वर्तुळ-कोन सिद्धांत
"
'वर्तुळ-कोन सिद्धांत' हा एक नव्याने पुढे आलेला विषय आहे. गेल्या साधारण सहा-एक वर्षांतील (माझ्या) अनुभवांवरून तो मला समजला. मग मी एक प्रयोग केला. त्या प्रयोगातून हा सिद्धांत शाबीत होतो, असे ध्यानी आले. तेव्हा त्या प्रयोगाची वारंवारिता वाढवली. काही प्रमाणे बदलली, आणि प्रयोग केले. याचवेळी माझ्या असेही ध्यानी आले की, काही जण (बहुदा अजाणता) असा प्रयोग करत असतातच. माझे प्रयोग आणि त्यांचे प्रयोग यातून असे दिसले की हा सिद्धांत शाबीत होत आहे. त्यामुळे मी असे ठरवले की माझ्या या निरिक्षणांना अधिक ठोस स्वरूप येण्यासाठी त्याची मांडणी करावी, आणि इतरांनी जाणीवपूर्वक हा प्रयोग करून तो शाबीत होतो का हे पहावे. हा माहितीपर चर्चाप्रस्ताव त्यासाठीच मांडतो आहे.
प्रयोग:
ध्येय: वर्तुळ गोल आहे, आणि त्याला कोन नसल्याने वर्तुळ ही कोनाकृतीच्या संदर्भात एक वृथा आकृती ठरते, हे मानवजातीने स्वीकारावे यासाठी वाद करता यावा.
साध्य: वर्तुळाला कोन नसतात, तर ते गोल(च) असते, हे शाबीत करणे.
साधने: एक वर्तुळ, एक कोनाकृती (कोन, त्रिकोण, चौकोन, पंचकोन वगैरे, अर्थात प्रत्येक आकृतीनुसार प्रयोग वेगळा होतो).
कृती: कोनाकृतीच्या कोणत्याही एका भुजेला आधार मानून तेथे वर्तुळ ठेवावे. वर्तुळ असे ठेवले पाहिजे की ते कोनाकृतीच्या सर्व भुजांना त्याचा स्पर्श झाला पाहिजे. म्हणजेच ते कोनाकृतीच्या आतमध्ये आले पाहिजे.
निरिक्षण: असे दिसते की, वर्तुळाच्या आत किंवा बाहेर कोनाकृतीचे कोन येतात. म्हणजे, ते वर्तुळ त्या कोनाकृतीला सामावून घेऊ शकत नाही, किंवा ती कोनाकृती वर्तुळाला सामावून घेऊ शकत नाही. थोडक्यात, असे दिसते की कोन स्वतंत्र दिसतात.
(माझ्या प्रयोगातील काही बाबी: मी वर्तुळाचा व्यास ज्या मापाचा आहे त्याच लांबीच्या भुजा असलेल्या कोनाकृती घेतल्या, त्यांचे कोन वेगवेगळे घेतले. पण सिद्धांत शाबीत होत गेला.)
निष्कर्ष: वर्तुळाला कोन नसतात, तर ते गोल असते.
सिद्धांत: कोनाकृतीचे कोन वर्तुळाच्या बाहेर राहतात, याचा अर्थ वर्तुळ गोल असते आणि वर्तुळ गोल असल्याने कोनाकृतीच्या संदर्भात ते 'वृथा' आहे. त्यामुळे कोणत्याही संदर्भात या वर्तुळाचा विचार करणे, त्याची कृती करणे किंवा त्यावर कृती करणे हेही 'वृथा' आहे. तेव्हा माणसाने कोणत्याही संदर्भात वर्तुळाचा नाद सोडला पाहिजे. माणसाच्या मर्यादित उर्जेचा यात क्षय तर होतोच, शिवाय त्याच्याकडील विचार करण्याच्या आणि विवेकाच्या क्षमतेचाही तो उपयोग करत नसल्याचे दिसते. या वर्तुळाने त्याला होत असलेले लाभ हेही 'वृथा'च आहेत, मग ते रंजनात्मक असोत वा ज्ञानप्राप्तीचे असोत वा अन्य काही.
लाभ: आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात असाच एक प्रकार आहे. अॅपल टू ऑरेंज कम्पॅरिझन असं त्याला म्हणतात. पण तेथे दोन फळं आहेत, आणि चवीसंदर्भात ती खाल्ल्याशिवाय तुलना होत नाही, आणि एकदा खाल्ली की पुन्हा तुलनेची संधी संपते. वर्तुळ आणि कोनाकृती खाता येत नसल्याने एकाने एक वर्तुळ आणि एक कोनाकृती यावर केलेला प्रयोग दुसराही करू शकतो, आणि त्यातून वर्तुळ हे कोनाकृतीच्या संदर्भात वृथाच असते हे पुन्हा-पुन्हा सिद्ध करता येते.
येथील वाचकांनी हा प्रयोग करून पहावा आणि त्यांची निरिक्षणे मांडावीत ही नम्र विनंती.
याच प्रयोगाचा पुढे विस्तार करून तेथे वर्तुळाच्या जागी एक आणि कोनाकृतीच्या जागी दुसरी अशी एकेक कल्पना (ही कल्पना म्हणजे विचारप्रणाली, जीवनप्रणाली, उपचाराचे मार्ग, ज्ञानक्षेत्रातील विविध विषय असे काहीही असू शकते) ठेवून हा प्रयोग करता यावा. तेथही 'वर्तुळ-कोन सिद्धांत' शाबीत व्हावा अशी अपेक्षा आहे. सध्या मी त्यावर काम करतो आहे. माझी निरिक्षणे कालौघात मांडेन.
(या प्रस्तावासाठी येथे मला सर्व लेखनप्रकार आणि सर्व लेखनविषय निवडता आले. कोणत्याही विषयाला हा सिद्धांत लागू होणे शक्य असल्याने अशा कोणत्याही आणि कितीही विषयांची मला निवड करता आली हे महत्त्वाचे.)
"
वर्गीकरण
प्रतिक्रिया
येकपे रहेना
यानन्तर ...
एक प्रयोग
टू राईट ऑर नोट टू राईट?
मिपा करांना माझा एक मनापासुन चा प्रश्न आहे
धन्यवाद प्रसाद हे प्रश्न इथे
मिपाकर हितचिंतक आहेत का तमाशाई आहेत?
सामायिक
मी फक्त मिपाकरां ना विचारले
अपघात?????
"लेखक डोक्यावर पडला आहे" हा अपघात
डोक्यावर पडणे याचा अर्थ फार
प्रतिसादाशी असहमत आहे.
काय ठरलं मग?
बसू आणि बोलू
>>तुमच्या मार्गदर्शनाची