मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विकसित भारत ?

जोशमनिष · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मागच्याच आठवड्यात मी पद्मालय येथे गाडीवर गेलो होतो. सकाळची वेळ होती. गाडीवरून मी एका छोट्याशा गावाजवळून चाललो होतो. कुठल्याही भारतीय खेडे गावाबाहेर रस्त्याच्या बाजूलाच प्रातर्विधीसाठी बसलेले लोक दिसणे यात आपल्याला नाविन्य / आश्चर्य / खेद वाटत नाही. पण त्यादिवशी मला एक नववधू परततांना दिसली. नवीनच लग्न होऊन आलेली ती चिसौकां मोठ्या बावरलेल्या नजरेने चालली होती. कपाळावर बांधलेल्या मुंडावळ्या व अंगाची हळद नवीन लग्नाची साक्ष देत होते. या नववधूला केवळ एकच सवलत होती, ती म्हणजे तिचा पाण्याचा डबा (टमरेल) धरून एक दुसरी मुलगी तिला मार्गदर्शन करीत होती. देश विकसित होतोय अशा गप्पा जेव्हा जेव्हा ऐकतो ती नववधू डोळ्यासमोर येते.

वाचने 4002 वाचनखूण प्रतिक्रिया 26

श्री गावसेना प्रमुख 27/02/2013 - 15:08
http://business.bhaskar.com/article/BIZ-how-tech-moguls-spend-their-wealth-4192282-PHO.html?HT2= हे वाचा

आदिजोशी 27/02/2013 - 16:23
'मी गाडीत आणि ती नववधू प्लस इतर रस्त्यावर बसलेत' हा काँट्रास्ट दाखवायचा असेल.

In reply to by आदिजोशी

परिकथेतील राजकुमार 27/02/2013 - 16:31
शौचकुपाची सोय असलेली गाडी असेल. पण त्या कामासाठी गाडी घेऊन येवढे लांब कशाला जावे म्हणतो मी.

प्रसाद१९७१ 27/02/2013 - 16:40
तुमचे टमरेल कोणी धरले होते आणि फक्त त्याच कामासाठी इतक्या लांब ( पद्मालय का कुठे ) कशाला जायचे हो? जवळच शोधायची एखादी मोकळी जागा

ऋषिकेश 27/02/2013 - 16:40
देश विकसित होतोय अशा गप्पा जेव्हा जेव्हा ऐकतो ती नववधू डोळ्यासमोर येते.
आता भारत विकास करतो आहे म्हटल्यावर कोणाच्या डोळ्यासमोर काय यावं हा ज्याचा त्याचा वकूब झाला.. असो.

नन्दादीप 27/02/2013 - 16:58
धागा वाचून एक विनोद आठवला. (कदाचित ही सत्य घटना आहे) दृष्य : खेडेगावात गावकुसाबाहेर, वेळ : सकाळ एका माणसाला सकाळीच सकाळी फेरफटका मारायची हौस येते. साहेब जातात गावाबाहेर फिरायला.... तर वाटेत गावातील मंडळी दिसतात लोटा घेऊन बसलेली.... त्या लो़कांमध्ये त्याच्या ओळखीचा म्हातरा बसलेला दिसतो. बिचारा आधीच अवघडलेल्या अवस्थेत, त्यात पाव्हणे अगदी निरखून पहातायत.... करणार काय... बिच्चारा गुडघ्यात तोंड खूपसून कार्यभाग उरकत होता. तेवढ्यात पाव्हण्याला हुक्की आली, त्या म्हातार्‍याला विचारले, "काय म्हातार बाबा, सर्व ठीक ना? खाली काय पहाताय??" म्हातारबाबा : - "काही नाही. पहातोय, तुमच्या पोटापाण्याची सोय होईल की......sssssss"

मन१ 27/02/2013 - 17:10
लिखाणामागचा उद्देश खिल्ली उडवण्यासारखा वाटला नाही.

इरसाल 27/02/2013 - 17:16
पद्मालय हे जळगाव जिल्ह्यातील एक गाब जिथे दोन गणपती मुर्ती आहेत ज्यात एक उजव्या सोंडेची व एक डाव्या सोंडेची आहे. त्यामंदिरा समोरच एक छान तलाव असुन थोड्याच अंतरावर भीमकुंड आहे. त्या कुंडाचा आकार पायाच्या ठश्यासारखा असुन तो भीमाच्या उजव्या पायाचा ठसा आहे असे मानले जाते म्हणुन त्याला भीमकुंड हे नाव पडलेय. ते आजुबाजुच्या परिसरातील एक भक्ती व पर्यटन स्थळ आहे.

In reply to by सुहास..

इरसाल 27/02/2013 - 22:44
मंग का आठे भी बोलानी बंदी कर टाकी तुम्ही लोकेस्नी ? आते काय करो गरीब जनता कोठे जाई ? तठे त्या "फुलवाली बाई" बठ्ठास्ले आजला/आजली बनाडी र्‍हायनी आनी आते आम्हले देवच वाचाडी अस वाटी र्‍हायनं. कसं वाटलं सुहास भो?

In reply to by इरसाल

श्री गावसेना प्रमुख 28/02/2013 - 11:11
तुमन गाव अयोध्या दख माले शंका उनी की तुम्हले खरच अहीराणी येत अशी का, ते गाव न नाव खोट से ना,खर खर सांगा.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

इरसाल 28/02/2013 - 15:35
अयोध्या आम्हनी राजधानी व्हती ती सोडी गैर्‍हा टाईम व्हयना. तठेना लोके आते अवधीमा बोलतस.

नाना चेंगट 27/02/2013 - 22:56
खरं आहे फुकाच्या गप्पा हो ह्या विकसित विकसित झाल्याच्या... नववधू म्हणजे विवाह, लग्न, पोरं बाळं, दुध पाजणं, संभाळणं ! छ्या ! ह्याने देश थोडीच विकसित होणार? ते लिव इन किंवा तसंच सुरु झालं म्हणजे देश विकसित होणार बगा !! तेव्हा नववधू दिसली नाही की देश विकसित झालाच समजा ! आणि नाहीच तर आपण दोन चार चार्ट तयार करुच विकसित झाल्याचा !! हाका नाका ;)

फारएन्ड 28/02/2013 - 07:28
नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते फिरते... हे गाणे आता कधीही न हसता ऐकू शकणार नाही :)

वेताळ 28/02/2013 - 11:04
माणुस म्हटले कि शरिरधर्म येणारच. त्यात विकसित भारत किंवा अविकसित भारत कसा काय मध्ये येतो? विकसित देश्यात काय वेगळी पध्दत वापरली जाते काय?