✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वीर सावरकर

D
Dhananjay Borgaonkar यांनी
Tue, 02/26/2013 - 16:04  ·  लेख
लेख
आज स्वा.सावरकरांची पुण्यतिथी. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी सुरु केली.पुढे त्याचे रुपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले. सावरकर जातीभेद नष्ट करण्यासाठी सुद्धा खुप लढले. हिंदुत्व ही संज्ञा त्यांनीच तयार केली. हिंदुत्वाविषयीचे त्यांचे विचार आजही अत्यंत प्ररणादायी आहेत. सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शि़क्षा भोगली. तुरुंगात असताना त्यांनी अनेक महाकावव्ये लिहिली. १९२१ साली त्यांची तुरुंगातुन सुटका झाली. त्यानंतर ते हिंदु महासभेचे अध्य़क्ष अनेक वर्षे होते. भारतीची फाळणी त्यांना कधीच मान्य नव्हती. त्यांनी कायम अखंड भारताचं स्वप्न बघितलं होतं. गांधींच्या खुनामधे त्याचा सहभाग होता की काय याची पुढे अनेक वर्र्षे शहानिशा चालली. पण निश्पन्न काहीच झाल नाही. सावरकरांना स्वातंत्र्यप्रात्पी नंतरसुद्धा भाषणबंदी होती. स्वातंत्र्यप्राप्तीचा पहिला लढा, कमला, काळे पाणी ही त्यांनी लिहीलेली काही गाजलेली पुस्तके. जयोस्तुते आणि सागरा प्राण तळमळला या कवितांचे कवी देखील सावरकरच होत. अशा या स्वातंत्र्यवीराला कोटी कोटी प्रणाम. _/\_
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
11534 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

स्वातंत्र्यवीरांना विनम्र आदरांजली...

शिद
Wed, 02/27/2013 - 08:41 नवीन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे वीर देशभक्त, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी, महाकवी, नाटककार, कादंबरीकार, इतिहासकार, नेते व तत्वज्ञ होते. सावरकर हे खर्‍या अर्थाने सर्वस्पर्शी विचार करणारे राष्ट्रशिल्पकार होते. त्यांचे विचार आज आणि उद्याही मार्गदर्शक आहेत.
  • Log in or register to post comments

विनम्र अभिवादन

श्रीरंग_जोशी
Wed, 02/27/2013 - 09:21 नवीन
स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन!! भारतमातेचा असा सुपुत्र पुन्हा होणे नाही...
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना

मालोजीराव
Wed, 02/27/2013 - 18:48 नवीन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली _/\_ Image removed. चंद्रशेखर आझाद यांची आज पुण्यतिथी या थोर क्रांतीकारकास हि त्रिवार मुजरा ! सावरकर ,सुभाषचंद्र बोस आणि आझाद यांच्यातील साम्य म्हणजे तिघेही प्रखर शिवभक्त होते
  • Log in or register to post comments

शिवभक्त?

तर्री
Wed, 02/27/2013 - 18:54 नवीन
शिवभक्त म्हणजे शंकराचे उपासक असे वाटले. म्हणजे शिवाजी महाराजांचे भक्त का ? तर मग बरोबर . स्वा.सावरकर यांनी छ.शिवाजी महाराज याची जी आरती केली आहे ते काव्य , संगीत ह ही एक समसमा योग आहे.
  • Log in or register to post comments

शिवभक्त म्हणजे शिवाजी

मालोजीराव
Wed, 02/27/2013 - 19:11 नवीन
शिवभक्त म्हणजे शिवाजी महाराजांचे भक्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

स्वातंत्र्यवीर सावरकर: एक आठवण, एक विनंती

श्रीनिवास टिळक
Wed, 02/27/2013 - 19:04 नवीन
(१) १९५७ साली ११वीची परीक्षा देऊन मी दिल्लीला गेलो होतो. वडील तेथे नोकरीस होते. १०मेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्ययुद्धाची शताब्दी या निमित्ताने मराठीतून भाषण झाले त्याला मी वडिलांबरोबर गेलो होतो. भाषणातील एक मुद्दा काही कारणाने अजून लक्षात आहे. कागदोपत्री Arabian sea किंवा अरबी समुद्र असा उल्लेख असतो. त्याला सिंधू सागर हा पर्याय सावरकरांनी सुचविला. (२)२६/२ला स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी आणि २७/२ला मराठी राजभाषा दिन आहे म्हणून प्रत्येक मराठी व्यक्तीने आज तरी निदान एक मराठी वाक्य लिहावे, वाचावे, आणि बोलावे.
  • Log in or register to post comments

पुरंदरे

विकास
Wed, 02/27/2013 - 19:42 नवीन
कागदोपत्री Arabian sea किंवा अरबी समुद्र असा उल्लेख असतो. त्याला सिंधू सागर हा पर्याय सावरकरांनी सुचविला. सिंधू नदी ही कदाचीत या समुद्रास मिळणारी सगळ्यात मोठी नदी असल्याने त्याला सिंधूसागर हे वेदकालीन नाव आहे असे म्हणले जाते. त्यामुळे सावरकरांनी त्याचा पुरस्कार केला असावा. मला वाटते बाबासाहेब पुरंदर्‍यांनी शिवकालाचे वर्णन करताना "सिंधू सागर" असा उल्लेख केलेला आहे. विकीवर पण अरेबिअन सी च्या माहीतीत जुने नाव "सिंधू सागर" असल्याचे लिहीले आहे. तसेच सिंधूसागर हे नाव काही उद्योगांनी आणि संस्थांनी देखील वापरल्याचे लक्षात येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा