Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by Dhananjay Borgaonkar on Tue, 02/26/2013 - 16:04
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
आज स्वा.सावरकरांची पुण्यतिथी. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी सुरु केली.पुढे त्याचे रुपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले. सावरकर जातीभेद नष्ट करण्यासाठी सुद्धा खुप लढले. हिंदुत्व ही संज्ञा त्यांनीच तयार केली. हिंदुत्वाविषयीचे त्यांचे विचार आजही अत्यंत प्ररणादायी आहेत. सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शि़क्षा भोगली. तुरुंगात असताना त्यांनी अनेक महाकावव्ये लिहिली. १९२१ साली त्यांची तुरुंगातुन सुटका झाली. त्यानंतर ते हिंदु महासभेचे अध्य़क्ष अनेक वर्षे होते. भारतीची फाळणी त्यांना कधीच मान्य नव्हती. त्यांनी कायम अखंड भारताचं स्वप्न बघितलं होतं. गांधींच्या खुनामधे त्याचा सहभाग होता की काय याची पुढे अनेक वर्र्षे शहानिशा चालली. पण निश्पन्न काहीच झाल नाही. सावरकरांना स्वातंत्र्यप्रात्पी नंतरसुद्धा भाषणबंदी होती. स्वातंत्र्यप्राप्तीचा पहिला लढा, कमला, काळे पाणी ही त्यांनी लिहीलेली काही गाजलेली पुस्तके. जयोस्तुते आणि सागरा प्राण तळमळला या कवितांचे कवी देखील सावरकरच होत. अशा या स्वातंत्र्यवीराला कोटी कोटी प्रणाम. _/\_
  • Log in or register to post comments
  • 11534 views

प्रतिक्रिया

Submitted by विटेकर on Tue, 02/26/2013 - 16:27

Permalink

विनम्र अभिवादन !

समाजसुधारक सावरकर हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि लेखाचा विषय आहे. त्यांचे सामाजिक कार्य देखील त्यांच्या देशभक्तिइतकेच प्रखर होते. क्रांतिकारक सावरकर/ काले पाणी या पैलू इतके सामाजिक कार्य प्रकाशात आले नाही.किबहुना त्यपुढे हे झाकोळले गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 02/26/2013 - 16:54

In reply to विनम्र अभिवादन ! by विटेकर

Permalink

>>क्रांतिकारक सावरकर/ काले

>>क्रांतिकारक सावरकर/ काले पाणी या पैलू इतके सामाजिक कार्य प्रकाशात आले नाही.किबहुना त्यपुढे हे झाकोळले गेले. त्यांच्या भक्तांना ते कार्य नकोसेच होते म्हणून ते फार प्रकाशात आले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Tue, 02/26/2013 - 17:03

In reply to >>क्रांतिकारक सावरकर/ काले by नितिन थत्ते

Permalink

कैच्या कैइ : )

कैच्या कैइ : )
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 02/26/2013 - 17:19

In reply to >>क्रांतिकारक सावरकर/ काले by नितिन थत्ते

Permalink

शाब्बास !

तरी मी विचारच करत होतो की धाग्याची अजून काश्मीरकडे वाटचाल कशी सुरु झाली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 02/26/2013 - 17:29

In reply to >>क्रांतिकारक सावरकर/ काले by नितिन थत्ते

Permalink

+१

तुम्हालाही सावरकरांचे बरेचसे कार्य नकोसे वाटते असे निरिक्षण आहे. निरिक्षण बरोबर आहे काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 02/26/2013 - 17:35

In reply to +१ by मन१

Permalink

हाण्ण !

त्यांना एकूणातच कुठलेच चांगलेसे कार्य नकोसे वाटते असे आमचे निरिक्षण आहे. विशेषतः ते कोणा काँग्रेसेतराचे असेल तर. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Tue, 02/26/2013 - 18:02

In reply to हाण्ण ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

अगदी अगदी.

अगदी अगदी.
  • Log in or register to post comments

Submitted by नन्दादीप on Wed, 02/27/2013 - 16:30

In reply to हाण्ण ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

+१

+१.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 02/26/2013 - 17:37

In reply to +१ by मन१

Permalink

:)

तुम्हालाही सावरकरांचे बरेचसे कार्य नकोसे वाटते असे निरिक्षण आहे.
थत्तेचाचा सावरकर भक्त आहेत असे तुम्हाला सुचवायचे आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 02/26/2013 - 17:33

In reply to >>क्रांतिकारक सावरकर/ काले by नितिन थत्ते

Permalink

गैरसोयीचे

त्यांच्या भक्तांना ते कार्य नकोसेच होते म्हणून ते फार प्रकाशात आले नाही.
नकोसे पेक्षा गैरसोयीचे म्हणायचे आहे का? :)
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 02/26/2013 - 17:38

In reply to गैरसोयीचे by ऋषिकेश

Permalink

अगदि अगदि.....

गांधींच्या भक्तांना गांधींचे कार्य जसे गैरसोयीचे होते त्याच धर्तीवर सावरकरांबाबतही म्हणताय काय?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 02/26/2013 - 17:45

In reply to अगदि अगदि..... by मन१

Permalink

तसे म्हणायचे नव्हते पण असु शकेल

तसे म्हणायचे नव्हते पण असु शकेल. वरचे मत सावरकरांच्या वैज्ञानिक व सामाजिक कार्याबद्दल होते. गांधींचे कार्य/मत विज्ञाननिष्ठ नव्हतेच. तेव्हा त्या बाबतीत त्यांचे कार्यं काही निरिश्वरवादी परंतू गांधींचा आदर करणारे आहेत अशा भक्तांना गैरसोयीचे असण्याची शक्यता आहे. गांधीजींचे बहुतांश सामाजिक कार्य गैरसोयीचे असायचे कारण नाहीच. काही वैयक्तीक वागणूक (जसे त्यांचे लैंगिक भावनांवर नियंत्रणाचे प्रयोग) अनेक भक्तांना गैरसोयीची आहे हे ही सर्वमान्य आहे. बाकी या धाग्यावर गांधी आले कसे नाहित हे समजत नव्हते.. चला आता धाग्याचे काश्मिर व्हायला सुरवात होईल या पराच्या मताशी सहमती व्यक्त करतो आणि या धाग्यावर अधिक अवांतर वाद घालणे उचित न वाटल्याने अवांतराबद्दल क्षमा मागून रजा घेतो:)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 02/26/2013 - 20:10

In reply to विनम्र अभिवादन ! by विटेकर

Permalink

काही दुवे

मिपासंदर्भात म्हणत असाल तर येथे, घरगुती सावरकर, सावरकर आणि समाजकारण - पु.ल. देशपांडे, सुधारक सावरकर, सावरकर आणि नास्तिकवाद, उपेक्षित सावरकर असे अनेक विविधांगाने लिहीलेले लेख दिसतील. अजूनही असतील हे पटकन मिळालेले... त्याव्यतिरीक्त सावरकरांचा क्रांतिवाद, राजकारण, हिंदूत्व वगैरेवर लेख आहेत ते वेगळेच. दुर्दैवाने गांधीजींच्या बाबतीत मात्र जे स्वतःला गांधीवादी म्हणवतात ते असे लेख लिहीण्याऐवजी केवळ गांधीजींचा उपयोग नथुराम, हिंदूत्ववाद वगैरेवर टिका करण्यासाठीच केला जातो असे वाटते. अर्थात हा दोष गांधीजी अथवा गांधीवादाचा नाही, स्वतःला गांधीवादी म्हणवणार्‍यांच्या प्रामाणिकपणाचा आहे. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Wed, 02/27/2013 - 10:19

In reply to काही दुवे by विकास

Permalink

आळशीपणा असावा.

शिवाय गांधींचे मार्केटिंग करावे लागावे इतपत गांधीजी लहान वा इन्सिग्निफिकण्ट अजूनही झाले नसावेत, असेही कारण असू शकते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 02/27/2013 - 10:34

In reply to आळशीपणा असावा. by आनंदी गोपाळ

Permalink

वापर

गांधीजी लहान अथवा इन्सिग्निफिकण्ट आहेत असे कुणाला वाटत नसावे. पण अनुयायी/भक्त वगैरे जे काही असतात त्यांचे वागणे कसे असते याबद्दल फक्त लिहीले होते. गांधीजींबद्दल लिहायचे तर गांधीहत्याच बाकी काही नाही. सावरकरांवर कोणी लिहीले तर त्यात अजून काहीतरी खुसपट काढणार, तेच टिळकांबद्दल (जरा बिचकत पण) करणार... कारण या आणि अशा सगळ्याच नेत्यांचा वापर केवळ वैचारीक दुही माजवण्यात केला जातो... असो. आज कुसुमाग्रजांची आठवण म्हणून मराठी दिन साजरा केला जातो. त्यामुळे याच संदर्भातील त्यांची "पुतळे" ही कविता आठवली... मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. जोतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्‍त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्‍त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्‍त बौद्धांचा. टिळक उद्‌गारले, मी तर फक्‍त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातील गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान; एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्‍त सरकारी कचेऱ्यातील भिंती....
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Wed, 02/27/2013 - 10:44

In reply to वापर by विकास

Permalink

+५००

गांधीजी लहान अथवा इन्सिग्निफिकण्ट आहेत असे कुणाला वाटत नसावे. पण अनुयायी/भक्त वगैरे जे काही असतात त्यांचे वागणे कसे असते याबद्दल फक्त लिहीले होते. गांधीजींबद्दल लिहायचे तर गांधीहत्याच बाकी काही नाही. सावरकरांवर कोणी लिहीले तर त्यात अजून काहीतरी खुसपट काढणार, तेच टिळकांबद्दल (जरा बिचकत पण) करणार... कारण या आणि अशा सगळ्याच नेत्यांचा वापर केवळ वैचारीक दुही माजवण्यात केला जातो...
कधी कधी वाटतं सगळे क्रांतीकारी ऊगाच स्वत्व विसरुन देशासाठी बलिदान करुन गेले. त्यापे़क्षा राजकारणात पडले असते तर अजुन त्यांचं कल्याण झाल असतं. किमान घर,संसार,पैसा सगळच सांभाळता आल असत. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 02/27/2013 - 10:51

In reply to काही दुवे by विकास

Permalink

>>दुर्दैवाने गांधीजींच्या

>>दुर्दैवाने गांधीजींच्या बाबतीत मात्र जे स्वतःला गांधीवादी म्हणवतात ते असे लेख लिहीण्याऐवजी तसे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 02/27/2013 - 19:31

In reply to >>दुर्दैवाने गांधीजींच्या by नितिन थत्ते

Permalink

गडबड

आपल्या प्रतिसादात चुकून बददुवा दिला गेला आहे ;) खालील प्रमाणे दिसते. :( Page not found The requested page "/node/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 02/27/2013 - 11:36

In reply to काही दुवे by विकास

Permalink

असे लेख लिहून एखाद्याविषयीची

असे लेख लिहून एखाद्याविषयीची भक्ती सिद्धा करावी लागते होय! अरेरे माहितच नव्हत! :(
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 02/27/2013 - 19:34

In reply to असे लेख लिहून एखाद्याविषयीची by ऋषिकेश

Permalink

मुद्दा वेगळा आहे

मुद्दा भक्ती सिद्ध करण्याचा नव्हता. स्वतःस गांधीजींचे भक्त म्हणवणारे बहुतांशी वेळेस गांधीहत्या या एकाच विषयाशी जाऊन थांबतात हा होता. हा मुद्दा काढायचे कारण हे सुरवातीस सावरकरांच्या संदर्भात त्यांचे इतर पैलू चर्चीले जात नाहीत असा जो सूर होता त्या संदर्भात होता.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 02/28/2013 - 09:23

In reply to मुद्दा वेगळा आहे by विकास

Permalink

स्वयंसंपादन (सोय नाही माहिती

स्वयंसंपादन (सोय नाही माहिती आहे. पोस्ट करायच्या आधीच काढून टाकला :( )
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 02/26/2013 - 16:29

Permalink

सावरकरांची विज्ञाननिष्ठा मला

सावरकरांची विज्ञाननिष्ठा मला सर्वात अनुकरणीय वाटते. या राष्ट्रभक्तास आदलांजली वाहतो!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/26/2013 - 18:52

In reply to सावरकरांची विज्ञाननिष्ठा मला by ऋषिकेश

Permalink

@सावरकरांची विज्ञाननिष्ठा मला

@सावरकरांची विज्ञाननिष्ठा मला सर्वात अनुकरणीय वाटते.>>> पूर्ण सहमत....
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 02/26/2013 - 16:33

Permalink

विनम्र अभिवादन!

राजकारण करायला बंदी घातल्यावर रत्नागिरीसारख्या एका कोपर्‍यातल्या शहरात राहून समाजसुधारणेचा प्रयत्न चालू ठेवणार्‍या प्रखर देशभक्ताला विनम्र अभिवादन.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 02/26/2013 - 16:34

Permalink

आदरांजली

आदरांजली __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 02/26/2013 - 16:40

Permalink

__/\__

__/\__
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on Tue, 02/26/2013 - 16:58

Permalink

विनम्र अभिवादन.

प्रखर देशभक्ताला विनम्र अभिवादन.
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Tue, 02/26/2013 - 16:59

Permalink

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Tue, 02/26/2013 - 17:06

Permalink

भाषा शुद्धी !

भाषा शुद्धी आणि त्यांच्या "कमला " प्रभाकारास " इ. कविता व सन्यस्त खड्ग हया नाटकाचा चाहता ! कोटी कोटी प्रणाम !
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Tue, 02/26/2013 - 17:13

Permalink

सावरकारांबद्दल आदरच आहे. पण

सावरकारांबद्दल आदरच आहे. पण १९७१ च्या बांगलादेश निर्मितीनंतर त्यांची आणि जिना यांचा हिंदू आणि मुस्लिम हे दोन धर्म नसून दोन वेगळी राष्ट्र आहेत ही theory कितपत बरोबर होती या विषयावर राग आणि त्रागा न करता चर्चा होत असेल तर खूप चांगल होईल
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Tue, 02/26/2013 - 17:19

In reply to सावरकारांबद्दल आदरच आहे. पण by पिंपातला उंदीर

Permalink

जिनांच्या मुस्लिम लीगला

जिनांच्या मुस्लिम लीगला रोखण्यासाठीच हिंदू महासभेची स्थापना झाली. बाकी १९७१ संदर्भ कळाला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Tue, 02/26/2013 - 17:27

In reply to जिनांच्या मुस्लिम लीगला by Dhananjay Borgaonkar

Permalink

पाकिस्तान हे धर्मा च्या

पाकिस्तान हे धर्मा च्या आधारावर स्थापन झालेले राष्ट्र होते. काही मुस्लिम विचारवंतानी यानी हिंदू व मुस्लिम हे केवळ दोन धर्म नसून दोन राष्ट्र आहेत असा विचार मांडला होता. त्याच आधारावर जिन्ना यानी पाकिस्तान या वेगळ्या राष्ट्राची मागणी केली होती. विशेष म्हणजे सावरकर यानी या दोन धर्म नाही तर दोन राष्ट्र या सिद्धांताला पाठिंबा दिला होता. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती लढ्याने या सिद्धांताला सुरुंग लावला. कारण वेगळ्या बांगलादेश ची मागणी करणारे मुस्लिम च होते. सावरकर यांचा हा स्टॅंड चुकला की नाही ह्यावर मुद्देसुद चर्चा व्हयला हवी
  • Log in or register to post comments

Submitted by लाल टोपी on Tue, 02/26/2013 - 20:11

In reply to पाकिस्तान हे धर्मा च्या by पिंपातला उंदीर

Permalink

पाकिस्तानच्या निर्मितीत धर्म..

धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती झाली मात्र बांग्लादेश बांग्ला भाषेच्या अस्मितेतून निर्माण झाला तेथील मुस्लिम उर्दू आपली भाषा न मानता बांग्ला हीच भाषा मानत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 02/26/2013 - 20:47

In reply to सावरकारांबद्दल आदरच आहे. पण by पिंपातला उंदीर

Permalink

तेच ते

या विषयावर राग आणि त्रागा न करता चर्चा होत असेल तर खूप चांगल होईल हा विषय येथे अनेकदा चघळला गेला आहे. ते आधी वाचले असते तरी चांगले झाले असते. मूळ संस्कृत आणि संस्कृतोद्भव "राष्ट्र" आणि "देश" आणि त्याला समांतर "नेशन" आणि "कंट्री (नेशन-स्टेट)" हे शब्द आहेत. जालावरील दोन्हीचा एकत्रित संदर्भ असलेले एक वाक्यः While the terms country (synonomyous with "State") and nation are often used interchangeably, there is a difference. A country is a self-governing political entity while a nation is a tightly-knit group of people which share a common culture. जेंव्हा जेंव्हा नेशन अथवा राष्ट्र हा शब्द वापरला गेला तेंव्हा तेंव्हा त्यातील समान परंपरेस महत्व दिले गेले आहे. अगदी १८८७ साली प्रथम सर सय्यद यांनी हा मुद्दा आणला त्यात देखील "Although my own thoughts and desires are towards my own community, yet I shall discuss whether or not this agitation is useful for the country and for the other nations who live in it. " असे म्हणलेले आहे. बर्‍याचदा युके ही कंट्री चार नेशन्सची बनलेली आहे असे म्हणले जाते. अमेरीकेत नेटीव्ह अमेरीकन्सच्या भूभागाला आजही नेशन्स म्हणले जाते. येथे "नेशन ऑफ इस्लाम" ही संघटना देखील वादग्रस्त संघटना असली तरी ती त्यातील "नेशन" या शब्दामुळे नाही... युरोपात देखील सेलटीक्स नेशन्स हा प्रकार आहे. आणि हो अजून एक आहेच की: स्वतंत्र भारत देशातील "महाराष्ट्र" ..
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Tue, 02/26/2013 - 21:12

In reply to तेच ते by विकास

Permalink

देश या संकल्पनेच्या व्याख्या

देश या संकल्पनेच्या व्याख्या स्थळ-काळ नुसार वेगळ्या असु शकतात. पण फ्रंटलाइन मधले हे आर्टिकल उद्बोधक आहे. सावरकरांचे हे वाक्य " "I have no quarrel with Mr Jinnah's two-nation theory. We, Hindus, are a nation by ourselves and it is a historical fact that Hindus and Muslims are two nations." त्यांची भूमिका स्पष्ट दाखवत. मुळात संपूर्ण आर्टिकल च वाचण्यासारखे आहे. ही लिंक http://www.frontlineonnet.com/fl1915/19151160.htm
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 02/26/2013 - 23:40

In reply to देश या संकल्पनेच्या व्याख्या by पिंपातला उंदीर

Permalink

खात्री नाही...

सावरकरांच्या वाक्यासाठी त्या लेखात सावरकरांच्या हिंदूत्व या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे, जे त्यांनी १९२३ साली लिहीले आहे आणि जिनांनी पाकीस्तानची मागणी ही १९४० साली केलेली आहे. तरी देखील सावरकरांचे हे वाक्य असू शकते का? अगदी सहज शक्य आहे. पण खात्री नाही... जर ते त्यांचे वाक्य असलेच तर (कदाचीत संदर्भ वेगळा असेल, "हिंदूत्व" नसेल). त्याचा अर्थ लावण्यासाठी त्याच्या मागेपुढे ते नक्की काय म्हणालेत ते देखील बघायला हवे. दुर्दैवाने त्या लेखात या पिएचडीच्या विद्यार्थ्याने ते स्पष्ट केलेले नाही. त्या व्यतिरीक्त, फ्रंटलाईन हे लेफ्टीस्ट आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे मासिक/साप्ताहीक जे काही असेल ते, असल्याने त्यातील biased विचार पण लक्षात घेण्याशिवाय पर्याय नाही. मी इथे लिहीताना कुठल्याच (डाव्या-उजव्या) बाजूचे विचार वाचून लिहीत नाही, तर स्वतः वाचून त्यातील संदर्भ लक्षात घेऊन विश्लेषण करायचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Wed, 02/27/2013 - 09:12

In reply to देश या संकल्पनेच्या व्याख्या by पिंपातला उंदीर

Permalink

अमोल उद्गिरकर

हा धागा सावरकरांना श्रद्धांजली म्हणुन उघडला होता/आहे. हिंदू,मुस्लिम,जिना,गांधी,फाळणी,इत्यादी विषयांवर चर्चा करायची असल्यास तुम्ही अवश्य दुसरा धागा चालु करु शकता.माझ्याकडुन याविषयावर इथे पुर्णविराम.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 02/26/2013 - 17:18

Permalink

विज्ञाननिष्ठा....

विज्ञानिष्ठ, ध्येयनिष्ठ दिग्गजास वंदन. त्याकाळात देशात सुरु असणार्‍या तुलनेने मवाळ main stream विचारास सडेतोड उत्तर, आव्हान देण्याचे महत्कार्य लक्षात रहावे असेच.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Tue, 02/26/2013 - 18:03

Permalink

कट्टर हिंदूत्ववादी देशभक्त

सावरकरांना आदरांजली !
  • Log in or register to post comments

Submitted by फिरंगी on Tue, 02/26/2013 - 19:31

Permalink

आदरांजली

आदरांजली
  • Log in or register to post comments

Submitted by लाल टोपी on Tue, 02/26/2013 - 20:17

Permalink

अष्ट्पैलू .....

नाटककार, खंडकाव्याचे कवि, भाषासुधारणेचे जनक मराठीतील कित्येक प्रचलीत शब्द सावरकरांची देण्गी आहेत, विज्ञानिष्ठ प्रखर देशभक्तास विनम्र अभिवादन
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 02/26/2013 - 20:22

Permalink

स्वा. सावरकरांना

स्वा. सावरकरांना 'हिंदूहृदयसम्राट' का म्हणतात ? इतर कुणालाही तशी पदवी दिली आहे का ? (ज्ञानेच्छु) जोग
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Tue, 02/26/2013 - 21:05

Permalink

अभिवादन!

प्रखर देशभक्ताला विनम्र अभिवादन...
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Tue, 02/26/2013 - 21:16

Permalink

विनम्र अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर या महान देशभक्तास विनम्र अभिवादन! देशासाठी त्यांनी जे काही केलं त्याबद्दल त्याना देशानं काय दिलं? तर अपमानास्पद वागणुक आणि उपेक्षा. चालायचेच. अशी उपेक्षा वा अवहेलना पदरी आलेले ते एकमेव देशभक्त नव्हेत. त्यांनी जे खडतर व्रत अंगिकारलं ते ध्येयाखातर. अंदमानच्या हाल अपेष्टांपेक्षा आपल्याच देशात आपल्याच राज्यात निघालेले धिंडवडे त्यांना अधिक यातनामय वाटले असतील. निदान अंदमानात कोलु पिसताना एक दिवस माझा देश स्वतंत्र होईल हा ध्यास आणि दुर्दम्य आशा तरी होती.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 02/26/2013 - 22:26

Permalink

स्वातंत्र्यवीरांना विनम्र

स्वातंत्र्यवीरांना विनम्र आदरांजली.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 02/26/2013 - 22:40

Permalink

सावरकरांवर सिनेमा करण्यासाठी

सावरकरांवर सिनेमा करण्यासाठी बाबूजींना यत्न करावा लागला ह्याचे अतीव दुख वाटते. अय्यर साहेबांना सावरकर म्हटले तर थेट गांधी खुनाचा खटला आठवतो. मात्र त्यांचा अंदमान ते रत्नागिरी हा प्रवास दिसत नाही. सध्याच्या काळात सावरकरांचे सामाजिक कार्य व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन भारतीयांना विशेषतः तरूणाईला व जगाला समजावण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सिनेमा निघाला पाहिजे. असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Wed, 02/27/2013 - 07:36

Permalink

सावरकरांचे भाट !

अनेक चित्तपावन / ब्राम्हण समाज सावरकरांचे विचार न वाचता - समजून घेता , सावरकरांचे गुणगान करतात. तर अनेक सावरकरांचे विचार न वाचता त्यांच्या बद्दल आकसाने बोलतात. हे दुर्दैव.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 02/27/2013 - 08:32

Permalink

आदरांजली, कारण यापेक्षा जास्त

आदरांजली, कारण यापेक्षा जास्त काही करायची माझी लायकी नाही. बाकी आजच अभिनव भारत या संस्थेवर ती जहाल अतिरेकी असुन मालेगाव, अजमेर, समझौता अशा बॉम्बस्फोटांसाठी तिला जबाबदार धरुन त्यावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे अशी बातमी दै.सकाळ मध्ये आलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 02/27/2013 - 09:17

In reply to आदरांजली, कारण यापेक्षा जास्त by ५० फक्त

Permalink

ती वेगळी आहे

बाकी आजच अभिनव भारत या संस्थेवर ती जहाल अतिरेकी असुन मालेगाव, अजमेर, समझौता अशा बॉम्बस्फोटांसाठी तिला जबाबदार धरुन त्यावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे अशी बातमी दै.सकाळ मध्ये आलेली आहे. सावरकरांनी स्थापलेल्या अभिनव भारत संघटनेची सांगता स्वतः सावरकर यांनीच आता अशा संघटनेची गरज नाही म्हणत, स्वतंत्र भारतात केलेली होती. मालेगाव वगैरे प्रकरणात ज्या अभिनव भारत संघटनेचे नाव घेतले जात आहे, ते त्यांनी घेतलेले नाव असले तरी सावरकरांनी स्थापलेली संघटना नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Wed, 02/27/2013 - 09:45

In reply to ती वेगळी आहे by विकास

Permalink

अवांतर......

माझ्याकडील माहिती :- ही संघटना ०च्या दशकात स्थापलेली आहे.हिमानी सावरकर मध्ये त्याच्याशी स्ंबंधित होत्या.बहुदा अध्यक्ष वगैरे. हिमानी सावरकर ह्या पूर्वाश्रमीच्या हिमानी गोडसे आहेत. गोपाळ गोडसे ह्यांच्या कन्या त्या होत. काही दशकांपूर्वी सावकर घराण्याच्या सून म्हणून प्रवेशिल्या. . त्यांचे विचार कित्येकांना ज्वलंत , तेजस्वी वगैरे वगैरे वाटतात; तर कित्येकांना आत्यंतिक खोडसाळ(ओवेसीस्टाइल) वाटतात. . माहिती समाप्त. वादास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com