Skip to main content

वर्तुळ-कोन सिद्धांत

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 08/03/2013 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
" 'वर्तुळ-कोन सिद्धांत' हा एक नव्याने पुढे आलेला विषय आहे. गेल्या साधारण सहा-एक वर्षांतील (माझ्या) अनुभवांवरून तो मला समजला. मग मी एक प्रयोग केला. त्या प्रयोगातून हा सिद्धांत शाबीत होतो, असे ध्यानी आले. तेव्हा त्या प्रयोगाची वारंवारिता वाढवली. काही प्रमाणे बदलली, आणि प्रयोग केले. याचवेळी माझ्या असेही ध्यानी आले की, काही जण (बहुदा अजाणता) असा प्रयोग करत असतातच. माझे प्रयोग आणि त्यांचे प्रयोग यातून असे दिसले की हा सिद्धांत शाबीत होत आहे. त्यामुळे मी असे ठरवले की माझ्या या निरिक्षणांना अधिक ठोस स्वरूप येण्यासाठी त्याची मांडणी करावी, आणि इतरांनी जाणीवपूर्वक हा प्रयोग करून तो शाबीत होतो का हे पहावे. हा माहितीपर चर्चाप्रस्ताव त्यासाठीच मांडतो आहे. प्रयोग: ध्येय: वर्तुळ गोल आहे, आणि त्याला कोन नसल्याने वर्तुळ ही कोनाकृतीच्या संदर्भात एक वृथा आकृती ठरते, हे मानवजातीने स्वीकारावे यासाठी वाद करता यावा. साध्य: वर्तुळाला कोन नसतात, तर ते गोल(च) असते, हे शाबीत करणे. साधने: एक वर्तुळ, एक कोनाकृती (कोन, त्रिकोण, चौकोन, पंचकोन वगैरे, अर्थात प्रत्येक आकृतीनुसार प्रयोग वेगळा होतो). कृती: कोनाकृतीच्या कोणत्याही एका भुजेला आधार मानून तेथे वर्तुळ ठेवावे. वर्तुळ असे ठेवले पाहिजे की ते कोनाकृतीच्या सर्व भुजांना त्याचा स्पर्श झाला पाहिजे. म्हणजेच ते कोनाकृतीच्या आतमध्ये आले पाहिजे. निरिक्षण: असे दिसते की, वर्तुळाच्या आत किंवा बाहेर कोनाकृतीचे कोन येतात. म्हणजे, ते वर्तुळ त्या कोनाकृतीला सामावून घेऊ शकत नाही, किंवा ती कोनाकृती वर्तुळाला सामावून घेऊ शकत नाही. थोडक्यात, असे दिसते की कोन स्वतंत्र दिसतात. (माझ्या प्रयोगातील काही बाबी: मी वर्तुळाचा व्यास ज्या मापाचा आहे त्याच लांबीच्या भुजा असलेल्या कोनाकृती घेतल्या, त्यांचे कोन वेगवेगळे घेतले. पण सिद्धांत शाबीत होत गेला.) निष्कर्ष: वर्तुळाला कोन नसतात, तर ते गोल असते. सिद्धांत: कोनाकृतीचे कोन वर्तुळाच्या बाहेर राहतात, याचा अर्थ वर्तुळ गोल असते आणि वर्तुळ गोल असल्याने कोनाकृतीच्या संदर्भात ते 'वृथा' आहे. त्यामुळे कोणत्याही संदर्भात या वर्तुळाचा विचार करणे, त्याची कृती करणे किंवा त्यावर कृती करणे हेही 'वृथा' आहे. तेव्हा माणसाने कोणत्याही संदर्भात वर्तुळाचा नाद सोडला पाहिजे. माणसाच्या मर्यादित उर्जेचा यात क्षय तर होतोच, शिवाय त्याच्याकडील विचार करण्याच्या आणि विवेकाच्या क्षमतेचाही तो उपयोग करत नसल्याचे दिसते. या वर्तुळाने त्याला होत असलेले लाभ हेही 'वृथा'च आहेत, मग ते रंजनात्मक असोत वा ज्ञानप्राप्तीचे असोत वा अन्य काही. लाभ: आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात असाच एक प्रकार आहे. अॅपल टू ऑरेंज कम्पॅरिझन असं त्याला म्हणतात. पण तेथे दोन फळं आहेत, आणि चवीसंदर्भात ती खाल्ल्याशिवाय तुलना होत नाही, आणि एकदा खाल्ली की पुन्हा तुलनेची संधी संपते. वर्तुळ आणि कोनाकृती खाता येत नसल्याने एकाने एक वर्तुळ आणि एक कोनाकृती यावर केलेला प्रयोग दुसराही करू शकतो, आणि त्यातून वर्तुळ हे कोनाकृतीच्या संदर्भात वृथाच असते हे पुन्हा-पुन्हा सिद्ध करता येते. येथील वाचकांनी हा प्रयोग करून पहावा आणि त्यांची निरिक्षणे मांडावीत ही नम्र विनंती. याच प्रयोगाचा पुढे विस्तार करून तेथे वर्तुळाच्या जागी एक आणि कोनाकृतीच्या जागी दुसरी अशी एकेक कल्पना (ही कल्पना म्हणजे विचारप्रणाली, जीवनप्रणाली, उपचाराचे मार्ग, ज्ञानक्षेत्रातील विविध विषय असे काहीही असू शकते) ठेवून हा प्रयोग करता यावा. तेथही 'वर्तुळ-कोन सिद्धांत' शाबीत व्हावा अशी अपेक्षा आहे. सध्या मी त्यावर काम करतो आहे. माझी निरिक्षणे कालौघात मांडेन. (या प्रस्तावासाठी येथे मला सर्व लेखनप्रकार आणि सर्व लेखनविषय निवडता आले. कोणत्याही विषयाला हा सिद्धांत लागू होणे शक्य असल्याने अशा कोणत्याही आणि कितीही विषयांची मला निवड करता आली हे महत्त्वाचे.) "

वाचने 51572
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

In reply to by कवितानागेश

प्रश्न विचारत रहा. अशा प्रश्नांतूनच चिकित्सेचा आरंभ होत असतो. त्यामुळे, असे प्रश्न करणं हाच तुमचा या प्रयोगातील सहभाग आहे.

In reply to by श्रावण मोडक

आमचा सहभाग आहेच. विदा लागला तर आम्ही पुरवू कितीही काळ लागू द्या. पण, या वर्तुळाच्या कानाचा सॉरी कोनाचा शोध लागलाच पाहिजे. 'तुम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्न करु' (तुकोबा क्षमा करा हं) असं आपलं शब्दांचं गाव तेव्हा 'शब्दांचे मोल असे निरर्थक जाऊ नये असे वाटल्यामुळे आम्ही बोललो. सिद्धता होईल तेव्हा होईल म्हणून आम्ही थांबलो. मनातल्या मनातः आज अशा नसत्या उठाठेवी का चालू आहेत बरं... कुठं गेले आपले गुप्तहेर. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नसत्या उठाठेवी असं आपण म्हणताहात. पुन्हा तेच झालं. त्याचं कारण आहे. आपण माझा चर्चाप्रस्ताव नीट वाचलेला नाही. चर्चाप्रस्ताव नीट वाचला तर ही नसती उठाठेव किंवा निरर्थक शब्दांचा खेळ नाही हे आपल्याला समजून येईल. थोडे इतरत्रचे संदर्भही पाहिलेत तर त्याची खात्री पटेल. हेरगिरीपेक्षा हा असा थोडा अभ्यास अधिक कामी येईल, हे नक्की. न वाचताच शिकवायला जाण्याचा प्रघात आहे, असं एक निरिक्षण यानिमित्तानं नोंदवावं लागेल असं दिसतंय. जो गंभीर प्रयोग आहे, त्या प्रयोगाला तो नीट वाचलेला नसल्याने न कळल्याने 'नसती उठाठेव' किंवा 'निरर्थक शब्दांचा खेळ' म्हणणे म्हणजेच न कळलेले आपले कोन त्याला लावू पाहणे. अर्थात, ही अशी टिप्पणी करून आपण या प्रयोगातच भर टाकली आहे, हे निश्चित. त्यामुळे आपल्या अशा आणखी टिपण्यांचे स्वागत. त्या वरकरणी अज्ञानमूलक असतील, पण या प्रयोगासाठी अत्यंत मौलीक असतील याची खात्री बाळगावी, ही विनंती.

In reply to by श्रावण मोडक

>>> न वाचताच शिकवायला जाण्याचा प्रघात आहे, असं एक निरिक्षण यानिमित्तानं नोंदवावं लागेल असं दिसतंय. हाहा. हाना. तद्मताय. च्यायला, कुठून गळ्यात शिवळं गुंतवून घेतली आणि कशाला टीपनं पुरवत बसलो कोणास ठाऊक. आपला प्रयोग गंभीर आहे, आपण गंभीर आहात, आपले विचार गंभीर आहेत, आपलं संशोधन गंभीर आहे, आणि आपल्या वर्तुळाचे कोनही गंभीर आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी पूर्वी कसा होतो आणि आज कसा आहे याची आपण करीत असलेली काळजी पाहून भरून आलं. पण ती काळजी करू नये. हा चर्चाप्रस्ताव जेव्हा आपल्याला नीट समजेल तेव्हा आपली ही काळजी संपलेली असेल याची खात्री बाळगा. अर्थात, आपली ही स्थिती समजू शकतो. ध्येयानं पछाडलं गेलं की माणसाच्या प्रतिमेचं असं काही-बाही होत असतंच म्हणा. या दरम्यान आपल्या भावना दुखावणारे काही लिहिले गेले असेल तर क्षमस्व.

वर्तुळाला कोन ? च्यायला, अवघडच आहे, वाचतोय. काही निष्कर्षा-बिष्कर्षाला गेल्यावर किंवा काही शाबीत-बिबीत झाल्यावर इथं अंतिम सिद्धांत मांडला जाईल अशी अपेक्षा आहे. -दिलीप बिरुटे (शाबीत)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवघड काही नाही प्रा.डॉ. यात. पण तुम्ही प्रा.डॉ. असल्याने सारंच अवघड करत असता, तसं हेही केलेलं दिसतंय. आता पहा, निष्कर्षाच्या जोडीने जेव्हा बिष्कर्षही येतात तेव्हा वर्तुळाला कोन असले पाहिजेत, असे म्हणता येते. त्याचबरोबर शाबीतच्या जोडीने बिबीत येते तेव्हा कोनाला वर्तुळाकार असला पाहिजे, असे म्हणता येते. नव्हे, अनेकदा अशा प्रयोगांमध्ये ते म्हटले जातेच. त्यातूनच हा सिद्धांत शाबीत होतो (बिबीत नाही) अशा निष्कर्षाप्रत (बिष्कर्ष नाही) मी पोचलो. म्हणून तर इथे चर्चाप्रस्तावाच्या स्वरूपात ही मांडणी केली.

In reply to by श्रावण मोडक

>>> निष्कर्षाच्या जोडीने जेव्हा बिष्कर्षही येतात तेव्हा वर्तुळाला कोन असले पाहिजेत अहं घोळ करत आहात. माती बिती म्हटल्या जाते तेव्हा माती ही अगदी मातीच असते पण बिती म्हटले की त्यात बारीक खडे, थोडे मोठे खडे येतात. म्हणजे माती सोडून जे जे येते ते बिती. तसं निष्कर्षाच्या जोडीने जेव्हा बिष्कर्ष येतील तेव्हा वर्तुळाला कोन आहेत हे सिद्ध होणारच नाहीत. बाकी बिनअर्थांचे नुसते शब्दांचे खेळ मस्त चालले आहेत, लगे रहो. -दिलीप बिरुटे (प्रा.डॉ.असल्याने सर्वच सोपं करणारा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घोळ नाही काहीच. बिती म्हटले जाते तेव्हा मातीच्या जोडीने खडे वगैरे येतात. थोडक्यात मातीत भेसळ असते. तसेच येथे आहे. बिष्कर्ष जेव्हा असतो तेव्हा त्यात भेसळ असते. भेसळ असते म्हणूनच वर्तुळाला कोन असले पाहिजेत, असे म्हणता येते. तसे अनेक प्रयोगात म्हटले जाते. यासंबंधी माझ्या लेखनातील करड्या रंगातील मजकूर वाचलात तर ते ध्यानी येण्यास हरकत नाही.

लेखातल्या शब्दांचा अर्थ कळाला पण वाक्य आणि त्यामुळे लेख कळला नाही. या आधी फक्त धनंजय यांच्याबाबतीत असं व्हायचं. :)

माणूस नि त्याची विचारशक्ती रबरबॅन्ड सारखी असायला काय हरकत आहे? त्याला सरळ रेषेत नसणार्‍या कोणत्याही तीन बिंदूंवर बसवला की त्रिकोण दिसतो, मिठाई अथवा तत्सम कुठल्याही बॉक्स वर चौकोन होतो तर पदवीच्या सुरळीवर वर्तुळाकार, लंबगोलाकार होतो.... अरे हाय काय अन नाय काय! आपल्याला सगळ्यात सोयिस्कर (फायदेशीर म्हटलं की आर्थिक विषय येतात म्हणून सोयीस्कर) काय आहे त्यानुसार माणूस तसं तसं बनणं पसंत करतो. स्वगतः .............. !

अनंत भुजा असलेली आकृती म्हणजे वर्तुळ असे मानून त्या भुजांचे होणारे कोन तपासतांना भुजा म्हणजे अनंत बिंदूची आकृती अर्थात पुन्हा वर्तुळच अशा प्रकारे एक वर्तुळ पूर्ण होते याविषयी आपण कशा पद्धतीने विश्लेषण करणार आहात याची उत्सुकता आहे.

In reply to by नाना चेंगट

तूर्त मी त्या सूक्ष्म स्तरावर जात नाही. स्थुलाचाच विचार करतो आहे. कारण त्या सूक्ष्म स्तरासाठी स्थुलातील स्थितीची मांडणीही करावी लागेल. कारण सूक्ष्मात जाऊ तेव्हा बिंदूचा आकार वर्तुळ आहे की तो कोनाकृती असतो, असा एक भेद करावा लागेल. त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरतील. त्यामुळे त्याकरता थोडी प्रतीक्षा करावी लागेल, आणि तुम्हाला थोडी मदतीची तयारीही ठेवावी लागेल. त्या स्तरावर जायचे असेल तेव्हा आपल्याशी चर्चा करावी म्हणतोय...

In reply to by श्रावण मोडक

>>>बिंदूचा आकार वर्तुळ आहे की तो कोनाकृती बिंदूची आणखी चिरफाड करता येत नाही म्हणूनच त्यास बिंदू (हा गणिती पुल्लिंगी बिंदू आहे) म्हणतात. उद्देश सफल होतो आहे... आन दो आन दो! ;)

In reply to by प्यारे१

बिंदूविषयीचे आपले मौलीक मत वाचले. ते मान्य आहेही. पण आधी ते पडताळ्यातून सिद्ध व्हावे लागेल. अन्यथा, माझी त्याला असलेली मान्यता ही केवळ श्रद्धा ठरते. त्यामुळे आपण त्याविषयी अधिक तपशील द्यावा ही विनंती. येथे बिंदूची चिरफाड करण्याचा हेतू नाहीही. फक्त बिंदूचा आकार काय आहे हे पाहायचे आहे. आकार पाहण्यासाठी चिरफाड करावी लागेल का?

In reply to by श्रावण मोडक

An exact location. It has no size, only position. a point has no size. No matter how far you zoomed in, it would still have no width. Since a point is a place, not a thing, it has no dimensions. आता ही गणिती श्रद्धा आहे आणि आमचा तिच्यावर विश्वास आहे. एकाला एक म्हणायचं दोनाला दोन, ए ला ए का नी बी ला बी ही देखील श्रद्धाच. (वर्तुळात त्रिकोण) तिला न तपासणंच कधी कधी फायदेशीर असतं.असो. बिंदू बिंदू शेजारी, रेखा बने क्षणोक्षणी... (हे असंच र ला ण) बाकी पुरेसा विदा गोळा झालाय ना? ;)

In reply to by प्यारे१

श्रद्धा न तपासणं कधी कधी फायदेशीर असतं, हे बरोबर. तुम्हाला ओळखत असल्याने त्याचा मी स्वीकार करेन. पण त्याचा पडताळा घेता आला नाही इतरांना तर? तर त्याची चिकित्सा करावी लागेल ना. त्याशिवाय त्या श्रद्धेचा सिद्धांत होणार कसा? माझा प्रयोग त्यासाठी चाललाय. म्हणूनच मी लेखनात करड्या रंगात काही स्थिती दिल्या आहेत, त्या समजून घ्याव्या ही विनंती.

In reply to by श्रावण मोडक

एकदा विश्लेषण सुरु केले की स्तरांचा भेद उरत नाही. स्तर हे केवळ प्राथमिक सोईस्कर वर्गीकरणासाठी असतात त्यांचा अंतिम निष्कर्षासाठी आणि उपायासाठी उपयोग नसतो. सत्व, रज आणि तम अथवा वात, पित्त आणि कफ याचा दाखला इथे लागू पडावा. आम्ही मदतीला केव्हाही तयार आहोत. चर्चेला सुद्धा नक्की... बसुच. :)

In reply to by नाना चेंगट

तुमचा मुद्दा तत्वतः अगदी बरोबर आहे. चिकित्सा म्हटली की, स्तरीकरणाला महत्त्व येते. कारण त्याशिवाय चिकित्सेचे मापदंड मांडणे मुश्कील. मग स्तरांनुसार मापदंड असल्याने निष्कर्षावर त्याचा परिणाम होणारच. म्हणजे, उदाहरण म्हणून, सचिन तेंडुलकर या क्रिकेटपटूकडे क्रिकेटपटू म्हणून न पाहता जेव्हा फलंदाज म्हणून पाहिले जाते तेव्हा वेगळे मापदंड, गोलंदाज म्हटले की वेगळे मापदंड आणि त्यानुसार त्याची त्या-त्या भूमिकेतील, आणि म्हणून अंतिमतः क्रिकेटपटू म्हणून, असलेली महानता वगैरे ठरते. त्याच्याच संदर्भात त्याचे शतक आणि भारताचा पराभव असे एक नाते पूर्वी मांडले गेले होते, हे आठवते. तो यातलाच प्रकार होता. आणि हे असे विश्लेषण आपल्या मुद्याच्या पुरस्कारासाठी उपयुक्त असते, म्हणून तर हे असे प्रयोग केले जातात, सिद्धांत मांडले जाता, हे तुम्हाला मान्य व्हावे. असो, आपण चर्चा करूच.

आपल्या संशोधनाला कदाचीत इंग्रजीतील, "reinventing the wheel" म्हणता येईल असे वाटले. आता हा माझा दृष्टी"कोन" आहे आणि wheel हे वर्तुळाकृती असते हा योगायोग असू शकेल. अजून एक गणितातील असल्याने आपल्यासाठी अवांतर, पण "द्वैत-अद्वैत एकच" ठरवण्याचा अनोखा सिद्धांत उगाचच आठवला... (डिसक्लेमरः यातील द्वैत-अद्वैताचा भारतीय तत्वज्ञानातील द्वैत-अद्वै सिद्धांताशी काडीचाही संबंध नाही.) गृहीतक : x=y म्हणून x (वर्ग) = xy म्हणून x (वर्ग) –y(वर्ग) = x(वर्ग) – xy म्हणून (x+y) (x-y) = x(x-y) म्हणून x+y =x म्हणून 2x = x म्हणून तात्पर्य 2 =1 (अतिअवांतरः श्रामोंचे असे लेख जर कोणी सतत वाचले तर डोके फिरून नक्की नक्षलवादी होऊ शकतील. ;) )

In reply to by विकास

हे शुद्ध गणीत झाले. त्याविषयी मी उगाच काही करणार नाही. कारण तो माझा प्रांत नाही. म्हणून मी माझ्या लेखनातच करड्या रंगात काही स्थिती टाकून ठेवल्या आहेत. त्या वाचल्या तर आपल्या हे ध्यानी येईल की इथे गणीत नाही, आणि म्हणूनच रिइन्व्हेंटिंग द व्हीलही नाही. आपण मांडलेला गणितातील सिद्धांत हा अगदी मार्मीक आहे. माझ्या प्रयोगाच्या सिद्धांताची अंतिम मांडणी करताना मला त्याचा संदर्भ म्हणून नक्की उपयोग होईल. खरे तर तो असूनही मला ही मांडणी करावी लागलीये यामागील कारण त्या करड्या रंगातील मजकुरातून व्यक्त व्हावे, आपल्याला ते लगेच कळावे. बहुदा ते कळले आहे म्हणूनच आपण केलेल्या अतिअवांतर या टिप्पणीने माझ्या सिद्धांताला पोषक सामग्री दिली आहे. धन्यवाद.

In reply to by श्रावण मोडक

ते टाईमपास गणीत आहे. विकासराव फिरकी घेत आहेत ;) (x - y) = 0 त्यामुळे (x - y)/(x - y) इज नॉट इक्वल टु १. अशा वेळी (x - y)/(x - y) लिमीट्स च्या सिद्धांतानी सोडवावे लागतात. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

विकासराव फिरकी घेत असावेत याचा त्या २=१ यावरून अंदाज आला होता. ०/० हे मात्र गवसलेच नाही. एकूणच गणीत हा माझा प्रांत नसल्याने मला विकासराव फिरकी घेत आहेत याची खात्री नव्हती. अशा स्थितीत मी त्याला शुद्ध गणीत ठरवून टाकले. आपल्याला धन्यवाद. अनायासे येथे पुन्हा सिद्धांत लागू झाला. मी केलेल्या लेखनात करड्या रंगात ज्या शक्यता मांडल्या आहेत तसा प्रयोग माझ्याकडून झाला. जो माझा प्रांत नाही, त्या विषयातील आपल्याच कुवत-अभावाच्या आधारे काहीही कल्पना लावून मी विकासरावांच्या मांडणीला शुद्ध गणीत ठरवले आहे, म्हणजे तेथेही वर्तुळाला नसलेले कोन मला दिसले. येथे पहा, कुवतीचा अभाव हे बलस्थान ठरते आहे. अर्थात काही चुकीच्या गोष्टींसाठी. तरी बरं, मी जालीय बुवा/बाबा नाही. नाही तर माझे जे अनुयायी, भक्त असते त्यांना विकासरावांनी केलेली मांडणी शुद्ध गणीत वाटून ते २=१ असे मानू लागायचे.

>>> ध्येय: वर्तुळ गोल आहे, आणि त्याला कोन नसल्याने वर्तुळ ही कोनाकृतीच्या संदर्भात एक वृथा आकृती ठरते, हे >>> मानवजातीने स्वीकारावे यासाठी वाद करता यावा. >>> साध्य: वर्तुळाला कोन नसतात, तर ते गोल(च) असते, हे शाबीत करणे. वर्तुळाला कोन नसतात असे नसते. तर वर्तुळाला अनंत कोन असतात असे मानले जाते. एक अनंत बाजू असलेला रेग्युलर पॉलिगॉन (ज्याच्या सर्व बाजूंची लांबी समान आहे व सर्व कोन एकाच मापाचे आहेत) घेतला, तर त्याच्या भुजा व वर्तुळाचा परीघ समान होतात.

In reply to by श्रीगुरुजी

वर्तुळाला कोन नसतात असे नसते. तर वर्तुळाला अनंत कोन असतात असे मानले जाते.
हो. हा मुद्दा याआधीच धनंजय यांनी अन्यत्र निदर्शनास आणला होता. त्याची मी येथे नोंद घेतली आहे. हा मुद्दा या सिद्धांताचा पोटभाग आहे, असेही मी नोंदवले आहे. कदाचित, तो अपवाद ठरू शकतो. अर्थात, तुम्ही ज्याविषयी 'मानले जाते', असे म्हटले आहे तेही सिद्ध व्हावे लागेल. कारण ते मानणे किंवा न मानणे हे सापेक्ष आहे. ते सिद्ध व्हावे लागेल. ते सिद्ध झाले की, मग त्याचा सार्वत्रिक स्वीकार होऊ शकतो. हे सारे प्रयोगाच्या पुढच्या भागात समाविष्ट करेनच. गणितातही मानले जाते याला वाव असावा का, असा प्रश्न पडला आहे.

या धाग्याला " वर्गणी" चालू करा. वर्तुळाकार नाणी चालतील किंवा चार कोन असलेल्या नोटा ही !

In reply to by चौकटराजा

चौकटाला किती कोन असतात ? आता तुम्ही म्हणाल दहा तर ते दहा कोन कोणते ते कसे शोधाल ? -दिलीप बिरुटे

ये कोना,वर्तुळ, कोना वर्तुळ क्या है रे ? येकपे रेहेना, या तो वर्तुळ बोलना नई तो कोन बोलना !

In reply to by तिमा

वॉम वॉव, वॉम वॉव, वॉम वॉव ,वॉम वॉव, टिंग टिंग टिंग टिंग टिंग हे मुजिक पायेल ना राव ........

अाघाड्यांच्या राजकारण यावर हा सिद्धांत लावता येईल का? सरकार स्थापन करताना सगळ्या तडजोडी करुन म्हणजे अापापले 'कोन' गुंडाळून राजकीय पक्ष अाघाडी नावाचं 'वर्तुळ' तयार करतात. Common Minimum Program नावाचा प्रकार अाठवत असेल तर... एकदा सत्तेत अाले की अापापले 'कोन' ताणले जातात अाणि वर्तुळ हळूहळू 'वृथा' होउ लागतं. काय जमला का प्रयोग?

कोनाकृतीच्या कोणत्याही एका भुजेला आधार मानून तेथे वर्तुळ ठेवावे. वर्तुळ असे ठेवले पाहिजे की ते कोनाकृतीच्या सर्व भुजांना त्याचा स्पर्श झाला पाहिजे. म्हणजेच ते कोनाकृतीच्या आतमध्ये आले पाहिजे.> हे वाचल्याबरोबर मला त्या (कु/सु)प्रसिद्ध ' त्रिकोणी पृथ्वीची' ( म्हणजे त्या सिद्धाम्ताची) आठवण झाली हो!

सर्व मिपा करांना त्यातल्या त्यात ह्या लिखाणावर comment करणार्‍या मिपा करांना माझे काही प्रश्न आहेत. स्वताच्या मनाशी तपासुन उत्तरे द्या. इथे उत्तरे दिली नाहीत तरी चालतील, स्वताच्या मनाला तरी द्या. फसवू नका १. हे लिखाण ( वर्तुळ-कोन सिद्धांत ) वाचल्या वर मनात खरे खरे काय वाटले. लिखाणा बद्दल, लेखका बद्दल. २. तुम्हाला लेखका च्या मानसिक स्थिती बद्दल शंका आली का? बोली भाषेत लेखकाचा Screw ढीला आहे का? लेखक "हुकलेला" आहे का? ३. लेख वाचुन हसायला आले का? ४. लेख वाचुन "हे काय मुर्खा सारखे लिहिले आहे" असे वाटले का? जर २, ३ किंवा ४ ह्यातल्या कोणत्याही प्रश्ना चे उत्तर "हो" असे असेल तर तुम्ही तसे स्पष्ट पणे का लिहिले नाही? ( उत्तर "नाही" असे असेल तर काही प्रश्न नाही ). उगाच काहीतरी गुडी-गुडी लिहिण्या पेक्षा तुम्ही जे काय वाटले ते लिहिले तर लेखक आहे तिथुन मागे फिरु शकतो. नाहीतर तुम्ही परिस्थिती बिघडवता आहात. इथे आपण सर्व हितचिंतकाची भुमिका घ्यायला पाहिजे.

In reply to by प्रसाद१९७१

धन्यवाद प्रसाद हे प्रश्न इथे उपस्थीत केल्या बद्दल. कदाचीत ह्याच सारख्या प्रश्नांमुळे या धाग्यावर प्रतिसाद दिला नाही. आता खाली उत्तरे. १. लेख वाचल्या नंतर लेखकाचा वेळ जात नसावा किंवा लेखक डोक्यावर पडला की काय हा प्रश्न मनात निर्माण झाला. २. लेखक हुकलेला आहेच. ३. हो. ४. हो. निखिल

मिपाकर हितचिंतक आहेत का तमाशाई आहेत? ह्या लेखावरच्या प्रतिक्रिया बघुन मला हा प्रश्न पडला. म्हणुन लिहिले. @ निखिल - धन्यवाद.

सामायिक उत्तर. @ आदित: हा सिद्धांत कुठेही लावता यावा. आघाड्यांच्या राजकारणाबाबत तुम्ही तो लावण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतोच आहे. तोच तर्कदृष्ट्या पूर्णत्वास नेऊन निरिक्षणे मांडावीत, ही विनंती. @ लीमाऊजेट: त्रिकोणी पृथ्वी या विषयालाही हा सिद्धांत लागू करता यावा. आपण थोडे प्रयत्न करून पहावेत ही विनंती. @ प्रसाद१९७१: आपल्या शंकांबाबत मी तूर्त उत्तर देणार नाही. आज विक्षिप्त वाटणारी प्रत्येक कल्पना ही उद्याची सैद्धांतिक मांडणी ठरत असते, असे कोणी तरी म्हटले आहे. मी त्यानुसार चालेन. @ निखिल देशपांडे: वेळ जातोय. आता या सिद्धांताच्या सिद्धतेतच माझा वेळ जातोय... डोक्याविषयी मात्र मी आपल्याशी या सिद्धांतानुसारच सहमत होईन.

In reply to by श्रावण मोडक

@श्रावण - अहो तुमच्या बद्दल मी काही शंका घेतली नाही. तुम्हाला वाटले ते तुम्ही लिहिले. मी फक्त मिपाकरां ना विचारले की "तुम्ही हितचिंतक आहात का काहीतरी मजा बघायला मिळते म्हणुन रस्त्यात अपघाताच्या ठिकाणी घोळका करणारे आहात?"

In reply to by प्रसाद१९७१

डोक्यावर पडणे याचा अर्थ फार काही चांगला होत नाही (माझ्या माहितीप्रमाणे). श्रामोंना (किंवा कोणत्यही सदस्यास) असे म्हणू नये हे सुचवते. तुमचे मत जमत नसल्यास, हवे ते उत्तर मिळत नसल्यास पुढे संवाद वाढवू नये ही विनंती.

In reply to by रेवती

प्रतिसादाशी असहमत आहे. कुणालाही अशा प्रकारे संवाद वाढवू नका अशी विनंती करणे हे योग्य वाटत नाही. राहता राहिला डोक्यावर पडला ह्या वाक्यप्रयोगाचा वापर. मुळात मतांची असहमती व्यक्त करतांना अशा प्रकारे वाक्यप्रयोग करावा लागला ही बाब पुरेसी बोलकी आहे. वर त्याप्रतिसादाला अनुमोदन देत असलेल्या व्यक्तींना सुद्धा मुद्दे न मांडता केवळ हाच वाक्यप्रयोग करावासा वाटला ही बाब तर त्याहून मजेशीर आहे. एकंदर असा मनोरंजनाचा खजिना मिपावर उधळला जात असतांना त्याला चाप लावणे ही वाचकांवर अन्याय करणारी बाब आहे असे माझे मत आहे. कदाचित मी सुद्धा डोक्यावर पडलेला असू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही ;)

In reply to by नाना चेंगट

प्रयोग सुरूच आहे. विदा संकलन सुरू आहे. ते झाले की, आपण बसू आणि बोलू. तुमच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहेच.