Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by फिझा on Tue, 03/05/2013 - 03:26
-पारिजातक - तुझ्या अंगणातली ती फुले, ओंजळ भरून घ्यायचे मी ... तू मात्र ती मोजून बघायचास , आणि त्या खोडावर लिहून ठेवायचास..... मग रागाने फेकून फुले ती, तुझ्याच अंगावर .. मी निघून जायचे .. तशीच ..!! दिवस बदलत गेले, अल्लडपणा संपत गेला ... मग चुकून समोर आलोच; तर अडखळत बोलायचो ... नाहीतर….एरवी नजरही टाळायचो आपण... ..पारिजातक मात्र बहरत राहिला ...तसाच ..!! मग बाबांची बदली झाली तेव्हा, "काहीतरी राहतंय " म्हणून; सामान भरत बसले होते मी ... "त्या " दिवसभर .. आणि तुझ्या घरातला एक दिवा सतत चालू बंद होत होता ... "त्या " रात्रभर .. निरोप नव्हता द्यायचा तर स्टेशन वर का आला होतास ...असंच ?.. काही वर्षांनी..तुझे लग्न जमल्याची बातमी कळली .. बोचलं नाही काही;पण सलत राहिलं काहीतरी ... हुरहूर होती ती, पण कसली ते कळलंच नाही, पारिजातकाची आठवण आली ...उगीचंच...!! काल सगळे तुझ्या घरी भेटलो तेव्हा जुन्या नजरा नव्याने टाळल्या आपण, निघतांना...का कुणास ठाऊक ...... पारिजातकाकडे पाहायचं टाळलं मी; पण नाजुकश्या फुलांनी लक्ष वेधलंच .. ....बहरला होता तो आख्खा .... फक्त खोडावर कोरलं गेलं होतं काहीतरी...कायमचंच !!! ---फिझा.

Submitted by पारिजातक on Tue, 03/05/2013 - 04:18

Permalink

छान...

छान...
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 03/05/2013 - 05:10

Permalink

काय आयुष्य असत ना?

काय आयुष्य असत ना? सापडतच नाही हातात, बघाव तेंव्हा निसटलेलच. आपलच आयुष्य असुनही आपलाच ताबा नसलेलंच.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Tue, 03/05/2013 - 08:33

In reply to काय आयुष्य असत ना? by स्पंदना

Permalink

सापडतच नाही हातात, बघाव

सापडतच नाही हातात, बघाव तेंव्हा निसटलेलच. आपलच आयुष्य असुनही आपलाच ताबा नसलेलंच एक्दम सहमत , कविता खुप छान ... :)३
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 03/05/2013 - 08:35

Permalink

भन्नाट

काल सगळे तुझ्या घरी भेटलो तेव्हा जुन्या नजरा नव्याने टाळल्या आपण, निघतांना...का कुणास ठाऊक ...... पारिजातकाकडे पाहायचं टाळलं मी; पण नाजुकश्या फुलांनी लक्ष वेधलंच .. ....बहरला होता तो आख्खा .... फक्त खोडावर कोरलं गेलं होतं काहीतरी...कायमचंच !!!
स्पीचलेस!!!
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Tue, 03/05/2013 - 08:46

Permalink

तुमच्या कविता छानच असतात!

तुमच्या कविता छानच असतात!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रिया on Tue, 03/05/2013 - 17:37

Permalink

कविता आवडली.

कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Tue, 03/05/2013 - 18:26

Permalink

पारिजातक आवडला

पारिजातक आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on Wed, 03/06/2013 - 00:23

Permalink

कविता अतिशय आवडली.

कविता अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 03/06/2013 - 00:40

Permalink

बोहोत खूब!!!

बोहोत खूब!!!
  • Log in or register to post comments

Submitted by लौंगी मिरची on Wed, 03/06/2013 - 00:44

Permalink

पहिलं आणि शेवटचं कडवं आवडलं .

पहिलं आणि शेवटचं कडवं आवडलं . मध्ये एक स्टोरी चालु आहे असा फील आला , शेवटच्या कडव्याने कथा झटक्यात सावरुन कवितेचं स्वरुप आणल्यासारखं वाटलं . छान प्रयत्न .
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2185 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com