-पारिजातक -
तुझ्या अंगणातली ती फुले,
ओंजळ भरून घ्यायचे मी ...
तू मात्र ती मोजून बघायचास ,
आणि त्या खोडावर लिहून ठेवायचास.....
मग रागाने फेकून फुले ती, तुझ्याच अंगावर ..
मी निघून जायचे .. तशीच ..!!
दिवस बदलत गेले,
अल्लडपणा संपत गेला ...
मग चुकून समोर आलोच;
तर अडखळत बोलायचो ...
नाहीतर….एरवी नजरही टाळायचो आपण...
..पारिजातक मात्र बहरत राहिला ...तसाच ..!!
मग बाबांची बदली झाली तेव्हा,
"काहीतरी राहतंय " म्हणून;
सामान भरत बसले होते मी ... "त्या " दिवसभर ..
आणि तुझ्या घरातला एक दिवा
सतत चालू बंद होत होता ... "त्या " रात्रभर ..
निरोप नव्हता द्यायचा तर
स्टेशन वर का आला होतास ...असंच ?..
काही वर्षांनी..तुझे लग्न जमल्याची
बातमी कळली ..
बोचलं नाही काही;पण
सलत राहिलं काहीतरी ...
हुरहूर होती ती,
पण कसली ते कळलंच नाही,
पारिजातकाची आठवण आली ...उगीचंच...!!
काल सगळे तुझ्या घरी भेटलो तेव्हा
जुन्या नजरा नव्याने टाळल्या आपण,
निघतांना...का कुणास ठाऊक ......
पारिजातकाकडे पाहायचं टाळलं मी;
पण नाजुकश्या फुलांनी लक्ष वेधलंच ..
....बहरला होता तो आख्खा ....
फक्त खोडावर कोरलं गेलं होतं काहीतरी...कायमचंच !!!
---फिझा.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान...
छान...
काय आयुष्य असत ना?
काय आयुष्य असत ना?
सापडतच नाही हातात, बघाव तेंव्हा निसटलेलच.
आपलच आयुष्य असुनही आपलाच ताबा नसलेलंच.
सापडतच नाही हातात, बघाव
In reply to काय आयुष्य असत ना? by स्पंदना
सापडतच नाही हातात, बघाव तेंव्हा निसटलेलच.
आपलच आयुष्य असुनही आपलाच ताबा नसलेलंच
एक्दम सहमत ,
कविता खुप छान ... :)३
भन्नाट
स्पीचलेस!!!
तुमच्या कविता छानच असतात!
तुमच्या कविता छानच असतात!
कविता आवडली.
कविता आवडली.
पारिजातक आवडला
पारिजातक आवडला.
कविता अतिशय आवडली.
कविता अतिशय आवडली.
बोहोत खूब!!!
बोहोत खूब!!!
पहिलं आणि शेवटचं कडवं आवडलं .
पहिलं आणि शेवटचं कडवं आवडलं .
मध्ये एक स्टोरी चालु आहे असा फील आला , शेवटच्या कडव्याने कथा झटक्यात सावरुन कवितेचं स्वरुप आणल्यासारखं वाटलं .
छान प्रयत्न .