✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राष्ट्रभक्त हिटलरला

अ
अनिकेतदळवी यांनी
गुरुवार, 02/21/2013 - 12:20  ·  लेख
लेख
हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल.मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-: 1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले. 2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला. 3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करायला लावली. 4) ज्या फ्रान्सने पहिल्या महायुद्धात जर्मनीला रेल्वेच्या डब्यात शरणागती पत्करायला लावुन आपल्या शौर्याचे प्रतिक म्हणुन तो डबा आपल्या देशात नेला होता त्याच फ्रान्सचा महिन्याच्या आत पाडाव करुन देशाच्या अपमानाचा बदला घेताना त्याच रेल्वेच्या डब्यात फ्रान्सच्या प्रमुखांना 22 जुन 1940 ला शरणागती पत्कारत शस्त्रसंधी करार करायला लावला. फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अंदाज फक्त हिटलरलाच आला होता त्यामुळे सेनानीँच्या विरोधाला न जुमानता त्याने फ्रान्सचा पराभव केला. 5) ज्या ब्रिटीशांच्या संपुर्ण जगात वसाहती होत्या त्या ब्रिटीशांना एकट्या हिटलरने BLITZCREIG तंत्राचा वापर करुन पळता भुई थोडी केली. भुमध्य समुद्रातील क्रिट बेट मिळवत ब्रिटीशांना पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही आणि रोमेलच्या साहाय्याने इजिप्तला पराभुत करुन इंग्लंडला सगळ्या बाजुंनी कोँडले. 6) बाल्कन प्रदेशात हिटलरने युद्ध करुन ग्रीकांना पराभुत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घास गिळला. 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.हिटलर 19 व्या शतकातील सर्वशक्तीमान व्यक्तिमत्व होते. जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमीत झाले. जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले. लक्षात ठेवा कोणतेही युद्ध भयानकच असते पण देशाची बेईज्जत त्यापेक्षा भयानक असते. हिटलरच्या ज्या विकासाविषयी मी सांगतोय तो काय होता ते सांगतो-: 1) हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण सक्तीचे केले. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. 3) जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते. 4) जर्मनीने आर्थिक क्षेत्रातप्रगती केली ती शस्त्रोत्पादनां च्या धोरणामुळेच. या सर्व योजनेला युद्धकालीन अर्थकारण म्हणतात. 5) हिटलरने CHANCELLER होताच सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना शरणागती पत्करण्यास सांगुन पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान" मिळवुन दिले. जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेंब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले. हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चक्रे प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली. कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल. हिटलरच्या या विकासाच महत्व अजुन वाढत कारण त्यावेळी जर्मनीतील परिस्थिती पुर्णतः प्रतिकुल होती. अशा परिस्थितीत हिटलर 30 जानेवारी 1933 ला जर्मनीचा CHANCELLER झाला आणि पुढील 5 वर्षात त्याने जर्मनीचा जो काही विकास केला त्यामुळे जर्मनीची गणती जगातील सर्वशक्तीमान राष्ट्रात होऊ लागली आणि 1 सप्टेँबर 1939 पर्यँत दुस-या महायुद्धास सामोरे जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या राष्ट्रात आली. हिटलरने कोणत्या परिस्थितीत विकास साधला हे जाणुन घ्यायला अगोदर जर्मनीतील प्रतिकुल परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे. 1) पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर 1$ ला 4 MARKS असलेली जर्मन चलनाची किंमत 1$ ला 10000 MARKS एवढी कमी झाली होती. 2) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. प्रत्येक गोष्टीत जर्मनीला बाकी राष्ट्रांकडुन प्रथम परवानगी घ्यावी लागत होती अशा परिस्थितीत अन्यायाने त्रस्त जर्मनीला सावरले ते हिटलरनेच...!!! या तहाच्या सर्व अटी झुगारुन देत चतुराईने त्याने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले आणि थोड्याच काळात जर्मनीला एवढे बलशाली बनवले की. ज्या इंग्लंड सारख्या देशांनी जर्मनीवर अटी लादल्या होत्या तेच देश युद्धाच्या भितीने हिटलरच्या अटी मान्य करु लागले होते. देशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....! राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
66599 वाचन

💬 प्रतिसाद (213)

प्रतिक्रिया

+१ सहमत

पिंपातला उंदीर
Tue, 02/26/2013 - 21:00 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

राही

निनाद मुक्काम …
Fri, 03/01/2013 - 00:33 नवीन
राही दुसर्‍या महायुद्धाचे जगावर परिणाम किंवा दुसर्या महायुद्धानंतर चे जग अश्या अर्थाने जर विचार केला तर तुम्हाला काही ठळक गोष्टी दिसून येतील. वसाहतवाद मग टप्प्याटप्याने नष्ट झाला, आणि फ्रांस ,व ब्रिटन ह्या महासत्ता माजी झाल्या व त्यांची जागा रशिया व अमेरिकेने घेतली. येथे एक लक्षात घ्या ह्या महायुद्धाच्या आधी रशिया व अमेरिकेचा जगावर प्रभाव कितीसा होता. शीतयुद्धात ह्या दोन देशांमध्ये युरोप विभागला गेला. पण हिटलर ने त्यांना युद्ध व हिंसा ह्याचे दर्शन दाखवले, उद्याचा दिवस कसा असणार आता विमानाचा हल्ला झाल्यावर हिटलर जर लंडन मध्ये आला तर ह्या विचाराने त्यांची बोलती बंद झाली , तस्मात युद्धानंतर ब्रिटन ची एक पिढी गारद झाली होती. शहरे उध्वस्त झाली होती , अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. आणि गंमत अशी होती युद्धाच्या नंतर ह्याची भरपाई ब्रिटन व फ्रांसला पहिल्या महायुद्धाच्या नंतर जसे त्यांनी जर्मनीची अर्थव्यवस्था बुडवणारा तह करता आला नाही. त्यांना दुसरा हिटलर निर्माण होणे परवडणारे नव्हते. व आता रशिया व अमेरिका ह्या नवीन महासत्तांच्या मताला जबरदस्त किंमत आली होती. आज काय परिस्थिती आहे पराजित जर्मनी व जपान हे जेते फ्रेंच व ब्रिटन पेक्षा मोठी अर्थव्यवस्था असणारे राष्ट्र आहेत . हिटलर च्या आधी जर्मनीत मार्क चे डॉलर च्या तुलनेत प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात अवमूल्यन झाले होते हे आज कुणाला खरे वाटणार नाही. ह्याच महायुद्धामुळे ब्रिटनच्या जनतेने त्यांच्या इतिहासात पहिल्यांदा मजूर पक्षाला सत्तेवर आणले , युद्ध जिंकणारा चर्चिल व त्यांचा साम्राज्यवादी पक्षाला युद्ध जिंकून सुद्धा त्यांच्या जनतेने नाकारले. कारण त्यांच्या धोरणांची व राजकारणाची त्यावेळच्या जनतेला चीड आली होती , ह्याला म्हणतात तोरा उतरवणे. आज ब्रिटन अमेरिकेचे लोंबते म्हणून जगात ओळखले जातात तर निर्दोष जनरल डायर च्या देशाच्या हुजूर पक्षाचा प्रमुख आपल्या माजी वसाहतीत येउन खेद व्यक्त करतो. येथे खरे तर एक वर्तुळ पूर्ण झाले. आज हे दुसरे महायुद्ध झाले नसते तर ब्रिटन व फ्रांस ह्यांनी आजतागायत त्याच्या वसाहतींवर राज्य केले असते. एवढी त्यांची साम्राज्यावर पकड होती. दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा चलेजाव चळवळ करता आली. आज जगात पहिल्या महायुद्धाच्या बद्दल बोलले जात नाही मात्र दुसरे महायुद्ध व हिटलर हे आजही जगभरात चर्चिले जातात कारण त्याने व त्यांच्यामुळे घडलेल्या ह्या महायुद्धामुळे जगाचा इतिहास , भूगोल बदलला. त्यांचे युरोपचे सामाजिक ,सांस्कृतिक जीवन बदलून टाकले. आज पराजित जर्मनी युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, व युरोपियन युनियन चा प्रमुख आधार स्तंभ अफगाण युद्धात रशियाचा तोरा तर दुसर्‍या महायुद्धात ब्रिटन व फ्रांस चा तोरा उतरला , माझ्या ४ वर्षाच्या लंडन मधील वास्तव्यात एकही इंग्लिश व्यक्तीस मी त्यांच्या जुन्या गत वैभवाचे गुणगान गातांना पहिले नाही. एवढी तिडीक त्यांना गतकाळातील त्यांच्या साम्राज्यशाही इतिहासाबद्दल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

पहिले महायुद्ध शिळे झाले.

राही
Sun, 03/03/2013 - 18:26 नवीन
पहिले महायुद्ध शिळे झाले. दुसरे महायुद्ध त्या मानाने ताजे आहे म्हणून त्याबद्दल अधिक लिहिले जाते. कुठल्याही युद्धानंतर इतिहास-भूगोल बदलतोच. त्याचे श्रेय हिटलरला देण्याचे कारण नाही. आज चीनची अर्थव्यवस्था यू.के.पेक्षा मोठी आणि जगात दुसर्‍या स्थानावर आहे म्हणून कोणी तियानन्मेन चौक हत्याकांड विसरेल असे नाही किंवा ते माफीपात्र ठरते असे नाही. दुसर्‍या महायुद्धात जपान ब्रिटिशांचे शत्रू होते आणि ब्रिटिश भारताच्या पूर्व सीमेवर जपानचे हल्ले होऊ घातले होते. त्यांचीही अर्थव्यवस्था जगात तिसरी आहे. आज ते भारतातल्या अजिंठा,गया,इ. बौद्ध ठिकाणांना मदत करताहेत म्हणून कोणी त्यांचे क्रौर्य विसरेल असे नाही.युद्धोत्तर जर्मनी-जपानला सैन्यावर खर्च करण्यास आणि सैन्य उभारण्यास मज्जाव होता.संरक्षणावरील खर्च त्यांनी विकासकार्यावर केला हेही त्यांच्या वाढलेल्या अर्थव्यवस्थेमागचे एक कारण आहे.जगाच्या इतिहासात असे शत्रू-मित्र बनत-तुटत असतात. आज अमेरिकन अर्थव्यवस्था घसरणीवर आहे म्हणून विसाव्या शतकाची पाऊणशे वर्षे अमेरिका महासत्ता होती हे विसरावे की काय? त्या त्या काळाचा इतिहास दर पिढीमागे बदलून सांगावा असे नाही. हिट्लर चा अतिरेकी विस्तारवाद, एक प्रकारचा साम्राज्यवादच त्याला नडला. हिट्लर ची औद्योगिक झेप त्याच्या ब्लित्स्क्रीग सारखीच अल्पजीवी ठरली.त्याच्या आक्रमक युद्धखोरीमुळे त्याने जर्मनीला पराभवाच्या आणि नामुष्कीच्या खाईत लोटले. जे अणुसंशोधन जर्मनीत पूर्णत्वाला जाऊ शकले असते ते नामवंत ज्यू शास्त्रज्ञांच्या अमेरिकेत स्थलांतरामुळे अमेरिकेत तडीला गेले. आज भलेही जर्मनी उर्जितावस्थेत असेल,पण त्याचे श्रेय हिट्लर् ला अजिबात नाही. ते अ‍ॅडेनॉर, एरहार्ड प्रभृतींना जाऊ शकेल. लढाया जिंकणे आणि शेवटी युद्ध जिंकणे यात फरक असतो.पूर्व-पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणामागे बराच मोठा राजकीय आणि धार्मिक पट आहे. सोविएत यूनियनची शकले उडणे हे जसे प्रमुख कारण तसेच रेगन,थोरले बुश यांची धोरणे,पोलंड आणि पूर्व योरप मध्ये उफाळून आलेली धर्मप्रीती,पोलिश धर्मगुरू जगद्गुरू- पोप बनणे अशी अनेक उघड आणि पडद्यामागची कारणे आहेत. हिट्लर हा जर्मन राष्ट्राला कलंक वाटला, पुढे जर्मन नेत्यांनी वॉर्-क्राइम्ज बद्दल जाहीर माफी मागितली. हिट्लरच्या चुलत नातेवाईकांनी आपले आडनावही बदलले. खुद्द जर्मनांना जो इतिहास आणि माणूस घृणास्पद वाटतो त्याचे उदात्तीकरण आपण करावे हे अनाकलनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

राही

निनाद मुक्काम …
Sun, 03/03/2013 - 21:18 नवीन
राही तुम्हाला येथे एक मुद्दा बहुदा लक्षात आला नाही जो माझ्या पहिल्या प्रतिसादात मी अमेरिका ,रेड इंडियन किंवा साम्राज्यवादी राष्ट्रे व वसाहतवाद ह्या उदाहरणातून सांगितला आहे. तो असा की हिंसा हि जगातील बहुतेक महासत्तांच्या हातून सर्वच काळात घडली आहे. ज्या ज्यू जमातीचा नरसंहार झाला ती जमत सध्या फिलीस्तानी लोकांशी आक्रमकतेने वागते. आज अमेरिका अफगाण व इराक मध्ये अशीच वागते. आणि तुम्ही कोणत्या काळात जगत आहात चीन बद्दल व जपानच्या आधी केलेल्या हिंसेबद्दल जगात सध्या कोणीच बोलत नाही.असे तुम्हाला वाटते. जगात चीन म्हटले की भविष्यातील महासत्ता व त्यांची प्रगती किंवा जपान म्हटले तर आर्थिक महासत्ता एवढेच समजले जाते. आपल्याकडे out sider हा कायक्रम चालला आहे त्यात मुशरफ व जसवंत सिंग ह्यांना टीम प्रश्न विचारत होता. काश्मीर मधील मानवाधिकार हक्काचे उल्लंघन व भारतीय मानवाधिकार संस्थांचे भारतावर गंभीर आरोप. तेव्हा जसवंत सिंग त्याला बाणेदार पणे म्हणाले. तुम्हा प्रगत देशाच्या लोकांकडून आणि संस्थांकडून आम्हाला लेक्चर देऊ नका. सध्या ब्रिटन व अमेरिकेने इराक व अफगाण मध्ये काय केले हे सगळ्याच्या डोळ्यासमोर आहे, हिटलर ने हिंसा केली तर तो वाईट मात्र अमेरिका सध्या हिंसा करते तरी ती चांगली सारे जग त्यांची भलावण करते. मी आधी म्हटले तसे एखाद्या माणसाचे चांगले गुण घ्यावे वाईट घेऊ नये, इतिहास हा विजेत्यांकडून लिहिला जातो. जर्मनीत दुसर्‍या महायुद्धानंतर विभागले गेले , अमेरिका ,फ्रांस व ब्रिटन ने त्यांचा कब्जा घेतला त्यामुळे त्यांची शिक्षण व्यवस्था ते सर्वच शेत्रात भांडवलशाही व हिटलर विरोध रुजवला. पूर्व जर्मनीत रशियाने साम्यवाद रुजवला व हिटलर विरोध सुद्धा आत पूर्व जर्मनी गरीब राहिली व वेस्ट जर्मनी श्रीमंत झाली मात्र ह्या दोघांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असला तरी एक गोष्ट कायम होती हिटलर विरोध आता ते एकत्र झाले तरी हिटलर विरोध कायम आहे, ह्यामुळे खुद जर्मनीत हिटलर वर एकांगी चर्चा होते , पण तुम्ही चीन जपान बद्दल जे उदाहरण दिले त्याबद्दल एवढेच म्हणतो तुमच्यामते सो कॉल्ड जग त्यांनी केलेली हिंसा विसरले नाही तरीही झक मारून बहुतेक प्रगत देश आपल्या कंपन्यांची कार्यालये व व्यापार चीनशी आणतात ना जपान बरोबर आर्थिक सहयोग जगाचा व भारताचा आहे ना मग तेव्हा जगातील दीड शहाण्या प्रगत देशांना त्यांचे क्रौर्य का आठवत नाही. गेलाबाजार भाव गुजरात वर व्यापारी बहिष्कार घालणारे ब्रिटन व युरोपियन युनियन आता त्यांच्याशी व्यापार करायला का उतावीळ झाले आहे. दाम करी काम हा जगाचा व्यवहारी दृष्टीकोन आहे , हे तुम्हाला पटो अथवा ना पटो पण वैश्विक सत्य आहे. आज अमेरिकेचा अणुहल्ला विसरून जग अमेरिकेचे गुणगान गाते,.हीच अमेरिका आता इराण ने अणुबोंब बनवू नये म्हणून जगाला मदत मागते, मात्र सारे विश्व संपविण्यासाठी केवळ ३६ अणु बोंब हवे असतांना तुम्ही ७००० अण्वस्त्रांचे लोणचे काय एलियन चे आक्रमण होईपर्यंत मुरवत ठेवणार आहात का असा प्रश्न जग त्यांना विचारत नाही. थोडक्यात काय अण्वस्त्र हल्ला करणारी अमेरिका चांगली कारण ते विजेते आहेत तर हिटलर वाईट कारण तो पराभूत आहे. भारतात शीख हत्यांकाड विसरून जायचे व मुस्लिम हत्याकांड वर बोलायचे असा भारतीय प्रसारमाध्यमांचा प्रचार खाक्या आहे. कारण तुमच्या लॉजिक नुसार बहुदा ते ताजे आहे. असे विधान एकदा पंजाबात करून पहा. इतिहासात एखादी घटना त्यांच्या जगावरील परिणामावरून ओळखली जाते ताजे व शिळ्या मुळे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

व्हिलन हिट्लर

राही
Sun, 03/03/2013 - 23:19 नवीन
चीन आणि जपानबरोबर जग सहकार्य करते तसेच आजच्या जर्मनीशी सुद्धा करते.पण ते करतेवेळी 'राष्ट्रभक्त हिट्लर'ला स्मरून किंवा त्याच्या कळवळ्यामुळे कोणी सहकार्य करते असे नाही. आजची ईक्वेशन्स बदललेली आहेत. आज नवी समीकरणे आहेत म्हणून काल मांडलेली समीकरणे खोटी ठरतात असे नाही.हिट्लर हा दुसर्‍या महायुद्धाचा विलन ठरलेला आहे. त्याला नायक बनवण्याचा आटापिटा केविलवाणा आहे. अमेरिकेच्या क्रौर्यामुळे त्यांच्यावरही टीका होतेच.संपूर्ण इस्लामी जगत आणि इतरत्रचे डावे (हो तेच ते पुरोगामी वगैरे विचारजंत वगैरे)विचारवंत अमेरिकेचे कट्टर आणि कठोर टीकाकार आहेत.चीनशी हातमिळवणी करायला जग धावत असले तरी चीनचा सगळा डोलारा सक्तीने राबवल्या गेलेल्या धोरणांवर अवलंबून आहे.लोकांना नको असलेली ही सक्ती काही कारणांनी नाहीशी झाली किंवा लोकांनी झुगारून दिली तर काय चित्र असेल? बादवे, 'तुम्ही कोणत्या काळात आहात' हा प्रश्न अगदीच बालिश असल्याकारणाने सोडून दिला आहे. पुन्हा एकदा : ज्या हिट्लर ला त्याच्या स्वतःच्या जर्मनी देशात कोणी चांगला किंवा राष्ट्रभक्त म्हणत नाहीत त्याचे आपण उदात्तीकरण करणे हे अनाकलनीय आहे. अर्थात इतिहासकारांनी योग्य तो न्यायनिवाडा केलाच आहे. आपण तो मानायचा की आगपाखड करीत रहायचे तो आपला प्रश्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

इतिहासकारांचे काय घेऊन बसला.

निनाद मुक्काम …
Mon, 03/04/2013 - 00:29 नवीन
इतिहासकारांचे काय घेऊन बसला. इंग्रजांचे जेव्हा जगभर साम्राज्य होते. तेव्हा त्यांच्या साम्राज्याचा इतिहास त्यांनी त्यांच्या इतिहासकारांना सांगून वाचून लिहिला. आपले स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या लेखी गुन्हेगार होते. आणि ह्या महायुद्धाच्या मुळे त्यांचे साम्राज्य लयास जाण्यास गेले नसते तर डायर आजही त्यांच्यालेखी म्हणजे त्यांच्या इतिहासकारांच्या लेखी निर्दोष होता. असो जर्मनीत हिटलर चांगला नेता नव्हता असे मानतात. पण त्याच्या देशभक्तीपर कोणीच संशय घेत नाही. त्याच्या पुस्तकातील काही मजकूर आता जर्मनीत शाळेत मुलांसाठी सरकार ठेवणार आहे , हे मी आपणास जर्मनी वरून लिहित आहे. व त्याबद्दल लिंक मी माझ्या पहिल्या प्रतिसादात दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

इतिहास

राही
Mon, 03/04/2013 - 08:48 नवीन
आपल्या दृष्टीने निष्पक्ष इतिहासकार कोणी निघाले आणि त्यांनी लिहिलेला निष्पक्ष इतिहास सर्वमान्य किंवा निदान बहुमान्य झाला तर आमच्यासारखे सर्वसामान्य बहुसंख्य तो मानतील.आपण जर्मनीत असता हे एव्हाना मिपावर बहुतेकांना ठाऊक आहे. जर्मनीत वास्तव्याला/नागरिक असणे म्हणजे जगाच्या इतिहासावर ऑथेंटिक भाष्य करता येण्याची क्षमता बाळगणे हे समीकरण बरोबर असेल असे नाही. भारतातील भारतीय लोक भारतासंबंधी अनेक विषयांबाबत उलटसुलट मते (आणि बरेच वेळा पराकोटीचे अज्ञानही) बाळगून असतात. आणि हे सर्वच देशांबाबत म्हणता येईल.हिट्लर हे केवळ जर्मन फिनॉमेनन नाही. त्याच्या अपरिमित दुष्कृत्यांमुळे तो जागतिक स्तरावर अभ्यासला गेला आहे,जातो आहे. असा भस्मासुर (स्वतःचा किंवा स्वतःच्या कुळाचा विनाश घडवणारा कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ माणूस)पुन्हा उद्भवू नये यासाठी जगभरचे विचारवंत चिंतनशील असतात.त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन असा माणूस या पृथ्वीतलावर पुन्हा न उपजो अशी आशा करणे एव्हढेच आपल्या हातात आहे.कारण इतिहासापासून मानवजात काहीही शिकत नसते म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होते हेही सत्यच आहे. हा धागा हिट्लरसंबंधी होता म्हणून हिट्लरसंबंधीच लिहिले.चंगीझ्खान आणि पॉल पॉट विषयी नाही.कुणाचीही हत्याकांडे क्षम्य नाहीतच. 'अमक्याने हेच केले, त्याला आधी मारा मग माझ्याकडे या' या विधानाला या धाग्यासारख्या स्पेसिफिक धाग्याच्या चौकटीत स्थान रहात नाही. अतिरेकी राष्ट्रकल्याणवादावरही बरेच लिहिता येईल पण या धाग्यावर अवांतर नको म्हणून भारतीय पुराणातले एकच उदाहरण बघता येईल. वाल्या कोळी आपल्या कुटुंबासाठी म्हणून अनेक दुष्कृत्ये करीत असे.शेवटी कुटुंबासमोर जाब विचारला तेव्हा सर्वांनी त्याला नाकारले,डिस्-ओन केले.असो. आता इथे थांबलेले बरे कारण नवीन असे लिहिण्याजोगे फारसे काही राहिलेले नाही.तेच तेच मुद्दे परत उगाळले जात आहेत.तेव्हा पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

बरे झाले वाल्या कोळ्याचे

निनाद मुक्काम …
Mon, 03/04/2013 - 13:57 नवीन
बरे झाले वाल्या कोळ्याचे उदाहरण दिले ते सध्याच्या जर्मन ,अमेरिका व इतर प्रगत देशांच्या जनतेला चपखल लागू पडते. वाल्याचा परिवार म्हणजे ह्या देशाची जनता ह्यांना आपल्या सत्ताधारी नेत्यांच्या कडून विकास हवा. मात्र आपले नेते व प्रशासन इतर देशात कोणत्या मार्गाने नफा कमवतात ह्याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. व फळे भोगायची वेळ आली की हीच जनता पळून जाते. यासाठी जगभरचे विचारवंत चिंतनशील असतात. ह्यासारखी गमतीदार विधाने करू नका. मी जगात कुठेही राहत असलो तरी मला जगभरातील लोकांशी संवाद साधायला आवडतो. त्यांची मते ऐकून मी माझी मते बनवतो. तुम्ही जगभरातील इतिहास किंवा मी म्हणेन घडलेल्या घटना नीट अभ्यासल्या आहेत का कोणा महापुरुषाने तुम्हाला सांगितले की जगभरातील विचारवंत ,,,........ म्हणजे नक्की कोण हो माझ्या माहितीत जगभरातील प्रगत देश व त्यांच्या हेर संस्था शीत युद्ध सुरु झाले तेव्हा पासून जगात हुकूमशहा निर्माण करतात तेही आपल्या सोयी नुसार सद्दाम , लादेन ,तालिबान कोणी निर्माण केले. इतके दिवस मुशरफ व झिझा ह्यांना पाकिस्तानी सत्तेवर ठेवून आपला स्वार्थ अमेरिकेने कसा काढून घेतला हे आपल्या ध्यानी येत नाही ,का गडाफी सारख्या लोकांना कोणी इतके दिवस पोसले. इंदिरा गांधी ने बीबीसी च्या पत्रकाराला फटकारले व सांगितले जेव्हा ज्यू मारत होते तुम्ही मध्ये पडला मात्र बांगला नागरिक पाकिस्तानी सैनिक मारत होते तेव्हा तुम्ही का नाही मध्ये पडला , म्हणून आम्हाला मध्ये पडावे लागले. इतिहास म्हणजे भूतकाळातील घडलेल्या घटना त्यांचा अन्वयार्थ प्रत्येक जण ,प्रत्येक राष्ट्र आपल्या सोयीनुसार लावतो. निखळ सत्य व असत्या ह्या जगात अजिबात नसते. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. फाशीची शिक्षा ज्या देशांना क्रूर वाटते ते देश द्रोण हल्ल्यांचे समर्थन करतात. थोडक्यात न्याय , मानवता वाद वैगैरे आपल्या देशात दुसर्याच्या देशात गेले तेल लावत. तेव्हा एक भारतीय म्हणून आपल्या दृष्टी कोनातून आपल्या सोयीनुसार जगाकडे पाहायला शिकले पाहिजे. भोंगळ आदर्शवाद सध्या जगात कोणीच अंमलात आणत नाही , तो फक्त पुस्तकात उरला आहे किंवा शाळेच्या भिंतीवर सुविचार म्हणून जे वाचून सुद्धा आजकालचे राजकारणी व तुम्ही आम्ही ह्या समाजात जगत आहोत. मुळात हा लेख हिटलर ह्यांच्या चांगल्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्या वर आहे. येथे लेखात कुठेही ज्यू व जिप्सी ह्यांचा उल्लेख नव्हता काही लोकांना हिटलर म्हंटला की आठवते त्यांचे ज्यू हत्याकांड तुम्हाला एक प्रसंग सांगतो माझी हिल्टन मध्ये एक अरब मैत्रीण होती व आजही चेपू वर आहे. जिच्याकडे जर्मनीचे नागरिकत्व होते.रवान बुर्वामी तिने गाझा पट्टीत निरपराध लहान मुले व महिलांच्या शाळा व घरांच्या वर ज्यू विमानांनी तुफान हल्ला केला त्यांचे फोटो घेऊन लंडन मध्ये प्रदर्शन केले, ह्या निमित तिने एक मिटिंग आयोजित केली होती ज्यात आमच्या हॉटेल चे बहुतेक सर्व उपस्थित होते. तिचे म्हणणे होते की ह्या दोन राज्यकर्त्यांच्या भांडणात लहान मुले व बायकांचा काय दोष होता . कोणाही अमेरिकन व जर्मन ज्यात माझी बायको सुद्धा होती ह्या विषयावर मौन बाळगले. तेव्हा तिने माझ्या बायकोला सांगितले , तुम्ही तुमच्या नेत्याला ज्यू लोकांना मारले म्हणून खलनायक म्हणतात, व त्यासाठी ह्या ज्यू लोकांना स्वतंत्र देश प्रगत देशांनी दिला , आता निदान जर्मन लोकांनी तरी त्यांना विचारले पाहिजे की ह्यासाठी तुम्हाला नवे राष्ट्र दिले. पण हिटलर ला नावे ठेवणारे आजचे जर्मन व जनता आपले सैन्य अफगाण मध्ये नक्की काय करत आहे , ह्याबद्दल साशंक आहेत , त्यांना जर्मन कंपन्या भारतात लहान मुलांवर त्यांची औषधे ट्राय करतात हे जर्मन प्रसारमाध्यमांच्या कडून कळते तेव्हा धक्का बसतो त्यांना बिचाऱ्यांना माहित होते की असे प्रकार फक्त हिटलर च्या काळात घडायचे. तुम्ही लिहिले हत्याकांड कुठेलेही माफी नाही हे तद्दन पुस्तकी वाक्ये आहे. वास्तविक जगात प्रगत देशाच्या जनतेला अनेक मुद्द्यावर मी सोयीस्कर मौन बाळगताना कैक वेळा पहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

वाईट वाटले कारण

यशोधन वाळिंबे
Sat, 02/23/2013 - 16:09 नवीन
हिटलर, नेपोलिअन इत्यादींवर जेवढे लिखाण झाले त्याचे एक चतुर्थांश लिखाण देखील शिवाजी महाराजांवर झालेले नाही..
  • Log in or register to post comments

हिटलर, नेपोलिअन इत्यादींवर

काळा पहाड
Sun, 02/24/2013 - 00:58 नवीन
हिटलर, नेपोलिअन इत्यादींवर जेवढे लिखाण झाले त्याचे एक चतुर्थांश लिखाण देखील शिवाजी महाराजांवर झालेले नाही..
आणि आता होईल असेही वाटत नाही. संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ ईत्यादी महान संघटनांच्या कर्तुत्वामुळे महाराजांवर आता फक्त मराठा संशोधक संशोधन करतील. उगीच संशोधन, लिखाण वगैरे करून घरावर मोर्चे वगैरेच येण्याची शक्यता जास्त. त्यात जाणता राजा हे बिरूद सध्या एका वेगळ्याच व्यक्ती ला वापरले गेल्याने महाराजांची बदनामी होतेय ते वेगळेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधन वाळिंबे

फक्त ११ हवेत .... द्विशतक पुरे करायला

रघुपती.राज
गुरुवार, 02/28/2013 - 10:18 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

२००

राही
गुरुवार, 02/28/2013 - 22:55 नवीन
झाले वाटतं.
  • Log in or register to post comments

मस्त

हस्तर
गुरुवार, 04/23/2020 - 22:47 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा