Skip to main content

रंगीत दहशतवाद

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 23/01/2013 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो. पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. च्यारिटी बिगिन्स आट होम ह्या न्यायाने सुरवातीला भगवा हा अस्सल भारतीय मातीतला रंग निवडला आहे. त्या धोरणाला अनुसरुन आजकाल भगवा दहशतवाद भारतात फोफावतो आहे, रा. स्व. संघाचे लोक मोठ्या प्रमाणात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे चालवत आहेत. तिथे गठ्ठ्याने अतिरेकी बनत आहेत वगैरे रोचक विधाने आपल्या गृहमंत्र्यानी केली. आणि मोठीच खळबळ झाली. बहुधा काळेपांढरे टीव्ही जाऊन रंगीत आल्यावर अशीच खळबळ माजली असेल. अर्थात सिनेमा चालू असताना प्रेक्षकाने खलनायकावर ओरडणे, त्याच्या अंगावर धावून जाणे बावळटपणाचे वाटते तसे गृहमंत्री हा एकरंगी दहशतवादाचा खेळ तटस्थपणे बघत आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून संबंधित संघटनेवर बंदी घालू, संबंधित संघटनांचे सदस्यत्व मिरवणारे आमदार, खासदार ह्यांचे पद रद्द करू, कुठल्या राज्यातील सरकार अशा वाईट नादाला लागत असेल तर ते बरखास्त करू असे काही म्हणत नाहीत. पण आता काही बुरसटलेले, जुनाट विचारांचे काँग्रेसी नेते ह्या रंगीत दहशतवादाला नाकारुन पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट दहशतवादाकडे वळू असे म्हणत आहेत. http://online2.esakal.com/esakal/20130123/5600019574208857395.htm पूर्वीही असे अप्रिय सत्य ठणकावून सांगणार्‍या द्र्ष्ट्या लोकांना हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. गॅलिलिओ, टॉलेमी अशा लोकांच्या तोडीस तोड आपले गृहमंत्रीजी आहेत असे वाटते. आपल्याला काय वाटते? रंगीत दहशतवादच बरा नाही का? रंगीत सिनेमे आल्यावर कुणी ब्लॅक अँड व्हाईटला विचारतो का? फक्त आपल्याला हवे ते रंग निवडायचे स्वातंत्र्य हवे, कसे?

वाचने 54833
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

नै पण रास्व संघाबद्दल ठिक आहे. पण डायरेक भाजपाचं नाव घेउन दहशतवादी तयार करतो म्हणाल्यावर जेव्हडा गदारोळ उठेल असं वाटलं होतं तेव्हडा झालाच नाही. इज इट टू ऑब्विअस की लोकं शिंदेंकडे दिग्गीराजासारखंच दुर्लक्ष करतात?

In reply to by नेत्रेश

काही दंगली आणि बाँबस्फोटाचे आरोपी रा.स्व.शी संबधीत आहेत हे सिद्ध झालयं(तरीही ते दहशतवादी तयार करतात किंवा त्यांना लष्कर वगैरेंच्या रांगेत बसवणं निव्वळ मुर्खपणा आहे हे मान्य). याच्या आधारावर जरा खुट्ट झालं की रा.स्व. वर तोंडसूख घेतात. पण एका दुसर्‍या नंबरचा मुख्य राष्ट्रीय पक्ष दहशतवादी तयार करतो असं सो कॉल्ड सर्वात मोठ्ठी लोकशाही असणार्‍या देशाचा सरक्षण मंत्री म्हणतो म्हणजे गोचीच की.

In reply to by दादा कोंडके

माझ्या माहीती प्रमाणे अजुन कोणत्याही न्यायालयात बाँबस्फोट वगैरे गोष्टी या संघाच्या दहशतवाही कारवाया आहेत हे सिद्ध झालेले नाही.

In reply to by दादा कोंडके

"काही दंगली आणि बाँबस्फोटाचे आरोपी रा.स्व.शी संबधीत आहेत हे सिद्ध झालयं(तरीही ते दहशतवादी तयार करतात किंवा त्यांना लष्कर वगैरेंच्या रांगेत बसवणं निव्वळ मुर्खपणा आहे हे मान्य). " हे कधी सिद्ध झालंय? जरा याचे संदर्भ देता का? मालेगावची केस बघूया. ऑगस्ट २००८ मध्ये मालेगावमध्ये मशिदीबाहेर बॉम्बस्फोट होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले. पोलिसांनी सप्टेंबर २००८ मध्ये ९ स्थानिक मुस्लिमांना अटक करून त्यांच्यावर मोक्का लावून चौकशी सुरू केली. नंतर कुठेतरी काहीतरी चक्रे फिरली आणि ऑक्टोबर २००८ मध्ये साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित आणि इतर ९ जणांना या बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक केली, मोक्का लावला आणि आजतगायत ते तुरूंगात आहेत. त्यांना पकडून तब्बल ५१ महिने लोटले तरी अजून जामिनावर सोडले नाही व न्यायालयात आरोपपत्रही दाखल केलेले नाही ज्यामुळे खटला सुरू होईल. त्यांना नुसतेच डांबून ठेवले आहे. त्यांना पकडल्यावर सुरवातीला स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. नंतर हेमंत करकरेंच्या नेतृत्वाखाली एटीएसने चौकशी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. मग महाराष्ट्र सीआयडीने चौकशी केली. तरीही काही मिळाले नाही. मग एक एसआयटी नेमून त्यांनी चौकशी केली. तरीही पुरावे मिळाले नाहीत. मग एकदा नव्हे तर तब्बल ४ वेळा या सर्वांची नार्को चाचणी केली. तरीही पुरावे नाहीत. मग सीबीआयला चौकशीसाठी पाचारण केले. सीबाआयला पुरावे जमविण्यात अपयश आल्यावर पुन्हा एक दुसरी एसआयटी नेमून चौकशी केली. त्यांनाही काही मिळाले नाही. आता शेवटी एनआयए चौकशी करत आहे. त्यांनाही अजून कणभरही पुरावा मिळाल्याचे दिसत नाही. पुरावे असते तर न्यायालयात आरोपपत्र दाखल करून खटला केव्हाच सुरू झाला असता. प्रत्येकवेळी आरोपींनी जामिन मागितला किंवा आरोपपत्र दाखल करून खटला सुरू करण्याची मागणी केली की सरकारी वकील एक ठरलेले छापील उत्तर देतात. "आम्हाला अजून नवीन पुरावे सापडले असून चौकशी सुरु आहे. त्यामुळे जामिन देऊ नये.". मोक्काखाली अटक केली असल्याने न्यायालय सरकार पक्षाच्या संमतीशिवाय जामिन देऊ शकत नाही. दरम्यान एक वर्षांपूर्वी अगदी याच आरोपाखाली अटक केलेल्या ९ मुसलमानांना न्यायालयाने जामिन दिला (कारण सरकार पक्षाने त्यांच्या जामिनाला विरोध केला नाही), पण साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित इं. ना जामिन देण्यास सरकारचा विरोध आहे. तुरूंगवासातल्या ५१ महिन्यांच्या काळात या आरोपींचा छळ करण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंगला जेवणात मांसाहार देणे, अश्लील फिल्म्स दाखविणे इ. प्रकार केले. पण तरीही कोणीही आजतगायत कबुलीजबाब दिलेला नाही. महिला आयोग या अत्याचारांबद्दल मूग गिळून गप्प आहे. साध्वी प्रज्ञासिंगला तर आता छातीचा कर्करोग झाल्याची बातमी आहे. तरीही तिच्या जामिनाला सरकारचा विरोध आहे. २००६ साली समझोता एक्सप्रेसमद्ये बॉम्बस्फोट झाल्यावर तत्कालीन फॉरेन्सिक प्रयोगशाळेने चाचणी करून न्यायालयात असे सांगितले होते की त्यात आरडीएक्स नव्हते. पण नंतर कर्नल पुरोहितला २००८ मध्ये पकडल्यावर चौकशी करणार्‍या समितीने न्यायालयात सांगितले की समझोता प्रकरणात आरडीक्स वापरले होते व ते पुरोहितने पुरविले होते. लष्कराने पुरोहितला ६ टन आरडीक्स तामिळनाडूहून काश्मिरला नेऊन तेथील लष्कराच्या ताब्यात देण्यास सांगितले होते. पण त्याने ते तिथे न पोचविता बॉम्बसाठी वापरले. हा तद्दन खोटा आरोप वाचल्यावर दुसर्‍या दिवशी लष्करप्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की लष्कराने पुरोहितला असे काहीही सांगितले नव्हते. लष्करात प्रत्येक बुलेटचा हिशोब ठेवला जातो. जर पुरोहितने तब्बल ६ टन आरडीक्स गडप केले असते, तर ते केव्हाच लक्षात आले असते. हे ऐकल्यावर चौकशी समितीने न्यायालयात जाऊन आरडीक्सबद्दलचे आपले निवेदन मागे घेतले. असीमानंदची वेगळीच कहाणी आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार असीमानंदला पकडून तुरूंगात ठेवल्यावर, समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटासाठी आरोप लावलेल्या एका मुस्लिम तरूणाला असीमानंदच्या सेवेसाठी ठेवले होते. त्याच्या सेवेमुळे असीमानंदला पश्चाताप झाला व उपरती होऊन त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तुरूंगात असलेल्या एका आरोपीच्या सेवेसाठी दुसरा आरोपी अधिकृतरित्या नियुक्त केला जातो हे बहुधा भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असावे. हा चौकशी समितीच्या खोटारडेपणाचा कळस होता. नंतर लगेचच असीमानंदने पत्रकारांना सांगितले की पोलिसांनी छळ करून त्याच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाब लिहून घेतला. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या सर्व चौकशी समित्या कोणाच्या तरी सांगण्यावरून प्रज्ञासिंग, असीमनंद, पुरोहित इ. ना खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिसत आहेत. अजूनतरी त्यांना कोणताही पुरावा मिळालेला दिसत नाही. त्यामुळे आरोपपत्र दाखल न करता व जामिन न देता गेले ५१ महिने या सर्वाना विनाकारण तुरूंगात डांबून ठेवलेले आहे. जोपर्यंत ते तुरूंगात आहेत व खटला सुरू होत नाही तोपर्यंत भाजपला व संघपरिवाराला झोडपण्यासाठी हत्यार म्हणून काँग्रेस व देशातले इतर निधर्मांध त्यांचा वापर करणार! खटला सुरू झाला तर ते निर्दोष सुटणार याची खात्री असल्याने आरोपपत्र दाखल न करता चौकशीचा निव्वळ फार्स केला जात आहे.

In reply to by श्रीगुरुजी

या खटल्यातला गंमतीशीर भाग असा की या खटल्यासाठी ९-१० स्थानिक मुस्लिमांचा एक गट अजूनही आरोपी आहे व त्यांना १ वर्षापूर्वी जामिनावर सोडण्यात आले, पण त्यांच्यावरचे आरोप मागे घेण्यात आले नाहीत. जामिनावर सोडल्यावर त्यांना नुकसानभरपाई दिल्याची देखील चर्चा होती. दुसरीकडे साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित व इतर ७-८ जणांचा गटही याच गुन्ह्यासाठी आरोपी आहे व त्यांना जामीन न देता तुरूंगात डांबून ठेवले आहे. एकाच गुन्ह्यासाठी २ पूर्णपणे वेगवेगळे गट आरोपी असण्याचा हा बहुधा जगातला पहिलाच खटला असावा.

In reply to by श्रीगुरुजी

बापरे! इतकी माहिती नव्हती. लोकसत्तेच्या अग्र्लेखात बरेच काही लिहीले होते: "जवळपास ८०० पानांचे आरोपपत्र या प्रकरणी सरकारतर्फे न्यायालयात सादर करण्यात आले आहे, परंतु त्यात कोठेही हा भगवा दहशतवाद यामागे आहे असे सरकारतर्फे नमूद करण्यात आलेले नाही." इतके सर्व आहे तर त्यावर कोणी आवाज का करत नाही? बाकी मला निधर्मांध हा शब्द फारच आवडला. एकदम चपखल आहे. मुक्तस्त्रोतातील समजून तो वापरला जाईल. :-)

In reply to by विकास

बापरे! इतकी माहिती नव्हती.
अगदी असचं. मागच्या दोन-चार वर्षातल्या घडामोडी वाचून मी हे मत बनवलेलं होतं. आक्षेप घेतल्यानंतर बातम्यांची जमवाजमव करतच होतो तोवर हा प्रतिसाद वाचला. एखाद वर्ग मिडीयाला धरून हळूहळू कसं कंडीशनिंग करतं याचं चांगलच उदाहरण आहे.

In reply to by विकास

बापरे! इतकी माहिती नव्हती.
सहमत आहे.

In reply to by विकास

@मला निधर्मांध हा शब्द फारच आवडला. एकदम चपखल आहे. मुक्तस्त्रोतातील समजून तो वापरला जाईल.>>> नक्कीच! 11111111111

In reply to by विकास

इतके सर्व आहे तर त्यावर कोणी आवाज का करत नाही?
सहमत. भाजपामध्ये राम जेठमलानींसारखे तज्ज्ञ वकील आहेत. एवढे ठोस पुरावे ढळढळीतपणे समोर असताना सरकारविरोधात खटला भरणे या मोठ्या संघटनांना सहजशक्य आहे.

In reply to by आजानुकर्ण

"भाजपामध्ये राम जेठमलानींसारखे तज्ज्ञ वकील आहेत. एवढे ठोस पुरावे ढळढळीतपणे समोर असताना सरकारविरोधात खटला भरणे या मोठ्या संघटनांना सहजशक्य आहे."
राम जेठमलानींसारखे वकील या डांबून ठेवलेल्यांच्या बाजूने का उभे रहात नसावेत याची माझ्या मते खालील कारणे असावीत. (१) राम जेठमलानी व्यावसायिक वकील आहेत. ते फुकट खटला लढणार नाहीत. त्यांची एका दिवसाची फी ४-५ लाख रूपये असावी. पुरोहित, प्रज्ञासिंग इ. मंडळी इतकी मोठी फी देणे शक्य वाटत नाही. (२) राम जेठमलानी जरी भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार झाले असले तरी त्यांचा व भाजपचा सुतराम संबंध नाही. गुजरात दंगलीसंदर्भात त्यांनी काही भाजप नेत्यांचे वकीलपत्र घेतल्याने त्याची परतफेड म्हणून मोदींच्या आग्रहाने भाजप त्यांना राज्यसभेत पाठविते. (३) या खटल्यापासून भाजपने सुरवातीपासूनच स्वतःला लांब ठेवले आहे. जर जेटली, रविशंकर प्रसाद इ. ख्यातनाम वकिलांनी या आरोपींचे वकीलपत्र घेतले तर "हिंदू" अतिरेक्यांना ते मदत करत आहेत व त्यांचे या तथाकथित "हिंदू" अतिरेक्यांशी संबंध आहेत असा भाजपवर आरोप होईल या भीतिने भाजप यापासून लांब आहे. यदाकदाचित या आरोपींवरील आरोप सिद्ध झाले तर त्यांच्याशी संबंध असल्याचे आरोप होऊ नये म्हणून भाजप याविरूद्ध अजिबात बोलताना दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

१. राम जेठमलानी व्यावसायिक वकील आहेत व ते फुकट खटला लढवणार नाही इतपत तुमचा प्रतिसाद खरा आहे. २. राम जेठमलानी यांचा भाजपशी सुतराम संबंध नाही हे पूर्णपणे खोटे आहे. गेले किमान ४० वर्षे ते भारतीय जनता पक्ष-जनसंघ-शिवसेना व इतर हिंदुत्त्ववादी पक्षांशी संबंधित आहेत. या दुव्यावर त्यांची थोडी माहिती मिळेल. थोडक्यात सारांश म्हणजे १९७१ साली जनसंघ-शिवसेनेच्या पाठिंब्यावर उल्हासनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. अटलबिहारी वाजपेयींच्या दोन्ही मंत्रीमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद होते. आता भाजपातर्फे ते राज्यसभेचे सदस्य आहेत. ३. पुरोहित आणि प्रज्ञासिंग हे संघाशी-व पर्यायाने भाजपाशी संबंधित आहेत आणि ते निरपराध आहेत हा तुमचा दावा आहे. तुम्ही दिलेली माहिती तुम्हाला निश्चितच विश्वासार्ह स्रोतांकडून मिळाली असणार. त्यांच्याकडे आवश्यक ते पुरावेही असणार. पुरोहित व प्रज्ञासिंग यांच्यावर असलेले आरोप हे त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या गुन्ह्यासाठी नसून ते ज्या स्वरुपाचा आदर्शवाद जोपासतात त्याच्या समर्थनासाठी केलेल्या कृत्याबाबत किंवा संघटनेच्या ध्येयासाठी केलेल्या गोष्टीबाबत आहेत. वृत्तपत्रातील बातम्यांवरुन माझा असा समज आहे की अशी राजकीय स्वरुपाची कृत्ये करणाऱ्यांची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी ती संघटना घेते. राजकीय पक्षांकडे व संघटनांकडे अशा स्वरुपाच्या मदतीसाठी पैसे असतात व त्यांचे सेपरेट लीगल सेल्स असतात. उदा. मनसेने केलेल्या तोडफोडीत काही तरुणांना पकडल्यानंतर मनसेच्या वकीलांनी त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले असे मी वाचले होते. आता जर हे लोक 'हिंदू अतिरेकी नाहीत' इतकी स्पष्ट खात्री हिंदुत्त्ववादी संघटनांना आहे तर हिंदू अतिरेक्यांशी संबंध आहेत या (बहुदा काँग्रेस व इतर हिरव्या दाढ्या कुरवाळणाऱ्य़ा पक्षांकडून) होणाऱ्या आरोपांची तमा बाळगण्याचे भाजपाला काय कारण आहे. भाजपाने स्वतःला सुरुवातीपासून लांब ठेवूनही देशाचा गृहमंत्री हिंदू अतिरेक्यांशी भाजपाचा संबंध लावतोच की. 'की येथे धूर येतो म्हणजे आग असणारच' स्वरुपाची सावधगिरी भाजपा बाळगत आहे?

In reply to by आजानुकर्ण

पुरोहित आणि प्रज्ञासिंग हे संघाशी-व पर्यायाने भाजपाशी संबंधित आहेत आणि ते निरपराध आहेत हा तुमचा दावा आहे. तुमचे वरील वाक्य वाचल्याने मी श्रीगुरूजींचा हा प्रतिसाद परत वाचला. त्यांना काय म्हणायचे आहे, ते, ते स्वतः सांगतील अशी आशा करूया. पण तुम्ही लावलेला अर्थ (...संघाशी-व पर्यायाने भाजपाशी संबंधित आहेत...) मला कुठेच दिसला नाही. किंबहूना तसे कोणी आरोपदेखील करू नयेत म्हणून भाजपा लांब आहे असे त्यांनी म्हणल्याचे दिसते. हिंदू अतिरेक्यांशी संबंध आहेत या (बहुदा काँग्रेस व इतर हिरव्या दाढ्या कुरवाळणाऱ्य़ा पक्षांकडून) होणाऱ्या आरोपांची तमा बाळगण्याचे भाजपाला काय कारण आहे. परत, भाजप काय आणि का करते हे त्यांचे मुद्दे झाले, मला त्याची कल्पना नाही. फक्त कॉमनसेन्सने इतकेच वाटते, जर त्यावर भाजपाने प्रतिक्रीया दिली नाही (पक्षी: तमा बाळगली नाही) तर त्याचा अर्थ काय लावला जाईल हे कोणत्याही शहाण्या व्यक्तीस/संघटनेस समजेल. शिवाय नंतरच्या काळात इंटरनेट-विचारवंत असल्या संशोधनातून अजून काय काय लोकांच्या डोक्यात भरवतील हा मुद्दा वेगळाच.

In reply to by विकास

साध्वी प्रज्ञासिंग यांची पार््श्वभूमी ही संपूर्णपणे संघाशी संबंधित आहे. त्यांनी बजरंग दल, अभाविप, दुर्गा वाहिनी, हिंदू जागरण मंच वगैरेंसाठी काम केले आहे. अधिक माहिती येथे पाहा. http://en.wikipedia.org/wiki/Pragya_Singh_Thakur#Political_career या सर्व संघटना म्हणजे व्यापक अर्थाने संघच आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे पैत्ृकही संघच आहे. त्या अर्थाने साध्वींचा संबंध भाजपाशी येतो. आता एवढे करुनसवरुनही वेगळे राहण्याची संघ आणि भाजपाची इच्छा असेल तर ते अपेक्षितच आहे. आपल्या परिवारातील संघटनांनी केलेल्या कृत्यांची जबाबदारी घेण्याबाबत संघ कधीच प्रसिद्ध नव्हता. असे आरोपदेखील करु नये म्हणून भाजपा लांब आहे म्हणजे काय? दंगली घडवण्याचे आरोप असलेले कटियार प्रभूती भाजपाचे खासदार आहेत.दंगली घडवण्याचे आरोप होऊन शिक्षा झालेले काही मंत्री मोदींच्या मंत्रीमंडळात होते. शिवाय असे अनेक साधू महंत भाजपाच्या व्यासपीठावर वावरतात त्यामुळे या स्वरुपाच्या हिंदुत्त्ववाद्याबाबत बाकी काय म्हणतील अशी काळजी करण्याची भाजपाची वृत्ती नाही. मग हे लांब असण्याचे कारण प्रज्ञासिंग व पुरोहित हे केवळ हिंदुत्त्ववादी नसून दहशतवादी आहेत हेच आहे की काय? असा प्र्श्न मला पडला आहे.

In reply to by आजानुकर्ण

साध्वी प्रज्ञासिंग यांची पार््श्वभूमी ही संपूर्णपणे संघाशी संबंधित आहे. काय बोंब आहे, अर्धे संघ विरोधक, संघ बायकांना का घेत नाही म्हणून टिकास्त्र सोडतात तर उरलेले साध्वी प्रज्ञासिंह सारख्या महीलांचा संघाशी कसा संबंध आहे हे ठासून सांगतात! शिंदे प्रकरणानंतर आयबीएन वर राम माधव म्हणले तेच खरे वाटते: The RSS is a whipping boy. :-) तरी बरं, आता (तुमच्या वरच्या प्रतिसादात) पुरोहीतांचे नाव आले नाही. बाकी तुम्ही म्हणता तो संबंध हा "गिल्ट बाय असोसिएशन" कॅटेगरीत येतो. मग हे लांब असण्याचे कारण प्रज्ञासिंग व पुरोहित हे केवळ हिंदुत्त्ववादी नसून दहशतवादी आहेत हेच आहे की काय? त्याचे उत्तर वास्तवीक पोलीस आणि गृहखात्याकडे (आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व गुप्तचर/कायदा सुव्यवस्था यंत्रणांकडे) असायला हवे. इतकी वर्षे सर्व शोध घेतला. अजून ना धड खटला भरला आहे ना त्या आरोपींना जामिन देऊ केला आहे. पण आधी म्हणल्याप्रमाणे तथाकथीत मानवी हक्कवाले , स्त्रीमुक्तीवाले आता गप्प आहेत. :(

In reply to by विकास

मला वाटले इथे रंगीत दहशतवादापुरती चर्चा चालू आहे. संघ बायकांना पुरेसे प्रतिनिधित्त्व देत नाही हे जगजाहीर आहे. साध्वीबाई या परिवारातील संघटनांमध््ये होत्या. संघाच्या परंपरेनुसार त्यांना संघात स्थान नाही. आता सरकारने खटला का भरला नाही हे मी सांगू शकत नाही. ज्यांना कोणाला साध्वी किंवा पुरोहित यांच्या निरपराधीपणाची खात्री आहे ते न्यायालयाकडे दाद मागू शकतात, की सरकारने तिथेही बंदी घातली आहे?

In reply to by आजानुकर्ण

बहुदा मोका लावल्यावर तसे अपील करता येत नसावे. बाकी, या प्रकरणांबद्दल या अंगाने (श्रीगुरूजींच्या मुळ प्रतिसादत दिलेली) माहिती नव्हती या वर व्यक्त झालेल्या प्रतिक्रीयांशी सहमत

In reply to by आजानुकर्ण

"साध्वी प्रज्ञासिंग यांची पार््श्वभूमी ही संपूर्णपणे संघाशी संबंधित आहे. त्यांनी बजरंग दल, अभाविप, दुर्गा वाहिनी, हिंदू जागरण मंच वगैरेंसाठी काम केले आहे. अधिक माहिती येथे पाहा. http://en.wikipedia.org/wiki/Pragya_Singh_Thakur#Political_career" वरील लिंक विकिपिडियातील आहे. या पानावर सुरवातीलाच "The neutrality of this article is disputed." असे लिहिले आहे. विकीपिडियावर कोणीही माहिती टाकू शकतो. त्यामुळे ती माहिती अधिकृत असेलच असे नाही. त्यामुळे विकीपिडियावरील माहिती हा विश्वासार्ह स्त्रोत मानला जात नाही. याच लेखात पुढे "On 19 January 2009, Maharashtra Police filed a 4000 page charge sheet for the Malegaon Blast." व "ChargeSheet not filed, yet no bail" अशी दोन परिस्परविरोधी वाक्ये आहेत. माध्यमात छापून येत असलेल्या बातम्यानुसार या खटल्यात अजूनही आरोपपत्र दाखल केले गेले नाही व त्यामुळे खटला सुरूच झालेला नाही. विकीपिडीयातील माहिती खरी मानायची का नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या प्रतिसादात मी साध्वी प्रज्ञासिंग ही रा. स्व. संघाशी संबंधित आहे का नाही यावर लिहिले नसून, तिला व इतरांना गेले ५१ महिने आरोपपत्र दाखल न करता व जामीन न देता डांबून ठेवले आहे व त्यांच्याविरूद्ध पुरावे तयार करण्यासाठी ४-४ वेला नार्को चाचणी करणे, पुरोहितने लष्कराचे ६ टन आरडीक्स लंपास करून बॉम्बस्फोटात वापरणे, असीमानंदला तुरूंगात त्याच्या सेवेसाठी दुसरा कैदी अधिकृतपणे सेवेकरी म्हणून नेमणे इ. हास्यास्पद गोष्टी करणे याबद्दल आहे. एवढे आकाशपाताळ एक करूनसुद्धा गेल्या ४-५ वर्षात आरोपपत्र दाखल करण्याइतका पुरावा सरकारला तयार करता आलेला नाही असे दिसून येत आहे. त्याचबरोबर याच गुन्ह्याखाली आरोप ठेवलेल्या दुसर्‍या ९-१० स्थानिक मुस्लिमांविरूद्ध अजूनही आरोप काढून घेण्यात आलेले नाहीत. या सर्व गोष्टींवरून नक्की सत्य काय आहे हा निष्कर्ष नक्कीच काढता येतो. माजी सनदी अधिकारी बी रामन यांनी मी लिंक दिलेल्या लेखात खालील वाक्यांतून तेच सुचित केले आहे. पुरोहित, प्रज्ञासिंग यांना अटक करून डांबून ठेवण्यामागे भाजपला झोडपणे हाच मुख्य हेतू आहे हे यातून दिसून येते. Investigation into these cases has since been taken over by the National Investigation Agency (NIA) formed by the Union Ministry of Home Affairs in 2009 when Mr P. Chidambaram was the Home Minister. Despite all its resources, the NIA has not so far been able to come out with a comprehensive conclusion on the alleged involvement of some Hindu extremists in acts of reprisal against Muslims. There has been no sense of urgency in the MHA in having the investigation completed and the suspects prosecuted. One has a strong suspicion that the NIA is sought to be used not for the investigation and prosecution, but for politically needling the BJP and the RSS by periodically levelling allegations against them. This partisan exploitation of the investigation for political purposes is likely to continue till the 2014 elections. Mr Shinde’s statement is part of this partisan exercise. "दंगली घडवण्याचे आरोप असलेले कटियार प्रभूती भाजपाचे खासदार आहेत.दंगली घडवण्याचे आरोप होऊन शिक्षा झालेले काही मंत्री मोदींच्या मंत्रीमंडळात होते. शिवाय असे अनेक साधू महंत भाजपाच्या व्यासपीठावर वावरतात त्यामुळे या स्वरुपाच्या हिंदुत्त्ववाद्याबाबत बाकी काय म्हणतील अशी काळजी करण्याची भाजपाची वृत्ती नाही. मग हे लांब असण्याचे कारण प्रज्ञासिंग व पुरोहित हे केवळ हिंदुत्त्ववादी नसून दहशतवादी आहेत हेच आहे की काय? असा प्र्श्न मला पडला आहे. " विनय कटियारांवर बाबरी मशीद पाडण्याच्या कारस्थानात सहभागी असल्याचे आरोप आहेत. दंगलीचे नाहीत. अडवाणी, उमा भारती, बाळ ठाकरे, मुरली मनोहर जोशी इ. अनेक जणांवर याच कारस्थानात सहभागी असल्याचे आरोप आहेत. त्यांच्यावर दंगल केल्याचे आरोप नाहीत. दंगली घडविण्याचे आरोप असलेले अनेक मंत्री अनेक मंत्रीमंडळात आहेत्/होते. १९८४ च्या शिखांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी हरकिशनलाल भगत, ललित माखन, सज्जनकुमार धरमदास शास्त्री हे राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात होते. कमलनाथ अजूनही केंद्रीय मंत्रीमंडळात आहे. जगदिश टायटलर २००५ पर्यंत मंत्रीमंडळात होता. अखिलेश यादवच्या मंत्रीमंडळात दंगलीचे आरोप असलेले मंत्री आहेत. त्यामुळे याबाबतीत भाजप एकटा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

वादापुरते साध्वीबाई संघात नाहीत हे मान्य केले तरी सरकारदरबारी तुमच्या मते जो अन्याय होतो आहे तो दूर करण्यासाठी मिपावर अकांडतांडव करण्यापेक्षा न्यायालयात पाठपुरावा करणे योग्य नाही का? जर साध्वी आणि पुरोहित संघाशी किंवा भाजपाशी संबंधित नसतील तर भाजपाला झोडण्यासाठी त्यांचा कसा काय वापर होऊ शकतो? मी निदान विकीपीडियावरील दुवे दिले ते तुम्हाला विश्वासार्ह वाटत नाहीत. मात्र तुमचे अनेक मुद्दे उदा. मुसलमानांना लगेच सोडून दिले वगैरे हे सिरकध करणारे काही तरी पुरावे द्या

In reply to by आजानुकर्ण

"जर साध्वी आणि पुरोहित संघाशी किंवा भाजपाशी संबंधित नसतील तर भाजपाला झोडण्यासाठी त्यांचा कसा काय वापर होऊ शकतो? " त्याचे कारण असे की अशा माध्यमे अशा कोणत्याही कृत्याचा लगेच संघाशी संबंध जोडतात. १-२ वर्षांपूर्वी मंगलोरमध्ये "श्रीराम सेने" या स्थानिक संघटनेने पबमध्ये महिलांना मारहाण केली होती. पण लगेच "श्रीराम" या नावावरून हे कृत्य संघपरिवाराचे आहे असा निष्कर्ष काढून माध्यमे मोकळी झाली. याही प्रकरणात अगदी तसेच होत आहे. "मी निदान विकीपीडियावरील दुवे दिले ते तुम्हाला विश्वासार्ह वाटत नाहीत. मात्र तुमचे अनेक मुद्दे उदा. मुसलमानांना लगेच सोडून दिले वगैरे हे सिरकध करणारे काही तरी पुरावे द्या" मुसलमानांना लगेच सोडले नव्हते. पुरोहित व इतरांना अटक करण्याआधी ९-१० स्थानिक मुस्लिमांना त्याच प्रकरणावरून पकडून मोक्काखाली अटकेत ठेवले होते. २०११ मध्ये त्यांच्यावरील मोक्का हटविण्यात आला व नंतर लगेचच म्हणजे अंदाजे दीड वर्षांपूर्वी त्यांना जामीन देण्यात आला. म्हणजे ते अंदाजे ३ वर्षे तुरूंगात होते. पण अजूनही त्यांच्यावरील आरोप हटविण्यात आले नाहीत. त्यांना जामिनावर सोडल्यावर आर आर पाटलांनी त्यांना ५ लाख रू. नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. म्हणजे या प्रकरणात पुरोहित व इतर ९ जण आरोपी आहेत आणि हे ९-१० मुस्लिम पण आरोपी आहेत. याबद्दलच्या लिन्क्स मी शोधून टाकतो.

In reply to by श्रीगुरुजी

पण लगेच "श्रीराम" या नावावरून हे कृत्य संघपरिवाराचे आहे असा निष्कर्ष काढून माध्यमे मोकळी झाली
श्रीराम सेनेचा संबंध संघपरिवाराशी लावण्याचे कारण श्रीराम हे निश्चितच नसावे. उद्या डॉ. लागूंचाही संबंध संघपरिवाराशी लागेल. :) ंंंश्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक हे पूर्णवेळ संघाचे कार्यकर्ते व बजरंग दलाचे कर्नाटक प्रांताचे समन्वयक होते असे दिसते. http://www.ndtv.com/convergence/ndtv/story.aspx?id=NEWEN20090081485

In reply to by आजानुकर्ण

मुतालिक हा रा.स्व. संघाशी कधीही संबंधित नव्हता हे रा. स्व. संघाने या पूर्वीच सांगितले आहे. तो भाजपशीही संबंधित नव्हता हे भाजपने देखील सांगितले आहे. त्याची स्वतःची एक वेगळीच संघटना आहे जिचा भाजप/संघाशी अजिबात संबंध नाही.

In reply to by श्रीगुरुजी

काँग्रेसवाले म्हणतात ना "संबंध आहे"? मग असणारच संबंध. काँग्रेसवाले म्हणतात ते सगळं खरंच असतं. आता तो शिंदे नाही का बरळला "संघ दहशतवादी तयार करतो". आता करतो म्हणजे करतो विषय संपला. अहो शेवटी त्यांचं सरकार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

याबद्दलच्या लिन्क्स मी शोधून टाकतो.
सोलापुरात सापडलेले गावठी बाँम्ब, पकडलेले व सोडून दिलेले ९ मुसलमान, असीमानंद, भारतीय लष्कराचे पुरोहितबाबत स्पष्टीकरण, आंध्रचे राज्यपाल असताना सुशीलकुमारांनी दिलेली शिक्षामाफी व न्यायालयाने ओढलेले ताशेरे वगैरे वगैरे च्या लिंक्स तुम्ही शोधत आहात. विसरुन जाल म्हणून आठवण करुन देत आहे.

In reply to by आजानुकर्ण


In reply to by आजानुकर्ण

"२. राम जेठमलानी यांचा भाजपशी सुतराम संबंध नाही हे पूर्णपणे खोटे आहे. गेले किमान ४० वर्षे ते भारतीय जनता पक्ष-जनसंघ-शिवसेना व इतर हिंदुत्त्ववादी पक्षांशी संबंधित आहेत. या दुव्यावर त्यांची थोडी माहिती मिळेल. थोडक्यात सारांश म्हणजे १९७१ साली जनसंघ-शिवसेनेच्या पाठिंब्यावर उल्हासनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. अटलबिहारी वाजपेयींच्या दोन्ही मंत्रीमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद होते. आता भाजपातर्फे ते राज्यसभेचे सदस्य आहेत." राम जेठमलानींचा भाजपशी संबंध नाही असे मी लिहिले तेव्हा त्यांचा भाजपच्या विचारसरणीशी संबंध नाही असे लिहायला हवे होते. जरी ते भाजपच्या तिकिटावर खासदार झाले असले तरी भाजपच्या/संघाच्या विचारसरणीशी त्यांचा संबंध दिसत नाही. अनेक उद्योगपती/पत्रकार जरी कोणत्याही पक्षाशी संबंधित नसले तरी कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडून येतात. मुकेश पटेल, राजकुमार धूत, राहुल बजाज, प्रितीश नंदी व आणि जेठमलानी सुद्धा पूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर राज्यसभेत गेले होते. म्हणजे ते शिवसेनेच्या विचारसरणीशी बांधील आहेत असा अर्थ होतो का? पूर्वी विजय मल्ल्यासुद्धा भाजप व काँग्रेसच्या एकत्रित पाठिंब्यावर खासदार झाला होता. म्हणजे तो दोन्ही पक्षांशी संबंधित होता का? जेठमलानी व भाजपचा संबंध केवळ राज्यसभेवर जाण्यापुरताच मर्यादित आहे. "पुरोहित व प्रज्ञासिंग यांच्यावर असलेले आरोप हे त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या गुन्ह्यासाठी नसून ते ज्या स्वरुपाचा आदर्शवाद जोपासतात त्याच्या समर्थनासाठी केलेल्या कृत्याबाबत किंवा संघटनेच्या ध्येयासाठी केलेल्या गोष्टीबाबत आहेत. वृत्तपत्रातील बातम्यांवरुन माझा असा समज आहे की अशी राजकीय स्वरुपाची कृत्ये करणाऱ्यांची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी ती संघटना घेते. राजकीय पक्षांकडे व संघटनांकडे अशा स्वरुपाच्या मदतीसाठी पैसे असतात व त्यांचे सेपरेट लीगल सेल्स असतात. उदा. मनसेने केलेल्या तोडफोडीत काही तरुणांना पकडल्यानंतर मनसेच्या वकीलांनी त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले असे मी वाचले होते." मनसेच्या आदेशानुसारच मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्यामुळे त्यांना मनसेचे वकील मदत करणारच. पुरोहित व प्रज्ञासिंगला बॉम्बस्फोट करा असे कोणत्या संघटनेने सांगितले होते का? त्यांनी मुळात हे कृत्य केले होते का हीच शंका आहे. त्यांनी खरेच हे कृत्य केले होते हे जर भविष्यात सिद्ध झाले तर आपल्यावर दोषारोप येउ नये यासाठी भाजप यापासून दूर रहात असावा.

In reply to by श्रीगुरुजी

अहो जेठमलानी हे केवळ राज्यसभेपुरते भाजपाशी संबंधित नसून, भाजपाच्या दोन्ही - अगदी तेरा दिवसांच्या - सरकारमध्येही कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्याइतके महत्त्वाचे नेते आहेत. १९७१ पासून जनसंघाचा त्यांना पाठिंबा आहे. दोन सरकारात ते मंत्री आहेत. मात्र त्यांचा विचारसरणीशी संबंध नाही. असे असेल तर ही सर्व मेहेरबानी भाजपाने का केली हा एक प्रश्न पडतो.
त्यांनी मुळात हे कृत्य केले होते का हीच शंका आहे. त्यांनी खरेच हे कृत्य केले होते हे जर भविष्यात सिद्ध झाले तर आपल्यावर दोषारोप येउ नये यासाठी भाजप यापासून दूर रहात असावा.
अगदी मागील प्रतिसादापर्यंत तुम्हाला साध्वी आणि पुरोहित यांच्या निरपराधीपणाची खात्री होती. ती आता शंकेत परिवर्तित झाली आहे. शिवाय आरोप भविष्यात सिद्ध होण्याची शक्यताही येथे दिसते. चर्चेत आता थोडी प्रगती वाटते.

In reply to by आजानुकर्ण

"अगदी मागील प्रतिसादापर्यंत तुम्हाला साध्वी आणि पुरोहित यांच्या निरपराधीपणाची खात्री होती. ती आता शंकेत परिवर्तित झाली आहे. शिवाय आरोप भविष्यात सिद्ध होण्याची शक्यताही येथे दिसते. चर्चेत आता थोडी प्रगती वाटते. " ते निरपराध असल्याची मला या क्षणापर्यंत खात्री आहे. त्यांच्याबद्दल मला शंका कधीच नव्हती. मी ३-४ प्रतिसादांपूर्वीच्या एका प्रतिसादात खालील वाक्ये लिहिली होती. ती पुन्हा एकदा वाचा. भाजप उघडपणे त्यांच्या बाजूने का जात नाही याविषयी मी माझे मत लिहिले होते. "(३) या खटल्यापासून भाजपने सुरवातीपासूनच स्वतःला लांब ठेवले आहे. जर जेटली, रविशंकर प्रसाद इ. ख्यातनाम वकिलांनी या आरोपींचे वकीलपत्र घेतले तर "हिंदू" अतिरेक्यांना ते मदत करत आहेत व त्यांचे या तथाकथित "हिंदू" अतिरेक्यांशी संबंध आहेत असा भाजपवर आरोप होईल या भीतिने भाजप यापासून लांब आहे. यदाकदाचित या आरोपींवरील आरोप सिद्ध झाले तर त्यांच्याशी संबंध असल्याचे आरोप होऊ नये म्हणून भाजप याविरूद्ध अजिबात बोलताना दिसत नाही."

In reply to by श्रीगुरुजी

यदाकदाचित आरोप कसे काय सिद्ध होतील ? उलट असा खटला लढवला तर दाढ्या कुरवाळण्याचे आरोप सिद्धही होतील आणि पक्ष आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही असा संदेशही कार्यकर्त्यांमध्ये जाईल. खटला लढवताना वकील हा केवळ अशीलाचा प्रतिनिधी असतो. अगदी कसाबलाही प्रतिनिधित्व मिळाले होते. तसे करणाऱ्या वकीलावर कोणी अतिरेक्यांशी संबंधित असा आरोप केला नाही.

In reply to by आजानुकर्ण

"यदाकदाचित आरोप कसे काय सिद्ध होतील ? उलट असा खटला लढवला तर दाढ्या कुरवाळण्याचे आरोप सिद्धही होतील आणि पक्ष आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही असा संदेशही कार्यकर्त्यांमध्ये जाईल. खटला लढवताना वकील हा केवळ अशीलाचा प्रतिनिधी असतो. अगदी कसाबलाही प्रतिनिधित्व मिळाले होते. तसे करणाऱ्या वकीलावर कोणी अतिरेक्यांशी संबंधित असा आरोप केला नाही." हे भाजपचे कार्यकर्ते आहेत हे कोणी सांगितले तुम्हाला? भाजप पुरोहित व इतरांना का उघड पाठिंबा देत नसावा याविषयी मी माझा अंदाज सांगितला. प्रत्यक्षात यामागे त्यांचे काय तर्कशास्र आहे हे फक्त भाजपाच सांगू शकतो.

In reply to by श्रीगुरुजी

>>या खटल्यापासून भाजपने सुरवातीपासूनच स्वतःला लांब ठेवले आहे. जर जेटली, रविशंकर प्रसाद इ. ख्यातनाम वकिलांनी या आरोपींचे वकीलपत्र घेतले तर "हिंदू" अतिरेक्यांना ते मदत करत आहेत व त्यांचे या तथाकथित "हिंदू" अतिरेक्यांशी संबंध आहेत असा भाजपवर आरोप होईल या भीतिने भाजप यापासून लांब आहे. मला एकदम इतिहासच आठवला. कुठे आपल्या आदर्शांशी सुसंगत कृत्ये करणार्‍यांना वाचवण्यापासून हात झटकून नामानिराळे होण्याची जेटली वगैरेंची धावपळ आणि कुठे आपल्या आदर्शांशी विरुद्ध असूनही देशहितासाठी लढणार्‍या आझाद हिंद सेनेची वकीलपत्रे घेणारे काँग्रेसी कुठे.

In reply to by नितिन थत्ते

आपल्या आदर्शांशी विरुद्ध असूनही देशहितासाठी लढणार्‍या आझाद हिंद सेनेची वकीलपत्रे घेणारे काँग्रेसी कुठे.
काँग्रेसी आता करतील काय तसे.तेव्हा मतांची फिकीर नव्हती, आता आहे म्हणुन कुणीही चार हात काय दोन गाव सोडुन लांब राहील.

In reply to by नितिन थत्ते

"कुठे आपल्या आदर्शांशी सुसंगत कृत्ये करणार्‍यांना वाचवण्यापासून हात झटकून नामानिराळे होण्याची जेटली वगैरेंची धावपळ " भाजपचे आदर्श बॉम्बस्फोट करावेत असे आहेत का? "कुठे आपल्या आदर्शांशी विरुद्ध असूनही देशहितासाठी लढणार्‍या आझाद हिंद सेनेची वकीलपत्रे घेणारे काँग्रेसी कुठे." अतिशय विनोदी वाक्य. कपिल सिब्बल ने १९९३ मध्ये भ्र्ष्टाचाराचे आरोप असलेल्या न्या. रंगास्वामीचे वकीलपत्र घेऊन त्याला वाचविले होते. सिब्बलनेच २००१-०२ मध्ये स्मगलिंग, बलात्कार व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या चर्चिल आलेमावचे वकीलपत्र घेऊन त्याला वाचविले होते. अर्थात भ्रष्टाचार व गुन्हेगारी हे काँग्रेसच्या आदर्शांशी सुसंगत असल्याने सिब्बलने त्यांचे वकीलपत्र घेणे यात आश्चर्य काहीच नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अहो भाजपाचे माजी मंत्री आणि राज्यसभा खासदार जेठमलानी जसे व्यावसायिक वकील आहेत तसेच कपिल सिब्बलही. उडदामाजी काळे गोरे.

In reply to by आजानुकर्ण

संसद हल्ल्यातील आरोपीच न्व्हे तर गुन्हेगार म्हणून शाबित झालेल्या अफझल गुरु ह्याचे वकीलपत्र राम जेठमलानी ह्यांनी घेतल्याचे स्मरते. बाकी चालु द्या.

In reply to by मन१

शिवाय जेठमलानीच्या आणखी काही केसेस विकीपीडियावर मिळाल्या त्या खालीलप्रमाणे. असो हा प्रोफेशनल मामला आहे. मात्र श्रीगुरुजींना जेठमलानींचा संघ किंवा भाजपाशी काही संबंध नाही असे वाटते. कपिल सिब्बलने घेतलेल्या केसवरुन काँग्रेसच्या चारित्र्यावर आरोप करणे आणि जेठमलानींपासून नामानिराळे राहणे मात्र रोचक आहे. पुढच्या निवडणुकीत समजा मोदी पंतप्रधान झाले तर भाजपाशी संबंध नसूनही जेठमलानी अगदी २०० टक्के मंत्री होतील. Defence of Rajiv Gandhi's killers in Madras High Court in year 2011. Defence of Indira Gandhi's killers Harshad Mehta's defence in stock market scam Ketan Parekh's defence in stock market scam Underworld don Haji Mastan Defended death sentence of Afzal Guru L K Advani's defence in Hawala Scam Manu Sharma's defence in Jessica Lall murder case Amit Shah's (Gujarat's former Minister of State for Home) defence in Sohrabuddin fake encounter case. Amit Jogi's defence (son of Ajit Jogi) in the case of Ramavatar Jaggi murder case. Kanimozhi's defence in Spectrum 2G case Y. S. Jaganmohan Reddy's special leave petition on stay for CBI probe on money laundering in his companies. Yeddyurappa's case on illegal mining scam[22] A. G. Perarivalan, T Suthendraraja alias Santhan and Sriharan alias Murugan - convicted in the Rajiv Gandhi assassination case. Ramdev's defence on use of force on the followers of Baba Ramdev at Ramlila gounds on June 4, 2011[23] Shiv Sena's defense in CPI MLA Krishna Desai murder case.

In reply to by आजानुकर्ण

मी सुरवातीपासून हेच सांगायचा प्रयत्न करीत आहे, पण तुमच्या ते लक्षात आलेले दिसत नाही. जेठमलानी हे जरी भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभेत असले आणि २००१ पर्यंत जरी ते वाजपेयींच्या मंत्रीमंडळात असले तरी ते आचरणाने, विचारसरणीने किंवा रूढार्थाने भाजप/संघ विचारांचे नाहीत. ते अतिशय कुशल व्यावसायिक वकील आहेत व आपली फी देणार्‍या कोणाचेही वकीलपत्र ते घेतात. त्यांना आपला पक्षकार हा कोणत्या पक्षाचा आहे किंवा तो गुन्हेगार्/अतिरेकी आहे याच्याशी देणेघेणे नाही. भाजप ते आपल्याला सोयिस्कर पडतात्/पडतील या विचाराने त्यांना खासदार करत असावा कारण गुजरात दंगलीतल्या काही जणांचे वकीलपत्र त्यांच्याकडे आहे. २००४ मध्ये त्यांनी वाजपेयींविरूद्ध लखनौतून अर्ज भरला होता पण तो आयत्यावेळी मागे घेतला. अधिकृत रित्या भाजपात असून सुद्धा त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवले आहे व भाजप्/संघ विचारांशी त्यांची कोणतीही बांधिलकी नाही. त्यांनी वकीलपत्र घेतलेला अजून एक म्हणजे चित्रपट अभिनेता संजय दत्त. ते जितक्या उघडपणे गुन्हेगारांची किंवा कोणाचीही वकीलपत्रे घेतात तितक्या उघडपणे भाजपातले इतर प्रसिद्ध वकील (रवि प्रसाद शंकर, अरूण जेटली इ.) अशी वकीलपत्रे पक्षशिस्तीमुळे घेऊ शकणार नाहीत. पण जेठमलानी घेतात कारण जरी अधिक्रुतरित्या ते भाजपचे असले तरी भाजप/संघाची विचारसरणी ते कधीही पाळत नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

ठीक आहे. म्हणजे तीसएक वर्षे पक्षाने पाठिंबा दिलेली व्यक्ती, जी २ वेळा कॅबिनेट मिनिस्टरही झाली आहे तिचा पक्षविचारांशी काहीही संबंध नाही. असे असूनही त्या पक्षाला, त्या व्यक्तीला मंत्रीपद व संसदेचे सदस्यपद सतत द्यावेसे वाटते हे एकंदरच मला न समजणारे गौडबंगाल आहे. मात्र हा भाजपचा निर्णय असल्याने तुम्हाला कदाचित काहीही माहीत नसेल. मात्र,
कपिल सिब्बल ने १९९३ मध्ये भ्र्ष्टाचाराचे आरोप असलेल्या न्या. रंगास्वामीचे वकीलपत्र घेऊन त्याला वाचविले होते. सिब्बलनेच २००१-०२ मध्ये स्मगलिंग, बलात्कार व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या चर्चिल आलेमावचे वकीलपत्र घेऊन त्याला वाचविले होते. अर्थात भ्रष्टाचार व गुन्हेगारी हे काँग्रेसच्या आदर्शांशी सुसंगत असल्याने सिब्बलने त्यांचे वकीलपत्र घेणे यात आश्चर्य काहीच नाही.
कपिल सिब्बल हे देखील व्यावसायिक वकील आहेत. त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांची वकीलपत्रे घेतली तर काँग्रेसच्या चारित्र्याचे विश्लेषण तुम्हाला करावेसे वाटते यामागचे कारण तुम्ही सांगू शकाल काय? की हा केवळ 'आपला तो बाब्या' प्रकारचा न्याय आहे?

In reply to by चिंतामणी

उदयनराजे अर्थातच माहीत आहेत. त्यांचा राष्ट्रवादीच्या धोरणांशी काही संबंध नसावा. काही वर्षापूर्वी ते भाजपामध्ये होते. भाजपाने त्यांना मंत्रीही केले होते. उदयनराजे एकाच पक्षात थांबलेले नाहीत. मात्र सिब्बल हे वर्षानुवर्षे भाजपाशी संबंधित आहेत मात्र तरीही त्यांचा भाजपाच्या विचारांशी किंवा धोरणांशी संबंध नाही.

In reply to by चिंतामणी

उदयन भोसले अपक्ष म्हणून किंवा कोणत्याही पक्षातून निवडून येऊ शकतो. उद्या तो जमाते-इस्लामी, अकाली दल, मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस अशा पक्षाच्या तिकिटावर उभा राहिला तरी प्रचंड बहुमताने निवडून येईल. त्याला कोणत्याही पक्षाची गरज नाही. उलट इतर पक्षांनाच त्याची गरज आहे. त्यामुळे तो भाजपात असताना भाजप नेतृत्वाला काडीचीही किंमत देत नव्हता आणि सध्या अधिकृतरित्या तो राष्ट्रवादीत असला तरी राष्ट्रवादीच्या कोणाचीही पत्रास ठेवत नाही. राष्ट्रवादी पक्षासंदर्भात विचारले गेल्यावर, "पक्ष गेला खड्ड्यात" असे त्याचे जाहीर उद्गार दूरदर्शनवर पाहिले असतीलच. पण एकंदरीत त्याची आजवरची वाटचाल पाहता तो राष्ट्रवादी संस्कृतीतलाच वाटतो हे मात्र नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

व्यावसाईकतेच्या नावाखाली राष्ट्राद्रोह्यांच्या केस लढवणार्या जेठमलानी यांचा उल्लेख आदरयुक्त करता आणि छत्रपति उदयनराजे भोसले यांचा उल्लेख उदयन असा एकेरी करता...! एकेरी उल्लेख करण्याएवढी आपली पात्रता आहे का तपासा

In reply to by मालोजीराव

१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व संस्थाने खालसा झाली आणि तेव्हाचे सर्व मांडलिक राजे-राजवाडे खालसा झाले आणि तेव्हाच महाराज, छत्रपति, युवराज, युवराज्ञी, श्रीमंत इ. स्वयंघोषित पदे खालसा झाली. २०१३ साली अजूनही स्वतःचा उल्लेख महाराज, छत्रपति, श्रीमंत असा एकाधिकारशाहीवाचक करवून घेणे अयोग्य आहे. जेठमलानी गुन्हेगारांच्या केसेस लढवितात व त्यांच्याबद्दल (व त्यांच्यासारख्या मामाराव भिडे, कोळसे पाटिल, कपिल सिब्बल इ. वकीलांबद्दल) मला तिरस्कार वाटतो हे मी एका प्रतिक्रियेत लिहिले आहेच. पण ते अशा केसेल लढविताना उघड उघड लढवितात, अजिबात लपवाछपवी करत नाहीत. खूनप्रकरणात अटक झाल्यावर तिसर्‍या मिनिटाला हार्ट अ‍ॅटॅक आल्याचे नाटक करून २ वर्षे तुरुंगवास टाळून रूग्णालयात राहून २ वर्षांनी केस संपल्यावर तिसर्‍या मिनिटाला खडखडीत बरे झाल्याचे नाटक करणार्‍यांपेक्षा असे वकील अनेकपटींनी बरे (कै. शरद लेवे प्रकरण आठवत असेलच).

In reply to by श्रीगुरुजी

दोघांचा हि उल्लेख एकेरी केला असता तर खटकलं नसतं साहेब, पण जेठ्मलानींचा उल्लेख आदराने आणि छत्रपति उदयन राजेंचा एकेरी असं का ? राजमाता विजयाराजे शिंदे, माधवराव शिंदे (दोघेही हयात नाहीत) ज्यांच्या पायावर डोकं ठेवायच्या ती व्यक्ती तुम्ही ज्या पद्धतीने मांडताय ते थोडं हास्यास्पद वाटत नाही का ? आणि शरद लेवे केस बद्दल म्हणाल तर पूर्ण माहिती घेऊन त्याबद्दल लिहा.

In reply to by मालोजीराव

"राजमाता विजयाराजे शिंदे, माधवराव शिंदे (दोघेही हयात नाहीत) ज्यांच्या पायावर डोकं ठेवायच्या ती व्यक्ती " बापरे!

In reply to by श्रीगुरुजी

बापरे!
होय आम्हीही त्यांच्या पायावर डोकं ठेऊनच प्रणाम करतो !देशद्रोह्यांची आणि सगळ्यात महत्वाचे जेम्स लेन आणि त्याच्या प्रकाशन संस्थेची केस लढवणार्या राम जेठमलानी यांच्यापेक्षा "श्रीमंत छत्रपति उदयनराजे भोसले" केव्हाही हजारपटीने आदरणीय आहेत.

In reply to by मालोजीराव

असेल बुवा! कोणाला कोण आदरणीय वाटेल याचे काही गणित नसते. माझ्यापुरतं बोलायचं तर असा इसम आदरणीय वाटण्याची वाईट वेळ माझ्यावर येऊ नये हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना! आमेन!

In reply to by श्रीगुरुजी

कोणाला कोण आदरणीय वाटेल याचे काही गणित नसते. माझ्यापुरतं बोलायचं तर असा राष्ट्रद्रोही इसम आदरणीय वाटण्याची वाईट वेळ माझ्यावर येऊ नये हीच छत्रपति शिवरायांकडे प्रार्थना! जय भवानी जय शिवाजी!

In reply to by मालोजीराव

आदरणीय वाटण्याची वाईट वेळ माझ्यावर येऊ नये हीच छत्रपति शिवरायांकडे प्रार्थना! जय भवानी जय शिवाजी! +१

In reply to by आजानुकर्ण

"ठीक आहे. म्हणजे तीसएक वर्षे पक्षाने पाठिंबा दिलेली व्यक्ती, जी २ वेळा कॅबिनेट मिनिस्टरही झाली आहे तिचा पक्षविचारांशी काहीही संबंध नाही. असे असूनही त्या पक्षाला, त्या व्यक्तीला मंत्रीपद व संसदेचे सदस्यपद सतत द्यावेसे वाटते हे एकंदरच मला न समजणारे गौडबंगाल आहे. मात्र हा भाजपचा निर्णय असल्याने तुम्हाला कदाचित काहीही माहीत नसेल." हा भाजपचा निर्णय असल्याने ते वारंवार जेठमलानींना का तिकीट देतात हे मला माहिती नाही. पण माझा व्यक्तिगत असा अंदाज आहे की, भाजपला जेठमलानींच्या वकीली कौशल्याची गरज आहे. गुजरात दंगलीतले आरोप असलेल्या भाजप संबंधित काही जणांची वकीलपत्रे जेठमलानींनी घेतलेली आहेत. हे एक कारण असावे. दुसरे कारण असे असावे, की गुजरात संबंधात मोदींना अडकविण्यासाठी काँग्रेस जंगजंग पछाडत आहे. अजूनतरी त्यात यश आलेले नाही. पण भविष्यात यदाकदाचित एखाद्या दंगल प्रकरणात मोदींचे नाव अधिकृतरित्या आरोपपत्रात आले तर त्यावेळी जेठमलानींनी मोदींचा बचाव करावा अशी भाजपची इच्छा असेल व कदाचित यासाठीच जेठमलानी गुजरातमधून राज्यसभेवर जातात. हे माझे व्यक्तिगत अंदाज आहेत. कदाचित माझे अंदाज १०० टक्के चुकीचे असू शकतील. मला स्वतःला जेठमलानी या व्यक्तिविषयी अजिबात आदर नाही. अनेक गुन्हेगारांची वकीलपत्रे ते घेतात. जरी ते काही काळ ते अधिकृतरित्या भाजपचे खासदार असले तरी त्यांची कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नाही. ते पूर्वी शिवसेनेचे महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार होते. त्यापूर्वी १९९० मध्ये ते जनता दलात होते व चंद्रशेखरांच्या पंतप्रधानपदाला विरोध केल्यामुळे त्यांना जाहीर मारहाणही झाली होती. भविष्यात जर भाजपने त्यांना खासदार केले नाही तर ते काँग्रेस, मुस्लीम लीग, राजद, समाजवादी, बसपा अशा कोणत्याही पक्षाच्या वळचणीला जाऊन खासदारकी मिळवतील याची मला खात्री आहे. म्हणूनच मी मागे लिहिले होते की भाजपात असूनसुद्धा भाजप/संघ विचारसरणीचा व जेठमलानींचा अजिबात संबंध नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पण माझा व्यक्तिगत असा अंदाज आहे की, भाजपला जेठमलानींच्या वकीली कौशल्याची गरज आहे.
पण, पण, पण मग व्यावसायिक वकीलाला सरळ फी द्यायची ना. की मंत्री केल्याने फीचे पैसे वाचतात? नाहीतरी जेठमलानीही कोणत्याही भ्रष्ट गुन्हेगाराची केस घेतातच. भाजपाच्या गुन्हेगारांच्या केसी घ्यायला काहीच हरकत नसावी. निदान अशा प्रवृत्तीला पक्षाबाहेर ठेवल्याने पक्षावर तरी शिंतोडे उडणार नाहीत.

In reply to by आजानुकर्ण

"कपिल सिब्बल हे देखील व्यावसायिक वकील आहेत. त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांची वकीलपत्रे घेतली तर काँग्रेसच्या चारित्र्याचे विश्लेषण तुम्हाला करावेसे वाटते यामागचे कारण तुम्ही सांगू शकाल काय? की हा केवळ 'आपला तो बाब्या' प्रकारचा न्याय आहे?" नाही. मी वर जेठमलानींचे उदाहरण दिलेच आहे. पुण्यात पूर्वी कट्टर संघ प्रचारक असलेले ब. ना. उपाख्य मामा भिडे या नावाचे प्रख्यात गुन्हेगारी वकील होते. जोशी-अभ्यंकर प्रकरणातील खुन्यांचे वकीलपत्रे त्यांच्याकडे होते. सासरी छळ करून मारलेल्या मंजुश्री सारडाच्या नवर्‍याला त्यांनी आपल्या वकीली कौशल्याने निर्दोष सोडविले. अशी इतर अनेक खुन्यांची किंवा हुंड्याकरता सुनेला मारलेल्यांची वकीलपत्रे ते घेत असत. सध्या कोळसे-पाटील नावाचे एक समाजवादी गप्पा मारणारे वकील असेच होते. त्यांनी देखील मानवत हत्याकांड प्रकरणातील (यात ११ बालकांचे बळी देण्यात आले होते) मुख्य सूत्रधार उत्तमराव पाटील याला आपल्या वकीली कौशल्याने वाचविले होते. अशा सर्व गुन्हेगारांच्या पाठिराख्यांचा मला तिरस्कार वाटतो. मी कपिल सिब्बलचे उदाहरण तुमच्या पूर्वीच्या या वाक्यासंबधात दिले होते. ("कुठे आपल्या आदर्शांशी विरुद्ध असूनही देशहितासाठी लढणार्‍या आझाद हिंद सेनेची वकीलपत्रे घेणारे काँग्रेसी कुठे.") भ्रष्टाचार, गुन्हेगारी व जातीयवाद यात आकंठ बुडालेल्या २०१२ ल्या काँग्रेसची तुलना १९४५ मधल्या काँग्रेसशी करणे हे मला अतिशय विनोदी व भोळेपणाचे लक्षण वाटले. म्हणूनच २०१२ मधल्या काँग्रेसमधले वकील गुन्हेगारांना सोडवितात हे मला दाखवायचे होते व त्यासाठीच मी सिब्बलचे उदाहरण दिले.

In reply to by श्रीगुरुजी

भा.ज.पा. ने हया पासून दूरच राहायला हवे. अन्यथा भारतीय समाज भा.ज.प. ला "२ जागा दाखवेल. गांधी हत्या , गुजरात दंगल आणि बाबरी ढाचा पाडणे ही तीन भुते उतरवणारा मांत्रिक भाजपला अजूनही सापडला नाही तर पुरोहिताचे भूत त्यांनी का वागवावे ? राष्ट्रहित , राष्ट्रीय चारित्र्य हया ध्येये प्रेरित होऊन भारतीय सुशिक्षित माध्यम वर्ग कोंग्रेस च्या अपप्रचाराला आणि निधार्मंध वादाला बळी न पडता जेंव्हा संपूर्ण मतदान करेल तेंव्हा एन.डी.ए नाही तर भा.ज.प. सत्तेवर असेल. तो सोनियाचा दिवस असेल.

In reply to by मैत्र

हा हा... चांगले चेंडूदेखिल निग्रहानी तटवणारे थत्तेचचा फुल्टॉस सोडतील काय? :)

In reply to by नितिन थत्ते

म्हणून स्वतंत्र मिळून ६० वर्षे झाली तरी आपली अवस्था अशी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

काय बोललायत गुरुजी! ह्या आणि अशा बाबी जनमानसापर्यंत पुर्णतः न पोचण्याची काटेकोर खबरदारी मिडिया आणि पर्यायानं सरकारनं घेण्याचा कावा पाहून मात्र कोणतीही संघटना का रान उठवत नाही हे मात्र कळत नाही. :-(

In reply to by नेत्रेश

रा.स्व. संघ हा गेली कित्येक दशकं भारतासाठी निष्ठावान कार्यकर्ते तयार करायचं चांगलं काम करत आहे. संघाच्या कुठल्याही शाखेमधे धर्म, रंग, जात-पोटजात ह्याच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. मी जवळपास वयाच्या ८ व्या वर्षीपासुन १५ वर्ष नियमित शाखेत जातं होतो. आता २ वर्षांपासुन वेळेअभावी शाखेत नियमित जाता येतं नाही, पण जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा माझे शिक्षक, शाखा व्यवस्थापक आणि काही स्वंयंसेवकांच्या संपर्कात असतो. शाखा नक्की काय करते हे समजण्यासाठी शाखेची प्रार्थना वाचा. सुधिर फडकेंच्या आवाजातील सुरेल प्रार्थनेचा दुवा देतोय तो नक्की पाहावा. तोपर्यंत ही प्रार्थना वाचा, त्याचा अर्थ ज्याला समजेल त्यानीच सांगा अशी धेयं असणारा संघ परीवार दहशतवादी तयार करु शकेल का ते.
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।। प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।। समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।। ।। भारत माता की जय ।।
हा सुधिर फडकेंच्या आवाजातील प्रार्थनेचा तुनळीचा धागा. http://www.youtube.com/watch?v=T7fOf8rUrdw