Skip to main content

आन्जी: शतशब्दकथा: पैला नंबर

लेखक आतिवास यांनी शनिवार, 09/03/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या म्हाडिक गुर्जींना बाळ झालं. म्हंजे त्यांच्या बायकोला वो. गोरी मिटट पोरगी. मी कडे घेतलं की खिदळायची. आमी सर्वे मऊ हून जायचो. नादच झाला तिला कडेवर घेऊन हिंडायचा. कुटंकाबी जावा. म्हाडिक बै सारखी वरडाय लागली, “आन्ज्ये, अगं घे की पोरीला ...” अंक्या म्हणला, आता तुजा पैला नंबर पक्का. पण मला कटाळा यायला. सारखी बबली माझ्यासंगं. कुणी मला खेळायला बी घेईना. झाडावर चढता यीना, पळता यीना, मारामारी तर बंदच. हात बी दुखायला लागला. बबली जड लई. एक दिस कुणाचं ध्यान नाही ते बगितलं. जोरात चिमटा काढला बबलीला. रडली लई. खच्चून. आता अजाबात येत न्हाई ती माझ्याकडं. पैला नंबर गेला म्हणा. जाउंदे. (केवळ शंभर शब्दांत - शीर्षक सोडून शंभर शब्द- अनुभव मांडण्याचा हा प्रयोग.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12510
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

हम्म्म ... असं 'मऊ दिसलं, कि कोपराने खणणारे' लोकं असतात खरे . पण तिचा पैला नंबर गेला ते वाईट झालं , बरं नाही वाटलं.:( शंभर शब्दात खूपच प्रभावी लेखन.

In reply to by चिगो

चिगो,'शतशब्दकथा'हा एक चांगला शब्द सुचवलात तुम्ही. आभार. आता इथून पुढं तुम्ही दिलेला शब्द वापरेन.