दारू गावोगावी 'कँटीन' नेऊन स्वस्तात दिली जाते. मेडीकल वा इंजिनिअरिंग कोअर मधे 'नसलेल्या' लोकांना दारू प्यायची गरज नसणे, किंबहुना त्यांनी न पिणे अपेक्षित असते. मला जरा समजवून सांगता का, की काय म्हणून सैनिकांना दारू 'पाजली' जाते?

सोकाजीचा या विषयाचा अभ्यास पुरा आहे आणि डॉक्टर खरे यांचे प्रतिसाद तर नेहमीप्रमाणेच आवडले!

प्रतिसादात तब्बल तिघांचे प्रतिसाद डबल आलेले आहेत.बहुदा ही सहजावस्था असावी. की ड्रुपलने घेतली एक पेग ? असो. कोणत्याही कारबोयड्रेटच्या द्रावात यीस्ट मिसळले की घरीही दारू तयार करता येते. ही माहिती बरोबर आहे का ?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

कोणीही हा प्रकार घरी /बाहेर्/ऑफिसमधे करण्याचा प्रयत्न करु नये. केल्यास प्रतिसाद लेखक त्यास जबाबदार नाही. साहित्य : मद्रास गुळ्/काळा गुळ ( ह्यालाच गोटा असेही नाव आहे साधारण गुळापेक्षा हा अधिक गोड असतो), मोहाची सुकवलेली फुले, नवसागर वडी (अमोनियम क्लोराइड ), पाणी, १५ किलो तेलाचे रिकामे डबे, चाटु, २५/३० लिटर कपॅसिटीचे अल्युमिनियम्चे पातेले, जुना टॉवेल्/धोतर, कापसाची लांब वात, बियरची रिकामी बाटली, चुल, लाकुड-फाटा, ५ लिटर प्लास्टिक कॅन. कृती : सुरुवातीला पहिला १५ लिटर कपॅसिटीचा तेलाचा रिकामा डबा घेवुन त्याला निरमाने स्वच्छ धुवुन घ्यावा. त्यात अन्दाजे ४/५ किलो मद्रास गुळ, १५० ग्रॅम सुकलेली मोहाची फुले, एक नवसागर वडी (२५० ग्रॅम) टाकुन तो पाण्याने १३/१४ लिटर पर्यंत भरुन त्याचे तोंड हवाबंद करावे. आता हा डबा उबदार जागी कमीत कमी ९/१० तास ठेवुन द्यावा. ९/१० तासाने आतले मिश्रण आंबुन डबा पुर्ण भरला जाइल व त्यास आंबुस वास यायला लागेल. आता हे मिश्रण दारु बनविण्यास तयार आहे. दुसरा १५ लिटर कपॅसिटीचा तेलाचा रिकामा डबा घेवुन त्याला निरमाने स्वच्छ धुवुन घ्यावा. ह्या डब्याचा वरचा पत्रा पुर्णपणे काढलेला असावा. हा डबा बाहेरुन मातीचा लेप देवुन पेटवलेल्या चुलीवरच्या रसरशीत जाळावर ठेवावा. त्यात ते आंबवलेले मिश्रण १/३ भरावे.तसेच डब्याच्या वरच्या एका बाजुस गोल छिद्र पाडुन त्यात चाटु अडकवावा. चाटु हा साधारणपणे टेबल्टेनिसच्या बॅट प्रमाणे दिसतो. त्याची एक बाजु व मुठ ही खोलगट असते. तर चाटु हा पसरट भाग मधे व दांडा बाहेर तसेच खोलगट भाग वरच्या बाजुस ह्याप्रमाणे डब्यास लावावा. या नंतर डब्यावर अ‍ॅल्युमिनियमचे पातेले पाण्याने पुर्ण भरुन ठेवावे.तसेच जुना टॉवेल्/धोतर हे ओले करुन पातेले व डब्याचा मधे पातेल्याला रिंग सारखे अडकवावे. डब्यातील वाफ निसटु नये म्हणुन. कापसाची लांब वात ही चाटुच्या बाहेर असलेल्या दांड्यात अर्धी आत अर्धी बाहेर अशी अडकवावी म्हणजे बाहेर पडणारा द्रव का नीट धारेने पडेल. त्या वाती खाली बियरची रिकामी बाटली ठेवावी. चुलीचा जाळ/धग हा/ही व्यवस्थित मेंटेन करावा/करावी.जास्त जाळ बाहेर पडणार्‍या द्रवाला गढुळ करतो, तर कमी जाळ उत्पादकतेवर परिणाम. अशाप्रकारे आतील द्रावण उकळु लागल्यावर ते वाफेत परिवर्तीत होते, ती वाफ वर पाणी असलेल्या पातेल्याला जावुन लागल्याने थंड होउन चाटुवर थेंबथेंबाने पडते व चाटुमार्गेच बाहेर वात धरुन पडते. ती धार बाटलीमधे अ‍ॅडजस्ट करावी. वरच्या पातेलीतील पाण्यावर लक्ष असु द्यावे ते गरम झाल्यास त्वरीत बदलावे. बाहेर पडणारी धार एकदम कमी झाल्यास डब्यातील द्रावण बदलायची वेळ झाली असे समजुन द्रावण बदलावे. बाटली भरली की ५ लिटर कॅनमधे रिकामी करावी. अन्यथा आग लागण्याचा धोका संभवतो. बाटलीमधे पडणारी धार म्हणजेच .............पहिल्या धारेची...........

In reply to by इरसाल

मद्रास गूळ ऐवजी तामिळनाडू गूळ चालेल का ? पाणी बिस्लेरीचे की साधे नळाचे ? पंधरा किलो वजनाचे तेलाचे रिकामे डबे की पंधरा किलो क्याप्यासिटी असलेले तेलाचे रिकामे डबे?? आल्युमिनियम च्या पातेल्या ऐवजी तांब्याचे पातेले चालेल का ? जुन्या टावेला ऐवजी नवा टावेल चालेल का ? किंवा नवी धोतर जोडीच आणली तर ? बिअरची मागेच रिकमी केलेली बाटली हवी की भरलेली जाग्यावरच रिकामी ( इथे स्मायली ) करून वापरायची ? काय आहे रेसीपीची पहिलीच वेळ आहे म्हून शान इचारले !

In reply to by इरसाल

ही गावठी दारु बनवण्याची स्टँडर्ड पद्धत आहे. :) आता हा प्रकार बर्‍यापैकी बंद झाला आहे. परंतू काही वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यामधील काही गावांचा जोडधंदा असायचा. काही सुशिक्षितांची घरं सोडली तर जवळपास प्रत्येक घरातील माणसं यापद्धतीने दारु बनवत असत.

In reply to by धन्या

छे ह्या पेक्षा, दोन दिवस शिळं ताक घ्या, त्यात एक कांदा फोडुन टाका, किचन कट्ट्याखाली अंधारात दोन तास ठेवा, मग काढुन त्यात स्वच्छ आरगॅनिक गुळ घाळा, गुळ विरघळला की मग नंतर पुन्हा दोन तास अंधारात ठेवा, मग बाहेर काढा अन नाक बंद करुन वास न घेता पिउन बघा, नाय दोन घोटात चढली तर विचारा.

In reply to by ५० फक्त

आहे की नै गंमत. दारू न पिणार्‍यांनी आधि असली काहीतरी माहिती द्यायची आणि मग तसले काही पिऊन कोणी लोळला की मग लगेच दारूला दूषणे द्यायला आपणच चौकात यायचे आणि दारूला बदनाम करायचे. ये ना चॉलबे! ;) - (शिस्तीत चांगली दारु पिणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

सोकाजीराव चांगली दारु कशी असते हो, जरा आम्हाला पण सांगा ना भट्टी टाकावी म्हणतोय

In reply to by श्री गावसेना प्रमुख

सोकाजीराव चांगली दारु कशी असते हो, जरा आम्हाला पण सांगा ना
सोकाजीराव जी दारू पितात ती चांगली बाकिच्या वाइट्ट. बोलेतो, त्यांचा 'पेग' आणि आमची 'पावशेर' ;)

In reply to by दादा कोंडके

सोकाजीराव जी दारू पितात ती चांगली बाकिच्या वाइट्ट
अच्छा म्हणजे जगातील दारु कंपन्या सोकाजीरावांना चव चाखायला बोलावीतात काय?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तुम्ही भट्टी टाका, आम्ही येऊन टेस्ट करुन सांगू चांगली की वाइट ते ;) - (जीम मरेचा एकलव्य छाप शिष्य) सोकाजी

दारवा पुराणेशु ..................... अध्याय समाप्तं. (सर्वांनी तीर्थ - प्रसाद घेउन जाणे)

In reply to by चिंतामणी

............................http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif (सर्वांनी तीर्थ - प्रसाद घेउन जाणे)>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif मेलो...मेलो...!!! आंम्हाला धर्म-काहिजणांना मद्यासारखा चढतो हे माहित होते,परंतू मद्य धर्मासारखे चढलेले पाहून जाम मज्जा वाटली... http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

पेठकर काका आणि डॉ.खरे यांचे प्रतीसाद देखिल आवडले. केवळ दारु पुरत म्हणुन नाही तर, कोणत्याही गोष्टीचा अतीरेक हा वाईटच.

सोकाजीनानाचा लेख माहितीपूर्ण आहेच. प्रतिसादही तितकेच माहितीपूर्ण. धन्स दोस्तहो. -दिलीप बिरुटे

ऑफिसच्या या ना त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने वरचेवर पार्ट्या होत राहतात. पिणार्‍यांची चंगळ होते कारण फुकटचे खाणेपिणे. पण मी मात्र पित नाही. त्यामुळे पुरेपूर पार्टी वसूल होत नाही असे वाटते. मग सॉफ्ट ड्रींकच्या ऐवजी एखादे महागडे मॉकटेल मागवतो. पण तरीही पिणार्‍यांच्या ग्रूपमध्ये ऑड मॅन असल्यासारखे वाटत राहते. तर एखादे असे ड्रींक सुचवा, जे जास्त चढणार नाही, ना त्याचे व्यसन लागेल. तरीही चारचौघांबरोबर प्यायल्याचे समाधान मिळेल. अर्थात बरोबरचे सुचवतात, मात्र त्यांच्यावर तेव्हा विश्वास ठेवावासा वाटत नाही, खास करून त्यांची फुकटची मिळतेय तर हवी तेवढी ढोसल्यानंतरची हालत पाहिल्यावर.. अवांतर - कसला रे तू सिविल ईंजिनीअर.. दारू न पिणारा .. असा टोमणा गेले काही वर्षे ऐकतोय.. :(

In reply to by तुमचा अभिषेक

अभिषेक साहेब माझा आपल्याला एक सल्ला किंवा विनंती आहे कि आपण दारू मजा करण्यासाठी किंवा प्यावीशी वाटत असेल तर प्या केवळ फुकट मिळते म्हणून नको.कारण फुकट दारू मिळते म्हणून पिणार्यांची ख्याती लवकर पसरते.मी स्वतः २३ वर्षे लष्करात राहून सुद्धा दारू पीत नाही.नौदलात सगळ्या बड्या पार्ट्यांमध्ये स्कॉच मिळते जॉनी वॉकर, शिवास रिगल वगैरे पण तरीही मला असा मोह कधीही झाला नाही. पण त्यामुळे माझी ख्याती एक सरळ माणूस म्हणून होती. ( मूर्ख म्हणून सुद्धा असेल) पण तरीही बर्याच लोकानी मला कधी गृहीत धरले नाही(TAKEN FOR GRANTED). आणी त्यांची बरोबरी करण्यासाठी महागडे कॉकटेल तर नक्कीच नको कारण तुम्ही वसुली करीत आहात हे लोकांना सहज लक्षात येते. शेवटी तुमची कीर्ती काय राहते ते तुम्हाला आज जाणवत नाही पण काही वर्षांनी नक्कीच जाणवते.आज माझ्या दारू पिणाऱ्या मित्रांमध्ये माझे एक विशिष्ट स्थान नक्कीच आहे आणि हिंदी भाषेत म्हटल्याप्रमाणे आप खुदकी नजरोमे गिर जाते हो.

In reply to by सुबोध खरे

मस्करीत लिहिली होती हो वरची पोस्ट.. ऑर्कुट समूहावर टाईमपास म्हणून धागा काढला तीच पोस्ट इथे चिपकवली.. बाकी गेले वर्षभर पोटाच्या आजारापायी मी साधे सॉफ्ट ड्रींक (पेप्सी किंवा कोक) जे मी एकेकाळी पाण्यासारखे प्यायचो, ते देखील पूर्णतः बंद केले आहे. आणखी एक म्हणजे, कॉलेजच्या दिवसांत बीअर आणि व्हिस्की या दोन मद्यप्रकारांची चव घेऊन झाली आहे. आवडली नाही, ना पुन्हा प्यायची इच्छा झाली. त्यामुळे भविष्यात पिण्याचा चान्सही नाहीच आहे तसा.. अवांतर - अश्या प्रत्येक पार्टीच्या आधी माझी बायको मला कोणाच्या आग्रहात येऊन चुकूनही पिऊ नकोस अशी ताकीदभरी शपथ घालूनच पाठवते.

In reply to by तुमचा अभिषेक

खूप छान , मना पासून कौतुक कि आपण बायको चे आय्क्ता तिचा भावने चा मान ठेवता कारण किती विश्वास ने ती तुम्हाला सांगत असेल आणिक जेवा तुम्ही त्य्वार खरे उतरतात तेवा तिचा मना ला खूप आनंद होत असेल. आणि हो हे कुठे लिहले नाही आहे sotware engineer चा syllabus मध्ये किवा इतर कुठ्लाय पाठ्यक्रम मध्ये कि दारू पिणे आवश्यक आहे. मला सुधा अशी बरेच लोको माहित आहे जे या क्षेत्रात मोठा पदावर असून पीत नाही आणिक ते सुखी संसार करून सगड्या जवाबदार व्यवस्थित पेलतात. तुमचा सारखे सागडे नवरे ना ला कडो हीच अपेक्षा :) तर संसार ची गाडी व्यवस्थित चालेल निदान या दारू मुडे त्यात अडचण येणार नाही बरे ना :)

In reply to by सुबोध खरे

अगदी खरे आहे तुमचे हे वाक्य 'शेवटी तुमची कीर्ती काय राहते ते तुम्हाला आज जाणवत नाही पण काही वर्षांनी नक्कीच जाणवते.आज माझ्या दारू पिणाऱ्या मित्रांमध्ये माझे एक विशिष्ट स्थान नक्कीच आहे आणि हिंदी भाषेत म्हटल्याप्रमाणे आप खुदकी नजरोमे गिर जाते हो. आणिक तुमचे खूप अभिनंदन, तुम्ही इतके वर्ष लष्कर मध्ये राहून सुधा या पासून दूर आहात,कारण हल्ली ची मुलं कंपनी चे कामा pressure मुढे प्यावेय लागते असली फुकट कारणे देतात.शेवटी दारू व्यसन कुठलाय परिस्थितीत नुकसान देः आणिक हि पड्वात नसावी एखादा त्रास किवा प्रेस्सुरे मधून बाहेर पडणा साठी

लेख माहितीपुर्ण आणि डॉ. ख-यांचे प्रतिसाद अगदी उत्तम, माझ्या ब-याच मतांना बळकटी देणारे, खरोखर धन्यवाद खरे सर. काही प्रतिसाद वाचुन मात्र एखाद्या बारमध्ये बसल्यासारखं वाटलं, अगदी ' बोल,बोल मी म्ह्णंतो ते साप बरोबर है ना, बोल बोल, दाखव दाखव कुठाय तो क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष . असो, मी दारु पिणा-यांकडे लाईव्ह करमणुक या भावनेतुन पाहतो, आणि हो ब-याच वेळा माझ्या बददलची खरी मतं कळतात, सुधारणेला वाव मिळतो हे का कमी आहे.

मी दारु पिणा-यांकडे लाईव्ह करमणुक या भावनेतुन पाहतो
मी पण. अगदी रोज. अगदी कृतज्ञता दाटून येते त्यांच्याबद्दल

मी अगदी गटारात लोळत वगैरे नाहि पडलो कधि... पण खुप पिणे, खुप झिंगणे हा आपला आवडता छंद आहे. शिवाय यार-दोस्त मंडळी जमवुन बीअर, खाणं पिणं करत रात्री जागवाव्या हे तर इसी का नाम झिंदगी :) पण साला एव्हढं पिऊन देखील एक बीअर सोडुन इतर कुठलच द्रव्य रंग-गंध-चवीवरुन ओळखता येत नाहि :( अर्धवटराव