Skip to main content

नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांचे वर्तन.

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 09/06/2011 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मिसळपाववर येणार्‍या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे. असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं. मग अश्या वेळी काही लोक त्यांना सांभाळून घेऊन पुढील लेखनास शुभेच्छा (पुलेशु) देतात तर काही लोक त्यांना चुकीच्या प्रतिक्रिया देतात. ह्या चुकीच्या प्रतिक्रियांमुळे त्या लेखकाचा लेखन करण्याचा उत्साह मारल्या जातो. ही नकारात्मक प्रतिक्रिया देणारे लोक आपला स्वत:चा सुरूवातीचा काळ विसरले आहेत की काय अशी शंका येते. प्रत्येक लेखावर चांगलेच लिहा असं मला म्हणायचे नाहीये. मला एवढेच म्हणायचे आहे की जे लोक नवीन आहेत, नुकतेच लिहायला लागले आहेत त्यांनी चांगलं लिहावं, उत्तम लिहावं यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि पुढील लेख यापेक्षा चांगला येईल अशी मदत करावी ते राहीलंच. काही लोकांच्या प्रतिक्रिया एवढ्या अंगावर जाणार्‍या असतात की तो लेखक/लेखीका पुन्हा काही लिहीण्याचा प्रयत्नच करत नाही. हे टाळता येऊ शकतं का? तर नक्कीच टाळता येतं. एखादा लेखक नवीन आहे तर त्याला त्याचे लेखन कसे सुधारावे याबद्दल मदत करा. काही प्रतिक्रिया असतील तर तो नवीन असे पर्यंत त्याला जरा सांभाळून घ्या. तो लेखक येथे जरा स्थिर स्थावर होऊ द्या आणि मग त्याच्या पुढील लेखांवर काय हव्या त्या प्रतिक्रिया द्या. म्हणजे तो लेखक बर्‍यापैकी येथील वातावरणाशी समरस झालेला असेल. आणि आपले मत उत्तम मांडू शकेल. नवीन लेखकाने लिहीलेल्या लेखनाची चेष्टा करणे, त्याचा हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणे टाळावे अशी विनंती सर्वांना करीत आहे. काही लोक वारंवार असे करतांना दिसत आहे. या कारणांने त्यांच्यावर कारवाईसुध्दा होऊ शकते हे लक्षात घ्यावे. सर्वांनी सोबत राहून मिपा पुढे नेऊया. मात्र काही लोकांना मिपा म्हणजे नवीन लोकांना त्रास देण्याची जागा आहे असं वाटत असेल तर यापुढे याबाबत कडक कारवाई होईल हे लक्षात घ्या. याचा अर्थ मिपा नवीन लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे किंवा ऑरकुट सारख्या गप्पांचे धागे चालवून घेईल असे नाही. माझा रोख केवळ नवीन लोकांना लिहीतं करावं आणि त्यांनी चांगलं लिहायला लागावं यासाठी जूण्या लोकांनी प्रयत्न करावे अशी विनंती करावी एवढाच आहे. कृपया याकडे लक्ष द्यावे. नवीन लोकांनी निश्चिंतपणे लिहायला लागा. हे सार्वजनीक संकेतस्थळ आहे त्यामुळे आपल्या लिखाणावर चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रिया येतील हे गृहीत धरा. खरं तर त्यातच मजा आहे. मात्र कुणी उगाचच अती करून वाईटच प्रतिक्रिया देत असेल तर संपादक मंडळ त्याची काळजी घेईल. - नीलकांत
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23687
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

नवीन लोकांना खोटं खोटं चांगलं लिहा असं कोण म्हणतंय? माझा रोख फक्त एवढाच आहे की अशी प्रतिक्रिया देऊ नका की ज्याने त्या नुकत्याच लिहू लागलेल्या लेखकाचा पुढे लिहीण्याचा उत्साह करपून जावा. नाही आवडलं लेखन तर ते सांगण्याच्या अनेक पध्दती आहेत की. नकारात्मक प्रतिक्रिया देऊन सुध्दा पुढे लिहीताना काय भान बाळगावं हे सांगणारी ओळ टाकली तर लेखकाला कदाचीत मदतच होईल.
हेच म्हणतो
आता तुमचं बघा ना, तुम्ही लेख लिहीला त्याला चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि तुम्ही आनंदीत झालात. मात्र याच वेळी तुमच्या लेखाला आलेल्या १५ प्रतिक्रिया तुमच्या लिखानाच्या वाभाडे काढणार्‍या आल्या असत्या तर तुम्ही नाराज झाले असते व कदाचीत पुन्हा लिहीले असते की नाही हे सांगता आले नसते. नवीन लोक जेव्हा लिहायला लागतात तेव्हा त्यांनी लागलीच चांगले आणि साहित्यमुल्य असलेले लिहावे असा अट्टाहास अनाठायी आहे असं वाटतं. लेखक जेव्हा नवीन असतो तेव्हा काही काळ त्याला सांभाळून घ्यावे आणि त्याचा अगदीच हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया टाळाव्यात म्हणजे त्याच्या लिखानात सुधारणेस वाव राहील. नवीन लेखकांना पळवून लावण्याच्या नादात मिसळपाव पाच दहा लेखकांनी लिहीण्याचे व त्याच पाच दहा लोकांनी प्रतिक्रिया देण्याचे ठिकाण बनेल. असा उच्चभ्रु दर्जा मिळवावा अशी मिसळपावची कधीच इच्छा नव्हती आणि नाही सुध्दा.
यातील नवीन लेखकांना पळवून लावण्याच्या नादात मिसळपाव पाच दहा लेखकांनी लिहीण्याचे व त्याच पाच दहा लोकांनी प्रतिक्रिया देण्याचे ठिकाण बनेल. असा उच्चभ्रु दर्जा मिळवावा अशी मिसळपावची कधीच इच्छा नव्हती आणि नाही सुध्दा. या विचारांशी शतशः सहमत काहि लोक कंपु बाजी करुन ज्या मुद्द्यात दम नाहि असे निरर्थक मुद्दे माहित असताना देखिल तो लेखक केवळ आपला कंपु / समविचारि आहे म्हणून मुद्दाम त्यांच्या लेखनाला सहमती दर्शवतायत, यातले काहि हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणारेहि आहेत, हे माझ्या नाहितर इतर लेखकांच्या लेखना वरिल प्रतिक्रियांवरुन मला तरि जाणवलेय.. डायर्‍या लिहा असे सांगणारे/ काड्या घालणारे आणी कहर म्हणजे असले लिखाण इथे आणू नका म्हणजे अप्रत्यक्षपणे लिहूच नका असे सांगणारे सदस्य तुमचा वरचा 'सा' निट लागला नाहि खालचा 'ध' बरोबर येत नाहि असे म्हणून नुकत्याच (लिहू) गाऊ लागलेल्या लेखकाचे गळे हे (लेखनशास्त्री) गायनशास्त्री घोटतात हे पाहून त्या लेखकाचे वाईट वाटते.. नवीन लोक जेव्हा लिहायला लागतात तेव्हा त्यांनी चांगले आणि साहित्यमुल्य असलेले आणी विशेषतः आपल्याला आवडेल असेच लिहावे असा अट्टाहास अनाठायी आहे असं मलाहि वाटतं.. नाही आवडलं लेखन तर ते सांगण्याच्या अनेक पध्दती आहेत हे मि हि अनेकदा सांगितले आहे निदान माझ्या बाबतीत तरी..दुर्देवाने टिका सहन करण्याची प्रघल्भता काहि सदस्यांकडे नाहि आहे, अन् मोठे दुर्देव म्हणजे जे सदस्य या गोष्टि करतायत तेच इथे काय नको,काय हवे,कसे हवे यावर चर्चा करतायत...ती व्हायलाहि हवी पण त्यात सुर तोच जाणवतोय.... असो.. मला वाटलं हा धागा माझ्या मुळे काढला की काय? हि अतिशयोक्तीची भावना मनाला चाटून गेली आय नो ते खरे नाहि पण या गोष्टि इथे घडल्यात हे खुद्द मालकांना जाणवले..आणी त्यांनी त्याची योग्य ती दखल घेतली त्या बद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार सर्वांनीच योग्य ती काळजी घेतली तर भविष्यात हे प्रॉब्लेम येणार नाहित...:) जय महाराष्ट्र......!!

माझ्या मते इथे सभासदांनी वाचावे, आवडलेले किंवा न आवडलेले मुद्दे लिहावेत, जमल्यास विधायक सूचनाही कराव्यात पण कुचेष्टा करू नये. कांहीं बोचणारी टीका असेल तर 'व्यनि'द्वारा करावी! प्रतिसादाचा उद्देश आपली हुषारी दाखविण्याचा नसावा तर लेखात सुधारणा करण्याकरता किंवा न पटलेले मुद्दे सांगण्याकरता असावा. इथे कंपूगिरी नक्की होती व खूप होती व तिचा भर दोन गोष्टींवर असायचा. एक गोष्ट होती "अहो रूपं अहो ध्वनि:" तर दुसरी गोष्ट होती कंपूमधल्या एकाद्याच्या लिखाणावर टीका केली कीं त्याच्यावर हल्ला करणे! कुणाच्या का प्रयत्नाने असेना, पण हल्ली हे 'अतिरेकी' खूपच 'सज्जन' झालेले आहेत असे दिसते!

In reply to by सुधीर काळे

पण काही बाबळीच्या गाठी आहेत , त्यांना कितीही प्रयत्न केले तरी अतिरेकी लेखन करण्यापासुन कोणी अजुन तरी रोखु शकलेलं नाही :) प्रकरण कधी थांबणार हे ? ;)

In reply to by सुधीर काळे

काळेसाहेब, तुमच्या प्रतिसादातील दोन्हीही मुद्द्यांशी असहमत आहे. ०१. सगळीकडे सगळ्या प्रकारचे लोक असतात. त्यांना पुरून उरायची हिंमत पाहिजे. आपला आपल्या लेखनावर भरवसा पाहिजे. लेखन चांगले असेल तर टिकेल आणि फालतू टीकाकार विस्मृतीत जातील. सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांचे स्वागत केले पाहिजे. ०२. बर्‍याच लोकांना आपल्यापेक्षा वयाने लहान लोकांनी टीका केली की खूप त्रास होतो. (तुमच्या बाबतीत मी हे बघितले नाहीये हे आवर्जून सांगतो.) जालावर लोकांची वयच मूळात माहित नसतात फारशी. त्यातून टीका झालीच तर वरचा मुद्दा आहेच. ०३. कंपुगिरी / अतिरेकी इत्यादी बद्दल. माझ्यामते काही फारसे बदलले नाहीये. थोडाफार फरक असेलही. पण तुमचाच दृष्टिकोन बदलला असावा असे वाटते. किंवा तुम्हाला सवय झाली असावी. ;)

बिपिन-जी, १. मी "अहो रूपं अहो ध्वनि:"ची उदाहरणे सतत पहात असतो हे मात्र खरे. २. मी नेहमीच एका तत्वाचा पुरस्कार करतो आणि ते म्हणजे "निरोपावर टीका करा निरोप्यावर नव्हे". पण इथे निरोप्याला निशाण बनविलेले मी रोजच पहातो. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी सर्व बरे-वाईट प्रतिसाद वाचतो, चांगल्या सूचना अमलात आणतो, न पटल्यास त्याबद्दल बर्‍याचदा 'व्यनि'द्वारा कळवतो, व्यक्तिशः टीका करणार्‍यांना "अनुल्लेखाने मारतो" व सुखाने जगतो. ३. कंपूबाजी नक्कीच कमी झालेली आहे हे मला जाणवते. संवय झाली म्हणून नव्हे. ४. बर्‍याच बाबतीत आपले दोघांचे एकमत नाहीं असे दिसते.....इलाज नाहीं!

आजच लिलि काळे यांचा लेख आणि प्रतिसाद वाचले . पण त्या बाई वेड पांघरुन पेडगाव गाठतायत असं वाटलं . कारण बरेचसे शब्द जे अवघड आहेत ते अगदी व्यवस्थित लिहिलेले आहेत .जर समोरासमोर अशी फसवणुक होत असेल तर पब्लिक गप्प बसणार नाहिच किंवा बसुहि नये . माझ्या पहाण्यात शक्यतो चांगल्या लेखाला चांगले वाईट प्रतिसाद , व्यक्तिपरत्वे आवडीनिवडीनुसार मिळतात . लिखान वाईट नसतच फक्त ते मांडण्याची पद्धत ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार माणुस घेतो आणि टिकाहि त्यावरच असते . त्यामुळे निलकांत यांच्या या लेखाचा गैरफायदा फसव्या लोकांना होऊ नये असे मनापासुन वाटते . लोक मुद्दाम इथे काहिहि भोचक , भंकस लिहित असतिल आणि वर नविन आहे , त्रास देऊ नका असे सुचवत असतिल तर यावर संपादकांनीच लक्ष घालुन हे प्रकार थांबवावेत . असो .

धन्यवाद

नीलकांत यांच्या लेखातील मताशी आणि
नवीन सदस्यांची एवढी काळजी घेणारे दुसरे संकेतस्थळ पाहण्यात नाही.
या वरिल प्रतिक्रियेशी सहमत.

सहमत. याच सदर्भात मिपावर कोणीतरी चांगला लेख होता "चला लेखक बनुया" म्हणून. हा सगळा घोळ होतोय तो कोणाला किती प्रतिसाद आले आहेत हे सर्वाना कळते म्हणून. एखादया लेखाच्या प्रतिसाद फक्त त्या लेखकाला दिसेल अशी सोय करा आणि मग बघा.

In reply to by NiluMP

कंपूबाजांना या उपायाचा तितकासा फरक पडेल असं वाटत नाही, कारण कोण काय प्रतिसाद देणार ते बहुदा हे लोक ठरवत असावेत आधीच.

मुलांनो सगळ्यांनी एक गोष्ट समजुन घ्या की नविन सदस्यांप्रती जुन्या सदस्यांचे वर्तन कसे असावे यासंबंधी हा धागा आहे. नविन आय डीं बद्दल नाही.

In reply to by पैसा

मोदकच्या वरील दोन्ही आयडींनी दिलेल्या प्रतिसादाशी सहमत आहे ;)

एकूणच हा मानवी वर्तनाचा भाग आहे. तशात आंतरजालाच्या असलेल्या मर्यादा व बलस्थाने दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. टंकणारा कुठल्या मोड मधे व मूड मधे आहे व वाचणारा कुठल्या मोड मधे व मूडमधे आहे या बावी महत्वाच्या ठरतात. एखाद्या संकेतस्थळाची प्रकृती त्यातील सरासरी लेखनाच्या प्रतिमेवर ठरते. तुच्छतेला प्रतिष्ठा मिळते आहे हे जेव्हा नव्या सदस्याच्या लक्षात येते त्यावेळी तो उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीने वर्तन करु शकतो. मग संकेतस्थळाची चॅट रुम व्हायला लागते. एखाद्याच्या वेदनेचा विषय जेव्हा बाकीच्यांच्या विनोदाचा होतो तेव्हा तो दुखावला जातो. त्याला संकेतस्थळाबद्दल वाटणारी आपुलकी नाहीशी व्ह्यायला लागते. सदस्यांची संख्या जेव्हा खूप मोठी होते त्या वेळी त्याचे व्यवस्थापन व नियंत्रण अवघड होउन बसते. अजून ही अनेक बाबी असतील. मानवी संबंधात या बाबी अपरिहार्य आहेत. असो......

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुच्छतेला प्रतिष्ठा मिळते आहे हे जेव्हा नव्या सदस्याच्या लक्षात येते त्यावेळी तो उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीने वर्तन करु शकतो.
हा अनुभव ताजा आहे. एनी पब्लिसीटी ईज गुड पब्लिसीटी या न्यायाने केवळ टीआरपी वाढतोय म्हणून थिल्लर धाग्यांकडे दुर्लक्ष करुन गुणवत्तेशी तडजोड करण्यात काहीच अर्थ नाही.

In reply to by धन्या

एकूणच हा मानवी वर्तनाचा भाग आहे. तशात आंतरजालाच्या असलेल्या मर्यादा व बलस्थाने दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. टंकणारा कुठल्या मोड मधे व मूड मधे आहे व वाचणारा कुठल्या मोड मधे व मूडमधे आहे या बावी महत्वाच्या ठरतात. नेमके लिहिलेत... धन्यवाद.

नवीन सभासदांना शाश्वती देणारा असा धागा बघून बरे वाटले. मी देखील मिपावर नवीनच आहे, पण स्वताची अशी काही तक्रार किंवा वाईट अनुभव नाही, उलट चांगलाच आहे. :)

मिपाचे बरेच सदस्य टोपण नाव वापरतात. याचे काय कारण असावे ? टोपण नावाच्या आड दडून काय हवे ते लिहिण्याची मुभा मिळते असे तर त्यांना वाटत तर नसेल ना ?

In reply to by रमेश आठवले

टोपण नावाने लिहिण्याची परंपरा आंतरजालाचा जन्म होण्यापूर्वीची आहे. त्यात मिसळपावचा काही संबंध आहे असं वाटत नाही. पूर्वी आपले सुधारणावादी जहाल विचार लोकांना पटले नाहीत तर आपल्या घराची, देहाची मोडतोड होऊ नये म्हणून लोक टोपणनावाने लिहित असावेत. हीच परंपरा तशीच पुढे आली असावी, त्यामागचं कारण संपलं तरीही.
टोपण नावाच्या आड दडून काय हवे ते लिहिण्याची मुभा मिळते असे तर त्यांना वाटत तर नसेल ना ?
नाही. जालावर थोडा अवधी गेला की टोपण नावाच्या मागची खरी व्यक्ती कोण आहे हे बरेच वेळा कळते. फेसबुकवर अ‍ॅडवले जाते, फोन केले जातात, सोबत ट्रेकींग वगैरेला जातात, आठ पंधरा दिवसाआठ हादण्यासाठी नवनविन हाटेले शोधून खादाडी कटटे केले जातात, दारु वगैरेच्या पार्टया होतात. सो टोपण नावाआड दडण्याचा प्रश्नच येत नाही.

मिपाचे बरेच सदस्य टोपण नाव वापरतात. याचे काय कारण असावे ? टोपण नावाच्या आड दडून काय हवे ते लिहिण्याची मुभा मिळते असे तर त्यांना वाटत तर नसेल ना ?
आठवल्यानन्तर सान्गतो :प

नीलकान्त दादान्शी मी पूर्ण सहमत आहे. लीलीताईवर फारच बोचरी टीका झाली. मी माझा पहीला लेख लीहू की नको असा विचार करतो आहे.

In reply to by खटपट्या

तुमची लीलीताई डुप्लिकेट आयडी असण्याची दाट शक्यता आहे. केवळ दंगा करण्याच्या उद्देशाने लिलि काळे या नावाने इथलाच कुणीतरी जुना सदस्य अवतरला असावा. एखादा आयडी डुप्लिकेट आयडी असावा अशी चारचौघांना शंका येऊनही अशा आयडींवर दंगा करण्यासाठी व्यवस्थापनाकडून तात्काळ कारवाई का केली जात नाही हे मात्र अनाकलनिय आहे.

प्रतिसाद क्रमांक १०० रच्याकने: नीलकांताने एका पेक्षा जास्त प्रतिसाद दिलेला हा एक्मेव धागा असावा असे वाटते. त्या हैद्राबाद्च्या धाग्यावर कदाचित असतील त्याचे एकापेक्षा जास्त प्रतिसाद

लेख लिहला आहे आणि बर्याच सदस्यांनी अनुमोदनही दिले आहे याचाच अर्थ पाणी मुरलेले आहेच आणि परिणाम ही दिसलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर चेसुगु. थोडा तिरपा विचार करायचा. प्रॅक्टिकल तर नव्ह्ताच. कुणाला त्रास देत नव्हता आणि विचार तर चांगलेच मांडत होता. पण कंपूबाजी आणि चिडवाचिडवीमुळे कायमचा निघून गेला. हा धागा नवीन लेखकांसाठीचा आहे पण तो तर जूना होता. तो परत असायला हवा. कदाचीत शांतपणे पाहत असेलही. तसाच एक छोटा डॉन. आजकाल काही लेखच लिहीत नाहीये. कदाचीत ईतरांना त्याचा कॉम्प्लेक्स असावा. दर्जा सुधारावा ही गोष्ट मान्य. पण नवीन लेखकाची लेख लिहीण्याची ईच्छा मारणे वाईटच. एक सल्ला. नवीन लोकांना जरा हळू मारा. थोडं जुन्यांनाही जपा.