✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रंगीत दहशतवाद

ह
हुप्प्या यांनी
Wed, 01/23/2013 - 22:42  ·  लेख
लेख
आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो. पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. च्यारिटी बिगिन्स आट होम ह्या न्यायाने सुरवातीला भगवा हा अस्सल भारतीय मातीतला रंग निवडला आहे. त्या धोरणाला अनुसरुन आजकाल भगवा दहशतवाद भारतात फोफावतो आहे, रा. स्व. संघाचे लोक मोठ्या प्रमाणात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे चालवत आहेत. तिथे गठ्ठ्याने अतिरेकी बनत आहेत वगैरे रोचक विधाने आपल्या गृहमंत्र्यानी केली. आणि मोठीच खळबळ झाली. बहुधा काळेपांढरे टीव्ही जाऊन रंगीत आल्यावर अशीच खळबळ माजली असेल. अर्थात सिनेमा चालू असताना प्रेक्षकाने खलनायकावर ओरडणे, त्याच्या अंगावर धावून जाणे बावळटपणाचे वाटते तसे गृहमंत्री हा एकरंगी दहशतवादाचा खेळ तटस्थपणे बघत आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून संबंधित संघटनेवर बंदी घालू, संबंधित संघटनांचे सदस्यत्व मिरवणारे आमदार, खासदार ह्यांचे पद रद्द करू, कुठल्या राज्यातील सरकार अशा वाईट नादाला लागत असेल तर ते बरखास्त करू असे काही म्हणत नाहीत. पण आता काही बुरसटलेले, जुनाट विचारांचे काँग्रेसी नेते ह्या रंगीत दहशतवादाला नाकारुन पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट दहशतवादाकडे वळू असे म्हणत आहेत. http://online2.esakal.com/esakal/20130123/5600019574208857395.htm पूर्वीही असे अप्रिय सत्य ठणकावून सांगणार्‍या द्र्ष्ट्या लोकांना हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. गॅलिलिओ, टॉलेमी अशा लोकांच्या तोडीस तोड आपले गृहमंत्रीजी आहेत असे वाटते. आपल्याला काय वाटते? रंगीत दहशतवादच बरा नाही का? रंगीत सिनेमे आल्यावर कुणी ब्लॅक अँड व्हाईटला विचारतो का? फक्त आपल्याला हवे ते रंग निवडायचे स्वातंत्र्य हवे, कसे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
54489 वाचन

💬 प्रतिसाद (167)

प्रतिक्रिया

दोघांचा हि उल्लेख एकेरी केला

मालोजीराव
Tue, 02/12/2013 - 18:11 नवीन
दोघांचा हि उल्लेख एकेरी केला असता तर खटकलं नसतं साहेब, पण जेठ्मलानींचा उल्लेख आदराने आणि छत्रपति उदयन राजेंचा एकेरी असं का ? राजमाता विजयाराजे शिंदे, माधवराव शिंदे (दोघेही हयात नाहीत) ज्यांच्या पायावर डोकं ठेवायच्या ती व्यक्ती तुम्ही ज्या पद्धतीने मांडताय ते थोडं हास्यास्पद वाटत नाही का ? आणि शरद लेवे केस बद्दल म्हणाल तर पूर्ण माहिती घेऊन त्याबद्दल लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

"राजमाता विजयाराजे शिंदे,

श्रीगुरुजी
Tue, 02/12/2013 - 21:55 नवीन
"राजमाता विजयाराजे शिंदे, माधवराव शिंदे (दोघेही हयात नाहीत) ज्यांच्या पायावर डोकं ठेवायच्या ती व्यक्ती " बापरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

श्रीमंत छत्रपति उदयनराजे भोसले

मालोजीराव
गुरुवार, 02/14/2013 - 13:40 नवीन
बापरे!
होय आम्हीही त्यांच्या पायावर डोकं ठेऊनच प्रणाम करतो !देशद्रोह्यांची आणि सगळ्यात महत्वाचे जेम्स लेन आणि त्याच्या प्रकाशन संस्थेची केस लढवणार्या राम जेठमलानी यांच्यापेक्षा "श्रीमंत छत्रपति उदयनराजे भोसले" केव्हाही हजारपटीने आदरणीय आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असेल बुवा! कोणाला कोण आदरणीय

श्रीगुरुजी
गुरुवार, 02/14/2013 - 13:49 नवीन
असेल बुवा! कोणाला कोण आदरणीय वाटेल याचे काही गणित नसते. माझ्यापुरतं बोलायचं तर असा इसम आदरणीय वाटण्याची वाईट वेळ माझ्यावर येऊ नये हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना! आमेन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

असेल बुवा...बरोबर आहे

मालोजीराव
गुरुवार, 02/14/2013 - 14:09 नवीन
कोणाला कोण आदरणीय वाटेल याचे काही गणित नसते. माझ्यापुरतं बोलायचं तर असा राष्ट्रद्रोही इसम आदरणीय वाटण्याची वाईट वेळ माझ्यावर येऊ नये हीच छत्रपति शिवरायांकडे प्रार्थना! जय भवानी जय शिवाजी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असा राष्ट्रद्रोही इसम

अवतार
Fri, 02/22/2013 - 14:44 नवीन
आदरणीय वाटण्याची वाईट वेळ माझ्यावर येऊ नये हीच छत्रपति शिवरायांकडे प्रार्थना! जय भवानी जय शिवाजी! +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

"ठीक आहे. म्हणजे तीसएक वर्षे

श्रीगुरुजी
Wed, 01/30/2013 - 14:45 नवीन
"ठीक आहे. म्हणजे तीसएक वर्षे पक्षाने पाठिंबा दिलेली व्यक्ती, जी २ वेळा कॅबिनेट मिनिस्टरही झाली आहे तिचा पक्षविचारांशी काहीही संबंध नाही. असे असूनही त्या पक्षाला, त्या व्यक्तीला मंत्रीपद व संसदेचे सदस्यपद सतत द्यावेसे वाटते हे एकंदरच मला न समजणारे गौडबंगाल आहे. मात्र हा भाजपचा निर्णय असल्याने तुम्हाला कदाचित काहीही माहीत नसेल." हा भाजपचा निर्णय असल्याने ते वारंवार जेठमलानींना का तिकीट देतात हे मला माहिती नाही. पण माझा व्यक्तिगत असा अंदाज आहे की, भाजपला जेठमलानींच्या वकीली कौशल्याची गरज आहे. गुजरात दंगलीतले आरोप असलेल्या भाजप संबंधित काही जणांची वकीलपत्रे जेठमलानींनी घेतलेली आहेत. हे एक कारण असावे. दुसरे कारण असे असावे, की गुजरात संबंधात मोदींना अडकविण्यासाठी काँग्रेस जंगजंग पछाडत आहे. अजूनतरी त्यात यश आलेले नाही. पण भविष्यात यदाकदाचित एखाद्या दंगल प्रकरणात मोदींचे नाव अधिकृतरित्या आरोपपत्रात आले तर त्यावेळी जेठमलानींनी मोदींचा बचाव करावा अशी भाजपची इच्छा असेल व कदाचित यासाठीच जेठमलानी गुजरातमधून राज्यसभेवर जातात. हे माझे व्यक्तिगत अंदाज आहेत. कदाचित माझे अंदाज १०० टक्के चुकीचे असू शकतील. मला स्वतःला जेठमलानी या व्यक्तिविषयी अजिबात आदर नाही. अनेक गुन्हेगारांची वकीलपत्रे ते घेतात. जरी ते काही काळ ते अधिकृतरित्या भाजपचे खासदार असले तरी त्यांची कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नाही. ते पूर्वी शिवसेनेचे महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार होते. त्यापूर्वी १९९० मध्ये ते जनता दलात होते व चंद्रशेखरांच्या पंतप्रधानपदाला विरोध केल्यामुळे त्यांना जाहीर मारहाणही झाली होती. भविष्यात जर भाजपने त्यांना खासदार केले नाही तर ते काँग्रेस, मुस्लीम लीग, राजद, समाजवादी, बसपा अशा कोणत्याही पक्षाच्या वळचणीला जाऊन खासदारकी मिळवतील याची मला खात्री आहे. म्हणूनच मी मागे लिहिले होते की भाजपात असूनसुद्धा भाजप/संघ विचारसरणीचा व जेठमलानींचा अजिबात संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

पण पण पण

आजानुकर्ण
Wed, 01/30/2013 - 23:08 नवीन
पण माझा व्यक्तिगत असा अंदाज आहे की, भाजपला जेठमलानींच्या वकीली कौशल्याची गरज आहे.
पण, पण, पण मग व्यावसायिक वकीलाला सरळ फी द्यायची ना. की मंत्री केल्याने फीचे पैसे वाचतात? नाहीतरी जेठमलानीही कोणत्याही भ्रष्ट गुन्हेगाराची केस घेतातच. भाजपाच्या गुन्हेगारांच्या केसी घ्यायला काहीच हरकत नसावी. निदान अशा प्रवृत्तीला पक्षाबाहेर ठेवल्याने पक्षावर तरी शिंतोडे उडणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बरोबर आहे. पण कदाचित खासदारकी

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/31/2013 - 12:15 नवीन
बरोबर आहे. पण कदाचित खासदारकी हीच जेठमलानींनी मागितलेली फी असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

"कपिल सिब्बल हे देखील

श्रीगुरुजी
Wed, 01/30/2013 - 14:54 नवीन
"कपिल सिब्बल हे देखील व्यावसायिक वकील आहेत. त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांची वकीलपत्रे घेतली तर काँग्रेसच्या चारित्र्याचे विश्लेषण तुम्हाला करावेसे वाटते यामागचे कारण तुम्ही सांगू शकाल काय? की हा केवळ 'आपला तो बाब्या' प्रकारचा न्याय आहे?" नाही. मी वर जेठमलानींचे उदाहरण दिलेच आहे. पुण्यात पूर्वी कट्टर संघ प्रचारक असलेले ब. ना. उपाख्य मामा भिडे या नावाचे प्रख्यात गुन्हेगारी वकील होते. जोशी-अभ्यंकर प्रकरणातील खुन्यांचे वकीलपत्रे त्यांच्याकडे होते. सासरी छळ करून मारलेल्या मंजुश्री सारडाच्या नवर्‍याला त्यांनी आपल्या वकीली कौशल्याने निर्दोष सोडविले. अशी इतर अनेक खुन्यांची किंवा हुंड्याकरता सुनेला मारलेल्यांची वकीलपत्रे ते घेत असत. सध्या कोळसे-पाटील नावाचे एक समाजवादी गप्पा मारणारे वकील असेच होते. त्यांनी देखील मानवत हत्याकांड प्रकरणातील (यात ११ बालकांचे बळी देण्यात आले होते) मुख्य सूत्रधार उत्तमराव पाटील याला आपल्या वकीली कौशल्याने वाचविले होते. अशा सर्व गुन्हेगारांच्या पाठिराख्यांचा मला तिरस्कार वाटतो. मी कपिल सिब्बलचे उदाहरण तुमच्या पूर्वीच्या या वाक्यासंबधात दिले होते. ("कुठे आपल्या आदर्शांशी विरुद्ध असूनही देशहितासाठी लढणार्‍या आझाद हिंद सेनेची वकीलपत्रे घेणारे काँग्रेसी कुठे.") भ्रष्टाचार, गुन्हेगारी व जातीयवाद यात आकंठ बुडालेल्या २०१२ ल्या काँग्रेसची तुलना १९४५ मधल्या काँग्रेसशी करणे हे मला अतिशय विनोदी व भोळेपणाचे लक्षण वाटले. म्हणूनच २०१२ मधल्या काँग्रेसमधले वकील गुन्हेगारांना सोडवितात हे मला दाखवायचे होते व त्यासाठीच मी सिब्बलचे उदाहरण दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

>> ब. ना. उपाख्य मामा भिडे

llपुण्याचे पेशवेll
Fri, 02/15/2013 - 11:44 नवीन
>> ब. ना. उपाख्य मामा भिडे तुम्हाला बाबा भिडे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बरोबर. ते मामा भिडे नसून

श्रीगुरुजी
Fri, 02/15/2013 - 12:16 नवीन
बरोबर. ते मामा भिडे नसून बाबाराव भिडे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

हे धोरण असेल तर ते बरोबर आहे.

तर्री
Sat, 01/26/2013 - 11:57 नवीन
भा.ज.पा. ने हया पासून दूरच राहायला हवे. अन्यथा भारतीय समाज भा.ज.प. ला "२ जागा दाखवेल. गांधी हत्या , गुजरात दंगल आणि बाबरी ढाचा पाडणे ही तीन भुते उतरवणारा मांत्रिक भाजपला अजूनही सापडला नाही तर पुरोहिताचे भूत त्यांनी का वागवावे ? राष्ट्रहित , राष्ट्रीय चारित्र्य हया ध्येये प्रेरित होऊन भारतीय सुशिक्षित माध्यम वर्ग कोंग्रेस च्या अपप्रचाराला आणि निधार्मंध वादाला बळी न पडता जेंव्हा संपूर्ण मतदान करेल तेंव्हा एन.डी.ए नाही तर भा.ज.प. सत्तेवर असेल. तो सोनियाचा दिवस असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

राष्ट्रहित , राष्ट्रीय

नितिन थत्ते
Sat, 01/26/2013 - 13:19 नवीन
राष्ट्रहित , राष्ट्रीय चारित्र्य या अपप्रचाराला मतदार बळी पडत नाहीत हे चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

दंडवत!!

मैत्र
Mon, 01/28/2013 - 13:09 नवीन
चाचा, --/\-- या वाक्यासाठी दंडवत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१

दादा कोंडके
Mon, 01/28/2013 - 15:54 नवीन
हा हा... चांगले चेंडूदेखिल निग्रहानी तटवणारे थत्तेचचा फुल्टॉस सोडतील काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

म्हणून स्वतंत्र मिळून ६० वर्षे झाली तरी आपली अवस्था अशी आहे.

तर्री
Fri, 02/22/2013 - 12:08 नवीन
म्हणून स्वतंत्र मिळून ६० वर्षे झाली तरी आपली अवस्था अशी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

है शाब्बास!

धमाल मुलगा
गुरुवार, 01/24/2013 - 20:06 नवीन
काय बोललायत गुरुजी! ह्या आणि अशा बाबी जनमानसापर्यंत पुर्णतः न पोचण्याची काटेकोर खबरदारी मिडिया आणि पर्यायानं सरकारनं घेण्याचा कावा पाहून मात्र कोणतीही संघटना का रान उठवत नाही हे मात्र कळत नाही. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गुरूमुर्थींचा लेख

विकास
Fri, 01/25/2013 - 21:48 नवीन
गुरूमुर्थींचा आज लेख बघितला... त्यात देखील बरीच माहीती आहे... True lies of Sushil Kumar Shinde
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नक्कीचं नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/24/2013 - 12:26 नवीन
रा.स्व. संघ हा गेली कित्येक दशकं भारतासाठी निष्ठावान कार्यकर्ते तयार करायचं चांगलं काम करत आहे. संघाच्या कुठल्याही शाखेमधे धर्म, रंग, जात-पोटजात ह्याच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. मी जवळपास वयाच्या ८ व्या वर्षीपासुन १५ वर्ष नियमित शाखेत जातं होतो. आता २ वर्षांपासुन वेळेअभावी शाखेत नियमित जाता येतं नाही, पण जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा माझे शिक्षक, शाखा व्यवस्थापक आणि काही स्वंयंसेवकांच्या संपर्कात असतो. शाखा नक्की काय करते हे समजण्यासाठी शाखेची प्रार्थना वाचा. सुधिर फडकेंच्या आवाजातील सुरेल प्रार्थनेचा दुवा देतोय तो नक्की पाहावा. तोपर्यंत ही प्रार्थना वाचा, त्याचा अर्थ ज्याला समजेल त्यानीच सांगा अशी धेयं असणारा संघ परीवार दहशतवादी तयार करु शकेल का ते.
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।। प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।। समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।। ।। भारत माता की जय ।।
हा सुधिर फडकेंच्या आवाजातील प्रार्थनेचा तुनळीचा धागा. http://www.youtube.com/watch?v=T7fOf8rUrdw
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

निषेध

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 22:55 नवीन
ओ. आमच्या गाववाल्यांबद्दल काही बोलायचे नाही. ते त्यांचे स्वतःचे मत नाहीये. ;)
  • Log in or register to post comments

सुशिल कुमार शिंदे पुन्हा अडचणीत

मदनबाण
Wed, 01/23/2013 - 23:06 नवीन
राजपुत्र राहुल गांधी यांच्या प्रेमाचे भरते आल्याने बहुतेक शिंदे साहेबांचे आपल्या बोलण्यावर नियंत्रण राहिले नसावे ! ;) यांना पाकव्याप्त काश्मिरमधले टेररिस्ट कँप दिसत नाहीत पण हिंदुस्थानात नसलेले हिंदु टेररिस्ट कॅंप दिसतात या बद्धल त्यांच्या दिव्य दॄष्टीचे कौतुकच करायला हवे. ;) या विषयावर लोकसत्ते मधे आलेला हा लेख वाचनिय आहे. जाता जाता :--- अफजल्याची फाईल हे म्हणे ४८ तासात मार्गी लावणार होते, शिंदे साहेब या फाईलवर सखोल अभ्यास करणार होते म्हणे ! अजुन यांचा अभ्यास पूर्ण झालेला दिसत नाही. ;)
  • Log in or register to post comments

कै नै हो, सगळा साला फ्याशनचा

बॅटमॅन
गुरुवार, 01/24/2013 - 01:26 नवीन
कै नै हो, सगळा साला फ्याशनचा खेळ आहे. विशिष्ट धर्माला शिव्या घातल्या की कूल पॉईंट्स मिळतात, अन्य कुणाबद्दल अवाक्षर उच्चारले तर मात्र ** मारतील. **** आहेत झालं.
  • Log in or register to post comments

मुळात या लोकांचा रा.स्व.

नानबा
गुरुवार, 01/24/2013 - 09:03 नवीन
मुळात या लोकांचा रा.स्व. वर का राग आहे देवच जाणे. याना संघाची विधायक कामं दिसत नाहीत, संघाच्या मुशीत घडलेल्या नरेंद्र मोदींनी घडवलेला विकसित गुजरात दिसत नाही, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आपल्या आजरपणावर उपचार करून घ्यायला परदेशी गेले नव्हते, कारण जर पंतप्रधानच परदेशी गेला तर आमच्या देशात उत्तम प्रतिच्या आरोग्यसुविधा नाहीत असं इतर देशात वाटेल, ही विचारसरणी दिसत नाही, भारतापासून जवळपास तुटलेल्या ईशान्य भारताला पुन्हा मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी संघाने चालवलेला पूर्वांचल विकास प्रकल्प, आणि त्यासाठी तिकडे पूर्णवेळ कार्य करणारे आय.आय.टी., आय.आय.एम. सारख्या संस्थांमधून बाहेर पडलेले आणि उच्च पगारावर लाथ मारलेले तरूण प्रचारक दिसत नाहीत. या लोकांकडुन अजून कसल्या अपेक्षा करणार? यांच्यासाठी प्रत्येक दिवस "अजि सोनियाचा दिनु" असतो ना.. आणि यांच्या सोनियाच्या ताटी ज्योती तर उजळलेल्या आहेतच... ******** संपादक मंडळः- येथील सर्वच सदस्यांना विनंती आहे की भडक भाषा न वापरताही हा काथ्याकूट होउ शकतो याचा विचार व्हावा.
  • Log in or register to post comments

संपादक मंडळः- येथील सर्वच

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 01/24/2013 - 10:15 नवीन
संपादक मंडळः- येथील सर्वच सदस्यांना विनंती आहे की भडक भाषा न वापरताही हा काथ्याकूट होउ शकतो याचा विचार व्हावा.
? जरुर व्हावा,नाहीतर आहेतच द्वेष्टे गरळ ओकायला. आता काल परवाला मुंबई मध्ये पकडलेला दहशतवादी हा आर एस एस चा होता का?
  • Log in or register to post comments

वेडा

चिरोटा
गुरुवार, 01/24/2013 - 11:28 नवीन
खुळा आहे सुशील. खालील फोटोच्या तसवीरी त्याच्या घ्ररातल्या प्रत्येक भिंतीवर लावा. Image removed.
  • Log in or register to post comments

हा फोटो नविन दिसत आहे.

चिंतामणी
Mon, 01/28/2013 - 12:36 नवीन
हा बघा १९८३ सालचा. महाराष्ट्राचे अर्थमंत्री असताना. (मला हा फोटो पोस्ट करायला न जमल्याने लिंक दिली आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

हे घ्या.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/14/2013 - 16:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

फोटो बघुन हे म्हणावेसे वाटते

इरसाल
Fri, 02/22/2013 - 12:09 नवीन
कॉमॅ मोड : किती गरीब व सालस माणुस आहे नजरसुद्धा वर करुन पहात नाही.(बाकीचे वर बघताय म्हणुन) मिपा मोडः खाली मुंडी पाताळधुंडी आहे लेकाचा झाल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सुशीलकुमार खुळे ?

तर्री
गुरुवार, 01/24/2013 - 12:44 नवीन
१०० % असहमत. सुशीलकुमारांची मानसिकता पहिली तर ते एक धूर्त राजकारणी आहेत हे समजून येते. हया वादग्रस्त उद्गारांमागे त्यांचा "मोटिव्ह" काय असेल ? असा प्रश्न केल्यास उत्तर सहज मिळेल . "२०१४ नंतर राहुल गांधींच्या च्या मंत्रिमंडळात परत महत्वाचे स्थान मिळवणे " राहुलजी समोर प्रतिस्पर्ध्याच्या वर्मावर घाला घालणारे सुशील हे "दिग्गी राजा प्रमाणे " उथळ व बेताल नाहित. सुशील हे स्वार्थ , हुजरेगिरी अंगात पूर्ण भिनलेले मुरब्बी राजकारणी आहेत ! आपले गृहमंत्री असे बोलण्याचे दुसरे करण "असुरक्षित असल्याची भावना " हे होय. ओवेसी , कसाब यांच्यावर कारवाई केल्याने - करावीच लागल्याने सोलापुरात "मायानोरीटी" ची मते आपल्याला मिळणार नाहित ह्या भावनेने त्यांना ग्रासले असावे. सोलापुरात पराभव आणि राज्यसभेत वर्णी लागली नाही तर आपला "शिवराज पाटील " तर नाही ना होणार ? असे ही वाटत असेल. त्यांच्या हया बोलघेवडेपणा मागे मला तरी ही दोन प्रमुख करणे दिसतात.
  • Log in or register to post comments

नसतील खुळे पण त्यासारखी

बॅटमॅन
गुरुवार, 01/24/2013 - 12:46 नवीन
नसतील खुळे पण त्यासारखी विधाने करतातच ना? गृहमंत्री झाल्याबद्दल विशिष्ट समाजाला काँग्रेसने प्राधान्य दिल्याबद्दल आभार मानणे हाही त्यापैकीच प्रकार. तद्दन मूर्खपणा आहे-राजकीय शहाणपणा असला तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

२००२ मध्ये सोलापूरमधील ३-४

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/24/2013 - 12:58 नवीन
२००२ मध्ये सोलापूरमधील ३-४ मुस्लिम कुटुंबातील काही जणांना घरात जवळपास १५० गावठी बॉम्ब सापडले म्हणून मोक्काखाली अटक करून तुरूंगात ठेवले होते. जानेवारी २००३ मध्ये शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सर्वात पहिल्यांदा त्यांनी या आरोपींवरील मोक्का रद्द करायला लावला व नंतर सर्वांना जामिनावर सोडले. तो खटला आजतगायत सुरू झालेला नाही. २००४ - २००६ या काळात आंध्रप्रदेशचे राज्यपाल असताना शिंद्यांनी खुनाच्या आरोपात जन्मठेप झालेल्या एका काँग्रेस कार्यकर्त्याला आपल्या अधिकारात त्याची शिक्षा माफ करून मुक्त केले होते. यावर संबंधित फिर्यादी न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने शिंद्यांवर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढून त्या आरोपीची जन्मठेप कायम केली होती. आदर्श घोटाळ्यातही शिंदे आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

या संदर्भात हाफिज सईद आणि

मालोजीराव
गुरुवार, 01/24/2013 - 14:18 नवीन
या संदर्भात हाफिज सईद आणि शिंदे सायबांनी एकत्र पत्रकार परिषद घेतल्याचे बघण्यात आले ;) भास होता कि खरे होते ? ...जाणकारांनी प्रकाश टाकावा
  • Log in or register to post comments

या सगळ्याचे

तिमा
गुरुवार, 01/24/2013 - 20:18 नवीन
या सगळ्याचे उत्तर २०१४ साली मतपेटीतून देणे एवढेच आपल्या हातात आहे. तरुण पिढीने जागृत होऊन मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments

याच विषयावर एक चांगला लेख

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/24/2013 - 21:07 नवीन
याच विषयावर एक चांगला लेख http://www.outlookindia.com/article.aspx?283666 या लेखातील हे परिच्छेद काय सुचवितात? The investigation so far, based largely on the interrogation of some arrested Hindu suspects, who professed the Hindutva ideology, showed that neither the BJP nor the RSS had any knowledge of the planned acts of reprisal by these suspects. There has been no evidence at all that these organisations had any role in these incidents. These were purely rogue acts of reprisal by these individual Hindus with past association with these organisations. While evidence of the involvement of some Hindu rogue elements in the Malegaon blasts seems to be strong, evidence of their involvement in the Samjhauta Express explosion appears to be more circumstantial than direct. Moreover, immediately after it, US authorities had assessed that it was probably caused by the Lashkar-e-Toiba (LET).They have not come out with any subsequent assessment on it. Investigation into these cases has since been taken over by the National Investigation Agency (NIA) formed by the Union Ministry of Home Affairs in 2009 when Mr P. Chidambaram was the Home Minister. Despite all its resources, the NIA has not so far been able to come out with a comprehensive conclusion on the alleged involvement of some Hindu extremists in acts of reprisal against Muslims. There has been no sense of urgency in the MHA in having the investigation completed and the suspects prosecuted. One has a strong suspicion that the NIA is sought to be used not for the investigation and prosecution, but for politically needling the BJP and the RSS by periodically levelling allegations against them. This partisan exploitation of the investigation for political purposes is likely to continue till the 2014 elections. Mr Shinde’s statement is part of this partisan exercise. Short-sighted leaders of the Congress do not seem to realize that they have been playing into the hands of Pakistan and weakening our campaign against Pakistan for early action against the masterminds of the 26/11 terrorist strikes in Mumbai. Pakistan has been trying to link up its early prosecution of the accused in the 26/11 strikes in Mumbai with our early prosecution of the accused in the Samjhauta Express explosion on the ground that many Pakistanis travelling back to Pakistan by this train were killed in this explosion.
  • Log in or register to post comments

`मालेगावचा मास्टरमाइंड' ---

अनामिका
Tue, 02/12/2013 - 17:06 नवीन
`मालेगावचा मास्टरमाइंड' --- लेखक श्री. रवींद्र दाणी मालेगाव येथे झालेल्या बाँबस्फोटांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांना गोवण्यात आले आणि राजकीय शक्‍तींना आयतेच कोलीत मिळाले. त्यानंतर या प्रकरणातील हिंदु आरोपींना अधिकाधिक अडकवण्यासाठी अतिरेकीविरोधी पथकावर दबाव आणून आरोपींच्या चौकशा सुरू झाल्या. हा दबाव नक्की कोणाच्या माध्यमातून होता, हे लेखक श्री. रवींद्र दाणी यांनी `साप्‍ताहिक विवेक'च्या अंकात प्रसिद्ध केलेल्या `मालेगावचा मास्टरमाइंड' या लेखातून काही भाग येथे देत आहे. लष्करप्रमुख जनरल कपूर यांची नाराजी महाराष्ट्र अतिरेकीविरोधी पथकाने (एटीएसने) मालेगाव चौकशीसाठी लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्याची परवानगी संरक्षणमंत्र्यांकडे मागितली. एका अतिरेकी कृत्यासाठी एका लेफ्ट. कर्नलला अटक करणे, ही काही साधीसुधी बाब नव्हती. अतिरेकीविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे वा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने वा दबावाने लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनी आपल्या एका अधिकार्‍यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्रश्‍नच नव्हता. लष्करप्रमुख या बाबतीत संरक्षणमंत्री ए.के. अँथनी यांचे ऐकतील, असेही वाटत नव्हते. ए.के. अँथनी यांचा कोणताही इरादा नाही, दबदबा नाही. मग `लष्करप्रमुखांवर कोणता दबाव आला असावा' या विचारातून मालेगावचा `मास्टरमाइंड' कोण असावा, याचा शोध मी सुरू केला. नंतरच्या घटनाक्रमाने त्या शोधाला जणू गती मिळाली. हेमंत करकरे वारंवार आणखी काही विद्यमान लष्करी अधिकार्‍यांच्या चौकशीची मागणी करत होते. यावरून त्यांना विलासराव देशमुख, रा.रा. पाटील व लष्करप्रमुख जनरल कपूर यांच्यापेक्षाही मोठ्या व्यक्‍तीचा पाठिंबा होता. म्हणूनच करकरे दिल्लीत येऊन आणखी काही लष्करी अधिकार्‍यांच्या चौकशीचा विषय लष्करी अधिकार्‍यांशी बोलत होते. मालेगाव चौकशीवर नियंत्रण कुणाचे ? मालेगाव चौकशीवर विलासराव देशमुख वा रा.रा. पाटील यांचे नियंत्रण राहिलेले नव्हते, तर दिल्लीतून या चौकशीवर देखरेख केली जात आहे, याचा स्पष्ट पुरावा म्हणजे शिवराज पाटील. दररोज या चौकशीवर ते लक्ष ठेवून होते. शिवराज पाटील मालेगाव चौकशीत आदल्या दिवशी काय झाले आहे, याची माहिती घेत होते आणि पुढे काय करावयाचे आहे, याचेही निर्देश देत होते. गृहमंत्रालयातील एका अधिकार्‍याने प्रस्तूत प्रतिनिधीस ही माहिती दिली. अर्थात शिवराज पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शिवराज यांच्या मागे कोण ? करकरे यांची अस्वस्थता ! या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यापूर्वी व निष्कर्ष काढण्यापूर्वी अतिरेकीविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना या चौकशीबाबत काय वाटत होते, याचाही उल्लेख केला पाहिजे. हेमंत करकरे आज हयात नाहीत. ते हयात असते, तर काही बाबींचा उल्लेख करता आला नसता. मालेगाव चौकशी सुरू झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांच्या अटकेचा मुद्दा वादग्रस्त झाल्यानंतर हेमंत करकरे मुंबईतील त्यांच्या एका मित्रामार्फत दिल्लीतील एका व्यक्‍तीसाठी काही संदेश पाठवत होते. हे संदेश माझ्याकडे येत होते. संदेश पुढे पोहोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. तीन संदेशांचा येथे उल्लेख करता येईल. दिवाळीच्या काळात : दिवाळीच्या काळात झालेल्या पहिल्या संदेशानुसार, मालेगाव बाँबस्फोटाची जबाबदारी हिंदु संघटनांपैकी कोणी तरी घेतल्यास चौकशी पूर्ण समजून संपवली जाईल. दुसरा संदेश : दिवाळीनंतर ८-१० दिवसांनी दुसरा संदेश आला. त्यात करकरे सांगत होते, `३० वर्षांत कधीही नव्हता एवढा दबाव माझ्यावर आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या `नार्को टेस्ट'मध्ये काहीही सापडलेले नाही. दोन ठिकाणी काही मामुली विसंगती आढळून आल्या. दिवाळीनंतर मालेगाव चौकशीत फार प्रगती झालेली नाही.' करकरे वारंवार दबावाचा उल्लेख करत होते. ३० वर्षांच्या सरकारी सेवेत माझ्यावर कधी नव्हता एवढा दबाव काही लोकांना, संघटनांना अडकवण्यासाठी आहे, असे ते कळवत होते. शेवटचा संदेश : २६ नोव्हेंबरची घटना होण्यापूर्वी करकरे यांचा तिसरा संदेश आला. काही बातम्या दिल्लीत `लिक' होत आहेत, तर काही मुंबईहून आणि यात माझी बदनामी होत आहे. मी त्या नाकारूही शकत नाही. मी काय करावे, हेच मला समजत नाही. करकरे यांचे हे संदेश पाहता वैयक्‍तिक आणि राजकीय दबावामुळे त्यांच्या मनाची झालेली घालमेल याची कल्पना येते. करकरे यांचे हे संदेश प्रसिद्ध झाल्याने त्यांच्याबद्दल निर्माण झालेले समज-गैरसमज दूर होण्यात मदतच होईल; कारण सर्व बातम्या करकरे स्वत:च `लिक' करत होते, असे चित्र तयार झाले होते; पण ती वस्तूस्थिती नव्हती. करकरे यांच्याकडून आलेल्या संदेशांमधून ते स्पष्ट होत होते. करकरे यांच्या संदेशातून स्पष्ट होणार्‍या दोन ठळक बाबी म्हणजे त्यांच्यावर सरकारमधून दबाव होता व चौकशीतील माहिती त्यांना न विचारता `लिक' केली जात होती. पंतप्रधान कार्यालयाचे राजकारण मालेगाव चौकशीबाबत पंतप्रधान स्वत: लक्ष देत होते काय ? या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थी आहे. पंतप्रधानांचा स्वभाव तसा नाही. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असले, तरी ते खरोखरीच नामधारी आहेत. शरद पवार वगळता अन्य कोणताही मंत्री त्यांना विचारत नाही. मग मालेगाव चौकशीची सूत्रे कोणत्या व्यक्‍तीकडे वा शक्‍तीकडे होती ? ही व्यक्‍ती वा शक्‍ती लष्करप्रमुखांना आदेश देऊ शकेल, अशी असण्यास हवी, `सीबीआय' व `आयबी' यांना निर्देश देऊ शकणारी असायलाच हवी. वृत्तपत्रांना बातम्या `लिक' करण्याचा निर्णय घेणारी असावयास हवी. या तिन्ही कसोट्या पूर्ण करणारी ती व्यक्‍ती होती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम्.के. नारायणन ! मालेगाव चौकशीची संपूर्ण सूत्रे नारायणन हाताळीत होते. लष्करप्रमुखांना हाताळण्याचे प्रकरण असो, `आयबी' व `सीबीआय' यांची मदत घेण्याचा निर्णय असो, प्रत्येक निर्णय नारायणन घेत होते. मालेगाव चौकशीचे निमित्त करून हिंदूंना अतिरेकी ठरवणे, निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा भयोत्पादनाचा (दहशतवादाचा) मुद्दा हिसकावून घेणे आणि संघ परिवारातील भाजप, रा.स्व. संघ व विश्‍व हिंदु परिषद यांना बदनाम करणे. या महायोजनेची अंमलबजावणी नारायणन करत होते. महाराष्ट्र अतिरेकीविरोधी पथक पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश घेत होते. हे अधिक स्पष्ट शद्बांत सांगावयाचे झाल्यास हेमंत करकरे नारायणन यांच्याकडून आदेश घेत होते. नारायणन यांची दोरी कोणाच्या हाती ? मालेगाव चौकशीची सूत्रे करकरे यांच्याकडे होती. सरकारी पद्धतीनुसार करकरे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाकडून आदेश घेत होते; पण त्या आदेशामागे एम्.के. नारायणन होते. आता यात नारायणन कसे आले ? नारायणन हे पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असले, तरी ते पंतप्रधानांना कमी `रिपोर्ट' करतात आणि सोनिया गांधींना जास्त `रिपोर्ट' करतात. नारायणन यांना राजकीय वर्तुळात `दस जनपथका आदमी' म्हणून ओळखले जाते. एम्.के. नारायणन हे फक्‍त त्यांना `१०-जनपथ'मधून मिळणार्‍या आदेशानुसार वागत होते. कारण त्यांची ख्यातीच `१०-जनपथ'चे निष्ठावंत अशी आहे. नारायणन `भारतीय लोक सेवे'तील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. `इंटेलिजन्स ब्युरो'चे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांची निष्ठा राजीव गांधी यांच्याशी होती. तीच निष्ठा २००४ मध्ये त्यांच्या कामी आली आणि पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे.एन. दीक्षित यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर नारायणन यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्‍त करण्यात आले. नारायणन यांनी मालेगाव चौकशी होण्यासाठी जे काही केले ते सोनिया गांधींच्या निर्देशनावरून केले; पण मालेगाव चौकशीतला `मास्टरमाइंड' येथेच थांबत नाही. सोनिया गांधी यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयामागे त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल असतात. मालेगावात हिंदु अतिरेक्यांनी बाँबस्फोट केले, अजमेर व हैद्राबाद या ठिकाणीही हिंदूच आहेत, हे अहमद पटेल यांचे सूत्र. हे सूत्र सोनिया गांधी यांच्या माध्यमातून पुढे रेटण्यात आले ते नारायणन यांच्या सरकारी माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत राबवण्यात आणि हेमंत करकरे यांच्यासारख्या कर्तबगार अधिकार्‍याच्या माध्यमातून राबवण्यात आले. शेवटी करकरे यांनाही याची कल्पना होती; पण ते काहीही करू शकत नव्हते आणि २६ नोव्हेंबरच्या घटनेने करकरे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मालेगाव प्रकरणात हिंदु संघटनांना अडकवण्यासाठी त्यांच्यावर आलेल्या दबावाची कथा सांगण्यासाठी ते हयात असते, तर मालेगावचा `मास्टरमाइंड' देशाला अधिक चांगल्या प्रकारे ओळखता आला असता ! -------------------------------------------------------------------------------- कोणताही लष्करप्रमुख सरकारचा प्रचंड दबाव असल्याशिवाय आपल्या विद्यमान लष्करी अधिकार्‍यास पोलिसांच्या स्वाधीन करत नाही. हा नोकरशाहीतील सर्वमान्य पण अलिखित नियम आहे. महाराष्ट्रातील मालेगाव बाँबफोटाची चौकशी सुरू झाल्यावर सर्वप्रथम साध्वी प्रज्ञासिंग यांना अटक झाली. त्या वेळी फार प्रतिक्रिया उमटल्या नाहीत; पण नंतर काही दिवसांत भारतीय लष्कराच्या `मिलिटरी इंटेलिजन्स'मध्ये कार्यरत एका लेफ्ट. कर्नलला अटक झाल्यावर मात्र मालेगाव चौकशी प्रकरण साधे सरळ नाही, याचा पहिला संकेत मिळाला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गॄहमंत्रायलाच्या ऑफिशिअल

मदनबाण
गुरुवार, 01/24/2013 - 21:27 नवीन
गॄहमंत्रायलाच्या ऑफिशिअल साईटवर प्रकाशित केलेल्या, तसेच सरकारने प्रतिबंधित केलेल्या अतिरेकी संघटनेच्या यादीत एकाही हिंदुत्ववादी अतिरेकी संघटनेचे नाव शोधुनही सापडले नाही. १)इंग्रजी दुवा :- http://www.mha.gov.in/uniquepage.asp?Id_Pk=292 (यात ३५ नावे आहेत.) २)हिंदी दुवा:- http://www.mha.gov.in/pdfs_hin/banned_org-H.pdf (यात ३४ नावे आहेत.) जाता जाता :--- तुलना करण्यात कॉग्रेसी नेत्यांची मजल कुठवर जावी ? तर... राहुल गांधींची तुलना मणिशंकर अय्यर यांनी ओबामांशी केली ! :D
  • Log in or register to post comments

गिल्ट बाय असोसिएशन

विकास
गुरुवार, 01/24/2013 - 21:43 नवीन
वर श्रीगुरूजींनी, तसेच लोकसत्तेच्या अग्रलेखातील आणि आउटलूक मधील लेखात अजून कोणालाच दोषी ठरवता आले नाही असे म्हणले आहेच. पण तरी देखील गिल्ट बाय असोसिएशन च्या नेहमीच्या पद्धतीने सरकार संघ-भाजपाला या आरोपींमुळे आरोपीच्या पिंजर्‍यात घालत आहे. वास्तवीक जर काही पुरावे असले तर खरेच जाहीर करून योग्य ती कारवाई करावी, कोणी काही म्हणणार नाही, म्हणू शकणार नाही... पण तसे कसे करता येणार? त्यात गंमत म्हणजे स्वतःची असोसिएशन कुणाबरोबर आहे आणि त्यावरून स्वतःस काय समजायचे ह्याचा देखील विचार करायला हवा: १. हिंदू मधील बातमी: 1993 Surat blast: imprisonment for former Congress Minister २. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटासंदर्भात अवैध शस्त्रे बाळगल्यासंदर्भात संजय दत्तवर हायकोर्टापर्यंत शिक्षा झाली आहे आणि लवकरच सुप्रिम कोर्ट अपिलावरील निकाल जाहीर करेल. अर्थात आत्ता तरी त्यावरील आरोप हे कोर्टाने मान्य करून दोषी ठरवले आहेच. तरी देखील त्याला विधानपरीषदेचे तिकीट दिले गेले आहे. ३. त्या आधी भगत वगैरेंवर अनेक खटले शिख दंगलीसंदर्भात भरले गेले, पण त्यामुळे त्यांच्या हयातीत पक्षकार्यास धक्क्क बसल्याचे किमान ऐकीवात तरी नाही. त्या उलट बंगारू लक्ष्मण आता कुठे आहे हे देखील कुणास माहीत नाही. याचा अर्थ भाजपा आदर्श आहे वगैरे मी म्हणत नाही, पण फरक नक्कीच दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हे दुसरे संजय दत्त आहेत...

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 01/24/2013 - 22:06 नवीन
१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटासंदर्भात अवैध शस्त्रे बाळगल्यासंदर्भात संजय दत्तवर हायकोर्टापर्यंत शिक्षा झाली आहे ....... तरी देखील त्याला विधानपरीषदेचे तिकीट दिले गेले आहे.
अभिनेता संजय दत्त समाजवादी पक्षाचा सदस्य झालाय. अन विधानपरिषदेचे तिकिट मिळालेले संजय दत्त काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी बहुधा त्यांनीच वि.प. सदस्यत्वाच राजीनामा दिला होता. प्रदेश काँग्रेस समितीचे ते दिर्घकाळ पदाधिकारी होते. नक्की माहीत नाही पण ते कोकणातले असावेत असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

दुसरे संजय दत्त

आजानुकर्ण
गुरुवार, 01/24/2013 - 22:40 नवीन
अभिनेता संजय दत्त बहुदा समाजवादी पक्षात आता नाही. विकास यांनी उल्लेख केलेले हे संजय दत्त म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी संजय दत्त. हे दुसरे ज्यांनी पृथ्वीराज जव्हाण यांच्यासाठी विधानपरिषदेतील जागा मोकळी करुन दिली. मात्र विकास यांना अभिप्रेत असलेल्या संजय दत्त यांच्यासाठी एका पक्षाच्या दिवंगत प्रमुखांनी विशेष मदत करुन त्याला तुरुंगातून बाहेर कसे येता येईल हे पाहिले होते हे नक्की आठवते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बरोबर

विकास
गुरुवार, 01/24/2013 - 22:50 नवीन
हा संजय दत्त काँग्रेसमधेच आहे: Congress welcomes Sanjay Dutt as actor regrets joining SP मात्र तुम्ही (श्रीरंग_जोशी) म्हणत असल्याप्रमाणे आमदार संजय दत्त बहुदा वेगळी व्यक्ती असावी.
मात्र विकास यांना अभिप्रेत असलेल्या संजय दत्त यांच्यासाठी एका पक्षाच्या दिवंगत प्रमुखांनी विशेष मदत करुन त्याला तुरुंगातून बाहेर कसे येता येईल हे पाहिले होते हे नक्की आठवते.
हा हा! अहो पण त्यांचे खुल्लमखुल्लाच होते. त्यांनी काही कुणाला गिल्ट बाय असोसिएशन ठरवले नाही आणि स्वत:ला सोवळे समजत चीप शॉट्स मारले नाहीत. तिथेच तर फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

अरेच्या

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 01/24/2013 - 23:19 नवीन
कदाचित याबद्दलची बातमी मी वाचलिही असावी पण लक्षात राहिली नाही हे माझ्यासाठी एक सुचिन्हच. कारण काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधीत बातम्यांचे लहान सहान तपशील मी ध्यानात ठेवत असे. अजूनही लक्ष असतेच पण हळू हळू रस कमी होत चालला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

खुल्लमखुल्ला

आजानुकर्ण
गुरुवार, 01/24/2013 - 23:57 नवीन
गुपचूप कायदा तोडणे आणि खुल्लमखुल्ला कायदा तोडणे हे दोन्ही सारख्याच स्वरुपाचे गुन्हे आहेत. आम्ही कायद्याला किंवा लोकशाहीला जुमानत किंवा मानत नाही वगैरे म्हणत आमदार निवडून आणण्याची आणि सरकार बनवण्याची कसरत करायची हेही तितकेच केविलवाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+

विकास
Fri, 01/25/2013 - 01:14 नवीन
तुमच्या भावनेशी सहमतच. ;) माझा मुद्दा: एका बाबतीत किर्तन आतून तमाशा असे वर्तब दिसते तर दुसर्‍या बाबतीत आंतर्बाह्य तमाशाच. किमान जनतेची दिशाभूल दुसर्‍या बाबतीत नसते इतकेच काय ते म्हणायचे आहे. मात्र पहील्या बाबतीत स्वत:ला हवे ते करायचे आणि दुसर्‍याला बदनाम करत लोकांचे लक्ष इतरत्रच वेधायचे असला प्रकार असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

सहमत

आजानुकर्ण
Fri, 01/25/2013 - 03:14 नवीन
मीदेखील तुमच्या भावनेशी सहमत आहे. लोकशाही न मानताही लोकशाही निवडणुका लढवणे हा वरुन कीर्तन आतून तमाशा किंवा सतत काँग्रेस किंवा मुसलमानांना बदनाम करत लोकांचे लक्ष विकासाच्या मुद्द्यांवरुन धार्मिक मुद्द्यांवर नेण्याचा प्रकार करण्यापेक्षा काँग्रेससारखा अंतर्बाह्य तमाशा मलाही मान्य आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अर्रर्रर्रर्र

रामपुरी
Wed, 01/30/2013 - 04:39 नवीन
काँग्रेसला तमाशा म्हणून तमाशाची बदनामी केल्याबद्दल निषेध... xxxxपेठ म्हणणार होतो पण तिथेही फक्त ठराविक धर्माच्या दाढ्या कुरवाळण्याचा प्रकार होत नसावा त्यामुळे त्यांचीही बदनामी होईल. त्यामुळे काँग्रेस = काँग्रेस. त्याला दुसरी उपमा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

दंगलीसंदर्भात

आजानुकर्ण
गुरुवार, 01/24/2013 - 22:42 नवीन
बहुदा सगळेच राजकीय पक्ष भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या नेत्यांबाबत निदान थोडीतरी लाज बाळगत असले तरी दंगलीबाबत आरोप सिद्ध झाल्यास तितकी पर्वा करत नाहीत असे दिसते. बंगारु लक्ष्मण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.भगत यांच्यावर दंगलीचे. दंगलीचे आरोप असूनही पक्षकार्यात धक्का न बसलेली इतर उदाहरणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे, विनय कटियार वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

फरक

विकास
गुरुवार, 01/24/2013 - 23:06 नवीन
बंगारु लक्ष्मण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.भगत यांच्यावर दंगलीचे.
आधी म्हणल्याप्रमाणे, बंगारूंना बाजूस केले गेले तर भगत शेवटपर्यंत पक्षात राहीले.
दंगलीचे आरोप असूनही पक्षकार्यात धक्का न बसलेली इतर उदाहरणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे, विनय कटियार वगैरे.
कटीयार बद्दल माहीत नाही, पण बाळासाहेबांबद्दल टाईम्स मधीले हे वाचनीय आहे. त्यातील पहीलाच परीच्छेद खाली उर्धृत करत आहे: For all the "inflammatory" speeches and controversy through Shiv Sena chief Bal Thackeray's long political career, his brush with the law was always rather remote. He never faced a trial, spent time in jail only once, and was never convicted for any substantial criminal offence. The cases against him for hate speech were all either withdrawn or never took off for want of prior government sanction ; in others he was never charged. He did get convicted once for contempt of court but any glee among his detractors was short-lived . The Supreme Court set aside his conviction in 2004 for want of the necessary consent of the advocate-general.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

बंगारु

आजानुकर्ण
गुरुवार, 01/24/2013 - 23:55 नवीन
बंगारु हे अगदी टीव्हीच्या पडद्यावर पैसे घेताना पकडले गेल्यावर भाजपाकडे दुसरा पर्याय होता का? भगत पक्षात राहिले कारण त्यांच्यावरचे आरोप हे भ्रष्टाचाराचे नसून दंगलींचे होते. दंगलींचे आरोप असलेले कटियार, साध्वी ऋतंभरा, ठाकरे वगैरे कोणीही पदावरुन बाजूला गेले नाही. याउलट भ्रष्टाचाराचे आरोप असलेले राम नाईक, दिलीप सिंग जुदेव, येडियुरप्पा, स्वतः श्री गडकरी हे अगदी शेवटची वेळ येईपर्यंत पदाला चिकटूनच होते. आता बंगारुंचे उदाहरण देऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपा काही ठोस पाऊल उचलत आहे असे तुम्हाला निर्देशित करायचे असेल तर त्याविरोधातील अनेक उदाहरणे इतिहासात मिळतील श्रीकृष्ण आयोग अहवालाने बाळासाहेबांना दंगलीबाबत जबाबदार धरले होते. मात्र तत्कालीन सेना-भाजपा सरकारने त्या अहवाला समाधी दिली. ठाकरे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे धैर्य व कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी याचा योगायोग अनेक सरकारांना साधता आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सुशीलकुमार

आजानुकर्ण
गुरुवार, 01/24/2013 - 22:44 नवीन
सुशीलकुमारांना जर हे सगळे माहीत असेल तर आख्खे गृहमंत्रालय हाताशी असताना मीडियासमोर बडबडण्यापेक्षा सरळ कारवाई करुन मोकळे व्हावे. दहशतवादाला धर्माचा रंग देणे चुकीचे आहे. मी हिंदू आहे आणि हिंदू दहशतवादी हा शब्द मला खुपतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा