आज भेटायचे ठरले होते आपले किनार्यावर
जरा लवकरच आलो
अन् दूर उभा राहिलो
.
मी नसतांनाचा समुद्र आणि
मी तुझ्याबरोबर नसतांनाची तू
दोघांना बघायचे होते म्हणून
.
पण तू माझ्या आधीच पोहचली होतीस
किनार्यावर, समुद्राकडे तोंड करून
.
मनात म्हटले,
यु आर लेट यु फुल!
.
बेभान वाहणारा खारट वारा
तुझ्या कुंतलात अडकून तुला छळत होता
वाटले तुझ्या केसांमधून बोटे फिरवून
त्याला मोकळे करावे
पण इतक्यात तू मानेला
एक मोहक झटका देऊन त्याला झटकलेस
वाटले...
यु आर लेट यु फुल!
.
तुझ्या पायाखालची वाळू
तुझ्या कोमल पाऊलांना चिटकत होती
तुला ती हुळहुळ सतावत होती
वाटले पुढे होऊन ती झटकून द्यावी
पण इतक्यात तू येणार्या लाटेत
आपले पाऊल हळूवार वरचेवर घुसलळेस
वाटले...
यु आर लेट यु फुल!
.
समुद्र जरा रागावलेला वाटला, बहुदा माझ्यावरच
तिला वाट पाहायला लावत होतो
म्हणून असेल बहुतेक
नाही,बहुदा तिच्या डोळ्यातला समुद्र जास्त सुंदर होता,
म्हणून कदाचित
माहित नाही नक्की काय ते
पण त्याच्या लाटा अजूनच
उग्रपणे किनार्यावर आदळत होत्या
.
कुठल्याशा अनावर ओढीने मी तुझ्याकडे सरसावलो
तुझा हात धरून तुला मागे ओढले
मला पाहताच तू लटक्या रागाने
ओठांचा लोभस चंबू करत म्हणालीस
.
यु आर लेट यु फुल!!
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
टिपः हि कविता मी ऑर्कुटवर प्रसिद्ध केली होती, तिथुन उचलुन चेपुवरच्या 'पुण्याला पुणेच म्हणा' नावाच्या ग्रुप ने ती माझे नाव वगळून, मला न विचारता एक पेज बनवून त्यांच्या ग्रुप मध्ये प्रसिद्ध केली होती. त्यामुळे तुम्ही ती आधीच वाचलेली असण्याची शक्यता आहे. तिथे काही हजार लाइक्स आले होते, मला कळल्यावर, मी ती कविता त्या ग्रुपशी भांडून तिथुन काढायला लावली.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
34601
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुपच सुंदर.....!!!
आवडेश
आवडली!
क्लास!!!!
जबरी रे मिका
ओहो!
क्या बात है.....!!!!
सुंदर!
+१
In reply to सुंदर! by पैसा
लव्हली... झकास.. कविता हा
+1
In reply to लव्हली... झकास.. कविता हा by गवि
सुन्दर!
चांगली कविता,
सुंदर कविता!!!
नाही, बहुदा तिच्या डोळ्यातला समुद्र जास्त सुंदर होता,
कविर्मिका कविर्मिका कविर्मिका
मस्तच
देवळाच्या थंड काळ्या दगडाने
व्वाह
In reply to देवळाच्या थंड काळ्या दगडाने by गवि
+१
In reply to व्वाह by मिसळलेला काव्यप्रेमी
वा गवि...चार चांद लावले
In reply to देवळाच्या थंड काळ्या दगडाने by गवि
हाय हाय!
In reply to देवळाच्या थंड काळ्या दगडाने by गवि
मिका
भन्नाट रे मिका.. एकेक शब्द
या वेळी आंम्हाला समुद्रच
आहा!
..........
+१००
In reply to .......... by प्यारे१
(आमच्या शब्दांची ठिगळं नकोत)+१०० !क्या बात है| कविता आवडली.
एकदम मस्त! रुमानी!
आवडली
झक्कास!!!
सही!
आहा!
खासच.
मस्त! आणि गविंच्या ठिगळाने एक
सरत्या आयुष्याला मागे वळुन
वाह
In reply to सरत्या आयुष्याला मागे वळुन by लौंगी मिरची
अगदि हाच प्रतिसाद द्यायला आलो होतो!
In reply to वाह by मिसळलेला काव्यप्रेमी
आह्ह
In reply to सरत्या आयुष्याला मागे वळुन by लौंगी मिरची
अतिशय सुंदर कविता आणि त्यावर
In reply to सरत्या आयुष्याला मागे वळुन by लौंगी मिरची
कवितेबद्दल काही लिहिण्यासारखं
हा प्रतिसाद एका चांगल्या धाग्याला..
कितीदा वाचली. पण आत अस काही
तरल
जबराट रोम्यांटिक
यु आर लेट यु फुल!
In reply to जबराट रोम्यांटिक by स्पा
चेरी आॅन द केक..!
In reply to यु आर लेट यु फुल! by मोदक
+११११
In reply to चेरी आॅन द केक..! by इनिगोय
वा !!
In reply to यु आर लेट यु फुल! by मोदक
त्या नाजूक ओलसर पाऊलांशी विरणारी एक लाट मागच्या लाटेला म्हणाली..
In reply to वा !! by अक्षया
धन्यवाद हो संक्षी..
In reply to त्या नाजूक ओलसर पाऊलांशी विरणारी एक लाट मागच्या लाटेला म्हणाली.. by संजय क्षीरसागर
माय्ला
मस्त , खुप आवडली
मस्तच...!!!!
मिकाभाउ तुस्सी छा गये
भन्नाट....
वाह मिका वाह! काय सुरेख
+१
In reply to वाह मिका वाह! काय सुरेख by श्रिया
मस्त!! खरच छान!
अप्रतिम. खूप आवडली आहे.
अतिशय सुंदर .... !
व्वाह..
आहा. फार सुंदर.
कविताशी आपले कधी जमलेच नाही,
कविताशी आपले कधी जमलेच नाही,
खुपच सुंदर काव्य मिका
मस्त!! पुन्हा पुन्हा वाचली...
छानच!
कविता आवडली.