✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अरुंधती रॉय वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा काय?

ब
बाळकराम यांनी
गुरुवार, 02/14/2013 - 04:41  ·  लेख
लेख
भारताविरुद्ध सतत गरळ ओकणार्‍या अरुंधती रॉयनी ही मात्र कमालच केलीये. ह्या नतद्रष्ट बाईला देशद्रोहाच्या, किमान राज्यद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी इतका गंभीर आणि खळबळजनक गुन्हा तीने केला आहे. तुम्हाला काय वाटतं? संतप्त- बाळकराम
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11221 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

संसदेला टॉयलेट म्हटलं तरी

खटासि खट
गुरुवार, 02/14/2013 - 05:40 नवीन
संसदेला टॉयलेट म्हटलं तरी देशद्रोह ठरत नाही हे नुकतंच कोर्टाने सांगितलंय. ;) हा हल्ला ज्या वेळी झाला होता त्या वेळच्या काहींच्या मासलेवाईक प्रतिक्रिया अजून लक्षात आहेत. त्याच लोकांकडून हल्ल्याची निर्भत्सना होताना बघून डोकं काम करेनासं झालंय.
  • Log in or register to post comments

उमर अब्दुल्लांचे काय करायचे?

चिंतामणी
गुरुवार, 02/14/2013 - 08:38 नवीन
त्यांनीसुद्धा असेच तारे तोडले आहेत. यु.पि.ए.चा घटक आणि काश्मीरमधे काँग्रेससह सत्तेत असलेल्या मंत्रीमंडळाचे हे प्रमुख आहेत.
  • Log in or register to post comments

नाही

विकास
गुरुवार, 02/14/2013 - 08:47 नवीन
अरूंधती रॉय यांचे विचार मला अजिबात पटत नाहीत. त्या समाजभेदी आहेत आणि त्यांचे लेखन वाचणार्‍या पब्लीकची त्या दिशाभूल करत आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. तरी देखील ज्या लोकशाहीला डाग पडला आहे असे त्या म्हणत आहेत त्या लोकशाहीच्या तत्वानुसारच त्यांना लेखन-भाषण स्वातंत्र्य आहे. आणि ते त्यांना मिळाले पाहीजे... "I disapprove of what you say, but I will defend to the death your right to say it." - Evelyn Beatrice Hall
  • Log in or register to post comments

+१

हंस
गुरुवार, 02/14/2013 - 10:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हं...

श्रावण मोडक
गुरुवार, 02/14/2013 - 10:50 नवीन
समजा एखाद्याने या लेखनाच्या आधारे फिर्याद दिली, त्यात सकृतदर्शनी तथ्य आढळले तर अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा लागेल. तसे झाले तर, माझ्या मते, तशा स्थितीत अरुंधती रॉय यांनी त्या कारवाईला सामोरे गेले पाहिजे. तेथे या स्वरूपाच्या नकारात्मकतेला महत्त्व नसावे. कारवाईतून तावून-सुलाखून बाहेर येणे हे प्रेयस नसते, पण श्रेयस असते, दीर्घकालीन सामाजिक प्रक्रियांसाठी. अर्थात, येथे सापेक्षतेला खूप वाव आहे आणि त्यामुळे डावे-उजवे होण्याचा धोका मोठा आहे. पण नेमके तसे होऊ नये हीच नेतृत्त्वाकडून (हे नेतृत्त्व लोकप्रतिनिधींचे असेल, वा नोकरशाहीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे असेल) अपेक्षा असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१

सुनील
गुरुवार, 02/14/2013 - 10:55 नवीन
सहमत. @ विकास
I disapprove of what you say, but I will defend to the death your right to say it." - Evelyn Beatrice Hall
माझ्या माहितीनुसार, सदर अर्थाचे वाक्य वोलतैर (Voltaire) यांचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+१.

बॅटमॅन
गुरुवार, 02/14/2013 - 12:21 नवीन
+१. मीपण व्हॉल्टेअरच्या नावाखालीच ते वाक्य वाचलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

तसे नाही

विकास
गुरुवार, 02/14/2013 - 17:33 नवीन
ते वाक्य व्होल्टेअरचे आहे असा गैरसमज आहे. वास्तवीक एव्हलीन हॉलने लिहीलेल्या व्होल्टेअरच्या चरीत्रात, व्होल्टेअर कसा होता (त्याचे जीवनाचे तत्व कसे होते) हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून तीने हे वाक्य लिहीले होते. पण त्यामुळे ते व्होल्टेअरचे आहे असा गैरसमज झाला. बाकी व्होल्टेअरचे एक वाक्य मात्र आत्ता लागू होत आहे असे वाटते: history is a bag of tricks we play on the dead :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

धन्यवाद

सुनील
गुरुवार, 02/14/2013 - 18:25 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+

नितिन थत्ते
गुरुवार, 02/14/2013 - 12:30 नवीन
श्रामोंशी सहमत आहे. गांधी नेहमीच जी काय शिक्षा होईल ती भोगायला तयार असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मुद्दा वेगळा आहे

विकास
गुरुवार, 02/14/2013 - 17:38 नवीन
समजा एखाद्याने या लेखनाच्या आधारे फिर्याद दिली, त्यात सकृतदर्शनी तथ्य आढळले तर अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा लागेल. तसे झाले तर, माझ्या मते, तशा स्थितीत अरुंधती रॉय यांनी त्या कारवाईला सामोरे गेले पाहिजे.
गुन्हा नोंदवता आला तर कारवाईस सामोरे जावेच लागेल, बाई देशाच्या कायदेकानू पेक्षा मोठ्या नाहीत. पण देशाचे कायदेकानू, घटना देखील तकलादू नाही आणि मुख्य म्हणजे देश इतका दूर्बल नाही की एका लेखाला देशद्रोह म्हणावे. हा लेख म्हणजे काय, "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" पठडीतली घटना आहे का? (जरी तो प्रश्न सर्वांनाच आत्ता जास्त पडत असला तरी! ;) ) थोडक्यात विचार-लेखन-भाषण स्वातंत्र्य आहे. आता ब्रिटीश राज नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

स्वातंत्र्य

श्रावण मोडक
गुरुवार, 02/14/2013 - 18:17 नवीन
स्वातंत्र्य आहेच. त्याविषयी दुमत नाही. त्या स्वातंत्र्याचे एक मोल आहे इतकाच माझा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१

शुचि
गुरुवार, 02/14/2013 - 18:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१/-१

पुण्याचे वटवाघूळ
Sun, 02/17/2013 - 18:54 नवीन
अरूंधती रॉय यांचे विचार मला अजिबात पटत नाहीत. त्या समाजभेदी आहेत आणि त्यांचे लेखन वाचणार्‍या पब्लीकची त्या दिशाभूल करत आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
अरूंधती रॉयला आदरार्थी बहुवचन वापरावे या योग्यतेची ती नाही तेव्हा तिच्याविषयी एकेरीच उल्लेख करत आहे. ती समाजभेदी आहे वगैरे गोष्टी मान्य.
तरी देखील ज्या लोकशाहीला डाग पडला आहे असे त्या म्हणत आहेत त्या लोकशाहीच्या तत्वानुसारच त्यांना लेखन-भाषण स्वातंत्र्य आहे. आणि ते त्यांना मिळाले पाहीजे...
तरी आपल्याला हे स्वातंत्र भारतातल्या लोकशाहीने दिले आहे आणि त्या स्वातंत्र्याचा उपभोग जबाबदारीनेच घ्यायला हवा हे असल्या नतद्रष्टांना कोण कळवून देणार? संसदभवनावरचा हल्ला जर यशस्वी झाला असता तर भारतावर खूप मोठे संकट कोसळले असते.भारताच्या लोकशाहीच्या मुळावरच असा हल्ला झाल्यास असे वाटेल ते बरळायचे स्वातंत्र द्यायला ती लोकशाहीच शिल्लक राहणार नाही याची जाणीव अरूंधती रॉयला नाही का?मग कोर्टाने रितसर खटला चालवून फाशीची शिक्षा ठोठावलेल्या अफझल्याचे समर्थन ती कशी करू शकते?अशा लोकांना ती जाणीव होण्यापुरती तरी काहीतरी शिक्षा करायला हवी. तेव्हा या बयेला तिचा वाटेल ते बरळायचा हक्क मिळायला हवा याला -१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

कशाला उगाच?

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/14/2013 - 08:54 नवीन
आधीच भारतीय न्यायव्यवस्था प्रलंबित खटल्यांच्य ओझ्याने पिचून गेली आहे. अन अशा लोकांना खटला दाखल झाल्याने अधिक प्रसिद्धी मिळून त्यांचा हेतू सफल होईल.
  • Log in or register to post comments

दुर्लक्ष हेच उत्तर

प्रसाद१९७१
गुरुवार, 02/14/2013 - 11:01 नवीन
अरुंधती रॉय सारखी बांडगुळे फक्त प्रसिद्धी साठी जगत असतात. प्रत्येक गोष्टीवर काय बोलले की प्रसिद्धी मिळेल हे त्यांना पक्के माहिती असते. त्यांच्या कडे दुर्लक्ष केले तर आपोआप च ही लोक संपतील. न्यायालयात दावा ठोकला तर ह्यांना भाषणबाजी करायला मोठा फोरम च मिळेल.
  • Log in or register to post comments

लेख वाचला !

सुहास..
गुरुवार, 02/14/2013 - 11:12 नवीन
मुळात लेखात अरूंधती रॉय ला काय म्हणायचे आहे तेच कळले नाही :( एकीकडे ती पोलीस तपासाला नावे ठेवते तर दुसरीकडे बीजेपी च्या नेत्यांची सेन्टेन्स काय आहेत ते लिहीते आहे. पोलीस तपासाच्या आधारावर कोर्ट शिक्षा ठोठवते , मग आरोपी कुणीही, कुठल्याही प्रांताचा, धर्माचा असला तरी न्यायदेवतेला त्याने फरक पडत नाही, आणि जर तो पडणार असेल तर तो योग्य त्या मार्गाने कोर्टापुढे ठेवावा लागतो , जनहित याचिका ई.ई. ... तिथे उसगावात बसलेलं ईन्टेलेक्च्युल किती सडलेल आहे, हेच यावरून दिसते ..असो .. जय जवान जय किसान जय शेझवान ;)
  • Log in or register to post comments

अरुंधती रॉय विचारवंत आहे.

नाना चेंगट
गुरुवार, 02/14/2013 - 12:06 नवीन
अरुंधती रॉय विचारवंत आहे.
  • Log in or register to post comments

च्यायला...

श्रावण मोडक
गुरुवार, 02/14/2013 - 12:20 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

(No subject)

सुहास..
गुरुवार, 02/14/2013 - 13:54 नवीन
;)
  • Log in or register to post comments

हाच लेख "हिंदू" दैनिकात १०

श्रीगुरुजी
गुरुवार, 02/14/2013 - 14:12 नवीन
हाच लेख "हिंदू" दैनिकात १० फेब्रुवारी २०१३ ला छापला आहे. http://www.thehindu.com/opinion/lead/a-perfect-day-for-democracy/article4397705.ece एकच लेख दोन वेगवेगळ्या दैनिकात छापता येतो का? आपल्या प्रकाशनात छापल्या गेलेल्या लेखावर दैनिकाचा प्रताधिकार नसतो का? अरुंधती रॉय सारखे निधर्मांध प्रसिद्धीसाठी हपापलेले असतात. त्यामुळे प्रस्थापित गोष्टींना विरोध करूनच ते प्रसिद्धि मिळवितात. पूर्वी देखील रामायणातील कैकेयी, रावण, पेशवाईतील आनंदीबाई इ. ना निर्दोष सिद्ध करण्याची एक लाट आली होती. आता देखील कसाब, अफझल गुरूच्या बाजूने लिहिले की अमाप प्रसिध्दी मिळते हे त्यांना माहीती आहे. सुरवातीला अनेक वर्षे, संसदेवरील हल्ला हे वाजपेयी व अडवाणींनी रचलेले कारस्थान आहे असे ही रॉय बाई म्हणत होती. दंगल घडवून आणण्यासाठीच संघाच्याच लोकांनी गोध्रा येथे रेल्वेचा डबा पेटवून दिला, अमेरिकेत जागतिक व्यापार केंद्रावर आदळलेली विमाने हे धाकट्या बुशचे कारस्थान होते असे जावई शोध हेच निधर्मांध लावत असतात.
  • Log in or register to post comments

कोण अरुंधती रॉय ?

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/14/2013 - 15:30 नवीन
कोण अरुंधती रॉय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१.

बॅटमॅन
गुरुवार, 02/14/2013 - 17:18 नवीन
+१. एक नंबरची मूर्खागमनी बाई आहे. तिला दुर्लक्षाने मारणे हेच योग्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

मालोजीराव
गुरुवार, 02/14/2013 - 17:38 नवीन
कोण अरुंधती रॉय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरुंधती रॉय विचारवंत आहे.

नानबा
गुरुवार, 02/14/2013 - 15:33 नवीन
अरुंधती रॉय विचारवंत आहे.
मग इम्रान हाशमी ब्रह्मचारी साधू आहे, आशिष नेहरा जलदगती गोलंदाज आहे, आणि युपीए सरकार अत्यंत सज्जन नेत्यांनी भरलेलं आहे... :D
  • Log in or register to post comments

वारलो !!

वाह्यात कार्ट
गुरुवार, 02/14/2013 - 18:37 नवीन
वाचून वारलो !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

दुर्लक्ष स्वातंत्र्य

रमेश आठवले
गुरुवार, 02/14/2013 - 17:14 नवीन
दोन वेळा परीक्षण करून सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम केली.कायद्यानुसार ह्याच्या नंतर फक्त राष्ट्रपति यांना आपल्याला जास्त अक्कल आहे असे दाखवण्याचा अधिकार आहे. इतरांनी असे उद्योग केले तर तो फक्त मतस्वातंत्र्य या अधिकाराचा दुरुपयोग आहे. यावर दुर्लक्षस्वातंत्र्य या मुलभूत अधिकाराचा सर्व माध्यमे आणि नागरिक यांनी उपयोग केला पाहिजे.. अन्नुलेखाने मारणे हा एक प्रभावी उपाय आहे.
  • Log in or register to post comments

हे कधीचे असावे?

पैसा
गुरुवार, 02/14/2013 - 18:00 नवीन
आता फेसबुकवर एकाने हा फोटो शेअर केलेला पाहिला.यासिन मलिकबरोबर अरुंधतीबाई. Image removed.
  • Log in or register to post comments

च्यायला !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/14/2013 - 18:12 नवीन
आता हा यासिन मलिक कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हाहा खरय!!!

शुचि
गुरुवार, 02/14/2013 - 18:19 नवीन
हाहा :) खरय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

JKLF

पैसा
गुरुवार, 02/14/2013 - 18:21 नवीन
JKLF च्या एका तुकड्याचा नेता आणि माजी अतिरेकी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ओह्ह !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/14/2013 - 18:27 नवीन
JKLF च्या एका तुकड्याचा नेता आणि माजी अतिरेकी.
अच्छा ! म्हणजे चांगले माननीय व्यक्तिमत्व आहे म्हणा की. पण माजी अतिरेकी म्हणजे ? आता दुसरा व्यवसाय निवडलाय, निवडून आलेत का गचकले ? नाही मिपावरती श्रद्धांजलीचा किंवा आनंद व्यक्त करा असा सुचवणारा धागा दिसला नाही म्हणून ही चौकशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

यातले काही नाही

पैसा
गुरुवार, 02/14/2013 - 18:42 नवीन
एअरफोर्सच्या ४ ऑफिसरांना मारल्यानंतर आता शांततेचा मार्ग पकडला आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छान !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/14/2013 - 18:53 नवीन
हिंदू दहशतवादी देखील ह्यांचा आदर्श घेतील तो सोनीयाचा दिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आँ? कोटी की उपरोध की अजून

बॅटमॅन
गुरुवार, 02/14/2013 - 18:58 नवीन
आँ? कोटी की उपरोध की अजून काही? (गोंधळलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ब्याटम्यान भौ

अस्वस्थामा
गुरुवार, 02/14/2013 - 21:16 नवीन
कोटी की उपरोध की अजून काही?
ब्याटम्यान भौ, आज काल परा फारच गूढ गूढ प्रतिसाद देऊ लागालाय नाही का ? लय विचार करावा लागतोय समजून घ्यायला.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बाई डाएटवर आहेत काय????? काही

प्यारे१
गुरुवार, 02/14/2013 - 18:21 नवीन
बाई डाएटवर आहेत काय????? काही नाही. खंगल्यात म्हणून विचारलं. बाकी गुन्हा कोण दाखल करणार आहे म्हणे बाळकराम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

संक्रात

विकास
गुरुवार, 02/14/2013 - 18:49 नवीन
संक्रातीच्या कार्यक्रमातून बाई बाहेर आल्या आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगदी!

पैसा
गुरुवार, 02/14/2013 - 20:27 नवीन
हा "तिळगुळ घ्या गोग्गोड बोला" कार्यक्रम २००५ सालचा आहे. तेव्हापासून त्यांची या गरीब बिचार्‍या लोकांशी मैत्री आहे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

शब्दप्रयोग...

विकास
गुरुवार, 02/14/2013 - 20:53 नवीन
संक्रातीच्या वेळेस लुटण्याचा कार्यक्रम असतो. त्याला लुटणे का म्हणत असावे हे वेगळ्याच कारणाने समजले. वरचा फोटू बघताना, काश्मीर लुटण्याचा कार्यक्रम करत देशावर संक्रात आणण्यास मदत करणे चालू आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कसला ठरकी दिसतोय तो मलिक.

बॅटमॅन
Mon, 02/18/2013 - 14:07 नवीन
कसला ठरकी दिसतोय तो मलिक. ईस्स %)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बदमाश

मनोरा
गुरुवार, 02/14/2013 - 20:17 नवीन
बाई फार बदमाश आहे. भारताचे दुर्दैव आहे. काय म्हणनार अजुन>
  • Log in or register to post comments

फक्त २ वर्षे वाट पहा म्हणावं

बापू मामा
Sat, 02/16/2013 - 15:26 नवीन
फक्त २ वर्षे वाट पहा म्हणावं अरुंधतीबाईना. रेल्वे सुरु झाल्यावर श्रीनगरचे पटना होते कि नाही ते पहा.
  • Log in or register to post comments

ऑं ?

चौकटराजा
Sat, 02/16/2013 - 16:22 नवीन
श्रीनगरचे पटना की श्रीनगरची मुंबई ...... ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू मामा

श्रीनगरची मुंबई

परिकथेतील राजकुमार
Sat, 02/16/2013 - 16:41 नवीन
श्रीनगरची मुंबई
चला, मग ताबडतोब 'अकबरसेना' किंवा 'श्रीनसे' ह्या पक्षांची नोंदणी करून ठेवायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हो विचारवंतच !

हारुन शेख
Sat, 02/16/2013 - 17:14 नवीन
प्रस्थापित विचार तपासून बघण्यासाठी अरुंधती रॉय, बशारत पीर, अंगना चटर्जी हे विचारवंत कसोटीच्या दगडासारखे महत्वपूर्ण आहेत. आणि लोकशाहीत त्यांची खरोखर गरज आहे. सध्याच्या बर्यापैकी सवंग पत्रकारितेच्या जमान्यात आणि सुमारसद्दी कळसाला पोचलेली असतांना रॉयबाई नेहमीच वेगळ्या दृष्टीकोनातून परिस्थितीचे विश्लेषण करत असतात. कोणास पटो न पटो, प्रसिद्धी मिळो की कुप्रसिद्धी त्यांना जे वाटते ते त्या निर्भीडपणे मांडतात.एका विचारवंताची हीच तर ओळख असते. अफजल गुरू खटल्याबद्दलचे त्यांचे आक्षेप जर योग्यरित्या खोडून काढता आले तर त्यातून आपलीच कायदा आणि न्यायव्यवस्था उजळ होईल. हा एक रोचक लेख.
  • Log in or register to post comments

अरुंधती रॉय आणि बेगडी मानवतावाद

बाळकराम
Sun, 02/17/2013 - 16:34 नवीन
हारुन शेखजी, अरुंधती बाईंनी काही विरोधी मत व्यक्त केलंय म्हणून हा राग नाही तर ज्या बेजबाबदार पणे आणि बेछूटपणे ते आरोप केले आहेत त्याचे स्वरूप भारताच्या लोकशाहीप्रधान आणि सांविधानिक प्रजासत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न म्हटला जाऊ शकतो. अरुंधती बाईंनी मांडलेले काही मुद्दे: १. अफजल गुरु ला प्रतिवादाची पुरेशी संधी देण्यात आली नव्हती २. अफजल गुरु वरचे आरोप पूर्णपणे साबित झाले नव्हते. ३. अफजल गुरु चा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नव्हता. अफजल गुरु ने भारताच्या संसदेवर २००१ मध्ये हल्ला केला आणि २००२ मध्ये त्याच्यावर खटला उभा राहिला. त्याच्यावर रीतसर खटला भरुन आरोप मांडले गेले आणि न्यायालयात ते सिद्धही झाले. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर त्याला राष्ट्रपतींकडे अपील करण्याची संधी देखील दिली गेली. एक भारतीय नागरीक म्हणून जेवढ्या जेवढ्या न्यायिक सुविधांचा तो हक्कदार होता त्या सर्व त्याला उपलब्ध केल्या गेल्या होत्या. ( आणि हे लक्षात घ्या, हे सगळे कुख्यात दहशतवाद्याला दिले जात आहे). थोडक्यात, न्यायालयीन प्रक्रिया निर्दोष होती असं नक्कीच म्हणता येइल. अरुंधती बाईंना ती नीट पार पाडली जात नाहीये किंवा त्या बिचार्‍यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटत होतं तर त्याविषयी काहीतरी करायची संधी त्यांना गेल्या १२ वर्षात जरूर होती. त्यांनी त्याची बाजू घेऊन भांडण्याची धमक तेव्हा का दाखवली नाही- एव्हढा जर पुळका होता तर? अफजल गुरुने संसदेवर केलेला हल्ला हा कुठल्याही देशात त्या देशाविरुद्ध छेडलेले युद्धच मानले जाते आणि म्हणून तो या देशाचा शत्रू ठरतो. अशा भयंकर शत्रूला देखील त्याच्या बाजूने युक्तिवाद करण्याची संधी दिली गेली आणि रीतसर न्याय दिला गेला. एक लोकशाहीप्रधान देश म्हणून भारताची ही कृती निश्चितच अभिमानास्पद होती (भलेही त्याला लागलेला वेळ आणि खर्च हा एक वादाचा मुद्दा असेल). आणि अरुंधती बाईंनी या लेखाद्वारे आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करायचा प्रयत्न करुन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करुन भारताच्या शत्रूला मदतच केली आहे. त्यामुळे, शत्रूचा मित्र तो शत्रू या न्यायाने अरुंधती बाई देशद्रोही आणि राज्यद्रोही ठरतात. यात त्यांच्या घटनात्मक अधिकारांचा (भाषण आणि लेखनस्वातंत्र्याचा) संकोच होत नाही तर उलट या अधिकारांचा दुरुपयोग (देशहितविरोधी) होतो. अफजल गुरू खटल्याबद्दलचे त्यांचे आक्षेप जर योग्यरित्या खोडून काढता आले तर त्यातून आपलीच कायदा आणि न्यायव्यवस्था उजळ होईल. हा एक रोचक लेख मुळात त्यांनी स्वतः त्यांचे आक्षेपांना काही आधार वा पुरावा दिलेला नाहीये त्यांच्या लेखात, तो दिला असता तर ते खोडून काढण्याची तसदीसुद्धा घेतली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

"प्रस्थापित विचार तपासून

श्रीगुरुजी
Mon, 02/18/2013 - 10:27 नवीन
"प्रस्थापित विचार तपासून बघण्यासाठी अरुंधती रॉय, बशारत पीर, अंगना चटर्जी हे विचारवंत कसोटीच्या दगडासारखे महत्वपूर्ण आहेत. आणि लोकशाहीत त्यांची खरोखर गरज आहे. " जर अरूंधती रॉय विचारवंत असेल तर, दिग्विजय सिंग हा महान विचारवंत समजला पाहिजे. सातत्याने खोटे बोलत राहणे व नियमितपणे आचरट उद्गार काढत राहणे ही विचारवंतांची लक्षणे नव्हेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हारुन शेख

किंचित सुधारणा...

विकास
Sat, 02/16/2013 - 18:24 नवीन
प्रस्थापित विचार तपासून बघण्यासाठी अरुंधती रॉय, बशारत पीर, अंगना चटर्जी हे विचारवंत कसोटीच्या दगडासारखे महत्वपूर्ण आहेत.
  • Log in or register to post comments

हम्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Sat, 02/16/2013 - 18:36 नवीन
एका 'विचारवंती' प्रतिक्रियेत असे फेरबदल केलेले पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. निर्भिड परा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा