✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अरुंधती रॉय वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा काय?

ब
बाळकराम यांनी
गुरुवार, 02/14/2013 - 04:41  ·  लेख
लेख
भारताविरुद्ध सतत गरळ ओकणार्‍या अरुंधती रॉयनी ही मात्र कमालच केलीये. ह्या नतद्रष्ट बाईला देशद्रोहाच्या, किमान राज्यद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी इतका गंभीर आणि खळबळजनक गुन्हा तीने केला आहे. तुम्हाला काय वाटतं? संतप्त- बाळकराम
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11221 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

या प्रकरणात...

श्रीरंग_जोशी
Sun, 02/17/2013 - 23:25 नवीन
या प्रकारणात (अफझल गुरू - फाशी) वैचारिक गोंधळ उडवण्यात संबंधीत दहशतवादी चांगलेच यशस्वी झाले आहेत. कुणाही दहशतवाद्याल अटक झाली की तो कसा सरळमार्गी माणूस आहे यासंबंधी बातम्या पेरल्या जातात. मराठवाड्यातल्या अबु जुंदालबद्दलही असेच पसरवले गेले. संसद हल्ला खटल्यात एस ए आर गिलानी याची सुटका झाली. पोलिसांना खोटे पुरावे तयार करून अडकवणे खरंच शक्य असते तर त्याचीही सुटका झाली नसती. सत्र न्यायालयात एक वेळ कमी अधिक झाले असेलही. पण उच्च व सर्वोच्च न्यायालय फाशीच्या शिक्षेच्या अपीलावर काळजीपूर्वकच निकाल देत असते. तिथेही कुणावर इतक उघड उघड अन्याय होईल इतकी वाईट परिस्थिती भारतीय न्यायव्यवस्थेची कदापी नाही. आपल्या न्यायव्यवस्थेचे मूलतत्वच १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाला चुकून शिक्षा होऊ नये. अफझल गुरूबद्दल माहिती वाचून त्याच्या बुद्धिमत्तेविषयी काही शंकाच नाही. त्याने बनवलेली कथा सत्यच वाटते. बाकी केंद्रीय गॄहमंत्रालयाने थोडी कल्पकता दाखवून (उदा. तो आजारी आहे असे सांगून कुटूंबियांना दिल्लीला आणून अखेरची भेट घालून व त्यांना फाशी होईपर्यंत प्रतिबंधात्मक अटकेत ठेवून (संपर्कसाधनांपासून लांब) फाशी झाल्यावर शेवटचे दर्शन घेण्याचे संधी देऊन सोडायला हवे होते). मानवाधिकारवाल्यांना संधी द्यायला नको होती. अर्थात गृहमंत्रालयाने कुठलाही धोका न पत्करण्याचा तुलनेत सोपा पर्याय निवडला...
  • Log in or register to post comments

माझ्या माहितीप्रमाणे आणि

आळश्यांचा राजा
Mon, 02/18/2013 - 01:01 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे आणि आठवणीप्रमाणे १. अफझल गुरु हा प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी नव्हता. त्याच्यावरील आरोप हे "कट" या सदरातील आहेत. २. अफझल गुरु हा शरण आलेला दहशतवादी होता, आणि त्याच्यावर सुरक्षा दलांची/ पोलीसांची नजर असणे अपेक्षित होते. (त्यामुळे त्याने हा कट रचला असेल, तर त्याच्यावर नजर ठेवणारे लोक काय करत होते असा प्रश्न अवाजवी नाही.) ३. या आरोपींचे वकीलपत्र राम जेठमलाणी आणि शांती भूषण (टीम अण्णा फेम) या दोन नामांकित वकीलांनी (आणि माजी कायदामंत्र्यांनी) घेतले होते (विनामूल्य). अर्थात बचावाची रीतसर व्यवस्था होती. ही माझी माहिती आहे. चुकीची असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments

किंचित अधिक माहिती

विकास
Mon, 02/18/2013 - 02:58 नवीन
अफझल गुरु हा प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी नव्हता. त्याच्यावरील आरोप हे "कट" या सदरातील आहेत.
त्याने तो कटात सामील असल्याचे मान्य केले होते आणि त्या अनुंषंगाने पुरावे देखील मिळाल्याचे वाचल्याचे आठवते. एन डी टी व्ही वरील त्याची मुलाखत या संदर्भात बघण्यासारखी आहे. त्याने कुठेही "मी त्यातला नाही" असे म्हणलेले नाही. फक्त आता पश्चाताप होतो आहे पण कोण विश्वास ठेवणार असे हताश पणे म्हणलेले आहे. ज्यात तथ्य वाटते आणि एक माणूस म्हणून दुर्दैवी वाटते. खाली एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे गांधीहत्येसंदर्भात कटात सामील असल्याबद्दल आपटेस देखील फाशी झाली होती.
अफझल गुरु हा शरण आलेला दहशतवादी होता, आणि त्याच्यावर सुरक्षा दलांची/ पोलीसांची नजर असणे अपेक्षित होते.
अफझल गुरू १९९६ च्या सुमारास शरण आला होता पण मला वाटते २००० नंतर परत तो दहशतवाद्यांच्या सान्निध्यात आला होता त्यामुळे त्याचे "उलट मतपरीवर्तन" झालेले होते आणि त्या नव्याने जागृत झालेल्या त्याच्या जुन्या कॉन्शसने त्याने दिल्लीत संसदेवर आणि इतर राष्ट्रांच्या (कदाचीत अमेरीका, युरोपीय राष्ट्रांच्या) वकीलातींवर हल्ला करण्याच्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांना त्याने मदत केली होती. थोडक्यात हे राष्ट्राच्या विरोधातील युद्ध होते आणि तो नुसताच एखाद्या हत्याकांडाच्या कटात सामील नव्हता तर एका अर्थी फितूर आणि देशाचा त्याग केलेला शत्रू होता असे म्हणले तरी गैर नाही. तरी देखील त्याला आपल्या न्यायव्यवस्थेने तसे मानले नाही आणि ज्या लोकशाहीवर हल्ला करण्यास त्याने मदत केली, त्या लोकशाहीतील नियमानुसारच न्याय दिला - रेअरेस्ट ऑफ दी रेअर...
(त्यामुळे त्याने हा कट रचला असेल, तर त्याच्यावर नजर ठेवणारे लोक काय करत होते असा प्रश्न अवाजवी नाही.)
कट रचला होता हे वास्तव आहे, जे त्याने स्वतः माध्यमांना देखील सांगितले होते. अफझल गुरू हा अनेक दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी होता आणि त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्याइतकी पोलीस/गुप्तचर यंत्रणा भारतात आहे असे वाटत नाही. शिवाय जर पोलीसांना आधी कळले असते आणि त्याला अटक केले असते तर तथाकथीत मानवतावाद्यांनी काय आक्रस्ताळेपणा केला नसता असे म्हणायचे आहे का? त्या व्यतिरीक्त, जर अशी नजर ठेवणारी लोकं असतील आणि ते जर यात कमी पडले असले तर काय अफझलगुरूचा गुन्हा कमी होतो का?
या आरोपींचे वकीलपत्र राम जेठमलाणी आणि शांती भूषण (टीम अण्णा फेम) या दोन नामांकित वकीलांनी (आणि माजी कायदामंत्र्यांनी) घेतले होते (विनामूल्य). अर्थात बचावाची रीतसर व्यवस्था होती.
खरे आहे. मला वाटते या संदर्भात अरूंधती रॉय यांचे म्हणणे आहे की सरकारी वकील चांगला नव्हता. पण त्याला काही अर्थ नाही जेंव्हा असे मोठे वकील पाठीशी असतात तेंव्हा त्याला बचाव मिळाला नाही असे म्हणण्यास काही अर्थ नाही. किंचित अवांतरः शांती भूषणच्या संदर्भात माहिती नाही, पण जेठमलानींनी नक्की असले किती खटले जिंकले असावेत असा प्रश्न पडतो. सगळ्यात कुप्रसिद्ध (जिंकलेला) खटला हा मंजुश्री सारडा खून खटला होता. पण इंदीरा गांधी हत्येकरी आणि तसेच अफझल गुरूपर्यंत तत्सम इतर अनेकांचे त्यांनी खटले लढवले आहेत. त्यातील ते किती जिंकले? जर जिंकले नसले तर हे काय, "येन केन प्रकारेण..." असे म्हणायचे का? सरते शेवटी: जोशी-अभ्यंकर हत्याकांडात जक्कल, जगताप, सुतार यांच्याबरोबरच्या मुन्वर शहास देखील फाशी झाली होती. त्याने तुरूंगातून "येस आय अ‍ॅम गिल्टी" नावाचे पुस्तक लिहीले होते. त्यात शेवटी पश्चाताप झालेला आणि आता फाशी होणार याचे दु:ख झाल्याचे स्पष्ट करत लिहीले होते की "असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, असे माझ्या बाबतीत घडले आणि येस आय अ‍ॅम गिल्टी". तसेच अफझल गुरूच्या बाबतीत घडले असे म्हणता येईल... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

विकास ह्यांच्याशी १००% सहमत.

मनिष
Mon, 02/18/2013 - 14:26 नवीन
विकास ह्यांच्याशी १००% सहमत. इतका मोठा प्रतिसाद मुद्देसुद लिहायचा कंटाळा आला होता. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

आधीचे ठळक उदाहरण

रमेश आठवले
Mon, 02/18/2013 - 01:50 नवीन
नारायण आपटे हा गांधींचा खून झाला त्यावेळी घटनास्थळी हजर नसताना सुद्धा न्यायमूर्ती आत्मचरण यांनी त्याला कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून फाशीची शिक्षा दिली आणि ही शिक्षा कोणताही उहापोह अथवा दिरंगाई केल्याशिवाय अमलात आणली गेली. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी दिलेल्या निवाड्यात- " He was the brain behind the assassination conspiracy." -अशा अर्थाचे लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा