✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांचे वर्तन.

न
नीलकांत यांनी
गुरुवार, 06/09/2011 - 18:19  ·  लेख
लेख
नमस्कार, आज मिसळपाववर येणार्‍या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे. असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं. मग अश्या वेळी काही लोक त्यांना सांभाळून घेऊन पुढील लेखनास शुभेच्छा (पुलेशु) देतात तर काही लोक त्यांना चुकीच्या प्रतिक्रिया देतात. ह्या चुकीच्या प्रतिक्रियांमुळे त्या लेखकाचा लेखन करण्याचा उत्साह मारल्या जातो. ही नकारात्मक प्रतिक्रिया देणारे लोक आपला स्वत:चा सुरूवातीचा काळ विसरले आहेत की काय अशी शंका येते. प्रत्येक लेखावर चांगलेच लिहा असं मला म्हणायचे नाहीये. मला एवढेच म्हणायचे आहे की जे लोक नवीन आहेत, नुकतेच लिहायला लागले आहेत त्यांनी चांगलं लिहावं, उत्तम लिहावं यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि पुढील लेख यापेक्षा चांगला येईल अशी मदत करावी ते राहीलंच. काही लोकांच्या प्रतिक्रिया एवढ्या अंगावर जाणार्‍या असतात की तो लेखक/लेखीका पुन्हा काही लिहीण्याचा प्रयत्नच करत नाही. हे टाळता येऊ शकतं का? तर नक्कीच टाळता येतं. एखादा लेखक नवीन आहे तर त्याला त्याचे लेखन कसे सुधारावे याबद्दल मदत करा. काही प्रतिक्रिया असतील तर तो नवीन असे पर्यंत त्याला जरा सांभाळून घ्या. तो लेखक येथे जरा स्थिर स्थावर होऊ द्या आणि मग त्याच्या पुढील लेखांवर काय हव्या त्या प्रतिक्रिया द्या. म्हणजे तो लेखक बर्‍यापैकी येथील वातावरणाशी समरस झालेला असेल. आणि आपले मत उत्तम मांडू शकेल. नवीन लेखकाने लिहीलेल्या लेखनाची चेष्टा करणे, त्याचा हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणे टाळावे अशी विनंती सर्वांना करीत आहे. काही लोक वारंवार असे करतांना दिसत आहे. या कारणांने त्यांच्यावर कारवाईसुध्दा होऊ शकते हे लक्षात घ्यावे. सर्वांनी सोबत राहून मिपा पुढे नेऊया. मात्र काही लोकांना मिपा म्हणजे नवीन लोकांना त्रास देण्याची जागा आहे असं वाटत असेल तर यापुढे याबाबत कडक कारवाई होईल हे लक्षात घ्या. याचा अर्थ मिपा नवीन लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे किंवा ऑरकुट सारख्या गप्पांचे धागे चालवून घेईल असे नाही. माझा रोख केवळ नवीन लोकांना लिहीतं करावं आणि त्यांनी चांगलं लिहायला लागावं यासाठी जूण्या लोकांनी प्रयत्न करावे अशी विनंती करावी एवढाच आहे. कृपया याकडे लक्ष द्यावे. नवीन लोकांनी निश्चिंतपणे लिहायला लागा. हे सार्वजनीक संकेतस्थळ आहे त्यामुळे आपल्या लिखाणावर चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रिया येतील हे गृहीत धरा. खरं तर त्यातच मजा आहे. मात्र कुणी उगाचच अती करून वाईटच प्रतिक्रिया देत असेल तर संपादक मंडळ त्याची काळजी घेईल. - नीलकांत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
माहिती

प्रतिक्रिया द्या
23597 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

नवीन सदस्यांप्रति जून्या

आत्मशून्य
Fri, 06/10/2011 - 00:13 नवीन
नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांची आचारसंहीता पटली.
  • Log in or register to post comments

नवीन लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे

आशु जोग
Fri, 06/10/2011 - 00:47 नवीन
>>याचा अर्थ मिपा नवीन लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे १. सरसकट कुठलाही नियम लावू नये २. विशेषतः माझ्या एका धाग्याबाबत कडवट प्रतिक्रिया आल्या होत्या मिपा सर्वर तेव्हा बराच आजारी असल्याने मला त्याचा तातडीने समाचार घेता आला नाही मिसळीची बरीच रडारड सुरू होती, उघडतच नसे ३. पण काही माणसे पूर्ण न वाचताच प्रतिक्रिया देतात हे ही थोडे तपासून पहावे ४. कुणी सदस्य मिपावर नवा असला तरी लिहायला वाचायला तो आयुष्यात खूप आधी शिकलेला असू शकतो ५. फार नियमांची जाचकता दिसली की सदस्य काढता पाय घेऊ लागतात, बाकी इथे सदस्यांना लिखाणाचे पूर्ण स्वातंत्र्य आहे असे दिसते, मात्र सदस्यांनी स्वयंशिस्त पाळली पाहीजे http://www.misalpav.com/node/18089 हा धागा पाहीला तर कळेल धागाकर्ता कळ्कळीने काही मांडतो आहे आणि लोक वाचण्याचेही कष्टही घेत नाही आहेत आणि अज्ञानी प्रतिक्रिया मात्र खरडत आहेत
  • Log in or register to post comments

चर्चाच करायची झाली तर...

पिवळा डांबिस
Fri, 06/10/2011 - 04:12 नवीन
हा नव्या-जुन्याचा वादही तसा जुनाच आहे! http://www.misalpav.com/node/2377 ही कविता/ विडंबन हे २००८ सालातलं आहे!!! :) मला वाटतं मिपावर मिळणार्‍या प्रतिक्रिया हया लेखनाला मिळतात लेखनकर्त्याला नव्हे. तसे काही लेखक बघून टार्गेट करणारे लोक कदाचित असतीलही पण मिपाकरांच्या एकूण संख्येच्या (>१२०००?) मानाने त्यांचं प्रमाण अगदी नगण्य आहे हे कोणीही मान्य करील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं! मला नाही वाटत की सामान्य मिपाकर धागा वाचल्यावर प्रतिक्रिया देण्याआधी जाऊन धागाकर्त्याचा मिपावरचा अवधी आणि नंबर बघतो, तो लेखक नवा मिपाकर आहे की जुना हे आधी ठरवतो, आणि मग प्रतिक्रिया कशी द्यायची ते ठरवतो!! लिखाण वाचनीय असेल तर त्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळतात/ मिळाव्यात. लिखाण अवाचनीय असेल तर त्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळत नाहीत/ मिळू नयेत... इथे जुन्या अगदी आद्य मेंबरांच्याही वाईट अथवा वादग्रस्त लिखाणावरही टीका होते. तेंव्हा फक्त मेंबर नवा आहे म्हणून काहीही अवाचनीय लिखाणाच्या प्रशंसेची अपेक्षा केली जाऊ नये... एक खुलासा करणं आवश्यक आहे की इथे मी लिखाणात चांगलं आणि वाईट असा भेद करत नाही. मला वाईट वाटणारं लिखाण इतर कोणाला चांगलं वाटू शकतं आणि व्हाईस व्हर्सा! मी वाचवलं जाणारं आणि न वाचवलं जाणारं असा भेद करतो आहे!! मिपावर किती मेंबर लेखक आहेत यापेक्षा मिपावरच्या लेखनाचा दर्जा काय आहे हे माझ्यामते जास्त महत्वाचं आहे!!! आता प्रोत्साहन देण्याबद्दल, जर नव्या लेखक/कवीने मनापासून प्रयत्न केलेला वाचकांना जाणवला तर त्याला प्रोत्साहनही दिलं जातं. पण काहीही लिहून जर 'नवीन आहे म्हणून चालवून घ्या' अशी जर अपेक्षा बाळगली तर अपेक्षा भंग निश्चित होतो... जर मिपावरचा सामान्य लेखक हा आधी काही महिने वाचक असतो हे गृहितक मान्य केलं तर मग त्याला इथे प्रकाशित होणार्‍या लिखाणातलं चांगलं-बेकार कुठलं हे समजायला फारशी अडचण होऊ नये... दुसरं म्हणजे स्वतःचं लिखाण प्रकाशित करण्यापूर्वी वाचून बघून ते आपल्याला स्वतःला तरी वाचवतंय का इतकं बघण्याची अपेक्षा करायला हरकत नसावी. आपण केलेली विधानं सत्य आहेत का याचाही विचार करायला हरकत नाही. असो! हे आमचे दोन पैसे! बाकी आम्ही स्वतःला नवीन समजत असल्याने नव्या-जुन्या सगळ्यांचीच कृपा असो द्यावी ही विनंती!! :)
  • Log in or register to post comments

सहमत !

सुहास..
Fri, 06/10/2011 - 12:06 नवीन
पिडाकाका ! कविता आणि प्रतिसाद दोन्ही साठी __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मला सुरुवातीला खुप म्हंजे खुप

नरेशकुमार
Fri, 06/10/2011 - 05:37 नवीन
मला सुरुवातीला खुप म्हंजे खुप त्रास झाला. पन आत्ता जरा बरे आहे. . नविन लोकांना उत्तेजन दिल्याबद्दल निलकांतचा आभारी आहे.
  • Log in or register to post comments

नरेशकुमारांप्रमाणे सुरुवातीला

किसन शिंदे
Fri, 06/10/2011 - 11:13 नवीन
नरेशकुमारांप्रमाणे सुरुवातीला माझीही सारखीच स्थिती होती ( काही लोकांनी तर माझा आय डी डूप्लिकेट ठरवून टाकला होता.) , नेहमी वाटायचं ह्या बाबींवर कोणीतरी प्रकाश टाकला पाहिजे आणी ते काम तुम्ही केल्याबद्दल तुमचे आभार. सध्या चांगलाच रुळलोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

नीलकांतशी पुर्णत:

अभिज्ञ
Fri, 06/10/2011 - 05:52 नवीन
नीलकांतशी पुर्णत: सहमत. एखाद्याचा एखादा लेख आवडला नाही तर त्याला तसे सौम्यपणे व सभ्यपणे सांगता येऊ शकते.वा अश्या लेखांकडे निव्वळ दुर्लक्ष करता येईलच,परम्तु नवीन लेखकांना उपहासात्माक प्रतिसाद देणे टाळले जावे.
  • Log in or register to post comments

माझा अनुभव

रणजित चितळे
Fri, 06/10/2011 - 08:59 नवीन
मी तसा नवा सदस्य आहे येथे पण मला असा एकही अनूभव आला नाही. खरे म्हणजे प्रतिक्रीया किंवा प्रतिसाद पाहताना मी कधी हे बघितलेच नाही की सदस्य किती जूना का नवा आहे आणि प्रतिक्रीयेच्या किंवा प्रतिसादाच्या माध्यमातून आपल्याला सदस्य कसा आहे त्याचे विचार कसे आहेत हे जाणता येते व त्याच बरोबर आपला लेख किंवा विचार कितपत विवेक पूर्ण आहे ते ताडता येते. माझ्या मते येऊदेत कसेही प्रतिसाद. मला मि पा आवडले.
  • Log in or register to post comments

काहिसा असहमत

ऋषिकेश
Fri, 06/10/2011 - 09:11 नवीन
सगळ्यांच्या मताचा आदर ठेऊनही थोडक्यात सांगायचं तर या मताशी पूर्ण सहमत नाही. वर पिडां म्हणतात त्याप्रमाणे बहुसंख्य सदस्य हे लेखक बघुन प्रतिसाद देत असतील असे वाटत नाही. प्रतिसाद हा साधारणतः लेखनावरच असतो तसा नसला तर इतर सदस्य प्रतिसादकर्त्याला सुनावतातच / अगदीच नियमांत बसणारा नसला तर संपादक त्यांचे काम करतातच. त्यामुळे पाणउतारा, निरुत्साहित करण्यासाठी म्हणून नव्हे पण जर लेखन आवडलं नाही तर ते का आवडलं नाही हे अजूनही सांगत राहिन. माझ्यामते नव्या सदस्यांना अश्या प्रतिक्रीयांचाही पुढील लेखन करतेवळी उपयोग व्हावा.
  • Log in or register to post comments

माझा रोख

नीलकांत
Fri, 06/10/2011 - 11:24 नवीन
माझा रोख मुद्दाम नवीन लेखकाला निरुत्साही करणार्‍या आणि पुढे त्यांनी लिहूच नये अश्या स्वरूपाच्या प्रतिक्रियांबाबत आहे. याचा अर्थ असा मुळीच नाही की कुणी तरी नवीन येतोय आणि काहीही वादग्रस्त लिहीतो आहोत आणि मिपाकरांनी ते चालवून घ्यावं. नवीन लेखक आता कुठे लिहायला लागतो. त्याला मराठी टंकण्यापासून ते प्रकाशित करण्यापर्यंतचा टप्पा आपल्याला वाटतो त्यापेक्षा जरा लांब वाटतो. अश्या वेळी त्याच्या वाटेत तुम्हाला या मार्गावर प्रवेश नाही असा बोर्ड लावणार्‍या प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे असं माझं मत. बाकी पिडा काका यांच्याशी सुध्दा सहमत आहे. प्रतिक्रिया लेखनालाच असल्या पाहिजेत लेखकाला नकोत. नवीन लेखकांचे लेखन लक्षात आले तर जरा त्यांना सांभाळून घ्या एवढेच मला सांगायचे आहे. एकदा का सदस्यं पक्का झाला आणि मिपाचं स्वरूप त्याच्या लक्षात आलं की तो सुध्दा सरावून जाईल. मग होऊन जाऊ द्या :) - नीलकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

ओके

ऋषिकेश
Sat, 06/11/2011 - 14:15 नवीन
अश्या वेळी त्याच्या वाटेत तुम्हाला या मार्गावर प्रवेश नाही असा बोर्ड लावणार्‍या प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे असं माझं मत.
सहमत
प्रतिक्रिया लेखनालाच असल्या पाहिजेत लेखकाला नकोत.
इथे तर सहमती आहेच
नवीन लेखकांचे लेखन लक्षात आले तर जरा त्यांना सांभाळून घ्या एवढेच मला सांगायचे आहे. एकदा का सदस्यं पक्का झाला आणि मिपाचं स्वरूप त्याच्या लक्षात आलं की तो सुध्दा सरावून जाईल. मग होऊन जाऊ द्या
प्रश्न इथे येतो. मिसळपाववर सारेच निष्णात लेखक नाहित व तसे अपेक्षितही नाही. अश्यावेळी चुका अत्यंत नीटपणे दाखवलेली कैक उदा. दाखवता येतील. मी स्वतः नवीन असताना अनेक सदस्यांनी प्रोत्साहन दिले तशा अनेक चुकाही दाखवून दिल्या आहेत. एखाद्याच्या लेखनावर मात्र तु म्हणतोस तसे वाभाडे काढले जातात हे सत्य आहे. मात्र असे का होते हा आत्मपरिक्षणाचा विषय झाला. आपला अख्खी दुनिया छळ करते असा गैरसमज सतत बाळगून चांगल्या इच्छेने दिलेल्या प्रतिसादांचा किंवा सहज केलेल्या गमतीचा विपर्यास केलेला अनेकदा आढळेल. शिवाय काही सदस्य असे आहेत ज्यांना अश्या ओढलेल्या कोरड्यातच गंमत वाटते. अश्या सदस्यांच्या लेखनावर चांगल्या वाईट कशाही प्रतिक्रीया द्या काहि खुचपट काढणे --> वाद उकरणे --> १००+ प्रतिसाद हा पॅटर्न वापरलेला दिसतो की नाही? असो. तुझ्या मुळ मतितार्थाशी सहमत आहेच. मात्र यावर जाहिर चर्चा व्हावी इतके टोक, जेष्ठ सदस्यांकडून गाठले जाते असे वाटत नाही (किंवा माझा अभ्यास कमी पडतोय :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

?

नितिन थत्ते
Fri, 06/10/2011 - 12:05 नवीन
मला नव्या लेखकांना टारगेट करून पाणउतारा केला जातो असे दिसलेले नाही.
  • Log in or register to post comments

दिसलेले नाही.?????????

चिंतामणी
Fri, 06/10/2011 - 13:53 नवीन
:( म्हणजे नीलकांतची चुक झाली म्हणायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

दिसलेले नाही.?????????

चिंतामणी
Fri, 06/10/2011 - 13:54 नवीन
:( म्हणजे नीलकांतची चुक झाली म्हणायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मी येथे तसा नविनच आहे

गणेशा
Fri, 06/10/2011 - 13:55 नवीन
मी येथे तसा नविनच आहे (कालावधी कीती ही असला तरी ७-८ नहिने पण नाही झाले येवुन). परंतु जुन्या लोकांपेक्षा ही नविन लोकांना रिप्लाय देने मला आवडतेच. तरीही जुन्या चांगल्या लेखांमुळे छान वाटते, आणि जुन्या लोकांचे लेखन ही वाचनिय असते. तरीही आपल्याला न आवडलेल्या किंवा फालतु धाग्यांना रिप्लाय न देने हे टिंगल करण्यापेक्षा ही चांगले आहे. मग तो फालतु धागा जुन्यांचा असो वा नविन लोकांचा.. वरती गवि म्हणतात तसे प्रतिक्रिया ह्या लेखनाला असल्या तरी प्रोत्साहन हे लिहिणार्‍याला असते. उगाच कोणाला ही प्रोत्साहन द्यायचे नाही पण ज्यांचा प्रामाणिक प्रयत्न असेन त्यांना नक्कीच प्रतिसाद द्यायला हवे. भले लिखानात सुधारणा दाखवाव्यात पण टिंगल करु नये असे वाटते. एक नविन सभासद... गणेशा
  • Log in or register to post comments

नीलकांतशी पुर्णत: सहमत.

चिंतामणी
Fri, 06/10/2011 - 13:51 नवीन
टिंगळ टवाळी कमी होईल अशी (भाभडी) आशा आहे.
  • Log in or register to post comments

खरं खरं होऊ द्या इथे !!!!

सुधीर मुतालीक
Sat, 06/11/2011 - 07:56 नवीन
नीलकांत यांच्या भावना समजू शकतो. मी ही नवीन सदस्य आहे. एक दोन लेख टाकलेत. पहिला लेख टाकल्यावर बरेच दिवस मिपा वर फिरकलो नव्हतो. पण जेव्हा आलो आणि माझ्या लेखावर वीस हून अधिक बोल बघितल्यावर छान वाटले. आणि मिपा ची मला चटक लागली. मला मिळालेल्या सगळ्या प्रतिक्रिया काही माझ्या लिखाणाचे उदो उदो करणा-या नव्हत्या . नंतरच्या माझ्या लिखाणाला फक्त दोन वा तीनच प्रतिक्रिया मिळाल्या. पण मी माझी चटक जाऊ दिली नाही. लेखक हे नाही बघत की त्याला प्रतिक्रिया कशी मिळाली - बरी वा वाईट ! प्रतिक्रिया मिळणं हाच लेखकाचा सन्मान असतो. लेखक हाही वाचक असतोच ना. किंबहुना, लिहिणा-याने खुपदा आधी वाचकच असावे लागते. मग वाचक म्हणुन मी नाई का कधी बोचरी टीका करत ? प्रत्येक जण करत असेल. करीत नसेल तर प्रगल्भते मध्ये गडबड आहे. तसेच माझ्या ही लिखाणाच्या बाबतीत कुणी करू शकते ही परिपक्वता इथे लिहिणा-या कडे असायला पाहिजे. मिपा सारखा एखादा तरी मंच अहो असुद्या, जिथे दिलखोल के बागडावं, खरखर बोलावं. याला सांभाळ त्याला सांभाळ करत सतत भान बाळगत जगताना इथे जरा मुक्तपणे व्यक्त होण्याची मुभा असू द्याना. त्या कृत्रिम पणे सांभाळण्याच्या उद्योगांमध्ये चांगल्या प्रतिक्रिया मिळतात हो खूप. पण त्या खोट्या असू शकतील या जाणीवेने एन्जोय करता येत नाहीत. मिपा वर ख-या प्रतिक्रिया मिळतात याचे सुख उपभोगता आलं पाहिजे. त्या ब-या वाईट कशा ही असोत पण ख-या असाव्यात. मराठी माणुस खूप सावरत जगण्यात आपले आयुष्य खर्ची घालतो. म्हणुन आपल्या कडे फार जण उद्योजक नसतात. स्वत:ला सावरतात इतरांकडून ही सावरून घेतात. सवारणा-यालाही सावरतात. साली झोकून देवून जगण्याची मजा, रिस्क घेण्याची झिंग त्यामुळे येतच नाही. तुम्ही इतका छान मंच निर्माण केलाय, जरा खरं खरं होऊ द्या इथे.
  • Log in or register to post comments

वा! क्या कही!

नगरीनिरंजन
Sat, 06/11/2011 - 10:07 नवीन
वा! क्या कही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर मुतालीक

है शाबास! तुमची रसिकता आवडली

Nile
Sat, 06/11/2011 - 12:14 नवीन
है शाबास! तुमची रसिकता आवडली ब्वॉ आपल्याला. संपादक-व्यवस्थापकांची बोटं धरून का "जेष्ठ" होता येतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर मुतालीक

खरं खोटं

नीलकांत
Sat, 06/11/2011 - 12:28 नवीन
नवीन लोकांना खोटं खोटं चांगलं लिहा असं कोण म्हणतंय? माझा रोख फक्त एवढाच आहे की अशी प्रतिक्रिया देऊ नका की ज्याने त्या नुकत्याच लिहू लागलेल्या लेखकाचा पुढे लिहीण्याचा उत्साह करपून जावा. नाही आवडलं लेखन तर ते सांगण्याच्या अनेक पध्दती आहेत की. नकारात्मक प्रतिक्रिया देऊन सुध्दा पुढे लिहीताना काय भान बाळगावं हे सांगणारी ओळ टाकली तर लेखकाला कदाचीत मदतच होईल. आता तुमचं बघा ना, तुम्ही लेख लिहीला त्याला चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि तुम्ही आनंदीत झालात. मात्र याच वेळी तुमच्या लेखाला आलेल्या १५ प्रतिक्रिया तुमच्या लिखानाच्या वाभाडे काढणार्‍या आल्या असत्या तर तुम्ही नाराज झाले असते व कदाचीत पुन्हा लिहीले असते की नाही हे सांगता आले नसते. नवीन लोक जेव्हा लिहायला लागतात तेव्हा त्यांनी लागलीच चांगले आणि साहित्यमुल्य असलेले लिहावे असा अट्टाहास अनाठायी आहे असं वाटतं. लेखक जेव्हा नवीन असतो तेव्हा काही काळ त्याला सांभाळून घ्यावे आणि त्याचा अगदीच हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया टाळाव्यात म्हणजे त्याच्या लिखानात सुधारणेस वाव राहील. नवीन लेखकांना पळवून लावण्याच्या नादात मिसळपाव पाच दहा लेखकांनी लिहीण्याचे व त्याच पाच दहा लोकांनी प्रतिक्रिया देण्याचे ठिकाण बनेल. असा उच्चभ्रु दर्जा मिळवावा अशी मिसळपावची कधीच इच्छा नव्हती आणि नाही सुध्दा. - नीलकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर मुतालीक

धन्यवाद निलकांत जी..

अजातशत्रु
Tue, 06/14/2011 - 13:56 नवीन
नवीन लोकांना खोटं खोटं चांगलं लिहा असं कोण म्हणतंय? माझा रोख फक्त एवढाच आहे की अशी प्रतिक्रिया देऊ नका की ज्याने त्या नुकत्याच लिहू लागलेल्या लेखकाचा पुढे लिहीण्याचा उत्साह करपून जावा. नाही आवडलं लेखन तर ते सांगण्याच्या अनेक पध्दती आहेत की. नकारात्मक प्रतिक्रिया देऊन सुध्दा पुढे लिहीताना काय भान बाळगावं हे सांगणारी ओळ टाकली तर लेखकाला कदाचीत मदतच होईल.
हेच म्हणतो
आता तुमचं बघा ना, तुम्ही लेख लिहीला त्याला चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि तुम्ही आनंदीत झालात. मात्र याच वेळी तुमच्या लेखाला आलेल्या १५ प्रतिक्रिया तुमच्या लिखानाच्या वाभाडे काढणार्‍या आल्या असत्या तर तुम्ही नाराज झाले असते व कदाचीत पुन्हा लिहीले असते की नाही हे सांगता आले नसते. नवीन लोक जेव्हा लिहायला लागतात तेव्हा त्यांनी लागलीच चांगले आणि साहित्यमुल्य असलेले लिहावे असा अट्टाहास अनाठायी आहे असं वाटतं. लेखक जेव्हा नवीन असतो तेव्हा काही काळ त्याला सांभाळून घ्यावे आणि त्याचा अगदीच हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया टाळाव्यात म्हणजे त्याच्या लिखानात सुधारणेस वाव राहील. नवीन लेखकांना पळवून लावण्याच्या नादात मिसळपाव पाच दहा लेखकांनी लिहीण्याचे व त्याच पाच दहा लोकांनी प्रतिक्रिया देण्याचे ठिकाण बनेल. असा उच्चभ्रु दर्जा मिळवावा अशी मिसळपावची कधीच इच्छा नव्हती आणि नाही सुध्दा.
यातील नवीन लेखकांना पळवून लावण्याच्या नादात मिसळपाव पाच दहा लेखकांनी लिहीण्याचे व त्याच पाच दहा लोकांनी प्रतिक्रिया देण्याचे ठिकाण बनेल. असा उच्चभ्रु दर्जा मिळवावा अशी मिसळपावची कधीच इच्छा नव्हती आणि नाही सुध्दा. या विचारांशी शतशः सहमत काहि लोक कंपु बाजी करुन ज्या मुद्द्यात दम नाहि असे निरर्थक मुद्दे माहित असताना देखिल तो लेखक केवळ आपला कंपु / समविचारि आहे म्हणून मुद्दाम त्यांच्या लेखनाला सहमती दर्शवतायत, यातले काहि हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणारेहि आहेत, हे माझ्या नाहितर इतर लेखकांच्या लेखना वरिल प्रतिक्रियांवरुन मला तरि जाणवलेय.. डायर्‍या लिहा असे सांगणारे/ काड्या घालणारे आणी कहर म्हणजे असले लिखाण इथे आणू नका म्हणजे अप्रत्यक्षपणे लिहूच नका असे सांगणारे सदस्य तुमचा वरचा 'सा' निट लागला नाहि खालचा 'ध' बरोबर येत नाहि असे म्हणून नुकत्याच (लिहू) गाऊ लागलेल्या लेखकाचे गळे हे (लेखनशास्त्री) गायनशास्त्री घोटतात हे पाहून त्या लेखकाचे वाईट वाटते.. नवीन लोक जेव्हा लिहायला लागतात तेव्हा त्यांनी चांगले आणि साहित्यमुल्य असलेले आणी विशेषतः आपल्याला आवडेल असेच लिहावे असा अट्टाहास अनाठायी आहे असं मलाहि वाटतं.. नाही आवडलं लेखन तर ते सांगण्याच्या अनेक पध्दती आहेत हे मि हि अनेकदा सांगितले आहे निदान माझ्या बाबतीत तरी..दुर्देवाने टिका सहन करण्याची प्रघल्भता काहि सदस्यांकडे नाहि आहे, अन् मोठे दुर्देव म्हणजे जे सदस्य या गोष्टि करतायत तेच इथे काय नको,काय हवे,कसे हवे यावर चर्चा करतायत...ती व्हायलाहि हवी पण त्यात सुर तोच जाणवतोय.... असो.. मला वाटलं हा धागा माझ्या मुळे काढला की काय? हि अतिशयोक्तीची भावना मनाला चाटून गेली आय नो ते खरे नाहि पण या गोष्टि इथे घडल्यात हे खुद्द मालकांना जाणवले..आणी त्यांनी त्याची योग्य ती दखल घेतली त्या बद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार सर्वांनीच योग्य ती काळजी घेतली तर भविष्यात हे प्रॉब्लेम येणार नाहित...:) जय महाराष्ट्र......!!
  • Log in or register to post comments

आवडलेले किंवा न आवडलेले मुद्दे लिहावेत पण कुचेष्टा करू नये.....

सुधीर काळे
गुरुवार, 06/16/2011 - 01:32 नवीन
माझ्या मते इथे सभासदांनी वाचावे, आवडलेले किंवा न आवडलेले मुद्दे लिहावेत, जमल्यास विधायक सूचनाही कराव्यात पण कुचेष्टा करू नये. कांहीं बोचणारी टीका असेल तर 'व्यनि'द्वारा करावी! प्रतिसादाचा उद्देश आपली हुषारी दाखविण्याचा नसावा तर लेखात सुधारणा करण्याकरता किंवा न पटलेले मुद्दे सांगण्याकरता असावा. इथे कंपूगिरी नक्की होती व खूप होती व तिचा भर दोन गोष्टींवर असायचा. एक गोष्ट होती "अहो रूपं अहो ध्वनि:" तर दुसरी गोष्ट होती कंपूमधल्या एकाद्याच्या लिखाणावर टीका केली कीं त्याच्यावर हल्ला करणे! कुणाच्या का प्रयत्नाने असेना, पण हल्ली हे 'अतिरेकी' खूपच 'सज्जन' झालेले आहेत असे दिसते!
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

टारझन
गुरुवार, 06/16/2011 - 07:41 नवीन
पण काही बाबळीच्या गाठी आहेत , त्यांना कितीही प्रयत्न केले तरी अतिरेकी लेखन करण्यापासुन कोणी अजुन तरी रोखु शकलेलं नाही :) प्रकरण कधी थांबणार हे ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

काळेसाहेब, तुमच्या

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/16/2011 - 13:08 नवीन
काळेसाहेब, तुमच्या प्रतिसादातील दोन्हीही मुद्द्यांशी असहमत आहे. ०१. सगळीकडे सगळ्या प्रकारचे लोक असतात. त्यांना पुरून उरायची हिंमत पाहिजे. आपला आपल्या लेखनावर भरवसा पाहिजे. लेखन चांगले असेल तर टिकेल आणि फालतू टीकाकार विस्मृतीत जातील. सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांचे स्वागत केले पाहिजे. ०२. बर्‍याच लोकांना आपल्यापेक्षा वयाने लहान लोकांनी टीका केली की खूप त्रास होतो. (तुमच्या बाबतीत मी हे बघितले नाहीये हे आवर्जून सांगतो.) जालावर लोकांची वयच मूळात माहित नसतात फारशी. त्यातून टीका झालीच तर वरचा मुद्दा आहेच. ०३. कंपुगिरी / अतिरेकी इत्यादी बद्दल. माझ्यामते काही फारसे बदलले नाहीये. थोडाफार फरक असेलही. पण तुमचाच दृष्टिकोन बदलला असावा असे वाटते. किंवा तुम्हाला सवय झाली असावी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

बर्‍याच बाबतीत आपले दोघांचे एकमत नाहीं असे दिसते.....

सुधीर काळे
गुरुवार, 06/16/2011 - 19:20 नवीन
बिपिन-जी, १. मी "अहो रूपं अहो ध्वनि:"ची उदाहरणे सतत पहात असतो हे मात्र खरे. २. मी नेहमीच एका तत्वाचा पुरस्कार करतो आणि ते म्हणजे "निरोपावर टीका करा निरोप्यावर नव्हे". पण इथे निरोप्याला निशाण बनविलेले मी रोजच पहातो. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी सर्व बरे-वाईट प्रतिसाद वाचतो, चांगल्या सूचना अमलात आणतो, न पटल्यास त्याबद्दल बर्‍याचदा 'व्यनि'द्वारा कळवतो, व्यक्तिशः टीका करणार्‍यांना "अनुल्लेखाने मारतो" व सुखाने जगतो. ३. कंपूबाजी नक्कीच कमी झालेली आहे हे मला जाणवते. संवय झाली म्हणून नव्हे. ४. बर्‍याच बाबतीत आपले दोघांचे एकमत नाहीं असे दिसते.....इलाज नाहीं!
  • Log in or register to post comments

नवीन सदस्य

कपिलमुनी
गुरुवार, 02/28/2013 - 07:26 नवीन
नवीन सदस्यांसाठी ;)
  • Log in or register to post comments

या पोस्ट बद्दल तुमचं अभिनंदन

वेल्लाभट
गुरुवार, 02/28/2013 - 07:32 नवीन
या पोस्ट बद्दल तुमचं अभिनंदन, नीलकांत.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद....

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 02/28/2013 - 07:35 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लिलि काळे .

लौंगी मिरची
गुरुवार, 02/28/2013 - 08:54 नवीन
आजच लिलि काळे यांचा लेख आणि प्रतिसाद वाचले . पण त्या बाई वेड पांघरुन पेडगाव गाठतायत असं वाटलं . कारण बरेचसे शब्द जे अवघड आहेत ते अगदी व्यवस्थित लिहिलेले आहेत .जर समोरासमोर अशी फसवणुक होत असेल तर पब्लिक गप्प बसणार नाहिच किंवा बसुहि नये . माझ्या पहाण्यात शक्यतो चांगल्या लेखाला चांगले वाईट प्रतिसाद , व्यक्तिपरत्वे आवडीनिवडीनुसार मिळतात . लिखान वाईट नसतच फक्त ते मांडण्याची पद्धत ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार माणुस घेतो आणि टिकाहि त्यावरच असते . त्यामुळे निलकांत यांच्या या लेखाचा गैरफायदा फसव्या लोकांना होऊ नये असे मनापासुन वाटते . लोक मुद्दाम इथे काहिहि भोचक , भंकस लिहित असतिल आणि वर नविन आहे , त्रास देऊ नका असे सुचवत असतिल तर यावर संपादकांनीच लक्ष घालुन हे प्रकार थांबवावेत . असो .
  • Log in or register to post comments

ओके

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 02/28/2013 - 09:00 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

नीलकांत यांच्या लेखातील मताशी

अधिराज
गुरुवार, 02/28/2013 - 14:23 नवीन
नीलकांत यांच्या लेखातील मताशी आणि
नवीन सदस्यांची एवढी काळजी घेणारे दुसरे संकेतस्थळ पाहण्यात नाही.
या वरिल प्रतिक्रियेशी सहमत.
  • Log in or register to post comments

सहमत !!!!....मिपा वय - ९ दिवस

अनिदेश
गुरुवार, 02/28/2013 - 14:27 नवीन
सहमत !!!!....मिपा वय - ९ दिवस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

काळजी...

मन१
गुरुवार, 02/28/2013 - 17:14 नवीन
काळजी ह्या शब्दाला दुहेरी अवतरण चिन्हात (double quotes मध्ये) टाकल्यास मीही सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

सहमत.

NiluMP
गुरुवार, 02/28/2013 - 16:36 नवीन
सहमत. याच सदर्भात मिपावर कोणीतरी चांगला लेख होता "चला लेखक बनुया" म्हणून. हा सगळा घोळ होतोय तो कोणाला किती प्रतिसाद आले आहेत हे सर्वाना कळते म्हणून. एखादया लेखाच्या प्रतिसाद फक्त त्या लेखकाला दिसेल अशी सोय करा आणि मग बघा.
  • Log in or register to post comments

कंपूबाजांना या उपायाचा

अधिराज
Mon, 03/04/2013 - 16:40 नवीन
कंपूबाजांना या उपायाचा तितकासा फरक पडेल असं वाटत नाही, कारण कोण काय प्रतिसाद देणार ते बहुदा हे लोक ठरवत असावेत आधीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: NiluMP

मुलांनो सगळ्यांनी एक गोष्ट

मृत्युन्जय
गुरुवार, 02/28/2013 - 18:30 नवीन
मुलांनो सगळ्यांनी एक गोष्ट समजुन घ्या की नविन सदस्यांप्रती जुन्या सदस्यांचे वर्तन कसे असावे यासंबंधी हा धागा आहे. नविन आय डीं बद्दल नाही.
  • Log in or register to post comments

जे ब्बात!!!!

मोदक
गुरुवार, 02/28/2013 - 18:42 नवीन
जे ब्बात!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हाहाहा!

पैसा
गुरुवार, 02/28/2013 - 18:51 नवीन
आय पी सलामत तो आय डी पचास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

+१

मन१
गुरुवार, 02/28/2013 - 19:37 नवीन
मोदकच्या वरील दोन्ही आयडींनी दिलेल्या प्रतिसादाशी सहमत आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मानवी वर्तन

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/28/2013 - 19:07 नवीन
एकूणच हा मानवी वर्तनाचा भाग आहे. तशात आंतरजालाच्या असलेल्या मर्यादा व बलस्थाने दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. टंकणारा कुठल्या मोड मधे व मूड मधे आहे व वाचणारा कुठल्या मोड मधे व मूडमधे आहे या बावी महत्वाच्या ठरतात. एखाद्या संकेतस्थळाची प्रकृती त्यातील सरासरी लेखनाच्या प्रतिमेवर ठरते. तुच्छतेला प्रतिष्ठा मिळते आहे हे जेव्हा नव्या सदस्याच्या लक्षात येते त्यावेळी तो उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीने वर्तन करु शकतो. मग संकेतस्थळाची चॅट रुम व्हायला लागते. एखाद्याच्या वेदनेचा विषय जेव्हा बाकीच्यांच्या विनोदाचा होतो तेव्हा तो दुखावला जातो. त्याला संकेतस्थळाबद्दल वाटणारी आपुलकी नाहीशी व्ह्यायला लागते. सदस्यांची संख्या जेव्हा खूप मोठी होते त्या वेळी त्याचे व्यवस्थापन व नियंत्रण अवघड होउन बसते. अजून ही अनेक बाबी असतील. मानवी संबंधात या बाबी अपरिहार्य आहेत. असो......
  • Log in or register to post comments

आय ओपनर !

धन्या
गुरुवार, 02/28/2013 - 21:49 नवीन
तुच्छतेला प्रतिष्ठा मिळते आहे हे जेव्हा नव्या सदस्याच्या लक्षात येते त्यावेळी तो उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीने वर्तन करु शकतो.
हा अनुभव ताजा आहे. एनी पब्लिसीटी ईज गुड पब्लिसीटी या न्यायाने केवळ टीआरपी वाढतोय म्हणून थिल्लर धाग्यांकडे दुर्लक्ष करुन गुणवत्तेशी तडजोड करण्यात काहीच अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

एकूणच हा मानवी वर्तनाचा भाग

मोदक
गुरुवार, 02/28/2013 - 23:16 नवीन
एकूणच हा मानवी वर्तनाचा भाग आहे. तशात आंतरजालाच्या असलेल्या मर्यादा व बलस्थाने दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. टंकणारा कुठल्या मोड मधे व मूड मधे आहे व वाचणारा कुठल्या मोड मधे व मूडमधे आहे या बावी महत्वाच्या ठरतात. नेमके लिहिलेत... धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मान्य...............

फिरंगी
गुरुवार, 02/28/2013 - 20:56 नवीन
मान्य...............
  • Log in or register to post comments

नवीन सभासदांना शाश्वती देणारा

तुमचा अभिषेक
गुरुवार, 02/28/2013 - 21:04 नवीन
नवीन सभासदांना शाश्वती देणारा असा धागा बघून बरे वाटले. मी देखील मिपावर नवीनच आहे, पण स्वताची अशी काही तक्रार किंवा वाईट अनुभव नाही, उलट चांगलाच आहे. :)
  • Log in or register to post comments

टोपण नाव

रमेश आठवले
गुरुवार, 02/28/2013 - 23:01 नवीन
मिपाचे बरेच सदस्य टोपण नाव वापरतात. याचे काय कारण असावे ? टोपण नावाच्या आड दडून काय हवे ते लिहिण्याची मुभा मिळते असे तर त्यांना वाटत तर नसेल ना ?
  • Log in or register to post comments

टोपण नावाने लिहिण्याची परंपरा

धन्या
Mon, 03/04/2013 - 20:29 नवीन
टोपण नावाने लिहिण्याची परंपरा आंतरजालाचा जन्म होण्यापूर्वीची आहे. त्यात मिसळपावचा काही संबंध आहे असं वाटत नाही. पूर्वी आपले सुधारणावादी जहाल विचार लोकांना पटले नाहीत तर आपल्या घराची, देहाची मोडतोड होऊ नये म्हणून लोक टोपणनावाने लिहित असावेत. हीच परंपरा तशीच पुढे आली असावी, त्यामागचं कारण संपलं तरीही.
टोपण नावाच्या आड दडून काय हवे ते लिहिण्याची मुभा मिळते असे तर त्यांना वाटत तर नसेल ना ?
नाही. जालावर थोडा अवधी गेला की टोपण नावाच्या मागची खरी व्यक्ती कोण आहे हे बरेच वेळा कळते. फेसबुकवर अ‍ॅडवले जाते, फोन केले जातात, सोबत ट्रेकींग वगैरेला जातात, आठ पंधरा दिवसाआठ हादण्यासाठी नवनविन हाटेले शोधून खादाडी कटटे केले जातात, दारु वगैरेच्या पार्टया होतात. सो टोपण नावाआड दडण्याचा प्रश्नच येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

मिपाचे बरेच सदस्य टोपण नाव

भिकापाटील
गुरुवार, 02/28/2013 - 23:08 नवीन
मिपाचे बरेच सदस्य टोपण नाव वापरतात. याचे काय कारण असावे ? टोपण नावाच्या आड दडून काय हवे ते लिहिण्याची मुभा मिळते असे तर त्यांना वाटत तर नसेल ना ?
आठवल्यानन्तर सान्गतो :प
  • Log in or register to post comments

नीलकान्त दादान्शी मी पूर्ण

खटपट्या
Fri, 03/01/2013 - 00:25 नवीन
नीलकान्त दादान्शी मी पूर्ण सहमत आहे. लीलीताईवर फारच बोचरी टीका झाली. मी माझा पहीला लेख लीहू की नको असा विचार करतो आहे.
  • Log in or register to post comments

लिहा हो तुम्ही.

धन्या
Mon, 03/04/2013 - 20:35 नवीन
तुमची लीलीताई डुप्लिकेट आयडी असण्याची दाट शक्यता आहे. केवळ दंगा करण्याच्या उद्देशाने लिलि काळे या नावाने इथलाच कुणीतरी जुना सदस्य अवतरला असावा. एखादा आयडी डुप्लिकेट आयडी असावा अशी चारचौघांना शंका येऊनही अशा आयडींवर दंगा करण्यासाठी व्यवस्थापनाकडून तात्काळ कारवाई का केली जात नाही हे मात्र अनाकलनिय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

लिली हा डुप्लिकेट आय डी असावा

श्री गावसेना प्रमुख
Sat, 03/02/2013 - 10:20 नवीन
लिली हा डुप्लिकेट आय डी असावा म्हणुनच कदाचीत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा