विकसित भारत ?
लेखनप्रकार
मागच्याच आठवड्यात मी पद्मालय येथे गाडीवर गेलो होतो. सकाळची वेळ होती. गाडीवरून मी एका छोट्याशा गावाजवळून चाललो होतो. कुठल्याही भारतीय खेडे गावाबाहेर रस्त्याच्या बाजूलाच प्रातर्विधीसाठी बसलेले लोक दिसणे यात आपल्याला नाविन्य / आश्चर्य / खेद वाटत नाही. पण त्यादिवशी मला एक नववधू परततांना दिसली. नवीनच लग्न होऊन आलेली ती चिसौकां मोठ्या बावरलेल्या नजरेने चालली होती. कपाळावर बांधलेल्या मुंडावळ्या व अंगाची हळद नवीन लग्नाची साक्ष देत होते. या नववधूला केवळ एकच सवलत होती, ती म्हणजे तिचा पाण्याचा डबा (टमरेल) धरून एक दुसरी मुलगी तिला मार्गदर्शन करीत होती.
देश विकसित होतोय अशा गप्पा जेव्हा जेव्हा ऐकतो ती नववधू डोळ्यासमोर येते.
वाचने
4002
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
पद्मालय हे कुठेय हो??
In reply to पद्मालय हे कुठेय हो?? by बॅटमॅन
शिवाय गाडीवर गेलो होतो म्हणजे काय हेही कळले नाही.
In reply to शिवाय गाडीवर गेलो होतो म्हणजे by नितिन थत्ते
हम्म..ते विकसित भारत का काय म्हणतात त्यामुळे गाडीचा उल्लेख केल्या गेल्या असावा.
In reply to पद्मालय हे कुठेय हो?? by बॅटमॅन
पद्मालय हे जळगाव जिल्ह्यात आहे,त्यांच कुठय ते नाही माहीत
In reply to पद्मालय हे जळगाव जिल्ह्यात by श्री गावसेना प्रमुख
धन्यवाद माहितीकरिता सेनाप्रमुख. मला तं कोल्लापूरमदलं पद्माळे आटवलंतं एकदम.
http://business.bhaskar.com/article/BIZ-how-tech-moguls-spend-their-wealth-4192282-PHO.html?HT2=
हे वाचा
पद्मालय ही दक्षिणेकडील चित्रपटनिर्मिती संस्था आहे. :)
'मी गाडीत आणि ती नववधू प्लस इतर रस्त्यावर बसलेत' हा काँट्रास्ट दाखवायचा असेल.
In reply to . by आदिजोशी
शौचकुपाची सोय असलेली गाडी असेल.
पण त्या कामासाठी गाडी घेऊन येवढे लांब कशाला जावे म्हणतो मी.
तुमचे टमरेल कोणी धरले होते आणि फक्त त्याच कामासाठी इतक्या लांब ( पद्मालय का कुठे ) कशाला जायचे हो?
जवळच शोधायची एखादी मोकळी जागा
देश विकसित होतोय अशा गप्पा जेव्हा जेव्हा ऐकतो ती नववधू डोळ्यासमोर येते.आता भारत विकास करतो आहे म्हटल्यावर कोणाच्या डोळ्यासमोर काय यावं हा ज्याचा त्याचा वकूब झाला.. असो.
धागा वाचून एक विनोद आठवला. (कदाचित ही सत्य घटना आहे)
दृष्य : खेडेगावात गावकुसाबाहेर, वेळ : सकाळ
एका माणसाला सकाळीच सकाळी फेरफटका मारायची हौस येते. साहेब जातात गावाबाहेर फिरायला....
तर वाटेत गावातील मंडळी दिसतात लोटा घेऊन बसलेली.... त्या लो़कांमध्ये त्याच्या ओळखीचा म्हातरा बसलेला दिसतो.
बिचारा आधीच अवघडलेल्या अवस्थेत, त्यात पाव्हणे अगदी निरखून पहातायत.... करणार काय... बिच्चारा गुडघ्यात तोंड खूपसून कार्यभाग उरकत होता.
तेवढ्यात पाव्हण्याला हुक्की आली, त्या म्हातार्याला विचारले, "काय म्हातार बाबा, सर्व ठीक ना? खाली काय पहाताय??"
म्हातारबाबा : - "काही नाही. पहातोय, तुमच्या पोटापाण्याची सोय होईल की......sssssss"
छान ! मिपा देखील विकसित होते आहे ;)
लिखाणामागचा उद्देश खिल्ली उडवण्यासारखा वाटला नाही.
पद्मालय हे जळगाव जिल्ह्यातील एक गाब जिथे दोन गणपती मुर्ती आहेत ज्यात एक उजव्या सोंडेची व एक डाव्या सोंडेची आहे. त्यामंदिरा समोरच एक छान तलाव असुन थोड्याच अंतरावर भीमकुंड आहे. त्या कुंडाचा आकार पायाच्या ठश्यासारखा असुन तो भीमाच्या उजव्या पायाचा ठसा आहे असे मानले जाते म्हणुन त्याला भीमकुंड हे नाव पडलेय. ते आजुबाजुच्या परिसरातील एक भक्ती व पर्यटन स्थळ आहे.
In reply to पद्मालय by इरसाल
माहितीकरिता धन्यवाद इरसाल. :)
अहिराणी कुठचा ;)
In reply to ईर्या ... by सुहास..
मंग का आठे भी बोलानी बंदी कर टाकी तुम्ही लोकेस्नी ? आते काय करो गरीब जनता कोठे जाई ?
तठे त्या "फुलवाली बाई" बठ्ठास्ले आजला/आजली बनाडी र्हायनी आनी आते आम्हले देवच वाचाडी अस वाटी र्हायनं.
कसं वाटलं सुहास भो?
In reply to ल्या भो ल्या by इरसाल
इरसाल भो तुमले भी येस का अहिराणी,
In reply to इरसाल भो तुमले भी येस का by श्री गावसेना प्रमुख
हाई का इच्चारानी गोट व्हयनी का ?
In reply to अरं काहो प्रमुखभो by इरसाल
तुमन गाव अयोध्या दख माले शंका उनी की तुम्हले खरच अहीराणी येत अशी का,
ते गाव न नाव खोट से ना,खर खर सांगा.
खरं आहे फुकाच्या गप्पा हो ह्या विकसित विकसित झाल्याच्या...
नववधू म्हणजे विवाह, लग्न, पोरं बाळं, दुध पाजणं, संभाळणं !
छ्या ! ह्याने देश थोडीच विकसित होणार? ते लिव इन किंवा तसंच सुरु झालं म्हणजे देश विकसित होणार बगा !!
तेव्हा नववधू दिसली नाही की देश विकसित झालाच समजा !
आणि नाहीच तर आपण दोन चार चार्ट तयार करुच विकसित झाल्याचा !! हाका नाका ;)
नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते फिरते...
हे गाणे आता कधीही न हसता ऐकू शकणार नाही :)
माणुस म्हटले कि शरिरधर्म येणारच. त्यात विकसित भारत किंवा अविकसित भारत कसा काय मध्ये येतो?
विकसित देश्यात काय वेगळी पध्दत वापरली जाते काय?
पद्मालय हे कुठेय हो??