Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user अनिकेतदळवी
Submitted by अनिकेतदळवी on गुरुवार, 02/21/2013 - 12:20
हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल.मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-: 1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले. 2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला. 3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करायला लावली. 4) ज्या फ्रान्सने पहिल्या महायुद्धात जर्मनीला रेल्वेच्या डब्यात शरणागती पत्करायला लावुन आपल्या शौर्याचे प्रतिक म्हणुन तो डबा आपल्या देशात नेला होता त्याच फ्रान्सचा महिन्याच्या आत पाडाव करुन देशाच्या अपमानाचा बदला घेताना त्याच रेल्वेच्या डब्यात फ्रान्सच्या प्रमुखांना 22 जुन 1940 ला शरणागती पत्कारत शस्त्रसंधी करार करायला लावला. फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अंदाज फक्त हिटलरलाच आला होता त्यामुळे सेनानीँच्या विरोधाला न जुमानता त्याने फ्रान्सचा पराभव केला. 5) ज्या ब्रिटीशांच्या संपुर्ण जगात वसाहती होत्या त्या ब्रिटीशांना एकट्या हिटलरने BLITZCREIG तंत्राचा वापर करुन पळता भुई थोडी केली. भुमध्य समुद्रातील क्रिट बेट मिळवत ब्रिटीशांना पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही आणि रोमेलच्या साहाय्याने इजिप्तला पराभुत करुन इंग्लंडला सगळ्या बाजुंनी कोँडले. 6) बाल्कन प्रदेशात हिटलरने युद्ध करुन ग्रीकांना पराभुत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घास गिळला. 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.हिटलर 19 व्या शतकातील सर्वशक्तीमान व्यक्तिमत्व होते. जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमीत झाले. जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले. लक्षात ठेवा कोणतेही युद्ध भयानकच असते पण देशाची बेईज्जत त्यापेक्षा भयानक असते. हिटलरच्या ज्या विकासाविषयी मी सांगतोय तो काय होता ते सांगतो-: 1) हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण सक्तीचे केले. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. 3) जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते. 4) जर्मनीने आर्थिक क्षेत्रातप्रगती केली ती शस्त्रोत्पादनां च्या धोरणामुळेच. या सर्व योजनेला युद्धकालीन अर्थकारण म्हणतात. 5) हिटलरने CHANCELLER होताच सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना शरणागती पत्करण्यास सांगुन पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान" मिळवुन दिले. जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेंब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले. हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चक्रे प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली. कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल. हिटलरच्या या विकासाच महत्व अजुन वाढत कारण त्यावेळी जर्मनीतील परिस्थिती पुर्णतः प्रतिकुल होती. अशा परिस्थितीत हिटलर 30 जानेवारी 1933 ला जर्मनीचा CHANCELLER झाला आणि पुढील 5 वर्षात त्याने जर्मनीचा जो काही विकास केला त्यामुळे जर्मनीची गणती जगातील सर्वशक्तीमान राष्ट्रात होऊ लागली आणि 1 सप्टेँबर 1939 पर्यँत दुस-या महायुद्धास सामोरे जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या राष्ट्रात आली. हिटलरने कोणत्या परिस्थितीत विकास साधला हे जाणुन घ्यायला अगोदर जर्मनीतील प्रतिकुल परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे. 1) पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर 1$ ला 4 MARKS असलेली जर्मन चलनाची किंमत 1$ ला 10000 MARKS एवढी कमी झाली होती. 2) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. प्रत्येक गोष्टीत जर्मनीला बाकी राष्ट्रांकडुन प्रथम परवानगी घ्यावी लागत होती अशा परिस्थितीत अन्यायाने त्रस्त जर्मनीला सावरले ते हिटलरनेच...!!! या तहाच्या सर्व अटी झुगारुन देत चतुराईने त्याने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले आणि थोड्याच काळात जर्मनीला एवढे बलशाली बनवले की. ज्या इंग्लंड सारख्या देशांनी जर्मनीवर अटी लादल्या होत्या तेच देश युद्धाच्या भितीने हिटलरच्या अटी मान्य करु लागले होते. देशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....! राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....!
  • Log in or register to post comments
  • 66599 views

प्रतिक्रिया

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 02/28/2013 - 12:05

In reply to ापीजमेण्ट चा मुद्दा फारसा पटत by पिंपातला उंदीर

Permalink

त्यांना काय रिझर्व बँकेची

त्यांना काय रिझर्व बँकेची तिजोरी उघडी करुन द्यायची राहीली आहे काय उद्वीरकर साहेब, हिंदुंमधले गरीब नाही दिसत काय तुम्हाला,गरीब काय फक्त मुस्लिमच असतात काय.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 03/03/2013 - 21:03

In reply to ापीजमेण्ट चा मुद्दा फारसा पटत by पिंपातला उंदीर

Permalink

>>> ापीजमेण्ट चा मुद्दा फारसा

>>> ापीजमेण्ट चा मुद्दा फारसा पटत नाही. कुठल्याही सरकारने मुस्लिमांसाठी काहीही भरीव केलेले नाही. मुस्लिमांसाठी आजवर कोणत्याही सरकारने काहीही भरीव केलेलेच नाही. काँग्रेस सरकारने तर फक्त सवंग लांगूलचालनच केले आहे. सचर आयोग हा एक विशिष्ट हेतू मनात बाळगून नेमलेला होता. त्यामुळे त्या आयोगाचा रिपोर्ट हा त्या हेतूनुसारच असणार. सचर आयोगाचा अहवाल क्षणभर खरा मानला तरी मुस्लिमांची जर दुरावस्था असेल तर ती तशी का आहे याचे विवेचन नाही. शिक्षणाकडे फारसे लक्ष नाही, घेटो करून राहणे, धर्माला भौतिक जीवनापेक्षा खूप जास्त महत्त्व, भारंभार मुले जन्माला घालणे, मुल्ला-मौलवींचे प्रस्थ माजवून ठेवणे इ. अनेक कारणांमुळे अशी अवस्था असणार. अशी दुरावस्था असणारा मुस्लिम हा एकमेव समाज नाही. गरीबी, अज्ञान, कमी शिक्षण असणारी कुटुंबे सर्व धर्मात आढळतात. पण आयोग नेमला गेला तो फक्त मुस्लिमांसाठी. हे लांगूलचालनाचे अजून एक उदाहरण!
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on गुरुवार, 02/28/2013 - 08:59

In reply to माफ करा पण हे जरा सरसकटीकरण by पिंपातला उंदीर

Permalink

त्यामुळे फक़त मुस्लिम याना हा

त्यामुळे फक़त मुस्लिम याना हा वेगळा न्याय लावणे योग्य आहे का?
मुस्लिम स्वतःसाठी वेगळा न्याया लावतात तो कसा चालतो? त्यांना समान नागरी कायदा का नको आहे? भारतीय लग्न व्यवस्थेचे कायदे का मानत नाहीत? भारतातच रहातात ना? कोण त्यांचा सोम्या गोम्या ऊठुन फतेवे काढतो, "आज पासुन महिलांना या मशिदी मधे बंदी" आणि सरकार काहीच बोलत नाही. हे कसं चालत? तेव्हा कुठे जातो तुमचा साम्यवाद? ओवेसी हिदू देव देवतांबद्दल अपशब्द वापरतो मग हिंदूनी गप्प बसुन ऐकुन घ्यायच अस म्हण्ण आहे का? बोल बाबा बोल, अजुन बोल. आम्ही सहिष्णु आहोत. मिरजेमधे गणपतीमधे अफजलखानाची पोस्टर लावली म्हणुन गणपतीची विटंबना केली.वरुन पोलिसाना आदेश काय तर कार्यकर्त्यांना पकडा आणि जेल मधे टाका का तर दंगल नको. हे कसं चालत? त्याच ठिकाणी मिरजेच्या महापौराचा पोरगा पोलिसांच्या गाडीवर चढुन हिरवा झेंडा फडकवतो आणि पोलिस काहीच करत नाहीत कारण त्यांना तसेच आदेश असतात. हे बघुन तर तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतीलच यात काही शंका नाही. मुंबईमधे या लोकांनी मोर्चा काढला, क्रांतीस्मारक फोडले, याही गोष्टीच तुमच्याकडे समर्थाचे असे उत्तर असेलच यात तिळमात्र शंका नाही. पण पोलिसांनी त्यांना पकडलच नाही कारण रमजान चालु होता??? आरे तुमचा(हो तुमचाच) सण आहे म्हणुन गुन्हेगाराला अटक नाही करायची का तर त्यांचा सण चालु आहे? हा काहो तुम्हाला वेगळा न्याय? आणि आमच्यासाठी का नाहे असे नियम? आम्हाला का नाही सबसिडी?
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 02/28/2013 - 10:05

In reply to त्यामुळे फक़त मुस्लिम याना हा by Dhananjay Borgaonkar

Permalink

हे ग्रुहीत धरणे असेच चालायचे

हे ग्रुहीत धरणे असेच चालायचे.जो पर्यंत आपण ह्या काँग्रेजी मंडळींना असेच निवडुन देत राहु
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on गुरुवार, 02/28/2013 - 11:52

In reply to त्यामुळे फक़त मुस्लिम याना हा by Dhananjay Borgaonkar

Permalink

जसा तिकडे ओवैसी आहे तसा इकडे

जसा तिकडे ओवैसी आहे तसा इकडे तोगडिया आहे. दोन्ही बाजूला धर्मांध लोकांची कमी नाही. या आकडेवारी नुसार स्वातंत्र्य नंत्तर झालेल्या दंगलीत मुस्लिमांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. आपण कुणा एका बाजूची आंधलेपणे कड घेणे हे कितपत योग्य हे ज्याने त्याने ठरवावे http://www.massviolence.org/IMG/article_PDF/Hindu-Muslim-Communal-Riots-in,589.pdf
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/28/2013 - 22:29

In reply to जसा तिकडे ओवैसी आहे तसा इकडे by पिंपातला उंदीर

Permalink

कॉज - इफेक्ट

हा दुवा नजरेखालून घातला आणि खूप माहितीपूर्ण वाटला. त्यात दंगली कशा चालू झाल्या हे पाहीले तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. अर्थात याचा अर्थ हे दंगलीचे समर्थन आहे असा अजिबात नाही. पण असे का घडते ह्याचा विचार करणे देखील महत्वाचे आहे. बर्‍याचदा मुस्लीम समाजातून अशा काही घटना घडल्या ज्यामुळे दंगली चालू झाल्या असे हा रिपोर्ट वाचताना म्हणता येऊ शकते. पण तो मुद्दा नाही. जो कोणी त्या त्या वेळेस शासक होता, त्याने कठोर भुमिका घेतली नसल्याने अशा दंगली चालू झाल्या असे लक्षात येते. अगदी मध्यंतरी आझाद मैदानावर जो हिंसात्मक गोंधळ घातला गेला त्यातील किती जणांना अटक केली? नुसते करणार असे म्हणले गेले... आता त्याला अपिजमेंट म्हणायचे का अजून काही हा प्रत्येकाच्या चष्म्याचा मुद्दा आहे. असो. सुदैवाने त्याचे रुपांतर दंगलीत झाले नाही. गुजरातमधे १९६९ साली काँग्रेसचे राज्य होते. दंगल जवळ जवळ वर्षभर चालली होती - पण त्याबद्दल कधी बोंब उठल्याचे ऐकलेले नाही.. तेच इतर ठिकाणि.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 02/26/2013 - 19:57

In reply to आणखी काही विचार by आजानुकर्ण

Permalink

वेगळा विषय

सर्वप्रथम आशा करतो की गुरूजींनी सर्वांना समान घटना आहे ती बदलण्याची गरज नाही, हे जे म्हणले आहे ते तुम्ही मान्य करत आहात. नसल्यास तसे सांगावे. इथे यातील प्रत्येक मुद्यावर लिहीता येईल. यातील बरेचसे मुद्दे किंबहूना याहूनही अधिक कुरुंदकरांच्या जागर मधे पण वाचता येईल. इतकेच काय मध्यंतरी शहारूख खानचे च्या एका लेखावरून वादंग झाला होता आणि पाकीस्तानने त्याचा गैरवापर करायचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस फॉर अ चेंज काँग्रेस आणि भाजपा दोन्ही एकाच बाजूने फक्त पाकीस्तानवरच उखडले आणि शाहरूखच्या विरोधात नाही. तरी देखील नंतर शाहरूखने जो काही एक "मी भारतीय आहे" हे उत्तर दिले होते, त्यात त्याने याचा (संदर्भाचा) बर्‍याच अंशी उहापोह केला आहे. पण त्यातील सगळ्यात महत्वाचा (त्याचा) त्रागा होता तो, माध्यमांच्या विरोधात होता, जी त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला मुस्लीम म्हणून वागवतात, भारतीय म्हणून नाही. आणि हाच मुद्दा आहे. तरी देखील हा वेगळा विषय आहे, नक्की यात गैर काय याचे खंडन आपण वेगळ्या लेखात केले तर अधिक विचार मांडेन.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on गुरुवार, 02/28/2013 - 21:58

In reply to पुरोगाम्यांची कावीळ by हुप्प्या

Permalink

पुरावा?

हिटलरच्या छळछावण्या, त्यातील क्रूर अत्याचार हे अगदी शेवटी शेवटी उघडकीस आले. असे नृशंस अत्याचार चालू आहेत हे माहित असताना किंबहुना माहित होते म्हणूनच गोळवलकर हिटलरवर खूश होते हा अपप्रचार अस्सल पुरोगामीच करु जाणे!
आय मीन त्यांना नंतर कळले, याचा पुरावा?
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Fri, 02/22/2013 - 09:01

Permalink

इतके सगळे वाईट लोकं असताना

इतके सगळे वाईट लोकं असताना फक्तं हिटलरवरच आगपाखड का ? या म्हणण्याला काय अर्थं आहे. बाकीचे वाईट आहेत म्हणून हिटलर समर्थनीय कसा ठरू शकतो? लंकेचा राजा रावण देखील पराक्रमी होता. त्याने युद्धात इंद्रालादेखील हरवले होते. तो ज्ञानी होता आणि अनेक गुण होते. पण त्याच्यात काही दुर्गुण होते. त्याने स्वतःच्या कर्माने रामाबरोबर युद्ध ओढवून घेतले आणि त्याचा सर्वनाश करून घेतला, हे सर्वश्रुत आहे. पण कुणीही रावणाला महात्मा म्हणत नाही आणि त्याच्या गुणांना सलाम करीत नाही. हिटलर राष्ट्रप्रेमी होता आणि त्याने आपल्या राष्ट्राच्या अपमानाचा बदला घेतला हे जरी खरे असले (मग त्याच न्यायाने तुम्ही कसाब आणि अफजल गुरूला सलाम करणार का? ) तरी त्याच्यासाठी त्याने जाणिवपूर्वक काही केले असे मी मानत नाही. कारण पहिले महायुद्ध संपल्यावर तो बेकार होता तेव्हा तो उपजिविकेचे साधन शोधत होता. त्यावेळी त्याच्या मनात नॅशनल सोशॅलिझम वगैरे विचार अजिबात नव्हते. केवळ योगायोगाने तो नाझी संघटनेच्या एका सभेला हजर राहिला (त्यावेळी फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सदस्य तेथे होते ). हिटलर कडे असलेल्या आमोघ वक्तृत्व गुणामुळे त्याला संघटनेत महत्वाचे स्थान प्राप्त झाले. आणि त्याच्या काळात जर्मनीची जी आर्थिक भरभराट झाली त्यात त्याचे स्वतःचे योगदान किती होते हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. त्याच्या (कॅरिझमॅटिक म्हणता येईल अशा) व्यक्तीमत्वाच्या आणि वक्तृत्वाच्या प्रभावाने त्याला अनेक निष्ठावान आणि कर्तुत्ववान साथीदार लाभले होते. ही त्याची जमेची बाजू म्हणता येईल. त्याच्या पाठीमागे जर्मन जनता आली हे सत्य असले तरी स्वयंस्फुर्तिने कितीजण आले आणि एस एस , आणि नाझी संघटनेच्या दहशतीमुळे कितीजण आले हे देखिल बघायला लागेल. इतर लाखो जर्मन नागरिकांइतकाच तो राष्ट्रप्रेमी होता असे म्हणणे योग्य ठरेल. पण त्याच्या इतर अनेक अवगुणांमुळे त्याचा हा गुण मातीमोल ठरला.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 02/22/2013 - 18:50

In reply to इतके सगळे वाईट लोकं असताना by मनीषा

Permalink

महात्मा रावण

यांच्या विषयी काही बोलल्यास निदर्शने करण्यात येतील !!
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Fri, 02/22/2013 - 21:35

In reply to इतके सगळे वाईट लोकं असताना by मनीषा

Permalink

>> पण कुणीही रावणाला महात्मा

>> पण कुणीही रावणाला महात्मा म्हणत नाही आणि त्याच्या गुणांना सलाम करीत नाही >> असहमत.. आजही बर्‍याच ठिकाणी रावणाला 'देव' मानतात.. Ex. Image removed. अवांतरः- आणी रावण जेवढा कुप्रसिद्द झालाय, तितके दोष त्याच्यात खरेच होते का??
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Fri, 02/22/2013 - 09:28

Permalink

अवांतर -अनेक जाती आणि धर्मात

अवांतर -अनेक जाती आणि धर्मात वाटल्या गेलेल्या भारतासारख्या देशात अनेक नेत्याना आणि बर्‍याच लोकाणा पण हिटलर चे आकर्षण का वाटते याचे उत्तम विश्लेषण करणारा पटकन वाचता येणारा लेख. हिट्लरी वृत्ती वर पण प्रकाश टाकणारा. http://www.thedailybeast.com/articles/2012/11/30/hitler-s-strange-afterlife-in-india.html
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 02/22/2013 - 10:57

Permalink

हायला !

काही प्रतिसाद वाचून, ह्या लोकांनी हिटलरला अंगाखांद्यावरती खेळवले असावे किंवा त्याच्या खांद्याला खांदा लावून लढाई तरी केली असावी असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Fri, 02/22/2013 - 13:12

In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

नशीब लढाई पर्यंतच थांबलात..

नशीब लढाई पर्यंतच थांबलात.. अजुन पुढं गेला नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचंड तापट on Fri, 02/22/2013 - 11:24

Permalink

लेख आवडला.....

लेखकाशी सहमत. मला हा लेख आवडला. बाकी नाण्याची महत्वाची बाजू खूप छान मांडलीत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचंड तापट on Fri, 02/22/2013 - 11:43

Permalink

नरेंद्र मोदींना शिव्या दिल्या

नरेंद्र मोदींना शिव्या दिल्या की आपण बुध्दिवादी आहोत हे सिध्द होत असावे असे दिसते एकंदर. कांग्रेस कडुन एक-एक मिसळपाव मिळालेला दिसतोय... की अकबरुद्दीन ओवेसी ने बिर्याणी खाऊ घातली असे म्हणावे..!! बाकी अकलेचे तारे छान तोडतात आपण..
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Fri, 02/22/2013 - 11:53

Permalink

फक्त या फटू पुरता हा माणूस

फक्त या फटू पुरता हा माणूस आपल्याला आवडतो ! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 02/22/2013 - 13:29

In reply to फक्त या फटू पुरता हा माणूस by मालोजीराव

Permalink

ह्या प्रकाराबद्दल

ह्याप्रकाराबद्दल माझे बरेच बंगाली मित्र नेताजींना शिव्या देतात ... (अर्थात ते सगळे "कम्युनिस्ट" आणि "सेक्युलर" आहेत...त्यामुळे ...मी रॉयली इग्नोर मारतो )
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Fri, 02/22/2013 - 12:09

Permalink

भारताला सुद्धा सध्या एका

भारताला सुद्धा सध्या एका हिटलरची गरज आहे. हिंदूधर्माविरुद्ध कारवाया करणार्‍यांची जमात नष्ट करण्याची वेळ आली आहे. अगदी गॅस चेंबर मधे घालुन्.....च्यायला तेव्हाच का नाही हिटलरने बाकीच्या जमाती संपवल्या??? अवांतर - नरेंद्र मोदींना माझा पुर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या सर्व कार्यासाठी. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 02/22/2013 - 21:17

In reply to भारताला सुद्धा सध्या एका by Dhananjay Borgaonkar

Permalink

तुम्ही संघवाले दिसत नाही.

तुम्ही संघवाले दिसत नाही. सरळसरळ काय ते जाहीर करून टाकलंत.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 02/23/2013 - 04:12

In reply to तुम्ही संघवाले दिसत नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ते

ते. डाव्या विचारांनी प्रेरीत झालेले नक्षलवादी असावेत कारण ते (म्हणजे नक्षलवादी) हिंसा बोलतात पण आणि तसेच करतात पण. संघाचे लोकं बोलतही नाहीत आणि करतही नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Sat, 02/23/2013 - 09:24

In reply to तुम्ही संघवाले दिसत नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

धाराशायि झालो. धारतीर्थी पडलो

धाराशायि झालो. धारतीर्थी पडलो. हसून हसून
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Sat, 02/23/2013 - 09:26

In reply to धाराशायि झालो. धारतीर्थी पडलो by पिंपातला उंदीर

Permalink

आदिती ने दिलेल्या प्रतिसादवर

आदिती ने दिलेल्या प्रतिसादवर : )
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Fri, 02/22/2013 - 12:55

Permalink

जमात ??

हिंदूधर्माविरुद्ध कारवाया करणार्‍यांची जमात नष्ट करण्याची वेळ आली आहे.
एकदम "जमात"? म्हणजे कोण-कोण, हो? बाकी, नाझी छळछावणीचा क्रूर अनुभव घेऊनही ज्या माणसाची विवेक आणि विनोदबुद्धी जीवंत राहीली, त्या P G Wodehouse चं एक वाक्य आठवलं.. "I don't hate in plurals.." बाकी चालु द्या.. हिटलरच्या हिरोगिरीबद्दल बोलणारे लै पाहीलेयत, पण तो एक वंशद्वेषी, क्रूर हुकूमशहा होता ज्याने आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी ज्यू आणि इतर नागरीकांची (सरतेशेवटी त्यात जर्मन "सुपेरीयर रेस" वालेही आले) नृशंस हत्या करवली, हे सत्य आहे आणि राहील. फक्त "तत्वांवर असलेल्या निष्ठेमुळे" केलेले क्रौर्य/ चुका जर क्षम्य ठरत असेल, तर ह्या जगात कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी शिक्षा होऊ शकत नाही.. Everything can be justified then..
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Fri, 02/22/2013 - 13:15

In reply to जमात ?? by चिगो

Permalink

फार मोठा विचार दिला, धन्यवाद.

फक्त "तत्वांवर असलेल्या निष्ठेमुळे" केलेले क्रौर्य/ चुका जर क्षम्य ठरत असेल, तर ह्या जगात कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी शिक्षा होऊ शकत नाही.. Everything can be justified then..
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Fri, 02/22/2013 - 17:50

In reply to जमात ?? by चिगो

Permalink

Hitler did very cruel and ugly things...

हिंदूधर्माविरुद्ध कारवाया करणार्‍यांची जमात नष्ट करण्याची वेळ आली आहे.
"Hitler did very cruel and ugly things. But he was an artist, I love him (for that). He had the power to carry the whole nation, the mob with him. You have to think what magic he had. He was a miracle.... The killing of Jews was wrong. But the good part about Hitler was that he was an artist. He was a daredevil. He had good qualities and bad. I may also have good qualities and bad ones." -बाळासाहेब
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 02/22/2013 - 13:32

Permalink

ज्यु हत्याकांडा विषयी

ज्यु लोकांनी सत्याग्रह करायला हवा होता ... असं आपलं उगाचच एक मत आहे . ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 02/22/2013 - 16:33

Permalink

३_१४ विक्षिप्त अदिती,

३_१४ विक्षिप्त अदिती, धागा हिटलरबद्दल आहे विसरल्या वाटतं --
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 02/22/2013 - 20:42

In reply to ३_१४ विक्षिप्त अदिती, by आशु जोग

Permalink

अय्याऽऽऽऽऽऽऽ

कसं सांगू! सांगू का नको सांगू? जाऊ दे बै, सांगूनच टाकते. माझंपण कि नै, तुमच्यावर किनै, खूप खूप प्रेम आहे. आतातरी अर्धवटरावांना माहित असलेल्या चष्म्याच्या दुकानातून पहिल्या पानावरचे प्रतिसाद वाचायला चष्मा आणाल का, गडे?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 02/22/2013 - 22:45

In reply to अय्याऽऽऽऽऽऽऽ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

कशाला कशाला

तुमचाच उधारीवर द्या म्हणजे झालं. पण असु दे. इतकी पॉवरबाज लेन्स प्रत्येकाला नाहि झेपायची. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 02/22/2013 - 23:11

In reply to कशाला कशाला by अर्धवटराव

Permalink

आमची ऑप्थॅल्मिक सर्जन म्हणते...

... "दुसर्‍यांचा चष्मा वापरू नये. आपला नंबर वाढतो." पण तुकोबांनी वेगळंच म्हटलं आहे, जया डोकी विचार। तया नेत्री पावर॥
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 02/22/2013 - 23:31

In reply to आमची ऑप्थॅल्मिक सर्जन म्हणते... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अच्छा.

आहे तो चश्मा कमी पॉवरचा कसा करता येईल याबद्दल पण सर्जन वा तुकोबा काहि बोलले असतील. असो. आपापली आवड आणि काय. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 02/23/2013 - 01:11

In reply to आमची ऑप्थॅल्मिक सर्जन म्हणते... by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>पण तुकोबांनी वेगळंच म्हटलं

>पण तुकोबांनी वेगळंच म्हटलं आहे, जया डोकी विचार। तया नेत्री पावर॥ नाही हे नवीन आहे गाथेमधे हे नाही मी घातलीये ना पालथी अनेकदा...
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sat, 02/23/2013 - 01:49

In reply to >पण तुकोबांनी वेगळंच म्हटलं by आशु जोग

Permalink

तुमच्याकडे गाथेची कोणती प्रत

तुमच्याकडे गाथेची कोणती प्रत आहे? कदाचित त्यांच्याकडे असलेल्या प्रतीमधला हा प्रक्षिप्त अभंग असेल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 02/23/2013 - 01:54

In reply to तुमच्याकडे गाथेची कोणती प्रत by धन्या

Permalink

प्रक्षिप्त की विक्षिप्त

प्रक्षिप्त की विक्षिप्त
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sat, 02/23/2013 - 02:16

In reply to प्रक्षिप्त की विक्षिप्त by आशु जोग

Permalink

अरेरे...

तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीससुद्धा प्रतिसाद देताना आयडीच्या नावाचा सवंग वापर करण्याचा मोह व्हावा ना. समाजाचे अधःपतन होत आहे हेच खरे. बरं ते जाऊ दया. ईथे शुचितैंनी तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर दिलंत तर तंत्र विद्येतील चार गोष्टी आम्हालाही कळतील. आमच्याकडे तंत्रशास्त्रातील पदवी असूनही या तंत्रविद्येच्या बाबतीत आम्ही कोरडे आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 02/23/2013 - 02:45

In reply to अरेरे... by धन्या

Permalink

शुचि ताईंनी विचारलेल्या

शुचि ताईंनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देऊ इच्छित नाही कारण तंत्र, ओळ्म्बा, हस्तसामुद्रीक या जंगलात हरवू इच्छित नाही तिकडून लवकर बाहेर येणे जमत नाही बादवे एकच सांगेन या सिद्धी अविद्याच मानायला हव्यात कारण त्या तुम्हाला मोक्षाप्रत नेत नाहीत (सध्या कडेला बसलेला) जोग
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sat, 02/23/2013 - 03:15

In reply to शुचि ताईंनी विचारलेल्या by आशु जोग

Permalink

कारण तंत्र, ओळ्म्बा,

कारण तंत्र, ओळ्म्बा, हस्तसामुद्रीक या जंगलात हरवू इच्छित नाही. तिकडून लवकर बाहेर येणे जमत नाही
तंत्र काय आहे ते या लेखात बर्‍यापैकी कळलेच आहे. ओळम्बा आणि हस्तसामुद्रिक आत न जाताच थोडक्यात सांगा.
एकच सांगेन या सिद्धी अविद्याच मानायला हव्यात. कारण त्या तुम्हाला मोक्षाप्रत नेत नाहीत.
मग नाथ संप्रदायाचं आणि त्यातील नाथांचं (यात ज्ञानदेवसुद्धा आला.) काय? त्यांना मोक्ष मिळाला नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by फिरंगी on Fri, 02/22/2013 - 20:27

Permalink

राष्ट्रभक्त हिटलरला

माहितीपूर्ण लेख .... सुंदर
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Fri, 02/22/2013 - 23:55

Permalink

राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात

राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी
अर्थातच चुकीचं वाक्य. उदाहरणार्थ, जर सगळे काश्मिरी पाकिस्तान च्या किंवा आझाद काश्मिर च्या बाजूने असतील तर त्यांना स्वातंत्र्य देणार का? अर्थातच् नाही. काश्मिर माणूसरहित करायची पाळी आली तरी नाही. यात प्राथमिकता राष्ट्रभक्ती लाच.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sat, 02/23/2013 - 00:45

Permalink

जाणारे जीवानीशी गेले, त्यांचा

जाणारे जीवानीशी गेले, त्यांचा जीव घेणार्‍या हिटलरनेही आत्महत्या करुन आता ६८ वर्षं झाली. पब्लिक मात्र उगाच शिळ्या कढीला उत आणून आपले कंड शमवून घेत आहे. च्यायला, जसा काही इथे तावातावाने कीबोर्ड बडवला म्हणजे जगाचा ईतिहास बदलणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 02/23/2013 - 01:14

In reply to जाणारे जीवानीशी गेले, त्यांचा by धन्या

Permalink

झालं

ओतलं आमच्या उकळत्या कढीवर पाणि =)) आयला.... जगाचा इतीहास बदलायची आमची जित्याची खुमखुमी मेल्यावरच जाणार कि काय. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Sat, 02/23/2013 - 01:27

In reply to झालं by अर्धवटराव

Permalink

जगाचा इतीहास बदलायची आमची

जगाचा इतीहास बदलायची आमची जित्याची खुमखुमी मेल्यावरच जाणार कि काय.
कदाचित इथे मिपावर अशा वादग्रस्त चर्चा करुन ईतिहासात अजरामर व्हायचा तुमचा डाव असावा. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Tue, 02/26/2013 - 00:30

In reply to जाणारे जीवानीशी गेले, त्यांचा by धन्या

Permalink

अत्यंत उथळ

हिटलर जरी मेला असला तरी त्या वेळचा इतिहास माहित असणे महत्त्वाचे आहे. माणूस हा इतिहासाची पुनरावृत्ती करत असतो असे म्हणतात. दुसरे महायुद्ध, हिटलर ह्या गोष्टींचा अभ्यास, त्यावरची मते ही उपयुक्त आहेत. प्रत्येक भारतीय कमी अधिक प्रमाणात आपल्या सरकारात सहभागी असतो. हिटलरसारख्या प्रवृत्ती, बाकी युरोपियन देशातील विविध नेत्यांची विचारपद्धती ही वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रमाणात पुन्हा एकदा आजही देशात, जगात दिसतेच. ती लक्षात घेणे, समजणे आणि काही प्रमाणात , जरुर असेल तर त्यावर उपाय करणे हे करण्यकरता इतिहास माहित असणे गरजेचे आहे. प्रत्येकाकडे इतिहास बदलायची कुवत असते. तुम्ही नाही तर तुमची मुले, तुमची नातवंडे, भाचे, पुतणे, काके, मामे काय करु शकतील ह्याचा अंदाज करणे अवघड आहे. निदान मतदान करुन इतिहास बदलल्याची उदाहरणे अगदी भारतीय इतिहासात अगदी अलीकडेही आहेत. अर्थात हे विचारमंथन सगळ्यांना जमेल, पचेल, रुचेल असे नाही. काहींना हलके फुलके तेवढेच लिहायला वाचायला आवडते. पण मग त्यांनी निदान इतरांच्या उहापोहाला तुच्छ लेखू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sat, 02/23/2013 - 03:10

Permalink

आमच्या बवेरियन राज्याकडे माईन

आमच्या बवेरियन राज्याकडे माईन कांफ चे कॉपी राईट हक्क आहेत. ते २०१५ ला संपल्यावर ह्या पुस्तकाचे अधिकृतरीत्या प्रकाशन करणार आहेत. व ह्याचे एक शालेय वर्जन सुद्धा असणार आहे. ह्या पुस्तकाची अधिकृत इंग्रजी प्रत आली की तिचे मराठी अनुवाद करून जो प्रकाशक महाराष्ट्रात आणेल त्यावर पैसा व कीर्ती व अपकीर्ती असे बरेच काही पदरी पडेल थोडक्यात ते लोकप्रिय होतील ह्याची नोंद घ्यावी, ह्या पुस्तकावर भारतात बंदी येईल की नाही किंवा यावी की नाही ह्यावर एक वेगळा धागा निघू शकतो , , पण रस्त्यावरून पायरेटेड माल विकत घ्यावा लागणार नाही.एवढे नक्की मुळात ह्या लेखात हिटलर व त्यांचे राष्ट्र प्रेम ह्या अनुषंगाने लेखन झाले. ह्या लेखात कोठेही त्याने केलेल्या हत्या कांडाचे समर्थन केले नाही आहे , तेव्हा त्या मुद्द्याला येथे आणून लेखात लिहिलेले इतर मुद्दे दुर्लक्षित करणे योग्य नाही असे मला वाटते. हिटलर विषयी माझे मत मी गांधी ह्यांच्या वरील एका लेखात लिहिले होते. एका व्यक्तीची धोरणे ,तत्वे , मत व इच्छा सर्व देशावर ह्या ना त्या प्रकारे लादण्यात आल्या तर देशाचे नुकसान होते , मुळात हिटलर सारखा हुकुमशाह जगात वेळोवेळी प्रस्थापित राष्ट्रांनी ,व्यवस्थेने निर्माण केले. हे आपले मत तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल हे नाटक सांगत , आपली मराठी ह्या संकेत स्थळावर तेंडुलकरांचे हे मत नाटकाच्या मध्यंतरात मांडले आहे. सद्दाम हुसेन ची निर्माती व त्याला पोसणे पुढे त्याने इराणी जनतेवर रासायनिक शस्त्रे वापरणे व कुर्दिश लोकांचा संहार करणे अश्या घटना ताज्या आहेत. हिटलर चा उदय एका रात्रीत झाला नाही. त्याची जर्मनीत वाढती लोकप्रियता ,त्याचे वाढते प्रस्थ त्याने केलेली शस्त्र सज्जता ब्रिटन व फ्रांस ला दिसू नये व खुपू नये असे मानले तर तर तो त्यांच्यावर त्यांच्या साम्राज्य वादी धोरण ज्या दूरदृष्टी व बुद्धी चातुर्य व व्यावहारिक व वास्तववादी दृष्टिकोनावर संशय घेण्यासारखे आहे. तेव्हा वाईट ,चांगले , पाप पुण्य ह्यांचा हिशोब चित्रगुप्त ठेवत aah , एखाद्याला जर्मनीला प्रगतीपथावर नेणारा हिटलर आवडतो हिटलर चा उदय होण्यास जरी फ्रेंच व ब्रिटन ने प्रत्यक्ष मदत केली नाही तरी पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीला भिकेला लावणाऱ्या ह्या साम्राज्यवादी देशांनी त्याला जर्मनीत मोठा होऊ दिले , म्हणजे अप्रत्यक्ष मदत केली. त्याने एवढे जिप्सी व ज्यू मारे पर्यंत हे झोपले होते का मुळात हिटलर हा नाझी भस्मासुराचा उदयास्त मध्ये सांगितला तेवढा हुशार नव्हता. हे त्याने शेवटी केलेल्या अनेक चुकांमधून दिसून येते. पण तरी त्याला घाशीराम ने पुण्यात घातला तसा गोंधळ युरोपात सुरवातीला ह्या बड्या राष्ट्रांनी का घालू दिला ह्याचे उत्तर आहे रशियन साम्यवाद भांडवलशाही च्या मुळावर असलेला साम्यवादाचा युरोपातील तरुण व बुद्धिजीवी वर्गावर पगडा बसत होता. ह्याचे कारण भांडवलशाही तेव्हा सुद्धा भले लोकशाहीत नांदत असली तरी लोकशाही चा अर्थ व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी चालवलेला मोठा व्यापार असे होते. सामान्य कष्टकरी व सुशिक्षित वर्गाला राजकारणात म्हणावे तेवढे स्थान नव्हते त्यांची संभावना वर्किंग क्लास अशी होती. फ्रांस पासून थेट भारतासारख्या वसाहतीत समाजवादी विचार सुशिक्षित हुशार तरुणांमध्ये रुजले होते. के जी बी चा इतिहास हे पुस्तक वाचतांना असे कळले की भारतात सुरवातीला जे कम्युनिस्ट पक्ष उभारले गेले त्यांच्यात व मॉस्को मधील संवाद व ताळमेळ भारतातील इंग्रजांनी आय बी ने पकडला होता. थोडक्यात प्रत्यक्ष युद्ध न करता किंवा आपली माणसे जगभर न पाठवता त्यांची विचारसरणी युरोपात लोकप्रिय होत होती. भारतात सुरवातीला बुद्धिजीवी वर्गात असलेले साम्य वादाचे जीवघेणे आकर्षण व त्यासाठी सर्वस्व त्यागाची वृत्ती पहिली तर युरोपात हा धोका साम्राज्यवादी राष्ट्रांनी पहिला. व ओळखला. तेव्हा प्रत्यक्ष रशिया वर हल्ला करणे हे काही मागास देशात वसाहत बनवण्याइतके सोपे नव्हते. मुळात इंग्रज व रशिया ह्यांच्यात अफगाण साठी द ग्रेट गेम अनेक दशके चालला होता. तेव्हा मांजराच्या गळ्यात घंटा घालणार कोण असा यक्षप्रश्न होता. इराण चा खात्मा करण्यासाठी सद्दाम व साम्यवादाचा निकाल लावण्यासाठी पहिले हिटलर व सरत शेवटी तालिबान , अल कायदा ची निर्मिती झाली. जे हिटलर करू शकला नाही ते तालिबान ने करून दाखवले. दुसरे महायुद्ध संपले व रशिया एक प्रभावी राष्ट्रे ,महासत्ता म्हणून उदयास आले व त्यांच्या सोबतीने शीत युद्ध सुरु झाले , आणि ते शेवट पर्यंत शीत राहिले कारण रशियावर प्रत्यक्ष हल्ला चढवणे दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतर दोस्त राष्ट्रांना परवडणारे नव्हते , हेच नेमके हिटलर विसरला व विशाल रशियात घुसला व आमच्या आजे सासऱ्याला तेथे हिम निद्रा घ्यावी लागली. काट्यानेच काटा काढावा म्हणून पहिले ब्रिटन व मग अमेरिकेने अनेक हुकूमशहा पोसले. त्यांच्या काळात जनतेवर झालेले अत्याचारांना खुली सूट दिली. फार लांब कशाला जायचे तर पाकिस्तान मध्ये झिया ला भारतात काश्मीर व खलिस्तान दहशतवाद सुरु करणे त्याचवेळी अण्वस्त्र सज्ज होणे अश्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले. रशियन मारे पर्यंत लादेन अमेरिकेसाठी निरुपद्रवी होता. जेव्हा त्याने अमेरिकन मारले तेव्हा मग तो अचानक दहशतवादी झाला. अचानक प्रगत देशाला हिरवा दहशतवाद दिसला. मग हिटलर ने भारतीय तर मारले नाही त्याने संपवला वसाहतवादी फ्रेंच व ब्रिटनचा तोरा आणि त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनाचा वाजवला बोर्या हिंसा ,युद्ध काय असते हे त्याने ह्या साम्राज्यवादी देशाच्या जनतेला दाखवले. इतके दिवस आपले देश दूर वसाहतीत तेथील स्थानिक लोकांना गुलाम म्हणून विकतात तेथे अत्याचार करतात , त्यांचे अनेक शतके आर्थिक व सर्वच बाजूने पिळवणूक करतात. त्या काळातील अंदमान व तेथे काळे पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या ब्रिटीश सरकारच्या राजकीय कैदी मानवतेच्या सर्व बंधने डावलून शिक्षा भोगत होते त्यांच्यासाठी कोणी अश्रू ढाळले नाही. आपण मात्र जगात घडलेल्या सर्व वाईट गोष्टींविषयी उर बडवून रडायचे ह्याला काय अर्थ आहे , बळी तो कान पिळी हे त्रिकालाबाधित सत्य आहे , भारत वसाहत असतांना जनरल डायर निर्दोष सुटला, तेव्हा आज भारताची ब्रिटनला व्यापार , गुंतवणूक व इतर अनेक गोष्टीसाठी गरज आहे तेव्हा त्यांच्या पंतप्रधानाला कंठ फुटला. आंतरराष्ट्रीय राजकारण नैतिकता ही देशाच्या सीमेवर संपते ह्या राजकारणात दोन अधिक दोन ह्याची शून्य किंवा चार अशी दोन उत्तर असतात द्यायचे की घ्यायचे ह्यावर अवलंबून असतात. हिटलर ने अत्याचार केले म्हणून तो वाईट मग रेड इंडियन चे अमेरिकेत गोर्‍या लोकांनी जे केले ते काय आहे , आज फिलीस्तानी ,इराकी ,अफगाणी भागात मरणारे निरपराध नागरिक व अनेक देशात आपल्या मर्जीचे सरकार यावे म्हणून घाणेरडे राजकारण करून जगाच्या अनेक खंडात अनेक देशात जे निरपराध लोक मारल्या गेली ,मारल्या जात आहेत , मारली जाणार आहेत त्यांचा साठी कोणी टाहो फोडायचा . हे करणारी प्रगत राष्ट्रे त्यांनी विकसित केलेली टेक्नोलॉजी, व त्यांचा चंगळवाद आपण सर्वच आवडीने स्वीकारतो तेव्हा त्यांच्या अश्या कृत्यांकडे आपण डोळेझाक करतो. मग एकटा हिटलर वाईट बाकीचे मात्र जगाला अमेरिकन ड्रीम देणारे देवदूत असा भेदभाव का विषारी वायुने मरणारे ज्यू बद्दल सहानुभूती तर १० ते वीस माणसांकडून बलात्कार झाल्यावर गळा चिरून मेलेल्या हिंदू , सिंधी ,शीख महिलांच्या बाबत बद्दल जगाला माहिती तरी आहे का पाकिस्तान निर्मितीच्या वेळी आपण सुद्धा हिंसा पहिली आपल्याला जगाने आजतागायत सहानुभूती दाखवली का की आपण आपल्यावर झालेल्या अन्यायाचे जगात लॉबिंग किंवा मार्केटिंग करू शकलो नाही. ही आपली चूक समजायची का माझा एक आफ्रिकन मित्र म्हणाला होता एकदा मेला की तुम्ही सुटला पण गुलाम म्हणून जगणे म्हणजे रोज हजार दा मरणे हे त्यांच्या अमेरिकन पूर्वजांचे उद्गार आहेत. अन्याय करणारे ह्या जगात अनेक आहेत व होते व असणार आहेत. एकट्याला दोष देऊन काय फायदा. दुधात मिसळलेले पाणी काढून दुध पिणारा राजहंस आणि त्याची दंतकथा आपणास ठाऊक आहे , कुठलाच व्यक्ती परिपूर्ण नसतो ,महात्मा नसतो, त्यांच्यात असणारे वाईट गुण सोडून चांगले गुण घेणे केव्हाही योग्य. आज ज्यू राष्ट्रांशी आपले मैत्रीचे संबंध आहे , त्यांच्याकडून दहशतवादाच्या विरुद्ध प्रशिक्षण तर आपल्याला मिळत आहे पण त्याच सोबत आपला पिढीजात व्यापारी वर्ग व त्यांचा पिढीजात व्यापारी समाज व्यापारात एकत्र येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉबिंग आपण शिकत आहोत करत आहोत , भोंगळ आदर्शवादाला तिलांजली देऊन म्यानमारच्या हुकुमशाहीचे भारतात स्वागत करत आहोत त्याचवेळी तेथील लोकशाहीच्या प्रणेत्या महिला नेत्याचे सुद्धा आपण भारतात स्वागत करत आहोत ,थोडक्यात चीन पासून म्यानमार दूर राहावा म्हणून जमेल ती कुटनीती करत आहोत , ह्यापुढे आपण चित्र गुप्त असल्याच्या अविर्भावात कधी काळी घडलेल्या घटनेवर गळा काढण्याच्या अगोदर आपल्या देशाचा हिताचा विचार महत्त्वाचा ठरतो , आपल्याला इराण व ज्यू राष्ट्रे अश्या दोन भिन्न विचारसरणी असलेली राष्ट्रे ज्यांच्याकडून अनेक हिंसक कृत्ये काळाच्या ओघात घडली आहेत ती भारतासाठी एकाचवेळी विविध कारणासाठी उपयुक्त आहेत व म्हणूनच ते आपले मित्र राष्ट्रे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 02/23/2013 - 09:28

In reply to आमच्या बवेरियन राज्याकडे माईन by निनाद मुक्काम …

Permalink

श्री.निनाद, तुमच्याकडुन

श्री.निनाद, तुमच्याकडुन प्रतिसाद येण्याची वाट पाहात होतो, कारण तुम्ही आजच्या जर्मनीच्या जास्त जवळ आहात, इथं मिपावर जर यावर तावातावानं चर्चा करणारे आयडि आहेत तर तिथं प्रत्यक्ष जर्मनीत सुद्धा हे होत असणारच. हिंसा ,युद्ध काय असते हे त्याने ह्या साम्राज्यवादी देशाच्या जनतेला दाखवले. - तुमचा सगळा प्रतिसाद चार वेळा वाचला, त्यातलं हे वाक्य फार फार पटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल खरे on Sat, 02/23/2013 - 13:21

In reply to आमच्या बवेरियन राज्याकडे माईन by निनाद मुक्काम …

Permalink

अप्रतिम प्रतिसाद. अतिशय सुंदर

अप्रतिम प्रतिसाद. अतिशय सुंदर.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 02/26/2013 - 07:32

In reply to अप्रतिम प्रतिसाद. अतिशय सुंदर by अमोल खरे

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 02/23/2013 - 23:43

In reply to आमच्या बवेरियन राज्याकडे माईन by निनाद मुक्काम …

Permalink

खणखणीत आणि वस्तुस्थितीवर आधारलेला प्रतिसाद...

आपण भारतीयांना उगाचच जगातील सगळ्या संतगिरीचा आमच्या कडे मक्ता आहे हा भम आहे आणि अनेकदा केवळ बोटेच नाही तर आख्खा हात पोळून घेउनही आपण त्या भमातून बाहेर यायला तयार नाही. तथाकथीत पुढारलेले देश मात्र "केवळ आम्हीच जगभरच्या लोकशाही आणि शांततेचे पुरस्कर्ते आहोत" असा सतत डंका पिटत असतात पण कृती मात्र स्वतःच्या फायद्यासाठी योग्य असेल तीच करत असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Tue, 02/26/2013 - 20:50

In reply to आमच्या बवेरियन राज्याकडे माईन by निनाद मुक्काम …

Permalink

साम्राज्यवाद्यांचा तोरा उतरवला?

प्रतिसाद वाचून सोडून दिला होता.पण काही वाक्ये धादान्त असत्य आहेत. कोणीतरी सत्य पुढे आणलेच पाहिजे.पहिल्या आणि दुसर्‍या दोन्ही महायुद्धांत जर्मनीचा सपशेल पराभव झाला मग तोरा कसा उतरवला? खरे तर जर्मनी हा वसाहतींच्या शर्यतीत लेट एन्ट्री होता. मध्य योरप मध्ये सतराव्या अठराव्या शतकात बर्‍याच अंतर्गत कुरबुरी सुरू होत्या. छोटीछोटी जर्मनभाषक राज्ये बाहेरच्यांचा(विशेषतः फ्रान्स)पाठिंबा घेत कधी ऑस्ट्रिअन साम्राज्याशी निष्ठा ठेवत तर कधी प्रशिआशी. या ऑस्ट्रोप्रशिअन दुष्मनी मुळे जर्मनी एकसंध होऊ शकला नाही.जर्मन राष्ट्रवादाचा उगमच मुळी १८०६ मध्ये रोमन साम्राज्य अधिकृतरीत्या विलय पावल्यावर आणि नेपोलिअन च्या विजयानंतरच्या(१८१५) विजयोन्मादाने डिवचले गेल्यावर झाला.पुढे १८६६ मध्ये अखेर ऑस्ट्रोप्रशिअन युद्ध घडलेच.प्रशिआची किंचित सरशी झाली,पण ते महत्त्वाचे नाही. तोपर्यंत इंग्लंड,फ्रान्स,स्पेन आदि इतर महासत्ता अक्ख्या जगात वसाहती स्थापून बसल्या होत्या आणि एकसंध नसलेल्या जर्मनीला काहीच वाव उरला नव्हता. त्यामुळे जर्मनी वसाहत वादी बनला नाही ह्यात जर्मनांनी किंवा त्यांच्या बाजूने इतर कोणीही नैतिक फुशारकी मारण्यासारखे काहीच नाही. बिस्मार्कने युनिफिकेशन केले आणि जर्मन साम्राज्याची औद्योगिक प्रगती होऊ लागली. त्यांनी ब्रिटन च्या स्पर्धेत आपले नाविक दल भक्कम करायला सुरुवात केली.तेव्हाच्या योरप् ची राजकीय स्थिती खूपच गुंतागुंतीची होती.कित्येक छोट्या साम्राज्यांनी याचा धसका घेऊन आपापली सैन्यदले वाढवली.एकंदरीत सर्व राष्ट्रे युद्धखोर बनली.ऑटोमान साम्राज्याचे लचके तोडण्याची शर्यतच लागली. १९०८ साली एक छोटी ठिणगी पडली आणि १९१४ मध्ये ऑस्ट्रिया-हन्गेरीने महायुद्धच पेटवले. शर्यतीत मागे पडलेल्याने शर्यत जिंकणार्‍यांचा मनोमन दुस्वास करावा आणि खुन्नस सुरूच ठेवावी तसे हे झाले.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com